घाईची वेळ
होई गुडगुड | जोरदार कळ ||
बहूतेक मिसळ | कालची ||
भरली बादली | घातली स्लिपर ||
उभे लायनीच्या | शेवटाशी ||
सगळे गप्पांत | रमत गमत ||
आमचाच प्राण | कंठाशी ||
घामाघूम झाला | सदरा फार ||
गाठही गुंतली | लेंग्याची ||
दहा भाडेकरु | एकची संडास ||
उद्धारली नाती | मालकाची ||
अखेरीस आला | आमचा नंबर ||
लाईनही मागे | वाढलेली ||
केली लगबग | घुसलो आत||
झाली शांती | आत्म्याची ||
उद्याही पुन्हा | असेलच घाई ||
लावेन नंबर | प्रभाती ||
-कवी शाहरुख
प्रतिक्रिया
22 Dec 2009 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छी छी छी ... अतिशय ही&ही विडंबन! आणि हो, शीर्षक वृत्तात बसवण्यासाठी "घाईची वेळ" ऐवजी "घाईची ही वेळ" असं करायला हरकत नाही.
अदिती
22 Dec 2009 - 1:08 pm | टारझन
=)) =)) =)) =))
बाई-बाटली ते डायरेक्ट संडासा पर्यंत विडंबणाची वाढलेली बँडविड्थ पाहून परमसंतोश झाला ... ! जियो शारुक !
- सलमान
22 Dec 2009 - 1:13 pm | llपुण्याचे पेशवेll
दहा भाडेकरु | एकची संडास ||
उद्धारली नाती | मालकाची ||
हे कडवे काळजाला भिडले. चित्रदर्शी आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
22 Dec 2009 - 1:14 pm | पर्नल नेने मराठे
अगदी गिरगाव आठवले 8|
(गिरगावकर) चुचु
22 Dec 2009 - 1:17 pm | टारझन
हॅहॅहॅ .. तेच ना ते .. स्लमडॉग करोडपती मधलं .. जेंव्हा जमाल अमिताभ बच्चन ला भेटण्यासाठी एक जब्बरदस्त स्टंट करतो ते ? =))
- ड्रेनेजवडी
22 Dec 2009 - 1:18 pm | मदनबाण
घामाघूम झाला | सदरा फार ||
गाठही गुंतली | लेंग्याची ||
आरा रा रा... हा तर मोठा लोचा !!! ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
22 Dec 2009 - 7:31 pm | प्रकाश घाटपांडे
||
सज्जन हो आमचा विल्याष्टीकचा आग्रह असतो तो या साठीच. योग्य वेळी गुरुशंकानिरसन झाले कि काय रिलीफ अस्तो. व्हॉट अ रिलिफ ! व्हॉट अ रिलिफ!
गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! गो अॅण्ड डु!
मागच्या म्हैन्यात जयपुर ला चोखीदानीला गेल्तो तव्हाच अनुभव घेत्ला ब्वॉ! अवो गुरुशंकानिरसनगृहच सापडानी कुड! यकदाच सापाल्ड बर गर्दी नवती नाई त वांदे! बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Dec 2009 - 7:48 pm | jaypal
गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! डु एनी व्हेअर.. डुडु....डु ना ;-)
बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय! जबरा, सालीड, लै आवडल
चाळीत लै वर्स आनुभवलया.
कविता आवडली हे वेगळ सांगायला हव का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयेंद्र पाटील, मुळगाव मु.पो. बेडग ,जि.सांगली सध्या वास्तव्य ठाणे