कोकण दर्शन - दिवेआगरातील शिल्पसौदर्य-भाग २

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
9 Dec 2010 - 3:03 pm

कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १

दिवेआगर प्रसिद्ध आहे ते येथील सुवर्ण गणेश मुखवट्यासाठी व सुंदर, शांत समुद्रासाठी, पण त्याहूनही खूप खूप सुंदर असे एक शिल्पनवल येथे आहे हे बर्‍याच जणांना माहितीही नसेल. ते आहे रूपनारायण मंदिर. अहं, मंदिर नव्हे तर श्रीरूपनारायणाची मूर्ती. रूपनानारायणाच्याच जोडीला सुंदरनारायणही आहे.
आम्ही सुवर्णगणेशाचे दर्शन घेउन निघालो व समुद्रकिनार्‍याला अगदी लागूनच असलेल्या या मंदिरांपाशी येउन पोहोचलो. लहान असलेल्या या मंदिरांचा सध्या जिर्णोद्धार चालू आहे. पहिले छोटेसे मंदिर आहे ते सुंदरनारायणाचे. ही श्रीविष्णूची चतुर्भुज मुर्ती आहे. सुंदरनारायणाचे दर्शन घेतले व आम्ही रूपनारायणाच्या गाभार्‍यात प्रवेश केला व अवाक होउन मुर्तीकडे पाहातच राहीलो. ९/१० वा शतकातील शिल्पकाराची अद्भुत कलाच आम्ही पाहात होतो. एकाच अखंड शिळेतून घडवलेली ही दाक्षिणात्य शैलीची विष्णूमुर्ती अत्यंत भरजरी दागिन्यांनी नटलेली आहे. हे दागिनेही आहेत ते त्याच शिळेतून घडवलेले. ही पण चतुर्भुज मुर्ती असून चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म कोरलेले आहे.सबंध मुर्तीभोवती दशावतारातील अवतार कोरलेले आहेत. तेही अगदी ठळकपणे. प्रत्येक अवतारांनाही शिलामय दागिन्यांचा साज चढवलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही देखणी मूर्ती शिलाहारकालीन आहे. शिलाहार राजे स्वत:पुढे रूपनारायणभक्त असे बिरूद लावत. या अश्या प्रकारच्या मुर्ती भारतात फक्त २/३ ठिकाणीच आहेत. त्यापैकी एक दिवेआगरात आहे आणि तीही दुर्लक्षित.
रूपनारायणाचे मनोभावे दर्शन घेउन आम्ही निघालो ते श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला जाण्यासाठी. त्याविषयी पुढच्या भागात.

सुंदरनारायण व रूपनारायण मंदिर संकुल

सुंदरनारायण

रूपनारायणाची अत्यंत तेजस्वी मूर्ती

वराहअवतार

नृसिंहावतार व हिरण्यकश्यपू

कौमोदकी गदा, राम, सीता व हनुमान

बुद्धावतार व शंख

परशुराम व गरूड

शिव

श्रीरूपनारायण मुखदर्शन

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

9 Dec 2010 - 3:11 pm | ५० फक्त

खुप छान फोटो व माहिती.

अतिशय धन्यवाद, या पुढची कोकण ट्रिप दिवे आगारच आहे, त्यामुळे याचा निश्चितच फायदा होईल.

हर्षद.

अनिल आपटे's picture

9 Dec 2010 - 4:15 pm | अनिल आपटे

सुन्दर फोटो माहिती पण चांगली आहे

पुढच्या भागाची वाट पाहतो

स्पा's picture

9 Dec 2010 - 4:25 pm | स्पा

झकास

गणेशा's picture

9 Dec 2010 - 5:55 pm | गणेशा

खुप छान आहेत सारी शिल्प//
आभार ..

अवांतरः

२ दा दिवेआगार ला गेलो होतो..
हरिहरेश्वर ते दिवेआगार यांमध्ये एक गाव लागते "आरावी" म्हणुन, त्याचा बीच खुप सुंदर आहे, सहसा लोक हरिहरेश्वर आणि दिवेआगार याच बीच वर जातात.. तेथे गर्दी असते.

आरावी ला खुप छान बीच आहे .. आणी तेथे कोणीच नसते .. एकदम फोटोतल्यासारखे चित्र आहे तेथे ..
नक्की जा तेथे पण आणि फोटो देत रहा

प्रचेतस's picture

9 Dec 2010 - 6:09 pm | प्रचेतस

आरावीचा बीच तर एकदम फॅन्टास्टिक आहे. सोनेरी वाळू, स्वच्छ समुद्र, निरव शांतता. अप्रतिमच. रस्त्याला लागूनच आहे. पण पाण्यात उतरायला जरा धोकादायकच. कारण उतार आहे.

गांधीवादी's picture

9 Dec 2010 - 6:10 pm | गांधीवादी

छान माहिती आणि फोटो.

सुन्दर फोटो !

किती प्रमाणबद्ध मुर्ती आहे ना? अन खरच तुम्ही म्हंटल्या प्रमाणे आभुषणे पण ठसठशीत ! धन्यवाद वल्लीजी!

( मी मागच्या भागात केवड्याच बन कस असत ते विचारल होत. असेल तर एखादा फोटो टाकाल?)

विसोबा खेचर's picture

9 Dec 2010 - 10:03 pm | विसोबा खेचर

माझे गुरुजी, किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर दिवेआगारचेच. त्यांच्या घरी जाणं झालं आहे..

पं अच्युतराव हे पं फिरोज दस्तुरांचे शागीर्द. करीमखासाहेबांच्या गायकीचा अच्युतरावांचा गाढा अभ्यास आहे..

असो..

फोटो व धागा दोन्ही छान..

तात्या.

पारा's picture

11 Dec 2010 - 11:57 am | पारा

दिवेआगर ला जाणे तसे बरेच वेळा झाले आहे मात्र ह्या मंदिराबद्दल माहिती नव्हती. मूर्ती खूपच सुरेख आहे. माहिती करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद !

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर !

sneharani's picture

11 Dec 2010 - 12:09 pm | sneharani

मस्त फोटो!!

श्रेयस पावणस्कर's picture

11 Dec 2010 - 12:23 pm | श्रेयस पावणस्कर

माहिती आणि फोटो उत्तम आहेत. स्थानिक लोकान्नी याचा प्रचार केला पाहिजे. कारण दोन वेळा जाउनही मला कोणी या बद्दल बोलले नव्हते.