✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकण दर्शन - दिवेआगरातील शिल्पसौदर्य-भाग २

प
प्रचेतस यांनी
गुरुवार, 12/09/2010 - 15:03  ·  लेख
लेख
कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १ दिवेआगर प्रसिद्ध आहे ते येथील सुवर्ण गणेश मुखवट्यासाठी व सुंदर, शांत समुद्रासाठी, पण त्याहूनही खूप खूप सुंदर असे एक शिल्पनवल येथे आहे हे बर्‍याच जणांना माहितीही नसेल. ते आहे रूपनारायण मंदिर. अहं, मंदिर नव्हे तर श्रीरूपनारायणाची मूर्ती. रूपनानारायणाच्याच जोडीला सुंदरनारायणही आहे. आम्ही सुवर्णगणेशाचे दर्शन घेउन निघालो व समुद्रकिनार्‍याला अगदी लागूनच असलेल्या या मंदिरांपाशी येउन पोहोचलो. लहान असलेल्या या मंदिरांचा सध्या जिर्णोद्धार चालू आहे. पहिले छोटेसे मंदिर आहे ते सुंदरनारायणाचे. ही श्रीविष्णूची चतुर्भुज मुर्ती आहे. सुंदरनारायणाचे दर्शन घेतले व आम्ही रूपनारायणाच्या गाभार्‍यात प्रवेश केला व अवाक होउन मुर्तीकडे पाहातच राहीलो. ९/१० वा शतकातील शिल्पकाराची अद्भुत कलाच आम्ही पाहात होतो. एकाच अखंड शिळेतून घडवलेली ही दाक्षिणात्य शैलीची विष्णूमुर्ती अत्यंत भरजरी दागिन्यांनी नटलेली आहे. हे दागिनेही आहेत ते त्याच शिळेतून घडवलेले. ही पण चतुर्भुज मुर्ती असून चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म कोरलेले आहे.सबंध मुर्तीभोवती दशावतारातील अवतार कोरलेले आहेत. तेही अगदी ठळकपणे. प्रत्येक अवतारांनाही शिलामय दागिन्यांचा साज चढवलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही देखणी मूर्ती शिलाहारकालीन आहे. शिलाहार राजे स्वत:पुढे रूपनारायणभक्त असे बिरूद लावत. या अश्या प्रकारच्या मुर्ती भारतात फक्त २/३ ठिकाणीच आहेत. त्यापैकी एक दिवेआगरात आहे आणि तीही दुर्लक्षित. रूपनारायणाचे मनोभावे दर्शन घेउन आम्ही निघालो ते श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला जाण्यासाठी. त्याविषयी पुढच्या भागात. सुंदरनारायण व रूपनारायण मंदिर संकुल सुंदरनारायण रूपनारायणाची अत्यंत तेजस्वी मूर्ती वराहअवतार नृसिंहावतार व हिरण्यकश्यपू कौमोदकी गदा, राम, सीता व हनुमान बुद्धावतार व शंख परशुराम व गरूड शिव श्रीरूपनारायण मुखदर्शन

Book traversal links for कोकण दर्शन - दिवेआगरातील शिल्पसौदर्य-भाग २

  • ‹ कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १
  • Up
  • कोकण दर्शन- हरिहरेश्वरात- भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5876 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

धन्यवाद

५० फक्त
गुरुवार, 12/09/2010 - 15:11 नवीन
खुप छान फोटो व माहिती. अतिशय धन्यवाद, या पुढची कोकण ट्रिप दिवे आगारच आहे, त्यामुळे याचा निश्चितच फायदा होईल. हर्षद.
  • Log in or register to post comments

दिवे आगर

अनिल आपटे
गुरुवार, 12/09/2010 - 16:15 नवीन
सुन्दर फोटो माहिती पण चांगली आहे पुढच्या भागाची वाट पाहतो
  • Log in or register to post comments

झकास

स्पा
गुरुवार, 12/09/2010 - 16:25 नवीन
झकास
  • Log in or register to post comments

खुप छान आहेत सारी

गणेशा
गुरुवार, 12/09/2010 - 17:55 नवीन
खुप छान आहेत सारी शिल्प// आभार .. अवांतरः २ दा दिवेआगार ला गेलो होतो.. हरिहरेश्वर ते दिवेआगार यांमध्ये एक गाव लागते "आरावी" म्हणुन, त्याचा बीच खुप सुंदर आहे, सहसा लोक हरिहरेश्वर आणि दिवेआगार याच बीच वर जातात.. तेथे गर्दी असते. आरावी ला खुप छान बीच आहे .. आणी तेथे कोणीच नसते .. एकदम फोटोतल्यासारखे चित्र आहे तेथे .. नक्की जा तेथे पण आणि फोटो देत रहा
  • Log in or register to post comments

गेलो होतो

प्रचेतस
गुरुवार, 12/09/2010 - 18:09 नवीन
आरावीचा बीच तर एकदम फॅन्टास्टिक आहे. सोनेरी वाळू, स्वच्छ समुद्र, निरव शांतता. अप्रतिमच. रस्त्याला लागूनच आहे. पण पाण्यात उतरायला जरा धोकादायकच. कारण उतार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

छान माहिती आणि फोटो.

गांधीवादी
गुरुवार, 12/09/2010 - 18:10 नवीन
छान माहिती आणि फोटो.
  • Log in or register to post comments

सुन्दर फोटो ! किती प्रमाणबद्ध

स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 18:20 नवीन
सुन्दर फोटो ! किती प्रमाणबद्ध मुर्ती आहे ना? अन खरच तुम्ही म्हंटल्या प्रमाणे आभुषणे पण ठसठशीत ! धन्यवाद वल्लीजी! ( मी मागच्या भागात केवड्याच बन कस असत ते विचारल होत. असेल तर एखादा फोटो टाकाल?)
  • Log in or register to post comments

माझे गुरुजी, किराणा घराण्याचे

विसोबा खेचर
गुरुवार, 12/09/2010 - 22:03 नवीन
माझे गुरुजी, किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर दिवेआगारचेच. त्यांच्या घरी जाणं झालं आहे.. पं अच्युतराव हे पं फिरोज दस्तुरांचे शागीर्द. करीमखासाहेबांच्या गायकीचा अच्युतरावांचा गाढा अभ्यास आहे.. असो.. फोटो व धागा दोन्ही छान.. तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पारा
Sat, 12/11/2010 - 11:57 नवीन
दिवेआगर ला जाणे तसे बरेच वेळा झाले आहे मात्र ह्या मंदिराबद्दल माहिती नव्हती. मूर्ती खूपच सुरेख आहे. माहिती करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सुंदर !

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 12:01 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 12/11/2010 - 12:09 नवीन
मस्त फोटो!!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

श्रेयस पावणस्कर
Sat, 12/11/2010 - 12:23 नवीन
माहिती आणि फोटो उत्तम आहेत. स्थानिक लोकान्नी याचा प्रचार केला पाहिजे. कारण दोन वेळा जाउनही मला कोणी या बद्दल बोलले नव्हते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा