कोकण दर्शन- हरिहरेश्वरात- भाग ३

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
11 Dec 2010 - 9:53 am

कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १
कोकण दर्शन - दिवेआगरातील शिल्पसौंदर्य-भाग २

दिवेआगरच्या रूपनारायणाचे दर्शन घेउन निघालो ते श्रीवर्धन, हरिहरेश्वरला जायला. वाटेत भरडखोल, शेखाडी(आरडीएक्स)ही गावे लागतात. श्रीवर्धनपर्यंत रस्ता समुद्रकिना‌‍र्‍याशी लगट करूनच जातो. मध्येच घाटरस्ता, उजवीकडे डोंगरकडा आणि डावीकडे खाली समुद्र असा अप्रतिम नजारा दिसतो. श्रीवर्धनाच्या अलीकडे आरावीचा एक अतिशय सुंदर असा बीच आहे. अगदी रस्त्याला जोडूनच पुर्ण निर्जन असा तो सोनेरी वाळूचा अप्रतिम किनारा आहे. गाडी सोडून खुशाल वाळूत जाउन पडा. समुद्रकिनार्‍याचे फोटो काढून आम्ही श्रीवर्धनला आलो. माडापोफ़ळींनी श्रीवर्धन नटलेले आहे. तिथून निघालो ते श्रीहरिहरेश्वरला जाण्यासाठी. वाटेत एक कमलपुष्पांनी भरलेले सुंदरसे बांधीव तळे लागले. पुष्कळच्या पांढर्‍या कमळांमध्ये मधूनच एखादे लाल कमळ फ़ुललेले दिसत होते. तिथून निघालो आणि दाखल झालो ते दक्षिण काशी हरिहरेश्वरात. हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत. मंदिराची शैली पेशवेकालीन आहे. लाकडी सभामंडप वगैरे. समुद्रात घुसलेल्या डोंगरावरच हे मंदिर बांधलेले आहे. आता हरिहरेश्वराची सुप्रसिद्ध प्रदक्षिणा करायचे ठरवले व मंदिरामागील पायर्‍या चढून माथ्यावर आलो. आता समोर एक तीव्र उताराची खिंड होती. खाली समुद्र होता. उतरायला मूळच्या कोरीव व आता नव्याने बांधून काढलेल्या पायर्‍या आहेत. खाली उतरलो. समुद्राच्या निकट आलो. हरिहरेश्वराचा हा प्रदक्षिणा मार्ग म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक आश्चर्यच आहे. डोंगराचा अख्खा कडाच समुद्राच्या लाटांनी कापून काढला आहे. व सतत लाटांचा मारा करून खडकांवर चित्रविचित्र कलाकुसर केलेली आहे. कधी खडकांना जाळीदार नक्षी, तर कधी मोठ्या भेगा व खळगे तर कधी कासवासारखे दिसणारे खडक. व बाजूला उसळणारा रौद्र समुद्र. हा मार्ग हरिहरेश्वराला अर्धवर्तुळाकार प्रदक्षिणा घालून परत मंदिरापाशी जातो, भरती-ओहोटीच्या वेळा पाहूनच प्रदक्षिणा घालणे इष्ट. पण हरिहरेश्वरला येउन प्रदक्षिणा न घालणे म्हणजे रायगडावर जाउन शिवसमाधीचे दर्शन न घेण्यासारखे आहे.
खडकाळ असल्याने अर्थातच इथला समुद्र अतिशय धोकादायकच आहे. तेव्हा पाण्यात न उतरलेलेच चांगले. पोहायला जवळचे श्रीवर्धन, दिवेआगर आहेतच. हरिहरेश्वराचे दर्शन घेउन निघालो ते परत श्रीवर्धनला आलो. स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा डोळे भरून पाहीला व म्हसळा मार्गे काशिदला जाण्यासाठी निघालो. त्याविषयी पुढच्या भागात.

आरावीच्या अलीकडे दिसलेले एकूटवाणे झाड-

आरावी समुद्रकिनारा-

कमळतळे-

हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्ग-

कापलेले खडक-

नक्षीदार जाळी-

सुप्रसिद्ध टर्टल रॉक उर्फ कासव खडक-

प्रदक्षिणा मार्ग-

धोकादायक किनारा-

श्रीवर्धन शांत, सुंदर, सुरक्षित समुद्रकिनारा-

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Dec 2010 - 10:01 am | यशोधरा

मस्त फोटो.

उधाच निघालो

sneharani's picture

11 Dec 2010 - 11:12 am | sneharani

मस्त फोटो.

विलासराव's picture

11 Dec 2010 - 11:24 am | विलासराव

फोटो आहेत मालक.

पारा's picture

11 Dec 2010 - 12:04 pm | पारा

लई भारी !
आठवणींना उजाळा दिलात !

यकु's picture

11 Dec 2010 - 3:02 pm | यकु

सगळे फटू जब्राट्ट!!!!!

स्पा's picture

11 Dec 2010 - 3:05 pm | स्पा

एक्दाम झकास

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Dec 2010 - 12:00 am | निनाद मुक्काम प...

छान फोटो व उत्तम सरळ सोपे लेखन
कोकणची माणसे साधीभोळी
असे गोमु माहेरला.... मधील गाण्याची ओळ आहे
.तुमचे लेखनात त्याच साधेपणाचा अंश जाणवतो .
( केरळ सारख्या कम्युनिस्ट राज्याने पर्यटनात मोठी मजल मारली आहे .पण मुंबईपासून जवळ असणाऱ्या कोकणाचा पर्यटन विकास कधी होणार ?

मस्त मस्त मस्त ,बसल्या कोकनात गेलेय असे वाट्ले झक्कास !

शिल्पा ब's picture

15 Dec 2010 - 1:11 am | शिल्पा ब

मस्त फोटो...खास करून प्रदक्षिणा मार्ग आवडला...स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा...एकदम दिलखुश..

प्राजु's picture

15 Dec 2010 - 3:01 am | प्राजु

सुरेख!!