कोकण दर्शन- काशिद समुद्र- भाग ४
हा भाग टाकायला जरासा उशीरच झाला. त्याबद्दल क्षमस्व.
आधीच्या भागांसाठी-
कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १
कोकण दर्शन - दिवेआगरातील शिल्पसौंदर्य-भाग २
कोकण दर्शन- हरिहरेश्वरात- भाग ३
श्रीवर्धनवरून निघालो ते म्हसळा मार्गे मुरुड-काशिद मार्गाला लागलो. वाटेत अनेक मत्स्यतळी दिसली. दिघीच्या मधल्या मोठ्या खाडीमुळे हा पल्ला तसा लांबचा आहे. मुरुडच्या जवळ आगरदांडा हे गाव आहे. तिथून जंजिर्याचे भव्य दर्शन झाले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. मुरुडला पोहोचलो. थोडे पुढे नवाबाचा भव्य राजवाडा दिसला. पाठीमागेच अथांग समुद्र. नांदगाव मागे टाकून काशिदला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. हॉटेलची खोली ताब्यात घेतली. जेवण केले व रात्री ११ च्या पुढे सर्वजण किनार्यावर आलो. चंद्र नसल्यामुळे पूर्ण काळोख होता त्यामुळे तारामंडलांचे सुंदर दर्शन होत होते. समुद्र अतिशय गूढ भासत होता. मध्येच लाटा चमकत होत्या. भरीला समुद्राची गाज. पूर्णपणे निर्जन. तास, दीडतास गप्पा मारून खोलीवर आलो. झोपलो.
सकाळी लवकर उठून किनार्यावर. सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसत होते. ढगांनी आकाशात मस्त फेर धरला होता. पाठीमागे फणसाडचे गच्च रान. एक वॉक घेउन परत खोलीवर. पोहे खाउन परत किनार्यावर डुंबायला.
काशिदचा किनारा बहुधा उत्तर कोकणातला सर्वोत्तम किनारा असावा. एकदम पांढरा शुभ्र, थोडाफार उंचसखल असा. पण तसा सुरक्षित. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लाटा. खूप मोठ्या उंचीच्या लाटा. आपण गुढघाभर पाण्यात उभे राहीलो तरी आपल्याला चिंब भिजवून टाकणार्या. पाण्यात भरपूर खेळलो. इथे वॉटर स्पॉर्टस पण सुरु झालेत. बंपरची थरारक राईड घेतली. एका मोटारबोटीला बांधलेला हवेचा तराफा. त्यावर दोर्या धरून पडून राहायचे पुढे मोटारबोट वेगाने चाललेली असते व आपण मागे बंपरवर लाटांवर उड्या मारत मारत. एकदम जबरदस्त अनुभव.
३/४ तास पाण्यातच होतो. पण नंतर सगळे जण नाईलाजाने बाहेर आलो. आवरायला घेतले व संध्याकाळी निघालो ते नागाव-अलिबाग-पेण-खोपोलीमार्गे पुण्याला.
म्हसळा-मुरुड मार्गावरील मत्स्यतळे
काशिदचा पांढराशुभ्र किनारा
बंपर बोट
समुद्रपक्षी
समाप्त
काशिदचा पांढराशुभ्र किनारा
समाप्तBook traversal links for कोकण दर्शन- काशिद समुद्र- भाग ४
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लई भारी!
सहमत आहे
खरे आहे!
शेवटचे दोन फोटू जाम आवडले
वा वा वा काय फोटु! मस्तच
व्वा वल्ली तुम्ही माझ्या
पाच्वा अन सातवा फोटो अगदी
प्रकृती रिसोर्ट
>>>रहायला प्रकृती रिझॉर्ट छान
काशीद बिच रॉक्स ... वल्ली चे