कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. उत्तर ध्रुवावरची अस्वलं आणि सील मासे मारून, संशोधन करता करता जेवढा वेळ मिळतो त्यात त्याने वानगीदाखल काही नावे ठरवली आहेत. ती खाली दिली आहेत.
धमाल मुलगा - कमाल मुलगा
परिकथेतील राजकुमार - नारिकथेतील खाजकुमार
राजेश घासकडवी - माजेश घरबुडवी
३_१४ विक्षिप्त आदिती - ६_२८ रोजची फजिती
मुक्तसुनीत - क्लिष्टखनिज
छोटा डॉन - खोटा मॅन
यशवंत एकनाथ - नाशवंत फेकनाथ
मिसळभोक्ता - कुसळठोक्ता
विसोबा खेचर - आला ना ढेकर
गांधीवादी - सांदीपादी
बेसनलाडू - वेसणसोडू
क्रेमर- शेमर
चिंतातूर जंतू - सेम
अर्धवट - सेम
पिवळा डांबिस - सेम
इंद्रराज पवार - खिन्नराज गवार
गगनविहारी - छगनबिहारी
रेवती - जेव की
शरदिनी उर्फ भडकमकर मास्तर - भरडीनी उर्फ आधीकर मग निस्तर
क्लिंटन - खुंटण
विलासराव - गिलासराव
अविनाश कुलकर्णी - सत्यानाश खुदकर्णी
आनंदयात्री - रतनखेत्री
बिपिन कार्यकर्ते - लपुन कार्यमार्ते
लीमाऊजेट - शीमाऊखेट
फारएन्ड - कर-की-एन्ड
नंदन - चंदन
अवलिया-मवालिया
नगरीनिरंजन - बेगडीअमृतांजन
पाषाणभेद - भीषण नेट
गंगाधर मुटे - धरधर सुटे
आळशांचा राजा - नस्ता बोजा
इंटरनेटस्नेही - बावळट हा:ही:
शिल्पा ब - बस्की उगं
विकास - भकास
Nile- Null & Void
Pain - In Vein
यानुसार बाकीची राहिलेली नावे सुचवल्यास मंड्ळ आभारी राहिल.
प्रेरणा: या धाग्यात दिलेल्या प्रतिसादातील राजेश.घासकडवी यांचा "बडबडबिहारी" हा शब्द.
प्रतिक्रिया
30 Nov 2010 - 12:54 pm | आनंदयात्री
आयला !! रतनखेत्री काय राव ?
बाकी "चंदन" विषेश आवडले ;)
30 Nov 2010 - 1:35 pm | नरेशकुमार
माझ नाव, का नाहि. ?
30 Nov 2010 - 11:21 pm | रन्गराव
घाबरला तुमासनी त्यो ;)
30 Nov 2010 - 1:46 pm | अवलिया
मवालिया? मा़ह्यासारखा सज्जन माणुस अख्या अंतर्जालावर नै !!
30 Nov 2010 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार
छान लेख आहे हो खाजवंत प्राध्यापकनाथ :)
आता सुरुवात तुम्हीच केली आहेत म्हणल्यावर आता तुमच्या नावाचा जो शिमगा होईल तो बघायला आणि वाचायला उत्सुक आहे .
30 Nov 2010 - 1:56 pm | अवलिया
हा हा हा
यावरुन आठवले टारोबांनी अशाच पद्धतीने अगदी समर्पक नाव विडंबने केली होती. पण त्याचे एक चुकले त्याने ज्यांची नावे घ्यायची नाहीत अशा काही विशिष्ट नावांची विडंबने जास्त केली त्यामुळे त्याचा आयडी उडाला. असो.
30 Nov 2010 - 1:59 pm | स्पा
नाना... लिंक देता का जरा?
का तो धागा उडाला?
30 Nov 2010 - 2:03 pm | अवलिया
टारोबा समोरच्याच्या प्रतिसादाला समर्पक प्रतिसाद देण्याबद्दल विख्यात होते. तो प्रतिसाद देतांना त्याच्यात असलेल्या नावाचे सुद्धा समर्पक विडंबन करायचे. आता असे अनेक प्रतिसाद मोत्याच्या दाण्यांसारखे मिपाच्या रंगमंचावर विखरुन पडलेले असतांना त्यातला कोणता शोधुन द्यायचा हा प्रश्नच आहे. :)
30 Nov 2010 - 2:07 pm | स्पा
बघा .....द्या जमलं तर एखादा मोत्याचा दाणा...... :)
30 Nov 2010 - 2:34 pm | अवलिया
त्यांचे प्रतिसाद शोधता येत नाहीत कारण खाते उडाले आहे.. पण त्यांनी केलेले लेखन http://misalpav.com/newtracker/1157 इथे वाचा आणि लुफ्त का काय ते.. चालु द्या !
30 Nov 2010 - 2:03 pm | अवलिया
टारोबा समोरच्याच्या प्रतिसादाला समर्पक प्रतिसाद देण्याबद्दल विख्यात होते. तो प्रतिसाद देतांना त्याच्यात असलेल्या नावाचे सुद्धा समर्पक विडंबन करायचे. आता असे अनेक प्रतिसाद मोत्याच्या दाण्यांसारखे मिपाच्या रंगमंचावर विखरुन पडलेले असतांना त्यातला कोणता शोधुन द्यायचा हा प्रश्नच आहे. :)
30 Nov 2010 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
चालायचे नान्या. अरे टारोबा पडला पुण्याचा, तो औरंगबादचा असता तर भाग वेगळा :)
तुला ना आजकाल सगळे उलगडून सांगावे लागते बघ.
30 Nov 2010 - 2:36 pm | अवलिया
वय झालं पराशेट ! लवकर लवकर उमज पडत नाही..
समजा टारोबा अमेरिकेत असता तर काही फरक पडला असता का रे ?
30 Nov 2010 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार
अमेरिकेला आणि मिपाला दोन्हीला फरक पडला असता ;)
30 Nov 2010 - 2:51 pm | अवलिया
खो खो खो
हे मिपालिक्स म्हणावे काय ?
30 Nov 2010 - 1:56 pm | स्पा
आता सुरुवात तुम्हीच केली आहेत म्हणल्यावर आता तुमच्या नावाचा जो शिमगा होईल तो बघायला आणि वाचायला उत्सुक आहे
आम्ही पण......
पोपकॉर्ण हवेत का कुणाला?
30 Nov 2010 - 1:55 pm | विलासराव
विलासराव - गिलासराव
हा हा हा.
30 Nov 2010 - 6:24 pm | सूर्यपुत्र
माझे नाव काय होऊ शकेल याविषयी प्रचंड उत्सुकता आहे....
30 Nov 2010 - 6:58 pm | इंटरनेटस्नेही
इंटरनेटस्नेही - बावळट हा:ही:
मस्त! काही नावं विशेष आवडली; पण मंत्रीमंडळाची नाराजी आम्हाला ओढवुन घ्यायची नाही म्हणुन इथे क्कोट करत नाही!
-
(राज्याला स्वच्छ, पारदर्शक आणि गतिमान कारभार देण्याची क्षमता असलेला मंत्रीपदाचा इच्छुक)
आमदार ॠषिकेशराव चव्हाण (मतदारसंघ: कराड)
30 Nov 2010 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच हो... पण टार्याची सर नाय ब्वॉ!!!!
30 Nov 2010 - 9:43 pm | सूर्यपुत्र
मिसळभोक्ता - कुसळठोक्ता
श्री. टारझन यांनी "मिटरठोक्ता" असा काहीसा शब्दप्रयोग केला होता.....
30 Nov 2010 - 9:51 pm | गवि
छगन"बिहारी" ? यशवंतजी...इथे रिक़्शा चालवणे बंद केले तरीही मला बिहारी वगैरे म्हणता? मनसेच्या तोंडी देताय की काय आता? मीटरमधे बसले नाही तरी चालेल पण छगनबिहारी ऐवजी छगनमराठी म्हणा.
जय महाराष्ट्र.
30 Nov 2010 - 11:08 pm | इन्द्र्राज पवार
अहो, यशवंतराव....पवारचे 'गवार' अॅक्सेप्टेबल आहे....पण 'इन्द्रराज' चे निदान 'टंड्राराज' तरी करायचे !! कसले 'खिन्नराज' केलेत हो ? मी चार पैशाला महाग असेन, एरव्हीचे सोडा, पण आतापर्यंत कसल्याही अॅडव्हर्स कंडिशन्समध्येही 'खिन्न' राहिलेलो नाही....इतके चांगले, अभ्यासू मित्र इथे आहेत, विविधता आहे, वैचारिक दंगामस्ती चालत असते, तर अशा वातावरणात धोत्र्याच्या फुलालाही इथे हसावेसे वाटते,.....मी तर चालताबोलता खळखळणार्या रक्ताचा माणूस !
खिन्न न होताही तुम्हाला सांगू इच्छितो की शक्य झाल्यास संपादनाची कात्री चालवा त्या 'खिन्न' वर !
इन्द्रा
1 Dec 2010 - 8:21 am | स्पंदना
काय हो पाळण्यात नाव ठेवताना पण असाच दंगा केला होतात का? गप दुपट चोखत पडुन रहा , काय बदल बिदल होणार नाही. अन घुगर्या पण नाही मिळणार सांगुन ठेवते आधिच!
1 Dec 2010 - 10:19 am | इन्द्र्राज पवार
ठीक आहे, कोल्हापुरी बाईसाहेब.....तुमचं ऐकतो...ऐकलच पाहिजे, नाहीतर बांगडा मिळायचा नाही [लहानपणी दुपट्याऐवजी 'बांगडा' मिळाला असता तर???]
इन्द्रा
1 Dec 2010 - 9:39 am | यकु
धागा अत्यंत खेळीमेळीने घेतल्याबद्दल सर्वांचे हबिनंदण !
खदाखदा हसू येऊनही आम्ही हसलोच नाही असे भासवल्याबद्दल विषेश हबिनंदण! ;-)
टारोपंत या महात्म्याची आठवण काढून लिंक दिलेल्या अवलियांचे विषेश डब्बल हबिनंदण!
1 Dec 2010 - 11:20 am | आळश्यांचा राजा
मिसिंग टारबा.
परत बोलवा!
12 Dec 2010 - 12:05 am | टारझन
गहिवरुण आले , डोळे पाणावले , सद्गदीत झालो , करुणासागरात डुबकी घेतली , नाकातोंडात हवा गेली , समाधी लागली .
मी देखील बाँड्री बाहेर असतांना तुम्हा सर्वांना मिस् केलं रे मित्रांनो !!
धाग्याची लिंग दिल्या बद्दल यशवंत चे धन्यवाद :)
-( सहि विडंबणामुळे च्यार लोकात ओळखल्या गेलेला) मोगली
12 Dec 2010 - 12:13 am | टारझन
बाकी ते छोटा डॉन चं ''चोता दोन" ह्या पलिकडे विडंबण होऊ शकत नाही. :) बिनबिडीचे उडालेल्या भापकरांचे त्याबद्दल कौतुक ! :)
12 Dec 2010 - 2:03 am | प्राजु
वा वा! छान चालू आहे!
मजेदार आहे धागा.
12 Dec 2010 - 12:31 pm | मितान
+१
असेच म्हणते :)