उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
10 Jun 2010 - 5:19 am

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"

सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र १: उन्हेरे येथे जाण्यासाठी मार्गदर्शन
Sarasghad Fort- Pali-Tal Sudhagad- Raigad-Maharashtra
छायाचित्र २: पाली येथील सरसगड

श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात अख्याईका आहे.

उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात. येथे गरम पाण्याच्या झर्‍यांचे कुंड बांधण्यात आलेले आहेते.
एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक स्रीयांसाठी, एक पुरूषांसाठी आहे.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ३: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. तिसर्‍या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. कुंडाच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र ४: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ५: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

स्नान करतांना साबण लावणे, चुळ भरणे, कपडे धुणे, पोहणे आदी प्रकार टाळावेत. हे पाणी पिऊ नये.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ६:

या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते. भुगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते. हेच गरम पाण्याचे झरे असतात.

उन्हेरे कुंडाचा परीसर अनेक सामाजीक राजकिय चळवळींचा साक्षीदार आहे. स्वातंत्रपुर्व काळात मो. कृ. देवधर यांचे अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. अनेक परिषदा, सभा या स्थानी झाल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीशांना मदत करू नये अशा अर्थाचे भाषण बापूसाहेब लिमये यांनी याठिकाणाहून केल्याने त्यांना शिक्षा झाली होती. ताकई येथील विठोबाची यात्रा संपली की येथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला येथे यात्रा भरते. सुकी मासळी व घोंगड्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने कुंडात आंघोळ करणार्‍यांना एक भावनिक आवाहन: -

उन्हेरे गरम पाण्याची कुंडे,
ही धारोष्ण गंगा आहे!
साबण लावून, कपडे धुवून,
या गंगेला मलीन करू नका!!

(संदर्भ: पाली तालुक्याचा इतिहास : लेखक: सुरेश पोतदार)

बाकी आमची कलाकारी:
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ७
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ८
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ९
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र १०
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ११:
वरील छायाचित्रे (क्र. ७ ते ११) कुंडातल्या पाण्यातून घेतलेली आहेत.

हे ठिकाणप्रवासभूगोलछायाचित्रणलेखमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

10 Jun 2010 - 5:29 am | शुचि

माहीत नव्हतं हे ठीकाण. छान माहीती.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

10 Jun 2010 - 7:36 am | सहज

>एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक स्रीयांसाठी, एक पुरूषांसाठी आहे.

आणि तिसरे? :-)

पाषाणभेद's picture

10 Jun 2010 - 7:53 am | पाषाणभेद

तिसरे कुंड बाजूलाच आहे. ते छोटे व उघडे आहे. (स्री-पुरूषांच्या कुंडाला वरती पत्र्याचे छप्पर आहे.) तुलनेने या कुंडाचे पाणी अधिक उष्ण आहे. फक्त पाय बुडवावे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

सहज's picture

10 Jun 2010 - 8:07 am | सहज

अच्छा.

धन्यु.

मदनबाण's picture

10 Jun 2010 - 8:08 am | मदनबाण

नविन माहिती आवडली... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

आगाऊ कार्टा's picture

10 Jun 2010 - 9:39 am | आगाऊ कार्टा

राजापूर जवळ ऊन्हाळे येथेही असाच एक गरम पाण्याचा झरा आहे.

आगाऊ कार्टा
http://www.ameyphadke.com

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 6:34 pm | मेघवेडा

राजापूरच्या गंगेजवळचं 'उष्णोदक तीर्थ' नं ते?

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

योगेश२४'s picture

10 Jun 2010 - 9:49 am | योगेश२४

मीही बर्‍याच वेळा जाऊन आलोय उन्हेरेला.

इरसाल's picture

10 Jun 2010 - 5:49 pm | इरसाल

असाच एक गरम पाण्याचा झरा जळगाव जिल्ह्यात अडावद इथे (उनपदेव) आहे.प्रभू श्रीरामाने बाण मारून श्रुंग ऋषी साठी अंगावरील कोढ जाण्यासाठी प्रकट केलेला आहे.

पांथस्थ's picture

10 Jun 2010 - 11:23 pm | पांथस्थ

प्रभू श्रीरामाने बर्‍याच लोकांच्या आंघोळीची सोय करुन ठेवलेली दिसते ;)

मला माहित असलेले अजुन एक ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश मधील "वशिष्ट" येथील गरम पाण्याचे कुंड. जवळपास पंधरा वर्षापुर्वी गेलो होतो. रोहतांग पास उतरुन आल्यावर कुडकुडत असतांना गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ म्हणजे स्वर्गसुख वाटले होते. नंतर जवळच एका तिबेटियन उपहारगृहात वाफाळलेले मोमो खाल्ले होते. अहाहा!!!

ह्या जागेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

शानबा५१२'s picture

10 Jun 2010 - 11:31 pm | शानबा५१२

चार नंबरच्या फोटो तली एका मनुष्य प्राण्याची उपस्थीती खटकली.......................
माझ्या मते एखाद्या साईटवर (मिपासारख्या) व्ययक्तीक फोटो टाकण्यास बंदी असावी..........

आणी हो पाषाणभेद..आपल्या त्या 'जीन्स' वरच्या कवितेचे आम्ही फयान वादळात फीरणा-या पंख्यापे़क्षा जोरात फीरणारे फ्यान आहोत ह्याची आपण दखल घ्यावी.
तस काहीतरी परत वाचायला भेटेल अशी आशा ठेउन आम्ही आपले लेख वाचतो.
आपल्या सर्व लेखांमधला सर्वात अव्वल होता तो.............

पांथस्थ's picture

10 Jun 2010 - 11:41 pm | पांथस्थ

तुम्ही म्हणत आहात तो फोटू पाच नंबर आहे चार नाही

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

शानबा५१२'s picture

10 Jun 2010 - 11:53 pm | शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

दुस-या कोणी चार काय तीन लिहले असते तरी मोजले नसतेत...... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आपल्यावर कोणाचा विश्वासच नाही राहीला आता हे आज पुन्हा जाणवल......

पांथस्थ ????? ह्याचा उगम काय???

पांथस्थ's picture

10 Jun 2010 - 11:59 pm | पांथस्थ

आपल्यावर कोणाचा विश्वासच नाही राहीला आता हे आज पुन्हा जाणवल......

न्हायबा, चौथ्या फोटोत व्यक्ति नसुन नुसत्या तंगड्या आहेत (तशी पाण्याच्या रिफ्लेक्शन्स मधे एक व्यक्ति आहे म्हणा!) तेव्हा म्हटलं मालकांच्या निदर्शनास आणुन द्यावे.

पांथस्थ ????? ह्याचा उगम काय???

ह्याचा उगम आजकाल वेळ जास्त झाल्याने मिपा वर माझी जरा वाढलेली लुडबुड आणि दुसर्‍यांच्या चुका काढण्याची जन्मजात सवय!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर