मै ऐसा क्यूं हूं?

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
3 May 2010 - 6:47 pm

जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :)

बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. माळ्यावर ट्रंकेत पुस्तकं. ग्यालरीतल्या शेल्फात पुस्तकं. माझ्या कप्प्यात अर्ध्या भागात कपडे, अर्ध्या भागात पुस्तकं. असं सगळं.

अगदी सुरूवातीला वाचलेली पुस्तकं म्हणजे (बहुधा) ज्योत्स्ना प्रकाशनाची अथवा केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं. राजाराणी, राक्षस, त्याचा पोपटात असलेला जीव वगैरेंची. वेगळ्याच एका अद्भुत दुनियेत घेऊन जाणारी. सुट्टी असो नाही तर शाळा असो... रोज एखादे तरी पुस्तक वाचायचोच. मग रात्री स्वप्नातही तेच दिसायचं. अर्थात तेव्हा राजकन्या वगैरे पेक्षा तो राक्षस, पोपट आणि त्याच्या राजपुत्राशी होणार्‍या लढायाच जास्त दिसायच्या स्वप्नात. पण एकंदरीत मजा यायची. जसजसा थोडा मोठा झालो तसतसं मग क्षितिज विस्तारले. बाबा दर शुक्रवारी का अशाच कोणत्याशा वारी 'द इलस्ट्रेटेद विकली ऑफ इंडिया' आणायचे, ऑफिसातून येताना. त्यातली रंगीत चित्रं बघायला मजा यायची. त्यातच ओळख झाली 'फँटम'ची. फँटम, त्याची लेडी डायना, जंगल, मधून मधून त्या फँटमचा होणारा मि. वॉकर, सध्याच्या फँटमचा पूर्वज जो पहिल्यांदा फँटम झाला, त्याने कवटी हातात घेऊन घेतलेली शप्पथ, फँटमची मुलं, म्हातारा गुर्रन हे सगळं मला अगदी अजूनही खरं वाटतं. आता, हे सगळं काल्पनिक आहे असं माहिती आहे, पण वाटत नाहीच अजूनही. अजून थोडा मोठा झाल्यावर भेटली, इंद्रजाल कॉमिक्स. बाबांपाशी हट्ट करून पेपरवाल्याकडे दर आठवड्याचे नवीन प्रसिद्ध झालेले कॉमिक्स टाकायला लावले होते. त्यात प्रामुख्याने मँड्रेक आणि त्याचा पैलवान सहाय्यक लोथार यांचे कारनामे असत. जादूचे कॉलेज, तिथला प्रिन्सिपॉल थेरॉन आणि ते मनाच्या शक्तीचे प्रयोग इत्यादी हे केवळ अद्भुत.

त्याच वेळेस आणि त्याच बरोबरीने वेड लावले होते ते अमर चित्रकथांनी. माझ्या मते अगदी अजूनही 'कॉमिक्स' या प्रकारातली ही सगळ्यात छान अशी मालिका आहे. या चित्रकथांनी माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकणार्‍या मुलाला भारतिय हिरोज आणि भारतिय संस्कृतीतल्या गोष्टींचा प्रच्चंड खजिना अतिशय नेटकेपणाने खुला केला. रामायण, महाभारत वगैरे तर आहेच... पण राजपुतान्यातल्या राणा संगा, राणा प्रताप, राणी पद्मिनी सारख्या थोर आणि शूर व्यक्तींचा परिचय मला झाला. आजही मला अमरचित्रकथांचा संपूर्ण संग्रह माझ्या मुलींसाठी विकत घ्यायची इच्छा आहे. अमर चित्रकथांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर रेखाटनं आणि साधी सरळ भाषा. नुसती बघत रहावी अशी रंगसंगती. अमर चित्रकथांना माझ्या मनात एक अगदी वेगळेच स्थान आहे. नेहमीच राहील. चांदोबा आणि किशोर मासिकं तर अगदी नववीत वगैरे जाईपर्यंत दर महिन्याला घरी येत असत.

आम्हाला पाचवीपासून इंग्रजी सुरू झाले. हळूहळू अक्षरओळख झाली आणि वाचनाची गाडी त्या भाषेकडे वळायला लागली. सतत प्रयत्न केल्याने बर्‍यापैकी लवकर इंग्रजी वाचता येऊ लागले. रोजचे इंग्रजी वर्तमानपत्र वाचणे हा तर नियमच झाला. माझ्या वडिलांना अ‍ॅगाथा ख्रिस्ती किंवा डॅफ्ने डु मॉरिएच्या कादंबर्‍या वाचायचा दांडगा शौक. त्यांच्याकडे बर्‍याचशा कादंबर्‍या संग्रही होत्याच. अर्थात हे सगळे वाचता येऊ लागे पर्यंत बराच वेळ गेला. पण पुस्तकं हाताशी असल्याने नेहमीच ती चाळली जात. मला आठवतंय, मी सातवीत की आठवीत असताना मला माझ्या आत्याने दिवाळीत शेरलॉक होम्सच्या सगळ्य कथांचा संग्रह दिला होता. सुट्टी संपायच्या आत वाचून संपले होते दोन्हीही खंड. बाबांच्या संग्रहामुळे हर्क्युल पायरॉची ओळख झालीच होती. मराठीतल्या गुरूनाथ नाईक वगैरेंची पुस्तकं तर तेव्हा सर्रास उपलब्ध असत. त्यांची तर पारायणं चालूच होती. एके दिवशी माळा साफ करताना, एका ट्रंकेत त्यांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या तरूणपणी जमवलेली अर्ल स्टॅनले गार्डनरची आख्खीच्या आख्खी पेरी मेसनची सिरिजच हाती लागली. थोड्याच दिवसात त्याचाही फडशा पाडण्यात आला.

अशा रितीने हळूहळू माझी वाचनाची सवय वाढत होती... अगदी हाताबाहेर जात होती असे म्हणले तरी चालेल. वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं.

पण माझ्या वाचनावर खरा प्रभाव असेल तर तो माझ्या काकाचा. घराण्याच्या गुणधर्माला अनुसरून तोसुद्धा वाचनकिडा आहेच. आमच्या घराजवळच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. खूपच सुसज्ज लायब्ररी होती ती. अजूनही आहे बहुधा. काका तिथे मेंबर. त्याची साहित्याची जाणही प्रगल्भ आहे. तो जी पुस्तके आणत असे ती दिवसा माझ्या ताब्यात असत. कथा / कादंबर्‍या / मासिकं अगदी भरपूर वाचन केलं त्याच्याजोडीने. लहान वय असल्यामुळे सगळंच कळलं असेल असं नाही, पण ती नावं, ती भाषा न कळत मनावर ठसत होती, संस्कार करत होती. काका 'ललित' मासिकाचाही सदस्य होता. दर महिन्याला त्याच्या जोडीने मीही नवीन अंकाची वाट बघत असे. 'ठणठणपाळ' तर लै हिट्ट होता त्यातला. अजूनही ते मिशाळ ठणठणपाळाचे सरवट्यांनी काढलेले व्यंगचित्र डोळ्यासमोर आहे. 'ललित'चा दिवाळी अंकही दणदणीत असायचा. माझ्या वडिलांचा आत्तेभाऊ साहित्यिक / प्राध्यापक वगैरे. तो नेमाडपंथी. म्हणजे, नेमाड्यांच्या अगदी रोजच्या बैठकीतला. त्या कनेक्शनमुळे माझा काकाही तसाच. कोसला, बिढार, झूल इत्यादी कादंबर्‍या घरच्याच संग्रहातल्या. अगदी शाळकरी वयातल्या. 'कोसला' पहिल्यांदा वाचली तेव्हा काहीतरी वेगळंच (पण त्या वयात नेमकं लक्षात न येणारं) असं काही आपण वाचतो आहे हे कळत होते त्या जाणिवेची आठवण अजूनही मनात घर करून आहे. महानोर, कोलटकर वगैरे नावं ऐकून माहित झाली. त्यापैकी महानोरांची कविता समजायला जास्त सोपी म्हणून त्याची पारायणं झाली. 'या नभाने या भुईला दान द्यावे' वगैरे ओळी तर मनात घर करून बसलेल्या. त्यावेळच्या नवीन वाटा चोखाळणार्‍या साहित्यिकांची ओळख अशा रितीने घरातच होत होती. काकाकडे 'फणीश्वरनाथ रेणू' या महान हिंदी सहित्यिकाची काही पुसकं / कादंबर्‍या होत्या. त्यापण वाचत होतो.

आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेला मेघनाबरोबरचा संवाद. तिच्याशी बोलताना जुन्या आठवणी निघाल्या आणि मी विचार करायला लागलो. आज मला कोणी विचारले की तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडेल तर मी रात्री झोपेतसुद्धा 'वाचन' असे उत्तर देईन. मग 'मै ऐसा क्यूं हूं?' असा विचार करत असताना मला लहानपणापासून सहजतः मिळालेला पुस्तकांचा सहवास आणि माझ्यसमोर घरातले इतर लोक करत असलेले वाचन हे त्याचे मुख्य कारण आहे असे जाणवले. मग असा विचार आला मनात की एखादा धागा टाकावा. सगळ्यांनाच काही ना काही छंद असतो, आवड असते. माझ्यासारखी आणि माझ्यहूनही जास्त वाचनाची आवड असणारे थोर लोक इथे आहेत. त्यांच्या त्या त्या आवडीनिवडी अथवा छंद त्यांना कसे लागले असावेत? त्या लोकांनी त्यांचे अनुभव / आठवणी इथे शेअर कराव्यात अशी कल्पना.

प्रत्येकाने वाचन वगैरे बद्दल लिहावे असे नाही. मला वाचनाचा छंद आहे. अजून कोणाला पर्यटनाचा असेल, कोणाला गिर्यारोहणाचा असेल. कोणाला चित्रकलेचा अथवा संगिताचा असेल. कोणी जुन्या हिंदी गाण्यांचा / चित्रपटांचा शौकिन असेल. तर प्रत्येकाने असे काहीना काही लिहावे ही अपेक्षा.

इतिहासमौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

3 May 2010 - 7:18 pm | स्पंदना

ही माझी सर्वात पहिली कादम्बरी.
तुम्ही खाल्लेले धपाटे आमच्या ही नशीबी होते.
कळतच नाही त्याना कि लिन्क तुटते. काय खातोय हे सुद्धा लक्षात येत नसे कधी कधी.'छान वाटल वाचताना. पुरा मागोवा घेतला तुम्ही सुरवातिच्या पुस्तकान चा. मिळेल तिथ मिळेल तस वाचल जाई.
खर तर दुरदर्शन न वाचनाची दुर्दशा केली.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

संदीप चित्रे's picture

3 May 2010 - 7:20 pm | संदीप चित्रे

कुणीतरी उचलून नेटकेपणाने मांडलेत असं वाटलं रे !
>> रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला.

>> वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं.

अगदी म्हणजे अगदीच सहमत.
'ऑडियो बुक' ऐकतोस का? नसशील तर जरूर बघ... वाचनाचे एक वेगळेच दालन खुलं होईल.

मुक्तसुनीत's picture

3 May 2010 - 8:06 pm | मुक्तसुनीत

उत्तम धागा. (इथे प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो. )
अशा स्वरूपाचा अन्यत्र असलेला हा अजून एक धागा. अनेक लोकांनी उत्तमोत्तम प्रतिसाद येथेही दिलेत.

http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=4222&hl=

sagarparadkar's picture

4 May 2010 - 5:07 pm | sagarparadkar

एकदम सहमत .... हे वाचनाचे वेड एकदा लागले कि मग काही विचारुच नका ...

पण असे का होते कि अवान्तर वाचन अफाट केले जाते अगदी न कन्टाळ्ता, पण अभ्यासाचे वाचन मात्र थोडेसे केले तरी खूप कन्टाळा येतो.

हे असे सर्वान्चेच होते कि ही माझी खोड आहे ...

रामदास's picture

3 May 2010 - 7:21 pm | रामदास

मी अनील अवचट होता होता वाचलो आहे.दर पंधरा दिवसानी एक नविन खूळ झपाटून टाकायचं .मग पुढच्या महीनाभर तेच तेच.
या खूळांपैकी वाचनाचं खूळ /वेड मात्र तसंच सोबत राहीलं.
आजच मिपाच्या धाग्यावर पाडसची आठवण कोणीतरी केली होती. परत दुपारपर्यंत पाडसच डोक्यात होतं.पहील्या प्रकरणातल्या पाणचक्कीपासून ते पाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सगळं काही आठवलं.(मग त्यामुळे वडलांची आठवण दिवसभर येत राहीली ती गोष्ट वेगळीच.)
रात्रीच्या प्रवासात मागच्या सिटवरून पाण्याची बाटली घरंगळत पायाशी येते आणि दचकायला होतं तशा अनेक आठवणी पुस्तकांसोबत जोडल्या गेल्या आहेत.
गेली पन्नास वर्षं हा एकच छंद माझ्या सोबत आहे. एका वेळी पाच ते सहा पुस्तकांचं वाचन करायची सवय त्यामुळेच लागली आहे.
नीलकांतनी पुस्तकविश्व सुरु केल्यावर तर आता हा छंद वाढणारच आहे.
बिपीन , हा धागा म्हणजे आमच्या यमना सारखा चिरंजीव धागा आहे.

धमाल मुलगा's picture

3 May 2010 - 7:44 pm | धमाल मुलगा

काय अप्रतिम प्रतिसाद आहे! :)
_/\_

सन्जोप राव's picture

4 May 2010 - 10:12 pm | सन्जोप राव

मी अनील अवचट होता होता वाचलो आहे.
तुम्ही किती नशिबवान आहात याची तुम्हाला कल्पना नाही!
रात्रीच्या प्रवासात मागच्या सिटवरून पाण्याची बाटली घरंगळत पायाशी येते आणि दचकायला होतं तशा अनेक आठवणी पुस्तकांसोबत जोडल्या गेल्या आहेत.
रामदास स्पेशल!

सन्जोप राव
किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है
जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 4:52 pm | खंडेराव

आजच मिपाच्या धाग्यावर पाडसची आठवण कोणीतरी केली होती. परत दुपारपर्यंत पाडसच डोक्यात होतं.पहील्या प्रकरणातल्या पाणचक्कीपासून ते पाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सगळं काही आठवलं.(मग त्यामुळे वडलांची आठवण दिवसभर येत राहीली ती गोष्ट वेगळीच.)

पाडस पहिल्यादा वाचले ते ८-९ चा असताना. नंतर पुन्हा पुन्हा, कैक वेळा. ज्योडी आणि मा ची स्वयंपाकघरातील वर्णने कायम डोक्यात घोळायची. हरणे काय आणि मगरी काय.

विन्ग्रजी पाडस घेउनही वाचली, पण ती काय तितका आनंद देउ शकली नाही. राम पटवर्धनांचा अनुवाद जबरी.

शेखर जोग's picture

3 May 2010 - 7:27 pm | शेखर जोग

नमस्कार बिपीनसाहेब! मनापासून नमस्ते! जगात जे काही खूप वाचणारे व खुळे लोक असतात अगदी आपल्या रामदाससारखे ते मला व्यक्तीशः अत्यंत आवडतात. मी ही अशीच खुळं घेऊन वावणारणारा एक वेडा. पण मला तुमच्या लेखाने प्रोत्साहन मिळाले! धन्यवाद

धमाल मुलगा's picture

3 May 2010 - 7:41 pm | धमाल मुलगा

मस्तच!
वाचनप्रवास अप्रतिम.
बाकी, रांगता रांगता हळुच उठुन उभे राहताना पहिलं पाऊल टाकताना आधारासाठी धरायला मिळावे ते साहित्याचे बोट..ह्यापेक्षा सुंदर बाब आणखी काय असावी? (च्चॅ! काय रे नंद्या, फारच दवणीय झालं काय हे वाक्य? :D)

आम्हीही वाचनपंथीच. फरक इतकाच, की साहित्यमुल्य, वाचनाची/आशयाची खोली वगैरे प्रकार आमच्या सामान्य कुवतीच्या बुध्दीला झेपलेच नाहीत. त्यामुळॅ 'सुंदर, नेटकं, उच्च अभिरुची' वगैरे विशेषणांचे धनी असलेले साहित्य फारसं वाचलं गेलंच नाही.

मिळेल ते वाचणं ही आवड. किती कळतंय, बुध्दीचा टीपकागद काम करतोय की नाही वगैरे बाब अलाहिदा. :)
संध्याकाळी आईआबांसोबत फिरायला गेलं की येताना खारे शेंगदाणे रोज घ्यायचेच...तेही एका ठराविक गाडीवरुनच..का? तर त्याच्याकडे बर्‍याचदा कोणत्याशा पुस्तकांची पानं असायची सुरनळ्या करायला ठेवलेली..शेंगदाणे खाऊन झाले की ती सुरनळी उलगडुन वाचायला सुरुवात :D मग रस्त्यानं चालताना ठेचकाळणं हे आलंच...मी यत्ता चौथी की पाचवीत असताना उजवा अंगठ्याला लागलेली ठेच जवळपास सहा महिने तशीच होती...सारखे ठेचकाळुन.. इतका आमचा येडेपणा.

आजी संध्याकाळी शाळेतुन आली की तिला चहाही न घेऊ देता 'हे वाचुया, ते वाचुया' करुन छळ करायचा.त्याचा फायदा झाला की मी पहिलीत गेलो तेव्हा माझा पहिलीचा सगळा अभ्यास आधीच पुर्ण झालेला. (पुढे कालपरत्वे ही अभ्यासाची वेडी ओढ ओहोटीला लागत गेली म्हणा. पण ते असो!) बर्‍याचदा जेवायला बसलेलो असतानाचं चित्र म्हणजे छानपैकी सगळेजण समोर ताटं घेऊन बसलो आहोत. माझी बोटं वरणभात त्यावरच वाळुन पिवळीधम्मक झालीयेत, डोकं पुस्तकात खुपसलेलं..शेजारी आजीच्या हातातला पोळीचा घास वाळुन चाललेला-तिच्याही डाव्या हातात पुस्तक, (सुटीला घरी आली असेल तेव्हा-) समोर आत्या पुस्तक जमिनीवर ठेऊन ते वाचण्यात गुंगलेली...पानात काहीच शिल्लक नाही ह्याचं भानच नाही.. आणि आमच्या मातोश्री हे सगळं पाहुन वैतागलेल्या :D

पुढे पुढे दिवाळी-उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आमच्या लायब्ररियनला संकट वाटायला लागलं :) कारण सकाळी एक पुस्तक घेऊन यायचो, ते बदलायला संध्याकाळी पुन्हा हजर :) शेवटी त्यानं नियम बाजुला ठेऊन मला सगळ्या रॅक्समध्ये उचकापाचक करण्याची पुर्ण मुभा देऊन टाकलेली!

निगडीला आत्या घरीच लायब्ररी चालवायची...आधीच ती आवडती आत्या, मी तिचा आवडता भाचा, त्यात तिच्याकडं खंडीभर पुस्तकं...नुस्ती मज्ज्ज्जा! सकाळी उठावं, ब्रश करुन झालं की मस्त एखादं पुस्तक उचलावं आणि बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर ऐसपैस पसराव...आत्या आपली आहेच सेवेसि हजर..दुधाचा कप बाल्कनीत...नाष्टाची डिश बाल्कनीत...जेवायला मात्र आत जावं लागायचं :(
हळुहळु विंग्रजी पुस्तकात काय असतं बुवा..ह्या उत्सुकतेपोटी आबांच कपाट उचकुन झालं...किंग लियर, क्लिओपात्रा अन काय अन काय...मग पुढे इंग्रजी वाचताना नजर मेल्यावर सिडने शेल्डन सुरु केलं..आणि मग एकामागुन एक पुस्तकं कुरतडतच राहिलो :) गावाच्या लायब्ररीतली सिडनेची सगळी बुकं संपल्याअवर अ‍ॅलिस्टर मॅक्लिनकडं मोर्चा वळवला.....पुढे अर्ल गार्डनरच्या पेरी मेसनने भुरळ घातली... (मध्येच कॉलेजात जायला लागल्यावर अंमळ पिवळ्या पुस्तकांचाही फडशा पाडायला लागलो.. ;) )
पण ह्यासोबत टवाळक्या करण्याची आवड आपोआप कशी काय वाढीला लागली कळालंच नाही...मग पुस्तकं राहिली बाजुला आणि गप्पांष्टकांचे फड रात्र रात्र रंगायला लागले......

क्या करूं? मै ऐसा ही हूं.... :D

श्रावण मोडक's picture

3 May 2010 - 7:43 pm | श्रावण मोडक

शीर्षक 'बदनाम' आहे. लेखनाची जातकुळी पाहता ते पटले नाही हे आधी नोंदवतो.
अनुभव जवळपास असेच. थोडा फरक (म्हणजे इथल्या लेखनापुरता, प्रत्यक्षात बिकाचेही ते अनुभव असतील) इथं नोंदवतो.
त्या काळात आम्ही पोरा-पोरांनी मिळून चालवलेली एक लायब्ररी आठवते. त्या लायब्ररीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील (हा उल्लेख मुद्दाम, कारण मी कर्नाटकात होतो) गड किल्ल्यांची माहिती देणारी एक पुस्तकमालिका आठवते. साठेक पानी पुस्तकं असावीत. त्याहीपलीकडं आठवतं ते एक पुस्तक - धनगराचा पोर. लेखकाचं नावही आज आठवतं - कायुम तांग्राकुलियेव्ह. तेव्हाच्या सोव्हिएतमधून प्रगती प्रकाशनाची पुस्तकं यायची. त्यांची खरेदी बाबा करायचे (त्यामागचे एक कारण आर्थीक असावे, नव्हे असेलच). त्या पुस्तकांच्या गठ्ठ्यात हे एक पुस्तक होते. भला मोठ्ठा आकार. आजच्या ए-४चा. रेखीव मुखपृष्ठ. ते पुस्तक वाचल्यापासून धनगरांच्या प्रवासात सहभागी होण्याची इच्छा मनात घर करून बसली आहे, ती अद्याप कायम आहे. दरवर्षी मेंढपाळ कोकणात जाताना पाहतो आणि ही इच्छा उसळी मारून वर येते. मी तिथंच आहे अजूनही. प्रगतीच्या या पुस्तकांबरोबरच मला आणखी एक नियतकालीक (बहुदा मासीक) आठवतं - स्पॅन. आजही निघत असावं. अमेरिकी दूतावासाचं. त्या मासिकाच्या एका मुखपृष्ठावर गरुडाचा एक होलोग्राम होता तो आठवतो. ते वाचायचो. पण किती कळायचं किंवा का वाचायचो हे आजही सांगता येणार नाही.
चांदोबा होता. चंपक होतं. त्यांच्या जोडीनं मी पोथ्या वाचायचो. डोक्यावरून जायच्या. पण वाचायचो.
आणखी एक - डिटेक्टीव्ह पुस्तकं. गुरूनाथ नाईक हेच एक नाव लेखकाचं म्हणून आठवतं. पण शिलेदार कथा, काळा पहाड, नाईटकिंग (आणखी एक कोणी स्त्री डिटेक्टीव्हही होती) वगैरेंची मोहिनी असलेला एक काळ होता, आजही त्या मिळाल्या तर आवडीने वाचेन. त्यातही शिलेदार कथा हमखास. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, हवालदार कदम, जंगम आणि पाचवा... कोण? आठवेना आत्ता... पण त्या पुस्तकांचं वेड होतं अक्षरशः. मिळेल तिथून ती पुस्तकं आणायचो. एकेका दिवसात (म्हणजे, बाकी उद्योग करतच) दोन-दोन पुस्तकं संपायची. त्या बदल्यात घरी ओरडणी खाल्ली आहेत - "असली पुस्तके काय वाचतोस?"
ज्याला साहित्य म्हणतात, तेही वाचलं. पण त्याविषयी काही लिहावं असं ते वय नाहीच. तेव्हा आपलं ते वाचायचं इतकंच महत्त्वाचं असायचं.
सर्वाधिक तिटकारा असलेली पुस्तकं - शालेय! ;)

धमाल मुलगा's picture

3 May 2010 - 7:51 pm | धमाल मुलगा

>>त्यातही शिलेदार कथा हमखास. कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, हवालदार कदम, जंगम आणि पाचवा... कोण? आठवेना आत्ता..
रिबेलो का हो? च्यायला मलाही आठवेना आता.

>>सर्वाधिक तिटकारा असलेली पुस्तकं - शालेय!
++++++१
ही:ही:ही: त्यात वाचण्यासारखं असायचं ते काय?
फारतर फार इतिहासाच्या पुस्तकातल्या चित्रांना दाढीमिश्या काढायचा उपयोग ;)

अवांतरः ह्यावरुन इयता सातवीत(की सहावीत..) असताना मराठीच्या पुस्तकात 'शिरगणती' हा धडा होता त्याचं दोन पानी चित्र होतं त्यात कॉमिक्समधल्यासारखे प्रत्येकाच्या डोक्याशी डायलॉग्ज बबल टाकुन स्वतःची अक्कल चालवुन लिहिलेले संवाद आठवले =))
ते इतकं हिट्ट झालं की आजुबाजुच्या वर्गातली पोरंही पुस्तक मागायला यायला लागली...कोण्या नतद्रष्टानं ते पुस्तक सरळ मुख्याध्यापकांच्या हातात ठेवलं... :( :( :( शाळेत त्यांचा मार..घरी आल्यावर पिताश्रींचा...
(आमच्यातल्या एका भावी कॉमिक्सवाल्याचा अकाली मृत्यु झाला तो हा असा. :D )

सातबारा's picture

3 May 2010 - 11:08 pm | सातबारा

कॅप्टन दीप बरोबर ती मारीया लोबो पण ..

शिवाय गरुड कथा पण असायची. त्यात त्याने फेल्ट हॅट पुढे ओढली की, चेहर्‍यावर लाल भडक चोच यायची म्हणे, मग तो अंगात आल्यासारखी मारामारी करायचा. आता हसू येते, की तो गरूड होता की पोपट ? पण त्या वयात माझा जाम विश्वास होता.
आणि अर्नाळ्करांचा झुंजार ! त्याचा तो झुंजार महाल, त्यातीला असाच वीस की बावीसाव्या मजल्यावरचा स्विमींग टँक, त्याची सेक्रेटरी इ. आणि तो कायम ब्यूक गाडी वापरायचा. हे ब्यूक काय असते याचे जाम कुतूहल होते.

बाकी तो वेताळ, त्याची कवटी गुहा, त्याचा तुफान आणि वाघ्या, त्या जंगलातील म्हणी, आणि ढोलांद्बारे पाठविले जाणारे संदेश खासच. वेताळाबरोबरच मॅंड्रेक पण.

चौथी ते सातवी बर्‍याच वेळेस मी पायी जावून बसचे पैसे वाचवायचो. ज्ञानेश्चर चौकात एक रद्दीचे दुकान होते, तेथे हे इंद्रजाल कॉमिक्स आणि गुरुनाथ नाईक, अर्नाळकर यांची पुस्तके रद्दीत आलेली असत. त्याच्याशी सेटींग लावून नियमीत पणे ती पुस्तके घ्यायचो. पुस्तक वाचत वाचत चालत घरी. दोनदा वाटेतल्या खांबाला धडकलो तेव्हा सवय जरा कमी झाली.

शिवाय मॅजेस्टीक ग्रंथ प्रदर्शनात यापायावरचे त्या पायावर असे उभे राहून तर किती तरी पुस्तके वाचली.

आणि विश्रामबागवाड्याचे शासकिय विभागीय ग्रंथालय जणू दुसरे घरच !
असो.

बिकाशेठ, काय मस्त विषय काढला राव तुम्ही ..!

---------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

sagarparadkar's picture

4 May 2010 - 5:40 pm | sagarparadkar

>> शिवाय मॅजेस्टीक ग्रंथ प्रदर्शनात यापायावरचे त्या पायावर असे उभे राहून तर किती तरी पुस्तके वाचली. <<

अरे हो ... मी तर ह्या मॅजेस्टिक्च्या समोरच राहत असे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर एका पायावर उभे राहुन वाचन आणि सन्ध्याकळी त्या सुप्रसिद्ध "मॅजेस्टिक गप्पा" ...

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 4:58 pm | खंडेराव

कायुम तांग्राकुलियेव्ह. तेव्हाच्या सोव्हिएतमधून प्रगती प्रकाशनाची पुस्तकं यायची.

नाव वाचुन २०-२५ वर्ष मागे गेलो.. मी या सोवियत पुस्तकांचा वेडाच होतो. घरी अजुनही जपुन ठेवली आहेत. ग्रह आणि तार्याविषयी, माणुस बलाध्य कसा बनला आणि कैक इतर.
कायुम तांग्राकुलियेव्हचे सोनेरी प्याला..

मराठी पुस्तके खूप वाचली, पण मला सगळ्यात आवडलेली मराठी कादंबरी आहे रणजीत देसाईंची "स्वामी"! किती वेळा वाचली? अगणित वेळा. कुठूनही सुरुवात केली तरी वाचकाला खिळवून टाकते.....
'समग्र पुल' व 'वपुं'ची पुस्तकं-गोष्टी-कथाही मस्त.
माझे इंग्रजी वाचन सुरू झाले अर्ल स्टॅन्ली गार्डनर यांच्या 'पेरी मेसन' कादंबर्‍या वाचून! पण खरी डौलदार इंग्रजी भाषा मी वाचली ती जेम्स हेडली चेसच्या कादंबर्‍यांत. १९६०१९५०-१९६०च्या काळात लिहिलेल्या या पुस्तकांतील इंग्रजी भाषा आजही मला मॉडर्न वाटते! इंग्रजी भाषेतील लवचिकपणा मला त्यांच्या लि़खाणात पहिल्यांदा जाणवला व आजही मला त्यातली इंग्रजी भाषा आवडते!
त्यानंतर माझ्या इंग्लिश भाषेवर संस्कार केले 'टाईम' या नियतकालिकातील भाषेने.
आजचा सर्वात आवडता इंग्रजी लेखक आहे टॉम क्लॅन्सी.
बिपिन यांच्या लेखाने हे लिहावे असे वाटले. नंतर सवडीने अधीक लिहीनही!
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

रामदास's picture

5 May 2010 - 10:49 am | रामदास

चेसच्या पंच्च्यांशी कादंबर्‍या माझ्या संग्रहात होत्या. नो ऑर्कीड्स फॉर मिस ब्लँडीश ही फार आवडती कादंबरी होती.
Mark Girland नायक असलेल्या सगळ्या कादंबर्‍या आवडायच्या.
भावुक होण्याच्या वयात वपु पण आवडले होते.
पुलंच्या असा मी असामी च्या शेवटच्या सहा सात ओळी फ्रेम करून टेबलावर ठेवल्या होत्या.

अरुंधती's picture

3 May 2010 - 7:56 pm | अरुंधती

मला भरपूर लिहायचंय ह्या विषयावर..... अगदी खुलं कुरण आहे चरायला, पण तूर्तास थोडी गडबडीत आहे.... जरा रात्री निवांत पोस्ट करेन आतापर्यंतच्या ''वाचनखुणा''!!

धागा मस्त आहे....खूप दिवस मनात ह्यावर काहीतरी लिहायचे घोळत होते, आता आयती संधी मिळाली आहे!!! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शानबा५१२'s picture

3 May 2010 - 8:00 pm | शानबा५१२

वाचन चांगल असत.जे नाही वाचत ते आपलीच खोटी करत फीरतात साले..........
आज एक भेटलेला तसाच &$&$#&%@#!

*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.

शुचि's picture

3 May 2010 - 8:01 pm | शुचि

माझी पहीली कादंबरी - ययाती (यत्ता ४ थी :SS ) पण मला अतोनात आवडलेली.
दक्षता, शतायुषी, मेनका, माहेर अगदी दर दिवाळीला
चांदोबा दर महीन्याला
अमर चित्रकथा ठीक ठीक आवडायच्या.
पण जयवंत दळवी, जीए, गंगधर गडगीळ, मिरसदार, काळे हे सगळे जीव का प्राण. विशेषतः जयवंत दळवी खूप आवडायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

मेघना भुस्कुटे's picture

3 May 2010 - 8:14 pm | मेघना भुस्कुटे

छंद आपल्या पिंडधर्माइतकेच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरही अवलंबून असतात, अशाच आशयाचं बोलणं नुकतंच माझ्या रूममेटशीही झालं. इतक्या स्वस्त लायब्रर्‍या आसमंतात असताना, तुला वाचायला आवडत असतानाही तू का नाही वाचायला लागलीस असा माझा तिला प्रश्न होता. त्यावरची तिची उत्तरं ऐकताना आणि त्याच्याशी - मी आतापावेतो सर्वसाधारण म्हणून गृहित धरलेले - माझे अनुभव ताडून पाहताना माझ्या असं लक्षात आलं, की ’माझा’ छंद असं मी निर्लज्ज अभिमानानं म्हणते खरी. पण त्यात माझ्याखेरीज इतर अनेक जणांचं मोठंच ऋण आहे.
मला वाचायला आवडतं. पुढे पुढे निरनिराळ्या लायब्रर्‍या हुडकणं, कुणाकुणाकडे निर्लज्जपणे पुस्तकं उसनी मागणं, कमवायला लागल्यावर जमतील तशी विकत घेणं हे मी केलं, करतेच. पण अगदी लहानपणी मला अक्षरओळखही होण्याआधी माझ्याकडे गोष्टींची पुस्तकं होती. ’१२० गोष्टी’. ’हितोपदेश’, ’इसापच्या नीतिकथा’ ही पुस्तकं तर मला स्पष्ट आठवतात. साधारणपणे एफोर साइझपेक्षा थोडी रुंद, पण तितकीच उंच ही पुस्तकं होती. माझ्या हातांत तेव्हा ती मावतही नसत. पण आई-बाबा-एक लांबची आजी यांनी अनेक वेळा त्यांतल्या गोष्टी वाचून दाखवल्यामुळे, सांगितल्यामुळे गोष्टी मात्र मला पाठ असत. आणि तरीही त्या मला पुन्हा पुन्हा ऐकायच्या असत. मग त्यांतलं एखादं पुस्तक हातांत उघडून अक्षरश: भीक मागितल्यासारखी ’आता फक्त एकच गोष्ट... दाखव ना वाचून’ असा धोशा लावत मोठ्या माणसांच्यामागे भुणभुण केल्याची स्पष्ट आठवण मला आहे. माझी पुष्कळदा निराशा होत नसे.
बिपिनप्रमाणेच माझ्याही घरी अगदी लहानपणापासून माझ्याकरिता बरीच लहान मुलांची मासिकं येत. किशोर, आनंद, चंपक, ठकठक, चांदोबा, कुमार, किशोर... आणि दिवाळीत यांतल्या बर्‍याचश्या अंकांचे दिवाळी अंकही. दिवाळी अंकांची ओळख मला तेव्हापासून आहे! हे अंक मी आत्ताआत्तापर्यंत ठेवले होते.
तसेच आमच्या शाळेचे ग्रंथपाल, अण्णा तेंडुलकर. बाबांशी असलेल्या त्यांच्या परिचयामुळे मला विशेष सवलत असे. कितीही पुस्तकं, कितीही दिवाळी अंक घरपोच मिळत. फक्त आमच्याच शाळेत नव्हे, आमच्या शाळेच्या इतर शाखांच्या लायब्रर्‍यांतूनही (मला माहीत आहे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे, पण मी त्या शब्दाचं सामान्यरूप करून त्याला मराठीच केलं आहे!) मला मुक्तद्वार असे. शाळेच्या लायब्रर्‍यांचा मी पुरेपूर वापर केला, आणि अजूनही अधूनमधून करते.
स्वत: निवृत्त झाल्यावर एकदा कधीतरी अण्णा घरी आले होते. दिवाळी अंकांसाठी आईबाबांकडे भुणभुण करण्याची वेळ आणि त्यांच्या येण्याची वेळ एकच आली. तेव्हापासून ते अगदी आत्ताआत्तापर्यंत, अगदी मी पैसे कमवायला लागेपर्यंत, आईबाबांना न जुमानता दर दिवाळीला अण्णा खास दिवाळी अंकांसाठी मला हौसेनं पैसे देत होते. (आणि मी निर्लज्जपणे घेत होते!)
मला पुस्तकं सतत हवीच असत. त्यामुळे वाढदिवसाला, बक्षीस म्हणून, खाऊ म्हणून मला पुस्तकंच मिळत. कितीतरी वेळा कामावरून येताना बाबा अनपेक्षितपणे पुस्तक घेऊन येत आणि माझ्या हातात देत. त्यातला आनंद वेगळाच. त्यांचं वाचन खरं तर वर्तमानपत्रापुरतं मर्यादित. आईचंही वाचन होतं, आहे. पण ते मासिकांपर्यंत - कादंबर्‍यांपर्यंतच. काहीसं ’बायकी’. पण असं असूनही, फारसे पैसे नसूनही त्यांनी हे लाड पुरवले खरे.
तसंच सिनेमा-नाटकंचही. लहानपणापासून उन्हाळी सुट्ट्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांत आमच्या चाळीतल्या लहान मुलांची वरात नाटकाला निघे. तिकिटं बाबा आधी काढून आणत. मग येतील त्या सगळ्या बालनाट्यांना ’आम्ही एकटे जाणार’ करत आम्ही सगळी चाळीतली पोरं, नाट्यगृहापर्यंत बाबा सोडायला, खाऊला ’स्वतंत्र ५ रुपये’ आणि येताना ’एकट्यानं रस्ते क्रॉस करून’ आम्ही घरी! रंगायतनच्या एसीचा वास, तिथला तो गूढ-रंगोन्मादी-मोहक पडदा आणि तिथला अंधार यांची भूल मला तशातच कधीतरी पडली असणार. कितीतरी नाटकांची पुढची आणि मोक्याची तिकिटं मिळावीत, म्हणून बाबा सकाळी सहा वाजता रंगायतनमधे रांग लावायला गेलेलेही आठवतात. एकदा तर ऐन सहामाही परीक्षेत ’उद्या नाहीतरी मराठीचाच पेपर आहे, आणि आदल्या दिवशी कुठे होतो अभ्यास’ असं म्हणून मी सहकुटुंब नाटकाला गेल्याचंही मला आठवतं. पुढेही अभ्यास या गोष्टीवरून पुरेसा आरडाओरडा होऊनही, मला सिनेमाला जाताना अपराधी म्हणून कधी वाटत नसे, ते त्यामुळेच असणार! ’चांगला सिनेमा एकदा बघून थोडाच पुरतो? परत बघितल्यावर निराळा आवडतो’ असा युक्तिवाद करून मी आईकडून एकच सिनेमा तिसर्‍यांदा बघायलाही पैसे उकळले होते आणि कमाल म्हणजे तिनं युक्तिवाद पटल्यावर नाईलाजानं दिलेही होते! ’१९४७ अर्थ’ मला कसंही करून पाहायचाच होता. मित्रमैत्रिणी इतके सिनेमे पाहतच नसत. शिवाय त्यात ’तसे’ सीन्स होते! ’उद्या सिनेमा जाईल, आता फक्त गुरुवार रात्रीचा शो आहे’ म्हणून मी तारांगण केल्यावर बाबा माझ्यासोबत रात्रीचा शो पाहायला आले आणि झोपले. मी सिनेमा संपल्यावर त्यांना उठवलं आणि मग मी आमीरच्या नजरेतलं ते श्वापद आठवत मंत्रचळ्यासारखी घरी आले. असे किती सिनेमे... मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणं मला कितीतरी दिवस अपरिचितच होतं. उलट त्यांच्यासाठी न थांबता विश्वासघातकीपणे मी पहिल्या संधीला सिनेमा पाहिलेला असणे, हाच आमच्यातल्या भांडणाचा मुद्दा अजूनही असतो.
आता या सगळ्याबरोबरच, मला ट्रेकिंग आवडत नाही, मुळात मला विषामृतही खेळायला आवडत नसे, शाळेतली पीटीची परीक्षा देतानाही मी फाफलत असे... या सगळ्यालाही माझ्या ’बश्या’ पिंडाइतकंच माझं भोवतालही कारणीभूत आहे; असं वाटल्यामुळे मला दिलासा मात्र वाटतो आहे!आणि उच्च अभिरुची म्हणे ’माझी’!
हे सगळं आठवायची संधी दिल्याबद्दल बिपिनदांचे मात्र मनापासून आभार.

सुबक ठेंगणी's picture

3 May 2010 - 8:48 pm | सुबक ठेंगणी

बिपिनदा किंवा इतर काही प्रतिसादकांसारखं तहानभूक विसरून वाचन मी केलेलं नाही हे आधी नमूद करते.
मलाही वाचनाची सवय बाबांनी लावली. आमच्याकडेही कानाकोप-यात पुस्तकं आहेत. इतकी की त्यांच्यासाठी वेगळं घर घ्यायला लागेल की काय असं वाटायचं. अजूनही कुणाच्या घरी गेलं आणि पुस्तकं दिसली नाहीत की मला फार परकं वाटतं.
लहान असताना आम्हाला वाचनाची आवड लावण्यासाठी बाबा निरनिराळ्या क्लुप्त्या करत. ब-याचदा अर्धीच गोष्ट वाचून एखाद्या सुरस वळणावर "आता मी नाही वाचून दाखवणार पुढे! " असं जाहीर करत आणि मग रात्री झोप नीट लागणार नाही म्हणून पुस्तक वाचलं जाई. :)
पुढे मोठी झाल्यावर जाणवलं की पुस्तकातून मिळणारा आनंद हा माझ्यासाठी एखाद्या नव्या जगात गेल्याचा आणि नवीन माणसांना भेटल्याचा होता. तोच आनंद भटकंती, ट्रेकिंग ह्यातूनही मिळतो असं कळल्यावर त्याचीही आवड लागली. नुसती भटकंतीच नव्हे पण त्याआधीचं प्लानिंग, कमीतकमी बजेटमधे सगळं बसवण्यासाठीची शोधाशोध, जिथे जाणार तिथली माहिती गोळा करणे हे सगळं करण्यात थ्रिल वाटायला लागलं.
आजकाल वाचनाची उपासमारच होते. त्यामुळे सध्या भटकंतीच्या वेडाने जोर धरलाय.
त्याचबरोबर काहीही नवीन करायला कधीच नाही न म्हणणा-या आईबाबांची खूप आठवण येते आहे.

राजेश घासकडवी's picture

3 May 2010 - 9:00 pm | राजेश घासकडवी

अतिशय छान चर्चा. मूळ लेखातले आणि प्रतिसादकर्त्यांचे वाचनाविषयीचे अनुभव वाचून अगदी आपली माणसं भेटल्यासारखं वाटलं. वाचनाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने माझे अनुभव असेच आहेत. एका हातात पुस्तक धरून दुसऱया हाताने चेंगटासारखं जेवण चिवडायचं, अंधूक प्रकाशात खडखडत्या बसमध्ये 'अरे चष्मा लागेल अशाने' असा ओरडा खात वाचायचं, रस्त्यातून चालताना पुस्तक हातातच घेऊन वाचत जायचं... मग काय वाचतोय याने तितका फरक पडत नाही. ही आवड आमच्या आईवडलांनी जोपासलेली. बायकोसुद्धा त्याच पठडीतली. आता आमचा अडीच वर्षांचा मुलगासुद्धा ते पाय पाळण्यात दाखवतोय - वाचत नाही पण आमच्या मागे त्याची पुस्तकं घेऊन बसून पुन्हा पुन्हा गोष्टी सांगायला लावतो. इतक्या वेळा की आम्हाला वाचवा म्हणण्याची पाळी येते...

मी ठरवलं होतं की सगळ्यांनीच वाचनाविषयी लिहिलं आहे तर आपण काहीतरी वेगळं लिहावं. वाचन हा प्रचंड मोठा छंद. माझी चित्रकला तशी बरी होती, त्यात पाचवीच्या सुमाराला मासिकावरची चित्रं काढायचा छंद लागला. मिळेल त्या कागदाच्या चिठोऱ्यावर ती चित्रं काढलेली होती. सुरूवातीला जमत नसत तेव्हा सगळे म्हणायचे, 'अरे, डोळे चुकलेयत'. खरं तर इतर काहीतरी प्रमाणं बरोबर नसायची. पण ते ऐकून मला गंमत वाटायची. पुढे चांगली चित्रं जमायला लागल्यावर मग मात्र थोडंसं चुकलेलं असलं तरीही 'छान आलंय' अशी प्रतिक्रिया यायची.... नंतर परीक्षा तोंडावर आलेली असताना खूप चित्रं मोह घालायची. आणि मग मी अभ्यास सोडून चित्र काढत बसायचो. स्केचिंग आताशा मागे पडलंय, कधीतरी पुन्हा सुरू करेन.

पण सगळ्यांत ज्या छंदाने आयु्ष्य बदललं तो म्हणजे गणिताचा. आमच्या बाबांनी मला रविवारी दुपारी गुंतवून ठेवण्यासाठी गणितं घालायला सुरूवात केली. ती तोंडीच सोडवायची. त्यामुळे आकड्यांशी खेळणं हा एक मोठा विरंगुळा होता. इतर छंद जोपासायला सुद्धा त्याची मदत झाली, कारण दहावीपर्यंत अभ्यास करण्याची काहीच गरज नव्हती. कोडी सोडवणं हा असाच छंद. लहानपणी बुद्धीबळ बरं खेळायचो, अमेरिकेत आल्यानंतर वर्ष-दीड वर्ष त्याने झपाटलेलं होतं. तेही आता बॅकग्राउंड इन्फर्मेशन म्हणून आहे.

तसे इतर बारीकसारीक छंद बरेच आहेत. पण मला वाटतं छंद असणं हा एका जास्त मोठ्या प्रवृत्तीचा परिपाक आहे. ती म्हणजे कुठच्या तरी अचेतन वस्तूंमध्ये, रममाण होऊन जाणं, गुंगून जाणं. इतर मित्रमंडळींप्रमाणे खेळायचो वगैरे अर्थातच, पण पुस्तकं, चित्रं काढणं अधिक प्रिय. याचं मुख्य कारण मला वाटतं म्हणजे अशा गोष्टींनी गुंगून जाण्याची, तहानभूक हरपण्याची, काहीवेळा अतिरेक करून जगापासून तोडून घेण्याचीही... प्रवृत्ती. बिपिननी म्हटलेलं आहे की मी वाचनामुळे असा झालो. मला वाटतं या प्रवृत्तीमुळे हे छंद बळावतात.

राजेश

शुचि's picture

3 May 2010 - 9:33 pm | शुचि

छंदाला वाहून घेणं, त्यात रमून जाणं, देहभान हरपून , स्व विसरून झपाटून जाणं यासारखी सुंदर गोष्ट नाही. छंदांचे वैद्यकीय फायदे जरूर असणार. घासकडवी यांचा प्रतिसाद नेहेमीप्रमाणे सुरेख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

भोचक's picture

3 May 2010 - 9:19 pm | भोचक

काही दिवसांपूर्वीच या विषयावर लिहिणं झालं होत, त्यामुळे त्याचीच लिंक इथे देतोय. तरीही त्या लेखापलीकडे जाऊन सांगण्यासारखं बरंच आहे. वेळ मिळाला की सविस्तर लिहिनच.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2010 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिका, आपलं पुस्तक प्रेमाचा प्रवास मस्तच. बाकी, प्रतिसादही आवडलेत.
वेळ मिळाल्यावर आमच्याही पुस्तक प्रेमाबद्दल खरडतो..!

-दिलीप बिरुटे

सुशि ला कोणी ओळ्खत नाही वाटते ?

दुनियादारी - कितिहीदा वाचा , कुठुनही वाचा एव्हरग्रीन

धमाल मुलगा's picture

3 May 2010 - 10:01 pm | धमाल मुलगा

बास का...बास का...बास का भौ?????

सुशिशिवाय आणि त्याची दुनियादारी वाचल्याशिवाय कुणी कॉलेजचं आयुक्ष पार करु शकतो का? :D
च्यायला... सु शि म्हणजे द बेश्ट..द गिरेट ना!

मुक्तसुनीत's picture

3 May 2010 - 10:03 pm | मुक्तसुनीत

रमो
व्हिस्को
नही तो खिस्को.

संदीप चित्रे's picture

3 May 2010 - 10:34 pm | संदीप चित्रे

'दुनियादारी' म्हटलं की माझा हा लेख पुन्हा एकदा देण्याचा मोह आवरत नाही :)

प्राजु's picture

3 May 2010 - 9:48 pm | प्राजु

सुरेख धागा..
वाचनाची (आणि काही प्रमाणात लिखाणाची सुद्धा) आवड अगदी लहानपणापासून. हिमगौरी सात बुटके, गुहेतला ससा.. अशा गोष्टींपासून सुरूवात होऊन.. कॉमिक्स, चाचा चौधरी, चांदोबा वगैरे वाचत वाचत, मग सुहास शिरवळकर, वि स खांडेकर, शिवाजी सावंत,इरावती कर्वे यांच्यासोबतच कुसुमाग्रज, इंदिरा संत वाचून झाल्या. आईच लेखिका त्यामुळे घरात पुस्तकेच पुस्तके. कॉलेज मध्ये मात्र काही प्रमाणात कमी झालं वाचन.
पण आता इथे सुद्धा अमेरिकेत २० च्या वरती पुस्तके आहेत माझ्याजवळ. शिवाय मित्रमैत्रीणींकडून आणलेली वेगळी.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

sagarparadkar's picture

4 May 2010 - 6:02 pm | sagarparadkar

>> ...शिवाय मित्रमैत्रीणींकडून आणलेली वेगळी. ... <<

ही मित्र-मैत्रिणिन्कडून आण्लेली पुस्तके परत कर्ण्याची माझी पद्धतच नव्ह्ती. पुधे पुधे ते विसरुन जात कि आप्लेच एखदे पुस्तक ह्याने नेले आहे ... मग मी नव्या जोमाने पुस्तके मागाय्ला तयार ... काही मित्रन्ची तर इन्गिनियरिन्ग्ची पुस्तके पण अशीच माझ्याकडे येउन स्थिराव्लेली आहेत ...

टारझन's picture

3 May 2010 - 11:54 pm | टारझन

वर अणेक लेख आलेले आहेत :) त्यात बिपीनचाही एक दिसतोय ;)
मस्त लिहीलंय :) आपल्याला काही एवढं क्रेझ नव्हतं वाचनाचं :) आपण ठकठक , नागराज (डायमंड पब्लिकेशण्स ची सगळी कॉमिक्स) चांदोबा , अकबर आणि बिरबल , टारझन-द एप मॅण एवढाच आपला शौक ... बाकी उगाच "प्रतिसादात लेख" पाडण्याइतकं काही नाही ;)

- वाचिन भुतासार्खे

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 6:03 pm | धमाल मुलगा

>>बाकी उगाच "प्रतिसादात लेख" पाडण्याइतकं काही नाही
हाय कंबख्त तुने पी ही नहीं... :)
वाच टार्‍या, वाच...मग बघ कसं तुही भरभरुन लिहिशील पुस्तकांच्या आवडीबद्दल.

राजेश घासकडवी's picture

5 May 2010 - 1:12 pm | राजेश घासकडवी

टारझनसाहेब,

आजकाल तुमची सही विडंबणं आर लीव्हींग अ लाट टू बी डिझायर्ड बरका... सध्या काही टेण्शणमध्ये वगैरे आहात का? जे काय असेल ते होईल व्यवस्थित पण तुमच्या कलेवर असा परिणाम होऊ देऊ नका... काही काळ संण्यास घ्या हवा तर, पण तुमच्या लेखणीतून अशी केविलवाणी विडंबणं आली की हृदय गलबलून जातं. आता वाचिन भुतासार्खे हे बिपिन कार्यकर्तेच्या वृत्तात बिलकुलच बसत नाही. तुमचं विडंबण 'लिहिण आर्धमुर्धे' झालं. 'सहित पाट्याभर्ते'ही म्हणता येईल कदाचित. ते अगदीच 'दाणकन' पाडलं होतं का, या प्रतिसादासारखं?

'रिडिंग जास्तबूके' कसं वाटतं?

किंवा तुम्हाला स्वत:ला उद्देशून म्हणायचं असेल तरी
'हितिण वाच्लिफक्त' कसं काय?
किंवा तुम्हा स्वत:विषय़ीच
'उगिच काड्याकर्ते' हेही काही वाईट नाही.
'बरिक पिंकमार्ते' कसं काय वाटतं...
'लिहिन सहीपुर्ते' ही बरं आहे, म्हणजे प्रतिसादात लेख लिहायचा नाही म्हणून....

अजून हवी असल्यास सांगा...
राजेश घासकडवी (वा, बरं वाटलं वाचायलाच. हे नाव बिनविडंबणाचं बघण्याचीच सवय नाही...)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2010 - 1:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"कलेवर" या शब्दाची अंमळ मौज वाटली!
बाकी चालू द्या! ;-)

शब्देश मौजवाटवी (हे बळचकर)

टारझन's picture

5 May 2010 - 10:10 pm | टारझन

आजकाल तुमची सही विडंबणं आर लीव्हींग अ लाट टू बी डिझायर्ड बरका...

:) :) :)

- टारेश नावंपाडवी

सध्या काही टेण्शणमध्ये वगैरे आहात का? जे काय असेल ते होईल व्यवस्थित पण तुमच्या कलेवर असा परिणाम होऊ देऊ नका...

हाहाहा .. आम्हाला टेण्शण्स आहेत , तोवर स्वतःला फाट्यावर मारुन घ्या ... आणि जे असेल ते व्यवस्थित करूच करु :) आमच्या कलेची एवढी चिंता पाहुन डोळे मात्र पाणावले =))

- चिंतेश डोळेपाणवी

काही काळ संण्यास घ्या हवा तर, पण तुमच्या लेखणीतून अशी केविलवाणी विडंबणं आली की हृदय गलबलून जातं.

=)) =)) भलतेच विणोदी की हो तुम्ही !! टारझन ने कधी कोणाला काय वाटलं ह्याची काळजी केली नाही =)) बाकी तुमच्या नावांची सोलपटे काढल्यावर सुमाने ४५ व्यनि आणि ५०+ चॅट पिंग्ज मात्र आल्या बरंका =))
ते "कोल्गेट दातकिडवी" ,"हळुच गाजरहलवी" इत्यादीने आम्हाला वैयक्तिक मौज वाटली =)) बाकी तुमच्या त्या लेंड्या पाडल्यासारख्या कविता आणि दोन परिच्छेद वाचेस्तोवर घोरायला लावणारे लेख ही खुप खुप छाण असतात बरंका =))

- काव्येश बाराकडवी उर्फ लेखेश झोपउडवी

आता वाचिन भुतासार्खे हे बिपिन कार्यकर्तेच्या वृत्तात बिलकुलच बसत नाही.

=)) बरं बरं

- टारेश वृत्तमोडवी

तुमचं विडंबण 'लिहिण आर्धमुर्धे' झालं. 'सहित पाट्याभर्ते'ही म्हणता येईल कदाचित. ते अगदीच 'दाणकन' पाडलं होतं का, या प्रतिसादासारखं?

ह्म्म .. जळजळ पोचली !!

- इनोश जळजळवी

'रिडिंग जास्तबूके' कसं वाटतं?
किंवा तुम्हाला स्वत:ला उद्देशून म्हणायचं असेल तरी
'हितिण वाच्लिफक्त' कसं काय?
किंवा तुम्हा स्वत:विषय़ीच
'उगिच काड्याकर्ते' हेही काही वाईट नाही.
'बरिक पिंकमार्ते' कसं काय वाटतं...
'लिहिन सहीपुर्ते' ही बरं आहे,

स्तुत्य प्रयत्न , सरावाने कदाचित सराईतपणा येऊ शकेल. :)

- टारेश ट्रायमारवी

म्हणजे प्रतिसादात लेख लिहायचा नाही म्हणून..

आहो लाजता काय ? लिहा की लेख प्रतिसादांत =))

- लाजेश गाशकलवी

अजून हवी असल्यास सांगा...

हो हो ... णक्की सांगतो बरंका =))

- मागेश फुसकारवी

राजेश घासकडवी (वा, बरं वाटलं वाचायलाच. हे नाव बिनविडंबणाचं बघण्याचीच सवय नाही...)

खुलाश्याबद्दल धण्यवात

- बुडेश लालकरवी

राजेश घासकडवी's picture

5 May 2010 - 10:39 pm | राजेश घासकडवी

बिपिन कार्यकर्तेंची सहि विडंबणं ठीक करा म्हणून सांगितलं. तर ते सोडून तुमची रेकॉर्ड भलतीकडेच अडकलेली दिसते... वृत्ताची तक्रार तुम्हीच केली होतीत म्हणून आपलं दाखवून दिलं. असो, तुम्हाला जी टेण्शणं आहेत त्यापासून लवकर तुमची सुटका होवो ही प्रार्थना...

टारझन's picture

5 May 2010 - 10:46 pm | टारझन

हो का ? आम्ही पण बिपींदांच्या सहि विडंबणांविषयीच बोललो की !!
तुम्ही का धावतं गाढव ओढवुन घेताय ? आय मीन आमच्या रेकॉर्डची काळजी करताय ? :)
बाकी तुम्हाला नक्की आमच्या टेण्शण्स ची काळजी आहे की सहि विडंबणांची ? जरा "बेस पक्का करा " =))

- खोलेश जन्मकुंडली

चतुरंग's picture

5 May 2010 - 10:56 pm | चतुरंग

खव आणि व्यनितून भांडता येऊ शकेल!
चांगल्या धाग्याचा विचका नको.
(अन्यथा वरचे लाघवी संवाद उडवून टाकावे लागतील. ;))

चतुरंग

मनिष's picture

4 May 2010 - 11:25 am | मनिष

प्रकाटाआ.

sur_nair's picture

4 May 2010 - 1:34 am | sur_nair

माझे आई -वडील बेताचेच शिक्षित व मराठी / इंग्रजी अजिबात लिहिता वाचता यायचे नाही. पण तरीही वाचन व संगीताची आवड लागली, त्याचे खुपसे श्रेय शेजारी एक कुटुंब राहायचे त्यांच्यामुळे. वाचन मराठी आणि इंग्रजी, दोन्ही तितकेच आवडीचे. पुण्यात ब्रिटीश लायब्ररीचा सदस्य होतो तर आता US मध्ये तर पुस्तकांना काही तोटा नाही. वर्षात १५-२० पुस्तकं नक्कीच वाचून होतात. इंग्रजीचा विस्तार जरा जास्त कारण त्यात सर्व जगातील संस्कृतीबद्दल वाचायला मिळते. पुलं, सुनिता देशपांडे, रणजीत देसाई, नासं इनामदार, गोनीदा, Toni Morrison , Barbara Kingsolver, William Boyd , PD James हे काही आवडीचे लेखक (चटकन आठवले ते). संगीतात हिंदुस्तानी,मराठी नाट्यगीते, भावगीते, गजल, चित्रपट संगीत आवडते. गेल्या ४-५ वर्षात हिंदुस्तानी संगीत मुद्दाम शिकलो. शिवाय इतरही छंद आहेत. लेखन, गायन, अभिनय, भटकंती, नाटक-चित्रपट पाहणे, cooking वगैरे

अरुंधती's picture

4 May 2010 - 4:28 am | अरुंधती

मस्त धागा आहे.

अस्मादिकांचे वाचनवेड लहानपणीच दिसू लागले होते. त्यात नवलही नाही, कारण आई व बाबा दोघेही ठार वाचनवेडे!!!! आमच्या घरात त्यामुळे एकवेळ सर्वसामान्य घरांमध्ये आढळणार्‍या चीजवस्तू नसतील, पण ढीगभरून पुस्तके जरूर होती.
मला आठवतंय तेव्हापासून आईबाबांनी माझ्यासाठी भरभरून गोष्टींची पुस्तके आणली आहेत. चांदोबा, किशोर, आनंद, चंपक, फुलबाग, छावा मासिके दर महिन्याला घरी यायची. त्यांचा फडशा पाडल्याशिवाय चैन नसे. काकांकडे विचित्र विश्व, ठकठक यायचे. तेही त्यांच्याकडे जाऊन वाचायचे.

आमच्याकडे बाबा रशियन भाषांतरित पुस्तके घेऊन यायचे.... अशी अनेक पुस्तके वाचली. सूर्यावरचे वारे नावाचे एक सुंदर पुस्तकही होते त्यात. रशियन परीकथा, प्राणीकथाही वाचल्या. नंतर हॅन्स अ‍ॅन्डरसनच्या परीकथा, जादूच्या गोष्टी, भूत-खेत, राक्षस, पर्‍या, राजकन्या-राजपुत्रांच्या ह्या आभासी दुनियेत तर मी खूप रमत असे. सिंहासन बत्तिशी, अमरचित्रकथा, फास्टर फेणे, पौराणिक कथा वगैरे भन्नाट वाचत असे. टॉम अंकलचे केबिन ही वर्णद्वेषावर आधारित कथा त्या वयात मनास फार चटका लावून गेली. गंगा, यमुना नद्यांचा इतिहास, त्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व विशद करणारी त्याच नावाची सचित्र पुस्तकेही माझी खास आवडती होती. प्र.के.अत्र्यांच्या झेंडूची फुले व साष्टांग नमस्कारचे अनेकदा पारायण झाले. वि.वा.बोकील, गंगाधर गाडगीळांची लहान मुलांसाठीची पुस्तकेही खूप आवडायची. सुट्ट्यांमध्ये पुण्यातील साहित्य परिषद, नगर वाचनायलय, पुणे मराठी ग्रंथालय अशा ग्रंथालयात ठिय्या असायचा.... रोज सकाळ संध्याकाळ पुस्तके बदलून आणायची! शाळेच्या ग्रंथालयातूनही पुस्तके आणायचे. सकाळी उठल्यापासून रात्री झोप अनावर झाल्यावर डोळे मिटेपर्यंत सतत नाक पुस्तकात खुपसलेले असायचे. त्यामुळे अनेकदा समोरचे ताट/खाणे तसेच दुर्लक्षित राहणे, आवरायला विसरणे, अंधार पडला तरी दिवे न लावता तस्सेच अंधुक प्रकाशात डोळे ताणताणून वाचणे वगैरे प्रकार खूप केले व त्याबद्दल धपाटेही खाल्ले, पण सुधारणा नाही!!!!
एका सुट्टीत मातृस्मृती ग्रंथालयाचे सभासदत्व घेतले. त्यांच्याकडे सगळी धार्मिक, पौराणिक पुस्तके! त्यातील असे अनेक खंड वाचून काढले. कथाकल्पतरु नावाचे सात खंड वाचले. सर्व पौराणिक कथा.... त्यात बरेच माझ्या वयाला अनाकलनीय काय काय [प्रौढांसाठी फक्त!] होते, मग प्रश्न विचारून घरच्यांच्या तोंडचे पाणी पळवले!!! त्या पढित ज्ञानाचे दिवे नको तिथे पाजळून अजूनच कहर केले.
लिओ टॉल्स्टॉयचे वॉर अ‍ॅन्ड पीस अनुवादित पुस्तक पाचव्या यत्तेत वाचून काढले. त्यातले बरेचसे डोक्यावरून गेले ते वेगळे! शाळेत अवांतर वाचनासाठी जी जी पुस्तके असायची ती ती त्या यत्तेत प्रवेशण्याअगोदरच वाचून संपलेली असायची. स्वामी, मृत्युंजय, तुंबाडचे खोत पासून शेक्सपियर पर्यंत जे जे मिळेल ते ते वाचले. शेरलॉक होम्स तर खराच वाटायचा! शिवाय पुढच्या यत्तेची मराठी, इतिहास, इंग्रजीची पुस्तके खाऊसारखी सुट्टीतच वाचून संपवायचे.

आई-बाबा बाहेरगावी गेले की त्यांना घरी परतल्यावर माझा पुस्तक टॅक्स द्यावा लागे. शिवाय वाढदिवस, खास प्रसंगाला पुस्तक भेट मिळाले की खजिना मिळाल्याचा आनंद होई.
आमच्या वाड्यात तळमजल्याला बाह्य भागी एक प्रसिध्द पुस्तकांचे दुकान होते. मी अनेकदा त्यांच्याकडे पुस्तक घ्यायला म्हणून जाई, आणि तिथेच काऊंटरपाशी स्टुलावर बसून न वाचलेली नवी नवी पुस्तके वाचून काढत बसे. मग लाजेकाजेस्तव आईला तिथून एखादे पुस्तक विकत घ्यावेच लागे!! शेजारी-पाजारी ही अशीच पुस्तकांची दोन-तीन दुकाने होती. तिथेही जाऊन पुस्तकांच्या विश्वात रमण्यात, कोर्‍या पुस्तकांचे वास भरभरून घेण्यात फार मौज येई.

शाळेत तर प्राथमिक मध्ये असताना आम्ही वर्गमैत्रिणींनी आपापसात पुस्तक लायब्ररीच सुरु केली होती. त्याची फी म्हणजे चॉकलेटच्या चांद्या, पिसे, शिसपेन्सिलीचे बुटुक वगैरे असायची! अशीही खूप पुस्तके वाचली.

नकाशावाचन देखील खेळाच्या माध्यमातून शिकलो. वडीलांनी भारताचा एक मोठा नकाशा तक्तास्वरूपात भिंतीला लावला होता. आम्ही भावंडे एकत्र जमलो की ''गाव शोधून दाखवा'' खेळत असू.... एकाने नकाशातील एखादे गाव इतरांना ठराविक वेळेत हुडकायला सांगायचे....खूप धम्माल यायची खेळताना....

एक ऑक्सफर्डची सचित्र डिक्शनरीही होती....ज्यात मानवी शरीर, प्राणी, पक्षी, वाहने, कपडे, खाद्यपदार्थांची भांडी, अवजारे इ.इ. वर्गीकरण करून त्यांची सचित्र इंग्रजी नामे व त्याचे उच्चार, मराठी अर्थ इ.इ. दिलेले असे. त्या डिक्शनरीचाही आम्ही खेळासाठी उपयोग करत असू. त्यातील वेगवेगळे शब्द हुडकून काढायचे वगैरे. काही चिनी पुस्तकेही होती. गोंडस चित्रे, अप्रतिम रंगसंगती, अनाकलनीय भाषा/ लिपी व अतिशय सुरेख दर्जाचा कागद अशी ती पुस्तके मुळात इतकी अर्थवाही होती की त्यांना वारंवार निरखणे हा एक छंदच होता.

अनेक नव्या पुस्तकांच्या धारदार कडांनी खूप वेळा हात कापला गेला आहे. नव्या पुस्तकाला कव्हर घालायचे म्हटले की मला मळमळायला व्हायचे. इतक्या सुंदर मुखपृष्ठाला का म्हणून झाकायचे???? आणि आईवडीलांनी कव्हर घालायला लावलेच तरी ते काहीच दिवसांत जीर्ण होऊन फाटायचे, इतकी मी त्या पुस्तकाला हाताळत असे, व वारंवार कव्हर उलगडून मुखपृष्ठ पाहत असे!!
असो.
हे सर्व वाचन साधारण इयत्ता सहावी पर्यंतचे आहे. आता पुढचे वाचन पुढच्या प्रतिक्रियेत!! हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्!!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

4 May 2010 - 6:16 am | शुचि

विचीत्र विश्व आणि सिंहासन बत्तीशी ची छान आठवण करून दिलीस. आजोबा "सोव्हिएट युनिअन" (तेच नाव होतं वाटतं) घ्यायचे ..... मी ते पण वाचायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

sagarparadkar's picture

4 May 2010 - 6:11 pm | sagarparadkar

"सोव्हिएट देश" आणि "सुर्यावर्चे वारे" अशी ती पुस्तके ... शिवाय कोलेज्मधे अस्ताना कोणाला तरी शोध लागला कि विज्ञानावर्ची रशियन प्रकाशकान्ची पुस्तके अधिक सोपी असतात .... मग ती पुस्तके मित्रन्कडून मिळ्वून वाचाय्ची ....

चित्रा's picture

4 May 2010 - 5:13 am | चित्रा

वरच्या बर्‍याच लोकांसारखेच अनुभव आहेत.
पुस्तके वाचण्याचा मला नाद होता, आता आठवतही नाही कधी लागला ते.
बहुदा घरातूनच आवड होती.

नंतर सविस्तर लिहीते.

घरातली/शेजारची सर्वांची वाचनाची आवड असे आहे. बहुदा माझी जनुके कारणीभूत असावीत! ;)

वडिल, दोन्हीकडचे आजोबा, काका, मावश्या सगळेच आपापल्या परीने भरपूर वाचत असत. आणि आम्ही भावंडेही. (आमचे एकत्र कुटुंब असल्याने सर्वांची पुस्तके राहतील अशी भिंतीतली कपाटे असलेली एक खोलीवजा जागा होती होती) - त्याला काही कारणाने आम्ही मधला पॅसेज म्हणत असू, खरे तर हा मधला पॅसेज कुठेच जात नसे!

आमच्या गावी आमचे आजोबा ज्यांच्याकडे आश्रित म्हणून एकेकाळी वाढले अशा एका सद्गृहस्थांच्या घरी अक्षरशः जमिनीपासून ते वरच्या छतापर्यंत जागा मिळेल तिथे पुस्तके ठेवलेली असत, तीही सगळी त्यांच्याकडे दोन चार महिन्यांनी गेले की वाचत असे.

असो. तर भरपूर वाचत होते. अगदी परिकथांपासून ते विंदा करंदीकरांच्या कविता, आणि पुल, श्रीमान योगी. इ. इ. रशियन कथा, नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके आणि इंग्रजी वगैरेही बरेच काही. माझ्या बहिणीचे लग्न ठरल्यापासून तिचे सासर जवळच असल्याने इंग्रजी पुस्तके मला तिच्या सासर्‍यांकडून मिळायला लागली.

बाकी म्हणजे भाषांतरे आणि लेख, आणि मुख्य म्हणजे रोजचे चार आणि रविवारची नऊ वर्तमानपत्रे! त्यामुळे वाचनाचा छंद म्हणण्यापेक्षा माझा अविभाज्य भाग होता, पुस्तके म्हणजे.

दुसरा छंद म्हणजे गाणे ऐकणे/गाणे. गायला अजूनही आवडते, पण एक दोन वर्षांपलिकडे शिकू शकले नाही, आणि आता आवाज उरला नाही. पण ऐकण्याचा प्रयत्न करते.

मीली's picture

4 May 2010 - 7:03 am | मीली

छान पुस्तक वाचायला असेल तर दुसरे काही नको ....पुस्तकांसारखे मित्र नाही म्हणतात ना.
आई ने लहानपणापासून वाचायची सवय लावली,बदली झाली तरी ती आधी लायब्ररी शोधायची मग तिच्या बरोबर मी पण पुस्तके घ्यायची .गोट्या,श्यामची आई ,पर्या नी राक्षसांच्या गोष्टीत रमायची.
नन्तर मग सानिया ,स्नेहलता दसनूरकर,शैलेजा राजे,पुलं देशपांडे यांचे कथा संग्रह वाचून काढले.माहेर ,मेनका मध्ये पण छान कथा असायच्या.
अनिल अवचट यांची पुस्तके पण संपल्याशिवाय चैन पडत नाही.सध्या ऋजुता दिवेकर चे पुस्तक वाचले ,डोंट लूज युवर माईण्ड,लूज युवर वेट!मस्त आहे.
एखादे छान पुस्तक हाताला लागले कि झपाटून टाकल्यासारखे होते मग घरातल्या इतरांची चिडचिड पण जाणवत नाही.
पण इकडे दुसर्या देशात मात्र पुस्तकांचा तुटवडा प्रकर्षाने जाणवतो.मग कोणी इकडे येणार असेल तर पुस्तके मागवली जातात.....नाहीतर नेट वर शोधाशोध.
लोकसत्ता मुळे लोकप्रभा वाचायची छान सोय आहे.मिपावर पण छान लेखन वाचायला मिळते.

मीली

केशवसुमार's picture

4 May 2010 - 7:58 am | केशवसुमार

बिका मस्त लेख..
आमच्या लहानपणीच्या वाचनाच्या आवडीची आठवण झाली..
आमची वाचनाची आवड एकदम जगावेगळी होती..
आई किंवा बाबांनी वाचनालयातून पुस्तकं आणलं की ते दोन्ही बहिणींच्या आधी ताब्यात घ्यायचे..आणि वाचून होईपर्यंत ते लपवून ठेवायचे..त्यावरून भांडण पण केलीत..
आमचा वाचनाच वेग इतका प्रचंड असायचा की घरचे सगळे वैतागून जायचे.. शेवटी आमचा एक अलिखित करार झाला.. पुस्तक घरी आले आणि जर का मी सर्वांच्या आधी ताब्यात घेतले तर (की जे मी नेहमीच घ्यायचो) माझ्या बहिणींनी ते मोठ्यांने वाचायचं आणि मी आरामात लोळत ऐकायचे..पुढे इंजिनिरिंगची चार वर्षे आभ्यास असाच केला आमच्या एका मित्राला मोठ्याने वाचल्याशिवाय लक्षात राहायचे नाही.. मी त्याच्या घरी जायचो ऐकायला ...आभ्यासाला.. ;)
स्वःता होउन जे काही वाचले ते सुशि च बहुदा... नंतर पाडगावकर, करंदिकर आणि बापट प्रत्यक्ष ऐकायला मिळाले आणि कवितेने पछाडले..कविता कसे एकदम आटोपशीर.. १०-१२ ओळीत खेळ खलास.. कोणी सांगितल ते पान पान.. किलो किलो वाचायला..अगदिच प्रसिद्ध पुस्तक असेल तर पहिली १-२ पने आणि शेवटची १-२.. येव्हडीच आमची साहित्य सेवा अता शिल्लक आहे..

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 2:23 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =))
च्यायला..इथंही विडंबन? वाचनाचंच?
धन्य आहात!

समंजस's picture

4 May 2010 - 11:35 am | समंजस

वा!! छान!! वाचून आनंद झाला :)
मी पण असाच आहे.....वाचनाच्या बाबतीत बराचसा पुलंच्या सखाराम गटणे सारखा(फक्त ते मराठी तेव्हढे बोलणे सोडून).... :)
काहिही, कितीही चालतं...वाचायला..कुठल्याही विषयांचे वावडे नाही... :)

नितिन थत्ते's picture

5 May 2010 - 4:34 pm | नितिन थत्ते

>>सखाराम गटणे सारखा
हे वाक्य काळजाला भिडले. :|

नितिन थत्ते

विशाल कुलकर्णी's picture

4 May 2010 - 12:01 pm | विशाल कुलकर्णी

बिकाभाऊ जागा बुक करून ठेवतोय, नंतर सविस्तर लिहीन.
बाकी लेख मस्तच तुमचा ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

नंदन's picture

4 May 2010 - 12:06 pm | नंदन

लेख. वाचण्याच्या आवडीबद्दल लेखात आणि काही प्रतिक्रियांत लिहिल्यासारखेच अनुभव आहेत. पुढे याच छंदातून भटकंतीची आवड निर्माण झाली, हीसुद्धा माझ्या दृष्टीने एक जमेची बाजू. सविस्तर लिहितोच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अमोल नागपूरकर's picture

4 May 2010 - 12:15 pm | अमोल नागपूरकर

माझा वाचनप्रवास सुरु झाला चान्दोबा पासून. आजही त्याचा अन्क पाहिल की मन मोहरून येते. सोबत चम्पक , इसापच्या बोधकथा, पन्चतन्त्र, जातक कथा, अरेबिअन नाइट्स वगैरे होतेच. घरात मिशा नावाचे एक लहान मुलान्करिता ईन्ग्रजी मासिक येत असे. त्यात रशियन भाषेतील सुन्दर कथा इन्ग्रजीत अनुवादित करून दिल्या असत.

८-९ वर्षान्चा असताना सर्वात पहिली कादम्बरी म्हणजे रणजित देसाईची 'श्रीमान योगी'. तेव्हापासून ऐतिहासिक कादम्बर्यान्चा असा काही चस्का लागलाअ की रणजित देसाई, ना स ईनामदार, बाबासाहेब पुरन्दरे ह्या सर्वान्चा एकदम फडशा पाडल्या गेला. अर्थात त्यापायी अभ्यास आणि खेळ ह्या दोघान्कडेही दुर्लक्ष आणि म्हणून आइबाबान्चा ओरडा !!!!! उन्हाळयाच्या सुट्टीत महिनाभर मामाकडे ठाण्याला आलो की रोज तिथल्या लायब्ररीमध्ये जाऊन एक पुस्तक वाचायचो. पुल, खाण्देकर, कुसुमाग्रज , शिवाजी सावन्त इत्यादिन्शी तिथेच ओळख झाली. महिनाभर काही नाही. फक्त,"मी आणि पुस्तक" बस.
नोकरि लागल्यावर माझी पोस्टिन्ग एका आदिवासी खेडेगावामध्ये झाली. तिथे एक बन्द पडलेली लायब्ररी होती. मित्रन्सोबत आम्ही ती परत सुरु केली. एका बी लिब मित्रानी पुस्तके नीट लावून दिली. एकन्दरित तो अनुभव फारच चान्गला होता.
एम टेक साठी आय आय टी मुम्बै मध्ये आलो असताना तिथे होस्टेल्मध्ये लायब्ररी होती. तिथे पहिल्यान्दा इन्ग्रजी साहित्याशी गाथ पदली. तसेच तिथल्या सेन्ट्रल लायब्ररी मध्ये ही खूप चान्गली साहित्यिक पुस्तके आहेत.
नन्तर मुम्बैत पोस्टिन्ग मिळाल्यावर तर तिथल्या कार्यालयातही खूप मोठी लायब्ररी होती. लग्नापूर्वी घरी काहिच काम नसल्याने मी पूर्णपने वाचनानन्द घेऊ शकत होतो. वेळ खरेच मजेत जायचा. इतर मित्राना खरच नवल वाटायचे की ह्याच्याकडे टी व्ही नाही मग हा टाइम पास कसा करतो !!!!!!!!!!
आता नोकरि आणि इतर प्रापन्चिक जबाबदार्यान्मुळे वाचन फक्त न्यूजपेपर पुरते सीमित झाले आहे. पण वाचण्याची भूक अजुन शमलेली नाही. ह्या वीकान्ताला नाशिकला गेलो असताना मी भाच्याला चान्दोबातील गोष्टी वाचून दाखवल्या. त्याच्यासोबत परत एकदा मी वाचनातील गम्मत अनुभवली. भाच्याला वाचनाची गोडी लागलेली पाहून जो आनन्द झाला त्याची खरच कशाशीही तुलना होऊ शकत नाही. वाचन सन्स्क्रुतीचा विजय असो !!!

वेदश्री's picture

4 May 2010 - 1:35 pm | वेदश्री

मस्तच विषय आहे आणि अनुभवही कमीजास्त प्रमाणात तेच.

शाळाकाळजातल्या पुस्तकांचीदेखील अ‍ॅलर्जी नव्हती मला. उन्हाळ्याच्या सुट्टीत गणिताची पुस्तके घेऊन यायचे मी सर/मॅडमकडून.. घरगुती उन्हाळी कामांचा (गहू निवडणे, पापड लाटणे, वगैरे) कंटाळा आला की करमणूक म्हणून त्यातली गणिते सोडवायला भारी मजा यायची. गणित सुटल्याचा आनंद शेअर करायला कोणी मिळायचे नाही म्हणून काहीसा हिरमोड झाला तरी व्यसन लावेल असाच स्वर्गीय आनंद असायचा तो. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिशच्या पुस्तकांचेही तेच. लवकर विकत आणले की गोष्टी वाचून संपवता यायच्या त्यातल्या. इतिहास आवडत नसला तरी त्यातल्या गोष्टी नामावळ्या, सनावळ्यांच्या पलिकडे जाऊन समजून घ्यायला खूप आवडायचे.

चंपक, चांदोबा वगैरे विकत घेणे परवडण्यातले नसले तरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आईने घेतलेली फुला, खडकावरला अंकुर, गोट्या, चिंगी, फास्टरफेणे, टारझन वगैरे पुस्तके मात्र अगदी वेड लावणारीच ठरली. परीराक्षसांच्या पुस्तकांची खरेदी आईने कधी केली नाही त्यामुळे त्या स्वप्नांमध्ये रंगणे काय असते ते कळले नाही.. आणि ते अगदी उत्तमच झाले असे आज प्रकर्षाने वाटते. परीक्षेत छान गुण मिळवले म्हणून किंवा वाढदिवसाला भेट म्हणून खास पुस्तके मिळायची. शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल मिळालेल्या बक्षिसाच्या पैशातून 'माझी जन्मठेप' विकत घेताना जग जिंकल्याचा आनंद झाल्याचे आजही अगदी स्पष्टपणे आठवतेय. शाळेच्या लायब्ररीतून चुकून वाचायला मिळालेल्या 'राधिका' पुस्तकाने विज्ञानकथा वाचण्याची गोडी लागली ती जयंतमामाने लिहिलेल्या प्रेषित, वामन परत न आला वगैरे कादंबर्‍यांच्या प्रवासातून वृद्धींगत होऊन आज मराठीपासून इंग्रजीपर्यंत पसरली आहे.

बाबांना सर्व धर्मांबद्दल जाणून घेण्याची कायमच मनस्वी हौस.. त्यातून मनाच्या श्लोकांपासून सुरू झालेली माझी वाटचाल त्यांच्या पोथ्या, पंचांग, दासबोध, बायबल, कुराण वगैरे करतकरत आज अमेरीकेत गेलेले असताना तिथे नील नामक दोस्ताने भेट म्हणून दिलेल्या बुक ऑफ मॉर्मन पुस्तकापर्यंत येऊन पोहोचली आहे. भेटीवरून आठवले.. दोस्तांना पुस्तकेच भेट देण्याचा आमचा अलिखित प्रघातच आहे. शाळाकॉलेजात असो, खेळाच्या मैदानात असो, ऑफिसमध्ये किंवा कुठे फिरायला जाता ओळख झालेली असो.. माझ्यासारखेच पुस्तकवेड असलेल्या दोस्तांचा क्लब बनायला वेळ लागत नाही. त्यातूनच इ-पुस्तके वाटण्याचा सपाटा सुरू झाला. एकाने एक पुस्तक आवडले म्हणून शेअर केले की त्याला उत्तरादाखल त्या पुस्तकावरची प्रतिक्रिया (ते आधीच वाचलेले नसल्यास वाचून!) तर द्यायचीच पण आपल्याला आवडलेल्या दुसर्‍या पुस्तकाची इ-प्रतदेखील उपलब्ध करून देऊन त्यावर थोडक्यात माहिती द्यायची. भरपूर पुस्तकांची माहिती तर मिळालीच पण अनेक भन्नाट दोस्तही मिळाले.

बाबांच्या कामानिमित्त आणल्या/मागवल्या गेलेल्या आर्थिक विषयांवरच्या पुस्तकांचा फडशा पाडायला त्रास हा की इतके जडजड आणि न कळणारे शब्द एकत्र एकाच वाक्यात वाचून त्यांचा अर्थ समजवून घेताना डोक्याला भारी शीण यायचा, झोप यायची.. कधी गाढ झोपूनही गेलेय मी त्या नादात.. पण तरीही वाचून काढलीच!

आईला नेहमीच्या साहित्यविषयात तर रस आहेच पण विणकाम, भरतकाम, बागकाम, पाककला वगैरेतही आवड.. मग त्याविषयांवरची पुस्तकेही घरात न आल्यास नवल. घरात आले की त्यातले सगळे करून बघायचे याचीही हौस तितकीच डोक्यावर स्वार व्हायची. मग ओळखीतल्यांकडे रुखवत, बाळंतविडे वगैरे करण्यासाठी बाजारातून काही आणायची गरज पडणे बंद झाले असल्यास.. नवल ते काय!

आज आमची आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा सुधरलेली असल्याने हक्काची पुस्तके विकत घ्यायला हाताला सवड झाली आहेच शिवाय घरातच एक पुस्तके ठेवायला योग्य अशा कपाटांनी भरलेली, ती वाचायला एक टेबल खुर्ची असलेली लिब्रा (लायब्ररीची खोली) मिळाली आहे पुस्तकांना. सर्व चांगल्या पुस्तकांचे खुल्या दिलाने स्वागत करते आमची लिब्रा.

चेतन's picture

4 May 2010 - 2:52 pm | चेतन

मी एव्हढा पुस्तकवेडा कधिच नव्हतो

शाळेनंतर किंवा रिकाम्या वेळात फक्त खेळ खेळ आणि खेळ.

मग आई बर्‍याच वेळा दमटवुन वाचनालयात पाठवायची. मी दोनदा इकडुन तिकडे फेर्‍या मारायचो मग पुन्हा खेळायला पसार

लहानपणी कधितरि चांदोबा, चंपक किंवा थोड नंतर फास्टर फेणे वाचलेल आठवतयं

पुढे कधीतरी वेळ जात नाही म्हणुन मार्मिक, आउटलुक वाचलं

सुशी, पुलं, वपु कधीतरी असेच

कॉलेजनंतर जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा हळुहळु वाचयला सुरवात झालि पण बहुतेक वेळेला रात्रिच. पण एक मात्र होतं एकदा पुस्तक हातात घेतलं की ते संपेपर्यंत मन ठिकाणावर नसायचं बहुतेक वेळा सलग वाचुन पुर्ण कारायचो
अशीच रात्रभर जागुन म्रुत्युंजय, महानायक दिवसभरात संपवलेली पुस्तके आठवली की हे जर अभ्यासाबाबात १/१० पट जरी केलं असतं तरी बरच होतं
असो तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकवेडाला मात्र सलाम

चेतन

झकासराव's picture

4 May 2010 - 3:59 pm | झकासराव

वा!!
लेख आणि प्रतिसाद वाचुन कळाल की आपल्यासारखे बरेच येडे आहेत.
बिपिनसेठ मस्त लिहिलय. :)

cant we share the books we have if we are in same city?
मी पुण्यात आहे (nearby sahakarnagar). मला आवडेल पुस्तकं share करायला. मात्र पुस्तकं नीट वापरावीत आणि वेळेवर परत करावीत ही अपेक्षा.

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 6:01 pm | धमाल मुलगा

पण लफडं तेच आहे ना.
आपण जीवापाड जपतो पुस्तकं, कोपरा मुडपला तरी जीव तीळतीळ तुटतो, पण आणखी कोण कसं वापरतं ते कुठे ठाऊक असतं?
मला स्वत:ला, कोणी पुस्तक दुमडुन वाचताना दिसलं की नुसता राग राग होतो! अरे...पुस्तक म्हणजे काय पेपर आहे काय?
बरं, पुस्तकाच्या मलपृष्टावर चहाचा कप ठेवल्याचे डाग वगैरे हा आणखी एक त्रास..परत येताना पुस्तकं खिळखिळी होऊन आली की आणखी चिडचिड!
मित्रांनी मागितलं म्हणुन वाचायला दिलेली रॉबर्ट लुडलमची जवळपास सगळी पुस्तकं जेव्हा परतच नाही आली तेव्हा ठरवलं, अगदी आपल्यासारखा होपलेसली वाचक असल्याशिवाय पुस्तक त्याला द्यायचंच नाही.
उगाचच मानसिक त्रास होतो.

.कोणी पुस्तक दुमडुन वाचताना दिसलं की नुसता राग राग होतो! अरे...पुस्तक म्हणजे काय पेपर आहे काय?

बाकी पुस्तक वाचण्यासंदर्भात माझं नि आमच्या एक मित्राचं स्वप्न आहे. नोकरी फॉरेस्ट खात्यात असावी. कुठल्याशा तालुक्याच्या किंवा त्याहून छोट्या गावी. (म्हणजे काम कमी असतं म्हणे.) मग बाज-खाट टाईप अंग पसरून द्यायला व्यवस्था हवी. शेजारी चिवडा, फरसाण, डोनेट, क्रीमची बिस्किटं वगैरे असावे. मस्त तंगड्या पसरून वाचत बसावे. विशेषतः गुप्तहेर कथा. शिवाय या काळात कुण्णी म्हणजे कुण्णी डिस्टर्ब करायला नको.
(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

श्रावण मोडक's picture

4 May 2010 - 7:06 pm | श्रावण मोडक

लय भारी स्वप्न... माझंही!

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 7:11 pm | धमाल मुलगा

तुमचा तो मित्र म्हणजे मीच की काय अशी मला शंका आली :)

फरक इतकाच, फॉरेश्ट हापिसर वगैरे नाही, पण सालं गावाकडं चौसोपी वाडा वगैरे असावा...गडीमाणसं कामाला लावली की मस्त बाजेवर पडुन शेजारी हुक्का घेऊन आणि मध्येअध्ये तोंडात टाकायला अबरचबर खाणं घेऊन निवांत तंगड्या पसरुन पुस्तकं कुरतडत बसावं. :)

ओहोहो....स्वर्ग स्वर्ग म्हणजे तो हाच, नाही का?

तुकाम्हणे's picture

4 May 2010 - 10:30 pm | तुकाम्हणे

१०० % सहमत, मी तर अजुनही ह्याचेच प्लांनीग करतो की हे स्वप्न पुर्ण कसे करायचे. :) पुढच्या ३-४ वर्षांचे प्लांनीग पुर्ण होत आले आहे, मग नक्की हा स्वर्ग मिळेल :> कोणाला जॉइन व्हायचे असेल तर सांगा

बाकी बिका, आम्हाला लिहीता येत नाहि, तुम्ही आमचे विचार शब्दात मांडायचे काम घेणार का? अगदी मनतले विचार मांडलेत.

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

धमाल मुलगा's picture

5 May 2010 - 4:11 pm | धमाल मुलगा

क्या बात है! आमचा नंबर लाऊन ठेऊ का? :)
येऊ कधीमधी पाहुणचार झोडायला..हां, पिशवीभर पुस्तकं सोबत आणुच :)

फक्त, सकाळी विहीरीत डुंबणे, संध्याकाळी दोन्/एक ग्लास बीर आणि गप्पा एवढे मिळवले की स्वर्गातील देव हेवा करतील असा स्वर्ग !

ह्या वेलींखाली थोडेसे अन्न,
कवितेचे पुस्तक आणि मदीरेची सुरई
शेजारी तू गाणारी माझ्यासाठी ,
अजून कुठे आणि कसला स्वर्ग ?
-ओमर खय्याम.

स्वर्ग म्हणजे अजून काय असते ?…..आणि कशाला शोधायला जायचा तो ?…..

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

खडूस's picture

5 May 2010 - 9:13 am | खडूस

हे तर माझेच स्वप्न आहे :)

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

वेदश्री's picture

5 May 2010 - 12:00 pm | वेदश्री

उताणे झोपून अजिबात इकडेतिकडे न करता पुस्तक वाचायला त्रास होतो त्यामुळे बाजेऐवजी दोन झाडांमध्ये मस्तपैकी नेट स्विंग लावून त्यात हलक्यानेच झोके घेत पुस्तक वाचायला मला अत्यंत आवडेल. झाडांच्या गर्द सावलीत, वार्‍याच्या हव्याहव्याशा झुळकींसोबत नेट स्विंगमध्ये पडून पुस्तक वाचायला अगदी योग्य अशी सेटींग होते. पुस्तक वाचताना काही खाण्यापिण्याचीही दखलंदाजी नको बा! माझी ही स्वप्नपूर्ती लवकरच होणार.. यात शंका नाही. :-)

संदीप चित्रे's picture

4 May 2010 - 6:51 pm | संदीप चित्रे

च्यायला लोक पण बुक मार्क वगैरे वापरण्यापेक्षा सरळ पानाचा कोपरा दुमडतात रे !

अजून दुसरे महाभाग म्हणजे पुस्तकातल्या आवडलेल्या ओळी / परिच्छेद वगैरे लाल पेनने अधोरेखित करून ठेवणारे !

नवीन पुस्तक घेतलं की त्याला प्लॅस्टिकचे कव्हर घालून घ्यायची सवय गेल्या कित्येक वर्षांपासून. अप्पा बळवंत चौकात, रतन टॉकिजजवळ, मिळतात अशी कव्हर्स घालून.

माझा धाकटा भाऊही माझ्यासाठी पुस्तकं पाठवताना आवर्जून त्या पुस्तकांना कव्हर घालूनच पाठवतो.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

छोटा डॉन's picture

5 May 2010 - 9:23 am | छोटा डॉन

>>अजून दुसरे महाभाग म्हणजे पुस्तकातल्या आवडलेल्या ओळी / परिच्छेद वगैरे लाल पेनने अधोरेखित करून ठेवणारे !
+१, सहमत आहे.

ह्यानिमित्ताने अजुन एक आठवले म्हणजे लायब्ररीतुन आणलेल्या पुस्तकांवर काही लोक उपरोक्त "लाल रेषा, खुणा, कंस" वगैरे टाकुन त्याच्यापुढे कोपर्‍यात दिमाखात ' हाण्ण तिच्यायला, एकदम पटले बघा, छे छे फारच एकांगी वाटले, हम्म् ह्यावर अधिक विचारमंथन घडायला हवे' अशा मजेशीर कमेंट्स लिहुन ठेवतात./
एकदा मी मिरासदारांचे एक पुस्तक आणले होते आणि त्यात 'नाटक' ह्या प्रकरणावर एका महाभागाने पानांच्या उअर्लेल्या जागेत चक्क 'पर्यायी कथा' लिहुन ठेवली होती.
१ अनमोल ठेवा म्हणुन मी ते पुस्तक अजुन ग्रंथालयाला परत केले नाही ;)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

रामदास's picture

5 May 2010 - 10:56 am | रामदास

रॉबर्ट लुडलमची जवळपास सगळी पुस्तकं जेव्हा परतच आली नाहीत कारण त्याचं वजन चांगलं भरतं.
वि. आ. बुवांच्या संग्रहात बरीच पुस्तकं होती. त्यांनी कपाटावर सूचना लिहीली होती.
कृपया पुस्तके वाचण्यासाठी मागू नयेत.
ही सूचना आपल्यासाठी नाही असे ज्यांना वाटते त्यांच्या साठीच ही सूचना आहे.

(ऐकीवात पण उपयुक्त किस्सा आहे.)

मनिष's picture

5 May 2010 - 11:07 am | मनिष

आणि विजुभाऊ (किंवा पुण्याला उगाचच शिव्या घालणारे इतर कोणी) आले घरी म्हणजे उगाचच "पुणेरी पाट्या" मधे अजूण एकाची भर पडायची! :(

बाकी धम्याशी सहमत. आपल्याला आवडणारी पुस्तके किंवा कॅसेट्/सी.डी. खराब झाल्यचे, हरवल्याचे अनुभव मी ही घेतलेत आणि आता शेवटी देणे जवळजवळ बंद केलय...

मनिष
(अवांतर : कुठे रहायचे हे वि आ बुआ?)

रामदास's picture

5 May 2010 - 11:14 am | रामदास

रहायचे कल्याणला.
कामाला व्हिजेटीआयला.(संग्रहाचा कामाशी काही संबंध नव्हता.)

मनिष's picture

5 May 2010 - 11:35 am | मनिष

एकदम ब्येष्ट्ट!!!

बुवा पुण्यात रहात नव्हते हे वाचून जीव भांड्यात पडला! ह. घ्या. :)

चित्रा's picture

6 May 2010 - 6:30 am | चित्रा

त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला आहे. त्यांची प्रचंड टापटिपीची खोली आणि डेस्क पाहिले आहे.
त्यांच्या डेस्कमध्ये एक किंवा फारतर दोन पेन्सिली मावतील अशा उंचीचे आणि रूंदीचे लहान-लहान कप्पे होते. प्रत्येक पेन्सिल ही जागच्या जागी. पेन जागच्या जागी. आणि शाईची दौत पाहिल्याचे आठवते.
त्यांचे अक्षर भलतेच वळणदार आणि सुंदर आहे.

मुक्तसुनीत's picture

6 May 2010 - 7:53 am | मुक्तसुनीत

.. मग लिखाण इतके भीषण का आहे हो ?
(हघ्या !) :-)

चित्रा's picture

6 May 2010 - 8:13 am | चित्रा

कसलाही आव न आणता लिहीणारे लेखक म्हणून बुवा मला आवडतात.
आपले बुवा असे आहे. :)

विनोद जाऊ दे - बुवा माझ्या माहितीप्रमाणे अतिशय रोखठोक, थेट आणि सरळमार्गी गृहस्थ आहेत.

स्वाती२'s picture

4 May 2010 - 6:25 pm | स्वाती२

वाचनाच वेड कधी लागलं ते आठवतही नाही. पण लागलं त्याला कारण माझी आई आणि माझा चुलत भाऊ.
>>वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं. >>
ही माझी लहानपणची आठवण. कढधान्यांचे डबे तसेच उघडे टाकून कागद वाचणारी आई आणि तिला ओरडणारी आजी. माझा सगळ्यात मोठा चुलतभाऊ , माझा धाकटा काका शोभावा अशा वयाचा. तो तेव्हा नोकरीमुळे आमच्याकडे राहायचा. जेवतानाही त्याच्या हातात पुस्तक असायचे. बरेचदा त्याला जेवायला बोलवायला म्हणून गेलीली आईपण तिथेच पुस्तक वाचत बसायची. बाबांच्या ३-४ हाका आल्या की एकदाचे दोघे जेवायला यायचे. या दोन पुस्तकवेड्यांच्या संगतीत मी ही पुस्तकवेडी झाले. या वेडाचा वारसा लेकालाही मिळालाय.

अडगळ's picture

5 May 2010 - 4:19 am | अडगळ

मी एकदा लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं .पण नाव आठवत नाही.

Pain's picture

5 May 2010 - 12:37 pm | Pain

मला वाचनास बन्दी घालण्यात आली आहे :(

बिप्स,
तुझ्या कडे पुस्तकांचा खजिना होता हे मलाही आठविते. गौरी-गणपतिला तुझ्या घरी आले होते तेव्हा तुझ्या बाबांकडून
'Nothing Lasts Forever' व If Tommorow comes ही Sidney Sheldon ची दोन पुस्तकी ही नेली होती सोबत.. अन उजव्या हाताची नखे कुरतडत कुरतडत मी ती पुस्तके वाचून संपविली होती. अन तू गमतीने म्हणायचास 'वाहीदा, आता नखे संपली असतील तर बोटे पण खाऊन टाक' पण तू मात्र पुस्तकांच्या बाबतित खुप पजेसिव होतास हो ना ???...

तुझ्या सारखी आमच्या ही घरी तिच परिस्थीती...अन प्रत्येकाची आवड निवड वेगळी.. अब्बुंची पुस्तके आई ने सांभाळून ठेवलेली होती पण त्यांनी एम् ए च पर्शियन भाषेत केल्या मुळे बहुतेक पुस्तके पर्शियन होती त्यामुळे ती मला कधीच समजली नाही. अन उरलेली जाडजूड पुस्तके भारतिय राज्यघटना ,कायदे कानून, समाजरचना, क्रांतिकारकांची होती त्यामुळे मी जास्त त्यांच्या वाट्याला जायचे नाही कारण ते समजायचे आमच वय ही नव्हंत .. माझं ही नाही अन ताईचं पण नाही

लहानपणी जादू ही अनाकलनीय आणि कल्पनेच्या पलिकडे असते म्हणूनच तिचं प्रचंड आकर्षण ही खुप होतं. शाळेत जादूच्या समस्त प्रयोगांनी तर मला जबरदस्त मोहिनी घातली होती.

मग कपाटात आमचा वेगळा कप्पा असायचा जादूची पोतडी, स्नोव्हाईट अन सातबुटके ( या नाटकात पण मी काम केलेले मला आठविते) पऱ्या, यक्षकिन्नर, त्यांची जादू, चांदण्या रात्रीचं अद्भुतरम्य वातावरण असलेल्या कथा .. मज्जा च मज्जा !!

. ... गायब झालेली वस्तू मिळते का परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते असेच वाटायचे.

एकदा का "जादू" ही कल्पना आपण स्वीकारली, की बाकीच्या सगळ्या गोष्टी खूपच सुसंगत वाटतात. प्रत्येका गोष्टीला, घटनेला कारण आणि परिणाम आहेत. आणि ते ज्या तर्हेने उलगडत जातात ...ते अगदी देहभान विसरून वाचायचो आम्ही ...इसापनीती, पंचतंत्र किंवा मुल्ला नसरुद्दीनची पुस्तंक, जादू, राक्षस व परी वेगळंच विश्व होतं ते !

शाळेत असताना सुधा करमरकरांना ही भेटले होते...त्यांना एकदा प्रष्न ही विचारला होता.."काळी जादू अन पाढरी जादू यातील फरक काय हो ??"
अन त्यांनी उत्तर ही गमतिदार दिलं होत - "काळी जादू चेटकिण करते, काही तरी वाईट घडावे म्हणून अन पांढरी जादू परिराणी करते चांगली गोष्ट घडावी म्हणून .." :-)
त्यांची लिटल थिएटर - बालरंगभूमीची नाटके तर आहाहा...
आता त्या कुठे आहेत माहीतही नाही पण आमचे जादूई विश्व त्यांनी सुंदर सजविले होते ..
चिमणी पाखरे नाटकात तर मला विषेश पारितोषिक हि मिळाले होते अन देव वाणिमंदीरम तर्फे पण मला मिळालेले संस्क्रुत बक्षिसांची पुस्तके फाटत आली आहेत तरिही मी अजून जपून ठेवली आहे. कोणी कितीही त्याला रद्दी म्हणू देत

बिप्स,
आता तुझ्यातला लेखक ही जागा झालाच आहे मग तुझ्या त्या खोबार सारखं लवकर भराभर छान आणखिन काहीतरी लिह ना... :-)

~ वाहीदा

अरुंधती's picture

7 May 2010 - 2:23 am | अरुंधती

वाहिदा, जादुई विश्व हाच शब्द पुस्तकांच्या दुनियेला चपखल लागू होतो असे मला वाटते.
काळी जादू पांढरी जादू वरून रशियन परीकथांमधील बाबायागा चेटकीण आठवली. खूप क्रौर्यपूर्ण, अंगावर शहारे आणणारी वर्णने आहेत तिच्या काळ्या जादूची आणि हरकतींची.... पण मजा म्हणजे त्या वयात त्यांचे एवढे विशेष काही वाटायचे नाही! आता तिच्या गोष्टी वाचायच्या तर त्या गोष्टींमधील क्रूरता जाणवते.
असो. इथे अजून आवडत्या मासिकांबद्दल फारसे लिहिले गेलेले दिसत नाही!
मला लहान असताना घरी येणारी ''न्यूज फ्रॉम इस्रायल'', ''शेतकरी'' आणि ''बळीराजा'' ही मासिके वाचायला खूप मजा यायची. इस्रायल मासिकातले इंग्रजी कळायचे नाही, पण कृष्ण धवल फोटो पाहून समाधान करुन घ्यायचे.
वडील बाहेरगावी दौर्‍यावर असले की हमखास त्या त्या महिन्याचा जत्रा अंक घ्यायचे. त्यात मोठे शब्दकोडे असायचे. घरातील सगळेजण डोके लावून ते कोडे सोडवायचा प्रयत्न करायचे. त्या कोड्याची दोन-तीन बक्षीसेही मिळाली होती बाबांना.

शिवाय वडील काही मराठी दिवाळी विशेषांकांतून कथालेखन करायचे. त्यांच्या कथा म्हणजे भयगूढकथा. स्मशान, प्रेते, भुतेखेते, आत्मे, वासना आणि अशाच अय्याईगं! बालमनावर वाईट्ट वाईट्ट परिणाम करणार्‍या गोष्टी त्यात असायच्या. नवल, हंस, बुवा, पैंजण दिवाळी विशेषांकात छापून यायच्या. नवल मासिकाला तर बहुतेक वेळा त्यांच्याच कथेवर आधारित मुखपृष्ठ असायचे. वडीलांची कथा व चंद्रमोहन कुलकर्णींनी चितारलेले मुखपृष्ठ हे समीकरण कित्येक वर्षे तसेच ठरून गेले होते. लोकांना खूप आवडायच्या त्या गोष्टी. पण मला कधीच नाही आवडल्या! मी त्यांना तसे सांगितलेही! माझ्या मते समाजातील विकृतीचं, माणसाच्या मनातील काळोख्या जागांचं, वासनांचं असं अंगावर येणारं चित्रण न करता ती गोष्ट सांगता येऊ शकली असती. त्यात कधीकधी विज्ञानाचं पण अजब मिश्रण असे. फुल्टू पल्प फिक्शन! ह्याच आधारावर ती गोष्ट प्रचंड लोकप्रिय होत असे. वडीलांना त्या कथांमुळे येणार्‍या फॅनमेलवरून अनंत अंतरकरांनी तेव्हा त्यांना सर्व कथांचे संकलित रुपात प्रकाशन करण्याची कल्पना बोलून दाखवली होती. पण फॅनमेल बरोबर हेटमेलही तेवढेच असावे ;-) कारण ही कल्पना प्रत्यक्षात आली नाही. मला लोकांची ही आवड कधीच कळली नाही!! असो. आता वडील अशा कथा लिहित नाहीत. अधून मधून त्यांना चिडवतेही, की काय हो, तुमच्या कथा आताश दिसत नाहीत. बट ही हॅज मूव्ह्ड फॉरवर्ड! आता ते अथर्ववेदाच्या अभ्यासात गुंगलेले असतात! :D पण मला ही '' प्रौढांची'' मासिके वाचण्यासाठी आईने आठवी-नववी पर्यंत मुभा दिली नव्हती! नंतर तिच्यामागे लकडा लावून वाचली, पण त्या गोष्टी आणि त्यांवर आधारित चित्रविचित्र आकारांची मुखपृष्ठ रेखाटने वगैरे गोष्टी नाही आवडल्या. पुरता हिरमोड!!

इन्डिया टुडे हे मासिक कधीकाळी खूप आवडायचं.... बाहेर स्टॅन्डवर दिसलं की हमखास विकत घेतलं जायचं....
फॅशन मासिके कधी फारशी वाचली गेली नाहीत. लोकप्रभा, ललित, शतायुषी सारखी मासिके कायमच आवडली. गृहशोभिका वगैरे निव्वळ टाईमपास म्हणून वाचली.
सध्या ग्राहकहित नावाचे मासिक येते. खरेच ग्राहक जागृतीसाठी खूप उपयुक्त माहिती असते. आवाज, जत्रा वगैरे मासिकांचे दिवाळी अंक कधी मधी चाळायला बरे वाटतात. मला विनोदी लिखाण खूप आवडते. आणि व्यंगचित्रे! ती ज्या मासिकात भरपूर, व चांगल्या दर्जाची असतात ते मासिक माझे लाडके बनते!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

वाहीदा's picture

7 May 2010 - 11:45 am | वाहीदा

शिवाय वडील काही मराठी दिवाळी विशेषांकांतून कथालेखन करायचे
अरुंधती,
आत्ता आम्हाला कळलं, तुझं इतकं सुंदर Impressive writting चे सिक्रेट... :-)

Keep it Up !!

~ वाहीदा

विजुभाऊ's picture

7 May 2010 - 6:51 am | विजुभाऊ

वाचनाने मला काय दिले............. हे नक्की सांगता येणार नाही.
लहानपणी बिका म्हणतो तशी घरात सर्वत्र पुस्तके असायची.
वाचनाला कोणतेच विषय वर्ज्य नसायचे....
भारा भागवतांचा फाष्टर फेणे वाचू त्याच्यासारखे टॉक्क करायचो.
डिटेक्टिव्ह डीटी वाचून उगाचच सर्वत्र संशयीत शोधायचो....
त्यावेळेस आवडलेले पुस्तक म्हणजे रविंद्र गुर्जरांचे " सत्तर दिवस"
ते पुस्तक कधीच विस्मरणात गेले नाही. परवा एका प्रदर्शनात दिसले म्हणून मुद्दाम घेऊन आलो.
अत्यन्त आवडलेले पुस्तके असायची हॅन्स अ‍ॅन्डरसन्स च्या परीकथांची .... ती आजही आवडतात. त्यातला तो यालमार आणी धूळफेक्या अक्षरांच्या होणार्‍या गमती आजही आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलानाही ही पुस्तके आवडतात.
गुरुनाथ नाईक वगैरे नेहमीचेच आवडते
नन्तर कधीतरी ज्यूल्स व्हर्नने भुरळ घातली. तिची झिंग आजही उतरलेली नाहिय्ये
११ वी १२ वीत जी एं चे गारूड डोक्यावर बसले.... ते कधीतरी उतरले....
वाचना बाबत मी शेळी आहे.......शेळी काहिही खाते तसा मी माहिही वाचायचो........ अगदी लेनीन ऑन डायलेक्टीक्स सुद्धा वर्ज्य नसायचे.

एक होता कार्व्हर , चिपर बाय डझन , चेकॉव्ह च्या कथा यानी वेगळे जग उघडून दिले.
ग्रंथाली वाचक चळवळीने मात्र वेगळ्या अर्थाने जागे केले. कधीच न अनुभवलेले अनुभवू लागलो
वाचलेले सगळेच सर्वोत्तम होते असे नाही पण उत्तम जरूर होते
पण ज्या पुस्तकाने वेड लावले असे म्हणून शकेन ते म्हणजे
तेत्सुको कुरोयानगी चे तोत्तोचान

मनीषा's picture

7 May 2010 - 3:51 pm | मनीषा

खूप छान वाचन अनुभव ...
माझे सुद्धा वाचनाचे अनुभव काहीसे असेच ... पुस्तकांची प्रदर्शने पाहणे, आणि पुस्तके विकत घेउन वाचणे हा माझा अत्यंत आवडीचा छंद/उद्योग आहे . पुण्यातील अत्रे हॉल, रमाबाई हॉल (स.प. कॉलेज) इथली पुस्तक प्रदर्शने आणि डेक्कन वरील पॉप्युलर बुक्स आणि जंगली महाराज रोड वरील क्रॉसवर्ल्ड (हे आता नाहीये ) इथे मला नेहमीच चांगली मराठी पुस्तके मिळाली आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

7 May 2010 - 4:10 pm | इन्द्र्राज पवार

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की लेखाचे शीर्षक वाचून माझी अशी समजूत झाली होती की हा कुठे शाहरुख किंवा आमीर यांच्या संदर्भातील लेख आहे कि काय, पण यावर पडत असलेल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहिल्यावर वाटू लागले कि हे प्रकरण काहीतरी वेगळे असावे..... आणि झालेही तसेच, प्रकरण निव्वळ वेगळे नाही तर अचाट आहे आणि मनमोहक सुद्धा. किती लिहू आणि कसे थांबू असे प्रत्येकाला वाटत असावे असे आलेल्या नोंदी वाचून मला वाटले.... आणि आनंद अशासाठी कि मलाही या पंक्तीत पान मांडायला आवडेल.

"अबकड" आणि "एबीसीडी" ची ओळख झालेल्या दिवसापासून माझ्या हातून पुस्तक (आणि आता लॅप टॉप) सुटलेले नाही, आणि या सवईत आता कोणताही बदल होणे संभवतदेखील नाही. माझ्या मामाच्या घरीच मी वाढलो असल्याने व मामा क्रमांक एकचे पुस्तक प्रेमी असल्याने त्यांच्या घरात कपडे ठेवायला जागा नसेल, पण पुस्तकासाठी प्रथम सोय अशी अवस्था होती/आहे. करवीर नगर वाचन मंदिर देखील चार पाउल अंतरावर असल्याने शाळा, नंतर हायस्कूल, नंतर महाविद्यालयीन वाटचाल या सर्वामध्ये 'नगर वाचन मंदिर' स्टॉप हे ठरलेले हमखास ठिकाण. समानधर्मी मित्रही असल्याने पुस्तकावरील गप्पाटप्पा ह्या तर ठरलेल्या. मी पुस्तक मागितले आणि झटकन मामानी आणून दिले (कारण ते स्वत: शासनाच्या शिक्षण खात्यातील एक अधिकारी असल्याने पुस्तक विश्वात त्यांची या ना त्या निमित्ताने उठबस असायची.... त्या नात्यानेही पुस्तके सहजगत्या घरात यायचीच....) असेच नेहमी घडत गेले. "चांदोबा" "अमृत" "नवनीत" "डायजेस्ट" यांची तर त्यांचा घरी "बांधीव" अंक होते. चांदोबातील जादूमय मजकुराने मला वेड लावले कि त्यातील सुंदर सुंदर अशा चित्रांनी, हे सांगणे कठीण ! पण चांदोबा व नंतर 'किशोर' मित्र झाले.... अमृत माहिती शास्त्रासाठी उत्तमच होते. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेने आमचे कोल्हापूर हे तसे "शांत" वातावरणातील आणि खास ग्रामीण स्पर्श असलेले गावे असल्याने वाचनाची आवड जोपासण्यासाठी रंकाळा, टाऊन हॉल, विद्यापीठ परिसर, पंचगंगा नदीच घाट या जागा खूपच आदर्शवत होत्या. ७ च्या वर्गात जाईपर्यंत सर्वश्री खांडेकर, पेंडसे, दळवी, कर्णिक, मोकाशी, दोन्ही माडगुळकर, रणजीत देसाई, (आणि अनेक अगणित...) वाचून झाले होते.... नंतर मामानी (व देशपांडे आणि वायकूळ नावाच्या शिक्षकांनी...) "सत्यकथा" आणि "ललित" चे व्यसन लावले. सत्यकथे विषयी तर इथे आपल्या संस्थळावर एक धागा होऊ शकेल इतके या मासिकाचे मराठी अभिरुचीवर उपकार आहेत. सत्यकथेमुळे प्रथम मी श्री. द. पानवलकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांचा भक्त झालो. ("मौज प्रकाशना" मुळे मर्ढेकर, विजया राजाध्यक्ष... आणि इत्तर खूपच....) माध्यमिक विद्यालयात मूळचे रत्नागिरीचे पण दम्याचा विकार असल्याने तेथील दमट हवेच्या त्रासाने कोल्हापूर मुक्कामी शिक्षकी पेशा स्वीकारलेले श्री. जगन्नाथ खोत नावाचे मराठी विषयाचे एक शिक्षक आम्हाला लाभले, अन योगायोगाने त्यांचे छोटेखानी घर आमच्या गल्लीच्या मागील बाजूसच असल्याने, व ते पुस्तकप्रेमी (गप्पाही पुस्तकांच्याच...) होते. साहजिकच रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही चार मित्र व खोत सर यांची चांगलीच मैत्री जमली व त्यांच्याकडून साहित्य विश्व म्हणजे काय, पुस्तक प्रकाशन व्यवसाय कसा असतो, पुण्या मुंबईकडे साहित्य चळवळी कशा असतात, पारितोषिके म्हणजे काय यांची बित्तंबातमी लागायची. या गोष्टी म्हटल्या तर फुटकळ म्हटल्या तर महत्वाच्या, कारण यांनीच पुस्तक विश्व विषयी अतोनात कुतूहल निर्माण केले.

आणि याच काळात "जी. ए. कुलकर्णी" नावाच्या भुताने झपाटले.... ते इतके कि आजही याच झाडाला चिकटून अन्य व्यवहार करीत आहे. मामांचा आणि जी. ए. कुलकर्णी यांचा व्यक्तिश: परिचय होता. निव्वळ पत्राव्यवहारच नव्हे तर ज्या काही फार थोड्या लोकांना जी. ए. कुलकर्णी यांनी त्यांच्या धारवाड येथील "कडेमनी कम्पाऊंड" घरात आवर्जून बोलून घेतले होते, त्यापैकी माझे मामा एक होत. गम्मत म्हणजे जी. ए. आणि मामा यांचात साहित्यापेक्षा "हॉलिवूड" वर जास्त गप्पा आणि पत्रव्यवहार होत. मामा कामानिमित्त महाराष्ट्रात खूप ठिकाणी जात असल्यामुळे भटकंती जास्त, त्यामुळे जी. ए. आवर्जून त्याना "जगावेगळी पुस्तके" आणून देण्याविषयी सांगत असत..... अर्थात इंग्रजी. प्रत्यक्ष इथे कोल्हापुरात आमच्या घरी जी. ए. न वाचलेलं कुणी सापडणे महाकठीण काम. मला तर भर मध्यरात्री धक्का मारून उठविले आणि "इंद्र्या.... जी. ए. वर बोल...." तर पोपटसारखा अथकपणे बोलत राहीन. मामांचे दुसरे मित्र म्हणजे ~~ जी. ए. या नावाशी एकदम फटकून वागणारे दुसरे टोक "श्री. भालचंद्र नेमाडे". यांच्या कोसला पासून जरीला पर्यंतच्या सर्व कादंब-या अर्थातच माझ्याकडे (किंवा ख-या अर्थाने आमच्याकडे) आहेत. खुद्द नेमाडे ज्यावेळी आमच्या घरी आले होते त्यावेळी झालेली "गेट टुगेदर " पार्टी मला आठवते. पणजीहून त्यांनी मामासाठी खास "वाईन" आणली होती... अर्थात त्यावेळी ते पेय काय आहे हे मला कळने शक्य नव्हते पण एकूणच मजा आली होती या मोठ्या लेखकाला माझ्या मामाबरोबर एकेरी नावाने गप्पा मारायला पाहताना.
महाविद्यालयीन जीवनात प्रथम वर्षापासूनच पदवीसाठी "इंग्लिश" हा विषय घेण्याचे नक्की केले असल्याने दोन्ही भाषेशी - मराठी व इंग्लिश - परत मोठी जवळीक सुरु झाली. इंग्लिश भाषेची गोडी तर माध्यमिकच्या वर्गातच लागली असल्याने वाचनाला सीमा नव्हतीच. त्यामुळे असेल कदाचित पण मराठीतील किरण नगरकर, दिलीप चित्रे, विलास सारंग, अरुण कोलटकर, श्याम मनोहर या मंडळींच्या साहित्याशी हातमिळवणी झाली, ती इतकी कि आजही अनेकविध इंग्लिश वाचन होऊनदेखील हे मित्र राहील आहेत.

खूप लिहिण्यासारखे आहे या अति सुंदर अशा विषयावर.... पण कुठेतरी थांबणे आवश्यक वाटते. (...... गप्पाला तर या विषयाने वेड लागायची पाळी येते....हा आमच्या सर्व मित्रांचा अनुभव आहे.) ... सबब इंग्रजी वाचनाविषयी पुन्हा कधीतरी ! इतक्या सुन्दर धाग्याबद्द्ल श्री. बिपिन यांचे मनःपूर्वक आभार !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मन१'s picture

11 Jul 2012 - 3:52 pm | मन१

धागा सुंदरच आहे. पण अशा कुठल्याही गोष्टीचा मनापासून आनंद लुटणार्‍या मंडळींचा हेवाच वाटतो.
विशेषतः वाचनप्रेमी मंडळींसमोर सतत inferiority compex (न्यूनगंड??)येतो :(

हे तुम्ही म्हणणे म्हणजे हद्दच झाली.

माझेच जणू आत्मवृत्त वाचतो आहे असे वाटले :) नव उत्खननपटू मनरावांचे आणि अर्थातच बिकांचे अनेकोत्तम आभार!!!!