✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मै ऐसा क्यूं हूं?

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 05/03/2010 - 18:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48172 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

_/\_

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 14:23 नवीन
=)) =)) =)) =)) च्यायला..इथंही विडंबन? वाचनाचंच? धन्य आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

वा!!

समंजस
Tue, 05/04/2010 - 11:35 नवीन
वा!! छान!! वाचून आनंद झाला :) मी पण असाच आहे.....वाचनाच्या बाबतीत बराचसा पुलंच्या सखाराम गटणे सारखा(फक्त ते मराठी तेव्हढे बोलणे सोडून).... :) काहिही, कितीही चालतं...वाचायला..कुठल्याही विषयांचे वावडे नाही... :)
  • Log in or register to post comments

वाक्य

नितिन थत्ते
Wed, 05/05/2010 - 16:34 नवीन
>>सखाराम गटणे सारखा हे वाक्य काळजाला भिडले. :| नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

बिकाभाऊ

विशाल कुलकर्णी
Tue, 05/04/2010 - 12:01 नवीन
बिकाभाऊ जागा बुक करून ठेवतोय, नंतर सविस्तर लिहीन. बाकी लेख मस्तच तुमचा ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Tue, 05/04/2010 - 12:06 नवीन
लेख. वाचण्याच्या आवडीबद्दल लेखात आणि काही प्रतिक्रियांत लिहिल्यासारखेच अनुभव आहेत. पुढे याच छंदातून भटकंतीची आवड निर्माण झाली, हीसुद्धा माझ्या दृष्टीने एक जमेची बाजू. सविस्तर लिहितोच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

माझा

अमोल नागपूरकर
Tue, 05/04/2010 - 12:15 नवीन
माझा वाचनप्रवास सुरु झाला चान्दोबा पासून. आजही त्याचा अन्क पाहिल की मन मोहरून येते. सोबत चम्पक , इसापच्या बोधकथा, पन्चतन्त्र, जातक कथा, अरेबिअन नाइट्स वगैरे होतेच. घरात मिशा नावाचे एक लहान मुलान्करिता ईन्ग्रजी मासिक येत असे. त्यात रशियन भाषेतील सुन्दर कथा इन्ग्रजीत अनुवादित करून दिल्या असत. ८-९ वर्षान्चा असताना सर्वात पहिली कादम्बरी म्हणजे रणजित देसाईची 'श्रीमान योगी'. तेव्हापासून ऐतिहासिक कादम्बर्यान्चा असा काही चस्का लागलाअ की रणजित देसाई, ना स ईनामदार, बाबासाहेब पुरन्दरे ह्या सर्वान्चा एकदम फडशा पाडल्या गेला. अर्थात त्यापायी अभ्यास आणि खेळ ह्या दोघान्कडेही दुर्लक्ष आणि म्हणून आइबाबान्चा ओरडा !!!!! उन्हाळयाच्या सुट्टीत महिनाभर मामाकडे ठाण्याला आलो की रोज तिथल्या लायब्ररीमध्ये जाऊन एक पुस्तक वाचायचो. पुल, खाण्देकर, कुसुमाग्रज , शिवाजी सावन्त इत्यादिन्शी तिथेच ओळख झाली. महिनाभर काही नाही. फक्त,"मी आणि पुस्तक" बस. नोकरि लागल्यावर माझी पोस्टिन्ग एका आदिवासी खेडेगावामध्ये झाली. तिथे एक बन्द पडलेली लायब्ररी होती. मित्रन्सोबत आम्ही ती परत सुरु केली. एका बी लिब मित्रानी पुस्तके नीट लावून दिली. एकन्दरित तो अनुभव फारच चान्गला होता. एम टेक साठी आय आय टी मुम्बै मध्ये आलो असताना तिथे होस्टेल्मध्ये लायब्ररी होती. तिथे पहिल्यान्दा इन्ग्रजी साहित्याशी गाथ पदली. तसेच तिथल्या सेन्ट्रल लायब्ररी मध्ये ही खूप चान्गली साहित्यिक पुस्तके आहेत. नन्तर मुम्बैत पोस्टिन्ग मिळाल्यावर तर तिथल्या कार्यालयातही खूप मोठी लायब्ररी होती. लग्नापूर्वी घरी काहिच काम नसल्याने मी पूर्णपने वाचनानन्द घेऊ शकत होतो. वेळ खरेच मजेत जायचा. इतर मित्राना खरच नवल वाटायचे की ह्याच्याकडे टी व्ही नाही मग हा टाइम पास कसा करतो !!!!!!!!!! आता नोकरि आणि इतर प्रापन्चिक जबाबदार्यान्मुळे वाचन फक्त न्यूजपेपर पुरते सीमित झाले आहे. पण वाचण्याची भूक अजुन शमलेली नाही. ह्या वीकान्ताला नाशिकला गेलो असताना मी भाच्याला चान्दोबातील गोष्टी वाचून दाखवल्या. त्याच्यासोबत परत एकदा मी वाचनातील गम्मत अनुभवली. भाच्याला वाचनाची गोडी लागलेली पाहून जो आनन्द झाला त्याची खरच कशाशीही तुलना होऊ शकत नाही. वाचन सन्स्क्रुतीचा विजय असो !!!
  • Log in or register to post comments

मस्त

वेदश्री
Tue, 05/04/2010 - 13:35 नवीन
मस्तच विषय आहे आणि अनुभवही कमीजास्त प्रमाणात तेच. शाळाकाळजातल्या पुस्तकांचीदेखील अ‍ॅलर्जी नव्हती मला. उन्हाळ्याच्या सुट्टीत गणिताची पुस्तके घेऊन यायचे मी सर/मॅडमकडून.. घरगुती उन्हाळी कामांचा (गहू निवडणे, पापड लाटणे, वगैरे) कंटाळा आला की करमणूक म्हणून त्यातली गणिते सोडवायला भारी मजा यायची. गणित सुटल्याचा आनंद शेअर करायला कोणी मिळायचे नाही म्हणून काहीसा हिरमोड झाला तरी व्यसन लावेल असाच स्वर्गीय आनंद असायचा तो. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिशच्या पुस्तकांचेही तेच. लवकर विकत आणले की गोष्टी वाचून संपवता यायच्या त्यातल्या. इतिहास आवडत नसला तरी त्यातल्या गोष्टी नामावळ्या, सनावळ्यांच्या पलिकडे जाऊन समजून घ्यायला खूप आवडायचे. चंपक, चांदोबा वगैरे विकत घेणे परवडण्यातले नसले तरी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आईने घेतलेली फुला, खडकावरला अंकुर, गोट्या, चिंगी, फास्टरफेणे, टारझन वगैरे पुस्तके मात्र अगदी वेड लावणारीच ठरली. परीराक्षसांच्या पुस्तकांची खरेदी आईने कधी केली नाही त्यामुळे त्या स्वप्नांमध्ये रंगणे काय असते ते कळले नाही.. आणि ते अगदी उत्तमच झाले असे आज प्रकर्षाने वाटते. परीक्षेत छान गुण मिळवले म्हणून किंवा वाढदिवसाला भेट म्हणून खास पुस्तके मिळायची. शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल मिळालेल्या बक्षिसाच्या पैशातून 'माझी जन्मठेप' विकत घेताना जग जिंकल्याचा आनंद झाल्याचे आजही अगदी स्पष्टपणे आठवतेय. शाळेच्या लायब्ररीतून चुकून वाचायला मिळालेल्या 'राधिका' पुस्तकाने विज्ञानकथा वाचण्याची गोडी लागली ती जयंतमामाने लिहिलेल्या प्रेषित, वामन परत न आला वगैरे कादंबर्‍यांच्या प्रवासातून वृद्धींगत होऊन आज मराठीपासून इंग्रजीपर्यंत पसरली आहे. बाबांना सर्व धर्मांबद्दल जाणून घेण्याची कायमच मनस्वी हौस.. त्यातून मनाच्या श्लोकांपासून सुरू झालेली माझी वाटचाल त्यांच्या पोथ्या, पंचांग, दासबोध, बायबल, कुराण वगैरे करतकरत आज अमेरीकेत गेलेले असताना तिथे नील नामक दोस्ताने भेट म्हणून दिलेल्या बुक ऑफ मॉर्मन पुस्तकापर्यंत येऊन पोहोचली आहे. भेटीवरून आठवले.. दोस्तांना पुस्तकेच भेट देण्याचा आमचा अलिखित प्रघातच आहे. शाळाकॉलेजात असो, खेळाच्या मैदानात असो, ऑफिसमध्ये किंवा कुठे फिरायला जाता ओळख झालेली असो.. माझ्यासारखेच पुस्तकवेड असलेल्या दोस्तांचा क्लब बनायला वेळ लागत नाही. त्यातूनच इ-पुस्तके वाटण्याचा सपाटा सुरू झाला. एकाने एक पुस्तक आवडले म्हणून शेअर केले की त्याला उत्तरादाखल त्या पुस्तकावरची प्रतिक्रिया (ते आधीच वाचलेले नसल्यास वाचून!) तर द्यायचीच पण आपल्याला आवडलेल्या दुसर्‍या पुस्तकाची इ-प्रतदेखील उपलब्ध करून देऊन त्यावर थोडक्यात माहिती द्यायची. भरपूर पुस्तकांची माहिती तर मिळालीच पण अनेक भन्नाट दोस्तही मिळाले. बाबांच्या कामानिमित्त आणल्या/मागवल्या गेलेल्या आर्थिक विषयांवरच्या पुस्तकांचा फडशा पाडायला त्रास हा की इतके जडजड आणि न कळणारे शब्द एकत्र एकाच वाक्यात वाचून त्यांचा अर्थ समजवून घेताना डोक्याला भारी शीण यायचा, झोप यायची.. कधी गाढ झोपूनही गेलेय मी त्या नादात.. पण तरीही वाचून काढलीच! आईला नेहमीच्या साहित्यविषयात तर रस आहेच पण विणकाम, भरतकाम, बागकाम, पाककला वगैरेतही आवड.. मग त्याविषयांवरची पुस्तकेही घरात न आल्यास नवल. घरात आले की त्यातले सगळे करून बघायचे याचीही हौस तितकीच डोक्यावर स्वार व्हायची. मग ओळखीतल्यांकडे रुखवत, बाळंतविडे वगैरे करण्यासाठी बाजारातून काही आणायची गरज पडणे बंद झाले असल्यास.. नवल ते काय! आज आमची आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा सुधरलेली असल्याने हक्काची पुस्तके विकत घ्यायला हाताला सवड झाली आहेच शिवाय घरातच एक पुस्तके ठेवायला योग्य अशा कपाटांनी भरलेली, ती वाचायला एक टेबल खुर्ची असलेली लिब्रा (लायब्ररीची खोली) मिळाली आहे पुस्तकांना. सर्व चांगल्या पुस्तकांचे खुल्या दिलाने स्वागत करते आमची लिब्रा.
  • Log in or register to post comments

पुस्तकवेडा

चेतन
Tue, 05/04/2010 - 14:52 नवीन
मी एव्हढा पुस्तकवेडा कधिच नव्हतो शाळेनंतर किंवा रिकाम्या वेळात फक्त खेळ खेळ आणि खेळ. मग आई बर्‍याच वेळा दमटवुन वाचनालयात पाठवायची. मी दोनदा इकडुन तिकडे फेर्‍या मारायचो मग पुन्हा खेळायला पसार लहानपणी कधितरि चांदोबा, चंपक किंवा थोड नंतर फास्टर फेणे वाचलेल आठवतयं पुढे कधीतरी वेळ जात नाही म्हणुन मार्मिक, आउटलुक वाचलं सुशी, पुलं, वपु कधीतरी असेच कॉलेजनंतर जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा हळुहळु वाचयला सुरवात झालि पण बहुतेक वेळेला रात्रिच. पण एक मात्र होतं एकदा पुस्तक हातात घेतलं की ते संपेपर्यंत मन ठिकाणावर नसायचं बहुतेक वेळा सलग वाचुन पुर्ण कारायचो अशीच रात्रभर जागुन म्रुत्युंजय, महानायक दिवसभरात संपवलेली पुस्तके आठवली की हे जर अभ्यासाबाबात १/१० पट जरी केलं असतं तरी बरच होतं असो तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकवेडाला मात्र सलाम चेतन
  • Log in or register to post comments

वा!! लेख आणि

झकासराव
Tue, 05/04/2010 - 15:59 नवीन
वा!! लेख आणि प्रतिसाद वाचुन कळाल की आपल्यासारखे बरेच येडे आहेत. बिपिनसेठ मस्त लिहिलय. :)
  • Log in or register to post comments

जर मिसळ्पाव वर इतके पुस्तकवेडे असतील तर

खडूस
Tue, 05/04/2010 - 17:28 नवीन
cant we share the books we have if we are in same city? मी पुण्यात आहे (nearby sahakarnagar). मला आवडेल पुस्तकं share करायला. मात्र पुस्तकं नीट वापरावीत आणि वेळेवर परत करावीत ही अपेक्षा. - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

खरंय!

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 18:01 नवीन
पण लफडं तेच आहे ना. आपण जीवापाड जपतो पुस्तकं, कोपरा मुडपला तरी जीव तीळतीळ तुटतो, पण आणखी कोण कसं वापरतं ते कुठे ठाऊक असतं? मला स्वत:ला, कोणी पुस्तक दुमडुन वाचताना दिसलं की नुसता राग राग होतो! अरे...पुस्तक म्हणजे काय पेपर आहे काय? बरं, पुस्तकाच्या मलपृष्टावर चहाचा कप ठेवल्याचे डाग वगैरे हा आणखी एक त्रास..परत येताना पुस्तकं खिळखिळी होऊन आली की आणखी चिडचिड! मित्रांनी मागितलं म्हणुन वाचायला दिलेली रॉबर्ट लुडलमची जवळपास सगळी पुस्तकं जेव्हा परतच नाही आली तेव्हा ठरवलं, अगदी आपल्यासारखा होपलेसली वाचक असल्याशिवाय पुस्तक त्याला द्यायचंच नाही. उगाचच मानसिक त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खडूस

स्तक वाचण्यासंदर्भात

भोचक
Tue, 05/04/2010 - 18:31 नवीन
.कोणी पुस्तक दुमडुन वाचताना दिसलं की नुसता राग राग होतो! अरे...पुस्तक म्हणजे काय पेपर आहे काय?
बाकी पुस्तक वाचण्यासंदर्भात माझं नि आमच्या एक मित्राचं स्वप्न आहे. नोकरी फॉरेस्ट खात्यात असावी. कुठल्याशा तालुक्याच्या किंवा त्याहून छोट्या गावी. (म्हणजे काम कमी असतं म्हणे.) मग बाज-खाट टाईप अंग पसरून द्यायला व्यवस्था हवी. शेजारी चिवडा, फरसाण, डोनेट, क्रीमची बिस्किटं वगैरे असावे. मस्त तंगड्या पसरून वाचत बसावे. विशेषतः गुप्तहेर कथा. शिवाय या काळात कुण्णी म्हणजे कुण्णी डिस्टर्ब करायला नको. (भोचक) महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आह्ह...

श्रावण मोडक
Tue, 05/04/2010 - 19:06 नवीन
लय भारी स्वप्न... माझंही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

देवाऽऽऽऽ...........

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 19:11 नवीन
तुमचा तो मित्र म्हणजे मीच की काय अशी मला शंका आली :) फरक इतकाच, फॉरेश्ट हापिसर वगैरे नाही, पण सालं गावाकडं चौसोपी वाडा वगैरे असावा...गडीमाणसं कामाला लावली की मस्त बाजेवर पडुन शेजारी हुक्का घेऊन आणि मध्येअध्ये तोंडात टाकायला अबरचबर खाणं घेऊन निवांत तंगड्या पसरुन पुस्तकं कुरतडत बसावं. :) ओहोहो....स्वर्ग स्वर्ग म्हणजे तो हाच, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

+१

तुकाम्हणे
Tue, 05/04/2010 - 22:30 नवीन
१०० % सहमत, मी तर अजुनही ह्याचेच प्लांनीग करतो की हे स्वप्न पुर्ण कसे करायचे. :) पुढच्या ३-४ वर्षांचे प्लांनीग पुर्ण होत आले आहे, मग नक्की हा स्वर्ग मिळेल :> कोणाला जॉइन व्हायचे असेल तर सांगा बाकी बिका, आम्हाला लिहीता येत नाहि, तुम्ही आमचे विचार शब्दात मांडायचे काम घेणार का? अगदी मनतले विचार मांडलेत. तुषार विश्व जालावरील मराठी जग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

क्या बात

धमाल मुलगा
Wed, 05/05/2010 - 16:11 नवीन
क्या बात है! आमचा नंबर लाऊन ठेऊ का? :) येऊ कधीमधी पाहुणचार झोडायला..हां, पिशवीभर पुस्तकं सोबत आणुच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुकाम्हणे

स्वप्न मला वाटतं काही दिवस तरी तुमच्याकडे येऊन पूर्ण करावे ते !

जयंत कुलकर्णी
Wed, 05/05/2010 - 14:57 नवीन
फक्त, सकाळी विहीरीत डुंबणे, संध्याकाळी दोन्/एक ग्लास बीर आणि गप्पा एवढे मिळवले की स्वर्गातील देव हेवा करतील असा स्वर्ग ! ह्या वेलींखाली थोडेसे अन्न, कवितेचे पुस्तक आणि मदीरेची सुरई शेजारी तू गाणारी माझ्यासाठी , अजून कुठे आणि कसला स्वर्ग ? -ओमर खय्याम. स्वर्ग म्हणजे अजून काय असते ?…..आणि कशाला शोधायला जायचा तो ?….. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अरे

खडूस
Wed, 05/05/2010 - 09:13 नवीन
हे तर माझेच स्वप्न आहे :) - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

नेट स्विंग

वेदश्री
Wed, 05/05/2010 - 12:00 नवीन
उताणे झोपून अजिबात इकडेतिकडे न करता पुस्तक वाचायला त्रास होतो त्यामुळे बाजेऐवजी दोन झाडांमध्ये मस्तपैकी नेट स्विंग लावून त्यात हलक्यानेच झोके घेत पुस्तक वाचायला मला अत्यंत आवडेल. झाडांच्या गर्द सावलीत, वार्‍याच्या हव्याहव्याशा झुळकींसोबत नेट स्विंगमध्ये पडून पुस्तक वाचायला अगदी योग्य अशी सेटींग होते. पुस्तक वाचताना काही खाण्यापिण्याचीही दखलंदाजी नको बा! माझी ही स्वप्नपूर्ती लवकरच होणार.. यात शंका नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक

एकदम सहमत धम्या

संदीप चित्रे
Tue, 05/04/2010 - 18:51 नवीन
च्यायला लोक पण बुक मार्क वगैरे वापरण्यापेक्षा सरळ पानाचा कोपरा दुमडतात रे ! अजून दुसरे महाभाग म्हणजे पुस्तकातल्या आवडलेल्या ओळी / परिच्छेद वगैरे लाल पेनने अधोरेखित करून ठेवणारे ! नवीन पुस्तक घेतलं की त्याला प्लॅस्टिकचे कव्हर घालून घ्यायची सवय गेल्या कित्येक वर्षांपासून. अप्पा बळवंत चौकात, रतन टॉकिजजवळ, मिळतात अशी कव्हर्स घालून. माझा धाकटा भाऊही माझ्यासाठी पुस्तकं पाठवताना आवर्जून त्या पुस्तकांना कव्हर घालूनच पाठवतो. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१

छोटा डॉन
Wed, 05/05/2010 - 09:23 नवीन
>>अजून दुसरे महाभाग म्हणजे पुस्तकातल्या आवडलेल्या ओळी / परिच्छेद वगैरे लाल पेनने अधोरेखित करून ठेवणारे ! +१, सहमत आहे. ह्यानिमित्ताने अजुन एक आठवले म्हणजे लायब्ररीतुन आणलेल्या पुस्तकांवर काही लोक उपरोक्त "लाल रेषा, खुणा, कंस" वगैरे टाकुन त्याच्यापुढे कोपर्‍यात दिमाखात ' हाण्ण तिच्यायला, एकदम पटले बघा, छे छे फारच एकांगी वाटले, हम्म् ह्यावर अधिक विचारमंथन घडायला हवे' अशा मजेशीर कमेंट्स लिहुन ठेवतात./ एकदा मी मिरासदारांचे एक पुस्तक आणले होते आणि त्यात 'नाटक' ह्या प्रकरणावर एका महाभागाने पानांच्या उअर्लेल्या जागेत चक्क 'पर्यायी कथा' लिहुन ठेवली होती. १ अनमोल ठेवा म्हणुन मी ते पुस्तक अजुन ग्रंथालयाला परत केले नाही ;) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

रॉबर्ट लुडलमची

रामदास
Wed, 05/05/2010 - 10:56 नवीन
रॉबर्ट लुडलमची जवळपास सगळी पुस्तकं जेव्हा परतच आली नाहीत कारण त्याचं वजन चांगलं भरतं. वि. आ. बुवांच्या संग्रहात बरीच पुस्तकं होती. त्यांनी कपाटावर सूचना लिहीली होती. कृपया पुस्तके वाचण्यासाठी मागू नयेत. ही सूचना आपल्यासाठी नाही असे ज्यांना वाटते त्यांच्या साठीच ही सूचना आहे. (ऐकीवात पण उपयुक्त किस्सा आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अशी पाटी लावली...

मनिष
Wed, 05/05/2010 - 11:07 नवीन
आणि विजुभाऊ (किंवा पुण्याला उगाचच शिव्या घालणारे इतर कोणी) आले घरी म्हणजे उगाचच "पुणेरी पाट्या" मधे अजूण एकाची भर पडायची! :( बाकी धम्याशी सहमत. आपल्याला आवडणारी पुस्तके किंवा कॅसेट्/सी.डी. खराब झाल्यचे, हरवल्याचे अनुभव मी ही घेतलेत आणि आता शेवटी देणे जवळजवळ बंद केलय... मनिष (अवांतर : कुठे रहायचे हे वि आ बुआ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

बुवा

रामदास
Wed, 05/05/2010 - 11:14 नवीन
रहायचे कल्याणला. कामाला व्हिजेटीआयला.(संग्रहाचा कामाशी काही संबंध नव्हता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

ब्येष्ट्ट!!!

मनिष
Wed, 05/05/2010 - 11:35 नवीन
एकदम ब्येष्ट्ट!!! बुवा पुण्यात रहात नव्हते हे वाचून जीव भांड्यात पडला! ह. घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वि. आ. बुवा

चित्रा
गुरुवार, 05/06/2010 - 06:30 नवीन
त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला आहे. त्यांची प्रचंड टापटिपीची खोली आणि डेस्क पाहिले आहे. त्यांच्या डेस्कमध्ये एक किंवा फारतर दोन पेन्सिली मावतील अशा उंचीचे आणि रूंदीचे लहान-लहान कप्पे होते. प्रत्येक पेन्सिल ही जागच्या जागी. पेन जागच्या जागी. आणि शाईची दौत पाहिल्याचे आठवते. त्यांचे अक्षर भलतेच वळणदार आणि सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

हाहा

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/06/2010 - 07:53 नवीन
.. मग लिखाण इतके भीषण का आहे हो ? (हघ्या !) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

काहीतरीच

चित्रा
गुरुवार, 05/06/2010 - 08:13 नवीन
कसलाही आव न आणता लिहीणारे लेखक म्हणून बुवा मला आवडतात. आपले बुवा असे आहे. :) विनोद जाऊ दे - बुवा माझ्या माहितीप्रमाणे अतिशय रोखठोक, थेट आणि सरळमार्गी गृहस्थ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मस्त धागा आणि लेख

स्वाती२
Tue, 05/04/2010 - 18:25 नवीन
वाचनाच वेड कधी लागलं ते आठवतही नाही. पण लागलं त्याला कारण माझी आई आणि माझा चुलत भाऊ. >>वाणसामान गुंडाळलेल्या पुड्यांचे कागदही सुटत नव्हते माझ्या तावडीतून. घे कागद की वाच, घे पुस्तक की वाच असं चालायचं. >> ही माझी लहानपणची आठवण. कढधान्यांचे डबे तसेच उघडे टाकून कागद वाचणारी आई आणि तिला ओरडणारी आजी. माझा सगळ्यात मोठा चुलतभाऊ , माझा धाकटा काका शोभावा अशा वयाचा. तो तेव्हा नोकरीमुळे आमच्याकडे राहायचा. जेवतानाही त्याच्या हातात पुस्तक असायचे. बरेचदा त्याला जेवायला बोलवायला म्हणून गेलीली आईपण तिथेच पुस्तक वाचत बसायची. बाबांच्या ३-४ हाका आल्या की एकदाचे दोघे जेवायला यायचे. या दोन पुस्तकवेड्यांच्या संगतीत मी ही पुस्तकवेडी झाले. या वेडाचा वारसा लेकालाही मिळालाय.
  • Log in or register to post comments

काय बरं नाव ?

अडगळ
Wed, 05/05/2010 - 04:19 नवीन
मी एकदा लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं .पण नाव आठवत नाही.
  • Log in or register to post comments

मला

Pain
Wed, 05/05/2010 - 12:37 नवीन
मला वाचनास बन्दी घालण्यात आली आहे :(
  • Log in or register to post comments

बालपण म्हणजे जादूई विश्व ...

वाहीदा
Fri, 05/07/2010 - 12:42 नवीन
बिप्स, तुझ्या कडे पुस्तकांचा खजिना होता हे मलाही आठविते. गौरी-गणपतिला तुझ्या घरी आले होते तेव्हा तुझ्या बाबांकडून 'Nothing Lasts Forever' व If Tommorow comes ही Sidney Sheldon ची दोन पुस्तकी ही नेली होती सोबत.. अन उजव्या हाताची नखे कुरतडत कुरतडत मी ती पुस्तके वाचून संपविली होती. अन तू गमतीने म्हणायचास 'वाहीदा, आता नखे संपली असतील तर बोटे पण खाऊन टाक' पण तू मात्र पुस्तकांच्या बाबतित खुप पजेसिव होतास हो ना ???... तुझ्या सारखी आमच्या ही घरी तिच परिस्थीती...अन प्रत्येकाची आवड निवड वेगळी.. अब्बुंची पुस्तके आई ने सांभाळून ठेवलेली होती पण त्यांनी एम् ए च पर्शियन भाषेत केल्या मुळे बहुतेक पुस्तके पर्शियन होती त्यामुळे ती मला कधीच समजली नाही. अन उरलेली जाडजूड पुस्तके भारतिय राज्यघटना ,कायदे कानून, समाजरचना, क्रांतिकारकांची होती त्यामुळे मी जास्त त्यांच्या वाट्याला जायचे नाही कारण ते समजायचे आमच वय ही नव्हंत .. माझं ही नाही अन ताईचं पण नाही लहानपणी जादू ही अनाकलनीय आणि कल्पनेच्या पलिकडे असते म्हणूनच तिचं प्रचंड आकर्षण ही खुप होतं. शाळेत जादूच्या समस्त प्रयोगांनी तर मला जबरदस्त मोहिनी घातली होती. मग कपाटात आमचा वेगळा कप्पा असायचा जादूची पोतडी, स्नोव्हाईट अन सातबुटके ( या नाटकात पण मी काम केलेले मला आठविते) पऱ्या, यक्षकिन्नर, त्यांची जादू, चांदण्या रात्रीचं अद्भुतरम्य वातावरण असलेल्या कथा .. मज्जा च मज्जा !! . ... गायब झालेली वस्तू मिळते का परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते असेच वाटायचे. एकदा का "जादू" ही कल्पना आपण स्वीकारली, की बाकीच्या सगळ्या गोष्टी खूपच सुसंगत वाटतात. प्रत्येका गोष्टीला, घटनेला कारण आणि परिणाम आहेत. आणि ते ज्या तर्हेने उलगडत जातात ...ते अगदी देहभान विसरून वाचायचो आम्ही ...इसापनीती, पंचतंत्र किंवा मुल्ला नसरुद्दीनची पुस्तंक, जादू, राक्षस व परी वेगळंच विश्व होतं ते ! शाळेत असताना सुधा करमरकरांना ही भेटले होते...त्यांना एकदा प्रष्न ही विचारला होता.."काळी जादू अन पाढरी जादू यातील फरक काय हो ??" अन त्यांनी उत्तर ही गमतिदार दिलं होत - "काळी जादू चेटकिण करते, काही तरी वाईट घडावे म्हणून अन पांढरी जादू परिराणी करते चांगली गोष्ट घडावी म्हणून .." :-) त्यांची लिटल थिएटर - बालरंगभूमीची नाटके तर आहाहा... आता त्या कुठे आहेत माहीतही नाही पण आमचे जादूई विश्व त्यांनी सुंदर सजविले होते .. चिमणी पाखरे नाटकात तर मला विषेश पारितोषिक हि मिळाले होते अन देव वाणिमंदीरम तर्फे पण मला मिळालेले संस्क्रुत बक्षिसांची पुस्तके फाटत आली आहेत तरिही मी अजून जपून ठेवली आहे. कोणी कितीही त्याला रद्दी म्हणू देत बिप्स, आता तुझ्यातला लेखक ही जागा झालाच आहे मग तुझ्या त्या खोबार सारखं लवकर भराभर छान आणखिन काहीतरी लिह ना... :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

मासिके

अरुंधती
Fri, 05/07/2010 - 02:23 नवीन
वाहिदा, जादुई विश्व हाच शब्द पुस्तकांच्या दुनियेला चपखल लागू होतो असे मला वाटते. काळी जादू पांढरी जादू वरून रशियन परीकथांमधील बाबायागा चेटकीण आठवली. खूप क्रौर्यपूर्ण, अंगावर शहारे आणणारी वर्णने आहेत तिच्या काळ्या जादूची आणि हरकतींची.... पण मजा म्हणजे त्या वयात त्यांचे एवढे विशेष काही वाटायचे नाही! आता तिच्या गोष्टी वाचायच्या तर त्या गोष्टींमधील क्रूरता जाणवते. असो. इथे अजून आवडत्या मासिकांबद्दल फारसे लिहिले गेलेले दिसत नाही! मला लहान असताना घरी येणारी ''न्यूज फ्रॉम इस्रायल'', ''शेतकरी'' आणि ''बळीराजा'' ही मासिके वाचायला खूप मजा यायची. इस्रायल मासिकातले इंग्रजी कळायचे नाही, पण कृष्ण धवल फोटो पाहून समाधान करुन घ्यायचे. वडील बाहेरगावी दौर्‍यावर असले की हमखास त्या त्या महिन्याचा जत्रा अंक घ्यायचे. त्यात मोठे शब्दकोडे असायचे. घरातील सगळेजण डोके लावून ते कोडे सोडवायचा प्रयत्न करायचे. त्या कोड्याची दोन-तीन बक्षीसेही मिळाली होती बाबांना. शिवाय वडील काही मराठी दिवाळी विशेषांकांतून कथालेखन करायचे. त्यांच्या कथा म्हणजे भयगूढकथा. स्मशान, प्रेते, भुतेखेते, आत्मे, वासना आणि अशाच अय्याईगं! बालमनावर वाईट्ट वाईट्ट परिणाम करणार्‍या गोष्टी त्यात असायच्या. नवल, हंस, बुवा, पैंजण दिवाळी विशेषांकात छापून यायच्या. नवल मासिकाला तर बहुतेक वेळा त्यांच्याच कथेवर आधारित मुखपृष्ठ असायचे. वडीलांची कथा व चंद्रमोहन कुलकर्णींनी चितारलेले मुखपृष्ठ हे समीकरण कित्येक वर्षे तसेच ठरून गेले होते. लोकांना खूप आवडायच्या त्या गोष्टी. पण मला कधीच नाही आवडल्या! मी त्यांना तसे सांगितलेही! माझ्या मते समाजातील विकृतीचं, माणसाच्या मनातील काळोख्या जागांचं, वासनांचं असं अंगावर येणारं चित्रण न करता ती गोष्ट सांगता येऊ शकली असती. त्यात कधीकधी विज्ञानाचं पण अजब मिश्रण असे. फुल्टू पल्प फिक्शन! ह्याच आधारावर ती गोष्ट प्रचंड लोकप्रिय होत असे. वडीलांना त्या कथांमुळे येणार्‍या फॅनमेलवरून अनंत अंतरकरांनी तेव्हा त्यांना सर्व कथांचे संकलित रुपात प्रकाशन करण्याची कल्पना बोलून दाखवली होती. पण फॅनमेल बरोबर हेटमेलही तेवढेच असावे ;-) कारण ही कल्पना प्रत्यक्षात आली नाही. मला लोकांची ही आवड कधीच कळली नाही!! असो. आता वडील अशा कथा लिहित नाहीत. अधून मधून त्यांना चिडवतेही, की काय हो, तुमच्या कथा आताश दिसत नाहीत. बट ही हॅज मूव्ह्ड फॉरवर्ड! आता ते अथर्ववेदाच्या अभ्यासात गुंगलेले असतात! :D पण मला ही '' प्रौढांची'' मासिके वाचण्यासाठी आईने आठवी-नववी पर्यंत मुभा दिली नव्हती! नंतर तिच्यामागे लकडा लावून वाचली, पण त्या गोष्टी आणि त्यांवर आधारित चित्रविचित्र आकारांची मुखपृष्ठ रेखाटने वगैरे गोष्टी नाही आवडल्या. पुरता हिरमोड!! इन्डिया टुडे हे मासिक कधीकाळी खूप आवडायचं.... बाहेर स्टॅन्डवर दिसलं की हमखास विकत घेतलं जायचं.... फॅशन मासिके कधी फारशी वाचली गेली नाहीत. लोकप्रभा, ललित, शतायुषी सारखी मासिके कायमच आवडली. गृहशोभिका वगैरे निव्वळ टाईमपास म्हणून वाचली. सध्या ग्राहकहित नावाचे मासिक येते. खरेच ग्राहक जागृतीसाठी खूप उपयुक्त माहिती असते. आवाज, जत्रा वगैरे मासिकांचे दिवाळी अंक कधी मधी चाळायला बरे वाटतात. मला विनोदी लिखाण खूप आवडते. आणि व्यंगचित्रे! ती ज्या मासिकात भरपूर, व चांगल्या दर्जाची असतात ते मासिक माझे लाडके बनते! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

No Wonder you write so Well and Impressive ...

वाहीदा
Fri, 05/07/2010 - 11:45 नवीन
शिवाय वडील काही मराठी दिवाळी विशेषांकांतून कथालेखन करायचे अरुंधती, आत्ता आम्हाला कळलं, तुझं इतकं सुंदर Impressive writting चे सिक्रेट... :-) Keep it Up !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

वाचनाने

विजुभाऊ
Fri, 05/07/2010 - 06:51 नवीन
वाचनाने मला काय दिले............. हे नक्की सांगता येणार नाही. लहानपणी बिका म्हणतो तशी घरात सर्वत्र पुस्तके असायची. वाचनाला कोणतेच विषय वर्ज्य नसायचे.... भारा भागवतांचा फाष्टर फेणे वाचू त्याच्यासारखे टॉक्क करायचो. डिटेक्टिव्ह डीटी वाचून उगाचच सर्वत्र संशयीत शोधायचो.... त्यावेळेस आवडलेले पुस्तक म्हणजे रविंद्र गुर्जरांचे " सत्तर दिवस" ते पुस्तक कधीच विस्मरणात गेले नाही. परवा एका प्रदर्शनात दिसले म्हणून मुद्दाम घेऊन आलो. अत्यन्त आवडलेले पुस्तके असायची हॅन्स अ‍ॅन्डरसन्स च्या परीकथांची .... ती आजही आवडतात. त्यातला तो यालमार आणी धूळफेक्या अक्षरांच्या होणार्‍या गमती आजही आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलानाही ही पुस्तके आवडतात. गुरुनाथ नाईक वगैरे नेहमीचेच आवडते नन्तर कधीतरी ज्यूल्स व्हर्नने भुरळ घातली. तिची झिंग आजही उतरलेली नाहिय्ये ११ वी १२ वीत जी एं चे गारूड डोक्यावर बसले.... ते कधीतरी उतरले.... वाचना बाबत मी शेळी आहे.......शेळी काहिही खाते तसा मी माहिही वाचायचो........ अगदी लेनीन ऑन डायलेक्टीक्स सुद्धा वर्ज्य नसायचे. एक होता कार्व्हर , चिपर बाय डझन , चेकॉव्ह च्या कथा यानी वेगळे जग उघडून दिले. ग्रंथाली वाचक चळवळीने मात्र वेगळ्या अर्थाने जागे केले. कधीच न अनुभवलेले अनुभवू लागलो वाचलेले सगळेच सर्वोत्तम होते असे नाही पण उत्तम जरूर होते पण ज्या पुस्तकाने वेड लावले असे म्हणून शकेन ते म्हणजे तेत्सुको कुरोयानगी चे तोत्तोचान Image removed.
  • Log in or register to post comments

खूप छान

मनीषा
Fri, 05/07/2010 - 15:51 नवीन
खूप छान वाचन अनुभव ... माझे सुद्धा वाचनाचे अनुभव काहीसे असेच ... पुस्तकांची प्रदर्शने पाहणे, आणि पुस्तके विकत घेउन वाचणे हा माझा अत्यंत आवडीचा छंद/उद्योग आहे . पुण्यातील अत्रे हॉल, रमाबाई हॉल (स.प. कॉलेज) इथली पुस्तक प्रदर्शने आणि डेक्कन वरील पॉप्युलर बुक्स आणि जंगली महाराज रोड वरील क्रॉसवर्ल्ड (हे आता नाहीये ) इथे मला नेहमीच चांगली मराठी पुस्तके मिळाली आहेत.
  • Log in or register to post comments

काय लिहू ? किती लिहू ??

इन्द्र्राज पवार
Fri, 05/07/2010 - 16:10 नवीन
सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की लेखाचे शीर्षक वाचून माझी अशी समजूत झाली होती की हा कुठे शाहरुख किंवा आमीर यांच्या संदर्भातील लेख आहे कि काय, पण यावर पडत असलेल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहिल्यावर वाटू लागले कि हे प्रकरण काहीतरी वेगळे असावे..... आणि झालेही तसेच, प्रकरण निव्वळ वेगळे नाही तर अचाट आहे आणि मनमोहक सुद्धा. किती लिहू आणि कसे थांबू असे प्रत्येकाला वाटत असावे असे आलेल्या नोंदी वाचून मला वाटले.... आणि आनंद अशासाठी कि मलाही या पंक्तीत पान मांडायला आवडेल. "अबकड" आणि "एबीसीडी" ची ओळख झालेल्या दिवसापासून माझ्या हातून पुस्तक (आणि आता लॅप टॉप) सुटलेले नाही, आणि या सवईत आता कोणताही बदल होणे संभवतदेखील नाही. माझ्या मामाच्या घरीच मी वाढलो असल्याने व मामा क्रमांक एकचे पुस्तक प्रेमी असल्याने त्यांच्या घरात कपडे ठेवायला जागा नसेल, पण पुस्तकासाठी प्रथम सोय अशी अवस्था होती/आहे. करवीर नगर वाचन मंदिर देखील चार पाउल अंतरावर असल्याने शाळा, नंतर हायस्कूल, नंतर महाविद्यालयीन वाटचाल या सर्वामध्ये 'नगर वाचन मंदिर' स्टॉप हे ठरलेले हमखास ठिकाण. समानधर्मी मित्रही असल्याने पुस्तकावरील गप्पाटप्पा ह्या तर ठरलेल्या. मी पुस्तक मागितले आणि झटकन मामानी आणून दिले (कारण ते स्वत: शासनाच्या शिक्षण खात्यातील एक अधिकारी असल्याने पुस्तक विश्वात त्यांची या ना त्या निमित्ताने उठबस असायची.... त्या नात्यानेही पुस्तके सहजगत्या घरात यायचीच....) असेच नेहमी घडत गेले. "चांदोबा" "अमृत" "नवनीत" "डायजेस्ट" यांची तर त्यांचा घरी "बांधीव" अंक होते. चांदोबातील जादूमय मजकुराने मला वेड लावले कि त्यातील सुंदर सुंदर अशा चित्रांनी, हे सांगणे कठीण ! पण चांदोबा व नंतर 'किशोर' मित्र झाले.... अमृत माहिती शास्त्रासाठी उत्तमच होते. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेने आमचे कोल्हापूर हे तसे "शांत" वातावरणातील आणि खास ग्रामीण स्पर्श असलेले गावे असल्याने वाचनाची आवड जोपासण्यासाठी रंकाळा, टाऊन हॉल, विद्यापीठ परिसर, पंचगंगा नदीच घाट या जागा खूपच आदर्शवत होत्या. ७ च्या वर्गात जाईपर्यंत सर्वश्री खांडेकर, पेंडसे, दळवी, कर्णिक, मोकाशी, दोन्ही माडगुळकर, रणजीत देसाई, (आणि अनेक अगणित...) वाचून झाले होते.... नंतर मामानी (व देशपांडे आणि वायकूळ नावाच्या शिक्षकांनी...) "सत्यकथा" आणि "ललित" चे व्यसन लावले. सत्यकथे विषयी तर इथे आपल्या संस्थळावर एक धागा होऊ शकेल इतके या मासिकाचे मराठी अभिरुचीवर उपकार आहेत. सत्यकथेमुळे प्रथम मी श्री. द. पानवलकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांचा भक्त झालो. ("मौज प्रकाशना" मुळे मर्ढेकर, विजया राजाध्यक्ष... आणि इत्तर खूपच....) माध्यमिक विद्यालयात मूळचे रत्नागिरीचे पण दम्याचा विकार असल्याने तेथील दमट हवेच्या त्रासाने कोल्हापूर मुक्कामी शिक्षकी पेशा स्वीकारलेले श्री. जगन्नाथ खोत नावाचे मराठी विषयाचे एक शिक्षक आम्हाला लाभले, अन योगायोगाने त्यांचे छोटेखानी घर आमच्या गल्लीच्या मागील बाजूसच असल्याने, व ते पुस्तकप्रेमी (गप्पाही पुस्तकांच्याच...) होते. साहजिकच रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही चार मित्र व खोत सर यांची चांगलीच मैत्री जमली व त्यांच्याकडून साहित्य विश्व म्हणजे काय, पुस्तक प्रकाशन व्यवसाय कसा असतो, पुण्या मुंबईकडे साहित्य चळवळी कशा असतात, पारितोषिके म्हणजे काय यांची बित्तंबातमी लागायची. या गोष्टी म्हटल्या तर फुटकळ म्हटल्या तर महत्वाच्या, कारण यांनीच पुस्तक विश्व विषयी अतोनात कुतूहल निर्माण केले. आणि याच काळात "जी. ए. कुलकर्णी" नावाच्या भुताने झपाटले.... ते इतके कि आजही याच झाडाला चिकटून अन्य व्यवहार करीत आहे. मामांचा आणि जी. ए. कुलकर्णी यांचा व्यक्तिश: परिचय होता. निव्वळ पत्राव्यवहारच नव्हे तर ज्या काही फार थोड्या लोकांना जी. ए. कुलकर्णी यांनी त्यांच्या धारवाड येथील "कडेमनी कम्पाऊंड" घरात आवर्जून बोलून घेतले होते, त्यापैकी माझे मामा एक होत. गम्मत म्हणजे जी. ए. आणि मामा यांचात साहित्यापेक्षा "हॉलिवूड" वर जास्त गप्पा आणि पत्रव्यवहार होत. मामा कामानिमित्त महाराष्ट्रात खूप ठिकाणी जात असल्यामुळे भटकंती जास्त, त्यामुळे जी. ए. आवर्जून त्याना "जगावेगळी पुस्तके" आणून देण्याविषयी सांगत असत..... अर्थात इंग्रजी. प्रत्यक्ष इथे कोल्हापुरात आमच्या घरी जी. ए. न वाचलेलं कुणी सापडणे महाकठीण काम. मला तर भर मध्यरात्री धक्का मारून उठविले आणि "इंद्र्या.... जी. ए. वर बोल...." तर पोपटसारखा अथकपणे बोलत राहीन. मामांचे दुसरे मित्र म्हणजे ~~ जी. ए. या नावाशी एकदम फटकून वागणारे दुसरे टोक "श्री. भालचंद्र नेमाडे". यांच्या कोसला पासून जरीला पर्यंतच्या सर्व कादंब-या अर्थातच माझ्याकडे (किंवा ख-या अर्थाने आमच्याकडे) आहेत. खुद्द नेमाडे ज्यावेळी आमच्या घरी आले होते त्यावेळी झालेली "गेट टुगेदर " पार्टी मला आठवते. पणजीहून त्यांनी मामासाठी खास "वाईन" आणली होती... अर्थात त्यावेळी ते पेय काय आहे हे मला कळने शक्य नव्हते पण एकूणच मजा आली होती या मोठ्या लेखकाला माझ्या मामाबरोबर एकेरी नावाने गप्पा मारायला पाहताना. महाविद्यालयीन जीवनात प्रथम वर्षापासूनच पदवीसाठी "इंग्लिश" हा विषय घेण्याचे नक्की केले असल्याने दोन्ही भाषेशी - मराठी व इंग्लिश - परत मोठी जवळीक सुरु झाली. इंग्लिश भाषेची गोडी तर माध्यमिकच्या वर्गातच लागली असल्याने वाचनाला सीमा नव्हतीच. त्यामुळे असेल कदाचित पण मराठीतील किरण नगरकर, दिलीप चित्रे, विलास सारंग, अरुण कोलटकर, श्याम मनोहर या मंडळींच्या साहित्याशी हातमिळवणी झाली, ती इतकी कि आजही अनेकविध इंग्लिश वाचन होऊनदेखील हे मित्र राहील आहेत. खूप लिहिण्यासारखे आहे या अति सुंदर अशा विषयावर.... पण कुठेतरी थांबणे आवश्यक वाटते. (...... गप्पाला तर या विषयाने वेड लागायची पाळी येते....हा आमच्या सर्व मित्रांचा अनुभव आहे.) ... सबब इंग्रजी वाचनाविषयी पुन्हा कधीतरी ! इतक्या सुन्दर धाग्याबद्द्ल श्री. बिपिन यांचे मनःपूर्वक आभार ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

सुंदर....

मन१
Wed, 07/11/2012 - 15:52 नवीन
धागा सुंदरच आहे. पण अशा कुठल्याही गोष्टीचा मनापासून आनंद लुटणार्‍या मंडळींचा हेवाच वाटतो. विशेषतः वाचनप्रेमी मंडळींसमोर सतत inferiority compex (न्यूनगंड??)येतो :(
  • Log in or register to post comments

हे तुम्ही म्हणणे म्हणजे हद्दच

बॅटमॅन
Fri, 07/13/2012 - 11:36 नवीन
हे तुम्ही म्हणणे म्हणजे हद्दच झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

माझेच जणू आत्मवृत्त वाचतो आहे

बॅटमॅन
Wed, 07/11/2012 - 16:16 नवीन
माझेच जणू आत्मवृत्त वाचतो आहे असे वाटले :) नव उत्खननपटू मनरावांचे आणि अर्थातच बिकांचे अनेकोत्तम आभार!!!!
  • Log in or register to post comments

आणखी एक गंमत म्हणजे

सस्नेह
गुरुवार, 07/12/2012 - 13:18 नवीन
आणखी एक गंमत म्हणजे अभ्यासाच्या पुस्तकात चांदोबा किंवा कादंबर्‍या लपवून वाचणे. पण आईला ते कसे कोण जाणे, लगेच समजायचे.. बाकी, चान्दोबातली चित्रे, विशेषतः अप्सरांची, अजुन डोळ्यापुढे आहेत.
  • Log in or register to post comments

वारलो !!

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/13/2012 - 16:59 नवीन
प्रतिक्रिया वाचून. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

जपा निरागसता!

मोहनराव
Fri, 07/13/2012 - 18:00 नवीन
जपा निरागसता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तं धागा आणि सुंदर प्रतिसाद

अनुप ढेरे
गुरुवार, 01/08/2015 - 17:10 नवीन
मस्तं धागा आणि सुंदर प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

मी या विषयावर लिहिलं तर जे

अजया
गुरुवार, 01/08/2015 - 18:23 नवीन
मी या विषयावर लिहिलं तर जे लिहीन तेच आलंय लेखात! कसा वाचायचा सुटला होता लेख कळत नाही!सुरेख लेख आणि प्रतिसाद!विशेषतः मेघनाचा!
  • Log in or register to post comments

खूप छान !! आवडले !!

खटपट्या
Fri, 01/09/2015 - 00:55 नवीन
खूप छान !! आवडले !!
  • Log in or register to post comments

पहला प्यार

पारुबाई
Tue, 01/27/2015 - 01:52 नवीन
लहानपणापासूनच मला वाचायला आवडते.माझ्या आठवणीतील माझी पहिली पुस्तक खरेदी म्हणजे मी पहिली दुसरीत असताना पुण्यात अप्पा बळवंत चौकात ‘अरगडे आणि मंडळी’ नावाचे एक कोपर्यावर दुकान होते तिथून मला बाबांनी लहान मुलांची ४० पुस्तके एका दमात आणून दिली होती.त्यांना वाटले कि मी आता उन्हाळ्याच्या सुट्टीत “आई मी काय करू?” असा धोशा लावणार नाही.पण मी सगळी पुस्तके २-४ दिवसात वाचून संपवली. तेव्हापसुन मी वाचतेच आहे..इयत्ता चौथी मध्ये असताना मी आचार्य अत्रे यांचे ‘कर्हेचे पाणी’ चे पाच खंड वाचून संपवले होते.माझे बाबा आल्या गेल्या सर्वाना हे कौतुकाने सांगत असत.मी स्वतःमध्ये रमते ते देखील याच कारणाने.मला वाचलेले मनात घोळवायला त्यावर विचार करायला खूप आवडते.मात्र मी काय वाचते याच्याकडे बाबांचे लक्ष असे.रहस्यकथा,कादंबर्या किंवा खून माऱ्यामाऱ्या यांचा समावेश असलेले मी वाचले कि बाबा एकच वाक्य म्हणायचे,”काहीतरी चांगले उत्तम अभिरुचीचे वाच” .त्यामुळे मी विविध तर्हेचे चौफेर वाचन केले असे म्हणता येणार नाही. माझी आई देखील खूप वाचायची रात्र रात्र जागून वाचायची.तीच माझी,माझ्या नवर्याची आणि माझ्या मुलांची सवय आहे. काही लोकांना जेवताना पण वाचयला आवडते.ते मात्र माझ्या आईला मान्य नव्हते.तिच्या मते तो अन्नाचा अपमान होता. लहान वयात जसे चांदोबा,किशोर,कुमार,आनंद आणि कॉमिक्स खूप वाचले तसे अधिकक मोठे होताच रणजीत देसाई, ना सं इनामदार वाचले पु ल आणि व पु ही तर दैवते. शांता शेळके वसंत बापट मंगेश पाडगावकर सुरेश भट यांच्या कित्येक कविता तोंडपाठ केल्या.आता अमेरिकेत आल्यावर माझी वाचनाची आवड एका वेगळ्याच विषयाकडे वळली.nonfiction, parenting, self-help books.या विषयावर इथे खूपच मोठा खजिना आहे गेली १४-१५ वर्षे मला या विषयावरच्या पुस्तकांनी झपाटून टाकलेले आहे.मात्र अजून अनेक विषयावर वाचून व्हायचय. माझे असे दिवस रात्र सलग वाचणे पाहून बाबांचे मित्र म्हणायचे,” किती गुणी मुलगी आहे रे तुझी! कशी शांतपणे एकटीच कोपर्यात वाचत बसली आहे” रात्रीचे जागरण करून वाचणे मला अजूनही आवडते.सगळीकडे शांत आहे रात्र हळूहळू चढत जत आहे आणि मी मोठमोठे श्वास घेत एका पानामागून एक पान उलगडत क्वचितच आजू बाजूला पाहत मी पुस्तक वाचनात रमून गेलेली आहे.हा माझा आनंदाचा ठेवा आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा