जालिंदर बाबा : पत्रकार समिक्षक ?

चेतन's picture
चेतन in जनातलं, मनातलं
29 Jan 2010 - 3:51 pm

जालिंदर बाबा... संचार नावाची विचित्रपट समिक्षणाची मालिका मिपावर पूर्वी वाचत असे...
चांगले चित्रपट शोधून शोधून त्यांना (घासुनपुसुन गुळगुळित ) मोहक बनवण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे... ;)
________
|-_\`' " " '/_--|
|--`('० | ० )'--+|
|=-- ' & '--=-|
|----_\ /_----|
|-+--- / \==--|
|_______ -|
#:S

पण सध्या त्यांची गाडी पत्रकार समिक्षेकडे वळाल्यापासून त्यांचे लेखावर मजेमजेदार प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत....

राजु परुळेकांची (लेखासकट) नुकतीच केलेली ही समिक्षा वाचा...
समिक्षेवरच्या प्रतिकिया वाचून छान छान वाटलं... ...

त्यातली काही महत्त्वाची वाक्यं...

१. हा सरळ सरळ लाळघोटेपणा आहे. खरोखरच मराठी पत्रकारितेची अवस्था इतकी बिकट झाली आहे का? श्री मास्तरांच्या निरीक्षणांशी सहमत.

२. महाराश्ट्रात १९९७ पासून दोन लाख शेतकर्यांनी आत्म्हत्या केल्या आहेत; हा आकडा देशात सर्वाधीक आहे. (हा दुवा) असे चित्र असताना परूळेकरांच्या बालिशपणाचा आणि लाळ्घोटेपणाचा तिरस्कार करावा तेवढा कमि च आहे.

३. कुमार केतकरांचा संदर्भ कळला नाही. त्यांच्याशी मतभिन्नता असेल पण ते 'प्रश्नांवर'(ही) लिहीतात. ह्या साहेबांनी टीन-एज मासिकातली गोष्ट लिहिली आहे. जाता जाता: आज मी मझ्या डायरीत एक नोंद करणारः "राजू परूळेकरः शोभा डे चा पुरूषी पण कल्पनाशून्य, पाणी घातलेला अवतार."

४. मला वाटते, वरील चर्चा ही 'प्रॉडक्ट दोषयुक्त निघाल्याचीच' आहे. पत्रकारितेचे 'प्रॉडक्ट' हे लेख किंवा बातमी नसून, 'सचोटी' हेच असते. मिडीया, लष्कर, न्यायसंस्था, वैद्यक या सर्व सेवांना एक पावित्र्याची झालर आहे, ती उगाच नाही. सगळा समाजच अनैतिक आहे, मग आम्ही का अपवाद? असे वरीलपैकी लोक म्हणू लागले (आणि लोकांना ते पटू लागले) तर जे काही होईल, त्यालाच अराजक म्हणत असावेत !

ते वरचं दोन नंबरचं वाक्य आहे ना, शेतकरी आणि आत्महत्यांच, त्याचा संदर्भ मूळ परिक्षणात पुन्हापुन्हा वाचूनसुद्धा कळाला नाही...

कुमार केतकरांचा संदर्भ कळला नाही. त्यांच्याशी मतभिन्नता असेल पण ते 'प्रश्नांवर'(ही) लिहीतात असे काही लिहिले आहे प्रतिक्रियेत... मी काही कुमार केतकरांचे लेख वाचलेले नाहीत, त्यामुळे काही कल्पना नाही...
ते असो..

एखादा समिक्षक अमुक एका पक्षाचा (समर्थक) आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातं...

देमार अभ्यंकर आणीबाणीच्या समर्थनपर काही लिहितात तेव्हा डोकं गरगरतं...

किंवा उभ्या आडव्या तिरक्या रेघांना तर संकेतस्थळाच्या (मर्यादा) (त्यांना स्वतःलाच न पटणार्‍या??!! ) गोष्टी डिफेन्ड करताना केविलवाणी धडपड करावी लागते असं मला सारखं वाटतं...

मिपावर फार छान सही होती ,(कोणाची बरं? आठवत नाहीये )
आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल

विनोदविडंबनमौजमजाप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

समंजस's picture

29 Jan 2010 - 4:09 pm | समंजस

हे काय #o
(एकूण किती लेखातले उतारे घेतलेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय :B )
कुणाला माझ्या आधी कळल्यास कृपया कळवावे ही विनंती........

बंडू बावळट's picture

29 Jan 2010 - 4:19 pm | बंडू बावळट

छान लेख! :)

प्रसन्न केसकर's picture

29 Jan 2010 - 4:46 pm | प्रसन्न केसकर

पण करु देत ना लोकांना टीका. बनु देत ना समीक्षक. जो जे वांछिल तो ते लाहो! शेवटी परत तेच लोक त्याच लेखकांचे अन तसेच लेख वाचत रहाणार आहेत.

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2010 - 6:04 pm | भडकमकर मास्तर

लेखाची कल्पना छान आहे..
विडंबन छान झाले आहे...वाचून मजा आली...

_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

चेतन's picture

30 Jan 2010 - 12:18 pm | चेतन

बंडु , पुनेरी भाउ धन्यवाद

" पण करु देत ना लोकांना टीका. बनु देत ना समीक्षक "
याबद्दल मला काहिच म्हणायचं नाही.

पण एक प्रसंग आठवला
मी आणि माझे पाच मित्र आम्ही मिळुन कंपनीच्या अ‍ॅन्युअल डे ची फोटोग्राफी केली होती (अर्थात प्रोफेशनल फोटोग्राफर पण होताच). फोटो पब्लिश करण्यावरुन थोडसं ऑरग्नायझरशी बिनसलं, तर त्यानी त्याच्या माणसाकडुन मुद्दाम काही कमेंट करवल्या. एक मित्र भडकला म्हणला एकतर फुकटची काम करतोय एव्हढच त्याला फोटोमधलं कळत असेल तर त्यानी करावी फोटोग्राफी.
यावर त्याला मी क्रिकेट्मधला समिक्षक साबा करिम आणी तेंडुलकरचं उदाहरण त्याला दिलं होतं... (याचा ईथे काही संबंध नाही असो..)

मास्तर स्पेशल धन्यावाद

समंजसपणा बहुतेक कमी पडला की लेख एकदम बाउन्सर होता :?
(ह.घ्या.)

चेतन

समंजस's picture

30 Jan 2010 - 1:20 pm | समंजस

लेख एकदम बाउन्सर होता :|
काही प्रतिक्रिया वाचल्यावर कळलं की हा विडंबन प्रकारातला आहे #:S
लेख समजल्यावरच, समंजसपणा वापरायचा की नाही हे ठरवता येतं :)

कालिन्दि मुधोळ्कर's picture

30 Jan 2010 - 1:47 pm | कालिन्दि मुधोळ्कर

मस्त विडंबन! :)

चेतन's picture

1 Feb 2010 - 10:17 am | चेतन

धन्यवाद कालिंदी

चेतन