फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in कलादालन
17 Dec 2009 - 12:35 am

पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.

तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.

तिथली अधिक माहिती या दुव्यावर मिळेल: फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
.
.
.
सुर्योदयाच्या आधी पोचलात तर स्वर्ग जमिनीवर आल्यासारखे वाटेल...


.
.
.
मग थोडी कोवळी उन्हं चढली की सगळे अवघे जग सोन्याने न्हाऊन निघते.


.
.
.
मग आम्ही फोटोग्राफर लाईट छान मिळाला म्हणून खुश होतो.


.
.
.
आणि भंगार पाईपसुद्धा सुंदर दिसू लागतात.


.
.
.

तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...

© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com

हे ठिकाणकलाप्रवासभूगोलछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Dec 2009 - 12:49 am | प्राजु

अमेझिंग!!!
पहिला फोटो कहर आहे!!
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

लवंगी's picture

17 Dec 2009 - 2:20 am | लवंगी

केवळ अप्रतिम..

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 4:58 am | पाषाणभेद

फोटो तर मस्तच आहेत.

(पण खालची कॉपीराईटची टिप्पणी चांगल्या झालेल्या खिचडीतील 'खड्यासारखी' लागतेय. (फोटोत (C) आहेच ना? )

"तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा..."

तुमच्या भावना पोहचल्या पण -
पाऊलखुणा म्हणजे आपली ओळख. म्हणजे आपण तेथे (निसर्गात) काहीतरी (म्हणजे आपली ओळख पटेल असल्या) गोष्टी ठेवून यायच्या का? (बरेच जण निसर्गात गेले की ओळख पटवण्यासाठी काहीतरी बरबटून ठेवतात, प्लॅश्टीक, कचरा टाकतात म्हणून लिहीले हो.)
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

मदनबाण's picture

17 Dec 2009 - 5:24 am | मदनबाण

२रा फोटो शॉलिट्ट्ट्ट्ट्ट हाय... :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

सहज's picture

17 Dec 2009 - 6:31 am | सहज

तुम्ही छान फोटो काढता.

टारझन's picture

17 Dec 2009 - 9:45 am | टारझन

सॉल्लीड फोटोशॉप वापरता राव तुम्ही :) कोणत्याही साधारण फोटो ला सुद्धा अल्टिमेट बनवु शकाल. इथे तर तुमच्या फर्स्टक्लास कॅमेरा अँगलची जोड आहे.
जबरा फोटू !

आपला
(छायाचित्र प्रेमी) फोटोबा ग्राफर

sneharani's picture

17 Dec 2009 - 11:22 am | sneharani

सुरेख... अप्रतिम फोटो आहेत.
पहिला तर जबराच..!

सूर्य's picture

17 Dec 2009 - 12:40 pm | सूर्य

मित्रा, फोटो निव्वळ जबरा आहेत. स्तुती करण्यासाठी शब्द नाहीत :)

- सूर्य.

दशानन's picture

17 Dec 2009 - 3:25 pm | दशानन

श्री झरेकर -जी,

उत्तम फोटो.

आवडले.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

मॅन्ड्रेक's picture

17 Dec 2009 - 8:44 pm | मॅन्ड्रेक

at and post : Xanadu.

संताजी धनाजी's picture

18 Dec 2009 - 7:35 pm | संताजी धनाजी

अप्रतिम फोटोज!

पण नक्की कुठे आहे हे ठिकाण? रस्त्यावरच आहे का?

- संताजी धनाजी

वेताळ's picture

18 Dec 2009 - 7:52 pm | वेताळ

कॅमेर्‍याचा अतिशय सुंदर वापर तुम्ही केला आहात. दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला. मस्त फोटो.
वेताळ

शाहरुख's picture

19 Dec 2009 - 3:01 am | शाहरुख

दुसरा फोटो तर मला चक्क परदेशात टिपल्याचा भास झाला

परदेशातील अवघे जग सोन्याने न्हायलेले आहे का ?

फोटो आणि त्यावरची कलाकारी अप्रतिमच !!

रेवती's picture

18 Dec 2009 - 7:54 pm | रेवती

फार म्हणजे फारच सुंदर फोटू!
ग्रेटच!

रेवती

सुबक ठेंगणी's picture

19 Dec 2009 - 5:19 pm | सुबक ठेंगणी

अतिशय सुरेख फोटो...निळं आकाश कसलं सही दिसतंय! :)

धनंजय's picture

19 Dec 2009 - 3:24 am | धनंजय

प्रतिबिंबे सुंदर टिपली आहेत.

मी-सौरभ's picture

19 Dec 2009 - 11:50 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Dec 2009 - 5:06 pm | बिपिन कार्यकर्ते

बॉस !!!

बिपिन कार्यकर्ते

रम्या's picture

28 Dec 2009 - 2:00 pm | रम्या

पहिला आणि दुसरा फोटो खूप आवडला.

आम्ही येथे पडीक असतो!

युयुत्सु's picture

29 Dec 2009 - 12:00 pm | युयुत्सु

क्यामेरा कोणता वापरता तुम्ही ते सांगितले तर बरं होईल.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.