फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.
तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे. सकाळी ३:०० वाजता उठायचे, चांदणी चौकमार्गे ८०-९० किमी जाऊन सुर्योदयापूर्वी त्या स्वर्गात पोचायचे असाच अगदी शेम-टू-शेम प्लॅन असायचा.
तिथली अधिक माहिती या दुव्यावर मिळेल: फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
.
.
.
सुर्योदयाच्या आधी पोचलात तर स्वर्ग जमिनीवर आल्यासारखे वाटेल...
.
.
.
मग थोडी कोवळी उन्हं चढली की सगळे अवघे जग सोन्याने न्हाऊन निघते.
.
.
.
मग आम्ही फोटोग्राफर लाईट छान मिळाला म्हणून खुश होतो.
.
.
.
आणि भंगार पाईपसुद्धा सुंदर दिसू लागतात.
.
.
.
तुम्ही पण नक्की भेट द्या... पण एकच विनंती आहे.... येताना फक्त आठवणी घ्या आणि पाऊलखुणा मागे ठेवा...
© या पोस्टमधील सर्व फोटोग्राफ्सचे हक्क अबाधित आहेत. pankajzarekar@gmail.com
लेखनविषय:
वाचन
8481
प्रतिक्रिया
21