ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;)
मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :)
तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!)
--------------
फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा. जर तूनळी मुळे काही प्रश्न येत असेल तर हा दुवा पहा.
-----------------------------
अबू आझमी नशिबाने महाराष्ट्रातच होता, युक्रेनमधे कानाखाली कशी वाजवली असती ते पहा येथे!
-------------------------------
हा पंजाब!
------------------------------
आणि भारतभाग्य विधात्याचे हे मूळ केंद्र!
मला सांगा या सर्वांपुढे जे काही महाराष्ट्रात झाले ते किती पुचाट वाटते? राज्यस्थापनेस साठ वर्षे होणार, तरी आपण पुढारलेले आहोत असे वाटते का? दिल्ली बहौत दूर है! (हिंदीत का लिहीले म्हणून विचारू नका कारण विधानसभेतपण त्यावेळेस "अबू आझमी चोर है!" अशाच घोषणा दिल्या जात होत्या!) :-)
असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर!
प्रतिक्रिया
13 Nov 2009 - 9:51 am | सहज
हा हा हा
शोधले तर अजुनही सापडतील अश्याच फिती जवळजवळ सगळ्याच देशात :-)
13 Nov 2009 - 9:53 am | अवलिया
या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर!
हा हा हा तुम्ही सुद्धा विचारवंत होण्यासाठी निमित्र मात्र शोधत असता ब्वा !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 9:55 am | प्रकाश घाटपांडे
विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे.
हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Nov 2009 - 9:58 am | निमीत्त मात्र
विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे.
हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात.
13 Nov 2009 - 10:01 am | सुनील
कचेरीत तुनळीवर बंदी असल्यामुळे चित्रफिती पाहता आल्या नाहीत. त्यामुळे प्रतिसाद आता घरी गेल्यावरच.
बाकी पंजाबमध्ये नक्की काय घडले हे कोणी सांगितल्यास बरे होईल!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Nov 2009 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तो पंजाब सीमेपारचा आहे, नवाझ शरीफांचा! नवाझ फक्त नावाचे शरीफ आहेत असं दिसत आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति एकमेकांना फेकून मारत आहेत.
बाकी नो कमेंट. प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही 'विचारवंत' आपल्याला हवा तसा अर्थ काढून स्वतःची मळमळ व्यक्त करण्यासाठी माझा खांदा वापरण्याची भीती!
अदिती
13 Nov 2009 - 10:17 am | विशाल कुलकर्णी
अदितीतैंशी १००% सहमत !
दगडांवर डोके आपटल्यास आपलेच डोके फुटायची भिती जास्त असते. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 2:48 pm | आम्हाघरीधन
दुसर्यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय?
अबु आजमी नावाच्या विदुषकाला मारुन काय मिळविले?
पण आपल्या महाराष्ट्राला एक संस्कॄती आहे तिचे आपण भान ठेवले पाहिजे.
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत.... असं वेडेवाकडे वागुन आपले हसे करुन घेवु नये हिच अपेक्षा..
हाच विदुषक आधी म्हणत होता 'काठ्या वाटु अन प्रसंगी आजमगडावरुन माणसे आणु'..... निकल गयी सारी हेक्डी........ आ थु थु थु थु..........'
13 Nov 2009 - 3:16 pm | गणपा
>>दुसर्यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय?
सहमत.
पण त्यांची पाप मोजली नाही तर आपल्याला कुणी विचारणार नाही समजुन ते जास्तच मुजोर बनतील.. हेही तित्कच खरं.
>>दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत
काँग्रेसी जनांसारखे दिल्लेश्वरींची चाटुन तख्त राखायचे की त्यांना गरजे नुसार साथ देत (जमल्यास एक्याद्या दिवशी टांग देउन) त्यावर बसायची दिवास्वप्न बाळगत राकाँ श्रेष्ठीं सारख बसायचे. यालाच तख्त राखणे म्हणत असाल तर कठिण आहे.
13 Nov 2009 - 3:24 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद !!
अवांतर : =)) =)) =))
-- मस्काखारीबन
13 Nov 2009 - 4:08 pm | आनंदयात्री
>>मस्काखारीबन
=)) =)) =))
-
आम्हा घरी ठण ठण
(थोडक्यात नो धन)
14 Nov 2009 - 12:43 am | स्वप्निल..
=))
=))
13 Nov 2009 - 5:33 pm | अविनाशकुलकर्णी
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत
दिल्लीच्या तख्त वर बसायची ताकत आपल्यात नाहि हे सर्व जण जाणुन आहेत
13 Nov 2009 - 6:03 pm | समंजस
छान विरंगुळा आहे...
बाकी इंडियन पार्लमेंट बद्दल ची फित बघून जास्त मजा आली. ह्याच्या तुलनेत तर
महाराष्ट्रातील घटना तर काहीच नाही. यापुढे महाराष्ट्र नक्कीच मागासलेला आहे ;)
विधानसभेत रक्त सुद्धा सांडू नये ? आणि तरी एवढ्या प्रतिक्रिया?? :O
(अवांतर: एक विचार मनात आला आहे :? ह्या घटनेबद्दल किती जणांना ४-५ वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असेल? किती जणांवर खटले दाखल झाले असतील?? किती जणांना न्यायालयाकडनं शिक्षा झाली असेल??)
13 Nov 2009 - 8:02 pm | रेवती
हा हा हा!
काय पण व्हिडिओज आहेत!;)
हे सगळं पाहून आपण उगाच नावं ठेवतोय मनसेला किंवा अबूला असं वाटायला लागलय.;)
आपल्या पार्लमेंटमधली लढाई पाहिली. त्यात जे जे जखमी झाले त्यांचा शौर्यपदक देऊन सत्कार झाला पाहिजे आणि झाला नसला तर ते आपल्या (सगळ्यांच्या) क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण आहे.;) जे कोणी बेंचेस खाली लपून मारा चुकवत होते त्यांना तांदळातल्या खड्यासारखे उचलून बाहेर टाकले पाहिजे. आता यापुढे कोणाचीही लायकी ठरवताना त्याने/ तिने किती मार खाल्लेला/चुकवलेला आहे हे पाहूनच किती टक्के ते ठरवावे सारखे टक्केटोणपे खाल्लेल्यांना जास्त........
रेवती
13 Nov 2009 - 8:45 pm | देवदत्त
विधानसभेत झालेले तर काहीच नाही :)
असो,
आणखी एक थप्पडनामा.
13 Nov 2009 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरील दुवे पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील घटना खूप सौम्य वाटते. :)
>>असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर!
जरुर लिहा ! तोपर्यंत 'थींकर' च्या काही व्याख्या वाचून ठेवतो. :)
-दिलीप बिरुटे
13 Nov 2009 - 11:03 pm | पक्या
महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?
http://72.78.249.124/esakal/20091113/4823467173871005478.htm ह्याला पुढारलेपण म्हणावे काय?
स्वतःमधील विचारवंत अजून जागा झाला नसल्याने प्रश्न पडला आहे.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
13 Nov 2009 - 11:35 pm | Nile
सचिनबद्दल असलेल्या आदरयुक्त प्रेमाचे द्विशतक झाले! :)
(बातमी खरी आहे असे समजुन वरील विधान वाचावे. हो, सध्या कोण कोणाच्या नावावर काय खपवेल सांगता येत नाही. ;) )
14 Nov 2009 - 12:59 am | Nile
वा वा! सुंदर चित्रफीती! भारतीय पार्लिंमेट्ची ( नक्की का? यु.पी. असेंब्ली वाटली मला!?) चित्रफीत पाहुन, या बाबतीतही आमचा भारत 'आघाडीवर' आहे हे पाहुन सार्थ अभिमान वाटला! ;)
(विकासराव, त्या नंतर तिथे कशा दंगली झाल्या, कीती बसेस फोडल्या वगैरे लिहायला विसरलात का हो? ;) )
काय हे विकासराव! हा वाक्याला सर्वात जास्त हसु आले. ;)
14 Nov 2009 - 1:40 am | संदीप चित्रे
चित्रफितींसाठी धन्स रे विकास :)
14 Nov 2009 - 1:47 am | चतुरंग
अब्बू गब्ब्बू आणि नवनिर्माण सेना सगळीकडेच आहेत हे बघून एकटे असल्याची खंत कुठल्याकुठे पळून गेली! :)
('झापड'वाला)चतुरंग