आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले.
रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ?
वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत. माझे ज्ञान अतिशय तोकडे आहे, काहि चुकले असल्यास मोठ्या मनानी क्षमा करावी आणी कान पकडुन चुक दाखवावी.
बाण लागुन वाली खाली कोसळताच राम त्याच्या दिशेने धावला, थोडेसे भानावर आल्यावर संतापलेल्या वालीने रामास खालील प्रश्न विचारले वा असे म्हणु की आपले मनोगत ऐकवले :-
१) हे उमद्या राजकुमारा मी दुसर्या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?
२) लोक म्हणतात की राम हा सत्यवचनी, तत्वनिष्ठ आणी सदा धर्माचे आचरण करणारा आहे. तुझ्या सारख्या क्षत्रियाने ज्याने वेदांचा अभ्यास केला आहे, काय योग्य काय अयोग्य ज्याला पुर्ण कळते अशा तुझ्या सारख्या व्यक्तीने असे अधर्माने वागणे योग्य आहे का ?
३) तुझ्या सारखा धर्माचरणी माणुस स्वत:च्या पवित्र आत्म्याला मारुन माझ्या सारख्याशी असे क्रुर वर्तन करेल अशी अपेक्षाच मी कधि केली न्हवती.
४) मी तुझ्या राज्यात किंवा तुझ्या विरुद्ध काहिही अपराध केलेला नसताना ती कोणती गोष्ट होती जिनी तुल मला असे अधर्मानी मारण्यास प्रवृत्त केले ? ते ही मी दुसर्या कोणाशी लढत असताना ?
५) तुझा जन्म रघुकुलातला आहे, तुमचे घराणे हे सदवर्तन आणी धर्मरक्षणासाठी फार पुर्वीपासुन प्रसिद्ध आहे. अशा कुलात जन्म घेउन सुद्धा तु हे असे पाप कसे केलेस ?
६) आम्ही वनवासी आहोत आणी तु एक नागरीक. असे असताना सुद्धा असे प्रतिष्ठा घालवणारे हिन कृत्य तु कसे करु शकतोस ?
७) लोक सोने, चांदी, सत्ता, जमीन मिळवण्यासाठी दुष्कृत्य करतात, मला मारुन तु काय मिळवलेस ?
८) पाच प्रकारची जनावरे हि ब्राम्हण व क्षत्रियांस खाण्यास योग्य असतात. मी त्यातील एकाहि प्रकारात मोडत नाही. माझी हाडे, त्वचा माझे केस हे कुठल्याच प्रकारे मनुष्यास उपयोगी पडु शकत नाहित, असे असताना सुद्धा तु माझी हत्या का केलीस ??
९) मी राम नावाच्या अशा हत्तीकडुन मारलो गेलोय ज्यानी धर्म,नितीमत्ता ह्यांची बंधने तोडुन टाकली आहेत आणी जो उन्मत्त झाला आहे.
१०) जर तु समोरा समोर मला आव्हान दिले असतेस तर आतापर्यंत तु नक्कीच मृत्युच्या कुशीत असतास.
११) जर सीतेला शोधण्यासाठी सुग्रीवाचे मदत मिळावी म्हणुन तु हे केले असशील तर ती फार मोठी चुका आहे. मला सांगितले असतेस तर मी कधिच रावणाला हात बांधुन तुझ्या समोर आणुन आदळले असते.
ह्यावर रामानी दिलेली उत्तरे अशा प्रकारे :-
१) ह्या असल्या निष्फळ आणी पुराव्याशिवाय बडबडीने तु माझ्यावर आरोप करु पाहत आहेस, किती निर्बुद्ध असशील तु.
२) कोणताही योग्य निर्णय घेताना धर्म, अर्थ, काम, समय, लोक ह्या सगळ्यांची आवश्यकता असते. तुला वरिल पैकी एकाहि गोष्टिचे ज्ञान नसताना तु ह्या गोष्टिंच्या आडुन माझ्यावर कसे आरोप करु शकतोस ?
३) तु जन्मानी एक वानर आहेस, आपल्या आजुबाजुला तु तुझ्या सारखीच इतर वानरे गोळाकरुन बसला आहेस आणी त्यांच्या संगतीत तु जे काय करशील ते सगळे धर्माप्रमाणे आहे असे तु कसे समजु शकतोस ? धर्म म्हणजे काय हे माहित नसेल तर थोर लोकांकडे जाउन अभ्यास कर, वेद, धार्मीक ग्रंथ वाच म्हणजे धर्म म्हणजे काय हे तुला निट आकलन होईल.
४) पृथ्वी वरील सर्व नद्या, डोंगर, जंगले ही रघुकुलाच्या अधिपत्याखाली येतात. रघुकुलात जन्म घेतल्याने ह्या सर्व ठिकाणी धर्माचे पालन कसे होईल ह्याकडे लक्ष देणे हे माझे कर्तव्य आहे. इथे अधर्मानी वागणार्यांना आम्ही दंडीत करणारच.
५) लहान भाउ, विद्यार्थी आणी मुलगा ह्यांना एकाच न्यायाने वागवावे.
६) मी तुझा वध करण्याचे मुळ कारण म्हणजे स्वत:च्या लहान भावाच्या बायकोशी तु केलेले दुर्वर्तन. त्या वर्तनानी तु धर्म आणी नितीमत्ता ह्यांच्याशी कायमची फारकत घेतली आहेस.
७) कन्या, भगीनी वा लहान भावाच्या बायकोशी केलेल्या कुठल्याही प्रकारच्या दुष्कृत्यासाठी 'मृत्युदंड' हि एकच शिक्षा प्रत्येक धर्मग्रंथानी सांगितलेली आहे.
८) सुग्रीवाशी माझे जुळलेले संबध हे माझे लक्ष्मणाशी असलेल्या संबंधा येव्हडेच पवित्र आहेत. जर मी तुझ्याशी संबंध जोडले असते, तर सुग्रीवाच्या पत्नीला कोणी बरे मुक्त केले असते?
९) राजाच्या हातुन दंडास पात्र झालेला पापी स्वर्गप्राप्ती करतो, त्याची सर्व पापे नाहिशी होतात. पण ह्या उलट जर राजानी अशा पापी लोकांकडे दुर्लक्ष केले तर ह्या पापी लोकांना मिळणार्या सार्या शिक्षा ह्या राजाला नरकात भोगाव्या लागतात. माझे पुर्वज मंधता ह्यांनी सुद्धा ह्या आधी ह्याच प्रकारे पाप्यांना दंडीत केलेले आहे.
१०) तु जन्माने वानर आहेस. अनादी कालापासुन मनुष्य सापळे लावुन प्राण्यांची शिकार करत आला आहे. तुझ्या सारख्या स्वत:च्या सुरक्षीत वस्तीस्थानापासुन बाहेर आलेल्या प्राण्याची हत्या करण्यात गैर काहिच नाही. आणी मुख्य म्हणजे शिकार ही समोरा समोरच खेळली गेली पाहिजे असा कोणताही धर्म वा नियम नाही.
११) तुझी हत्या ही मी माझ्या कुलाचे नाव राखण्यासाठी, उज्वल करण्यासाठी आणी धर्माच्या रक्षणासाठीच केलेली आहे.
ह्या उत्तरांनंतर स्वत: वालीनेही रामानी काहिही पाप केले नसल्याचे मान्य केले होते.
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 10:02 pm | मेघना भुस्कुटे
हा 'बिनतोड' युक्तिवाद वाचून माझंही मनोरंजन झालं आहे.
रामायण हे तत्कालीन समाजसंकेतांना धरून चालणारं एक काव्य आहे हे गृहित धरून आणि तितपतच महत्त्व त्याला देऊन त्याकडे पाहायचं हे ठाऊक आहे. पण आजच्या बदललेल्या नीतीमूल्यांमध्येही त्या वागण्याचं कुणी हिरिरीनं समर्थन करत असेल, तर त्याबद्दल दुमत नोंदवण्याचा हक्क बजावला पाहिजे, कारण रामायणाचे दाखले आजही दिले जातात. म्हणून लिहिते आहे.
रामाचा - आणि त्याच्या कुलाचा - आजूबाजूच्या परिसरावरचा हक्क हा स्वघोषित होता. तत्कालीन साम्राज्यविस्ताराच्या तंत्राचा तो एक भाग होता. वाली वानर असला, तरी तो त्याच्या प्रदेशाचा शासक होता. तो प्राणी असल्यामुळे त्याला मारण्याचा हक्क रामाला मिळत नाही. हा हिसकावलेला हक्क आहे. होता.
वाली, शंबुक, सीता अशा अनेक बाबतींत रामाची भूमिका वादग्रस्त ठरत आली आहे. आजच्या बदलत्या मूल्यांच्या संदर्भात तसं कुणी रोखठोकपणे म्हणत असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? कुठलंही महाकाव्य हे काळाच्या कसोटीवर अशा प्रकारे घासून घेतलं जात असतंच.
9 Mar 2009 - 11:17 pm | अवलिया
हा तथाकथित संवाद आपणास कुठुन प्राप्त झाला हे कळाले तर बरे होईल.
बाकी, आपले रामायणाविषयीचे ज्ञान किती आहे हे आपण सांगितले असल्याने त्यावर काहीही बोलत नाही.
राम आदर्श मानला जातो आहे हजारो पिढ्यांपासुन.. काहीतरी असेलच ना त्यात.. का आजची पिढी फार हुशार आणि मागील आपले सर्व पुर्वज केवळ गतानुगतिक. नाही, काहीतरी आपलेच चुकते आहे, आपल्या पहाण्यात दोष आहे. असो.
रामायण हे ना कल्पनाविलास ना काव्य !
रामायण ही कहाणी आहे अयोध्येच्या राजपुत्राची!!
एका हाडामासांच्या मानवाची!!!!
जो तुमच्या आमच्या सारखाच होता,
फक्त फरक असेल तर येवढाच की संकटे आल्यावर तो गांगरुन जात नसे...
तोंड देत असे.. विजय प्राप्त करत असे...बास ..हाच तो मुलभुत फरक!!!
इंग्रजांनी फोडा झोडा केले असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले... सुग्रीव, बिभीषण!!
अमेरिका दुस-या देशाच्या धनसहाय्याने तिस-या जगावर हल्ला करते असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले.. सु्ग्रीवाच्या सहाय्याने लंकेवर हल्ला !!
बाकी, चमत्कार, जमिनीतील पेटी, अहिल्येची मुक्ती वगैरे वगैरे माणसाचा देव होतांना जो शेंदुर अपरिहार्यपणे चढतो त्याची पुटे. असल्याने फरक पडत नाही, नसल्याने माहात्म्य कमी होत नाही.
ज्याला रामाला मानायचे त्याने मानावे, कुणी नसेल मानत त्यामुळे मला तरी फरक पडत नाही.
बोला सियावर रामचंद्र की जय !!!
श्रीराम जय राम जय जय राम !!!
-- अवलिया
10 Mar 2009 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
मागच्या वर्षी ह्याच मुद्यांवर झालेल्या वादात काहि लोकांकडुन मला हा संवाद प्राप्त झाला होता, त्यावेळी तरी त्यांनी तो हा संवाद वाल्मिकींनी रामायणात लिहिला आहे असा दावा केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मी ह्या संवादाचे दाखले दिलेले बघत होतो.
मी राम हा देव असल्याचा कुठल्याही प्रकारे दावा करत नाहि अथवा त्यानी केलेल्या कृत्याचे समर्थन अथवा विरोधही करत नाहि. जे मला प्राप्त झाले ते मी फक्त आपणासमोर आणले. ह्याच्या सह्हायानी मला कुठलाही दावा करायचा नाही. वाली वध आणी अधर्मचरणाचे आरोप जेव्हड्या मनोरंजकपणे मी वाचतो तेव्हड्याच मनोरंजकतेने मी हा संवाद सुद्धा वाचतो.
चार ज्ञानी लोकांकडुन सांगोपांग चर्चा होउन ह्याविषयीच्या ज्ञानात अजुन भर पडावी म्हणुन हा संवाद इथे मांडला आहे. हि मांडणी करण्यात काहि चुक झाली असल्यास अथवा एखाद्या चुकिच्या गोष्टिचे समर्थन केले आहे असे वाटत असल्यास क्षमा असावी.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
10 Mar 2009 - 12:26 pm | अवलिया
हम्म. ठिक आहे.
चालु द्या मग....
-- अवलिया
9 Mar 2009 - 11:48 pm | प्रियाली
>>आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली.
:)
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले. ;)
10 Mar 2009 - 12:14 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : मला वाटलं की येल्लॉनॉटी हेच त्या पंथातले पहिले की काय? ;) )
चतुरंग
10 Mar 2009 - 3:30 am | पिवळा डांबिस
खुद के साथ बातां : मला वाटलं की येल्लॉनॉटी हेच त्या पंथातले पहिले की काय?
नाय हो!!!
"महाजनो येन गता, सः पंथः"
:)
सध्याचा डांबिस
यल्लोनॉटी
13 Mar 2009 - 10:20 am | विसोबा खेचर
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले.
तात्या म्हणायचे?? अगं प्रियाली तू माझ्या जिवावर का उठली आहेस? तात्या आहेत अजून! :)
बाकी वाल्मिकींना तंबाखूचे बेसुमार व्यसन असल्यामुळे त्यांना भ्रम झाला होता असे ऐकून आहे! :)
आपला,
(द्वाड प्रियालीचा मित्र) तात्या.
10 Mar 2009 - 12:04 am | विकास
>>>हे उमद्या राजकुमारा मी दुसर्या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?...
ह्या आणि ह्याला जोडून पुढचे सर्व प्रश्न रामाने शांतपणे ऐकले आणि एका वाक्यात रामबाणासारखे उत्तर दिले: "मी तुला का मारले म्हणून विचारतोयस? उत्तर शिंपल आहे, मी खराखुरा राजकुमार आहे, परीकथेतील नाही..." :-)
10 Mar 2009 - 12:09 am | विकास
(खालील काही "शोध" प.वि. वर्तकांचे - पण मला ते बर्यापैकी लॉजिकल वाटले काही बाबतीत अर्थातच सोडून देयचे...)
वाली हा महान राज्यकर्ता होता. त्याची मदत घेतली असती तर तो भूराजकीय राजकारणात रामाला म्हणजे अयोध्येच्या (त्यावेळेस भावी) राजाला डोईजड झाला असता.ह्याचा विचार करून रामाने वालीपेक्षा कमी श्रेष्ठ पण तरीदेखील मदत होऊ शकेल अशा सुग्रीवाची मदत घेतली. अर्थात त्या आधी सीतेला शोधण्याचे वचन त्याने सुग्रीवाकडून मिळवले होते आणि हनुमानाने दोघांना आधीच मैत्रीत आणि रामाला शब्दात बांधले होते हे आहेच.
वाली हा त्याच्या प्रजाजनांमधे एक कुशल राजा म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळेच त्याला मारल्यावरून, "कोणी वाली उरला नाही" अशी म्हण तयार झाली. (यातील मला त्यांचे लॉजिक आवडले पण मग मराठी किती जुनी होईल वगैरे विचार मनात येतात ;) )