राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.
[ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.]
एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली.
साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते. तसा, एक दाढीवाला विकट म्हातारा तिच्या अगदी जवळ जाऊन तिला धमकावतो, ‘मामाच्या अंगावर जी फुलं आहेत, त्यात मोठमोठाले काळे पिवळे साप वेटोळे घालून बसलेत. तू जवळ जाशील तर ते साप तुला कचाकचा चावतील. गप्प बैस.’ आला तसा, तो म्हातारा डोळे गरागरा फिरवीत गर्दीत दिसेनासा झाला.
इकडे राणी एलिझाबेथ हमसाहमशी रडून हैराण झाली होती. तिच्या जवळही असाच एक म्हातारा गेला, ‘मामाच्या अंगावर जी हारफुलं आहेत, त्यात प्रचंड मोठे कारस्थान आहे. जवळ जायचा प्रयत्नही करशील, तर तू होत्याची नव्हती कधी झालीस, ते या राजवाड्याच्या भिंतीनाही कळणार नाही. मुकाट रहा.’
पुढे साध्या एलिझाबेथचे लग्न ठरले. तिने एकच अट घातली, ‘माझ्या लग्नात कोणतीही फुले वापरायची नाहीत.’ तिची अट मान्य झाली. लग्न झाले. आणि..... मग.... हळूहळू..... कुठूनकुठून काळ्या पिवळ्या सापांची पिलावळ तिच्या आयुष्यात शिरू लागली. ‘आपण फुलांना स्पर्शही न करता, सापांच्या राज्यात कशा अडकलो?’ -- -- तिला आजही कळत नाही. पण ती सामना करतेय.
इकडे राणी एलिझाबेथच्या राज्यारोहणाचा सोहळा आला. तिनेही एकच अट घातली. ‘या सोहळ्यात कोणतीही फुले वापरायची नाहीत.’ ती तर महाराणीच होणार! तिची अट तत्काळ मान्य झाली. फुलच काय, पण फुलाची पाकळीही न वापरता, जंगी राजेशाही सोहळा पार पडला. तिने सत्तासूत्रे हाती घेतली. आणि....मग....हळूहळू.... कुठूनकुठून तिला कटकारस्थानांचा वास येऊ लागला. श्वास घेणेही जड वाटावे, इतका कुटीलपणा आजूबाजूला. ‘आपण फुलांना स्पर्शही न करता, या कटकारस्थानाच्या राज्यात कसे आलो,’ तिला आजही ते कळत नाही, पण ती त्यांचा सामना करतेय.
-शिवकन्या
प्रतिक्रिया
20 Nov 2017 - 3:26 pm | माहितगार
कळलं नै. तामीळनाडूच्या गेल्या वर्षाभरातल्या बातम्या खोलातन वाचलेल्या नाही तिकडचा काही संदर्भ ?
2 Dec 2017 - 7:44 am | शिव कन्या
तामिळनाडूत काही घडत असेल तर मला नाही माहित. त्याचा काही संबंध नाही.
पण विंट्रेस दाखवलात, धन्यवाद.
20 Nov 2017 - 9:34 pm | उपयोजक
साधं सोप्पं सर्वांना कळेल असं लिहा की!!
22 Nov 2017 - 12:22 am | रानरेडा
देव आपल्या कृपेचा राणी जतन करा
आमच्या प्रख्यात राणी
देवा, राणीचे रक्षण कर
विजयी तिला पाठवा
आनंदी आणि तेजस्वी
आपल्यावर राज्य करण्यासाठी दीर्घकाळ
देवा, राणीचे रक्षण कर
परमेश्वरा, आमच्या देवा,
तिच्या शत्रूंना सोडचिठ्ठी द्या
आणि त्यांना फॉल करा
त्यांच्या राजकारणाचा भंग करा
त्यांच्या विनोदी युक्त्या हरवून टाक
आमच्या निराशा आम्ही आपली खात्री आहे
देव आम्हाला सर्व वाचवतो
स्टोअरमध्ये तुमची सर्वोत्तम भेटवस्तू
तिच्या ओतणे खूश वर
दीर्घकाळ ती राज करू शकते
ती आमच्या नियमांचे रक्षण करू शकते
आणि कधीही आम्हाला कारण द्या
हृदय आणि आवाज गाण्यासाठी
देवा, राणीचे रक्षण कर
या देशात केवळ नाही
परंतु, देवाने त्याची कृपा कळविली
किनारापासून किनाऱ्यापर्यंत
प्रभु, राष्ट्रे पाहा
त्या माणसांकडे बंधू असले पाहिजे
आणि एक कुटुंब तयार करा
एकही रन नाही
प्रत्येक गुप्त शत्रु पासून
मारेकर्यांकडून फुंकणे
देवा, राणीचे रक्षण कर
आपले हात बळकावणे
ब्रिटनच्या फायद्यासाठी
आमच्या आई, राजकुमार आणि मित्र
देवा, राणीचे रक्षण कर
भगवान मार्शल वेड मंजूर
आपल्या पराक्रमी मदत करून मे करू शकता
विजय आणणे
तो शांत बसू शकते
आणि जोराचा प्रवाह सारखा
बंडखोर स्कॉट्स चिरडणे
देव राजा जतन
22 Nov 2017 - 1:24 pm | मराठी कथालेखक
मला वाटतं गरीब असो वा श्रीमंत .. लहानपणी दु:ख, संकटे आणि वेदनांपासून कितीही दूर राहिलं तरी मोठेपणी या गोष्टी आपल्या जीवनात हळूहळू प्रवेश करतातच असा काहीसा या कथेचा अर्थ असावा.
2 Dec 2017 - 7:42 am | शिव कन्या
हा आणखी एक नवा अर्थ. धन्यवाद.
4 Dec 2017 - 11:54 am | पुंबा
आवडली रूपककथा..