एक अतिशय आनंदाची बातमी..!
शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते..
महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..!
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
28 Feb 2009 - 12:32 am | रामदास
मन:पूर्वक अभिनंदन..!
28 Feb 2009 - 12:38 am | घाटावरचे भट
मनःपूर्वक अभिनंदन!!
28 Feb 2009 - 12:49 am | रेवती
असेच म्हणते.
रेवती
28 Feb 2009 - 8:01 am | अवलिया
असेच म्हणतो
--अवलिया
28 Feb 2009 - 10:21 am | चाणक्य
अभिनंदन
28 Feb 2009 - 10:37 am | दशानन
अभिनंदन !!!
28 Feb 2009 - 5:32 pm | सुक्या
आनंदाची बातमी.
अभिनंदन!
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
28 Feb 2009 - 12:56 am | चतुरंग
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
बातमीबद्दल धन्यवाद तात्या!!
चतुरंग
28 Feb 2009 - 12:57 am | चकली
महानोरांच्या कविता अजरामर आहेत!
चकली
http://chakali.blogspot.com
28 Feb 2009 - 9:26 am | शितल
सहमत. :)
28 Feb 2009 - 1:50 am | संदीप चित्रे
निसर्गाशी एकजीव झालेल्या माणसाची कविता तशीच नसती तरच नवल.
महानोरांचा कल्पनाविष्कार आणि शब्दरचना हे पाहिलं की त्यांच्याबद्दल खूपच आदर वाटतो.
>>> या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
>>> फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
>>> काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
28 Feb 2009 - 1:57 am | प्राजु
ना धो महानोरांचे अभिनंदन. हाच खरा त्यांचा सन्मान!
नभ उतरू आलं.. चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं.. हिरव्या गव्हरात...
बालकवींच्या नंतर, निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेला हाच एकमेव कवी असेल.. ज्याने निसर्गाला आपला श्वास मानला. :)
खूप खूप आनंद झाला या बातमीने.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Feb 2009 - 10:11 am | वेताळ
बालकवींची पताका पुढे चालु ठेवलेला खरा निसर्ग कवी......
वेताळ
28 Feb 2009 - 5:46 am | मुक्तसुनीत
महानोरांच्या कवितांच्या सहवासात घालवलेल्या रात्री, दुपारी आठवताहेत. आठवणीत रूतून बसलेले शब्द , ओळी , सगळ्यांना आज अंकुर फुटल्यासारखे झाले आहे. "पक्ष्यांचे लक्ष थवे...गगनाला पंख नवे...." "या नभाने या भुईला दान द्यावे ...कोणती पुण्ये अशी येती फळाला ... जोंधळ्याला चांदणे लखडून यावे... शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे" , "जळाणार्या पानांसाठी , मन ओथंबलं" ....त्यांच्या वह्या , लावण्या ....सगळ्यांकडे आयुष्याचे काही क्षण कायमचे गहाण आहेत.
महानोरांना सलाम. आणि तात्यांचे , मिपाचे आभार :-)
28 Feb 2009 - 10:16 am | ढ
कविवर्य ना.धो.महानोर यांचे अभिनंदन.
28 Feb 2009 - 6:03 am | बेसनलाडू
त्याच जोडीला महानोरांची 'फुलात न्हाली पहाट ओली' (माझी फारच आवडती कविता) येथे टंकायचा मोह आवरत नाहीये :) ठळकावलेल्या द्विपदी म्हणजे तर क्या कहने!!!!!
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले
रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले
निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी
अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!
(ओलाचिंब)बेसनलाडू
आणि याच पिढीचा वारसा नलेश पाटलांसारखे कवी पुढे चालवत आहेत, याचा आनंद होतो.
(निसर्गप्रेमी)बेसनलाडू
28 Feb 2009 - 7:56 am | प्रदीप
'ह्या शेताने लळा लाविला असा, असा की
परस्परांशी सुखदु:खाने हसलो, रडलो,
आता तर हा जीवच अवघा असा जखडला,
मी ह्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो'
कवि महानोरांचे अभिनंदन.
28 Feb 2009 - 10:28 am | अमोल नागपूरकर
निसर्ग कवीन्चे अभिनन्दन
28 Feb 2009 - 11:32 am | विनायक पाचलग
या उत्तम कवीचे अभिनंदन
त्यांच्याकडुन आणखी सुंदर कवीता येवोत हीच प्रार्थना
अवांतर्-सांगण्यास आनंड वाटतो की आमच्या दहावीच्या पुस्तकात फक्त दोन कवीता मला मनापासुन आवडल्या होत्या त्यातली एक होती कुसुमाग्रजांची आणि दुसरी ना धो महानोरांची
छानसे वाचलेले
विनायक पाचलग
28 Feb 2009 - 11:54 am | विनायक प्रभू
महा'नरां'चे मनःपुर्वक अभिनंदन
28 Feb 2009 - 11:59 am | बिपिन कार्यकर्ते
महानोरांची वाचलेली पहिली कविता.... "या नभाने या भुईला..." काही तरी विलक्षण वाचल्याची अनुभूती अंगावर काटा आणून गेली होती. त्या नंतर एकाहून एक सुंदर कविता देणार्या या मातीतल्या कविला लाख लाख सलाम.
बिपिन कार्यकर्ते
28 Feb 2009 - 3:29 pm | दत्ता काळे
महानोर हे पु.ल. देशपांडेंना लाडक्या कवींपैकी एक. एकदा पुल म्हणाले होते "मातीशी नातं सांगणारा हा शेतकरी-कवी आहे, ह्याच्या कवितेच्या ओळीसारखी एखादी जरी ओळ मला लिहिता आली असती तर माझं जीणं सार्थकी लागलं असतं"
ह्या श्रेष्ठ कवीचे मनःपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन.
28 Feb 2009 - 4:27 pm | सुनील
बालकवींचा वारसा सर्वार्थाने पुढे नेलेल्या महानोरांचे अभिनंदन.
नाव मिळवण्यासाठी मुंबई-पुण्यात येण्याची गरज नसते. गुणवत्ता असेल तर, अजिंठ्याच्या परिसरात राहूनदेखिल काही बिघडत नाही, हेच यावरून दिसून येईल.
"फुलात न्हाली" ही संपूर्ण कविता दिल्याबद्दल बेसनलाडू यांचेदेखिल आभार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2009 - 4:38 pm | ढ
माझ्यासारख्या फाटक्या कवीला आणखी काय हवे ? खूप मिळाले..’ असे भावोद्गार निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी जनस्थान पुरस्काराच्या स्वीकारानंतर सत्काराला उत्तर देताना काढले. -लोकसत्ता.
28 Feb 2009 - 6:03 pm | विसुनाना
लोककवीचे अभिनंदन