रिकामी दिसली एक गाडी
त्यात जाऊन बसलो मी
आता मजा येईल प्रवासाची
म्हणून स्वतःशीच हसलो मी
कधी वाटलं गाडीला थांबवावं
कधी सुसाट पळवावं तिला
पण आयुष्य नामक चालकाने
माझा पूर्ण भ्रमनिरास केला
मी नेईन तसंच जायचं तू
म्हणालं मला माझं आयुष्य
कसला हट्ट करायचा नाही
विचारायचं नाही कधी भविष्य
घडवीन तुला सफर मी आता
एका वेगळ्याच जादुई दुनियेची
कुठे फार थांबायचं नाही आपण
आणि घाईही नाही करायची
आलास जसा जन्माला
सगळे रंग तू बघून घे
लक्षात नाही यायचा खेळ हा
हे पहिल्यांदा समजून घे
तुझ्यासारखेच इतर अनेक
भेटतील तुला पावलोपावली
तू मात्र असशील एकटाच
बरोबर फक्त तुझीच सावली
वाटेल तुला तूच करतोस सगळं
पण तो फक्त आभास असेल
एका ठिकाणाहून दुसरीकडे
एवढाच तुझा प्रवास असेल
हे एेकून अंतर्मुख झालो मी
विचारलं एवढं फक्त आयुष्याला
माझं वाटतं तरीही काहीच नाही माझं
मग काय अर्थ आहे या धावपळीला ?
हसलं आयुष्य आणि म्हणालं मला
मी तुला अगदीच निराश नाही करणार
अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी
गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !
प्रतिक्रिया
28 Jun 2017 - 1:21 pm | पद्मावति
फारच सुरेख.
वाटेल तुला तूच करतोस सगळं
खरंय अगदी. हे लक्षात ठेवलं तर आयुष्य किती सुखकर होईल.पण तो फक्त आभास असेल
एका ठिकाणाहून दुसरीकडे
एवढाच तुझा प्रवास असेल
अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी
क्या बात है!गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !
खूप खुप आवडली कविता.
28 Jun 2017 - 2:10 pm | नितिन५८८
खुप आवडली फारच सुरेख
28 Jun 2017 - 2:18 pm | नावातकायआहे
सुंदर!
28 Jun 2017 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
आहे जिलबी.. तरिही मनोहर. ;)
28 Jun 2017 - 3:58 pm | जगप्रवासी
छान आहे कविता
28 Jun 2017 - 9:48 pm | मुक्त विहारि
"अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी
गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !"
+ १ ...मस्त
29 Jun 2017 - 1:47 pm | संदीप-लेले
खूपच छान !
पण ...
यापेक्षा ..
'गाडी चालू आहे तोपर्यंत भरभरून देणार' या अर्थाचं काही जास्त सुसंगत होईल असं वाटतं ! ;)
29 Jun 2017 - 6:49 pm | सिद्धेश्वर विला...
खरंय आयुष्य आहेच मुळी गाडी
मनी फार चढाओढी
पहिला डब्बा तो बालपणाचा
गोडगोड खाऊ न द्वाडपणाचा
दुसरा डब्बा शाळेचा
हसत रडत घालवायचा
तिसरा डब्बा कॉलेजमध्ये
वेळ जाई पोरींमध्ये
चौथा डब्बा नोकरीचा
पाचवा नेहेमीच लग्नाचा
सहावा वाटे नेहेमी असावा
छकुल्यांचा आसरा सदैव लाभावा
सातवा डब्बा काठीचा
थेट वरच्या भेटीचा
गाडी अशीच धावत असते
इंजिन नेहेमीच बदलत असते
डब्बे जोडत जोडत
सुस्साट पळत असते
मित्रा ,, आयुष्य वेचायचे असते , तिच्यासाठी जी आपलयाला जन्म देते , सोबत देते ... ती आई असते न दुसरी बायको असते ...........
29 Jun 2017 - 7:09 pm | अत्रुप्त आत्मा
बदा बदाबदा बदाबदा ! =))
29 Jun 2017 - 7:22 pm | सिद्धेश्वर विला...
बदा बदाबदा बदाबदा लिहिले आहे ...त्याच्या बाजूला जिलेबी पडायचं मशीन बसवलंय का दादा ? ....
29 Jun 2017 - 7:50 pm | सिद्धेश्वर विला...
गुर्जी खाकी गोळी संपली वाटत
एम सील असेल देर्देकरांकडे
मला पोचला आवाज तुमच्या अतृप्त आत्म्याचा
मी बसलोय तुम्ही दिलेली खाकी गोळी शोधत
वेदना फार होत असतील
आवाजही फार फार येत असतील
आषाढ चालू आहे ना ....
आषाढीच्या कळा सोसत नसतील ...
धैर्य बाळग जरा मनी
सोबत देईल तुला यामध्ये
माझी प्रेमळ बहीण .... जेनी