यंदा कर्तव्य आहे भाग ३

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
24 Feb 2009 - 9:30 pm

यंदा कर्तव्य आहे? पुस्तकाचे
मनोगत
यंदा कर्तव्य आहे भाग १
यंदा कर्तव्य आहे भाग २

एकनाड
आमच्या एका मित्राच्या लग्न जुळविण्याचे वेळी प्रथेप्रमाणे काही कुंडल्या व फोटो बायोडाटासह येउन पडल्या होत्या. मित्राचे वडील त्याचे सॉर्टिंग करीत होते. त्यातील काही पत्रिका त्यांनी प्राथमिक फेरीतच बाद केल्या. ते म्हणाले, '' स्थळ चांगली आहेत पण एकनाड आहे. त्यामुळे बाद कराव्या लागल्या.`` त्यांना पंचांगाची परिभाषा थोडीफार समजत होती. एवढया भांडवलावर असलेले ज्योतिषज्ञान एकनाड समजण्यास पुरेसे होते. पाच अधिक पाच बरोबर दहा हे सांगायला रॅन्गलर व्हावे लागते काय? एकनाड असल्यास संतती होत नाही अथवा अडचणी येतात हा ठाम समज! पूर्वी रक्तगट समजण्याची सोय नसल्याने आपले पूर्वाचार्य एकनाड पहात असत असा वैज्ञानिक मुलामाही काही लोक देतात.
खरं तर या समजुतीत काहीही तथ्य नाही. फलज्योतिषात नाडी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते कुठेही स्पष्ट सांगितलेले नाही. एकनाड-दोषामुळे होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. नाडीग्रंथात नाडी म्हणजे एक पळाचा अवधी. शरीरशास्त्रात नाडी म्हणजे रक्तवाहिनी. फलज्योतिषात अमुक नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाची नाडी अमुक एवढेच सांगितले आहे. अंत्य, आद्य, मध्य अशा तीन प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत. जगातला प्रत्येक माणूस या तीनपैकी कोणत्या तरी एका नाडीचा असतोच. पंचांगात अवकहडा चक्र नावाचे एक कोष्टक असते. त्यावरून जन्मनक्षत्राच्या आधारे तुमची नाडी कोणती ते कळते. उपवर मुलगा व मुलगी या दोघांची नाडी एकच आहे असे दिसले तर तिथे एकनाडीचा दोष आहे म्हणून त्या दोघांचे लग्न करू नये कारण अशा जोडप्याला संतती होत नाही अशी वेडगळ श्रद्धा प्रचलित आहे. वधूवरांची नक्षत्रे आद्यनाडीत असता वियोग, मध्यनाडीत असता दोहोचा नाश व अंत्य नाडीत असता वैधव्य व अतिदु:ख अशी फळे काही ग्रंथात दिली आहेत. पत्रिका-गुणमेलनात नाडीला सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिले आहेत. एकनाड असता नाडीचे शून्य गुण अन्यथा थेट आठ गुण असा मामला आहे नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडण्याचा प्रयत्न काही ज्योतिषीलोक करतात पण तो त्यांचा कावेबाजपणा आहे. का? ते पहा. रक्तगट हे ए, बी, एबी, ओ, आरएच पॉझिटीव्ह व निगेटीव्ह असे एकूण आठ प्रकारचे आहेत. तीन नाडया व आठ प्रकारचे रक्तगट यांचा कुठेही गणिती ताळमेळ बसत नाही.एकनाड-दोषामुळे जोडपे निपुत्रिक रहाते ही समजूत जर खरी असती तर संभवनीयतेच्या नियमानुसार जगातली एक-तृतीयांश जोडपी निपुत्रिकच राहिली असती! पण तसे काहीच आढळत नाही. यावरून उघड दिसते की ही समजूत म्हणजे एक खुळचटपणा आहे. एकनाड-दोषाला काही अपवाद गर्गसंहितेमध्ये दिले असले तरी पूर्वीच्या व आजच्याही ज्योतिष्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा अंधानुकरणाने म्हणा किंवा स्वार्थामुळे म्हणा एकनाडीचे फालतू स्तोम माजले आहे.
एकनाड-दोषावर आजवर झालेल्या टीकेचा एक परिणाम असा झालेला दिसतो की आता दाते पंचांगात नाडी-दोषाचे वेगळेच परिणाम सांगण्यात येवू लागले आहेत. तिचा संबंध आता संततीशी नसून माणसाच्या स्वभावाशी जोडण्यात आला आहे, संतती बाबत मौन पाळण्यात आले आहे, पण एकनाडीमुळे मृत्यूदायक दोष निर्माण होतो अशी दहशत आता नव्याने घातली आहे ! दुसरा महत्वाचा बदल म्हणजे एकनाड दोष ठरवण्यासाठी आख्ख्या नक्षत्राऐवजी त्याचा फक्त एक चरणच विचारात घ्यावा असे नरपतिजयचर्या स्वरोदय या ग्रंथाचा आधार देउन सांगितले आहे. या बदलामुळे एकनाड दोषाच्या केसेसचे प्रमाण एकदम खाली येउन ते फक्त २५ टक्क्यावर येते असा दावा केला आहे. पण या प्रकाराचा खरा अर्थ काय होतो ते पहा. गेली शेकडो वर्षे चालत आलेल्या रूढीमुळे ७५ टक्के केसेस मध्ये निष्कारणच एकनाड-दोष मानून स्थळे नाकारली गेली असाच याचा अर्थ होत नाही का ? आम्ही तर म्हणतो की एकनाड-दोष ही कल्पनाच मुळी कालबाहय झाली असल्यामुळे तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करावे.

यंदा कर्तव्य आहे ? भाग ४
यंदा कर्तव्य आहे? भाग ५
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
यंदा कर्तव्य आहे? भाग ७
यंदा कर्तव्य आहे? भाग ८

फलज्योतिषविचार

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Feb 2009 - 10:53 pm | अवलिया

वाचतोय......

--अवलिया

सहज's picture

25 Feb 2009 - 7:56 am | सहज

वाचतोय.

शितल's picture

24 Feb 2009 - 11:04 pm | शितल

तीन ही भाग वाचले, अजुन लिहा वाचायला आवडेल. :)

छोटा डॉन's picture

25 Feb 2009 - 8:52 am | छोटा डॉन

आत्ताच तिन्ही भाग एका मागुन एक वाचले.
चांगले चालु आहे, माहिती बरीच मिळते आहे व उपयोगालाही येईल असे वाटते ...

अजुन लिहा, आम्ही वाचतो आहोतच ..!!!

------
( यंदा नाही पण फुडल्या वर्षी कर्तव्य असणारा ) छोटा डॉन ;)
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

ऍडीजोशी's picture

26 Feb 2009 - 12:11 am | ऍडीजोशी (not verified)

तुझ्या राशीला सौम्य चंद्रअसल्याचे स्मरते :) :) :)

आनंद घारे's picture

25 Feb 2009 - 7:56 am | आनंद घारे

पति व पत्नीची एकनाड असलेले एक कुटुंब माझ्या माहितीमध्ये आहे. त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे होऊन गेली. दोघेही सुदैवाने अजून जीवंत आहेत, सुखी जीवन जगत आहेत आणि त्यांना नातवंडे झाली आहेत.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2009 - 8:48 am | प्रकाश घाटपांडे

या निमित्ताने एकनाड या गोष्टीवर आपले/ आपल्या निकटवर्तियांचे अनुभव / विचार मिपाच्या हाटेलात मांडले जावे हाच उद्देश. आजही जेव्हा एकनाड या गोष्टीमुळे जेव्हा पत्रिका बाद होतात त्यावेळी आपण २००९ सालातच आहोत का? असा विचार मनात येतो. बाद करणार्‍यांना मी कधीच दोष देत नाही. बास यावर विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे मात्र आपल्या हातात आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दशानन's picture

25 Feb 2009 - 9:16 am | दशानन

एकनाड = :?

का म्हणतात हे समजले नाय !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

प्रकाश घाटपांडे's picture

25 Feb 2009 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

ही नाडी म्हणजे
नाडीग्रंथातील नाडी नव्हे
तसेच कोणत्याही प्रकारचे विलॅष्टीक बी नव्हे
पायजम्या ची नाडी नव्हे. दाक्तर तपासतात ती नाडी बी नव्हे.
हिचा संबंध फक्त पंचांगातील अवकहडा चक्राशी आहे नक्षत्र क्र १ अ श्वि नी पासुन सुरुवात करुन आद्य मध्य अंत्य , अंत्य मध्य आद्य, आद्य मध्य अंत्य .....करत नक्षत्र क्र २७ रे व ती मधे केला आहे.
नाडी ही संज्ञा केवळ प्राकृतिक विभागणी साठी वापरली आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनिल हटेला's picture

25 Feb 2009 - 9:08 am | अनिल हटेला

लिहीत रहा सर !!
अजुन माहिती घ्यायला आवडेल !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

योगिता_ताई's picture

26 Feb 2009 - 11:02 am | योगिता_ताई

पति व पत्नीची एकनाड असलेले माझे दादा वहीनी आहेत...
त्यांना संतती बद्दल खरच त्रास आहे..
-----------------------------
त्यांचा पहीला मुलगा २ वर्षाचा झाल्यावर वारला.. त्याला काय झाले होते याचा उलगडा शेवटपर्यंत डॉक्टर करू शकले नाही (त्याच्यासाठी जवळपास ३ ते ४ लाख खर्च केला टाटा हॉस्पिटल मधे)..

त्यांची दुसरी मुलगी आता ३ वर्षाची आहे, तिला कायम युरिन इन्फेक्शन असते. तिचे यासाठी खुप मोठे ऑपरेशन झाले आहे (१.५ ते २ लाख खर्च केला). ऑपरेशन नंतर सुध्धा ती सारखी आजारीच असते. तिला अजुनही शू कळत नाही, कायम चड्डीत नाहीतर अंथरुणात करते..

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 12:17 pm | प्रकाश घाटपांडे

एकनाडीचे उपद्रवमुल्य हे संतती न होण्याशी जोडले आहे. संतती सौख्याशी नाही. घारे सरांच्या परिचयातील वरील उदाहरणात एकनाड असुनही सुरळित चालले आहे. पुर्वी किंवा आजही काही ठिकाणी संतती नसलेल्या बाईकडे "बिच्चारी" म्हणुन पहातात. समाजातील कुजकट बोलण / टोमणे ऐकायला लागतात. ती संवेदनशील असेल तर तिला ते सहन होत नाही. जिथे "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव |" असा आशिर्वाद दिला जात असे अशा समाजात निपुत्रिक असणे वेदनामय असते म्हणून ही नाडीची दहशत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

महेश हतोळकर's picture

26 Feb 2009 - 12:41 pm | महेश हतोळकर

मी आणि माझी पत्नी एकनाड नाही. आम्हाला आमच्या पहिल्या संतती वेळेस खूप त्रास झाला. मुलगी जन्मतःच कवकबाधित (fungal infection) होती. ११व्या दिवशी गेली. ही कवकबाधा हवेतून होते. तिचा असंरक्षीत हवेशी संबंध आला नव्हता (ऑपरेशन थियेटर --> मोबाइल इन्क्युबेटर --> NICU). डॉक्टरांना शेवटपर्यंत कवकबाधेचा उगम सापडला नाही.