...मग असे द्या पैसे!

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
15 Nov 2016 - 3:21 am

कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या.
तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस
(https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...)
-----------
एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते.
युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे)

याचे फायदे:

  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.

या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.

जीवनमानतंत्रअर्थकारणअर्थव्यवहारलेखमाहितीमदत

प्रतिक्रिया

एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अ‍ॅपस बनवली आहेत बँकांनी.
युपीआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.
बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे पण मिळते आहे...
कोणतेही वापरले तरी सेफ असावे असे वाटते कारण बाटली बदलली तरी युपीआय ही दारू तीच असणार आहे.

Steps for Registration:
1.User downloads the UPI application from the App Store / Banks website
2.User creates his/ her profile by entering details like name, virtual id (payment address), password etc.
3.User goes to “Add/Link/Manage Bank Account” option and links the bank and account number with the virtual id

Generating M – PIN:

1.User selects the bank account from which he/she wants to initiate the transaction
2.User clicks on requried option

हे वरचे कुणी सुलभ मराठीत भाषांतर करून देईल का?

खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे:
Banks live as PSP and Issuer:

1 Andhra Bank

2 Axis Bank

3 Bank of Maharashtra

4 Canara Bank

5 Catholic Syrian Bank

6 DCB Bank

7 Karnataka Bank

8 Union Bank of India

9 United Bank of India

10 Vijaya Bank

11 Punjab National Bank

12 Oriental Bank of Commerce

13 TJSB

14 Federal Bank

15 ICICI Bank

16 UCO Bank

17 South Indian Bank

18 HDFC

---
मर्चंट एण्ड साठी काय सेट अप आहे याची मात्र कल्पना आली नाही..
त्यावर कुणी काही सांगेल का?

कंजूस's picture

15 Nov 2016 - 5:10 am | कंजूस

//(UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. //

//या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.//
//वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या//

- १)स्टेट ब्यान्केचं नाव का नाही?
-२)दुकानदार सर्व लबाड आहेत हे चार दिवसांच्या चौकशीत कळले.ते म्हणतात क्याशच द्या
- सर्वांच्याकडे स्मार्टफोन्स हवेत
-४)गुगल अॅन्ड्राइडला सुरक्षितता कमी आहे.

- १)स्टेट ब्यान्केचं नाव का नाही?
उत्तम प्रश्न आहे. मला ही कळले नाही. पण बहुदा 'वरुन' दट्ट्या आल्या शिवाय ते होत नसावे असे वाटते.
-२)दुकानदार सर्व लबाड आहेत हे चार दिवसांच्या चौकशीत कळले.ते म्हणतात क्याशच द्या
या विषयी काय बोलणार हो आता? माझा पास. पण ज्या दुकानदारांना हवे आहे त्यांना ही माहिती तरी द्यायला हरकत नाही.
- सर्वांच्याकडे स्मार्टफोन्स हवेत
सद्य काळात हे असावेत असा समज आहे... नसल्यास शक्य नाही.
-४)गुगल अॅन्ड्राइडला सुरक्षितता कमी आहे.
याला माझा पास!
असो
हा ही पैसे देण्या घेण्याचा अधिकृत सरकारी एक मार्ग आहे. याविषयी काही माहिती दिसली नाही म्हणून हा प्रयास केला. हाच वापरला पाहिजे असा आग्रह वगैरे नाही.
अनेक व्यावसायिक सुट्टे आणि त्यांचा प्रश्न सोडवताना आपला शिक्का वापरून कुपन्स वगैरे देतात. त्यापेक्षा हा माग बराय असे वाटते इतकेच.

(पे वेव आणि पे पास असले तर काहीच प्रश्न रहात नाही...)

जे काही सुटे पैसे आहेत ते भाजी, रिक्षा ,लोकल ट्रेन/बस तिकिटाला वापरेन आणि दुधवाल्यांस चेक/NFT ने मोठी रक्कम देईन हा विचार केला.दुधवाले/वाणी ब्यान्केत नको बोलतात. शेवटी काल दोन हजारची नोट देऊन अडवान्स पेड कार्ड बनवलं.मला वाटतं दुधवाले मोठ्या स्टॅाकिस्ट कडून दुध घेतात आणि रोजची क्याश ( कमिशन वजा करून )थेट स्टॅाकिस्टच्या ब्यान्क अकाउंटला भरतात. हे नामानिराळे. हे लोक काही ( दहाएक लाखांची अथवा अधिक )मोठी आर्थिक उलाढाल करतात याची कागदोपत्री नोंदच होत नाही. असं टॅक्स-वाचवू लफडं आहे याची पक्की खात्री झाली. फक्त नोकरदार माणसांकडूनच टॅक्स ओरबाडला जातो.

टीपीके's picture

15 Nov 2016 - 12:04 pm | टीपीके

hdfc आणि sbi अजून टेस्टिंग मोड मध्ये आहेत , पुढच्या महिनाभरात लाइव्ह होतील बहुतेक. सध्या नेहमीचे दूधवाला, पानवाला यांना educate करण्याचे माझे काम चालू आहे.
BTW, एकूण २३ बॅंक्स लाइव्ह आहेत १८ नाही

बोका-ए-आझम's picture

29 Nov 2016 - 6:35 am | बोका-ए-आझम

HDFC Bank च्या app मध्ये UPI मिळतंय. त्यात Virtual Payment Address, IFSC & Bank account number, Phone number & MMID आणि आधार नंबर असे चार पर्याय आहेत. यातला कुठलाही पर्याय वापरून पैसे पाठवता येतात. दुस-या व्यक्तीला ताबडतोब मिळतात.

टीपः हा लेख कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक वर वापरला तर चालेल!

पैसा's picture

15 Nov 2016 - 9:18 am | पैसा

विक्रेत्याकडचा सेटप व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही बहुतेक. पण विक्रेत्याच्या नंबरला पेमेंट पेटीएम प्रमाणेच करता येते. http://www.npci.org.in/imps_product.aspx बँकांच्या मोबाईल बँकिंगचा प्रसार तेवढासा झालेला नाही त्यामुळे इतकी चांगली योजना दुर्लक्षित राहिली आहे. वास्तविक आमची सर्कारी बेंकही मोबाईल बँकिंग वर MMID आणि imps वापरून मोबाईल फंड ट्रान्सफरची सोय देते. म्हणजे ज्या ज्या बँका मोबाईल बँकिंग अ‍ॅपवरून देतात त्या सगळ्यांकडे ही सोय असणार. मात्र लिंक केलेल्या बँकांच्या यादीत आमच्या बँकेचे नाव नाही. वरच्या लोकानी ते यावे म्हणून काही कष्ट घेतलेले नसणार. मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर सगळे आहे. पण एक टक्का सुद्धा लोक वापरत नसावेत. खरे तर ही अधिकृत आणि पेटीएम पेक्षा सुरक्षित सेवा आहे. शिवाय पैसे विक्रेत्याच्या थेट बँक अकाउंटला जमा होतात. मात्र लोकांपर्यंत पोचण्यात फार कमी पडली आहे.

कंजूस म्हणतात तसेच मलाही वाटले होते. ते कन्फर्म झाले. सगळ्याच लोकांकडे मोबाईलने ऑनलाईन पेमेंट घेता येईल. पण त्या लोकाना पैसे बँक अकाउंटला यायला नको आहेत. कारण टॅक्स लागू होईल. फक्त अगदी छोटे विक्रेते कोणी टॅक्सीड्रायव्हर, चहावाल्याचा उल्लेख केला होता त्यांचे उत्पन्न इन्कम टॅक्स लिमिटच्या आत बसत असेल तेच फक्त अशा प्रकारे पैसे घ्यायला तयार होतील.

स्टेट ब्यान्केचं इंटरनेट-ब्यान्किंग साइट वापरून मोबाइलातूनच करतो गेले सहा महिने, अॅप वापरून रिचार्ज करतो,बिल भरतो.एटिम कार्ड मात्र कोणाकडे स्वाइप करत नाही. रुपे नावाचं "सर्व ठिकाणी चालणारं" कार्ड मात्र अवलक्षणी आहे. त्यांचा सर्वर धोका देतो. मोठ्या रकमा दिल्यानंतर छोटी क्याश ठेवायला फारच सोपं आहे. त्यासाठी स्मार्टफोन,इंटरनेट,ब्याटरी डौन होणे,घेणाय्राचं पिटिएम बंद असणे यातून मुक्त राहतो.

रघुनाथ.केरकर's picture

15 Nov 2016 - 11:05 am | रघुनाथ.केरकर

मी ग्रहकांकडुन पैसे पॉस टर्मिनल ने घेत होतो.
८ तारखेच्या पुर्वी सगळे रोख व्यवहार करायचे, आता मात्र सगळे कार्ड देतात.
पण गडबड अशी आहे ना की पॉस वर २.७८ % कमीशन पॉस वाल्याना द्याव लागत.
पुर्वी मी लोकांना पर्याय द्यायचो कि एक्तर कार्ड +३ % द्या कींवा रोख.

आता न सांगता सगळे कार्ड पुढे करतात, ह्यातील बर्‍याच लोकाना २.७८ टक्क्यांचा नीयम माहीत नसल्याने त्याना वाटतं की मी त्यान्च्या अडचणीचा फ़ायदा घेतोय.
बरे हे तीन टक्के सोडावे तर आपलचं नुकसान.
घ्यावे तर २ -३ वर्षे कमवलेलं नाव खराब होतय.

सध्या ह्यावर तोडगा म्हणुन उधार चालु केलय.

पैसा's picture

15 Nov 2016 - 11:16 am | पैसा

ऑनलाईन ट्रान्सफर घ्या, एनईएफ्टी किंवा मोबाईल बँकिंग मधून.

बिलाच्या मागे पर्सनल आणी करंट दोन्ही खात्याचे नंबर प्रिंट करुन देतोय.

अजुन एक छदाम देखील आला नाही.

ग्राहक वर हा हौसवाईफ़ वर्गातला असल्याने, ऑन्लाईन पेमेंट वैगरे प्रकार अजुन इतकासा रुळलेला नाही.

पैसा's picture

15 Nov 2016 - 12:00 pm | पैसा

खरं आहे. पण त्यांच्या घरातल्या कोणाची बँकेत खाती असतील, त्यांचीही असतील. बँकेत जाऊन त्या एन ई एफ टी करू शकतात.

टीपीके's picture

15 Nov 2016 - 12:07 pm | टीपीके

UPI वापरू लागा आणि लोकांना पण सांगा. सर्वोत्तम फायदा म्हणजे , कोणतेही चार्जेस नाहीत आणि १ मिनिटाच्या आत तुमच्या बँकेत पैसे जमा

फोने पे हे फ्लिपकार्ट चे असले तरी येस बँकेच्या मदतीने (powered by ) ऍप आहे. ICICI पॉकेट्स हे दुसरे चांगले ऍप आहे
तुमचे अकाउंट कोणत्याही बँकेत असले तरी तुम्ही ही ऍप्स वापरू शकता

सध्या लाइव्ह बँकांची यादी खालील प्रमाणे

Andhra Bank
Axis Bank
Bank of Maharashtra
Canara Bank
Catholic Syrian Bank
DCB Bank
Karnataka Bank
Union Bank of India
United Bank of India
Vijaya Bank
Punjab National Bank
Oriental Bank of Commerce
TJSB
Federal Bank
ICICI Bank
UCO Bank
South Indian Bank
Yes Bank
RBL Bank
IDFC Bank
IDBI Bank
Allahabad Bank
Kotak Bank

पैसा's picture

15 Nov 2016 - 12:38 pm | पैसा

आमच्या सिंडिकेट बँकेचे आणि देना बँकेचे मोबाईल बँकिंग अ‍ॅप आहे. मला मोबाईलवरून आयएमपीएस आणि एमएमाअयडी वापरून पेमेंट्स करता येतात. paymate यानी ती अ‍ॅप्स डेव्हलप केलेली आहेत. त्याअर्थी इतर बँकांचीही असणार. मात्र या सर्व बँका या यादीत आलेल्या नाहीत. मला वाटते की ज्या ज्या बँकांची मोबाईल बँकिंग अ‍ॅप्स आहेत त्यानी ही सुविधा सुरू केलेली असणार. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर याबद्दल माहिती मिळेल. यादी सापडली http://imps.npci.org.in/P2Pparticipatingbanks.asp
Participating Banks for IMPS Funds Transfer

A P Mahesh Co-op Urban Bank
Allahabad Bank
Andhra Bank
Axis Bank
Bank of Baroda
Bank of India
Bank of Maharashtra
Bassein Catholic Co - operative Bank
Canara Bank
Catholic Syrian Bank
Central Bank Of India
Citi Bank
Corporation Bank
Cosmos Co-operative Bank
Dena Bank
Development Credit Bank
Dhanlaxmi Bank
Dombivali Nagari Sahakari Bank
Federal Bank
Greater Bombay Co-operative Bank
HDFC Bank
ICICI Bank
ING Vysya Bank
IDBI Bank
Indian Bank
Indian Overseas Bank
Janata Sahakari Bank Pune
Karur Vysya Bank
Kotak Mahindra Bank
Karnataka Bank
Lakshmi Vilas Bank
Oriental Bank of Commerce
Punjab National Bank
Punjab & Maharashtra Co-op Bank
Saraswat Co-operative Bank
South Indian Bank
State Bank of Bikaner & Jaipur
State Bank of Hyderabad
State Bank of India
State Bank of Mysore
State Bank of Patiala
State Bank of Travancore
Syndicate Bank
Tamilnad Mercantile Bank
The Hongkong And Shanghai Banking Corporation Limited ,India (HSBC India)
The Thane Janata Sahakari Bank
UCO Bank
Union Bank of India
United Bank of India
Vijaya Bank
Yes Bank
BNP Paribas
Jammu & Kashmir Bank
Mehsana Urban Co-operative Bank
NKGSB Bank
Nainital Bank
Pandharpur Merchant Co-operative Bank
Punjab and Sind Bank
Janaseva Sahakari Bank
Gopinath Patil Parsik Janata Sahakari Bank
Maharashtra Grameen Bank
SUCO Souhadra Sahakari Bank
The Surat District Co-op. Bank Ltd
Dr. Annasaheb Chougule Urban Co-op Bank Ltd

टीपीके's picture

15 Nov 2016 - 12:53 pm | टीपीके

नाही , तुमची यादी ही IMPS लाइव्ह असणाऱ्या बँकांची आहे, पण UPI ची यादी वेगळी आहे. बँकांना NPCI बरोबर काम करून UPI एनेबल करून घ्यावे लागते , त्याचे निकष वेगळे आहेत. विश्वास ठेवा :) गेली दिड वर्ष मी हि बातमी ट्रॅक करतो आहे

पैसा's picture

15 Nov 2016 - 1:12 pm | पैसा

मी बोलते आहे ते आयएमपीएस वापरून एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला पेमेंट करण्याबद्दल. आणि तुम्ही म्हणता आहात ते कमर्शियल युनिफाईड पेमेंटबद्दल.

मात्र आयएमपीएस सुद्धा सध्याच्या परिस्थितीत नीट वापरले गेले तरी पुरेसे आहे. कारण वैयक्तिक खात्यात आयएमपीएस द्वारे पैसे ट्रानसफर करता येतात, तसेच मोबाईल डीटीएच रिचार्ज आणि फोन वीज क्रेडिट कार्ड इ बिलांचे पेमेंट याद्वारेच करता येते.

संजय पाटिल's picture

15 Nov 2016 - 1:37 pm | संजय पाटिल

IMPS ला चार्जेस लागतात..

आपल्या बँकेच्या मोबाईल बँकिंग अ‍ॅपद्वारे केलेल्या imps ला कोणतेही चार्जेस लागत नाहीत. मोबाईल बँंकिंग सुरू करण्यालाही कोणतेही चार्जेस नाहीत. icici hdfc yes axis इ खाजगी बँकाच्या अ‍ॅपला चार्जेस असू शकतील. माहीत नाही. सरकारी बँकाना तरी नाहीत. upi enebled कोणत्याही बँकेचे अ‍ॅप वापरून imps व्यतिरिक्त ऑनलाईन खरेदी वगैरे करता येते तर फक्त imps enebled बँकाच्या स्वतःच्या अ‍ॅपद्वारे फक्त त्याच बँकेतला अकाउंट वापरून डीटीएच-मोबाईल रिचार्ज, बिल्स पेमेंट आणि दुसर्‍या व्यक्तीच्या कोणत्याही खात्यात फंड्स ट्रान्सफर करता येते हा फरक लक्षात आला.

संजय पाटिल's picture

15 Nov 2016 - 3:31 pm | संजय पाटिल

मी SBI to SBI IMPS केलेले, तेव्हा ५००० रू ला ५.७५ कमिशन म्हणून डेबीट झालेले.

पैसा's picture

15 Nov 2016 - 4:08 pm | पैसा

तुमच्या बॅंकेच्या साईटवर या चार्जेसबद्दल माहिती तपासून घ्या. सिंडिकेट बँक आणि वर कोणीतरी म्हटले की कॅनरा बँकही मोबाईल बँकिंगद्वारे आयएमपीस वर चार्जेस लावत नाहीत नक्की.

टीपीके's picture

15 Nov 2016 - 3:35 pm | टीपीके

हे मात्र बरोबर , पण IMPS किरकोळ (रिटेल) पेमेंट्स साठी उपयोगी नाही कारण प्रत्येक बँकेचे इम्पलेमेंटेशन वेगवेगळे आहे, अनेक बँकात पहिले registration करावे लागते. आणि हीच अडचण UPI दूर करण्याचा प्रयत्न करते

पैसा's picture

15 Nov 2016 - 3:56 pm | पैसा

दुसर्‍या बँक अकाउंटला पेमेंट करता येते. आताच माझे अ‍ॅप उघडून मुद्दाम पाहिले. पेमेंट सेक्शन मधे IMPS other banks -> त्यात (१)IMPS using Account No & IFSC (२) IMPS using Mobile No & MMID (३)Know your MMID असे ऑप्शन्स आहेत. त्याशिवाय Transfer to syndicate bank हा वेगळा उपविभाग आहे.

म्हणजेच ज्याच्या अकाउंटला मोबाईल बँकिंग अ‍ॅक्टिव्हेट केले आहे त्याना Mobile No & MMID वापरून किंवा ते नसेल तर Account No & IFSC वापरून पेमेंट करता येते. हे युपिआय पेक्षा जरा किचकट आहे मात्र ज्या बँका अजून युपिआय मधे सहभागी नाहीत त्यांचे ग्राहक सुद्धा मोबाईल बँकिंग वापरून काम भागवू शकतात. फ्लिपकार्टसारख्या साईटवरून ऑनलाईन खरेदी फक्त करता येणार नाही इतकंच काय ते.

प्रत्येक बँकेचे ऍप वेगवेगळे आहे, त्या मुळे एकच पद्धत नाही चालत

कोणत्याही बॅंकेचे! अाले, की लगेच वापरणार।
ही एक जबरदस्त सुविधा अाहे. सर्वात महत्वाचे: ज्या बॅंकेचे अॅप वापराल, त्या बॅंकेत खाते असण्याची गरज नाही, कोणत्याही बॅंकेचे खाते त्या अॅपला लिंक करू शकता. मक्तेदारीमुक्त अॅप!

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 1:53 pm | संदीप डांगे

2012 मध्ये m-pesa बद्दल खूप कौतुक ऐकले होते, आपल्याकडे हे कसे इम्प्लिमेंट करता येईल, किंवा तसे प्रयत्न झालेत का?

https://en.m.wikipedia.org/wiki/M-Pesa

टीपीके's picture

15 Nov 2016 - 3:31 pm | टीपीके

UPI त्या सारखेच आहे, फक्त अधिक रेफाईन्ड

अंजनेय's picture

15 Nov 2016 - 1:55 pm | अंजनेय

धन्यवाद

चालू परिस्थितीत अत्यंत उपयुक्त लेख लिहून लोकांचे प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद.

माझा अनुभव सांगतो

ICICI ची UPI पद्धती गेले ४-५ महिने वापरत आहे. कोणतीही अडचण आली नाही.
१ सुधारणा सुचवतो. मी UPI वापरून मित्राला १० रुपये देखील पाठवले आहेत. त्यामुळे ५० ची किमान मर्यादा नाही.

फायदे

१) अकाउंट नंबर, IFSC कोड सांगावा लागत नाही. त्यामुळे अकाउंट नंबर, IFSC लक्षात ठेवावे लागत नाहीत. ते सांगताना आणि नोंदवून घेताना होणाऱ्या अपघाती चुका होत नाहीत. ई-मेल सारखा १ VPA फक्त लक्षात ठेवावा लागतो. एका अकॉउंट वरती अनेक VPA बनवू शकतो.
२) पैसे रियल टाइम म्हणजे काही सेंकंदात जमा किंवा ट्रान्सफर होतात.
३) भविष्यातील देवाण घेवाण सेट करून ठेवू शकतो.
४) कुणाकडून पैसे येणे असेल तर UPI वर तशी विनंती पाठवू शकतो. समोरच्या व्यक्तीस मेसेजे द्वारे सूचित केले जाते आणि त्यांनी प्रणालीत जाऊन देयक स्वीकार केल्यास लगेच पैसे आपणास मिळतात.

आगामी काळांत NEFT, RTGS, IMPS या सर्व पद्धतीची जागा UPI नक्की घेईल असे वाटते

टीपीके's picture

15 Nov 2016 - 3:37 pm | टीपीके

उत्तम , फक्त ४-५ महिने कसे वापरात आहात ते कळले नाही कारण UPI ११ एप्रिल ला NPCI ने लाँच केले आणि १८ ऑगस्ट पासून त्यावर ऍप्स आल्या, ICICI माझ्या माहितीप्रमाणे २२ ऑगस्ट पासून लाइव्ह आहे

अंजनेय's picture

16 Nov 2016 - 8:40 pm | अंजनेय

भावना समजून घ्या हो!!

तुम्ही पुणेकर का?

टीपीके's picture

17 Nov 2016 - 12:45 pm | टीपीके

:) sorry

अंजनेय's picture

18 Nov 2016 - 5:34 pm | अंजनेय

अहो सॉरी कशाला??? ठीक आहे चालायचंच !!!!
रच्याकने तुम्ही पुणेकर वाटत नाही. :)

राहुल काटु's picture

15 Nov 2016 - 2:19 pm | राहुल काटु

ios वर ICICI चे imobile हे app आहे, त्यात UPI हा पर्याय उपलब्ध आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 2:34 pm | मराठी कथालेखक

paytm पण UPI आहे का ?
बाकी सगळं ठीक आहे पण रोजच्या व्यहवारात इंटरेनेटशिवाय हे पेमेंट होणार नाही. स्मार्टफोनचा अनिवार्य यामुळे अनेक लोकांना (ग्राहक , तसेच दुकानदार) हे वापरता येतील याची खात्री नाही.

टीपीके's picture

15 Nov 2016 - 3:41 pm | टीपीके

Paytm UPI नाही , ते एक क्लोज्ड वॅलेट आहे.

हो, इंटरेनेट आणि स्मार्टफोन शिवाय ह्या पद्धती वापरता येत नाहीत, आणि हे सर्वच मोबाईल वॅलेट साठी लागू आहे. एखाद्या वेळी एप्रिल २०१७ मधील UPI व्हर्जन २ मध्ये सध्या फोन साठी पण काही सोय करतील

मराठी कथालेखक's picture

15 Nov 2016 - 4:01 pm | मराठी कथालेखक

हो. म्हणजे एखादा sms पाठवून पेमेंट करता आलं तर बरं होईल.
पण त्याकरिता सुरक्षेचे काही नवीन उपाय योजावे लागतील...

मोबाईल अ‍ॅप्स वाल्यांचे रेव्हेन्यू मॉडेल काय असते ? सध्या किंवा कालांतराने काही चार्जेस घेतले जाण्याच्या शक्यता ? असल्यास चार्जेसचे स्वरुप ?

चांगल्या धाग्यासाठी आभार.

कंजूस's picture

15 Nov 2016 - 3:42 pm | कंजूस

fast भरवसावाले इंटरनेट घेणार्र देणाय्रा दोघांचे चालू हवे, स्मार्टफोनचे डबडे ऐनवेळी धोका द्यायला नको. कुठे फुकट वाइफाइ वापरले की काही घुसखोरी नको. पाकिस्तान बॅार्डरजवळच्या गावांत चालेल का?

निनाद's picture

16 Nov 2016 - 2:34 am | निनाद

फुकट सार्वजनिक वायफाय वापरून बँकेचे व्यवहार कधीही करू नका!
आपल्या फोन कंपनीच्या नेटवर्कचा डाटा वापरा तो जास्त सुरक्षित राहील. असेही फोन बँकिंगसाठी फारसा डाटा लागत नाहीच. जोवर तुम्ही तुमच्या फोन कंपनीने दिलेला डाटा वापरत आहात तोवर भारतात (अथवा त्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये कुठेही) फोन बँकिंग वापरायला प्रत्यवाय नाही.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 4:33 pm | संदीप डांगे

इ ट्रांझाकशन ची सर्वात मोठी गैरसोय कि व्यवहार पूर्ण व्हायला अजून एक माध्यम लागतं. दोन्हीकडे मोबाईल हवेत, ऍप हवे, इंटरनेट हवे,

रोख चलनात ह्यापैकी कशाचीच गरज नसते, म्हणून भारतात 99 टक्के कॅश व्यवहार होतात, हे सत्य आहे व ते मान्य करायलाच हवे.

दोन्हीकडे मोबाईल हवेत, ऍप हवे, इंटरनेट हवे असे नाही. द्यायच्यावेळी देणार्‍याकडे असले म्हणजे झाले. घेत्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत.

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 2:54 am | संदीप डांगे

हो, पण जास्तीची माध्यमं लागतात जी उपलब्ध असण्यावर व्यवहार शक्य आहे.

असो, किमान 20 टक्के e ट्रान्सफर साठी इन्फ्रा तयार होणे अवघड आहे, अशक्य नसले तरी. जियो ची रेंज खेडोपाडी बऱ्यापैकी आहे, बघूया

पैसा's picture

15 Nov 2016 - 5:17 pm | पैसा

UPI आणि IMPS द्वारे मोबाईलवरून सोप्या पद्धतीने पेमेंट्स
UPI काय आहे?

Unified Payments Interface.
अर्थात यात सामील झालेल्या बँकापैकी कोणत्याही बँकेच्या ग्राहकांसाठी मोबाईलद्वारे विविध पेमेंट्स करण्याची व्यवस्था. यात सामील असलेल्या एका बँकेचा ग्राहक दुसर्‍या बँकेचे मोबाईल अ‍ॅप वापरून या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. google app store मधून UPI app डाऊनलोड करून घ्यायचे. आपल्या बँकेशी संपर्क करून मोबाईल बँकिंग सुरू करून घ्यायचे आणि मग मोबाईलवरून या app द्वारे विविध पेमेंट्स करायची अशी ही सोपी पद्धत आहे. यात बँकेकडून एक व्हर्चुअल पत्ता abc@pockets अशा प्रकारचा दिला जातो आणि त्याच्या आधारे दुसर्‍याला पेमेंट करता येते किंवा स्वीकारता येते. पेमेंट घेणार्‍याकडे मोबाईल बँकिँग नसेल तरी Account Number + IFSC वापरून त्याला पैसे देता येतात.
Transfer through Virtual ID
Account Number + IFSC
Mobile Number + MMID
Aadhar Number
Collect / Pull money basis Virtual ID
या सर्व पद्धतीनी दुसर्‍याला पैसे देता येतात.
या पद्धतीने दुसर्‍याला छोट्या मोठ्या रकमा मोबाईलद्वारे देता - घेता येतात याशिवाय ऑनलाईन खरेदीच्या साईट्सवरून खरेदी करता येते. pockets हे icici बँकेचे UPI app चे उदाहरण आहे. यात ते ग्राहकाला व्हर्चुअल तसेच मागणी केल्यास फिजिकल व्हिसा कार्ड देतात.

IMPS
ज्या बँका अजून UPI व्यवस्थेत सामील झाल्या नाहीत त्यांच्या ग्राहकांसाठी IMPS उपलब्ध आहे. यात ऑनलाईन खरेदी वगळता इतर छोटीमोठी पेमेंट्स आणि मोबाईल डीटीएच रिचार्ज, वीज, फोन इ. बिले भरणे ही कामे आपल्या स्मार्टफोनवरून करता येतात.
IMPS काय आहे?
Immediate Payment Service
यातही मोबाईलवरून छोटी मोठी पेमेंट्स दुसर्‍या व्यक्तीला करता येतात. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. त्यासाठी आपल्या बँकेचे मोबाईल बँकिंग ऎप डाऊनलोड करून बँकेतून मोबाईल बँकिंग चालू करून घ्यायचे. बँकेतून आपल्याला यासाठी PIN आणि पासवर्ड मिळतो. आणि MMID जनरेट केला जातो. दुसर्‍या व्यक्तीकडे कोणत्याही बँकेचे मोबाईल बँकिंग चालू केले असेल तर या MMID आणि फोन नंबरचा वापर करून पैसे ट्रांसफर करता येतात. समजा दुसर्‍याकडे मोबाईल बँकिंग चालू नसेल तरी त्याचा Account number & IFS Code वापरून मोबाईल NEFT दवारे पैसे ट्रांसफर करता येतात.

सध्या नकद पैशांची चणचण भासत असताना या दोन्ही पद्धती वापरणे सर्वांसाठी सोयीचे आहे कारण ५० पासून ५०००० पर्यँतचे पेमेंट अवघ्या काही मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून करू शकतो. मात्र यासाठी स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. या व्यवस्था बँकिंग सिस्टीम मधून आल्या आहेत आणि सुरक्षित आहेत. फोन हरवल्यास बँकेत फोन करून नंबर ब्लॉक करता येतो. तसेच पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने मोबाईल इतर कोणाच्या हातात पडला तरी तो आपल्या खात्यातून पैसे वापरू शकणार नाही.

या व्यवस्थेसाठी काही बँकात कोणतेही चार्जेस नाहीत मात्र आपल्या बँकेत चार्जेस आहेत का आणि असल्यास किती आहेत याची खातरी त्या त्या बँकेच्या वेबसाईट किंवा हेल्पलाईन वरून करून घ्यावी.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 5:19 pm | संदीप डांगे

धन्यवाद!

सुबोध खरे's picture

15 Nov 2016 - 6:55 pm | सुबोध खरे

एच डी एफ सी बँकेचे IMPS दर असे आहेत
Slabs (Rs) Existing Charges (Excluding Taxes) Revised Charges (Excluding Taxes)
Upto Rs, 10,000 3.5 5
10,001 Upto 100,000 5 5
100,001 Upto 200,000 15 15

निनाद's picture

16 Nov 2016 - 2:38 am | निनाद

असे असेल तर ही बँक लुबाडते आहे. जी बँक या सुविधा फुकट देते त्यांची सेवा घ्यायला हवी.
या शिवाय मग अजून काय काय चार्जेस या बँका लावतात याचा ही पडताळा घ्या. सरकारी बँकांशी एकदा पडताळून पहा. लहान सहान करत या बँक्स वर्षभरात बराच पैसा काढत असतील.
(शक्य असेल तर हे सर्व चार्जेचासद्य काळात काढून टाकावेत यासाठी अध्यक्षांना इमेल करून पाहा. खास बाब म्हणून काढतीलही...)

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 11:28 am | संजय पाटिल

सरकारी बँकांशी एकदा पडताळून पहा.

SBI वाले पण घेतात..

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2016 - 7:41 pm | चौथा कोनाडा

मी देखील ह्द्फ्चचं ((समजून घ्या :-) )) इम्प्स (समजून घ्या :-) ) बर्‍याचं वेळेला वापरलेय.
कापले जाणारे चार्जेस परवडण्याजोगे वाटतात मला.
आजकाल मल्टिप्लेक्सला पण पार्किंग वीस चाळीस रू आकारतात!
मर्यादित व्यवहार असतील तर काय पाच-दहा रूपयांकडे पहायचे ?
अश्या प्रकारच्या चार्जेस मधिल सवलती नंतर बंद होत असतात अथवा वेगळ्या प्रकारच्या व्यवहारांच्या माध्यमातून आकारल्या जातात.

निनाद's picture

16 Nov 2016 - 2:29 am | निनाद

वा खुप छान सांगितलेत!
धन्यवाद.
हे लिखाण विकिवर वापरले तर चालेल का?

पैसा's picture

16 Nov 2016 - 5:40 am | पैसा

बिनधास्त वापर.

तुम्ही उत्तम माहिती दिली आहे.
माझे मत आहे, माझ्या सुविधेसाठी जर मला एक हजार रु. मागे काही पैसे द्यावे लागले तर मी ते का नाकारावेत?
अनेक जागी आपण गाडी पार्क करण्यासाठी १० ते २० रु देतो ना ते देखील काही तासासाठी?
मला हे लोकांचे लॉजिक समजत नाही, ते का पैसे घेतात? अहो! सेवा आली की सेवेचे मुल्यपण असते! हे आपला समाज का विसरतो?

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 2:35 am | संदीप डांगे

सामान्य भावना आहे, लोकांना कुठेही पैसे फुकट द्यावे वाटत नाहीत.दुकानदार स्वतःच पक्क्या बिलाशिवाय वस्तू विकू शकत नाहीच अशी व्यवस्था झाल्यास - माझ्याकडे कॅश आहे ती देऊन मी पक्के बिल घेऊ शकतो हे सामान्य कायदेशीर उदाहरण. ह्यात वस्तू व सेवेवर जो काही सरकार निर्धारित कर आहे तो लागणारच, तो कर अंतर्भूत करूनच विक्री किंमत दुकानदार सांगेन. यात कायदेशीररित्या सुटका नाही व झक मारून ग्राहकाला ती सर्व किंमत वस्तू सेवा हवी असेल तर द्यावीच लागते.

हाच व्यवहार एकही शिल्लक पैसा न देता रोखीने वा कार्ड swipe करून होतो, तेव्हा ग्राहक किंवा दुकानदार खळखळ करत नाही. पूर्वी 2.5 पर्यन्त कार्ड पेमेंट अधिभार घ्यायचे त्यामुळे कार्ड पेमेंट टाळण्याकडेच जोर होता.

आता हे दोन मार्ग (एकही पैसा अधिक न देता) उपलब्ध असतांना हा पैसेवाला प्रकार लोकप्रिय होणारच नाही. त्यामुळे सरकारने अशा सेवांवर कोणतेही चार्जेस लावू नये व बँकांना त्यांच्या प्रत्येक ग्राहकाला चेकबुक एटीएम कार्ड सारखेच मोबाईल app देणे, sms transaction व त्याची सर्व सुविधा, लोकशिक्षण, प्रचार प्रसार मोफत पुरवणे बंधनकारक करावे. तसेच याप्रकारे व्यवहार करण्यावर करातूनच काही सूट दिली तर प्रोत्साहन मिळेल. म्हणजे रोख बिल घेतले तर 100+18% टॅक्स होत असेल तर तो 16.5 किंवा 17 करावा. याद्वारे जास्तीत जास्त व्यवहार होऊन प्रत्यक्षात करसंकलन वाढेल.

उठसुठ फक्त 'पीएमोला पाठवू पीएमोला पाठवू' चा रतीब घालणाऱ्यानी सदर संकल्पनेला पीएमो पर्यंत पोचवण्याचा व तिथून अंमलबजावणी होईल असे बघण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही ;)

सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे हे आपण विसरतो. लाख दोन लाखाचे दागिने करताना सुधा दोन चार हजार रुपये कर वाचवण्याकरता पक्के बिल नको म्हणून सांगतो.

BMC कचरा घोटाळा फक्त - ९०० कोटी रु. , जकात घोटाळा - १ वर्षात ६००० कोटी रु अंदाजे
राज्य सरकार - तोल वसुली पूर्ण होऊन हि तोल काढायला नकार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आता तर आठ पदरी करायच्या नावाखाली २०३५ पर्यंत टोल जनतेच्या मानगुटीवर बसवणार .
हे सगळे सरकारी घोटाळे तुम्हाला दिसत नाही.

टोल वाल्या लोकांचे ? कि सरकारी बाबू लोकांचे ? कारण तुम्हाला करप्शन च्या समुद्रातील देव मासे दिसत नाहीत. चिल्लर असलेला सामान्य माणूस हाच खरा दोषी वाटतोय म्हणून म्हटले असे

कंजूस's picture

15 Nov 2016 - 6:01 pm | कंजूस

शेवटी काय ठरलं?
काळाची गरज काय?
NFC वाला स्मार्टफोन का/ 4G वाला स्मार्टफोन ?उपयुक्त

निनाद's picture

16 Nov 2016 - 2:30 am | निनाद

दोन्ही असलेला :)

अजया's picture

15 Nov 2016 - 7:32 pm | अजया

अतिशय उपयुक्त धागा.
पैसाताई फार छान संकलन दिले आहेस.
अजिबात माहिती नव्हती या प्रकाराची.धन्यवाद.

गामा पैलवान's picture

16 Nov 2016 - 12:30 am | गामा पैलवान

लोकहो,

भारतात पेपाल चालतं का?

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 12:42 am | संदीप डांगे

हो, चालतं

गामा पैलवान's picture

16 Nov 2016 - 2:29 am | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद!

मला वाटतं इमेल व आधार कार्डशी संलग्न असलेलं कुठलंही मोबाईल अॅप बँकिंगसाठी चालू शकेल. एकात्मिक भरणा पद्धती अशीच काहीशी दिसते आहे.

आ.न.,
-गा.पै.

पे-पाल भारतात चालते पण त्याला भरपूर सरकारी नियमाचा सेट पुर्ण करावा लागतो. त्यामुळे पे-पाल रोजच्या वापरासाठी सध्यातरी भारतात योग्य पर्याय नाही आहे.

मी गेली ६-७ वर्षे पे-पाल वापरत आहे व आठवडी आज ही वापरतो, बाहेर देशातून कामाचे पैसे घेण्यासाठी वापरतो.

खरडफळ्यावर ११ नोव्हेंबरला मोबाइल पेमेंट्सबद्दल जी चर्चा झाली होती ती साठवली होती. ती इथे द्यावी का? चर्चा तांत्रिक आहे तरीपण खफ फक्त सभासदांसाठी आहे म्हणून विचारतो.निनादच्या खरडवहीत लिहू का?

पैसा's picture

16 Nov 2016 - 8:05 am | पैसा

इथेच लिहा की. सगळे बरे वाईट मुद्दे एकत्र असू देत.

कंजूस's picture

16 Nov 2016 - 8:30 am | कंजूस

मोबाइल पेमेंट अॅप्स
कंजूस
Fri, 11/11/2016 - 15:00
पेटीम वगैरे मोबाइल पेमेंट्सवर लेख टा का कुणीतरी.
१)कोणती अॅप्स
२)कुठे चालतात(!)
३)इंटरनेट लागते का?/ नाही लागले तर पेमेंट करता येते का?
---
कंजूस
Fri, 11/11/2016 - 16:06
ओके नाव न घेता कोणत्या सोयी असतात/असाव्यात, एका अॅपमधून दुसय्राला ट्रान्स्फर होते का ,अॅप्स फ्री असतात का? टॅक्स,सर्विस टॅक्स असतो का?नेट ब्यान्किंग,एसेमेस यांत काय फरक आहे हे तरी लिहा.वापर केलेल्यांनी अनुभव लिहा.
संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 16:09
पेटीम बद्दल लिहा राव. मला तर कायबी म्हाईत नाही त्यातली. बरीच शोधायचा प्रयत्न केला पण काही समजली नाही ही व्यवस्था कशी वापरायची ते. पेपाल सारखं आहे काय?
सतिश गावडे
Fri, 11/11/2016 - 16:34
पेटीयमचे खाते काढून त्या खात्याचा माध्यमातून पैसे चुकते करणे हा पर्याय ज्यांना "ऑफर" हव्या असतात त्यांच्यासाठी कामाचे आहे त्यांनाच फायद्याचे आहे.
जे गरजेच्या वस्तू आहे त्या भावाला खरेदी करतात त्यांनी थेट इंटरनेट ब्यांकिंग वापरणे सोयीस्कर
----
मंदार भालेराव
Fri, 11/11/2016 - 16:52
पेटिम किंवा तत्सम ऍप हे सध्या पेमेंट गेटवे सारखं काम करतात. या मध्ये आपण भरपूर सुविधा वापरू शकतो.
उदा. पेटीमचा वापर आपण खालील गोष्टीसाठी करू शकतो करू शकतो.
रिचार्ज :- मोबाईल, डीटीएच,डेटाकार्ड
बिल भरणा :- गॅस, लाईट, फोन
तिकीट बुकिंग :- बस, मेट्रो,रेल्वे , विमान, चित्रपट, एम्युसमेंट पार्क, इव्हेंट्स इ...
विविध खरेदी : वाहन, सोने, ग्रोसरी, ऑनलाईन शॉपिंग साईट वरच्या वस्तू इ ...
इन्शुरन्स, इमआय पेमेंट
अशा अनेक गोष्टींसाठी करू शकतो.
मोबाईल वॉलेट : कोणत्याही साईट वरून खरेदी केल्यास पेमेंट करतांना आपल्याला
डेबिट/क्रेडिट कार्ड
नेट बँकिंग
आणि मोबाईल वॉलेट असे पर्याय येतात.
आता मोबाईल वॉलेट म्हणजे असे पाकीट ज्यात तुम्ही आधीच पैसे जमा करून ठेवू शकता आणि तुमच्या गरजे प्रमाणे वापरू
शकता.
उदा. मी पेटीम वरून २५० rs चे रिचार्ज केलं आता पेमेंट करतांना पेटीम तुम्हाला वरचे ३ पर्याय देईल.
त्यात तुम्ही नेट बँकिंग निवडले तर पेटिट तुम्हाला उपलब्ध बँकांचे पर्याय दाखवते. त्यात तुमची बँक असेल तर ती निवडायची . हि निवड केल्यावर पेटीम तुम्हाला बँकेच्या साईटवर रिडायरेक्ट करेल/ नेईल. तुमच्या बँकेच्या साईट वर आल्यास तुम्ही तुमचे नेहमी प्रमाणे प्रकिया पूर्ण करून पैसे भरू शकता.
आता जर तुम्ही मोबाईल वॉलेट निवडलं असेल तर पैसे तुमच्या मोबाईल वॉलेट मधून कट होतील. पण त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या वॉलेट मध्ये पैसे भरणे गरजेचे असते. हे पैसे तुम्ही नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड द्वारे वॉलेट मध्ये भरू शकता.
तुम्ही जर मोबाईल वॉलेट द्वारे पैसे भरत असाल तर विविध साईट तुम्हाला कॅशबॅकच्या ऑफर पण देतात. हे कॅशबॅक तुमच्या मोबाईल वॉलेट मध्येच जमा होते.
---
अभिजीत अवलिया
Fri, 11/11/2016 - 17:01
पेटिम प्रमाणेच मोबिक्विक देखील चांगले आहे.
---
गॅरी ट्रुमन
Fri, 11/11/2016 - 17:13
पेटीएमवर एक गोष्ट चांगली आहे. मधूनमधून कॅशबॅक मिळतो.मी उबरचा बराच वापर करतो. पेटीएम २२२ किंवा ५५५ रूपयांनी रिचार्ज करा आणि उबरसाठी पेटीएम वापरून पैसे भरा आणि २५% (७५ रूपयांपर्यंत) कॅशबॅक मिळवा अशाप्रकारच्या ऑफर्स पेटीएम मधूनमधून देते. त्या ऑफर्स किती दिवस चालतील हे माहित नाही पण चालू आहेत तोपर्यंत वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचे
-----
बोका-ए-आझम
Fri, 11/11/2016 - 17:25
PAYTM वर एक अत्यंत मोठा फायदा म्हणजे समोरच्याचा मोबाईल नंबर माहित असेल आणि त्याच्याकडेही PAYTM असेल तर सरळ पैसे transfer करु शकता. टॅक्सी आणि रिक्षासाठी अत्यंत फायदेशीर. कालपासून एका टॅक्सीवाल्याला आणि दोन रिक्षावाल्यांना PAYTM ने पैसे दिलेले आहेत. हे पैसे तुमच्या PAYTM account मधून तुमच्या bank account मध्ये IFSC code वापरून transfer करता येतात. त्यामुळे इतरत्र पैसे पाठवण्याची मोठीच सोय झालेली
--
बोका-ए-आझम
Fri, 11/11/2016 - 17:28
सगा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण netbanking मध्ये दर transaction ला one time password घेणं (ते सर्वात सुरक्षित आहे) कदाचित वैतागवाडी ठरू शकतं. त्याऐवजी e-wallet बरं. बिलं भरण्यासाठी netbanking सर्वोत्तम आहे.
---
मंदार भालेराव
Fri, 11/11/2016 - 17:29
फक्त पेटीम च नाही तर इतर अनेक ऍप्स आहेत जी चांगली आहेत आणि ऑफर्स देतात.प्रॉब्लेम फक्त एक यांचे ऍप मोबल्यात खूप जागा खातात. त्यामुळे नको वाटते. डिजिटल मनी (पैसा )ची हि बाकी सुविधा झकास आहे. पण अनेक जण या ऍप मध्ये कॅश लोड करायला घाबरतात, त्यात मी पण येतो. कारण एकच या कंपन्या कधी बंद पडतील याची भीती.
----
पैसा
Fri, 11/11/2016 - 17:34
पेटीएम बद्दल मिपावर एक लेख आला होता मधे. एकूणात सुरक्षित नाही असा निष्कर्ष निघाला होता. क्रेडिट कार्डाने ऑटीपी वापरून वस्तू घेणे उत्तम. कालच अमेझॉनवरून १००० रु च्या वस्तू मागवल्या. चहा, साबण, पेस्ट, क्लीनर इ. त्यावर २०० रुपये गिफ्ट सर्टिफिकेटच्या रूपात डिस्काउंट मिळाला. स्नॅपडीलवरही सध्या क्रेडिट डेबिट कार्ड पेमेंटला १०% डिस्काउंट आहे. ४/८ दिवसात लागतील अशा गोष्टी तिथून थेट मागवलेल्या उत्तम.
-----
पैसा
Fri, 11/11/2016 - 17:37
एअर्टेल मनीवाल्यानी क्रेडिट कार्डला ओटीपी नव्हता त्या काळात माझ्या क्रेडिट कार्डाचे पिन बदलून घेऊन पैसे काढले होते. माझा अपराध हा की मी एअरटेलचे पोस्ट पेड बिल भरायला क्रेडिट कार्ड लावून दिले होते. त्यानंतर कानाला खडा. एकही अकाउंट कनेक्ट करत नाही.
----
संदीप डांगे
Fri, 11/11/2016 - 17:40
पैतै, अगदी अगदी. ह्याचमुळे इ-वॅलेट पासून दूर आहे.
------
पैसा
Fri, 11/11/2016 - 17:46
नशीब की मी लिमिट ५००० ठेवली होती. आणि पिन बदलल्याचा एसेमेस येताच मी कार्ड ब्लॉक केले. कार्ड ब्लॉक करीपर्यंत ५ मिनिटात त्यानी ४८०० काढून दुसर्या मोबाईलला ट्रान्सफर केले होते. त्या नंबराला फोन करून मी मनसोक्त शिव्या घातल्या होत्या. त्याच एअरटेल फोनवरून. उत्तर प्रदेश गाझियाबादचा नंबर होता. पण ट्रॅम्झॅक्शन झाले तो आयपी आणि मोबाईल नंबर सगळे पोलिसाना देऊनही त्याना काही फायदा नसल्याने सगळे तसेच सोडून दिले. तेव्हा ऑनलाईन क्रेडिट कार्ड कसे वापरतात यावर पोलिस स्टेशनातल्या लोकांची शाळा घेतली होती. =)) जर का लिमिट ठेवली नसती तर मला बराच मोठा चुना लागला असता.
------
अन्नू
Fri, 11/11/2016 - 18:15
पे-टीएम बाबतची कळालेली बातमी-
२०१५ ची
।।http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/ali...
आणि ही २०१६ ची
।।http://economictimes.indiatimes.com/small-biz/startups/alibaba-staff-fro...
पेटीएममध्ये चायनाची ४०% गुंतवणूक!!
--
।।अभिजीत अवलिया
Fri, 11/11/2016 - 18:39
ही लिंक पहा रेवतीताई.
।।http://www.sbs.com.au/yourlanguage/hindi/en/article/2016/11/09/4-ways-no...
तुमच्या नोटांचे स्थानिक चलनात रूपांतर करून टाकणे हाच एक सगळ्यात बरा उपाय दिसतोय

प्रकाश घाटपांडे's picture

16 Nov 2016 - 11:16 am | प्रकाश घाटपांडे

माझ्या अ‍ॅक्सिस बँकेचे हे युपीआय साठी असलेले अ‍ॅक्सेस पे हे अ‍ॅप माझ्या मोबाईलला सपोर्ट करत नाही. माझा मोबाईल अगदीच दगड नाही. सॅमसंग ड्यऑस आहे

सॅमसंग गुगलचे android वापरते, जाहिराती त्यांच्या साइट्सना डाइवर्ट करते .गुगल सर्चला नाही. तसेच त्यांचे पे न वापरता सॅमसंगचे डेवलप केलय.हा सर्व धपला सुंदर पिचाईने दाखवला त्याबद्दल त्याला बढती मिळाली यावर लेख आले होते. आरोप नव्हे.

एस बी आय. च्या अलिकडील वृत्तपत्रीय जाहीरातीतून सोशल नेटवर्क वापरून आर्थीक व्यवहार पद्धतीसाठी 'एस बी आय. मिंगल' चा उल्लेख होता, हे काय आहे या बद्दल कुणाला काही माहिती आहे का ?

बोका's picture

16 Nov 2016 - 12:17 pm | बोका

युपीआय चे टेक्निकल स्पेसिफिकेशन उपलब्ध आहे.
त्यात देवाण-घेवाणीची काही छान उदाहरणे दिली आहेत.
npci.org.in/documents/Technical_Specifications.pdf

जर कोणाला अ‍ॅप लिहिता येत असेल तर मला वाटते हे स्पेसिफिकेशन वापरुन कोणीही अ‍ॅप लिहू शकेल.

अभ्या..'s picture

16 Nov 2016 - 1:09 pm | अभ्या..

IMPS is better option but Axis Bank charges Rs.5 per transaction for me. plus service tax. in emergency it's better than NEFT.
I also use axis pay and simple to use.
Vodafone pesa is also best option. sometimes I have to deposit money in axis acount for cheque clearance after 5.oo pm. there is no CDM outside the bank. then Vodafone pesa helped me. bcoz mobile stores time is till 10.00. I can recharge mpesa account from there and transfer to bank account within minute. without charges. Vodafone also Cashback UpTo 50 rupees per month. it's another benefit.

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 1:34 pm | संजय पाटिल

या केस मध्ये IMPS बेस्ट ऑपशन आहे एका सेकंदात ट्रांसफर होते अमाउंट ... पण कमिशन(:
ज्या ब्यँका IMPS ला कमिशन लावत नाहित अश्या ब्यँकेत खातं उघडावं म्ह्ण्तो..

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 3:40 pm | पुष्कर जोशी

बडोदा बॅंक... IMPS आणि रेल्वे बुकिंग दोन्ही फुकट

सेवा मूल्य अथवा कर वाचवणे हेच काळा पैसा निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे हे आपण विसरतो. लाख दोन लाखाचे दागिने करताना सुधा दोन चार हजार रुपये कर वाचवण्याकरता पक्के बिल नको म्हणून सांगतो.

कंजूस's picture

16 Nov 2016 - 1:21 pm | कंजूस

एकदा का मोबाइल पेमेंट्स सुरळीत झालं की साडेसाती मागे लागणारच. साडेसात टक्के टॅक्स.

निनाद's picture

19 Nov 2016 - 5:20 pm | निनाद

हा अजुन कोणता कर? जीएसटी येतो आहे ना??

सत्यनारायण पुजेसाठी छोटा मंडप घालून बिल घेतले तर पाच हजारावर साडेसातशे रुपये सर्विस टॅक्स आहे.जो पुर्वी अजिबात नव्हता.

निनाद's picture

21 Nov 2016 - 2:26 am | निनाद

हेच तर गडबड होते आहे ना... म्हणजे मंडप घालण्याची अधिकृत किंमत पाच हजार नसून ५७५० आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक वस्तुची किंमत तेव्हाच पुर्ण होते जेव्हा सर्व कर भरून मग व्यवहार पुर्ण होतो.

'कर तर द्यायचा नाही' असे का?

प्रतिसाद लेखक "कंजूस" आहेत म्हणून.

छोटे दुकानदार आपल्याला जी वस्तू छापील किंमत १०० रु असलेली देतात तेव्हा त्यांना १०रु सुटतात (मार्जिन). मोबाइलपेमेंट्सवर एक टक्का टॅक्स लावला तर ९ रु सुटतील.साडेसात टक्के कर बहुतेक नाही लावणार ही आशा आहे.
((# गेली दहा वर्षे आपण फोन बिलावर पंधरा टक्के कर देत आहोत.
# मोबाइलचा वापर २०१० पासून वाढत जाऊन आता दर महिन्याला ( १०० कोटी ग्राहक दर महिन्याला १०० रुपयांचा रिचार्ज करत असतील असे धरले तर १५००कोटी रु कर??))

निनाद's picture

21 Nov 2016 - 7:10 am | निनाद

हे इतर सर्व कर जी एस टी आल्यावर रद्द होतील. फक्त एकच कर राहील. यामुळे प्रणाली सुलभ होइल. मग हा प्रश्न नसेल ना?
प्रश्नचिन्ह वाचून कुतुहल वाढले. म्हणजे कर गोळा होऊ नये असे म्हणणे आहे का? माझ्या मते जितका कर गोळा होतोय ते चांगलेच आहे. क्रयशक्ती असेल तसा कर गोळा होईल. कर परत अर्थव्यवस्थेत अधिकृत पैश्याच्या स्वरुपात येईल. मग अजून क्रयशक्ती वाढेल, तसा अजून लोक कर भरतील. - अधिकस्य अधिकम... मग कराची रक्कम कमी होईल.
की माझे तर्क चुकीचे आहेत का?

Nitin Palkar's picture

9 Dec 2016 - 9:07 pm | Nitin Palkar

जर खरोखरी समग्र अर्थक्रांती यशस्वी झाली तर सर्व कर बंद होऊ शकतील. फक्त ‘बँकिंग व्यवहार कर’ हा एकच कर राहू शकेल. ज्याचे सर्वात वरचे टोक साडेसात टक्के असेल. सध्या हे सर्व स्वप्नवत वाटतंय पण काही काळ तरी सकारात्मक आशावादी असायला काय हरकत आहे?

कार्ड स्वाईप मशिन किंवा सध्या ज्याला पीओएस मर्चंट टर्मिनल म्हणतात,

  • ते घेण्याची काय पद्धती आहे?
  • किती पैसे लागतात?
  • बँक किती पैसे एका व्यवहाराला चार्ज करते?
  • महिन्याचे भाडे किती असते?
  • इतर काय अडचणी आहेत?
  • कोणत्या प्रकारे सगळ्यात कमी पैशात, भाड्यात हे बसवता येते?
  • त्यातल्या त्यात चांगली बँक कोणती?
  • कायदेशीररित्या पुर्णपणे फुकट बसवण्याची काही क्लुप्ति?

कुणी माहिती देईल का?

पुष्कर जोशी's picture

3 Dec 2016 - 3:42 pm | पुष्कर जोशी

Www.payumoney.com

Nitin Palkar's picture

9 Dec 2016 - 9:22 pm | Nitin Palkar

पिओएस यंत्रे ई-बे अथवा इंडिया मार्ट या संस्थळांवर ३०००/- ते २५०००/- रुपयांना मिळतात. याचे भाडे नसते मात्र हमी काल संपल्यानंतर मामुली वार्षिक देखभाल खर्च असतो. व्यावसायिकाचे खाते असलेल्या बँकेशी ते संलग्न करता येते. याकरता लागणारी सर्व सेवा बहुतेक बँका मोफत देतात.

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 11:36 am | संदीप डांगे

E-wallet प्रकाराला कायदेशीर आधार नाही असे वाचले, ह्या कंपन्या ऑनलाईन असून आपल्या अटीशर्ती वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे सामान्य ग्राहकाला त्याची कल्पना असेलच असे नाही,

या बद्दल अधिक व खात्रीशीर माहिती इथे कुणाला असल्यास द्यावी.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2016 - 2:24 pm | टवाळ कार्टा

E-wallet प्रकाराला कायदेशीर आधार नाही असे वाचले

=))
कुठे वाचले म्हणे असे?

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 2:31 pm | संदीप डांगे

मी कुठे वाचले ते जाऊ द्या.

एका समस्येवर उत्तर माहित असेल तर द्या, तसेही वरच्या प्रतिसादात शंकाच विचारलेली आहे.

पैसाताईंचे ऐरटेल मनीवाल्यांनी पैसे खाल्ले, ह्या प्रकरणात काय कायदेशीर आधार किंवा मदत मिळेल/मिळते?

इ-वॉलेट वाल्यांसाठी ट्राय सारखी रेगुलेटरी संस्था आहे काय? कायदेशीररित्या ह्या कंपन्यांचे उत्तरदायित्व काय आहे ह्याबद्दल कुठे माहिती मिळेल? काहीही डिस्पुट झाले तर किंवा झाले असतील तर त्यासंबंधात काही माहिती आहे का?

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2016 - 5:45 pm | टवाळ कार्टा

मी कुठे वाचले ते जाऊ द्या.

म्हणाजे हे पण ट्रकवाल्यासारखेच आहे का?

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 6:34 pm | संदीप डांगे

हे पण ट्रक सारखे जाणून बुजून भलतीकडे न्यायचे आहे काय? आपली मर्जी,

पवन दुग्गल हे नाव तुम्हाला तरी माहिती असेलच, त्यांनी वरील प्रतिपादन केले आहे. आजच्या लोकमतमध्ये 8व्या पानावर बॉटम राईट ला बातमी आहे, (आता समजा 9व्या किंवा 7 व्या पेजवर, अगदीच बॉटम ला नाही तीन इंच वर बातमी सापडली तर मी खोटे बोलतो म्हणून काही लोक दिशाभूल, इत्यादी करत छाती पिटत येतीलच, तेव्हा बातमीतले प्रश्न महत्त्वाचे कि अनावश्यक डिटेल्स महत्त्वाचे याचा ज्यानेत्याने विचार करावा)

तुमची शंका दूर झाली असल्यास, वेळ मिळाल्यास माझ्याही शंका दूर कराव्यात...