जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
14 Nov 2016 - 1:14 am

तसे अल्कोहोल आणि माझे तसे जुने नाते आहे. पिण्याच्या निमिताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने हे केमिकल माझ्या आयुष्यात येतच गेले. थर्ड इअरला असताना distillary डिझाईनचे फक्त प्रश्न सोडवून मी plant technology चा पेपर सोडवला होता.

जेडीला तर मी पुण्यात ओळखतच नव्हतो, आपले मित्र सुरवातीचे मित्र म्हणजे white mischief आणि ओल्ड मोन्क (हा मित्र अजून टिकून आहे.)! २००९ मध्ये टेनेसीच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला, लगेच लोकांचे सल्ले आले - "अरे ते टेनेसी भयानक आहे, रेड्नेक कंट्री , रेसीसट लोक राहतात, एक वर्ष ड्रोप घे आणि जिकडे बाकीचे भारतीय जातात (newyork, california) तिकडे जा" पण मला असे सल्ले आणि लोक फाट्यावर मारायची 'मी साप पकडत' असल्यापासूनची चांगली सवय आहे. त्यामुळे मी टेनेसी मध्ये आलो आणि मला जॅक डनियल्स (जेडी) नावाचा मित्र भेटला.

माझे गाव इनमिन २५००० लोकवस्तीचे युनिव्हर्सिटी town आणि त्यातून ते बायबल बेल्ट मध्ये (कडवे Christian आणि जास्त करून सगळे ट्रंपवाले!). २-३ कंट्री बार होते, ते पण म्हणजे टोबी केथच्या I love this bar! गाण्यामधले - फक्त बर्बन (bourban), मूनशाईन मिळणार, ४-५ पूल टेबले आणि आजूबाजूला फुल कंट्री जनता. विकेंडला हिम्मत करून या बारच्या वाऱ्या चालू केल्या तशी हळू हळू जेडीशी ओळख व्हायला लागली. "वीकडेज ला मी आणि इतर लोकं, तर विकेंड ला मी आणि ज्याक आणि कोक!" असे लाइफ चे साधे समीकरण बसले. जॅक डॅनियल्स (जेडी) ही एक परिपूर्ण परिपूर्ण पाककृती आहे, आणि ती दीडशे वर्ष तशीच बनत आहे. जेडीला दारू म्हणणे म्हणजे दुर्वांकूरच्या (फक्त उदाहरण दिले आहे- चर्चा नको!) मसाले भाताला तांदूळ म्हणण्यासारखे आहे.

.
जॅक डॅनियल्स

१८५७ च्या उठावाच्या ७ वर्ष आधी याचा टेनसीमध्ये एका खेडेगावात (लिंचबर्ग) झाला. फारच मोठे कुटुंब आणि गरिबी त्यामुळे जेडी वयाच्या ७ वर्षापासूनच टेनसी ची देशी दारू -मूनशाईन बनवायला लागला. दिवसा बनवली तर धार्मिक लोक मारतील म्हणून ही दारू चंद्र प्रकाशात बनवली जायची.

.
ही मूनशाईन बनवायची जुनी पद्धत - लाकूड टाकून भट्टी पेटवली जायची .

जेडीचा गुरु म्हणजे त्याचा काका तो तर चर्च मध्ये पाद्री होता. याने जेडीला व्हिस्कीची दीक्षा दिली आणि हा गुरुमंत्र दिला
.

'सिंहगडावरच्या भजीला ची चव येते ती तिकडच्या देव टाक्यातल्या पाण्यामुळे' तेच तत्व व्हिस्कीला पण लागू होते.
कुठल्यापण व्हिस्की चा आत्मा म्हणजे "पाणी"! आपण लोकं पाण्याला फारच कमी लेखतो पण "ते पाणीच" एकाला जॅक डॅनियल्स बनवते तर दुसऱ्याला मल्ल्या ! जेडीने लिंचबर्ग मध्ये हा झरा शोधला. हे कमी iron असलेले (iron हे ethanol ला ऑक्सिडाइज करते म्हणजे थोडक्यात त्याची चव बिघडवते! ) पाणीच जॅक डॅनियल्सची चव १५० वर्ष राखून आहे.

.
या झऱ्याचे पाणी आजही वापरले जाते.

.
झऱ्याच्या समोर जॅक डॅनियल्स !

जशी ताकापासून पियुषची व्युत्पत्ती होते, तशीच मूनशाईनपासून टेनसी व्हिस्की बनते, म्हणजे बेस सम पण फायनल product वेगळे. जॅक डॅनियल्सने त्या साठी दारू distill झाल्यावर कोळश्यामधून फिल्टर केली (म्हणजे टेनसी दारू गाळली, आपली देशी दारू ही कशातून गाळली नाही जात, मोस्टली distil झाल्यावर, देशी पाईप मधून गळत असेल म्हणून आपल्या कडे दारू गाळली असेल म्हणत असावेत!). हा कोळसा पण शुगर-मेपल झाडापासून बनवाला जातो.

.

.
हि कोळसा बनवायची भट्टी आहे, जर विकडे मध्ये गेला तर कोळसा बनताना बघू शकतो.

एकाच प्रकारचे आणि त्याच प्रदेशातील झाड कोळसा बनवण्यासाठी वापरल्यामुळे कोळशाची porosity, त्याची adsorption capacity (दारू मधले नको असलेले घटक शोषून चिटकवून ठेवायची capacity ) सारखी राहते.

.
या जेडी बनायच्या स्टेजेस आहेत, पहिली म्हणजे मूनशाईन, नंतर जशी कोळश्यातून पास झाल्या आणि ब्यारेल मध्ये साठवल्यानंतरची फायनल स्टेज !

.
Distillary बिल्डिंग जी आतून बघू देत नाहीत.

.
सुशोभित करून ठेवलेल्या जेडी च्या बाटल्या !

मेपल कोळश्यातून गाळलेली जेडी ही मेपल झाडाच्याच ब्यारेल मध्ये साठवली जाते. जॅक डॅनियल्सची ३-४ ब्यारेल हाऊस आहेत. आझादहिंदच्या सेकंड स्लीपर बर्थ सारखी तीन लेवेलला ही ब्यारेल साठवली जातात. सगळ्यात वरच्या बर्थ किंवा लेव्हलला कोरड्या आणि गरम हवेमुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते (H2O molecule हा C2H5OH ethnaol छोटा आहे.)म्हणून या लेव्हलची व्हिस्की जास्त strong (अल्कोहोल % जास्त असते.)असते आणि लवकर mature होते. सगळ्यात खालच्या लेव्हलला थंड आणि दमट हवा असल्याने हवेतले पाणी ब्यारेल मध्ये जाऊन भेसळ होते. सगळ्यात चांगली व्हिस्की ही मधल्या बर्थ च्या ब्यारेल मधून निघते. जॅक डॅनियल्स distillary टूर मध्ये जुन्या ब्यारेल हाउस ला घेऊन जातात, आत्ता चालू असणाऱ्या घेऊन गेले तर लोकांच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या CO2 मुळे व्हिस्की खराब व्हायची आणि ब्यारेल मधल्या झिरपणाऱ्या दारूमुळे लोक झिंगायची ! (ब्यारेल मधून जी थोडी दारू झिरपली जाते त्याला angel कट म्हणतात. )

.
ब्यारेल साठवायची बिल्डिंग.

जश्या आपल्या आज्ज्या लोणचे मुरले हे त्याच्या सुगंधावरून आणि चवीवरून ठरवतात, तीच पद्धत जॅक डॅनियल्सने वापरली. जेडी मुरली हे त्याच्या वासावरून आणि चवीवरून ठरवले जाते. (मी नोकरी साठी अर्ज टाकत असताना एक अर्ज केंटकीच्या बर्बन distillary मध्ये analyatical chemist केला होता, त्यांची अट होती की व्हिस्कीच्या gas chromatography टेस्टिंग नंतर चव घेऊन बघावे लागेल :) ) यापद्धतीमुळे १५० वर्ष कधीच जेडीच्या ब्यारेल वर तारीख घातली गेली नाही. जॅक डॅनियल्सला ७ गर्ल फ्रेंड्स होत्या म्हणून त्या व्हिस्की ला "ओल्ड नंबर सेव्हन" पण म्हणले जाते.

.
ओल्ड नंबर सेव्हन चे ब्यारेल !

लिंचबर्गचा तालुका म्हणजे "मूर तालुका ", त्या मूर मध्ये दारू (हार्ड लिकर) विकायला परवानगी नाही. म्हणून लिंचबर्गसाठी "जिकडे पिकते तिकडे विकता येत नाही" असे म्हणायला लागेल. (मी ज्या गावात होतो -कुक्व्हील मध्ये पण २०१२ पर्यंत दारू विकायला परवानगी नव्हती, आम्ही १५ miles वर taxi करून जाऊन विंटरसाठी साठा भरून ठेवायचो. नंतर २०१२ ला माझे लग्न झाले आणि त्याच वर्षापासून कुक्व्हील मध्ये दारू विकायला परवानगी मिळाली--- चांगले योग येतात ते असे !) लिंचबर्ग मध्ये प्रत्येक घरटी २-३ मानसं जॅक डॅनियल्स distillary मध्ये कामाला आहे.

Jack Daniels Town Video

.
गावातले जुने एक दुकान आहे.

.
गावातले जुने कोर्ट.

मला दिवसाची सुरवात लवकर करायला आवडते, तसाच हा जॅक डॅनियल्स होता. एका अश्याच सकाळी जॅक डॅनियल्स स्वतःची तिजोरी उघडायची खटपट करत होता पण काही केल्या त्याला कोड आठवत नव्हता अश्या वेळी मी जे केले असते तेच त्याने केले तिजोरीला लाथ घातली (लाथ घालणे हा कॉम्पुटर रीबूट करण्यासारखा univarsal पर्याय आहे.) नंतर "उपचार न केल्यामुळे" त्याचा पायाला infection होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याने infection थांबवायला स्वतःची जेडी जरी वापरली असती तरी वाचू शकला असता, पण असो !

एखादा ब्रान्ड कुठे चालू होतो याला महत्व नसते तर त्याची क्वालिटी कशी वर्षानुवर्षे कशी राहते तेच जास्त महत्वाचे जसा आपला चितळे तसा टेनसीचा जॅक डॅनियल्स !

.

(सगळे फोटो मी काढले आहेत - samsung galaxy S6 वरून )

जीवनमानप्रवासदेशांतरलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 1:23 am | संदीप डांगे

मस्त ओळख आणि फटू!!

पद्मावति's picture

14 Nov 2016 - 1:27 am | पद्मावति

वाह, मस्तं लेख. फोटोही खूप छान.

आपणांस इथे पाहून आनंद झाला. :)

बादवे डिस्टीलरीमध्ये गुप्त राखण्यासारखं काय आहे?

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:04 am | जॅक डनियल्स

डिस्टीलरीमध्ये गुप्त राखण्यासारखे काही नाही. पण बहुतेक safety च्या आणि contamination च्या भीतीनी टूरमध्ये दाखवत नसतील. माझा एक मित्र तिकडे काम करायचा intern म्हणून तो म्हणलेला खूप lastest कंट्रोल system आहे जेडी प्लांट ची.

पीके's picture

14 Nov 2016 - 6:18 am | पीके

तुमच्या आयडी मागचे रहस्य...

देशपांडेमामा's picture

14 Nov 2016 - 7:10 am | देशपांडेमामा

कुछ समझा नहीं..ये तो ऑन द रॉक्सवाली चीज है!

लेख मस्त जमलाय!!

देश

मस्त लेख.. चारकोल नाकात दरवळून गेला.

पण कोक? छ्या... डॅनियलअंकलनी इतक्या वेगवेगळ्या नोट्स त्यात आणल्या आणि नाकाला त्याचा पूर्ण फील देण्याऐवजी कोकाकोला मिसळला?

जॅक डनियल्स's picture

14 Nov 2016 - 8:51 am | जॅक डनियल्स

ज्याक आणि कोक हे टेनसी मधले famous cocktail आहे. त्यामुळे सुरूवातीला काही दिवस ते चाखून नंतर फक्त बर्फावर आलो. तसेच आम्ही 8 वाजता आत जाऊन 3 am बाहेर पडायचो त्यामुळे कोक शुद्धीत ठेवायला मदत करायचा.

अजया's picture

14 Nov 2016 - 8:59 am | अजया

मस्त ओळख करुन दिलीये! मूनशाइनचा उगम पण कळला.जिथे जेडी तिथे मूनशाइन!

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:05 am | जॅक डनियल्स

धन्यवाद !

प्रीत-मोहर's picture

1 Jun 2017 - 11:59 am | प्रीत-मोहर

असेच म्हणते!!

महासंग्राम's picture

14 Nov 2016 - 9:09 am | महासंग्राम

फेव्हरिट ब्रॅण्डची मस्त ओळख करून दिलीत जेडी राव....

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2016 - 9:12 am | टवाळ कार्टा

बाब्बो, जियो
जॅक डॅनियल आणि कोकाकोला म्हणजे हाय मै मर जावा :)

बोका-ए-आझम's picture

14 Nov 2016 - 9:21 am | बोका-ए-आझम

आम्ही चखणावाले असल्यामुळे काही उपयोग नाही, पण माहिती म्हणून मस्तच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 11:34 am | कैलासवासी सोन्याबापु

खुद्द पुण्यात असताना जॅक डॅनियल म्हणजे प्राइझ्ड प्रकरण होते. कोणाचा मित्र ऑन साईट जातोय त्याने ती तुंबा भरून जॅक आणणे मग एक पार्टी जॅक स्पेशल त्या पार्टी मध्ये जॅक नीट न पिल्यामुळे मित्रांनी एकमेकांना 'तू गावठी बेवडा आहेस' वगैरे चिडवणे असे सगळे धार्मिक कार्यक्रम होत असत. नंतर मात्र चॉईसेस्ट आयरिश अन स्कॉटिश स्पिरिट्स सोबत ओळख वाढली तशी जॅक वेड कमी झाले, स्पाय साईड किंवा आईल साईड स्पिरिट्स वर चर्चा झडू लागल्या, बेलीज आयरिश क्रीम किंवा ग्लेनफिडीच ग्लेनमोरेंज पैकी सोवळे काय ह्यावर जास्त(च) खल होऊ लागला देवा. अशात अगदी शिवास रिगल किंवा जॉनी वाकर सुद्धा तितक्याश्या अपील होत नसत त्यात गरीब बिचाऱ्या जॅकला कोण पुसणार, तरीही तरुणपणाचा मद्यपानाचे प्राथमिक एटिकेट्स अन रॉयल ड्रिंकिंगचे आद्य धडे देणारा साथी म्हणून जॅक कायम आठवणीत राहील

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:13 am | जॅक डनियल्स

ज्या बार मध्ये प्यायचो तिकडे सगळ्या अमेरिकन व्हिस्की होत्या, आणि अमेरिकन व्हिस्की टेनसी मध्ये कंट्री लोकांबरोबर प्यायची मजा जास्त यायची. त्यामुळे जेडी, केंटकी बर्बन - जिम बीम, बेसल हैदन इ. मधेच मन रमले म्हणून आत्ता सिंगल माल्ट कडे कधी वळीन असे वाटत नाही. काटाकिर मिसळची तल्लफ लागली की बेडकर आवडत नाही तसे ..दोन्ही ही आपल्यापरीने सर्वश्रेष्ठ पण तल्लफ एकाचीच लागते !

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 7:17 am | कैलासवासी सोन्याबापु

चियर्स ब्रदर, एन्जॉय सेफली स्टे सेफ रॉक ऑन!! अमेरिकन व्हिस्की सुद्धा उत्तमच असतात, रच्याकने कधी प्रॉपर चिल्ड ग्रॅनाईट स्टोन्स घालून व्हिस्की ची मजा घेतली आहेत काय? नसल्यास तडक घ्या, एक अनुभव असतो दस्तुरखुद्द रॉक्स वर घेणे

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:25 am | जॅक डनियल्स

चियर्स ब्रदर ! बाहेर पडणारा बर्फ टाकून घेतली आहे ! पण आत्ता तुम्ही म्हणता तसे बर्फाचा दगड टाकून या winter ला अनुभव घेतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 7:33 am | कैलासवासी सोन्याबापु

नाही नाही बर्फाचा दगड नाही प्रॉपर दगड असतो तो हायलँड स्कॉटिश भागातला, त्याचा गुणधर्म असा असतो की तो खूप लवकर गार पडतो, असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो

https://www.vat19.com/item/whiskey-stones

इथे बघा मजा.

टीप - संपादक मंडळ, लिंक पेस्ट करता येत नाहीयेत मिपावर कालपासून

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 8:01 am | जॅक डनियल्स

फारच भारी , माहिती नव्हते मला, लगेच घेऊन टाकतो आत्ता !

अप्पा जोगळेकर's picture

15 Nov 2016 - 1:59 pm | अप्पा जोगळेकर

असे क्यूब आकारातले दगड फ्रिझर मध्ये अर्धातास ठेवले की गार होतात मग ते ग्लास मध्ये (२ दगड) ठेऊन त्यावर स्कॉच/अमेरिकन ओतायची, पाणी नसल्यामुळे ड्रिंक डायल्युट होत नाही अन गारेगार दगडामुळे फ्युमिंग कंट्रोल होऊन टेस्ट अन अरोमा क्लासिक मेन्टेन राहतो
हायला, मी तर कल्पनेनेच गारेगार झालो. निवांत गप्पा मार्त पिताना शिंच्या त्या डायल्यूशन ने वैताग येतो.
भारतात कुठे मिळते हे ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 2:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

अमेझॉन वर आहेत की अप्पा उपलब्ध, स्टेनलेस स्टील क्युब्स पण असतात ते ही मिळतील, पण स्कॉटिश स्टोन्सची बात न्यारी, त्यांचा सुगंध स्कॉचच्या फ्लेवरला पूरक असतो. ₹ ३५० ते ₹५००० / संच (४ स्टोन, पुसायला मखमली कापड अन ठेवायला एक चंची) असा सेट असतोय बघा

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 2:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

३५०-५००० प्राईज रेंज आहे, मनाला येईल अन परवडल ते घेता येतंय

"व्हिस्की क्युब" किंवा "वाईन पर्ल्स" असे शोधा.

आणखी एक वाचलेला प्रकार म्हणजे डायरेक्ट जेडीला गोठवून त्याचे क्युब करायचे. (याबाबत अधिक माहिती नाही)

महासंग्राम's picture

15 Nov 2016 - 4:25 pm | महासंग्राम

चाखलाय हा प्रकार लै म्हणजे लैच भारी. बत्त्या गुल होतात डायरेक्ट.

आदूबाळ's picture

15 Nov 2016 - 4:35 pm | आदूबाळ

पण अल्कोहोलचा गोठणबिंदू शून्याच्या बराच खाली असतो ना?

(म्हणून ध्रुवीय प्रदेशात पार्‍याऐवजी अल्कोहोल भरलेले थर्मामीटर वापरत असत असं ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यांत वाचलं होतं.)

महासंग्राम's picture

15 Nov 2016 - 4:48 pm | महासंग्राम

नीट नाही वापरत काहीतरी कॉकटेल करून आईस ट्रे मध्ये क्यूब बनवतात.

तुम्ही एक झक्कास आयड्या दिली आहे त्याबद्दल लै लै धन्यवाद..!!!

ते प्युअर अल्कोहोल असेल. जेडीमध्ये किती % असणार आहे..?

कमाल ५२% असे काहीतरी लिमीट असते ना..?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Nov 2016 - 6:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आबा तुम्हीपण व्हर्नियन काय माझ्यासारखे?

आदूबाळ's picture

16 Nov 2016 - 4:50 pm | आदूबाळ

हा मंग!

बोका-ए-आझम's picture

17 Nov 2016 - 12:00 pm | बोका-ए-आझम

व्हर्निअन आणि भागवतीयन पण!

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2016 - 12:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

म्हणजे!?

जॅक डनियल्स's picture

16 Nov 2016 - 9:38 am | जॅक डनियल्स

Ethanol चा गोठण बिंदू −114.9 °C असल्यामुळे तो कमी तापमानाला वापरला जातो. तसेच ethanol, पाऱ्यापेक्षा कमी विषारी असल्यामुळे पण तो वापरला जातो.
कॉकटेल करताना ५० % पाणी आणि ५० % जेडी ( म्हणजे खरी २५ % volume %) असल्यामुळे ७५% पाणी गोठते आणि २५% जेडी तशीच राहते. मी जेली चे वोडका जेलो करयचो, ते याच तत्वाने !

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 2:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्यावर एक लेख होऊ द्या बापु ...

बाकी तिकडले जॅक, मॉर्गन ,अन इक्डले साधुबाबा झ्याक. आम आदमी की चॉईस ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 3:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाबौ, म्हातारा बुडा (ओल्ड मॉन्क) लैच खास आहे, मध्यंतरी मोहन मिकिन्स ओल्ड मॉन्क बंद करणार म्हणून खबर आली होती (अर्थात खोटी) तेव्हाच मनात विचार आला होता, जोवर तरुणाई आहे इंजिनीरिंग कॉलेज आहेत, हॉस्टेल्स आहेत, खिशात कडकी आहे, मिलिटरी आहे तोवर ओल्ड मॉन्कला मरण नाही महाराजा.

आमचा एक मित्र ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीला होता, पुढे त्याने अमेरिकेत खूप भ्रमंती केली नोकरी निमित्त, पार सीएटल ते मियामी अन जर्सी ते सेक्रेमेंटो फिरला शेवटी शिकागोला स्थाईक झाला गडी, तो सांगत असे की त्याच्या सीएटल ऑफिस मधली स्थानिक एतद्देशीय गोरी, घारी, काळी सगळी मित्रमंडळी त्याला घरी सुट्टीला आला की येताना ओल्ड मॉन्क सोबत आणायची विनंती करत असत. आता ते खरे का आमचा ओल्ड मॉन्क प्रेमी अहं सुखावयला सांगितलेली गोष्ट ते माहिती नाही तरी, आपले अमेरिका स्थित मिपाकर ह्यावर अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते. :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 3:24 pm | अनिरुद्ध.वैद्य

कोलोरॅडोसारख्या (म्हणजे, तितकेसे भारतीय नसलेल्या) राज्यात लिकर मॉलमध्ये ओल्ड माँक आढळला होता. दर्दीलोक्स घेत असतील तिथले.

अत्तापोतुर जगातली सगळ्यात जास्त विकली जाणारी रम होती ती!

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 3:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

ज्जे बात !! खुद्द जावईबुआ रिपोर्ट देणार म्हणजे दस्तुरखुद्द शिक्कामोर्तब!. ओल्ड मॉन्क ओल्ड मॉन्क है हुजूर. कडाक्याच्या थंडीत हाती ओल्ड मॉन्क ऑन रॉक्स अन सोबत तंदुरीत खरपूस भाजलेला देशी कोंबडा बस्स, हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 9:45 pm | अनिरुद्ध.वैद्य

एकदा जमवाव म्हणतो सगळे बुलेटिअर्स न साधू न कोंबडा ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 9:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

वल्लाह वल्लाह !!!

जगप्रवासी's picture

14 Nov 2016 - 5:52 pm | जगप्रवासी

डिस्कव्हरी चॅनेल वर "how they do it?" की अजून असल्या कुठल्यातरी प्रोग्राम मध्ये ही पूर्ण प्रोसेस दाखवली होती. तो झरा देखील. खूप छान झालाय लेख.

मारवा's picture

14 Nov 2016 - 7:35 pm | मारवा

कुठे दर्जेदार दुध विकणारे सात्विक चितळे कुठे दारु गाळणारा कलाल डॅनियल !
कुठे एकही गर्लफेंड नसणारे गर्लफ्रेंडविहीन सत्वशिल चितळे कुठे सात गर्लफ्रेंडा असणारा चरीत्रहीन जॅक डॅनियल !
कुठे मास्टर ऑफ बाकरवडी चितळे कुठे तो भट्टी पेटवणारा डॅनियल
कुठे पुण्यात्मा चितळे कुठे अपवित्रात्मा डॅनियल
कुठे किंग चितळे कुठे जॅक डॅनियल
कुठे पुण्यनगरीचा मानबिंदु कुठे....
छे छे
आमच्या भावना दुखावल्यात तुम्ही
हे खपवुन घेतले जाणार नाही
संपादक मंडळ धागा तात्काळ उडवावा
मारवा

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:33 am | जॅक डनियल्स

भावना समजल्या गेल्यात !
प.पु. चितळे किंवा प.पु.डॅनियल च्या वैकीक्तिक आयुष्याबद्दल तुलना करणे, हा लेखाचा उद्देश नाही तर डॅनियल ने मेहनत केल्यामुळे तयार झालेल्या "brand" बद्दल माहिती देणे हा लेखाचा उद्देश आहे.

लेख खरच सुंदर आहे आवडलाही
सहज तुलना गमतीदार वाटली तुमचे म्हणुन मी ही गंमत करत होतो.
कृपया हलक्यात घ्यावे ही विनंती.

पिलीयन रायडर's picture

14 Nov 2016 - 8:30 pm | पिलीयन रायडर

ओह!! ही होय ती मुनशाईन!! टोटल लागलेली आहे!

मस्तच लेख!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुनशाईन फक्त जेडी बेस प्रॉडक्टला म्हणतात असे नाही, तर बेकायदेशीरपणे तयार केल्या गेलेल्या अन थोडक्यात हातभट्टीच्या दारूलासुद्धा हमरिकेत मूनशाईन म्हणतात असे ऐकले होते. खखो देव, जॅक अन मिपा वरले जॅक जाणोत

टिवटिव's picture

15 Nov 2016 - 6:15 am | टिवटिव

स्मोकी माउंट्न मध्ये गटलिनबर्गला मूनशाईन ची अनेक दुकाने आहेत.शार्लेटजवळपण लोणच्याच्या बरणी सारख्या बरणीमघ्ये हि मूनशाईन मिळ्ते..

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:44 am | जॅक डनियल्स

गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण दुकानात जी लोणच्याच्या बरणीत मिळते ती लीगल मूनशाईन आहे. त्याची बनवण्याची पद्धत सारखीच असते पण चांगल्या distillary मध्ये (without contamination) बनवली असते आणि अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% ) असते. ती पण उग्र वासामुळे प्यायली जात नाही - पण त्यामध्ये बुडवून ठेवलेल्या चेरया आणि स्टोबेरी चावायला मजा येते.

महासंग्राम's picture

15 Nov 2016 - 10:04 am | महासंग्राम

अल्कोहोल चे प्रमाण पण कमी (१०० प्रुफ, ५० v%v% )

जेडी वर लिहिलेलं १०० प्रुफ म्हणजे काय आणि अल्कोहोलचे प्रमाण कसे ठरवतात.

जॅक डनियल्स's picture

16 Nov 2016 - 9:45 am | जॅक डनियल्स

अल्कोल्होल हा abv - अल्कोहोल बाय व्होलूम मध्ये मोजतात - जेडी ४०% असते म्हणजे ४० ml ethanol आणि ६० ml पाणी. अमेरिकत तीच ८० प्रुफ असते (volume % च्या दुप्पट).

अप्पा जोगळेकर's picture

15 Nov 2016 - 2:04 pm | अप्पा जोगळेकर

गटलिनबर्गला किंवा कुठल्या पण दुकानात जी लोणच्याच्या बरणीत मिळते ती लीगल मूनशाईन आहे.
म्हणजे आपली नारिंगीच. 'सरकार मान्य' दारुचे दुकानात मिळणारी.

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:35 am | जॅक डनियल्स

धन्यवाद ! कोणाला तरी लागेल असे वाटलेच होते :)

माझी मात्र JD चा छोटा भाऊ जिम बिमशी जास्त मैत्री आहे.

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:36 am | जॅक डनियल्स

नक्कीच ! जेडी ची सगळी family चा आवडते मला !

सुधांशुनूलकर's picture

14 Nov 2016 - 8:52 pm | सुधांशुनूलकर

मूनशाइनचा उगमही कळला. जिथे जेडी, तिथे मूनशाइन!

- अजयाताईंशी १०००% सहमत.

एक खास पुणेकर प्रश्न (पुण्यात राहत नसूनसुद्धा) मनात आला - 'बाकरवडी संपली'प्रमाणे 'जेडी संपली' असा बोर्ड (इंग्लिशमध्ये) दिसला काय हो?

आता माझा आयडी 'ओल्ड माँक' असा बदलून घ्यावा असा विचार करतोय.

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:49 am | जॅक डनियल्स

तिकडे लिंचबर्ग जेडी विकत नसल्यामुळे "तसा" बोर्ड दिसण्याचे प्रमाण नगण्य होते. जे काही विकायला होते ते सिंगल ब्यारेल किंवा अजून महाग पर्याय होते की जे संपायचे प्रमाण खूप कमी असेल.
आता माझा आयडी 'ओल्ड माँक' -- नक्कीच बदलून घ्या ! "कीप काम आणि फिनिश द ओल्ड माँक"

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2016 - 7:53 am | अभिजीत अवलिया

अमेरिकेतून कुठला ब्रँड घेऊन जावा हे सांगाल का मला प्लीज ?

एस's picture

14 Nov 2016 - 8:53 pm | एस

गुड वन.

अतुल पाटील's picture

15 Nov 2016 - 2:21 am | अतुल पाटील

मस्तच!

ही दारू कशाची बनवतात ?कॅार्न?
सापांना { अथवा इतर प्राण्यांना} दारू आवडते का? चढते का?
लेखनशैली फारच आवडली. असं पाल्हाळ न लावता चटकदार लिहिणारे{इथे} फारच थोडे आहेत.
सॅमसंग ६ चे फोटो मस्त आलेत.

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:56 am | जॅक डनियल्स

कॅार्न पासून अमेरिकन व्हिस्की बनवतात, बाकी विकी करा !
ज्यांना मेंदू असतो त्यांना सगळ्यांना दारू चढू शकते, अजून माहिती पाहिजे असेल तर गोल्ड फिश अल्कोहोल स्टडी असेल शोधा !
धन्यवाद् !

कंजूस's picture

15 Nov 2016 - 9:51 am | कंजूस

वाचलो, सुटलो.

अभिजीत अवलिया's picture

15 Nov 2016 - 5:47 am | अभिजीत अवलिया

गेल्या वर्षी ग्लेनफ़िडीचं च्या ३ आणी जॅक डॅनियल्स ची एक बाटली नेली होती यु.के. मधून. ग्लेनफ़िडीचं तितकीशी आवडली नाही पण जॅक डॅनियल्स संपवली. आता कुठल्या घेऊन जाव्यात इथून ह्याचा विचार करतोय.

ट्रेड मार्क's picture

15 Nov 2016 - 6:05 am | ट्रेड मार्क

जॅक अँड कोक हे माझं फेवरीट आहे, ज्यावेळेला काहीतरी मिसळून प्यायला लागते तेव्हा ;) नाहीतर नुसती जॅक मस्तच.

अवांतर: विषय निघालाच आहे तर स्पेबर्न (Speybern) नावाच्या एका १० इयर्स ओल्ड सिंगल माल्ट स्कॉच चा शोध लागला आहे. जॅकनंतर आता ही फेवरीट आहे. किंमत पण फार नाही म्हणजे $३० ला एक खंबा मिळतो आणि मस्त स्मूथ चव आहे वर नो ह्यांगोवर.

जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:58 am | जॅक डनियल्स

नक्कीच try करतो, थंडीसाठी साठा करूनच ठेवत होतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2016 - 6:29 am | कैलासवासी सोन्याबापु
जॅक डनियल्स's picture

15 Nov 2016 - 7:59 am | जॅक डनियल्स

फारच भारी ! केके ने तोडले आहे सगळे विक्रम या सिनेमा मध्ये !

बाकी जे.डी uttam

शानदार, जबरदस्त जिंदाबाद!

JD आमचा पण आवडता ब्रँड.
सोन्याबापू च्या उलटा आमचा प्रवास...
स्कॉटिश सिंगल malt वरून JD वर गेलो आम्ही :)
त्यातल्या त्यात silver select आणि Gentlemans jack हे आम्हाला भारी वाटतात.
त्यांची honey वाली liqueur तर बढिया आहे. (मधाची चव आणि कडवटपणा नाही)
JD+coke+लिम्बु किंवा maple syrup 1 नंबर मिश्रण :)

जॅक भाऊ, मस्त लेख आणि फोटू.

त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँड्स च्या वेगवेगळ्या डिस्टीलररिएस असतात का?

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2016 - 10:05 am | टवाळ कार्टा

कधी बसूया?

महासंग्राम's picture

15 Nov 2016 - 10:30 am | महासंग्राम
बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2016 - 11:07 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_

वेल्लाभट's picture

15 Nov 2016 - 3:57 pm | वेल्लाभट

इतकं सुंदर 'रस'ग्रहण केलंयत की साला दारूशी संबंध नसूनही ज्याक ड्यानियल्स चाखावीशी वाटलीय.
उत्तम. अप्रतिम परिचय करून दिलात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 9:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

चाखायला हरकत नाही, चटक लागू नका देऊ म्हणजे मिळवली :)

आदिजोशी's picture

15 Nov 2016 - 4:02 pm | आदिजोशी

लेख मस्तच. छान माहिती मिळाली.
जेडी वरून आमच्या एका जुन्या मिपा बंगळूरू कट्ट्याची आठवण ताजी झाली :)

लॉरी टांगटूंगकर's picture

15 Nov 2016 - 4:08 pm | लॉरी टांगटूंगकर

क्या बात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2016 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

सचित्र जॅडॅपुराण आवडले ! प्रत्येक प्रसिद्ध डिस्टिलरीच्या आणि वायनरीच्या मागे रोचक कथा असतेच, आणि तिही वारूणीसारखीच काळाबरोबर अधिक रोचक होत जाते.

माझीही शॅम्पेन's picture

15 Nov 2016 - 8:21 pm | माझीही शॅम्पेन

नेसीत चार वर्ष काढलीत जॅझ आणि ब्लूज सोबत टेनेसीत बरेच उद्योग केलेत (ट्रेकिंग , कानूइंग ई.. )

पण पण पण whiski ला स्पर्शहि केलेला नाही जगाच्या पाठीवर टेनेसीत राहून जॅक न प्यालेला एकटाच असेन कदाचित , पण टाकिला , कॉकटेल्स आणि बिअर चा प्रचंड प्रमाणात रिचवली आहे

टेनेसी बद्दल काही वाचाल कि मन भुर्रर्रकन उडून आठवणीत रमत .... काश जाने दो यार छोड आये हम ओह गलिया

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 9:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

फेडाल हे पाप ..

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Nov 2016 - 9:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे कॉम्बो मस्तच, पण ऑन द रॉक्स जास्त आवडली! कोक रमसोबत जास्त छान लागते.

मदनबाण's picture

16 Nov 2016 - 9:37 am | मदनबाण

सुरेख लेखन...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Secret World Of Indian Currency Printers

दुर्गविहारी's picture

16 Nov 2016 - 4:37 pm | दुर्गविहारी

लेख तर एक नम्बर आहे. पण आधी सर्प् मालिका पुर्ण करा. त्याचा इथल्या ट्रेकरना चांगला उपयोग होइल.

गामा पैलवान's picture

16 Nov 2016 - 7:46 pm | गामा पैलवान

जॅक डनियल्स,

घनफळाने मद्यार्काचं प्रमाण कसं ठरवतात? समजा माझ्याकडे बाटलीत १ लिटरभर प्यायची दारू आहे. बाटलीवर समजा ४०% मद्यार्क (=अल्कोहोल) म्हणून छापलंय. यावरून बाटलीत ४०० मिली अल्कोहोल सापडेल असं गृहीत धरूया. म्हणूनच ६०० मिली पाणी आहे.

आता असं बघा की ४०० मिली मद्यार्कात ४०० मिली पाणी टाकलं. उरलेलं २०० मिली पाणी वेगळं ठेवलं. पाणी आणि मद्यार्क एकमेकांत विरघळतात. त्यामुळे घनफळ ८०० मिली न होता ६४० मिली होतं. त्यात बाजूस ठेवलेलं २०० मिली पाणी मिसळलं की एकत्रित घनफल ८४० मिली होतं. म्हणजे लिटरभर दारूच्या जागी ८४० मिली दारू मिळणार.

यावरून पुढे आकडेमोड करता येईल. बाटलीवर ४०% चा छाप मारायला ४०० मिली मद्यार्क वापरला तर फक्त ८४० मिली प्यायची दारू तयार होते. म्हणून एका फुल लिटरच्या खंब्यासाठी १०००*४००/८४० = ४७६.२ मिली मद्यार्क वापरावा लागेल.

तर १ लिटर बाटलीवरचा ४०% छाप नेमका किती मद्यार्क दर्शवतो ४०० मिली की ४७६.२ मिली ?

आ.न.,
-गा.पै.

मारवा's picture

16 Nov 2016 - 8:01 pm | मारवा

घनफळाने मद्यार्काचं

सुवर्णाक्षरांत कोरुन ठेवावा असा शब्द तुम्ही आज दिलेला आहे.
आहाहा धन्य धन्य झालो.
घनफळी मद्यार्क
वा वा हा शब्द वाचुन माझा त्रिफळा च उडाला.