रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क's picture
ट्रेड मार्क in जनातलं, मनातलं
8 Nov 2016 - 9:38 pm

मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.

काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.

असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.

मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?

हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.

http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-...

कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.

धन्यवाद.

धोरणसमाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

13 Nov 2016 - 6:41 pm | पिशी अबोली

ओके, आय होप तुमची काहीतरी सोय नंतर तरी झाली असेल.

अर्धवटराव's picture

13 Nov 2016 - 11:31 pm | अर्धवटराव

अशात दुसर्‍याची मदत कोण कशी करु शकणार?

हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा, व त्याची उत्तरं शोधुन ति वापरायची आपली तयारी हवी.

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 12:06 pm | सुबोध खरे

अतिशयोक्तीपूर्ण प्रतिसाद
निदान दहा लाख वर्षात इतकी अतिशयोक्ती पहिली नव्हती
तुंम्ही आता ज्यांची लग्न ऐन मोक्यावर थांबली आहेत त्यांना-- चेक ने पैसे देऊन कोणतेच काम होत नाही का?
औषधाअभावी जे हॉस्पिटलमध्ये खितपत आहेत त्यांना-- रुग्णालयात औषधे देणे हे काम रुग्णालयाचे असते. तुम्ही त्यांना चेकने पैसे द्या की.
जे घरी मुलांना "पैसे असूनही" खाणं उपलब्ध करु शकत नाहीत त्या पालकांना-- काहींच्या काही
जे दुसर्‍याच्या भरवशावर आपली लहानगी ठेवून दिवस दिवस बँकेच्या लाईनीत घालवत आहेत त्यांना--दिवस दिवस बँकेच्या लाईनीत --परत काहींच्या काही -- कोणीही दोन तासाच्या वर रांगेत उभे राहिलेले नाही.
पर्याय नसल्याने रोज कामाचे खडे करुन गर्दीत ताटकळत आहेत त्यांना-- आज खाडा करून पैसे काढले तर उद्यापासून रोज खाडा करायची काय गरज?
एवढेच नाही तर पैसे नाहित म्हणून हॉस्पिटलमधून (आप्तांचे) प्रेतही घेऊन जाऊ शकत नाहीत त्यांना--कोणते रुग्णालय मृत व्यक्तीच्या प्रेतासाठी चेक घेत नाही हो?
इतका टोकाचा द्वेष का हो? काही कारण आहे का इथे न सांगण्यासारखे?

चौकटराजा's picture

13 Nov 2016 - 2:44 pm | चौकटराजा

ही बाब व युद्ध परिस्थीती व नैसर्गिक आपत्ती यात फरक आहे. भूकंप , सुनामी हे फार काळ टिकणारे नसतात. युद्ध विशिष्ट समूहात( तीन दले ) लढले जाते. इथे सर्व समाज काळ्या पैशाच्या पापात सामील आहे या ना त्या प्रमाणात. म्हणून एका बाजूला मोदींची स्तुति तर दुसर्‍या बाजूला संताप दिसतो आहे. माझ्या अंदाजाने फक्त २००० च्या नोटा दि ८ पूर्वी छापल्या असाव्यात .साधारण पणे मोठी नोट येणार अशी बातमी पसरल्यास लहान नोट रद्द होईल अशी अटकळ बांधली जात नाही. २००० ची नोट आणण्याचे हे कारण असू शकेल. ८ नंतर ५०० ची नोट छपून ती सर्व देशात वहातुकीने नेण्यास काही काळ लागेलच. तो पर्यंत लोकानी काटकसर व उधारी यांचा आधार घेतलाच पाहिजे. यातअनेक सापळे काही नियम करून सरकारने केलेले दिसत आहेत. त्यात मनी लॉन्डरिंगला साथ देणारे जनधन वालेही पकडले जाउ शकतात. मला तरी वाटते. यावेळी माध्यमाना चोरानी विकत घेतले आहे. सबब फक्त निगेटिव्ह बाबी दाखवत आहेत. एरवी ते निगेटिव्ह बाबीच दाखवीत असतात कारण नकारात्मक बाबीना सेन्सेशन व्हॅल्यू असते.

अर्धवटराव's picture

13 Nov 2016 - 3:17 pm | अर्धवटराव

कारण कुठलंही असो, जनतेवर आपत्ती ओढावल्यावर जनता स्वाभावीकपणे सरकारकडे मदतीची अपेक्षा करते, पण एक लोकांनी एकमेकांची काळजी घेणारी व्यवस्था देखील अत्यावष्यक आहे... येत्या काळात आपल्याला काय काय बघायला लागणार काय माहित.

ज्योत्स्ना's picture

13 Nov 2016 - 3:39 pm | ज्योत्स्ना

तुम्ही हे संयमित आवाहन whatsapp वर कृपया पोस्ट कराल का, मला विश्वास आहे की हे सर्व समंजस नागरिकांना एक नवा विचार देईल, कदाचित प्रत्यक्षातही उतरेल अशी आशा आपण तरुणांकडून करू शकतो.ही पोस्ट अगदी नक्की व्हायरल होईल अशीच आहे.

माझ्याच कुटुंबातले बँकेत काम करणारे लोकं, आमचे नेहेमीचे किराणा माल व्यापारी वगैरे मंडळी थोडंफार सकारात्मक काम करताना मी बघतोच आहे. त्यातुन अगदी हातघाईच्या परिस्थितीतल्या काहि लोकांना २-३ आठवड्यांची उसंत मिळाल्याचं बघुन फार आनंद झाला. हेच काम एक समाज म्हणुन व्हायला लागलं तर परिस्थिती लवकर निवळेल असं वाटतं.

माझं एडीटींग फार काहि बरं नाहि... कुणीतरी फिरवेलच असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतांश जनता या निर्णयाचे स्वागत करत रांगेत शांतपणे उभे राहून सहकार्य करताना दिसत आहे. नंतरच्या मोठ्या फायद्यासाठी काही दिवस त्रास सहन करायला तयार आहे.

विरोधी पक्षांतले बरेच नेते निर्णयाचा विरोध करून, "जनतेला त्रास अतिशय त्रास होतो आहे, अराजक होईल," इत्यादी दावे अराजक निर्माण करण्यासाठी चिथावणी देत आहेत असा संशय येण्याइतक्या कर्कश्यपणे करत आहेत. त्याचबरोबर त्यातील काही नेते, १-२ कोटीच्या गाडीत बसून जावून, पैसे बदलायला उभे असलेल्या लोकांच्या रांगात शिरून, लोकांचा त्रास समजावून घेण्याचा दावा करत, लोकांचा त्रास अजून वाढवत आहेत आणि टीव्ही फूटेज मिळवायचा प्रयत्न करत आहेत. सेल्फी काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत.

खरे समाजसेवक केवळ जनतेचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे अनेक प्रकारे मदत करत आहेत.

जनता हुशार आहे. या सगळ्या वरच्या घटनांची नोंद तिच्या मनात होत असणारच ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाकी,

"करोडो रुपयांचे काळे पैसे असलेले रांगेत उभे राहून ते बँकेत का भरत नाहीत ?" असे विचारणार्‍यांच्या हुशारीबद्दल काय बोलावे ? =)) =)) =))

चाणक्य's picture

13 Nov 2016 - 10:29 pm | चाणक्य

.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Nov 2016 - 11:47 am | हतोळकरांचा प्रसाद

आपले एक माजी मुख्यमंत्रीही काळ असं म्हणाले. काय बोलणार?

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Nov 2016 - 11:47 am | हतोळकरांचा प्रसाद

*काल

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 3:49 pm | श्रीगुरुजी

आपले एक माजी मुख्यमंत्रीही काळ असं म्हणाले. काय बोलणार?

या "आदर्श" माजी मुख्यमंत्र्यांच्या "आदर्श" मताला शून्य किंमत आहे.

पिशी अबोली's picture

13 Nov 2016 - 4:30 pm | पिशी अबोली

काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी.
1. 'काळा पैसा कुठे सगळाच्या सगळा कॅशमध्ये असतो का' असं जे म्हणत आहेत, त्यांना 'या एकाच निर्णयाने सगळाच्या सगळा काळा पैसा बाहेर निघणार आहे, बाकी काही करायची गरज नाही' असं कुणी क्लेम केलेलं दिसलं? मोदींनी तसं क्लेम केलं का? अगदी भक्तांनी असं म्हटलं का?
2. अंबानी वगैरे लोक कुठे रांगेत नाही दिसले, दिसले ते फक्त सर्वसामान्य असं म्हणणाऱ्यांना अंबानी सदृश लोकांनी 4 हजार वगैरे बँकेतून बदलून घ्यावेत हे बघायची खरंच अपेक्षा आहे का? ते लोक खरंच आपले व्यवहार स्वतः बँकेत जाऊन करत असतील?
3. काळा पैसा प्रत्यक्ष असणारे लोक स्वस्थपणे त्याची विल्हेवाट लावतायत आणि त्यांच्यात काहीच अस्वस्थता नाही (आणि अर्थात, भरडले जाणारे सर्वसामान्य तेवढेच) असं म्हणणाऱ्यांना काळा पैसा जमा करून ठेवलेल्यांकडून नक्की काय गोंधळ होणं अपेक्षित आहे? माझ्या कॉमन सेन्स प्रमाणे माझ्याकडे अनधिकृतपणे कोट्यवधी रुपये असतील तरी मी त्यांची आत्ता या क्षणाला बोंबाबोंब करणार नाही. माझ्यावर अन्याय होतोय असं तर खाजगीतही बोलू शकणार नाही. त्यामुळे काळा पैसा असलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता नाही म्हणणाऱ्यांना त्यांच्याकडून नक्की कसली प्रतिक्रिया अपेक्षित आहे ते कळलेलं नाही.
4. माझ्या वर्षानुवर्षं असलेल्या मोलकरणीचा बँक अकाउंट नसेल, तर मी तिला खूप आधी अकाउंट उघडायला एक माझी सामाजिक जबाबदारी म्हणून मदत केलेली असली पाहिजे. ती जर मी केलेली नसेल, तर तिच्या पैशांचं आता काय? अशी चिंता व्यक्त करण्याचा मला नैतिक अधिकार काय राहतो?

राही's picture

13 Nov 2016 - 6:41 pm | राही

आमच्याइथले वास्तव असे आहे की अनेक केसेसमध्ये बँक अकाउण्ट्स उघडली गेली आहेत पण ती बहुतांशी रिकामी असतात. कारण घरातले 'कर्ते' पुरुष दारुडे असतात. बँकेतले अकाउंट एकल नावाने नसते. त्यात मुलाचे, नवर्‍याचे, सासूचे, लग्न न झालेल्या नणंदेचे (यातल्या एकाचे किंवा अनेकांचे) नाव असते. आणि दारुड्या नवर्‍याला हाताशी धरून पैसे काढले जातात. प्रसंगी पैसे काढू न दिल्यास मारझोडही होते. शिवाय या बायकांमध्ये 'भिशी'मध्ये पैसे गुंतवण्याचे प्रमाण अधिक आहे. 'भिशी' लागलेली नसतानाही जास्त दराने कोणी गरजू उचलतो. हे अधिकचे व्याज सभासदांत वाटले जाते. आपापसात पैसे अधिक व्याजाने देण्याचे प्रमाणही खूप आहे. दरमहा दर शेकडा पाच सहा रुपये व्याज असते. त्यामुळे बँकेत पैसे ठेवण्याचे प्रमाण कमी आहे.

पिशी अबोली's picture

13 Nov 2016 - 8:08 pm | पिशी अबोली

हे अगदी मान्य.

मार्मिक गोडसे's picture

13 Nov 2016 - 4:38 pm | मार्मिक गोडसे

काही बाळबोध प्रश्न- या निर्णयाबाबत पूर्णपणे निराशा व्यक्त करणाऱ्यांसाठी.

निर्णयापेक्षा ज्या पद्धतीने राबवला त्याबद्दल नाराजी आहे. चोर पळून जाउ नये म्हणून पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला विरोध आहे.

अन्नू's picture

13 Nov 2016 - 5:06 pm | अन्नू

पुढील दरवाजाला कुलुप लावायचे व मागील दरवाजा उघडा ठेवाण्याच्या शेखचिल्ली प्रकाराला...... >>>>
=)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 5:29 pm | हतोळकरांचा प्रसाद

कसा राबवायला हवा होता हेही ऐकायला आवडेल.

मार्मिक गोडसे's picture

13 Nov 2016 - 7:13 pm | मार्मिक गोडसे

कसा राबवायला हवा होता हेही ऐकायला आवडेल.

एका रात्रीत काळा पैसा कुठे गुंतवला गेला हे ध्यानात घेतले तर समजेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 10:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

तेच नाही कळत आहे, तुम्ही थोडं विस्कटून सांगाल काय?. तुम्ही "सोनं" ह्या गोष्टीकडे बोट दाखवत असाल तर त्याला काही आधार आहे का?

देशाच्या मोठ्या नोटांचा सर्व पैसा आता ९ नोव्हेंबर पूर्वी आणि तदनंतर असा विभागला गेला आहे. त्यामुळे कुणाकडेही ५०० आणि २,००० च्या भरमसाठ नोटा सापडल्या की त्याला स्पष्टीकरणाचे दोनच पर्याय उरले आहेत :

१) त्या स्वतःच्या बँक अकाउंटमधून काढल्या आहेत.
२) ९ तारखेपासून पकडले जाईपर्यंतच्या काळात वैध मार्गानं मिळवल्या आहेत.

यापैकी काहीही डिसप्रूव झालं की तो पैसा काळा समजला जाऊन टॅक्स आणि दंड अशी दुहेरी कारवाई होईल. शिवाय निलंबन वगैरे आहेच !

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 6:37 pm | संदीप डांगे

आपल्या प्रतिसादातला "नोटा सापडल्या की" हा भाग अनेक शक्यतांना जन्म देतो.

संजय क्षीरसागर's picture

13 Nov 2016 - 6:43 pm | संजय क्षीरसागर

संबंधित बातमीत व्यक्तीकडे नोटा सापडल्या आहेत म्हणून तर प्रतिसाद दिलायं.

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 7:03 pm | संदीप डांगे

मी बातमीबद्दल किंवा तुमच्या प्रतिसादाबद्दल नाही, शक्यतांबद्दल बोलत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

लाचखोरी आणि साठाखोरी हे मानवी मनाचा अनादी कालापासूनचा रोग आहे आणि अनंत कालापर्यंत चालू राहील.

नवीन नोटा वापरून असे गुन्हे झाल्यास त्यांचा तपास करताना "९ नोव्हेंबर" एक उत्तम प्लेसहोल्डर तयार झाल्याने तपास सुलभ होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 7:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्थात हा एकच मुद्दा सगळे काम करणार नाही. प्रथम गुन्हा उकरून काढणे हे पण महत्वाचे आहेच.

चौकटराजा's picture

13 Nov 2016 - 8:36 pm | चौकटराजा

पुढचा टप्पा मालमत्ता शोधाचा असणार आहे.......मोदी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे

७० वर्षांची घाण साफ कराण्याला अजून बरेच टप्पे असतील हे नक्की. मात्र, यापुढच्या पायर्‍यांत सामान्य माणसाला नगण्य किंवा शून्य तोशीस असेल असे वाटते.

चौकटराजा's picture

13 Nov 2016 - 6:29 pm | चौकटराजा

आवं तिथंच १५० बी यम डब्लु आहे असं म्हन्यात !

जयंत कुलकर्णी's picture

13 Nov 2016 - 7:02 pm | जयंत कुलकर्णी

चला..., इतर लिखाण करायचे असल्यामुळे या धाग्यावरुन आता रजा घेतो. बर्‍याच गोष्टी समजल्या त्याबद्दल सर्वांचे आभार.

चौकटराजा's picture

13 Nov 2016 - 8:34 pm | चौकटराजा

२००० च्य नोटेचा रंग जात आहे याच डेमो एक माणूस टीव्ही वर देत असता २ अधिक दोन बरोबर चार म्हणजे काय याचे ज्ञान नसलेल्या माझ्या मतिमंद ( सरकारी एम डी डो च्या हिशेबाने ७५ टक्के माननिक नुकसान ) मुलीने मला एक प्रश्न केला की " नोटेचा रंग घालवून बघायचाच कशाला ?" . मला वाटते आपल्याला बनावट नोट काढता येईल किंवा कसे या नादात हा उद्योग कोणातरी केलेला दिसतो. देवाची मूर्ति खरेच सोन्याची आहे का हे भक्त कधी ती मुर्त ठेचून पाहिल का ?
बादवे मी वर म्हटल्याप्रमाणे ५०० ची नोट आज दिल्ली मधे जारी करण्यात आली आहे. सहकारी बॅन्कात सुद्धा या नोटा
मंगळ॑वारी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून म्ह्टले सर्व ओके होईल.

असे असू शकेल काय कि मुळातच हि नोट फार काळ टिकावी या उद्देशाने बनलीच नसेल, म्हणजे कि काही वर्षात हि नोट देखील चलनातून हद्दपार होऊ शकेल. किंवा सरकार डिफेक्टिव्ह नोटा बदलून घ्यायला लोकांना सांगेल. (खूप लेम जस्टीफिकेशन वाटू शकेल, जे वाटतंय ते लिहितोय)

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2016 - 8:38 pm | श्रीगुरुजी

मला वाटते की सरकारने ५०० व १००० अशा दोन्ही नोटा रद्द करण्याऐवजी फक्त ५०० च्या नोटा रद्द करायला पाहिजे होत्या.

१००० च्या नोटा वैध राहिल्याने लोकांची कमी अडचण झाली असती. फक्त ५०० च्या नोटा बदलण्यासाठी तुलनेने कमी झुंबड उडाली असती. एटीम सुरू राहिली असती व त्यातून फक्त १००० च्या नोटा देता आल्या असत्या. काळाबाजारवाल्यांनी ५०० च्या नोटातील पैसे बदलून घेऊन १००० मध्ये ठेवण्याचा फारसा विचार केला नसता आणि सध्या हातात असलेल्या १००० च्या नोटा बदलण्याचा प्रयत्न केला असता कारण काही काळाने १००० च्या नोटाही रद्द होतील अशी शंका मनात डोकावत राहिली असती. नंतर काही महिन्यांनतर १००० च्या नोटाही रद्द करता आल्या असत्या.

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 9:13 pm | संदीप डांगे

सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे घोषणा झाली व पॅनिक झाले ते सांभाळतांना बिघडले. लोकांना वन-लायनर कळतात फक्त. "१०००-५०० च्या नोटा रद्द झाल्या, त्या बॅन्केत बदलून घ्या" एवढंच. बाकीचे डिटेल्स मुरायला वेळ जातो, ओवरनाईट होत नसतं.

नेमकं काय होणार आहे, व प्लानिंग काय हे येता काळच सांगेल. आपण बसलोय कळफलक बडवत आणि अंदाज बांधत. :)

मूळ हेतू नकली नोटा बद्दल होता तो साध्य झाला नसता ना मग?

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

या प्रक्रियेने खोट्या नोटांच्या स्वरूपातल्या पैशाचे व काळ्या "१०० किंवा कमी रकमेच्या नोटांत" किंवा "इतर शोधायला कठीण (उदा.सोने, रियल इस्टेट, इ) गोष्टींत" रुपांतर करायला पुरेसा वेळ मिळेल. मग नोटा रद्द तरी कशाला करायच्या ? हेच पुर्वी दोनदा केले होते आणि काळा पैसेवाले खूष होते !

१. आता लोकसभेतली किंवा माध्यमातली चर्चा पाहिली तर (डावे व ममता सोडून) मुख्य आक्षेप "आम्हाला न सांगता अचानक का कारवाई केली (पक्षी : निदान आमचे पैसे तरी आम्हाला सुरक्षितपणे बदलू द्यायचे होते :) ).

२. राजकारण्याचा अजून एक उघड-गुप्त सूर असा की "उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीपूर्वी हे करून सरकारने आमचा विश्वासघात केला आहे".

३. या कारवाईने अतिरेक्यांना मिळणारा खोटा पैसा (जवळ जवळ २ लाख कोटी प्रतीवर्ष) बंद झाला आणि त्याचे परिणाम (अ) दगडफेक पूर्ण थांबली आहे आणि (आ) चारपाच महिने शाळा बंद असून व ४०एक शाळा जाळल्यानंतरही सद्या काश्मीरमध्ये ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वात महत्वाचा मुद्दा...

पूर्ण (१००%) गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता. बातमी थोडीशीही बाहेर फुटणे म्हणजे कारवाईला "फुसका बार" बनवणे झाले असते.

हे लोकांना समजले तर सर्व विरोध थंड होईल ना, मग पुढे असलेल्या राज्य निवडणूक मध्ये याचे भांडवल असे केले जाईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2016 - 11:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत !

यालाच मी वर "नसलेल्या मोहरीचा पर्वत बनवणे" म्हटले आहे ;) :)

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2016 - 9:09 pm | श्रीगुरुजी

घराजवळचे एक एटीएम सुरू झाल्याचे समजले. उद्या जाऊन बघतो. ५०० च्या नवीन ५० लाख नोटा वितरणासाठी आलेल्या आहेत असे वाचले. तसे असेल तर जास्तीत जास्त २-३ दिवसात बर्‍याच समस्या कमी होतील.

नव्या नोटांचा साईझ वेगळा असल्याने सगळी मशिन्स कॅलिब्रेट व्हायला हवीत. दोन हजाराचे नवे डिनॉमिनेशन असल्याने सॉफ्टवेअरही बदलावे लागेल. इथे एसबीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस आणि एचडीएफसी यानी शंभराच्या नोटा भरून एटीएम चालू केली आहेत. पण तिथे रांगा लावून लोक त्या नोटाही संपवत आहेत. इतर सरकारी बँकाना एसबीआयमधून शंभराच्या नोटांचा पुरवठा नसल्याने ते एटीएम चालू करू शकलेले नाहीत.

पुंबा's picture

13 Nov 2016 - 9:17 pm | पुंबा

Krupaya, Nava dhaga Kadhava ashi namra vinanti.

केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप च्या कार्य कर्त्या ची वक्त्यव्ये आणि ट्विटर वरच्या ट्विट्स) शिसारी आणणार्या आहेत. या लोकांबद्दलची सगळी सहानुभूती आधीच नष्ट झाली होती. आता त्याची जागा तिरस्कारानं घेतली आहे.

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 9:34 pm | संदीप डांगे

ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक खेचून आणणाऱ्या लोकांबद्दल काय मत?

पिनाक's picture

13 Nov 2016 - 9:46 pm | पिनाक

आधारभूत मुद्दा (reference पॉईंट) कोणता आहे ते सांगाल का? जर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक बद्दल म्हणत असाल तर सैनिक स्वतः: कोणतीही एक्शन करत नाहीत आणि राजकीय नेतृत्वांन त्याच क्रेडिट घेणं गैर काय?

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 12:55 am | संदीप डांगे

तिकडे सैनिक सीमेवर... ह्या शब्दाने सुरु होणारे डॉयलॉक!

जसे की रामदेवबाबा लेटेस्ट! ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Nov 2016 - 11:44 am | हतोळकरांचा प्रसाद

परत तेच! मला सांगा - सरकारचा निर्णय झालाय. त्याने सध्या सार्वजनिक जीवन थोडं कोलमडून गेलंय. ते घाईघाईत निर्णय झालाय म्हणून तसं झालाय असं काही लोकांचं मत आहे तर निर्णय घाईघाईत घेणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच त्याची परिणामकता वाढणार होती असं बाकीच्यांचं. आता या परिस्थितीत काही लोक सैन्याची उदाहरणे देऊन किंवा आणखी बऱ्याच प्रकारे लोकांना संयम ठेवायला प्रवृत्त करत आहेत तर यात चुकीचे ते काय? खूप त्रास होतोय असा परत परत बिंबवून लोकांचा संयम कसा तुटेल असं बोलायला हवं का?

शाम भागवत's picture

13 Nov 2016 - 10:48 pm | शाम भागवत

२००० च्या नोटेत चीप असल्याबद्दलचा व्हिडीओ टीव्ही ९ वर आत्ता दाखवला. रेडिओ सिग्नलला प्रतिसाद देते म्हणे.
काय चाललेय समजत नाही.

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 9:59 am | संदीप डांगे

ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या नियोजनाच्या चायलेंज बद्दल:

त्रास झाला तर बोलूही नये अशी काहीशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ज्याचं मूल दगावले, आईबाप मेले तो आता सरकारला शिव्या घालत असेल, तुम्ही हे चायलेंज त्याच्यासमोर जाऊन त्याला कराल काय? जो आज खिशात हक्काचे वैध रित्या कमावलेले पैसे असून उपाशीतापाशी वणवण भटकत असेल त्याला हे चायलेंज कराल काय?

नियोजनात त्रुटी असल्याने ज्या सामान्य लोकांना त्रास होतोय ते जर बोलत असतील तर तुम्ही त्यांच्या तोंडावर हे चायलेंज फेकणे किती अमानुष आहे ह्याची काही कल्पना?

याच धाग्यात आपण भारतीय कसे एकमेकांना समजून घेत नाही, मदत करत नाही असे काहीसे आपण बोललात, त्या पार्श्वभूमीवर असे चायलेंज फेकणे समजूतदारपणा व माणुसकीपूर्ण आहे असे दिसत नाही.

नियोजनातल्या त्रुटी सरकारही मान्य करतंय, पण समर्थकांची अवस्था चाय से ज्यादा केटली गरम अशी झालीये! ;)

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Nov 2016 - 11:30 am | हतोळकरांचा प्रसाद

ज्याला त्रास होतोय त्याने जरूर बोलावं कि, त्याबद्दल कोणी आक्षेप का घेईल? त्रास होतोय तो या गोष्टीचा कि काही लोक इतरांना झालेल्या त्रासाचा स्वतःच्या मोदी आणि सरकारविरोधी मताची आणि सुरांची धार वाढवण्यासाठी वापर करून घेत आहेत. देशात आत्यंतिक घायकुतीचं वातावरण झालंय वगैरे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. याला आक्षेप का बरं नसावा? रांगेत उभ्या असलेल्या १० जणांना प्रतिक्रिया विचारायची, त्यातल्या दोन लोकांनी दिलेल्या तिखट प्रतिक्रिया ह्या बाकीच्या ८ प्रतिक्रिया वगळून रांगेच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून दाखवायच्या याला आक्षेप का नसावा?

अवांतर : ज्यांचे मूल दगावले त्यांनी नोटांना दोष दिला कि डॉक्टर च्या अमानवीय वागणुकीला याचा काही माहिती स्रोत आहे का कुणाकडे? कि आपणही दिल्लीतल्या काही नेत्यांसारखं, आत्महत्या केलेल्यांच्या घरच्यांच्या आधी छाती बडवायला लागणार?

पद्माक्षी's picture

14 Nov 2016 - 4:50 pm | पद्माक्षी

कालपर्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत हातातल्या घड्याळापासून गळ्यातल्या चेनपर्यंत कशाचाही उपयोग विनिमय म्हणून होऊ शकत होता पण आज मात्र सगळ्या १०० कोटी लोकांकडे फक्त ५०० किंवा १०००च आहेत.
सरकारने सांगितले होते कि ८-१० दिवस गैरसोय होणार, थोडी कळ सोसा.

आमच्या शहरात तरी गेल्या ५ दिवसात मी कुठेही गडबड गोंधळ उडालाय असे पहिले नाही. मी स्वतः एका रांगेत उभे होते, ATM चे पैसे संपले. लोकं (आणि मीसुद्धा) दुसरे ATM हुडकायला निघालो. कुठेही आरडाओरडा, शिव्याशाप नव्हते. काल एका रांगेत उभे राहून पैसे काढले, अर्धा तास लागला. तिथे security पण नव्हता, पण लोक शिस्तीत उभे होते.

पॅनिक फक्त दिल्लीत आहे असे वाटतंय. खास करून केजरीवालच्या घरी.

ओरिसा मध्ये मुख्यमंत्री पॅनिक परिस्थिती कशी तयार होणार नाही हे बघतायत आणि Mr IIT फक्त पॅनिकच create करतायत. बेसिकली अतिशय युजलेस माणूस आहे हा.

प्रदीप's picture

14 Nov 2016 - 8:01 pm | प्रदीप

अवांतर : ज्यांचे मूल दगावले त्यांनी नोटांना दोष दिला कि डॉक्टर च्या अमानवीय वागणुकीला याचा काही माहिती स्रोत आहे का कुणाकडे? कि आपणही दिल्लीतल्या काही नेत्यांसारखं, आत्महत्या केलेल्यांच्या घरच्यांच्या आधी छाती बडवायला लागणार?

दुसरी बाजू इथे पहावी. नेहमीसारखे, काहीतरी भडक बातमी 'तयार' केली गेली, असे दिसते!

माझं म्हणणं एवढंच आहे की आता सरकारला नावं ठेवतोच आहोत तर मग हे चांगल्या पद्धतीने कसं करता आलं असतं हे पण बघूया. आम्ही नोकरीपेशा माणसं जेव्हा आमच्या बॉसकडे एखादी तक्रार करतो तेव्हा तो म्हणतो की नुसत्या तक्रारी घेऊन येऊ नकोस त्याला पर्याय पण सांग. म्हणून म्हणलं तुम्ही तक्रार करताय तर तुमच्याकडे उपाय असावा. पण नसेल तर राहूदे, मी काही बॉस नाहीये त्यामुळे...

अडचण/ त्रास झाला असेलच लोकांना, त्याबद्दल अजिबात ना नाही. पण फक्त सगळ्यांना फक्त त्रासच झालाय असं जे दर्शवलं जातंय ते खरं नाही/ नसावं. तुम्ही स्वतः सुद्धा सांगितलं आहेच की तुमचं बँकेतील काम पटकन झालं.

"याच धाग्यात आपण भारतीय कसे एकमेकांना समजून घेत नाही, मदत करत नाही असे काहीसे आपण बोललात"

हा जनरल अनुभव आहे की आपण फार लवकर पॅनिक होतो. त्यात खरंच आपल्याला गरज आहे का एखाद्या गोष्टीची ते पण तपासून बघत नाही. उदा. द्यायचं झालं तर आत्ता मिठाची टंचाई होणार म्हणून जी अफवा उठली होती त्यात शहानिशा न करता लोक १०/१० किलो मीठ घेत होते. त्यात हा विचार नाही की महिन्याला मला किती मीठ लागतं तेवढं माझ्याकडे असेल तर पुढच्या ६ महिन्याचं मीठ कशाला घेऊन ठेवायचं? त्यामुळे ज्याच्याकडे अगदी कमी मीठ असेल त्याला मिळणार नाही ना? त्याच प्रमाणे नोटा बदलायला ३० डिसेम्बरपर्यंत वेळ आहे, जेवढी गरज असेल तेवढे पैसे जवळ असले की झालं. पण उगाच घरातले झाडून सगळे पैसे बदलून आत्ताच घ्यायला पाहिजे असं नाही किंवा खात्यात भरणा आत्ताच करायला पाहिजे असं नाही. पण हा विचार किती लोक करतात? बरं हे काही नैसर्गिक आपत्तीसारखं नाहीये की सगळंच अनिश्चित आहे. त्यामुळे कितीही प्लॅनिंग केलं तरी सामोरची पार्टी कशी प्रतिक्रिया देईल हे अनिश्चित आहे ना.

वर परत विरोधी पक्ष, काळे पैसेवाले आहेतच ज्यांना त्यांच्याकडची बेहिशोबी संपत्ती बदलून घ्यायची आहे ते जो सापडेल त्याला लायनीत उभं करत आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर ताण येणारच. ४-५ दिवसांत ३ लाख कोटी रुपये जमा झालेत म्हणे आणि ५०००० कोटी काढले गेलेत.

केवळ ५००-१००० च्या नोटा स्वीकारणार नाही असं सांगून हॉस्पिटल जर का उपचार नाकारत असेल तर ते सर्वात अमानुष नाही का? जर हे पैसे झालेल्या उपचाराचा खर्च म्हणून आहेत तर ब्लॅक नाहीत त्यामुळे हॉस्पिटलला बँकेत भरायला काय अडचण असणार होती? बरं त्या लोकांकडे फक्त ५००-१००० च्या नोटा देणे हाच मार्ग होता का? बाकी चेक्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड, नातेवाईक, मित्रमंडळी काहीच नव्हतं?

मुळात कोणी एखादी चांगली गोष्ट करत असेल तर खोट काढायची सवय आहेच आपली (हे वैयक्तिक तुम्हाला उद्देशून नाही, सर्वसाधारण विधान आहे). तरी हे बघून मला आनंद होतोय की बहुतांशी लोक या वेळेला सामंजस्याने घेत आहेत, सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 2:48 am | संदीप डांगे

धाग्यावरून रजा घेतली आहे पण या प्रतिसादाला उत्तर द्यावे वाटतं,

मला स्वतःला हे zero error कसं राबवता आलं असतं ह्याचे कुतूहल आहे, त्याबद्दल खास धागा वा मालिका काढण्याचा विचार आहे, कारण ही खूप मोठी, व सर्वत्र परिणामकारक ऐतिहासिक घटना आहे, तुमच्या प्रतिसादातल्या पहिल्या भागाचे उत्तर तेव्हा देईल,

मला खटकलेला भाग तो हा:
'वर परत विरोधी पक्ष, काळे पैसेवाले आहेतच ज्यांना त्यांच्याकडची बेहिशोबी संपत्ती बदलून घ्यायची आहे ते जो सापडेल त्याला लायनीत उभं करत आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर ताण येणारच. ४-५ दिवसांत ३ लाख कोटी रुपये जमा झालेत म्हणे आणि ५०००० कोटी काढले गेलेत.'

विरोधी पक्षकडेच काळा पैसा आहे हा अर्थ निघतोय, सत्ताधारी पक्ष व सर्वच नेते कार्यकर्ते अगदी स्वच्छ, प्युअर व्हाइट आहेत?

शिवाय ते (विरोधी पक्ष व कालाधनवाले) इतर लोकांना आपले पैसे पांढरे करायला लायनीत उभे करत आहेत? म्हणून ब्यावस्थेवर ताण येतोय? आय होप यु वेअर ईन युअर ट्रू सेन्सेस व्हाईल टायपिंग दिस. तुम्ही रांगेत उभे असलेल्या लाखो करोडो भारतीयांचा सरळ अपमान करत आहात, फक्त तुम्हाला एका पक्षाला समर्थन द्यायचे म्हणून? ह्यालाच अंधभक्ती म्हणतात. प्रधानसेवक म्हणाले ना कालेपैसेवाले रांगेत उभे, ओढा मग त्यांची री. तुमचे कोणी मित्र, नातेवाईक, सख्खे उभेच असतील ना रांगेत, कोणाचे पैसे बदलले मग त्यांनी?

मला अर्थशास्त्रातील ओ कि ठो कळत नाही, एवढे मोठे आकडे माझा पिनट ब्रेन प्रोसेस करू शकत नाही, पण भारतीय समाज व समाजशास्त्राचा थोडाबहुत अभ्यास आहे, त्यावरून इतके तरी कळते की 3 लाख कोटी म्हणजे फार मोठी रक्कम नाही 125 कोटीच्या देशात. 25 कोटी लोकांनी (म्हणजे कर्त्या पुरुषांनी, महिलांनी) निव्वळ 12000 प्रत्येकी भरले तरी 3 लाख कोटी होतात, इथं तर अख्खा देश सक्तीने उभा केला आहे, आणि मध्यमवर्गीयांच्या घरात रोख 5-25 हजार तर सहज मिळून जातात, इमर्जन्सी खर्चाला ठेवलेले, बायकांनी लपवून बचत केलेले. तुम्ही अशांना सरळ काळेपैसेवाल्यांचे, विरोधी पक्षाचे दलाल समजत आहात बंधो! थोडी तरी माणुसकी दाखवा जी तुम्ही इतरांना दाखवायला सांगत आहात.

व्यवस्थेवर ताण का आला याचे उत्तर अजून तुम्हाला कळले नाही. जाऊद्या, तुमच्या लाडक्या नेत्यांना कळले नाही तर काय बोलायचे! तुम्हाला आश्चर्य वाटले ना मिठाच्या किमतीबद्दल झालेल्या गोंधळाबद्दल? जेव्हा गणपती दूध प्यायला तेव्हाही मला असेच आश्चर्य वाटले होते, तेव्हा ह्या समाज मनाच्या अभ्यासाचा किडा घुसला डोक्यात, आणि कळले कारण तेव्हाच, लिहितो सविस्तर येत्या धाग्यात.

पब्लिक पॅनिक होतंच, होणारच, ते ध्यानात ठेवून प्लॅनिंग करावं लागतं, आपले आडाखे चुकले कि पब्लिकला ब्लेम करणे जबाबदारीपासून पळणे म्हटलं पाहिजे. दुसऱ्या भाषेत नाचता येईना अंगण वाकडे!

उद्या चोर पकडायचे म्हणून प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशनात जाऊन आपले निरापराधित्व सिद्ध करायला लाईन लावा असे देशभक्तीची बालगुटी देऊन सांगितले जाईल काय अशी ह्या तुघलकी राज्यात भीती वाटायला लागलीये,

समर्थक अगदी रामराज्य अवतरल्याच्या स्वप्नात रमतायत, थोडा आरसा दाखवला तर चरफडतात, हे तरी का असावे मग?

असो, नवीन धाग्यावर चर्चा करू. 24 तारखेला! तेव्हापर्यंत 1000 पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेतच! करन्सी बॅन करूनही करन्सी युज चालू आहे, जबराट आहे सगळं!

ट्रेड मार्क's picture

15 Nov 2016 - 3:16 am | ट्रेड मार्क

जे लिहीन त्याचा विपर्यास करायचा म्हणल्यावर काय बोलणार? कालाधनवाले कोणीपण असू शकतात ना? यात पक्षाचा काय संबंध? विरोधी पक्ष याचा विरोध करत आहेतच, कोणाच्या किती पैश्यांची रद्दी झाली हे आकडे बहुतेक कधीच जाहीर होणार नाहीत. मला खात्री आहे की यात भाजप, शिवसेनेपासून अगदी गल्लीतल्या सगळ्या पक्षांचे नेते असणार. बाकी अंधभक्तीबद्दल काय बोलायचे तुम्ही पण अंधविरोध करत आहातच. न्यूटनबाबांच्या ३ऱ्या नियमाप्रमाणे जेवढा विरोध तेवढी भक्ती असणारच. बाकी माझं पक्षाला समर्थन असण्यापेक्षा नोटा रद्द करण्याच्या या कृतीला समर्थन आहे हे नमूद करतो. कृतीला समर्थन असल्याने ती काँग्रेसने केलेली असो व भाजपने, समर्थन हे राहिलंच असतं. त्याचबरोबर नियोजनात आणि एकूण प्रक्रियेत त्रुटी आहेत आणि त्या असणारच हे पण मी आधीच मान्य केलं आहे. सांगण्याचं प्रयोजन हे की हे झीरो एररने राबवणे अशक्य आहे. याला कारण प्रक्रियेला विरोध करणारे लोक - ज्या रेफरन्स ने मी विरोधी पक्ष आणि कालाधनवाल्यांचा उल्लेख केला होता.

बाकी लायनीतल्या सरसकट सगळ्या लोकांबद्दल ते काळे पैसे पांढरे करून घेतात असं मी कुठे म्हणालो? पेपरमध्ये पण येत आहेत की लोक त्यांच्याकडे काम करणारे, ओळखीचे लोक यांच्या खात्यात २.४९ लक्ष रुपये भरून पैसे नियमित करत आहेत. याचा अर्थ रांगेतला एकूण एक माणूस हे करतोय असा खचितच नाही. असो. बाकी १२५ करोड जनतेतील प्रत्येकाकडे (लहान मुले धरून) १२००० रुपये आहेत असं तुम्हाला म्हणायचं नसणार हे गृहीत धरतो. कारण याच १२५ करोड जनतेने ९ तारखेच्या आधीच्या ४ दिवसात किती रक्कम भरली याची तुलना केली पाहिजे.

तुम्हाला फारसा त्रास झाला नाही असं तुम्ही याच धाग्यावर लिहिलंय तरी तुम्ही विरोध करताय हे मात्र नवल आहे. परत आणि उपाय मात्र सांगत नाही हे अजूनच नवल.

संदीप डांगे's picture

15 Nov 2016 - 10:56 am | संदीप डांगे

होस्टेलच्या लढ्याचा धागा वाचला का तुम्ही माझा? त्यात असाच प्रश्न विचारणारे आमचे रेक्टर होते, तुला त्रास होत नाही तर तू कशाला सही करतो? त्याची आठवण झाली. तेव्हा स्वतःला त्रास न होणारी पण इतरांच्या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्यास मदत करणारी पोरं चुकली कि बरोबर ह्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला जे नवल वाटतंय त्याचं कारण सापडेल!

बाकी निर्णयाला विरोध नाही हे पहिल्या दिवसापासून माझा स्टॅन्ड आहे, नियोजन बिघडलं आहे त्याबद्दल विरोध आहे हे आता किती वेळा सांगावं?

आधी बाण मारून नंतर रिंगण काढणे सोपं असते, सध्या समर्थकांचे तेच चाललंय. मोदींनी सहा महिने घेतलं तरी नियोजन गडबडले, मला इथे चार दिवस वेळ नै देत बॉ तुम्ही! :)

होस्टेलच्या धाग्यावर तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी केलेली कृती सांगितली होती. जी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध होती पण त्या कृतीमुळे पीडित विद्यार्थ्यांना मदत झाली. आत्ताच्या प्रसंगात तुम्ही मिपावर आधी येऊन कसं नियोजन चुकलं हे सांगत आहात.

तुम्ही कोणाला मदत केली, नाही केली हे काही तुम्ही सांगितलं नाही. गेलाबाजार तुमच्या स्थानिक ब्रँच मध्ये (हाय प्रोफाइल बँक सोडून) जिथे गर्दी किंवा अव्यस्थापन दिसतंय तिथे जाऊन आवाज उठवला का अथवा तिथे मदत केलीत का? तुम्ही केली असेलही पण ते इथे प्रतिसादांमध्ये कुठे दिसलं नाही त्यामुळे मला तरी समजलं नाही. परत इतक्या मिपाकरांनी विचारलं की मग सुयोग्य नियोजन काय आणि कसं करता आलं असतं तर त्यावर पण तुम्ही गेले ४ दिवस काही उत्तर दिलं नाही पण ठीक आहे अजून ४ काय ८ दिवस घ्या आणि सांगा तुमचा फुलप्रूफ प्लॅन काय आहे. तसं तर मोदींनी पण जाहीरपणे सांगितलंच की की थोडे दिवस त्रास होणार पण त्याचा दीर्घकालीन फायदा आहे त्यामुळे त्रास सहन करावा असं आवाहन केलं होतंच.

गेली २.५ वर्ष विरोधकांचं पण हेच चाललंय की, काही बोललं की त्यातलं संदर्भ सोडून एखादं वाक्य किंवा शब्द घ्यायचा आणि वाटेल तसा अर्थ काढायचा, नाही बोललं तरी काही बोलत नाहीत म्हणून आरोप करायचा. कृती केली तरी खुसपटं काढायची आणि नाही केली तरी काही करत नाही म्हणून ओरडायचं. विदेश दौरे केले की एनआरआय पंतप्रधान म्हणायचं, नाही केले तरी तिथून बोलायचं. त्यामुळे चालायचंच दोन्ही बाजू तेवढ्याच हिरीरीने भांडणार.

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 12:41 am | संदीप डांगे

इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला अडचण होत आहे, त्यामुळे पुढं प्रतिसाद देत नाही, इथेच थांबतो.

ट्रेड मार्क's picture

16 Nov 2016 - 12:56 am | ट्रेड मार्क

तुमच्या फुलप्रूफ आणि १२५ करोड पैकी एकाही व्यक्तीला त्रास होणार नाही अश्या नियोजनाच्या धाग्याची वाट पाहतो. तिथे चर्चा करू. बादवे धाग्याचे नियोजन तुम्ही केलंच असेल, तेवढी प्रकाशनाची तारीख द्या... वेळ नाही दिली तरी चालेल.

रच्याकने: चर्चा इथेच केली असती तर हजारी धागा झाला असता...

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 1:20 am | संदीप डांगे

बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात ते का? मी काय करतो, केले, करणार ह्याच्या चौकशा कशाला? मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणे जमत नसले कि वैयक्तिक पातळीवर लोक येतात जी चर्चेची फार उत्तम पातळी नाही.

ट्रेड मार्क's picture

16 Nov 2016 - 1:46 am | ट्रेड मार्क

मी कधी वैयक्तिक झालो? तुम्हीच म्हणालात की नियोजन कसं असावं याचा वेगळा धागा काढीन. मी तर फक्त त्याची प्रकाशनाची तारीख विचारली, जसं आपण पुढचा भाग कधी असं विचारतो, तसंच. यात एवढा राग येण्यासारखं काय आहे? बाकी तुम्ही काय कसं केंव्हा करणार याची काळजी आणि चौकशी मी कशाला करू? मला फक्त तुमच्या धाग्यातून नियोजन शिकायची अंमळ घाई झाली. त्याबद्दल क्षमस्व.

मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणे जमत नसले कि वैयक्तिक पातळीवर लोक येतात

याला मात्र सहमत. फक्त हे मला कसं लागू होतंय हे कळलं नाही. तुमच्या मुद्द्यांची मी माझ्यापरीने मुद्देसूद उत्तरं दिली आहेत. मी व इतरांनी नियोजनाबद्दल अधिक विचारल्यावर मात्र तुमची चिडचिड झालेली दिसतेय. असो. चिडू नका आणि कोणावरही रागावू नका. हे दोन्ही चांगल्या नियोजनाला घातक आहे. तुमच्या नियोजनावरील धाग्यास शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 1:58 am | संदीप डांगे

वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही मला विचारलं आहे की तुमचं तर बँकेचं काम नीट झालंय, मग इतरांना मदत केली का इत्यादी इत्यादी, हे वैयक्तिक आहे. मी मांडलेल्या मुद्द्यांना प्रत्त्युत्तर देण्याऐवजी तुम्ही मी वैयक्तिक काय करतो, केले हे विचारलेत,

तुम्ही बहुतेक तिकडे फारेनात आहात, तुमचंच लॉजिक वापरलं आणि तुम्हाला इथल्या ग्राउंड सिच्युएशन प्रत्यक्ष माहित नाही तरी हिरीरीने समर्थन करत आहात आणि उपदेश देत आहात त्याबद्दल मी तुम्हाला वैयक्तिक बोललो तर योग्य असणार नाही. तेच कोणीही माझ्याबाबतीत करू नये अशी माझी साधी अपेक्षा आहे.

नियोजनाचा धागा ह्यावरून जी आपली टोमणेबाजी चालली आहे तीही संतुलन गमावल्याचे लक्षण आहे. शहाजोगपणा नाही केलात तर आनंद वाटेल. प्लिज आता म्हणू नका भलते अर्थ काढतोय ते, तुम्हाला चांगलं कळतंय मी काय म्हणतोय ते, इतकेही तुम्ही राहुल गांधी नाही. ;)

असो, आता खरंच राम राम! धन्यवाद!

ट्रेड मार्क's picture

16 Nov 2016 - 2:16 am | ट्रेड मार्क

तुम्ही हॉस्टेलमध्ये तुम्ही काय केलंत तो विषय काढलात म्हणून पुढचं सगळं आलं. उगाच मोदींना विरोधासाठी विरोध करून आणि काहीही केलं तरी कुठली ना कुठली चूक दाखवत राहून तुम्ही केजरीवालांच्या रांगेत बसणार नाही/ बसू नये असं मला वाटतंय. बाकी मी फक्त तारीख विचारली, टोमणेबाजी किंवा शहाजोगपणा काय त्यात? पण आता तुम्हाला वाटतंय तर वाटुदे.

आता राम राम तर राम राम. शुभेच्छा तर आहेतच.

संदीप डांगे's picture

16 Nov 2016 - 4:10 pm | संदीप डांगे

हॉस्टेलमधे मी काय केलं हे तुम्हाला मी इथे कोनत्या प्रतिसादात सांगितलेलं दिसलं?

तुम्हीच आता वाट्टेल ते अर्थ, नसले ते वाचत आहात राव.

परत एकदा तो प्रतिसाद वाचा. मी संदर्भ दिला फक्त, मी काय केलं त्याची शेखी नाही मिरवली. आमच्या रेक्टरने मुलांना खोपच्यात घेऊन 'तुला काय त्रास होतो का, मग सही कशाला करतो' असे विचारले होते. त्याची आठवण झाल्याचे म्हटले.

मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या, मुद्दे संपले की वैयक्तिक होऊ नका इतकच म्हणणं आहे. माझ्याबद्दल इतकी चिंता करत आहात हे वैयक्तिकच नाही का?

माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याची चिंता मी करत नाही, तीही मी करत बसलो तर मग तुम्ही काय करणार? =))

चौकटराजा's picture

15 Nov 2016 - 9:47 pm | चौकटराजा

कारण या नियोजनात कुणाला सामील करून घ्यायचे? इथे १२० कोटी चोर रहातात. गुप्तता कधीच मेली असती. यावर मोदी बोलले देखील आहेत. लोकाना उधारी, काटकसर व संयम तिन्ही नको आहे. अशी जनता युद्ध परिस्थीती आली तर शत्रूला देखीला जाउन मिळायला कमी करणार नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Nov 2016 - 8:13 am | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही फक्त आणि फक्त विरोधासाठी विरोध करत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? याच पानावर खाली मृत्यूनजय यांनी एक प्रतिसाद लिहिला आहे (साभार) तो तुम्ही वाचला नसेल तर वाचावा. त्यात त्यांनी हा निर्णय सर्व तयारी करून कोणालाही त्रास न होता कसा घेतला जाऊ शकत नव्हता हे लिहिलं आहे. नवीन धाग्यावर, २४ तारखेनंतर, तुमच्या सविस्तर प्रतिसादात कुठेतरी त्यावर तुमचे मत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा!

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 10:06 am | सुबोध खरे

काळा पैसे फक्त नोटांमध्ये असतो इतरही अनेक मार्गानी लपवला जातो सरकारला हे कळत नाही का? सामान्य माणसांना त्रास द्यायची गरज काय असा उच्चरवा ने टाहो फोडणार्यांचे लक्ष मी बेनामी मालमत्तेबद्दल आताच पारित झालेल्या कायद्याकडे वेधू इच्छितो.
http://www.prsindia.org/uploads/media/Benami/Benami%20Transactions%20Act...
भारत सरकार का असामान्य राजपत्र. extraordinary Gazzette of India मध्ये प्रसारित झालेले आहे.
जाणकारांनी आणि जिज्ञासूंनी पाहून घ्यावे.
सरकारने "रोकड नोटा" या एकाच मार्गावर बंदी आणली नसून बेनामी मालमत्ता हा सर्वात मोठा अवैध संपत्तीचा मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. श्री मोदींच्या कालच्या गोव्याच्या भाषणात याचे पडसाद उमटलेले आहेत हे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास लक्षात येईल.
५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ हि अतिशय काळजीपूर्वक निवडलेली होती. दिवाळी झाल्यामुळे सामान्य लोकांनी बोनसची रक्कम आपल्या दिवाळीच्या खरेदी साठी वापरलेली होती. हि रक्कम व्यापाऱ्यांच्या खिशात आहे पण बँकेत भरलेली नाही. ७ तारीख होऊन गेल्यामुळे लोकांचे पगार झालेले होते. तेंव्हा आपल्या सेवकवर्गाला पगार देण्यासाठी पैसे नाहीत हा आरडा ओरडा मालक वर्गाला करता आला नाही.
बहुसंख्य लोकांच्या हातात रोख पैसे पगार झाल्यामुळे होता. दिवाळीची सुट्टीवरून लोक आणि बँकेचे कर्मचारीही परत आलेले होते. लग्न साराय साठी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जाण्याची शक्यता होती. दिवाळी नंतर स्थावर मालमत्तेची बरीच देवाणघेवाण रोखीच्या/ काळ्या पैशाच्या माध्यमातून होणार होती. अशा अतिशय काळजीपूर्वक निवडलेल्या वेळेत केलेल्या शल्यक्रियेमुळे बऱ्याच लोकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे.
सामान्य माणसाला त्रास होतो आहेच परंतु त्यासाठी सामान्य माणसांनी कोठेही आंदोलने इ केलेली नाहीत. राजकारणी लोक अशी चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत असले तरीही सामान्य जनता अशा भूल थापांना अजून तरी बळी पडलेली नाही. त्यासाठी मी मिसळपाव वरील आपल्या मित्रांना विनंती करतो कि व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका.

गणामास्तर's picture

14 Nov 2016 - 10:20 am | गणामास्तर

मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी झाली आहे एवढी गोष्ट तर गेल्या चार पाच दिवसात लक्षात येत आहे.
मला वेगळाचं प्रश्न पडलाय, ज्या लोकांना या निर्णयामुळे खूप त्रास,मनस्ताप सहन करावा लागत आहे ते बव्हंशी सामान्य लोक आहेत असे समजून चालले तर याच लोकांना इथे किंवा तत्सम सोशल मिडीयावर लगातार पोष्टी टाकायला वेळ कसा मिळतोय?

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 10:28 am | संदीप डांगे

तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे हजार पाचशेच्या नोटा असतात काय या प्रश्नासारखा वाटतोय, ;)

गणामास्तर's picture

14 Nov 2016 - 10:47 am | गणामास्तर

नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि काही पात्रे व्हाट्सअप आणि चेपू वर आपल्याला कसा त्रास होतोय हे दिवसातून पंधरा वीस पोष्टी टाकून सांगत आहेत.तो वेळ सत्कारणी लावून पैशाची व्यवस्था करावी ना?

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 11:14 am | संदीप डांगे

पैशाची व्यवस्था कशी करावी? समजलं नाय बॉ,

पैसा's picture

14 Nov 2016 - 10:32 am | पैसा
संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2016 - 11:09 am | संजय क्षीरसागर

In the first four days ( from November 10th to 13th , upto 5 pm ) about Rs 3.0 lacs crores of old Rs.500/- and Rs.1000/- bank notes have been deposited in the banking system

एकूण १३.६० लाख कोटी इतकं चलन ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटात आहे. त्यामुळे ५ लाख कोटी चलन बाद होईल हा अंदाज बरोबर वाटतो.

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 10:59 am | अप्पा जोगळेकर

उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी लोकांकडे क्रेडिट, डेबिट कार्ड चा पर्याय आहे. सगळ्याच लोकांकडे चेकने व्यवहार करण्याचा किंवा उधारी उसनवारीचा व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
नोटा नाहीत म्हणून किंवा एखादा उपास घडला म्हणून कोणी उपाशी मरणार नाही. आणि एखादी व्यक्ती नोटांच्या अडचणी पायी थोडीशी सुद्धा अ‍ॅडजस्टमेंट करु शकत नसेल तर अशी भारभूत व्यक्ती मेली तर बरेच आहे. .

सतिश गावडे's picture

14 Nov 2016 - 11:26 am | सतिश गावडे

त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा त्यांना भारताबाहेर हाकलून देण्याचा सौम्य पर्याय निवडूया का आपण? ;)

गणामास्तर's picture

14 Nov 2016 - 11:33 am | गणामास्तर

=)) =)) =))

इरसाल's picture

15 Nov 2016 - 4:59 pm | इरसाल

हा सौम्य उपाय आम्हाला मान्य नाही. त्यापेक्षा यालाच एक्स्ट्रापोलेट करुन इसिस वगैरे कडे पाठवता येत असेल तर तसे पहावे, जायला ५००/१००० च्या नोटा मी देतो ;)

मृत्युन्जय's picture

14 Nov 2016 - 11:44 am | मृत्युन्जय

सरकारचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही खुपच वाहवत गेलात काय? हा प्रतिसाद खुपच असंवेदनशील होता. रोज चारी ठाव जेवणार्‍या लोकांसाठी एखाद दिवस उपास करणे कदाचित फॅड किंवा जमवण्यासारखे असेल. रोज भाकरीवर गुजराण करणार्‍या लोकांना ती देखील खायला न मिळणे ही किती केविलवाणी गोष्ट असु शकेल याची तुम्हाला कल्पना आहे का? योजनेत त्रुटी आहेत (आणी त्या तश्या असणारच होत्या) आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे हे मान्य केलेच पाहिजे. ज्या लोकांसाठी हा त्रास जीवावर उठला आहे त्यांच्याबद्द्दल आपण किमान सहानुभूती बाळगुयात. आपण सगळे खुप वेल प्लेस्ड आहोत. आज पैसे नसले तरी १० लोकांना फोन करुन आपण काही सोय करु शकतो. सगळेच एवढे प्रिव्ह्लेज्ड नसतात . त्यामुळे अश्या लोकांना भारभूत म्हणुन त्यांच्या मरण्याची अपेक्षा व्यक्त करणे हे खुपच संवेदनाहीन होते आप्पा.

असो.

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 12:41 pm | अप्पा जोगळेकर

माझ्या प्रतिसादाचे चुकीचे इंटरप्रिटेशन होत आहे.
रोज भाकरीवर गुजराण करणार्‍या लोकांना ती देखील खायला न मिळणे ही किती केविलवाणी गोष्ट असु शकेल याची तुम्हाला कल्पना आहे का?
मी गरीब वर्गा बद्दल लिहिले असे तुम्हाला का वाटले ते मला माहीती नाही. मी जे लोक अ‍ॅडजस्टमेंट करु शकत नाहीत त्यांच्याबद्दल लिहिले आहे. असे लोक गरीब श्रीमंत कोणीही असू शकतात.

आज पैसे नसले तरी १० लोकांना फोन करुन आपण काही सोय करु शकतो.
जोपर्यंत नोटा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत सगळेच लोक गरीब आहेत. मी गेले ३ दिवस किराणा माल वाल्याच्या वहीत लिहून ठेवूनच व्यवहार करत आहे. डी मार्ट माझ्या घरापासून ८ किमी लांब आहे. महिन्यातून एकदाच तिथे जाणे जमू शकते.

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 12:48 pm | अप्पा जोगळेकर

सदर अ‍ॅडजस्टमेंट हा जीवन-मरणाचा प्रश्न नाही. परंतु तो तसा आहे असे दाखवून उगाचच वातावरण कलुषित केले जात आहे. शिवाय लगेचच गरीबांचे काय हाल होतात तुम्हाला काय कळणार असे गुबगुबीत सोफ्यावर बसून सांगणार्‍ लोकांबद्दल काय बोलणार.
१० लोकांना फोन करुन पैसे कुठून जमवणार ? त्या १० लोकांकडे तरी असले पाहिजेत ना.
तरीदेखील 'मेले तर बरेच आहे' असे जे वाक्य मी लिहिले त्याबद्दल कोणाला त्रास झाला असेल तर त्या वाक्याबद्दल मी दिलगीर आहे.

नाखु's picture

14 Nov 2016 - 2:27 pm | नाखु

आपल्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
(प्रांजळपणे दिलगिरी मागणे मिपावर फारसे प्र्तिष्ठेचे नसते हे माहीत असूनही)

नाखु मिपावाला

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 2:33 pm | अप्पा जोगळेकर

धन्यवाद.

ह्या असंवेदनशील प्रतिसादाचा निषेद..!!

मृत्युन्जय's picture

14 Nov 2016 - 11:29 am | मृत्युन्जय

सरकारी निर्णयामुळे बाजारात नोटांची टंचाई झाली आहे आणि हे सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे होते आहे असा एक सूर आहे. काही त्रुटी नक्कीच राहिल्या आहेत. थोडी गडबड नक्कीच झालेली आहे. पण संपुर्णपणे बिनचुक यंत्रणा राबवण्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेच होते:

१. नोटा बदलत असल्याचा निर्णय सर्व बँकांच्या संचालकांना कळवायला लागले असते. (किमान एक महिनाभर आधी). त्यानुसार सर्व बॅंकांनी त्यांच्या अधिकारीवर्गाला जागृत करुन संपुर्ण प्रोसेस समजावुन सांगुन, योग्य प्रमाणात १०० च्या नोटा जमवुन ठेवायला सांगायला लागले असते. (अर्थात हे करताना त्यांनी अधिकारीवर्गाला हे सगळे का चालले आहे हे सांगायचे नाही)

२.सर्व नगरसेवकांना, मंत्र्यांना आणी आमदार खासदारांना (जमलेच तर सगळ्या स्टेट लेव्हल पक्षांच्या प्रमुखांना) पुर्वकल्पना देउन ( आणि गोपनीयतेची शपथ देउन) पुर्वसूचना देउन समाजप्रबोधनासाठी तयार करायचे (म्हणजे निर्णय जाहीर झाल्यावर लॉजिस्टिक्स नीट जमवता येइल या अनुषंगाने)

३. सर्व प्रिंटर्स ना (अधिकृत) खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प मोठ्या प्रमाणावर १०० आणि २००० च्या नोटा छापुन ठेवायला सांगायचे (म्हणजे इकडे निर्णय जाहीर झाला की तिकडे बँकांमध्ये पैसे जमा) (अर्थात हे करताना ५०० आणि १००० च्या नोटा छापणे एकाएकी का बंद करायचे हे मात्र त्यांना सांगायचे नाही)

४. आरबीयला सांगुन "नोटा बदलण्याचे फॉर्म्स" सगळीकडे पुरवायचे. म्हणजे शाळा, कॉलेजेस, बँका, पोस्ट ऑफिसेस (झालेच तर वर्तमानपत्रातुन) . पण हे सगळे करताना कोणी विचारलेच की हे सगळे काय चालले आहे तर केवळ "मज्जा" म्हणुन डोळे मिचकवायचे (त्याहुन जास्त कोणी पाठपुरावा केलाच तर राजकोट मधल्या त्या पेपरचा अनुवाद (मूळ कात्रणासह) देउन बेंबीच्या देठासह " एप्रिल फूल" म्हणुन कोकलायचे)

५. ज्पोपर्यंत १०० / २००० च्या नोटा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नाहित तोवर ५०० / १००० च्या नोटा सगळीकडेच चालतील असे जाहीर करावे आणी मग ३१ डिसेंबरला काही लोक म्हणाले की त्यांना अजुन बँकेत जायला जमलेले नाही तर मुदत प्रथम ३१ मार्च पर्यंत आणी मग ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवावी.

तळटीपः
१. हे सग्ळे करुन मग काळा पैसा कसा बाहेर आणणार हे विचारणार्‍या सर्वांना फाट्यावर मारण्यात यायला हवे होते.
२. हे सगळे करुन " सगळ्या राजकारण्यांना " तर तुम्ही आधीच सांगितलेत. सग्या सोयर्‍यांचे सोय पाहिलीत असे म्हणणार्‍या लोकांनाही फाट्यावर मारायला हवे होते.
३. फाट्यावर मारण्याची गरज असणारी बरीच वक्तव्ये असल्याने " --------------------- " असे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारण्यात येइल असे लिहिलेली पत्रके प्रसिद्ध करायला हवी होती. या निर्णयासंदर्भात कुठलाही नवीन आरोप झाला की गाळलेल्या जागा भरुन पत्रक काढण्याचे आदेश पीएमओ ला द्यायला हवे होते.

धन्यवाद.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Nov 2016 - 11:52 am | हतोळकरांचा प्रसाद

१००% सहमत! (कुड नॉट ऍग्री मोअर!)

पुर्ण आणि मनापासून सहमत.

अनुप ढेरे's picture

14 Nov 2016 - 11:50 am | अनुप ढेरे

http://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.