Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ट्रेड मार्क on Tue, 11/08/2016 - 21:38
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
  • 307110 views

प्रतिक्रिया

Submitted by चौकटराजा on Sun, 11/13/2016 - 18:29

In reply to नवी २००० ची नोट लाचखोरीसाठी by सतिश गावडे

Permalink

आवं

आवं तिथंच १५० बी यम डब्लु आहे असं म्हन्यात !

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 11/13/2016 - 19:02

Permalink

चला..., इतर लिखाण करायचे

चला..., इतर लिखाण करायचे असल्यामुळे या धाग्यावरुन आता रजा घेतो. बर्‍याच गोष्टी समजल्या त्याबद्दल सर्वांचे आभार.

Submitted by चौकटराजा on Sun, 11/13/2016 - 20:34

Permalink

२००० ची सदोष नोट आणि आय क्यू

२००० च्य नोटेचा रंग जात आहे याच डेमो एक माणूस टीव्ही वर देत असता २ अधिक दोन बरोबर चार म्हणजे काय याचे ज्ञान नसलेल्या माझ्या मतिमंद ( सरकारी एम डी डो च्या हिशेबाने ७५ टक्के माननिक नुकसान ) मुलीने मला एक प्रश्न केला की " नोटेचा रंग घालवून बघायचाच कशाला ?" . मला वाटते आपल्याला बनावट नोट काढता येईल किंवा कसे या नादात हा उद्योग कोणातरी केलेला दिसतो. देवाची मूर्ति खरेच सोन्याची आहे का हे भक्त कधी ती मुर्त ठेचून पाहिल का ? बादवे मी वर म्हटल्याप्रमाणे ५०० ची नोट आज दिल्ली मधे जारी करण्यात आली आहे. सहकारी बॅन्कात सुद्धा या नोटा मंगळ॑वारी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून म्ह्टले सर्व ओके होईल.

Submitted by पुंबा on Tue, 11/15/2016 - 12:01

In reply to २००० ची सदोष नोट आणि आय क्यू by चौकटराजा

Permalink

असे असू शकेल काय कि मुळातच हि

असे असू शकेल काय कि मुळातच हि नोट फार काळ टिकावी या उद्देशाने बनलीच नसेल, म्हणजे कि काही वर्षात हि नोट देखील चलनातून हद्दपार होऊ शकेल. किंवा सरकार डिफेक्टिव्ह नोटा बदलून घ्यायला लोकांना सांगेल. (खूप लेम जस्टीफिकेशन वाटू शकेल, जे वाटतंय ते लिहितोय)

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 11/13/2016 - 20:38

Permalink

मला वाटते की सरकारने ५०० व

मला वाटते की सरकारने ५०० व १००० अशा दोन्ही नोटा रद्द करण्याऐवजी फक्त ५०० च्या नोटा रद्द करायला पाहिजे होत्या. १००० च्या नोटा वैध राहिल्याने लोकांची कमी अडचण झाली असती. फक्त ५०० च्या नोटा बदलण्यासाठी तुलनेने कमी झुंबड उडाली असती. एटीम सुरू राहिली असती व त्यातून फक्त १००० च्या नोटा देता आल्या असत्या. काळाबाजारवाल्यांनी ५०० च्या नोटातील पैसे बदलून घेऊन १००० मध्ये ठेवण्याचा फारसा विचार केला नसता आणि सध्या हातात असलेल्या १००० च्या नोटा बदलण्याचा प्रयत्न केला असता कारण काही काळाने १००० च्या नोटाही रद्द होतील अशी शंका मनात डोकावत राहिली असती. नंतर काही महिन्यांनतर १००० च्या नोटाही रद्द करता आल्या असत्या.

Submitted by संदीप डांगे on Sun, 11/13/2016 - 21:13

In reply to मला वाटते की सरकारने ५०० व by श्रीगुरुजी

Permalink

सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे

सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे घोषणा झाली व पॅनिक झाले ते सांभाळतांना बिघडले. लोकांना वन-लायनर कळतात फक्त. "१०००-५०० च्या नोटा रद्द झाल्या, त्या बॅन्केत बदलून घ्या" एवढंच. बाकीचे डिटेल्स मुरायला वेळ जातो, ओवरनाईट होत नसतं. नेमकं काय होणार आहे, व प्लानिंग काय हे येता काळच सांगेल. आपण बसलोय कळफलक बडवत आणि अंदाज बांधत. :)

Submitted by पिनाक on Sun, 11/13/2016 - 21:19

In reply to सहमत आहे. मुळात ज्या प्रकारे by संदीप डांगे

Permalink

मूळ हेतू नकली नोटा बद्दल होता

मूळ हेतू नकली नोटा बद्दल होता तो साध्य झाला नसता ना मग?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/16/2016 - 23:46

In reply to मला वाटते की सरकारने ५०० व by श्रीगुरुजी

Permalink

या प्रक्रियेने खोट्या

या प्रक्रियेने खोट्या नोटांच्या स्वरूपातल्या पैशाचे व काळ्या "१०० किंवा कमी रकमेच्या नोटांत" किंवा "इतर शोधायला कठीण (उदा.सोने, रियल इस्टेट, इ) गोष्टींत" रुपांतर करायला पुरेसा वेळ मिळेल. मग नोटा रद्द तरी कशाला करायच्या ? हेच पुर्वी दोनदा केले होते आणि काळा पैसेवाले खूष होते ! १. आता लोकसभेतली किंवा माध्यमातली चर्चा पाहिली तर (डावे व ममता सोडून) मुख्य आक्षेप "आम्हाला न सांगता अचानक का कारवाई केली (पक्षी : निदान आमचे पैसे तरी आम्हाला सुरक्षितपणे बदलू द्यायचे होते :) ). २. राजकारण्याचा अजून एक उघड-गुप्त सूर असा की "उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीपूर्वी हे करून सरकारने आमचा विश्वासघात केला आहे". ३. या कारवाईने अतिरेक्यांना मिळणारा खोटा पैसा (जवळ जवळ २ लाख कोटी प्रतीवर्ष) बंद झाला आणि त्याचे परिणाम (अ) दगडफेक पूर्ण थांबली आहे आणि (आ) चारपाच महिने शाळा बंद असून व ४०एक शाळा जाळल्यानंतरही सद्या काश्मीरमध्ये ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/16/2016 - 23:49

In reply to या प्रक्रियेने खोट्या by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सर्वात महत्वाचा मुद्दा...

सर्वात महत्वाचा मुद्दा... पूर्ण (१००%) गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता. बातमी थोडीशीही बाहेर फुटणे म्हणजे कारवाईला "फुसका बार" बनवणे झाले असते.

Submitted by निओ१ on Wed, 11/16/2016 - 23:52

In reply to सर्वात महत्वाचा मुद्दा... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता

हे लोकांना समजले तर सर्व विरोध थंड होईल ना, मग पुढे असलेल्या राज्य निवडणूक मध्ये याचे भांडवल असे केले जाईल.

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/16/2016 - 23:55

In reply to गुप्तता पाळणे हा या कारवाईचा जीव होता by निओ१

Permalink

सहमत !

सहमत ! यालाच मी वर "नसलेल्या मोहरीचा पर्वत बनवणे" म्हटले आहे ;) :)

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 11/13/2016 - 21:09

Permalink

घराजवळचे एक एटीएम सुरू

घराजवळचे एक एटीएम सुरू झाल्याचे समजले. उद्या जाऊन बघतो. ५०० च्या नवीन ५० लाख नोटा वितरणासाठी आलेल्या आहेत असे वाचले. तसे असेल तर जास्तीत जास्त २-३ दिवसात बर्‍याच समस्या कमी होतील.

Submitted by पैसा on Sun, 11/13/2016 - 21:25

In reply to घराजवळचे एक एटीएम सुरू by श्रीगुरुजी

Permalink

कॅलिब्रेशन व्हायला हवे

नव्या नोटांचा साईझ वेगळा असल्याने सगळी मशिन्स कॅलिब्रेट व्हायला हवीत. दोन हजाराचे नवे डिनॉमिनेशन असल्याने सॉफ्टवेअरही बदलावे लागेल. इथे एसबीआय, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस आणि एचडीएफसी यानी शंभराच्या नोटा भरून एटीएम चालू केली आहेत. पण तिथे रांगा लावून लोक त्या नोटाही संपवत आहेत. इतर सरकारी बँकाना एसबीआयमधून शंभराच्या नोटांचा पुरवठा नसल्याने ते एटीएम चालू करू शकलेले नाहीत.

Submitted by पुंबा on Sun, 11/13/2016 - 21:17

Permalink

Krupaya, Nava dhaga Kadhava

Krupaya, Nava dhaga Kadhava ashi namra vinanti.

Submitted by पिनाक on Sun, 11/13/2016 - 21:25

Permalink

केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप

केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप च्या कार्य कर्त्या ची वक्त्यव्ये आणि ट्विटर वरच्या ट्विट्स) शिसारी आणणार्या आहेत. या लोकांबद्दलची सगळी सहानुभूती आधीच नष्ट झाली होती. आता त्याची जागा तिरस्कारानं घेतली आहे.

Submitted by संदीप डांगे on Sun, 11/13/2016 - 21:34

In reply to केजरीवाल आणि आशुतोष (आणि आप by पिनाक

Permalink

ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक

ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक खेचून आणणाऱ्या लोकांबद्दल काय मत?

Submitted by पिनाक on Sun, 11/13/2016 - 21:46

In reply to ज्यात त्यात सीमेवरचे सैनिक by संदीप डांगे

Permalink

आधारभूत मुद्दा (reference

आधारभूत मुद्दा (reference पॉईंट) कोणता आहे ते सांगाल का? जर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक बद्दल म्हणत असाल तर सैनिक स्वतः: कोणतीही एक्शन करत नाहीत आणि राजकीय नेतृत्वांन त्याच क्रेडिट घेणं गैर काय?

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/14/2016 - 00:55

In reply to आधारभूत मुद्दा (reference by पिनाक

Permalink

तिकडे सैनिक सीमेवर... ह्या

तिकडे सैनिक सीमेवर... ह्या शब्दाने सुरु होणारे डॉयलॉक! जसे की रामदेवबाबा लेटेस्ट! ;)

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 11/14/2016 - 11:44

In reply to तिकडे सैनिक सीमेवर... ह्या by संदीप डांगे

Permalink

परत तेच! मला सांगा - सरकारचा

परत तेच! मला सांगा - सरकारचा निर्णय झालाय. त्याने सध्या सार्वजनिक जीवन थोडं कोलमडून गेलंय. ते घाईघाईत निर्णय झालाय म्हणून तसं झालाय असं काही लोकांचं मत आहे तर निर्णय घाईघाईत घेणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच त्याची परिणामकता वाढणार होती असं बाकीच्यांचं. आता या परिस्थितीत काही लोक सैन्याची उदाहरणे देऊन किंवा आणखी बऱ्याच प्रकारे लोकांना संयम ठेवायला प्रवृत्त करत आहेत तर यात चुकीचे ते काय? खूप त्रास होतोय असा परत परत बिंबवून लोकांचा संयम कसा तुटेल असं बोलायला हवं का?

Submitted by शाम भागवत on Sun, 11/13/2016 - 22:48

Permalink

२००० च्या नोटेत चीप

२००० च्या नोटेत चीप असल्याबद्दलचा व्हिडीओ टीव्ही ९ वर आत्ता दाखवला. रेडिओ सिग्नलला प्रतिसाद देते म्हणे. काय चाललेय समजत नाही.

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/14/2016 - 09:59

Permalink

ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या

ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या नियोजनाच्या चायलेंज बद्दल: त्रास झाला तर बोलूही नये अशी काहीशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ज्याचं मूल दगावले, आईबाप मेले तो आता सरकारला शिव्या घालत असेल, तुम्ही हे चायलेंज त्याच्यासमोर जाऊन त्याला कराल काय? जो आज खिशात हक्काचे वैध रित्या कमावलेले पैसे असून उपाशीतापाशी वणवण भटकत असेल त्याला हे चायलेंज कराल काय? नियोजनात त्रुटी असल्याने ज्या सामान्य लोकांना त्रास होतोय ते जर बोलत असतील तर तुम्ही त्यांच्या तोंडावर हे चायलेंज फेकणे किती अमानुष आहे ह्याची काही कल्पना? याच धाग्यात आपण भारतीय कसे एकमेकांना समजून घेत नाही, मदत करत नाही असे काहीसे आपण बोललात, त्या पार्श्वभूमीवर असे चायलेंज फेकणे समजूतदारपणा व माणुसकीपूर्ण आहे असे दिसत नाही. नियोजनातल्या त्रुटी सरकारही मान्य करतंय, पण समर्थकांची अवस्था चाय से ज्यादा केटली गरम अशी झालीये! ;)

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Mon, 11/14/2016 - 11:30

In reply to ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या by संदीप डांगे

Permalink

ज्याला त्रास होतोय त्याने

ज्याला त्रास होतोय त्याने जरूर बोलावं कि, त्याबद्दल कोणी आक्षेप का घेईल? त्रास होतोय तो या गोष्टीचा कि काही लोक इतरांना झालेल्या त्रासाचा स्वतःच्या मोदी आणि सरकारविरोधी मताची आणि सुरांची धार वाढवण्यासाठी वापर करून घेत आहेत. देशात आत्यंतिक घायकुतीचं वातावरण झालंय वगैरे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. याला आक्षेप का बरं नसावा? रांगेत उभ्या असलेल्या १० जणांना प्रतिक्रिया विचारायची, त्यातल्या दोन लोकांनी दिलेल्या तिखट प्रतिक्रिया ह्या बाकीच्या ८ प्रतिक्रिया वगळून रांगेच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून दाखवायच्या याला आक्षेप का नसावा? अवांतर : ज्यांचे मूल दगावले त्यांनी नोटांना दोष दिला कि डॉक्टर च्या अमानवीय वागणुकीला याचा काही माहिती स्रोत आहे का कुणाकडे? कि आपणही दिल्लीतल्या काही नेत्यांसारखं, आत्महत्या केलेल्यांच्या घरच्यांच्या आधी छाती बडवायला लागणार?

Submitted by पद्माक्षी on Mon, 11/14/2016 - 16:50

In reply to ज्याला त्रास होतोय त्याने by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

+१

कालपर्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत हातातल्या घड्याळापासून गळ्यातल्या चेनपर्यंत कशाचाही उपयोग विनिमय म्हणून होऊ शकत होता पण आज मात्र सगळ्या १०० कोटी लोकांकडे फक्त ५०० किंवा १०००च आहेत. सरकारने सांगितले होते कि ८-१० दिवस गैरसोय होणार, थोडी कळ सोसा. आमच्या शहरात तरी गेल्या ५ दिवसात मी कुठेही गडबड गोंधळ उडालाय असे पहिले नाही. मी स्वतः एका रांगेत उभे होते, ATM चे पैसे संपले. लोकं (आणि मीसुद्धा) दुसरे ATM हुडकायला निघालो. कुठेही आरडाओरडा, शिव्याशाप नव्हते. काल एका रांगेत उभे राहून पैसे काढले, अर्धा तास लागला. तिथे security पण नव्हता, पण लोक शिस्तीत उभे होते. पॅनिक फक्त दिल्लीत आहे असे वाटतंय. खास करून केजरीवालच्या घरी. ओरिसा मध्ये मुख्यमंत्री पॅनिक परिस्थिती कशी तयार होणार नाही हे बघतायत आणि Mr IIT फक्त पॅनिकच create करतायत. बेसिकली अतिशय युजलेस माणूस आहे हा.

Submitted by प्रदीप on Mon, 11/14/2016 - 20:01

In reply to ज्याला त्रास होतोय त्याने by हतोळकरांचा प्रसाद

Permalink

दुसरी बाजू

अवांतर : ज्यांचे मूल दगावले त्यांनी नोटांना दोष दिला कि डॉक्टर च्या अमानवीय वागणुकीला याचा काही माहिती स्रोत आहे का कुणाकडे? कि आपणही दिल्लीतल्या काही नेत्यांसारखं, आत्महत्या केलेल्यांच्या घरच्यांच्या आधी छाती बडवायला लागणार?
दुसरी बाजू इथे पहावी. नेहमीसारखे, काहीतरी भडक बातमी 'तयार' केली गेली, असे दिसते!

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 11/15/2016 - 01:41

In reply to ट्रेंड मार्कक साहेब, तुमच्या by संदीप डांगे

Permalink

मी काही चायलेंज फेकलं वगैरे नाही

माझं म्हणणं एवढंच आहे की आता सरकारला नावं ठेवतोच आहोत तर मग हे चांगल्या पद्धतीने कसं करता आलं असतं हे पण बघूया. आम्ही नोकरीपेशा माणसं जेव्हा आमच्या बॉसकडे एखादी तक्रार करतो तेव्हा तो म्हणतो की नुसत्या तक्रारी घेऊन येऊ नकोस त्याला पर्याय पण सांग. म्हणून म्हणलं तुम्ही तक्रार करताय तर तुमच्याकडे उपाय असावा. पण नसेल तर राहूदे, मी काही बॉस नाहीये त्यामुळे... अडचण/ त्रास झाला असेलच लोकांना, त्याबद्दल अजिबात ना नाही. पण फक्त सगळ्यांना फक्त त्रासच झालाय असं जे दर्शवलं जातंय ते खरं नाही/ नसावं. तुम्ही स्वतः सुद्धा सांगितलं आहेच की तुमचं बँकेतील काम पटकन झालं.
"याच धाग्यात आपण भारतीय कसे एकमेकांना समजून घेत नाही, मदत करत नाही असे काहीसे आपण बोललात"
हा जनरल अनुभव आहे की आपण फार लवकर पॅनिक होतो. त्यात खरंच आपल्याला गरज आहे का एखाद्या गोष्टीची ते पण तपासून बघत नाही. उदा. द्यायचं झालं तर आत्ता मिठाची टंचाई होणार म्हणून जी अफवा उठली होती त्यात शहानिशा न करता लोक १०/१० किलो मीठ घेत होते. त्यात हा विचार नाही की महिन्याला मला किती मीठ लागतं तेवढं माझ्याकडे असेल तर पुढच्या ६ महिन्याचं मीठ कशाला घेऊन ठेवायचं? त्यामुळे ज्याच्याकडे अगदी कमी मीठ असेल त्याला मिळणार नाही ना? त्याच प्रमाणे नोटा बदलायला ३० डिसेम्बरपर्यंत वेळ आहे, जेवढी गरज असेल तेवढे पैसे जवळ असले की झालं. पण उगाच घरातले झाडून सगळे पैसे बदलून आत्ताच घ्यायला पाहिजे असं नाही किंवा खात्यात भरणा आत्ताच करायला पाहिजे असं नाही. पण हा विचार किती लोक करतात? बरं हे काही नैसर्गिक आपत्तीसारखं नाहीये की सगळंच अनिश्चित आहे. त्यामुळे कितीही प्लॅनिंग केलं तरी सामोरची पार्टी कशी प्रतिक्रिया देईल हे अनिश्चित आहे ना. वर परत विरोधी पक्ष, काळे पैसेवाले आहेतच ज्यांना त्यांच्याकडची बेहिशोबी संपत्ती बदलून घ्यायची आहे ते जो सापडेल त्याला लायनीत उभं करत आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर ताण येणारच. ४-५ दिवसांत ३ लाख कोटी रुपये जमा झालेत म्हणे आणि ५०००० कोटी काढले गेलेत. केवळ ५००-१००० च्या नोटा स्वीकारणार नाही असं सांगून हॉस्पिटल जर का उपचार नाकारत असेल तर ते सर्वात अमानुष नाही का? जर हे पैसे झालेल्या उपचाराचा खर्च म्हणून आहेत तर ब्लॅक नाहीत त्यामुळे हॉस्पिटलला बँकेत भरायला काय अडचण असणार होती? बरं त्या लोकांकडे फक्त ५००-१००० च्या नोटा देणे हाच मार्ग होता का? बाकी चेक्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड, नातेवाईक, मित्रमंडळी काहीच नव्हतं? मुळात कोणी एखादी चांगली गोष्ट करत असेल तर खोट काढायची सवय आहेच आपली (हे वैयक्तिक तुम्हाला उद्देशून नाही, सर्वसाधारण विधान आहे). तरी हे बघून मला आनंद होतोय की बहुतांशी लोक या वेळेला सामंजस्याने घेत आहेत, सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत.

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/15/2016 - 02:48

In reply to मी काही चायलेंज फेकलं वगैरे नाही by ट्रेड मार्क

Permalink

धाग्यावरून रजा घेतली आहे पण

धाग्यावरून रजा घेतली आहे पण या प्रतिसादाला उत्तर द्यावे वाटतं, मला स्वतःला हे zero error कसं राबवता आलं असतं ह्याचे कुतूहल आहे, त्याबद्दल खास धागा वा मालिका काढण्याचा विचार आहे, कारण ही खूप मोठी, व सर्वत्र परिणामकारक ऐतिहासिक घटना आहे, तुमच्या प्रतिसादातल्या पहिल्या भागाचे उत्तर तेव्हा देईल, मला खटकलेला भाग तो हा: 'वर परत विरोधी पक्ष, काळे पैसेवाले आहेतच ज्यांना त्यांच्याकडची बेहिशोबी संपत्ती बदलून घ्यायची आहे ते जो सापडेल त्याला लायनीत उभं करत आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर ताण येणारच. ४-५ दिवसांत ३ लाख कोटी रुपये जमा झालेत म्हणे आणि ५०००० कोटी काढले गेलेत.' विरोधी पक्षकडेच काळा पैसा आहे हा अर्थ निघतोय, सत्ताधारी पक्ष व सर्वच नेते कार्यकर्ते अगदी स्वच्छ, प्युअर व्हाइट आहेत? शिवाय ते (विरोधी पक्ष व कालाधनवाले) इतर लोकांना आपले पैसे पांढरे करायला लायनीत उभे करत आहेत? म्हणून ब्यावस्थेवर ताण येतोय? आय होप यु वेअर ईन युअर ट्रू सेन्सेस व्हाईल टायपिंग दिस. तुम्ही रांगेत उभे असलेल्या लाखो करोडो भारतीयांचा सरळ अपमान करत आहात, फक्त तुम्हाला एका पक्षाला समर्थन द्यायचे म्हणून? ह्यालाच अंधभक्ती म्हणतात. प्रधानसेवक म्हणाले ना कालेपैसेवाले रांगेत उभे, ओढा मग त्यांची री. तुमचे कोणी मित्र, नातेवाईक, सख्खे उभेच असतील ना रांगेत, कोणाचे पैसे बदलले मग त्यांनी? मला अर्थशास्त्रातील ओ कि ठो कळत नाही, एवढे मोठे आकडे माझा पिनट ब्रेन प्रोसेस करू शकत नाही, पण भारतीय समाज व समाजशास्त्राचा थोडाबहुत अभ्यास आहे, त्यावरून इतके तरी कळते की 3 लाख कोटी म्हणजे फार मोठी रक्कम नाही 125 कोटीच्या देशात. 25 कोटी लोकांनी (म्हणजे कर्त्या पुरुषांनी, महिलांनी) निव्वळ 12000 प्रत्येकी भरले तरी 3 लाख कोटी होतात, इथं तर अख्खा देश सक्तीने उभा केला आहे, आणि मध्यमवर्गीयांच्या घरात रोख 5-25 हजार तर सहज मिळून जातात, इमर्जन्सी खर्चाला ठेवलेले, बायकांनी लपवून बचत केलेले. तुम्ही अशांना सरळ काळेपैसेवाल्यांचे, विरोधी पक्षाचे दलाल समजत आहात बंधो! थोडी तरी माणुसकी दाखवा जी तुम्ही इतरांना दाखवायला सांगत आहात. व्यवस्थेवर ताण का आला याचे उत्तर अजून तुम्हाला कळले नाही. जाऊद्या, तुमच्या लाडक्या नेत्यांना कळले नाही तर काय बोलायचे! तुम्हाला आश्चर्य वाटले ना मिठाच्या किमतीबद्दल झालेल्या गोंधळाबद्दल? जेव्हा गणपती दूध प्यायला तेव्हाही मला असेच आश्चर्य वाटले होते, तेव्हा ह्या समाज मनाच्या अभ्यासाचा किडा घुसला डोक्यात, आणि कळले कारण तेव्हाच, लिहितो सविस्तर येत्या धाग्यात. पब्लिक पॅनिक होतंच, होणारच, ते ध्यानात ठेवून प्लॅनिंग करावं लागतं, आपले आडाखे चुकले कि पब्लिकला ब्लेम करणे जबाबदारीपासून पळणे म्हटलं पाहिजे. दुसऱ्या भाषेत नाचता येईना अंगण वाकडे! उद्या चोर पकडायचे म्हणून प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशनात जाऊन आपले निरापराधित्व सिद्ध करायला लाईन लावा असे देशभक्तीची बालगुटी देऊन सांगितले जाईल काय अशी ह्या तुघलकी राज्यात भीती वाटायला लागलीये, समर्थक अगदी रामराज्य अवतरल्याच्या स्वप्नात रमतायत, थोडा आरसा दाखवला तर चरफडतात, हे तरी का असावे मग? असो, नवीन धाग्यावर चर्चा करू. 24 तारखेला! तेव्हापर्यंत 1000 पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेतच! करन्सी बॅन करूनही करन्सी युज चालू आहे, जबराट आहे सगळं!

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 11/15/2016 - 03:16

In reply to धाग्यावरून रजा घेतली आहे पण by संदीप डांगे

Permalink

काय बोलणार?

जे लिहीन त्याचा विपर्यास करायचा म्हणल्यावर काय बोलणार? कालाधनवाले कोणीपण असू शकतात ना? यात पक्षाचा काय संबंध? विरोधी पक्ष याचा विरोध करत आहेतच, कोणाच्या किती पैश्यांची रद्दी झाली हे आकडे बहुतेक कधीच जाहीर होणार नाहीत. मला खात्री आहे की यात भाजप, शिवसेनेपासून अगदी गल्लीतल्या सगळ्या पक्षांचे नेते असणार. बाकी अंधभक्तीबद्दल काय बोलायचे तुम्ही पण अंधविरोध करत आहातच. न्यूटनबाबांच्या ३ऱ्या नियमाप्रमाणे जेवढा विरोध तेवढी भक्ती असणारच. बाकी माझं पक्षाला समर्थन असण्यापेक्षा नोटा रद्द करण्याच्या या कृतीला समर्थन आहे हे नमूद करतो. कृतीला समर्थन असल्याने ती काँग्रेसने केलेली असो व भाजपने, समर्थन हे राहिलंच असतं. त्याचबरोबर नियोजनात आणि एकूण प्रक्रियेत त्रुटी आहेत आणि त्या असणारच हे पण मी आधीच मान्य केलं आहे. सांगण्याचं प्रयोजन हे की हे झीरो एररने राबवणे अशक्य आहे. याला कारण प्रक्रियेला विरोध करणारे लोक - ज्या रेफरन्स ने मी विरोधी पक्ष आणि कालाधनवाल्यांचा उल्लेख केला होता. बाकी लायनीतल्या सरसकट सगळ्या लोकांबद्दल ते काळे पैसे पांढरे करून घेतात असं मी कुठे म्हणालो? पेपरमध्ये पण येत आहेत की लोक त्यांच्याकडे काम करणारे, ओळखीचे लोक यांच्या खात्यात २.४९ लक्ष रुपये भरून पैसे नियमित करत आहेत. याचा अर्थ रांगेतला एकूण एक माणूस हे करतोय असा खचितच नाही. असो. बाकी १२५ करोड जनतेतील प्रत्येकाकडे (लहान मुले धरून) १२००० रुपये आहेत असं तुम्हाला म्हणायचं नसणार हे गृहीत धरतो. कारण याच १२५ करोड जनतेने ९ तारखेच्या आधीच्या ४ दिवसात किती रक्कम भरली याची तुलना केली पाहिजे. तुम्हाला फारसा त्रास झाला नाही असं तुम्ही याच धाग्यावर लिहिलंय तरी तुम्ही विरोध करताय हे मात्र नवल आहे. परत आणि उपाय मात्र सांगत नाही हे अजूनच नवल.

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/15/2016 - 10:56

In reply to काय बोलणार? by ट्रेड मार्क

Permalink

होस्टेलच्या लढ्याचा धागा

होस्टेलच्या लढ्याचा धागा वाचला का तुम्ही माझा? त्यात असाच प्रश्न विचारणारे आमचे रेक्टर होते, तुला त्रास होत नाही तर तू कशाला सही करतो? त्याची आठवण झाली. तेव्हा स्वतःला त्रास न होणारी पण इतरांच्या त्रासाविरुद्ध आवाज उठवण्यास मदत करणारी पोरं चुकली कि बरोबर ह्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला जे नवल वाटतंय त्याचं कारण सापडेल! बाकी निर्णयाला विरोध नाही हे पहिल्या दिवसापासून माझा स्टॅन्ड आहे, नियोजन बिघडलं आहे त्याबद्दल विरोध आहे हे आता किती वेळा सांगावं? आधी बाण मारून नंतर रिंगण काढणे सोपं असते, सध्या समर्थकांचे तेच चाललंय. मोदींनी सहा महिने घेतलं तरी नियोजन गडबडले, मला इथे चार दिवस वेळ नै देत बॉ तुम्ही! :)

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 11/15/2016 - 21:14

In reply to होस्टेलच्या लढ्याचा धागा by संदीप डांगे

Permalink

एक बेसिक फरक ध्यानात नाही घेतलात

होस्टेलच्या धाग्यावर तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी केलेली कृती सांगितली होती. जी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध होती पण त्या कृतीमुळे पीडित विद्यार्थ्यांना मदत झाली. आत्ताच्या प्रसंगात तुम्ही मिपावर आधी येऊन कसं नियोजन चुकलं हे सांगत आहात. तुम्ही कोणाला मदत केली, नाही केली हे काही तुम्ही सांगितलं नाही. गेलाबाजार तुमच्या स्थानिक ब्रँच मध्ये (हाय प्रोफाइल बँक सोडून) जिथे गर्दी किंवा अव्यस्थापन दिसतंय तिथे जाऊन आवाज उठवला का अथवा तिथे मदत केलीत का? तुम्ही केली असेलही पण ते इथे प्रतिसादांमध्ये कुठे दिसलं नाही त्यामुळे मला तरी समजलं नाही. परत इतक्या मिपाकरांनी विचारलं की मग सुयोग्य नियोजन काय आणि कसं करता आलं असतं तर त्यावर पण तुम्ही गेले ४ दिवस काही उत्तर दिलं नाही पण ठीक आहे अजून ४ काय ८ दिवस घ्या आणि सांगा तुमचा फुलप्रूफ प्लॅन काय आहे. तसं तर मोदींनी पण जाहीरपणे सांगितलंच की की थोडे दिवस त्रास होणार पण त्याचा दीर्घकालीन फायदा आहे त्यामुळे त्रास सहन करावा असं आवाहन केलं होतंच. गेली २.५ वर्ष विरोधकांचं पण हेच चाललंय की, काही बोललं की त्यातलं संदर्भ सोडून एखादं वाक्य किंवा शब्द घ्यायचा आणि वाटेल तसा अर्थ काढायचा, नाही बोललं तरी काही बोलत नाहीत म्हणून आरोप करायचा. कृती केली तरी खुसपटं काढायची आणि नाही केली तरी काही करत नाही म्हणून ओरडायचं. विदेश दौरे केले की एनआरआय पंतप्रधान म्हणायचं, नाही केले तरी तिथून बोलायचं. त्यामुळे चालायचंच दोन्ही बाजू तेवढ्याच हिरीरीने भांडणार.

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/16/2016 - 00:41

In reply to एक बेसिक फरक ध्यानात नाही घेतलात by ट्रेड मार्क

Permalink

इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला

इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला अडचण होत आहे, त्यामुळे पुढं प्रतिसाद देत नाही, इथेच थांबतो.

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 11/16/2016 - 00:56

In reply to इथे नवे प्रतिसाद ट्रॅक करायला by संदीप डांगे

Permalink

ओक्के

तुमच्या फुलप्रूफ आणि १२५ करोड पैकी एकाही व्यक्तीला त्रास होणार नाही अश्या नियोजनाच्या धाग्याची वाट पाहतो. तिथे चर्चा करू. बादवे धाग्याचे नियोजन तुम्ही केलंच असेल, तेवढी प्रकाशनाची तारीख द्या... वेळ नाही दिली तरी चालेल. रच्याकने: चर्चा इथेच केली असती तर हजारी धागा झाला असता...

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/16/2016 - 01:20

In reply to ओक्के by ट्रेड मार्क

Permalink

बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात

बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात ते का? मी काय करतो, केले, करणार ह्याच्या चौकशा कशाला? मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणे जमत नसले कि वैयक्तिक पातळीवर लोक येतात जी चर्चेची फार उत्तम पातळी नाही.

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 11/16/2016 - 01:46

In reply to बादवे, तुम्ही वैयक्तिक झालात by संदीप डांगे

Permalink

ऑ

मी कधी वैयक्तिक झालो? तुम्हीच म्हणालात की नियोजन कसं असावं याचा वेगळा धागा काढीन. मी तर फक्त त्याची प्रकाशनाची तारीख विचारली, जसं आपण पुढचा भाग कधी असं विचारतो, तसंच. यात एवढा राग येण्यासारखं काय आहे? बाकी तुम्ही काय कसं केंव्हा करणार याची काळजी आणि चौकशी मी कशाला करू? मला फक्त तुमच्या धाग्यातून नियोजन शिकायची अंमळ घाई झाली. त्याबद्दल क्षमस्व.
मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देणे जमत नसले कि वैयक्तिक पातळीवर लोक येतात
याला मात्र सहमत. फक्त हे मला कसं लागू होतंय हे कळलं नाही. तुमच्या मुद्द्यांची मी माझ्यापरीने मुद्देसूद उत्तरं दिली आहेत. मी व इतरांनी नियोजनाबद्दल अधिक विचारल्यावर मात्र तुमची चिडचिड झालेली दिसतेय. असो. चिडू नका आणि कोणावरही रागावू नका. हे दोन्ही चांगल्या नियोजनाला घातक आहे. तुमच्या नियोजनावरील धाग्यास शुभेच्छा.

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/16/2016 - 01:58

In reply to ऑ by ट्रेड मार्क

Permalink

वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही

वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही मला विचारलं आहे की तुमचं तर बँकेचं काम नीट झालंय, मग इतरांना मदत केली का इत्यादी इत्यादी, हे वैयक्तिक आहे. मी मांडलेल्या मुद्द्यांना प्रत्त्युत्तर देण्याऐवजी तुम्ही मी वैयक्तिक काय करतो, केले हे विचारलेत, तुम्ही बहुतेक तिकडे फारेनात आहात, तुमचंच लॉजिक वापरलं आणि तुम्हाला इथल्या ग्राउंड सिच्युएशन प्रत्यक्ष माहित नाही तरी हिरीरीने समर्थन करत आहात आणि उपदेश देत आहात त्याबद्दल मी तुम्हाला वैयक्तिक बोललो तर योग्य असणार नाही. तेच कोणीही माझ्याबाबतीत करू नये अशी माझी साधी अपेक्षा आहे. नियोजनाचा धागा ह्यावरून जी आपली टोमणेबाजी चालली आहे तीही संतुलन गमावल्याचे लक्षण आहे. शहाजोगपणा नाही केलात तर आनंद वाटेल. प्लिज आता म्हणू नका भलते अर्थ काढतोय ते, तुम्हाला चांगलं कळतंय मी काय म्हणतोय ते, इतकेही तुम्ही राहुल गांधी नाही. ;) असो, आता खरंच राम राम! धन्यवाद!

Submitted by ट्रेड मार्क on Wed, 11/16/2016 - 02:16

In reply to वरच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही by संदीप डांगे

Permalink

हे राम

तुम्ही हॉस्टेलमध्ये तुम्ही काय केलंत तो विषय काढलात म्हणून पुढचं सगळं आलं. उगाच मोदींना विरोधासाठी विरोध करून आणि काहीही केलं तरी कुठली ना कुठली चूक दाखवत राहून तुम्ही केजरीवालांच्या रांगेत बसणार नाही/ बसू नये असं मला वाटतंय. बाकी मी फक्त तारीख विचारली, टोमणेबाजी किंवा शहाजोगपणा काय त्यात? पण आता तुम्हाला वाटतंय तर वाटुदे. आता राम राम तर राम राम. शुभेच्छा तर आहेतच.

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/16/2016 - 16:10

In reply to हे राम by ट्रेड मार्क

Permalink

हॉस्टेलमधे मी काय केलं हे

हॉस्टेलमधे मी काय केलं हे तुम्हाला मी इथे कोनत्या प्रतिसादात सांगितलेलं दिसलं? तुम्हीच आता वाट्टेल ते अर्थ, नसले ते वाचत आहात राव. परत एकदा तो प्रतिसाद वाचा. मी संदर्भ दिला फक्त, मी काय केलं त्याची शेखी नाही मिरवली. आमच्या रेक्टरने मुलांना खोपच्यात घेऊन 'तुला काय त्रास होतो का, मग सही कशाला करतो' असे विचारले होते. त्याची आठवण झाल्याचे म्हटले. मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या, मुद्दे संपले की वैयक्तिक होऊ नका इतकच म्हणणं आहे. माझ्याबद्दल इतकी चिंता करत आहात हे वैयक्तिकच नाही का? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याची चिंता मी करत नाही, तीही मी करत बसलो तर मग तुम्ही काय करणार? =))

Submitted by चौकटराजा on Tue, 11/15/2016 - 21:47

In reply to होस्टेलच्या लढ्याचा धागा by संदीप डांगे

Permalink

जरा नियोजन बिघडणारच !

कारण या नियोजनात कुणाला सामील करून घ्यायचे? इथे १२० कोटी चोर रहातात. गुप्तता कधीच मेली असती. यावर मोदी बोलले देखील आहेत. लोकाना उधारी, काटकसर व संयम तिन्ही नको आहे. अशी जनता युद्ध परिस्थीती आली तर शत्रूला देखीला जाउन मिळायला कमी करणार नाही.

Submitted by हतोळकरांचा प्रसाद on Tue, 11/15/2016 - 08:13

In reply to धाग्यावरून रजा घेतली आहे पण by संदीप डांगे

Permalink

तुम्ही फक्त आणि फक्त

तुम्ही फक्त आणि फक्त विरोधासाठी विरोध करत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? याच पानावर खाली मृत्यूनजय यांनी एक प्रतिसाद लिहिला आहे (साभार) तो तुम्ही वाचला नसेल तर वाचावा. त्यात त्यांनी हा निर्णय सर्व तयारी करून कोणालाही त्रास न होता कसा घेतला जाऊ शकत नव्हता हे लिहिलं आहे. नवीन धाग्यावर, २४ तारखेनंतर, तुमच्या सविस्तर प्रतिसादात कुठेतरी त्यावर तुमचे मत ऐकायला मिळेल अशी अपेक्षा!

Submitted by सुबोध खरे on Mon, 11/14/2016 - 10:06

Permalink

काळा पैसे फक्त नोटांमध्ये

काळा पैसे फक्त नोटांमध्ये असतो इतरही अनेक मार्गानी लपवला जातो सरकारला हे कळत नाही का? सामान्य माणसांना त्रास द्यायची गरज काय असा उच्चरवा ने टाहो फोडणार्यांचे लक्ष मी बेनामी मालमत्तेबद्दल आताच पारित झालेल्या कायद्याकडे वेधू इच्छितो. http://www.prsindia.org/uploads/media/Benami/Benami%20Transactions%20Act,%202016.pdf भारत सरकार का असामान्य राजपत्र. extraordinary Gazzette of India मध्ये प्रसारित झालेले आहे. जाणकारांनी आणि जिज्ञासूंनी पाहून घ्यावे. सरकारने "रोकड नोटा" या एकाच मार्गावर बंदी आणली नसून बेनामी मालमत्ता हा सर्वात मोठा अवैध संपत्तीचा मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. श्री मोदींच्या कालच्या गोव्याच्या भाषणात याचे पडसाद उमटलेले आहेत हे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास लक्षात येईल. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ हि अतिशय काळजीपूर्वक निवडलेली होती. दिवाळी झाल्यामुळे सामान्य लोकांनी बोनसची रक्कम आपल्या दिवाळीच्या खरेदी साठी वापरलेली होती. हि रक्कम व्यापाऱ्यांच्या खिशात आहे पण बँकेत भरलेली नाही. ७ तारीख होऊन गेल्यामुळे लोकांचे पगार झालेले होते. तेंव्हा आपल्या सेवकवर्गाला पगार देण्यासाठी पैसे नाहीत हा आरडा ओरडा मालक वर्गाला करता आला नाही. बहुसंख्य लोकांच्या हातात रोख पैसे पगार झाल्यामुळे होता. दिवाळीची सुट्टीवरून लोक आणि बँकेचे कर्मचारीही परत आलेले होते. लग्न साराय साठी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जाण्याची शक्यता होती. दिवाळी नंतर स्थावर मालमत्तेची बरीच देवाणघेवाण रोखीच्या/ काळ्या पैशाच्या माध्यमातून होणार होती. अशा अतिशय काळजीपूर्वक निवडलेल्या वेळेत केलेल्या शल्यक्रियेमुळे बऱ्याच लोकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे. सामान्य माणसाला त्रास होतो आहेच परंतु त्यासाठी सामान्य माणसांनी कोठेही आंदोलने इ केलेली नाहीत. राजकारणी लोक अशी चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत असले तरीही सामान्य जनता अशा भूल थापांना अजून तरी बळी पडलेली नाही. त्यासाठी मी मिसळपाव वरील आपल्या मित्रांना विनंती करतो कि व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका.

Submitted by गणामास्तर on Mon, 11/14/2016 - 10:20

Permalink

मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी

मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी झाली आहे एवढी गोष्ट तर गेल्या चार पाच दिवसात लक्षात येत आहे. मला वेगळाचं प्रश्न पडलाय, ज्या लोकांना या निर्णयामुळे खूप त्रास,मनस्ताप सहन करावा लागत आहे ते बव्हंशी सामान्य लोक आहेत असे समजून चालले तर याच लोकांना इथे किंवा तत्सम सोशल मिडीयावर लगातार पोष्टी टाकायला वेळ कसा मिळतोय?

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/14/2016 - 10:28

In reply to मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी by गणामास्तर

Permalink

तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे

तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे हजार पाचशेच्या नोटा असतात काय या प्रश्नासारखा वाटतोय, ;)

Submitted by गणामास्तर on Mon, 11/14/2016 - 10:47

In reply to तुमचा प्रश्न गरीबाकडे कुठे by संदीप डांगे

Permalink

नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि

नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि काही पात्रे व्हाट्सअप आणि चेपू वर आपल्याला कसा त्रास होतोय हे दिवसातून पंधरा वीस पोष्टी टाकून सांगत आहेत.तो वेळ सत्कारणी लावून पैशाची व्यवस्था करावी ना?

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/14/2016 - 11:14

In reply to नाय ओ. .म्हणायचं एवढचं आहे कि by गणामास्तर

Permalink

पैशाची व्यवस्था कशी करावी?

पैशाची व्यवस्था कशी करावी? समजलं नाय बॉ,

Submitted by पैसा on Mon, 11/14/2016 - 10:32

Permalink

प्रेस रिलीज

कालचा प्रेस रिलीज http://finmin.nic.in/press_room/2016/MoF_reviewed_availability_distribution_Notes.pdf

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 11/14/2016 - 11:09

In reply to प्रेस रिलीज by पैसा

Permalink

पहिला पॉइंट अलार्मींग आहे

In the first four days ( from November 10th to 13th , upto 5 pm ) about Rs 3.0 lacs crores of old Rs.500/- and Rs.1000/- bank notes have been deposited in the banking system एकूण १३.६० लाख कोटी इतकं चलन ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटात आहे. त्यामुळे ५ लाख कोटी चलन बाद होईल हा अंदाज बरोबर वाटतो.

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 11/14/2016 - 10:59

Permalink

उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी

उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी लोकांकडे क्रेडिट, डेबिट कार्ड चा पर्याय आहे. सगळ्याच लोकांकडे चेकने व्यवहार करण्याचा किंवा उधारी उसनवारीचा व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. नोटा नाहीत म्हणून किंवा एखादा उपास घडला म्हणून कोणी उपाशी मरणार नाही. आणि एखादी व्यक्ती नोटांच्या अडचणी पायी थोडीशी सुद्धा अ‍ॅडजस्टमेंट करु शकत नसेल तर अशी भारभूत व्यक्ती मेली तर बरेच आहे. .

Submitted by सतिश गावडे on Mon, 11/14/2016 - 11:26

In reply to उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी by अप्पा जोगळेकर

Permalink

त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा

त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा त्यांना भारताबाहेर हाकलून देण्याचा सौम्य पर्याय निवडूया का आपण? ;)

Submitted by गणामास्तर on Mon, 11/14/2016 - 11:33

In reply to त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा by सतिश गावडे

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))

Submitted by इरसाल on Tue, 11/15/2016 - 16:59

In reply to त्यांच्या जीवावर उठण्यापेक्षा by सतिश गावडे

Permalink

णाही

हा सौम्य उपाय आम्हाला मान्य नाही. त्यापेक्षा यालाच एक्स्ट्रापोलेट करुन इसिस वगैरे कडे पाठवता येत असेल तर तसे पहावे, जायला ५००/१००० च्या नोटा मी देतो ;)

Submitted by मृत्युन्जय on Mon, 11/14/2016 - 11:44

In reply to उगाचच बाऊ केला जात आहे. शहरी by अप्पा जोगळेकर

Permalink

सरकारचे समर्थन करण्याच्या

सरकारचे समर्थन करण्याच्या नादात तुम्ही खुपच वाहवत गेलात काय? हा प्रतिसाद खुपच असंवेदनशील होता. रोज चारी ठाव जेवणार्‍या लोकांसाठी एखाद दिवस उपास करणे कदाचित फॅड किंवा जमवण्यासारखे असेल. रोज भाकरीवर गुजराण करणार्‍या लोकांना ती देखील खायला न मिळणे ही किती केविलवाणी गोष्ट असु शकेल याची तुम्हाला कल्पना आहे का? योजनेत त्रुटी आहेत (आणी त्या तश्या असणारच होत्या) आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे हे मान्य केलेच पाहिजे. ज्या लोकांसाठी हा त्रास जीवावर उठला आहे त्यांच्याबद्द्दल आपण किमान सहानुभूती बाळगुयात. आपण सगळे खुप वेल प्लेस्ड आहोत. आज पैसे नसले तरी १० लोकांना फोन करुन आपण काही सोय करु शकतो. सगळेच एवढे प्रिव्ह्लेज्ड नसतात . त्यामुळे अश्या लोकांना भारभूत म्हणुन त्यांच्या मरण्याची अपेक्षा व्यक्त करणे हे खुपच संवेदनाहीन होते आप्पा. असो.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 12
  • पान 13
  • पान 14
  • पान 15
  • पान 16
  • पान 17
  • पान 18
  • पान 19
  • पान 20
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com