आजपासून शारदीय नवरात्राला सुरूवात होत आहे. घरोघरी घट बसले असतील. आदिशक्तीची आराधना वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. नवरात्रीचा उत्सव हा आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. कोमल आणि कणखर अशा स्त्रीत्वाच्या दोन टोकांचा उत्सव आहे. नवरात्रात देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. असंही म्हणता येईल की ही नऊ रुपे म्हणजे नऊ वेगवेगळी क्षेत्रे, वेगवेगळी क्षितीजे! आज साहित्य, कला, शास्त्र, खेळ, राजकारण, समाजकारण आदि सर्वच क्षेत्रातला स्त्रियांचा सहभाग नुसताच उल्लेखनीय नाही तर त्या त्या क्षेत्रातले एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रमही अनेक सौदामिनी करत आहेत. अशा व्यक्तिंना कुसुमाग्रज 'प्रकाशाची बेटे' म्हणतात. गार्गी, मैत्रेयीपासून सुरू झालेल्या ह्या परंपरेत जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रायबाघन सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर अशा अनेक स्त्रियांनी इतिहासात सोन्याचे पान लिहिले आहे. इंदिरा गांधी, दुर्गाबाई भागवत, मृणाल गोरे, डॉ. आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, सुधा मूर्ती, डॉ.मंदा आमटे, पी.टी..उषा, सायना नेहवाल ते अगदी आत्ताच्या ऑलिंपिक्समध्ये भारताला जगाच्या नकाशावर पाऊल ठेवू देणार्या साक्षी, सिंधुसारख्यांपर्यंत.. यादी न संपणारी आहे. भारताबाहेरही अशा अनेक जणी आहेत की ज्यांची दखल सार्या जगाला घ्यावी लागलीच आहे. क्लिओपात्रा, मार्गारेट थॅचर, मादाम क्यूरी, फ्लोरेन्स नाइटिंगेल, सिरिमाओ बंदारनायके.. अक्षरशः अशा कर्तृत्ववान स्त्रिया अमोज आहेत. कित्येकजणींची फक्त नावे आपल्याला माहित असतात तर कितीतरी जणींचे असामान्य कर्तृत्व काळाच्या पडद्याआड दडून जाते. आदिशक्तीची आराधना करताना कोणी उपास करतात तर कोणी स्त्रीसूक्ताचे पठण करतात. गेली काही वर्षे जिद्दीने स्वतःला सिध्द करणार्या,स्वतःबरोबर समाजाला पुढे नेणार्या, आपल्या असामान्य कर्तृत्वाने देशाचे,जगाचे राजकारण, अर्थकारण बदलणार्या व्यक्तिमत्वांची माहिती, चरित्रे मी वाचते. आंतरजालामुळे '.तिळा दार उघड..' म्हटलं की..माहितीचा खजिनाच समोर येतो. त्याच खजिन्यातले हे काही माणिक,मोती! आधुनिक युगातल्या अशा काही परिचित/अपरिचित असामान्य दुर्गा, काली, लक्ष्मी, सरस्वती, अंबा यांच्या बुध्दिमत्तेची, कलाकौशल्याची, अफाट कर्तृत्वाची, स्त्रीशक्तीची ही अक्षरपूजा!
प्रतिक्रिया
1 Oct 2016 - 12:08 am | रेवती
सुरुवात आवडली.
1 Oct 2016 - 12:18 am | पद्मावति
वाह! खूप छान.
1 Oct 2016 - 6:15 am | रुपी
वा! मस्तच.
1 Oct 2016 - 6:38 am | शरद
वरील छायाचित्रातील किती "प्रसिद्ध" भगिनींना आपण ओळखू शकता ? प्रतिसादात आकडा द्या
विजेतीला/विजेत्याला "अनाहिता" तर्फे नवरात्रीत एक नारळ मिळेल.
शरद.
1 Oct 2016 - 6:57 am | यशोधरा
उपनिषदांवर लिहिणारे तुम्हीच का ते पाहून आले. असो.
तुम्ही किती नारळ जमावताय पाहू.
1 Oct 2016 - 8:56 am | पिलीयन रायडर
ओळख होणे हाच उद्देश आहे ना काका..
आणि पुरुषांनी सुद्धा ओळखलं ह्यांना तरी काही हरकत नाही. त्यामुळे नारळ द्यायचाच असेल तर स्पर्धा सगळ्यांसाठीच घ्या की!
2 Oct 2016 - 11:27 am | आदूबाळ
विजेत्याला एक नारळ मिळणार आहे का दरडोई एक नारळ? ;)
- छिद्रान्वेषक, 27 कफ परेड
4 Oct 2016 - 6:59 pm | असंका
________/\_________
4 Oct 2016 - 7:17 pm | मारवा
२७ कफ परेड कुठल्या महापुरुषाचा अॅड्रेस आहे ?
1 Oct 2016 - 6:55 am | यशोधरा
छान लिहिले आहे स्वाती ताई, आवडले.
1 Oct 2016 - 8:52 am | एस
क्रमश: आहे का? सुरुवात आवडली.
1 Oct 2016 - 8:58 am | पिलीयन रायडर
कल्पना आवडली! नक्कीच आवडेल अशी लेखमाला वाचायला!
1 Oct 2016 - 11:39 am | पूर्वाविवेक
स्वाती ताई, छान लिहिले. स्तुत्य उपक्रम.
1 Oct 2016 - 11:54 am | स्वाती दिनेश
@ शरद, प्रसिध्द आणि कर्तूत्ववान हे दोन वेगळे शब्द आहेत ना.. परिचित/अपरिचित असामान्य कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख हा माझ्या लेखमालेचा उद्देश आहे.
स्वाती
2 Oct 2016 - 7:39 am | शरद
सर्वश्री. यशोधरा, पिलियन रायडर, स्वाती, मुलींनो, तुमचा गैरसमज झालेला दिसतो. लेख वाचल्यावर मी जवळजवळ अर्धा तास कागद-पेन घेवून बसलो व मला निम्मी चित्रेही ओळखता आली नाहीत वयाचा परिणाम ? शक्य आहे. प्रतिसाद देण्याचा उद्देश हा की माझे सोडा, पण किती मिपाकरांना या
कर्तृत्ववान स्त्रीयांची ओळख पटते ते पहावे. नारळ माझ्या बागेतलेच द्यावयाचे आहेत. किती का लागेनात. आता प्रश्न असा की (माझ्यासारखे निरुद्योगी सोडून) किती जणींनी(जणांनी) ही छायाचित्रे आहेत तरी किती ? हे पाहिले आहे. असो. अजून आठ दिवस (खरे म्हणजे रात्री) आहेत. मिळवा जास्तीत जास्त नारळ
दीपशिखा १,२ यांची ओळख छानच आहे.
शरद
.
1 Oct 2016 - 11:56 am | गिरिजा देशपांडे
छान लिहिलेय स्वातीताई, लेखमाला असेल तर अजूनच छान!!!!!!!
1 Oct 2016 - 3:16 pm | नीलमोहर
स्तुत्य उपक्रम, दीपशिखा नावही साजेसे.
2 Oct 2016 - 8:30 am | मोदक
सुंदर सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत
2 Oct 2016 - 8:30 am | मोदक
सुंदर सुरुवात, पुढील भागांच्या प्रतिक्षेत
2 Oct 2016 - 9:51 am | पैसा
सुरेख उपक्रम! वाचायच्या तयारीत आहे.
2 Oct 2016 - 11:28 am | आदूबाळ
एक नंबर आहे कल्पना. शुभेच्छा आणि धन्यवाद!
5 Oct 2016 - 10:40 pm | अनन्न्या
वाचायला आवडेल!
16 Oct 2016 - 7:46 pm | त्रिवेणी
आता हा पहिला भाग वाचला.
आता वाचते रोज.