रंजीश हि सही

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
25 Aug 2016 - 5:39 pm

तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा.
जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते.

अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा. त्यांची लिखाणाची भाषा अत्यंत साधी असली तरी त्यांनी हुकूमशाहा आणि हुकूमशाहीला नेहमी विरोध केला होता. त्याकाळी जनरल झिया ना विरोध केल्यामुळे त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण काही काळासाठी निर्वासित सुद्धा व्हाव लागलं होतं.

रंजीश हि सही हि फराज साहेबांची अत्यंत सुप्रसिद्ध रचना. अनेकांनी हि गझल गायली आहे पण, 'मेहंदी हसन' साहेबांच्या आवाजात ऐकणे म्हणजे सुभानल्लाह.... एकदम स्वर्गीय अनुभव असतो.
खुद्द फराज या बद्दल म्हणाले होते, मेहदी साहब ने इस ग़ज़ल को इतनी अच्छी तरह गाया है कि यह उनकी ही ग़ज़ल हो चुकी है.. रंजीश, त्यांनी एक मुलीसाठी लिहिली होती, पण जिच्यासाठी लिहिली होती तिच्याशी फराज यांची नंतर भेट झाली नाही.

नव्वदच्या दशकात ते दिल्लीत आले असतांना टाईम्स ऑफ इंडिया ने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांना प्रश्न विचारला गेला, 'शायरी स्वतः अनुभवल्याशिवाय लिहिली जाऊ शकते का' ???
तेव्हा फराज म्हणाले, "नही, सच्ची शायरी तभी निकलती है जब दिल कि हदो से कोई बात महसूस कि जा सके" !!!

पण अहमद फराज जास्त प्रसिद्ध होते ते त्यांच्या सोप्या आणि सुटसुटीत शेरांसाठी...
जसे

उसने मुझे छोड़ दिया तो क्या हुआ फ़राज़,
मैंने भी तो छोड़ा था सारा ज़माना उसके लिए

उम्मीद वो रखे न किसी और से फ़राज़
हर शख्स मुहब्बत नहीं करता उसे कहना

अब तिरा ज़िक्र भी शायद ही ग़ज़ल में आए
और से और हुए दर्द के उनवाँ जानाँ

अब ज़मीं पर कोई गौतम न मोहम्मद न मसीह
आसमानों से नए लोग उतारे जाएँ

दोस्ती अपनी भी असर रखती है फ़राज़
बहुत याद आएँगे ज़रा भूल कर तो देखो

आज अहमद फराज साहेबांची पुण्यतिथी त्यांना विनम्र श्रद्धांजली.

संस्कृतीकलागझलभाषासाहित्यिकआस्वादलेख

प्रतिक्रिया

धन्यवाद ह्या धाग्याबद्दल.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 5:55 pm | संदीप डांगे

वाह,

फराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली आणि त्यांच्या गजलांसाठी माझ्यातर्फे दोन ओळी,
इतने हसीन जुल्म न कर फराज, हमें भी जीने का मौका दे.
दर्दभरी इस दुनियामें, तेरी शायरी की महक हमें चौंका न दे.

मंदारराव, लिहित जा हो नियमितपणे, आम्हालाही काहीबाही खरडायला चानस भेटतो मंग..

महासंग्राम's picture

25 Aug 2016 - 6:44 pm | महासंग्राम

नक्कीच दादा ...

मोदक's picture

25 Aug 2016 - 6:07 pm | मोदक

वाह.. अजून येवूद्या..!!

सानझरी's picture

25 Aug 2016 - 6:15 pm | सानझरी

हि माझ्या आवडत्या गजलांपैकी एक..

सिलसिले तोड़ गया वो सभी जाते जाते
वरना इतने तो मरासिम थे के आते जाते
(मरासिम - नातं)

शिकवा-ए-ज़ुल्मत-ए-शब् से तो कहीं बेहतर था
अपने हिस्से की कोई शम्मा जलाते जाते
(ज़ुल्मत - अंधकार)

कितना आसान था तेरे हिज्र में मरना जाना
फिर भी इक उमर लगी जान से जाते जाते
(हिज्र - विरह)

जशन-ए-मकतल ही न बरपा हुआ वर्ना हम भी
पा-बजोलान ही सही नाचते गाते जाते
(मकतल - ठार मारण्याची जागा, बरपा - सुरूवात, पा - पाय, बजोलान - साखळदंडाने बांधलेले)

उसकी वो जाने उसे पास-ए-वफ़ा था के न था
तुम "फ़राज़" अपनी तरफ़ से तोह निभाते जाते

- अहमद फराज

बाबा योगिराज's picture

25 Aug 2016 - 6:44 pm | बाबा योगिराज

सानझरीजी,
वल्लाह है यह.

सानझरी's picture

26 Aug 2016 - 10:14 am | सानझरी

धन्यवाद. हि आणखी एक गज़ल

अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें

तू खुदा है, न मेरा इश्क़ फ़रिश्तों जैसा
दोनों इंसां हैं तो क्यों इतने हिजाबों१ में मिले

ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो
नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें

ढूँढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये ख़जा़ने तुझे मुमकिन है ख़राबों२ में मिलें

आज हम दार पे खेंचे गए जिन बातों पर
क्या अजब कल वो ज़माने को निसाबों३ में मिलें

---------------------
१ पर्दों २. खंडहर ३. पाठ्यक्रम

एस.योगी's picture

27 Aug 2016 - 4:06 pm | एस.योगी

कितना आसान था तेरे हिज्र में मरना जाना
फिर भी इक उमर लगी जान से जाते जाते

कपिलमुनी's picture

25 Aug 2016 - 6:16 pm | कपिलमुनी

वाह !!

बाबा योगिराज's picture

25 Aug 2016 - 6:43 pm | बाबा योगिराज

मस्तच, वाह, सुंदर, क्या बात.

महासंग्राम's picture

25 Aug 2016 - 7:10 pm | महासंग्राम

मेहंदी हसन

Papon

रंजीश मेहंदी हसन आणि पापोन च्या आवाजात

भ ट क्या खे ड वा ला's picture

25 Aug 2016 - 8:14 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्त लिहिलंय . रंजिश हे सही .... मेहदिच्या आवाजात ऐकणे हा एक जालीम उपाय आहे,

शिददत ए तिशनगी में भी ग़ैरत ए मयकशी रही
उसने जो फेर ली नज़र मैंने भी जाम रख दिया
और कितनी मोहब्बते तुझ को चाहिए फ़राज़
माँ ओ ने तेरे नाम पे बच्चों का नाम रख दिया

झेन's picture

25 Aug 2016 - 9:32 pm | झेन

नेमका अर्थ माहीत नसेल तर पूरा लूत्फ नही आता.

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 9:37 pm | संदीप डांगे

तिशनगी = तृष्णा

लूत्फ = लुफ्त़

झेन's picture

25 Aug 2016 - 9:49 pm | झेन

धन्यवाद डांगे सर.
रंजीश हि सही, अनेक स्त्री पुरुषांच्या आवाजात ऐकले आहे पण मेहंदी हसनच्या आवजात एेकणे म्हणजे पर्वणी. पपूनच्या आवाजातले अपील होत नाही कारण शब्दांचे उच्चार आणि काही वाद्यांची सुरावट मूळ रचनेवरती अत्याचार करतात असे वाटते.

चिनार's picture

26 Aug 2016 - 10:45 am | चिनार

उत्तम लेख....

रंजीश म्हणजे अजरामर गझल आहे. फराज यांनी लिहिलेले शेर खाली दिले आहेत.

रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ,
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ....

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो,
रस्मो - ए - राहे दुनिया ही निभाने के लिये आ...

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम,
तु मुझसे खफा है तो झमाने के लिये आ...

कुछ तो मेरे पिंडार-ए-मुहब्बत का भरम रख,
तु भी तो कभी मुझको मनाने के लिये आ...

एक उम्र से हुं लझ्झत-ए-गिरिया से भी महरूम,
अय राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ...

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ

अब तक दिल-ए-ख़ुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिये आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त\-ए\-गिरिया से भी महरूम
ऐ राहत\-ए\-जाँ मुझको रुलाने के लिये आ

काही उत्साही शायर लोकांनी या गझलेसाठी आणखी शेर लिहिले आहेत. असे जवळ पास 30 शेर आहेत. कोणाजवळ असतील तर कृपया टंकवावे. मला माहिती असलेला एक खालीलप्रमाणे

माना के तुम्हे पिने के आदत ही नाही वाईज...
मयखाने की रौनक ही बढाने के लिये आ.......

वेल्लाभट's picture

26 Aug 2016 - 10:46 am | वेल्लाभट

रंजीश, त्यांनी एक मुलीसाठी लिहिली होती, पण जिच्यासाठी लिहिली होती तिच्याशी फराज यांची नंतर भेट झाली नाही.

हे वाक्य माझ्या मते चूक आहे. रंजिश ही सही ही ग़ज़ल भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली असून तिचा संदर्भ ताटातूट झालेल्या दोन राष्ट्रांच्या, त्यांच्यातील लोकांच्या भावनेचा आहे. परंतु ते प्रेमकाव्य म्हणूनच लोकप्रिय झालेलं असल्याने त्याचा 'हा' अर्थ कुणाला सहसा ठाऊक नसतो.

महासंग्राम's picture

26 Aug 2016 - 12:23 pm | महासंग्राम

हि गझल एका मुलींसाठी लिहिली होती हे स्वतः फराज साहेबांनी एका मुलाखती मध्ये सांगितलं होतं. त्यामुळे हि प्रेम गझलच आहे .

कैच्या कै हो वेल्लाभट भाऊ..एखादा शेर त्या अर्थाने असेलही. पण हे प्रेमकाव्यच आहे..

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ

हा शेर काय सिंधू नदी साठी लिहिलाय का ??

वेल्लाभट's picture

26 Aug 2016 - 10:59 am | वेल्लाभट

नका मानू. मला काय.

चिनार's picture

26 Aug 2016 - 11:51 am | चिनार

कृ.ह.घ्या.

सुंदर धागा. धन्यवाद.

रंजीश तर आवडत्या गजलांपैकी एक...आज का दिन मुलायम कर गया ये धागा, बहुत काम धागे आज-कल सुहाने लागते है...

पद्मावति's picture

26 Aug 2016 - 3:00 pm | पद्मावति

सुंदर धागा.

उल्का's picture

26 Aug 2016 - 5:07 pm | उल्का

वाह वाह!
मस्त धागा.

जयन्त बा शिम्पि's picture

27 Aug 2016 - 2:54 am | जयन्त बा शिम्पि

मेहंदी हसन यांची ही आणखी एक गझल , ऐकावयाला अतिशय सुमधुर आहे , अर्थ ही मनाला भिडणारा आहे.
बुलबुल ने गुल से, गुल ने बहारों से कह दिया
इक चौदहवी के चाँद ने तारों से कह दिया

दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं
इक दिलरुबा है दिल में जो हूरों से कम नहीं

भूले से मुस्कराओ तो मोती बरस पड़ें
पलकें उठा के देखो तो कलियाँ भी हँस पड़ें
ख़ुश्बू तुम्हारी ज़ुल्फ़ की फुलों से कम नहीं

तुम बादशाह-ए-हुस्न हो हुस्न-ए-जहान हो
जान-ए-वफ़ा हो और मुहब्बत की शान हो
जलवे तुम्हारे हुस्न के तारों से कम नहीं

क्षमस्व's picture

27 Aug 2016 - 8:33 am | क्षमस्व

खूप छान!!!

अजया's picture

27 Aug 2016 - 2:52 pm | अजया

मस्त धागा.
आवडती गझल, फराजचे शेर आणि मेहंदी हसनचा मखमली आवाज.आत्ताच परत ऐकलं.दिन बन गया!