प्रतिभेचा सन्मान..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 Jan 2009 - 1:12 am

हृदयनाथ मंगेशकर!

मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार!

त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!

(हृदयनाथप्रेमी) तात्या.

संगीतसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनबातमी

प्रतिक्रिया

चकली's picture

26 Jan 2009 - 1:29 am | चकली

हृदयनाथ मंगेशकरांचे अभिनंदन!

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

26 Jan 2009 - 1:33 am | प्राजु

हृदयनाथ मंगेशकर- सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर - शांता शेळके..
यांची इतकी गाणी मनांत रूंजी घालतात की, धन्य ते संगित, धन्य ती लेखणी, आणि धन्य ते गायक्-गायिका.
पंडीतजींचे अभिनंदन.
नतमस्तक..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

26 Jan 2009 - 1:35 am | विकास

ही बातमी ऐकून आनंद झाला!

अभिनंदन!

चित्रा's picture

26 Jan 2009 - 10:01 am | चित्रा

हृदयनाथांची गाणी म्हणजे एक वेगळेच रसायन आहे. कितीही वेळा ऐकली तरी कायम नवीन वाटणारी अशी त्यांची गाणी आहेत.

या निमित्ताने तात्यांनी हृदयनाथांच्या गाण्यांचे रसग्रहण करावे अशी विनंती करते.

मुक्तसुनीत's picture

26 Jan 2009 - 10:18 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम , या आनंदात अगदी हजार हिश्शांनी सामील आहे हे नमूद करतो. "धाकट्या मंगेशकरांचे गाणे किती आवडते ?" या प्रश्नाचे उत्तर इतकेच देता येईल : एक काळ असा होता की "भावसरगम" चे ५० कार्यक्रम मी ऐकले होते. त्यांची सर्व नवी , जुनी गाणी जमतील तितकी मिळवून ऐकली होती. आणि हो , ज्याला प्रमाद म्हणता येईल अशी एक गोष्ट : भावसरगम मधल्या काही दुर्मिळ चीजा आम्ही वेड्या लोकांनी , पॉकेट टेपरेकॉर्डरवर टेप केल्या होत्या ! या टेप्स्च्या एम्पी३ज आजही हजारो मैलांवर , इतक्या वर्षांनी कधीतरी गाडीत लागतात. अंगावरची वर्षे गळून पडल्यासारखे होते. ...

मात्र इतक्या वर्षांनंतर , आताशा "पद्मश्री" मिळाल्यानंतर आमच्यासारख्या माणसांना "टू लिट्ल् , टू लेट !" अशी भावना झाली असेल तर नवल ते काय ?
अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाचह वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी. असो.

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 10:22 am | विसोबा खेचर

अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाचह वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी. असो.

दोघांची क्षेत्रे वेगळी आहेत. अक्षयकुमार हा माणूस मला नट म्हणून खूप आवडतो! :)

असो..

आपला,
(अक्षयकुमारप्रेमी) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2009 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाच वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी.

अक्षय कुमार, ऐश्वर्या राय ह्यांनाही पद्मश्री?

'पद्मश्रीचे महत्व पातळ झाले' अशीच भावना झाळी.

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:02 am | दशानन

हेच म्हणतो !

* अक्षयकुमार ने कुठला देशभक्तीपर - देश भक्तीची जाणीव युवकांमध्ये वाढावी असा चित्रपट केला आहे... कोणाला माहीत आहे काय रे :?
चार-पाच लफडी व दोन-तीन उत्तम चित्रपट - व शेकडो टुक्कार पिच्चर सोडून ह्याचे काही सामाजिक देणं घेणं आहे का ? मला माहीत नाही म्हणून हा प्रश्न !

जेथे स्टार वापरला आहे तेथे कुठल्याही हिरोचे नाव घाला ... सगळे एकाच माळेचे मणी !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

आपला अभिजित's picture

26 Jan 2009 - 10:32 am | आपला अभिजित

सन्मान हे अनेकदा प्रादेशिक अस्मिता, दबावाचे राजकारण, या निकषांवर दिले जातात. यंदा कुमार शानूलाही पद्मश्री मिळाली आहे.

वाजपेयी पंतप्रधान असताना पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी त्यांच्या कविता गायल्या होत्या. पुढच्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळाली.

अक्षयकुमार, ऐश्वर्या राय, कुमार शानू, यांच्या तुलनेत ह्रुदयनाथ मंगेशकरांना तर `भारतरत्न'च मिळायला हवे.

बाय द वे,
लताबाईंना `भारतरत्न' आणि आशाबाईंना `पद्मविभूषण' हा भेदही मला झेपला नाही. का? `ऐ मेरे वतन के लोगों'वर नेहरू रडले होते म्हणून?

कोलबेर's picture

26 Jan 2009 - 10:56 am | कोलबेर

अरारा.. शानूलापण पद्मश्री??

ह्या बातमीतली सगळी हवाच गेली राव...

सर्किट's picture

27 Jan 2009 - 1:01 am | सर्किट (not verified)

प्रकाटाआ.

भडकमकर मास्तर's picture

26 Jan 2009 - 4:21 pm | भडकमकर मास्तर

पुढल्या वर्षी अब्बास मस्तान,सेलिना जेटली,विदिशा पावटे यांना देणार आहेत म्हणे पद्मश्री...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन's picture

26 Jan 2009 - 11:04 am | दशानन

या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!

हेच म्हणतो !

अभिनंदन !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2009 - 11:05 am | अविनाशकुलकर्णी

'पद्मश्री' चा सन्मा़न झाला....
अविनाश........मंगेशकर भक्त.

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 11:49 am | नितिन थत्ते

इतकी वर्षे पद्मश्री मिळाली नव्हती हे ऐकून धक्काच बसला होता. त्यातही पद्मजा फेणाणी नंतर ७ - ८ वर्षांनी हृदयनाथांना पद्मश्री म्हणजे काहीतरीच.

एनीवे. त्यांचे मोठेपण पद्मश्रीवर थोडेच अवलंबून आहे?

रेझर रेमॉन's picture

26 Jan 2009 - 3:18 pm | रेझर रेमॉन

आधी फक्त गाणी ऐकली. संगीत कोणाचे वगॅरे कळत नसताना गाण्यांच्या टेपा झिजवल्या... नंतर संगीतकार समजायला लागला. मराठीत जो एक सुवर्णकाळ झाला ( ज्याच्या जीवावर आजही उदंड वृंद आणि गायक म्हणून माध्यमांवर झळकणारे जगताहेत) त्या काळचा सरताज म्हणून पंडितजींचे नांव. कुठून एक-एक चीजा आणतात आपल्याला पत्ताच नाही... पण एक रचना भावली म्हणून दाद द्यावी तर दुसरी रचना गहजब ढानेवाली! आपण दाद किती ठिकाणी द्यायची? मानेला पट्टा लावायची वेळ यायची... मोजकंच गायले तेव्हा ही वेडं केलं....
लक्ष- लक्ष प्रणाम.. आपण नतमस्तक...
खंत एकच... प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून सार्‍या भारताला वेड लावेल एवढा खजिना राखून असताना ते झाले नाही... मनस्वीपणा, का तटस्थ, स्थितप्रज्ञ वृत्ति... जे असेल ते...
-रेझर रेमॉन