Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Mon, 01/26/2009 - 01:12
  • Log in or register to post comments
  • 7041 views

प्रतिक्रिया

Submitted by चकली on Mon, 01/26/2009 - 01:29

Permalink

मन:पूर्वक अभिनंदन

हृदयनाथ मंगेशकरांचे अभिनंदन! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 01/26/2009 - 01:33

Permalink

हेच म्हणते..

हृदयनाथ मंगेशकर- सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर - शांता शेळके.. यांची इतकी गाणी मनांत रूंजी घालतात की, धन्य ते संगित, धन्य ती लेखणी, आणि धन्य ते गायक्-गायिका. पंडीतजींचे अभिनंदन. नतमस्तक.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 01/26/2009 - 01:35

Permalink

अभिनंदन!

ही बातमी ऐकून आनंद झाला! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Mon, 01/26/2009 - 10:01

Permalink

असेच

हृदयनाथांची गाणी म्हणजे एक वेगळेच रसायन आहे. कितीही वेळा ऐकली तरी कायम नवीन वाटणारी अशी त्यांची गाणी आहेत. या निमित्ताने तात्यांनी हृदयनाथांच्या गाण्यांचे रसग्रहण करावे अशी विनंती करते.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Mon, 01/26/2009 - 10:18

Permalink

प्रतिक्रिया

सर्वप्रथम , या आनंदात अगदी हजार हिश्शांनी सामील आहे हे नमूद करतो. "धाकट्या मंगेशकरांचे गाणे किती आवडते ?" या प्रश्नाचे उत्तर इतकेच देता येईल : एक काळ असा होता की "भावसरगम" चे ५० कार्यक्रम मी ऐकले होते. त्यांची सर्व नवी , जुनी गाणी जमतील तितकी मिळवून ऐकली होती. आणि हो , ज्याला प्रमाद म्हणता येईल अशी एक गोष्ट : भावसरगम मधल्या काही दुर्मिळ चीजा आम्ही वेड्या लोकांनी , पॉकेट टेपरेकॉर्डरवर टेप केल्या होत्या ! या टेप्स्च्या एम्पी३ज आजही हजारो मैलांवर , इतक्या वर्षांनी कधीतरी गाडीत लागतात. अंगावरची वर्षे गळून पडल्यासारखे होते. ... मात्र इतक्या वर्षांनंतर , आताशा "पद्मश्री" मिळाल्यानंतर आमच्यासारख्या माणसांना "टू लिट्ल् , टू लेट !" अशी भावना झाली असेल तर नवल ते काय ? अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाचह वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 01/26/2009 - 10:22

In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत

Permalink

अक्षय

अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाचह वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी. असो. दोघांची क्षेत्रे वेगळी आहेत. अक्षयकुमार हा माणूस मला नट म्हणून खूप आवडतो! :) असो.. आपला, (अक्षयकुमारप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 01/26/2009 - 10:28

In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत

Permalink

मुक्तसुनित ह्यांच्याशी सहमत....

अक्षय कुमार आणि हृदयनाथ यांना एकाच वेळी पद्मश्री , यातली विसंगती न लपण्यासारखी. अक्षय कुमार, ऐश्वर्या राय ह्यांनाही पद्मश्री? 'पद्मश्रीचे महत्व पातळ झाले' अशीच भावना झाळी.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 01/26/2009 - 11:02

In reply to मुक्तसुनित ह्यांच्याशी सहमत.... by प्रभाकर पेठकर

Permalink

हेच म्हणतो

हेच म्हणतो ! * अक्षयकुमार ने कुठला देशभक्तीपर - देश भक्तीची जाणीव युवकांमध्ये वाढावी असा चित्रपट केला आहे... कोणाला माहीत आहे काय रे :? चार-पाच लफडी व दोन-तीन उत्तम चित्रपट - व शेकडो टुक्कार पिच्चर सोडून ह्याचे काही सामाजिक देणं घेणं आहे का ? मला माहीत नाही म्हणून हा प्रश्न ! जेथे स्टार वापरला आहे तेथे कुठल्याही हिरोचे नाव घाला ... सगळे एकाच माळेचे मणी ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Mon, 01/26/2009 - 10:32

Permalink

पद्म

सन्मान हे अनेकदा प्रादेशिक अस्मिता, दबावाचे राजकारण, या निकषांवर दिले जातात. यंदा कुमार शानूलाही पद्मश्री मिळाली आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी त्यांच्या कविता गायल्या होत्या. पुढच्या वर्षी त्यांना पद्मश्री मिळाली. अक्षयकुमार, ऐश्वर्या राय, कुमार शानू, यांच्या तुलनेत ह्रुदयनाथ मंगेशकरांना तर `भारतरत्न'च मिळायला हवे. बाय द वे, लताबाईंना `भारतरत्न' आणि आशाबाईंना `पद्मविभूषण' हा भेदही मला झेपला नाही. का? `ऐ मेरे वतन के लोगों'वर नेहरू रडले होते म्हणून?
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Mon, 01/26/2009 - 10:56

In reply to पद्म by आपला अभिजित

Permalink

हं

अरारा.. शानूलापण पद्मश्री?? ह्या बातमीतली सगळी हवाच गेली राव...
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 01/27/2009 - 01:01

In reply to हं by कोलबेर

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 01/26/2009 - 16:21

In reply to पद्म by आपला अभिजित

Permalink

पुढल्या

पुढल्या वर्षी अब्बास मस्तान,सेलिना जेटली,विदिशा पावटे यांना देणार आहेत म्हणे पद्मश्री... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 01/26/2009 - 11:04

Permalink

या अनवट

या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! हेच म्हणतो ! अभिनंदन ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 01/26/2009 - 11:05

Permalink

'पद्मश्री'

'पद्मश्री' चा सन्मा़न झाला.... अविनाश........मंगेशकर भक्त.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 01/26/2009 - 11:49

Permalink

पद्मश्रीचाच सन्मान

इतकी वर्षे पद्मश्री मिळाली नव्हती हे ऐकून धक्काच बसला होता. त्यातही पद्मजा फेणाणी नंतर ७ - ८ वर्षांनी हृदयनाथांना पद्मश्री म्हणजे काहीतरीच. एनीवे. त्यांचे मोठेपण पद्मश्रीवर थोडेच अवलंबून आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by रेझर रेमॉन on Mon, 01/26/2009 - 15:18

Permalink

हृदयनाथ आपल्या हृदयात.

आधी फक्त गाणी ऐकली. संगीत कोणाचे वगॅरे कळत नसताना गाण्यांच्या टेपा झिजवल्या... नंतर संगीतकार समजायला लागला. मराठीत जो एक सुवर्णकाळ झाला ( ज्याच्या जीवावर आजही उदंड वृंद आणि गायक म्हणून माध्यमांवर झळकणारे जगताहेत) त्या काळचा सरताज म्हणून पंडितजींचे नांव. कुठून एक-एक चीजा आणतात आपल्याला पत्ताच नाही... पण एक रचना भावली म्हणून दाद द्यावी तर दुसरी रचना गहजब ढानेवाली! आपण दाद किती ठिकाणी द्यायची? मानेला पट्टा लावायची वेळ यायची... मोजकंच गायले तेव्हा ही वेडं केलं.... लक्ष- लक्ष प्रणाम.. आपण नतमस्तक... खंत एकच... प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून सार्‍या भारताला वेड लावेल एवढा खजिना राखून असताना ते झाले नाही... मनस्वीपणा, का तटस्थ, स्थितप्रज्ञ वृत्ति... जे असेल ते... -रेझर रेमॉन
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com