नमस्कार,
गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे.
आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा वाचण्याकरीता पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही, म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रेडीओ भागांचे या अनुदिनी करीता संपादन करुन ते आपण 15 दिवसांनी एक भाग असे प्रसारीत करणार आहोत. हे सर्व भाग आपण ऐकून त्याचा आनंद तर घ्याच, पण आम्हालाही कळवा आपल्याला हे भाग आवडले की नाही ते. चला तर करुया सुरुवात.....
मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासूनच्या कामाचा घेतलेला हा आढावा आपण ऐकूयात....
खालील दुव्यावर टिचकी मारुन (Click) आपण हा भाग ऐकू शकता.
ध्वनी अनुदिनी भाग-1 - श्री अशोक रावत
टिप - सदर लिंक मुंबई ग्राहक पंचायतीच्या गुगल ड्राईव्ह वरील ऑडियो फाईल सुरु करते.
आपण हा भाग येथूनही ऐकू शकता.
धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.
- अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर ध्वनी धागा मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 12:25 pm | बोका-ए-आझम
एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?
15 Apr 2016 - 12:25 pm | रुस्तम
लवकरच ऐकतो...
15 Apr 2016 - 12:56 pm | gogglya
कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.
15 Apr 2016 - 1:10 pm | पुणे मुंग्रापं
मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल.
धन्यवाद...
15 Apr 2016 - 6:51 pm | gogglya
दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.
16 Apr 2016 - 9:17 am | पुणे मुंग्रापं
आपल्या इमेल वर उत्तराची इमेल पाठविली आहे. कृपया तपासावी.
16 Apr 2016 - 2:24 pm | सुधांशुनूलकर
मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो.
मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.
16 Apr 2016 - 4:11 pm | अनन्न्या
मालाचा अतिशय उत्तम आहे. रत्नागिरीतही चांगला प्रतिसाद मिळतोय.
16 Apr 2016 - 4:13 pm | अनन्न्या
लिहीताना गडबड झाली.