नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे १० फेब्रुवारी. प्रवेशिकेबरोबर फुलाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.
या विषयाबद्दल सर्वसाक्षी यांचे मत -
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला स्पर्धेसाठी 'फूल' हा विषय द्यायला आवडेल. म्हटलं तर अतिशय सोपा आणि सर्वत्र आढळणारा साधासुधा विषय. वॉसपची सकाळ उजाडते ती सपुष्प सदिच्छांनी. आपल्या शुभेच्छांमध्ये फूल हे असतच. समारंभात सजावटीला, उत्सवाला, कार्यक्रमाला, पूजेला फुलं हवीतच. अगदी मेजावर साध्याशा पात्रात रचलेली फुलं सुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करतात. पुष्परचना ही तर एक कला आणि मोठा व्यवसायही आहे. निसर्गाचं वैविध्य फुलांमध्ये पाहायला मिळतं. एखादं चांगलं फुल दिसल्यावर ते टिपायचा मोह आवरत नाही, अर्थात अनेकांकडे अशी चित्रे असतीलच, शिवाय विषय सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याने नव्याने चित्रित करणे सहज शक्य आहे.
विषय जरी फूल असा एकवचनी असला तरी फूल, फुलांचा ताटवा/ गुच्छ, बहरलेली डहाळी/ वेल, मळा हे सर्व काही समाविष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मिपाकरांनी टिपलेली सुरेख चित्रे पाहायला मिळतील. फूल सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण असण्यापेक्षा फुलाचे प्रभावी चित्रण स्पर्धेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे कारण स्पर्धा फुलांची नसून फुलांच्या चित्रणाची आहे. इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्या फुलाचे/फुलांचे असावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~ सर्वसाक्षी यांनी काढलेली फुलांची चित्रे ~
मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी कृपया चित्रांवर क्लिक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूकव्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषीकृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया
1 Feb 2016 - 9:34 am | मोहन
वा वा ! सर्वाधीक प्रवेशिका या स्पर्धेला मिळ्तील असा कयास आहे.
1 Feb 2016 - 12:02 pm | चांदणे संदीप
+१
मी पण सहभाग नोंदवणार! :)
Sandy
1 Feb 2016 - 10:10 am | मुक्त विहारि
जमल्यास नक्कीच भाग घेईन.
1 Feb 2016 - 11:59 am | कंजूस
भाग घेतलाय.सर्वसाक्षींची चित्रे फारच सुरेख आहेत.
1 Feb 2016 - 12:02 pm | कंजूस
हा गुच्छ फारच सामान्य आहे
1 Feb 2016 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
तो गुच्छ कोणी कोणाला दिला यावर त्याचे सामान्य/असामान्यत्व अवलंबून असेल :)
1 Feb 2016 - 12:09 pm | कंजूस
माघी गणेशोत्सव जवळ आला म्हणून
1 Feb 2016 - 5:34 pm | सूड
नियम वर क्लिक केलं की 'पगे नोत फोउन्द' असं येतंय.
1 Feb 2016 - 8:03 pm | साहित्य संपादक
ही त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दुवा दुरुस्त केला आहे.
11 Feb 2016 - 9:44 pm | साहित्य संपादक
~ मुन्नार येथील एका बागेतले हे फूल ~
~ "कोवळा संन्यास" ~
~ काश्मिरी गुलाब ~
स्थळः पहेलगामचा एक बगीचा. नुकतीच एक पावसाची सर येवुन गेली होती आणि सूर्योदय झाला होता....
~ प्राजक्त ~
~ अबोली ~
~ लिली ~
~ फिर छिडी रात, बात फूलों की ~
~ लक्षवेधी ~
~ उटीच्या रोझ गार्डन मधल्या २८०० प्रकारच्या गुलाबांपैकी एक ~
~ कुर्ग बागेतील कंमळ ~
~ जंगलात भटकंती करताना सापडलेले एक फुल ~
~ बोगन वेलीचे कागदी फ़ुल ~
~ पिंक पॅशन ~
EXIF: एफ २.८; १/६०; आयएसओ २००; ५० एम एम
~ दो फूल एक माली ~
~ अलिबाग येथील खासगी बागेतले हे एक फूल ~
हे छायाचित्र सुर्यास्ताच्या वेळी काढले आहे.
~ कमळ ~
~ लेक जिनिवा येथील एक फूल ~
~ बोगनवेल ~
~ रक्ता़ङ्गं रक्तवर्णम् ~
1 Feb 2016 - 8:19 pm | अभ्या..
स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर दुसर्याचा काय नंबर येणार :)
पूर्वी कंपनी आयोजित स्पर्धेत कंपनीचे कामगार, जाहिरात एजन्सीचे कलाकार यांना पण स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी नसायची त्याची आठवण झाली. बादवे फोटो बघून जुन्या चित्रपटाचीपण आठवण झाली. हिरो हिरॉइनचे कृत्य फुलांच्या आदळाआद्ळीने झाकायची प्रथा होती म्हणे. ;)
1 Feb 2016 - 8:21 pm | प्रचेतस
=))
कदाचित उत्साहाच्या भरात आपल्या लॉग इन ऐवजी चुकून सासं आयडीने प्रवेशिका टाकल्या गेली असावी रे.
1 Feb 2016 - 8:22 pm | प्रचेतस
बाकी त्या फुलाच्या मागे अजून ३ फुले दिसताहेत.
1 Feb 2016 - 8:24 pm | अभ्या..
फुलामागे सगळेच फूल.
1 Feb 2016 - 8:25 pm | प्रचेतस
एक फूल दो माली.
1 Feb 2016 - 9:49 pm | शब्दबम्बाळ
फुल तो फुल है आंखो से घिरे रेहते है
कांटे बेवजा हिफाजत मै लगे रेहते है
उसको फुरसत नाही मिलती के पलट कर देखे
हम हि दिवाने है, दिवाने बने रेहते है...
2 Feb 2016 - 10:39 am | नूतन सावंत
क्या बात है!
@ शब्दबंबाळ,
(फक्त फुल च्या ऐवजी फूल असायला हवे होते,ऱ्हस्व,दीर्घाच्या चुकांमुळे रसभंग होतो, याकडे लक्ष देता येईल का?
2 Feb 2016 - 2:06 pm | शब्दबम्बाळ
नक्कीच लक्ष देईन! एक डाव माफी असावी! :)
2 Feb 2016 - 6:37 pm | नूतन सावंत
धन्स.
1 Feb 2016 - 8:33 pm | साहित्य संपादक
स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यासाठी स्पर्धा क्र. १५ पासून स्पर्धक साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे प्रवेशिका पाठवतात. मिळालेल्या प्रवेशिका साहित्य संपादकांद्वारे स्पर्धेच्या धाग्यावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातात. अजुनपर्यंत एकच प्रवेशिका आल्याने केवळ तिच प्रकाशित केली आहे.
1 Feb 2016 - 8:41 pm | प्रचेतस
ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण पटले नाही.
परीक्षक सर्वसाक्षी हेच आहेत आणि इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यात काय हशील आहे?
1 Feb 2016 - 8:44 pm | प्रचेतस
आणि मूळातच इतर स्पर्धांसाठीही प्रवेशिका व्यनिद्वारे पाठवणे मला पटले नाही. सदस्यांना बायस्ड ठरवल्यासारखे वाटते.
बाकी व्यवस्थापन मंडळ मिळून योग्य तो निर्णय घेइलही.
1 Feb 2016 - 8:52 pm | अभ्या..
हम्म तोच मुद्दा होता. असो.
1 Feb 2016 - 9:05 pm | साहित्य संपादक
याची दोन कारणे आहेत
ही पद्धत मिपाकरांकडून वेळोवेळी मिळालेल्या सुचवण्यांनुसारच अवलंबिली गेली आहे.
1 Feb 2016 - 9:12 pm | प्रचेतस
कारणे पटली नाहित त्यामुळे असो.
ज्यांची इच्छा आहे त्यांना खुलेपणाने स्वत: काढलेले छायाचित्र देता यायला हवे. स्पर्धकांचे नाव दडवून ठेवण्याच्या प्रकारामुळे मी तरी भाग घेऊ इच्छित नाही.
स्पर्धेला शुभेच्छा.
1 Feb 2016 - 9:14 pm | साहित्य संपादक
स्पर्धकांची नावे अगोदरच्या स्पर्धेप्रमाणेच निकालाच्या धाग्यावर जाहीर करण्यात येतील.
1 Feb 2016 - 9:16 pm | प्रचेतस
बैल गेला आणि झोपा केला असे करण्यासारखे होते ते. त्यामुळे असो.
1 Feb 2016 - 9:27 pm | स्पा
वल्ली शी सहमत
1 Feb 2016 - 10:48 pm | यशोधरा
हे प्रचेतसचं म्हणणं पटलंय.
2 Feb 2016 - 10:28 am | मयुरMK
10 Feb 2016 - 1:07 pm | चांदणे संदीप
असे असताना ~ नैसर्गिक वाटणारे एक कृत्रिम फूल ~ ही प्रवेशिका कशी? एक शंका....
Sandy
10 Feb 2016 - 6:56 pm | साहित्य संपादक
अनावधानाने प्रवेशिका स्वीकारली गेली याबद्दल दिलगीर आहोत. त्रुटी लक्षात आणुन दिल्यावद्दल आभारी आहोत.
सदर छायाचित्र अवांतर फोटो म्हणून खाली प्रकाशित केले आहे. तसेच स्पर्धकास विनंती केली आहे की मुदत संपण्यापूर्वी पर्यायी प्रवेशिका पाठवावी.
1 Feb 2016 - 9:22 pm | मयुरMK
1 Feb 2016 - 9:44 pm | चांदणे संदीप
का हो? चांगलय की हे!
2 Feb 2016 - 10:19 am | मयुरMK
ह्या आधी मी इथे हे चित्र प्रकाशित केले आहे न म्हणून दिल नाही
1 Feb 2016 - 9:58 pm | संदीप डांगे
2 Feb 2016 - 10:21 am | मयुरMK
"गुलमोहर"
गावाकडची आठवण आली :)
1 Feb 2016 - 10:02 pm | संदीप डांगे
1 Feb 2016 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी
अप्रतिम आहेत तीनही फोटोज.
मयुरएमके यांचा फोटोही आवडला.
2 Feb 2016 - 10:25 am | मयुरMK
:)
2 Feb 2016 - 11:02 am | संदीप डांगे
धन्यवाद रंगाण्णा!
2 Feb 2016 - 11:25 am | मयुरMK
छान फोटो काढले आहेत
संदीप भाऊ कोणता कॅमेरा आहे ?
2 Feb 2016 - 11:34 am | संदीप डांगे
कॅनन १०००डी. लेन्स १८-५५
2 Feb 2016 - 11:50 am | मयुरMK
मी पण कॅमेरा घेण्याचा विचार करतोय निकोन चा मोडेल अजून ठरवलं नाही.
1 Feb 2016 - 10:45 pm | कंजूस
पांढरी फुले आवडतात कारण ती रात्रीही दिसतात.
2 Feb 2016 - 2:05 am | टुंड्रा
2 Feb 2016 - 10:45 am | नन्दादीप
----
माझ्या Asus Zenfone 2 ने काढलेला फोटो
-------
-----
2 Feb 2016 - 11:24 am | मयुरMK
छान फोटो आहे सर्व त्यातल्या त्यात गुलाबाचा मस्त
2 Feb 2016 - 11:31 am | स्पा
१.
२.
३.
४.
2 Feb 2016 - 11:32 am | स्पा
१.
२.
३.
2 Feb 2016 - 11:47 am | मयुरMK
सर्वच फोटो सुंदर एकापेक्षा एक
2 Feb 2016 - 1:07 pm | पद्मावति
Amsterdam ची keukenhof बाग.
2 Feb 2016 - 4:37 pm | अन्नू
एक नंबर आहेत फुलं
2 Feb 2016 - 2:43 pm | महासंग्राम
2 Feb 2016 - 3:47 pm | मोहन
पवई गार्डन.
2 Feb 2016 - 3:49 pm | Jitendra Gharat
2 Feb 2016 - 3:53 pm | कंजूस
छान आहेत सर्व फुलं.
2 Feb 2016 - 4:02 pm | Jitendra Gharat
2 Feb 2016 - 6:31 pm | अबोली२१५
2 Feb 2016 - 8:08 pm | मयुरMK
:) मनमोहून टाकणारे छायाचित्र
2 Feb 2016 - 8:25 pm | तुषार काळभोर
काय एकएक फुलं.. सासंनी टाकलेले फोटो (प्रवेशिका).. आहाहा!!!
(गुप्ततेच्या नियमाविषयी : अगदी योग्य निर्णय वाटतो. मिपाकर बायस्ड असोत वा नसोत, अनइंटेन्शनली का होईना पण आपल्या लाडक्या स्पर्धकाला मत दिले गेले, असे होऊ शकाते ना. आणि मतदान करताना कोणती प्रवेशिका कोणी दिली आहे हे महत्वाचं का ती प्रवेशिका कशी आहे ते महत्वाचं?)
2 Feb 2016 - 8:27 pm | यशोधरा
पण मिपाकर मत कुठे देणारेत? सर्वसाक्षी निवड करणार आहेत ना?
3 Feb 2016 - 12:58 am | संदीप डांगे
त्यांनापण नको ना कळायला की फोटो कुणाचे आहेत ते. म्हणजे एकदम सिलपॅक परिक्षणाची हमी. (मला असे अजिबात म्हणायचे नाही की सर्वसाक्षींच्या निष्पक्षपणाबद्दल शंका आहे. पण कोणाला असेलच तर ह्या प्रतिसादाने तीही बाजू क्लिअर होईल.)
3 Feb 2016 - 6:30 am | तुषार काळभोर
सर्वसाक्षी यांना जरी कोणाच्या प्रवेशिका आहेत, ते कळलं नाही तरी काय फरक पडतो.
3 Feb 2016 - 9:28 am | यशोधरा
आणि कळलं तरीही फरक पडणार नाही.
4 Feb 2016 - 1:31 pm | नंदन
'गुलदस्त्यात ठेवणे' हा वाक्प्रचार कित्ती फिट्ट बसतो नै! ;)
4 Feb 2016 - 4:32 pm | यशोधरा
=))
3 Feb 2016 - 12:42 am | जे.जे.
शेकडो पाकळि फुल
हॅन्गिन्ग फ्लॉवर्स...
3 Feb 2016 - 6:49 pm | उपयोजक
क्लास.जवाब नही
3 Feb 2016 - 6:18 am | कंजूस
अवांतर
3 Feb 2016 - 6:30 am | श्रीरंग_जोशी
जास्वंदाचं सौंदर्य काय टिपलय!!
3 Feb 2016 - 10:55 am | मयुरMK
.
3 Feb 2016 - 8:15 pm | कंजूस
कर्नाटकात( आणि तमिळनाडूत) सुगंधी फुलांनाच फुले म्हणतात. थोडी अबोली. किनाय्राकडे कारवार मंगळुरात जास्वंदीचं कौतुक कुंपणासाठी.
3 Feb 2016 - 8:17 pm | यशोधरा
कोकणातही.
3 Feb 2016 - 8:44 pm | मयुरMK
बाकी इथे दर २६ जानेवारी ला फूलांचे प्रदर्शन असते खूप न पाहिलेली फूले असतात.
4 Feb 2016 - 2:51 pm | कंजूस
आणि १५ ,१६,१७ ओगस्ट (August).सर्व विलायती फुले ( दिल्लीतही तीच) असतात.काही उटीकडची बांडगुळं.
3 Feb 2016 - 1:25 pm | जागु
खालील फुले स्पर्धेसाठी नाहीत.
१. ब्रह्मकमळ म्हणतात पण हे कॅकटस आहे.
गायत्रीची फुले
सीता अशोक
3 Feb 2016 - 2:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे आमच्या बागेत उमललेलं निसर्गाचं एक अप्रूप...
3 Feb 2016 - 2:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून काही...
.
3 Feb 2016 - 6:38 pm | मीता
4 Feb 2016 - 1:04 pm | तुषार काळभोर
अवांतर फोटोच इतके झक्कास आलेत... स्पर्धेसाठीचे कसे असतील?
4 Feb 2016 - 1:57 pm | वैदेहीजी
4 Feb 2016 - 2:03 pm | वैदेहीजी
4 Feb 2016 - 3:03 pm | कंजूस
१,३ बेगोनिया आहे का?
4 Feb 2016 - 2:08 pm | मृत्युन्जय
4 Feb 2016 - 2:09 pm | मृत्युन्जय
4 Feb 2016 - 2:10 pm | मृत्युन्जय
4 Feb 2016 - 2:26 pm | मृत्युन्जय
4 Feb 2016 - 2:43 pm | मराठी कथालेखक
मिपावर छायाचित्र थेट अपलोड करता येत नाही फक्त इतरत्र दुअसर्या वेबसाईटवर असलेले छायाचित्र जोडता येते.
असे असताना छायाचित्र स्पर्धा आयोजित करणे तर्कसंगत वाटत नाही.
असो.
4 Feb 2016 - 6:34 pm | संदीप डांगे
तुमचं मत नक्की समजलं नाही. छायाचित्र दुसर्या वेबसाईटवर असलेले म्हणजे दुसर्याचे थोडीच आहे? जरा विस्ताराने सांगाल काय?