छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
1 Feb 2016 - 1:00 am

नमस्कार मंडळी,

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे.

आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे १० फेब्रुवारी. प्रवेशिकेबरोबर फुलाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.

या विषयाबद्दल सर्वसाक्षी यांचे मत -
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला स्पर्धेसाठी 'फूल' हा विषय द्यायला आवडेल. म्हटलं तर अतिशय सोपा आणि सर्वत्र आढळणारा साधासुधा विषय. वॉसपची सकाळ उजाडते ती सपुष्प सदिच्छांनी. आपल्या शुभेच्छांमध्ये फूल हे असतच. समारंभात सजावटीला, उत्सवाला, कार्यक्रमाला, पूजेला फुलं हवीतच. अगदी मेजावर साध्याशा पात्रात रचलेली फुलं सुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करतात. पुष्परचना ही तर एक कला आणि मोठा व्यवसायही आहे. निसर्गाचं वैविध्य फुलांमध्ये पाहायला मिळतं. एखादं चांगलं फुल दिसल्यावर ते टिपायचा मोह आवरत नाही, अर्थात अनेकांकडे अशी चित्रे असतीलच, शिवाय विषय सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याने नव्याने चित्रित करणे सहज शक्य आहे.

विषय जरी फूल असा एकवचनी असला तरी फूल, फुलांचा ताटवा/ गुच्छ, बहरलेली डहाळी/ वेल, मळा हे सर्व काही समाविष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मिपाकरांनी टिपलेली सुरेख चित्रे पाहायला मिळतील. फूल सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण असण्यापेक्षा फुलाचे प्रभावी चित्रण स्पर्धेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे कारण स्पर्धा फुलांची नसून फुलांच्या चित्रणाची आहे. इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्‍या फुलाचे/फुलांचे असावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

~ सर्वसाक्षी यांनी काढलेली फुलांची चित्रे ~


मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी कृपया चित्रांवर क्लिक करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता.

स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे

मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूकव्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषीकृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

कलाछायाचित्रणसद्भावना

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

4 Feb 2016 - 7:08 pm | मराठी कथालेखक

छायाचित्र दुसर्‍या वेबसाईटवर आधी टाकावे लागणे ठीक वाटत नाही. समजा काही कारणाने मला ते अन्यत्र कुठे अपलोड करायचे नसेल पण ते माझ्या संगणकावर आहे तर मी थेटपणे मिपावर अपलोड करु शकत नाही.
म्हणजेच छायाचित्र अपलोड आणि प्रसिद्ध करण्याकरिता मिपा दुसर्‍या साईटवर अवलंबून आहे. अशा प्रकारे परावलंबन असताना स्पर्धा आयोजित करु नये असे मला वाटते. याबाबत मिपाने लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे.
झालेच तर काही तांत्रिक गुंतागुंत होवू शकते असेही मला वाटते. जसे मी समजा फेसबूक वर चित्र अपलोड केले तर ते करताना फेसबूक त्या चित्राला काही प्रमाणात संक्षिप्त (कॉम्प्रेस) करते. पुढे तेच चित्र मिपावर येताना त्याचे संक्षेपण कायम राहते. दुसर्‍या स्पर्धकाने वेगळ्या साईटवर चित्र टाकले की जिथे ते संक्षिप्त होत नाही तर त्याचा परिणाम वेगळा असू शकतो.
चित्र मिपापर्यंत पोहोचवण्याकरिता वेगवेगळे माध्यम वापरल्याने वेगवेगेळे परिणाम होवू शकतात.

संदीप डांगे's picture

5 Feb 2016 - 2:37 pm | संदीप डांगे

तुमचा मुद्दा योग्य आहे. पण मिपाच्या सर्वरवर जास्त ताण येऊ नये म्हणून ही व्यवस्था आहे. फोटो मिपावर लोड केले तर बॅण्डविड्थ व सर्वर स्पेस खाईल. ते महागात जाणारं प्रकरण आहे, ज्या पद्धतीने मिपा मोफत आहे त्या परिस्थितीत सर्वरचे खर्च वाढवणे संयुक्तिक नाही.

दुसरं असं की सर्वांना फेसबुक वा इतर साईटबद्दल साउंड नॉलेज असेलच असे नाही. इथे स्पर्धकांना ह्याबाबतीत थोडेसे गृहित धरले जाते हे खरे. पण आंजा वापरणारे इतर सोशल साईट्स व फोटो अपलोड वैगरेंशी नीट युज टू असतात. काही अपवाद असू शकतात.

तिसरं असं की कंप्रेशन किंवा प्रेझेंटेशन प्रोफाइलींग बदलणे. हा मुद्दा ग्राह्य धरण्यासारखा आहे. याबद्दल फारतर एक करता येईल की मिपा अ‍ॅडमिन तर्फे एखादी सुविधा उपलब्ध करुन द्यावे जिथे थेट संगणकावर फोटो अपलोड करणे शक्य होईल, सदस्यत्वाचा प्रश्न येणार नाही, सर्व फोटोंची क्वालिटी समान राहिल. सदस्यांना ह्याबाबत काही तांत्रिक सूचना व मार्गदर्शन करणे शक्य असेल तर अवश्य करावे.

श्रीरंग_जोशी's picture

5 Feb 2016 - 7:39 pm | श्रीरंग_जोशी

जालावर फोटो प्रकाशित करण्यासाठी चकटफू ते पैसे देऊन तसे करण्याच्या सोयी आहे (गुगल फोटोज पासून फ्लिकर ते ५००पीएक्स. अजूनही बरेच पर्याय असतील.

हे सर्व पर्याय याच कामासाठी उपलब्ध आहेत व त्यावर सार्वजनिकरित्या प्रकाशित केलेल्या फोटोजचे दुवे हवे तिथे वापरता येतातच. मग हातचं सोडून पळत्याच्या मागे का लागावे?

मिपा म्हणजे फेसबुक नाही.तेसुद्धा २००४ नंतर.आजच फेसबुकला बारा वर्ष झाली.तोपर्यंत आम्ही काढलेले फोटो इतरांना दाखवण्याची काहीच सोय नव्हती.माळ्यावर धूळ खात पडायचे.फुकटची खुर्चीबी कोण देतोय बुड टेकायला?आमचे फोटोग्राफर मित्र खिशातले आठ दहा हजार रु घालून छायाचित्र प्रदर्शन भरवायचे.

प्रणित's picture

5 Feb 2016 - 7:41 am | प्रणित

unknown

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 1:34 pm | Jitendra Gharat

.

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 1:39 pm | Jitendra Gharat

.

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 1:39 pm | Jitendra Gharat

.

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 1:39 pm | Jitendra Gharat

.

पैसा's picture

6 Feb 2016 - 6:11 pm | पैसा

आकाशवेल

यशोधरा's picture

6 Feb 2016 - 6:15 pm | यशोधरा

गणेशवेल, असेही नाव ऐकलेय.

असंका's picture

7 Feb 2016 - 10:11 pm | असंका

+१..गणेशवेल

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 2:17 pm | Jitendra Gharat

.

Jitendra Gharat's picture

6 Feb 2016 - 2:20 pm | Jitendra Gharat

.

इशा१२३'s picture

6 Feb 2016 - 4:08 pm | इशा१२३

अप्रतिम आहेत एक एक फोटो.

इशा१२३'s picture

6 Feb 2016 - 4:41 pm | इशा१२३

स्पर्धेसाठी नाहि...
ऑर्चिड..
aaa

aa

घरच्या बागेतील जास्वंद...
j

s

जास्वंदाचा फोटो छान जमलाय

उदय's picture

8 Feb 2016 - 5:31 am | उदय

photo1

photo2

photo3

photo4

photo5

photo6

वा सगळे फोटो सुंदर आहेत.

चांदणे संदीप's picture

8 Feb 2016 - 7:21 pm | चांदणे संदीप

साहित्य संपादक आयडिला व्यनि जात नाहीये!

"सोस"

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Feb 2016 - 8:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला करा व्यनि

चांदणे संदीप's picture

9 Feb 2016 - 12:38 pm | चांदणे संदीप

झाला/गेला!

धन्यवाद कॅप्टन!

Sandy

साहित्य संपादक's picture

10 Feb 2016 - 9:23 pm | साहित्य संपादक

सदर चित्र स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून मिळाले होते. परंतु ते कृत्रिम फूलाचा असल्याने येथे हलवण्यात येत आहे.

~ नैसर्गिक वाटणारे एक कृत्रिम फूल ~

त्रिवेणी's picture

10 Feb 2016 - 1:17 pm | त्रिवेणी

मस्त फूल आहेत सगळी.
या वेळी विसरलेच मी.

त्रिवेणी's picture

10 Feb 2016 - 1:17 pm | त्रिवेणी

मस्त फूल आहेत सगळी.
या वेळी विसरलेच मी.

महासंग्राम's picture

10 Feb 2016 - 1:56 pm | महासंग्राम

निकाल कब है, कब हे निकाल ????

मीता's picture

10 Feb 2016 - 5:58 pm | मीता

t

वाचक's picture

10 Feb 2016 - 8:48 pm | वाचक

नुसतीच आपली बघायला टाकतोय....

माँट्शायर बागेत
flower @montshire

कॉग रेल्वे स्टेशन वर
flower @Cog railway

हे सुद्धा तिथेच
हनी