समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार
गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार
उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे
वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे
संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा
अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा
नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची
जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची
साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी
हंबरून गायी सार्या उधळीत दिशा गिरिकुहरी
निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी
पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी
अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई
अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!
प्रतिक्रिया
6 Dec 2015 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे.
ही बहुतेक चिनी पाकृ असावी ;)
7 Dec 2015 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
@
7 Dec 2015 - 11:13 pm | बोका-ए-आझम
झुरळाय विन्महे काॅक्रोचाय धीमहि तन्नो छपडे प्रचोदयात्!
6 Dec 2015 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
साकल्याने विचार केल्यावरच समजते ते साकल्यसुक्त. तसे न केल्यास ते नुसतंच सुकतं... सुकून सगळा रस निघुन गेल्यावर रसभंग होणारच. सो, कल्ला न करता सुमडीत रसास्वाद घ्या, भोहो :)
6 Dec 2015 - 2:08 pm | विशाखा पाटील
अहाहा! काय ती काव्यप्रतिभा! केवढं 'अर्थपूर्ण' काव्य... ही कविता आणि वाचकांच्या प्रतिक्रिया समिक्षेतली 'reader's response theory' अभ्यासण्यासाठी उत्तम उदाहरण ठरेल. पुढची कविता कधी पाडतेयेस, सॉरी करतेयेस?
6 Dec 2015 - 3:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
कधीकधी उन्मुक्त आणि प्रच्छंन्न आनंदाच्या, एखाद्या उन्मादामधे, तिव्र मध्यमलयीत, धावणार्या आपल्या मन्श्वाच्या आयाळीच्या, गर्द गुंतवळ्यामधुन, एका बेसावध क्षणी, आपण अचानक आपल्या मनीच्या गुढगर्भ डोहात, उघड्या डोळ्यांनी फेकले जातो आणि आपल्याच मनःसागरात असलेल्या अमर्याद व अनंत अशा आर्याष्टाङ्गमार्गाच्या तेजाने आपण उजळुन निघतो आणि मग परमेश्वराच्या त्या सन्धावेणिके पुढे आपण नतमस्तक होतो. तसा काहिसा अनुभव हे अपराधभञ्जनस्तोतत्र वाचल्यानंतर प्रवाचकांना येतो.
लघुखट्विके मधे उत्तेजक रस प्राशन करत असताना, मक्षीकाप्रपात झाला, तर आपण जसे उव्दीग्न होतो, तशी काहीशी वैचक्षण रसानुभूती आपल्याला मधली काही कडवी वाचताना आली, तरी एकंदर हा अनुभव आपल्या अंतरात्म्याच्या अत्यंत निकटतम असलेल्या त्या सहृद आणि स्वयंप्रकाशीत आनंदपुरुषाच्या संस्थिती प्रसज्यप्रतिषेध करुन जातो.
अत्यंत रसाळ माधुर्यपुर्ण आणि बहुआयामी असे बहुअर्थगर्भी काव्यपुप्ष प्रसवल्या बद्दल कक्षावेशीकेच्या कवित्वैशिष्ट्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
पैजारबुवा,
6 Dec 2015 - 3:57 pm | माहितगार
--/\--
6 Dec 2015 - 8:16 pm | मितान
साष्टांग प्रणिपात --/\-- !!!!
=))
7 Dec 2015 - 10:54 am | पिशी अबोली
किती सुंदर, सरळ समीक्षा! असे कमीतकमी आणि अंतःकरणाला भिडतील अशा शब्दांमधून लिहिणारे समीक्षक विरळाच..
6 Dec 2015 - 10:34 pm | बिपिन कार्यकर्ते
काकू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कधी आमच्यासाठी पण लिहा हं!
7 Dec 2015 - 6:25 am | मितान
आपला वरदहस्त डोक्यावर असताना अाम्हास काहीही लिहिणे अशक्य नाही! तुम्ही फक्त पेर्णा द्या आजोबा ;)
7 Dec 2015 - 5:12 am | नगरीनिरंजन
शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी फार आवडली!
7 Dec 2015 - 10:09 am | पैसा
कखगघङ चछजझ टठडढण तथदधन पफबभम यरलवश षसहळ क्षज्ञ
7 Dec 2015 - 10:15 am | संदीप डांगे
अतिशय सुंदर प्रतिसाद. आवडला. कवयित्रीच्या भावना अचूक पकडल्यात... :-)
7 Dec 2015 - 10:58 am | pacificready
स्वर वर्ज्य असणं साहजिकच!
7 Dec 2015 - 10:59 am | पिशी अबोली
कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारा रसाळ प्रतिसाद.. 'ञ' मुळे उगाच होऊ शकणारा फापटपसारा वगळून जी चतुराई केलेली आहे, तिला तोडच नाही.
धन्यवाद पैसाताई!
7 Dec 2015 - 3:47 pm | पैसा
सगळी अक्षरे शोधली पण बेटा 'ञ' मिळाला नाही मग मरो मेला म्हटले! नाहीतरी 'त्र' सोबत भांडतो तो!
28 May 2018 - 10:36 pm | सस्नेह
=)) =)) =))
ही वाखू साठवल्याचे सार्थक झाले. आज लै बोर झाल्तं ;)
7 Dec 2015 - 12:44 pm | मृत्युन्जय
कवितेचे या धाग्यावरील सर्वोत्तम रसग्रहण. अगदी मितानतैंनी स्वतः केलेल्या रसग्रहणापेक्षासुद्धा चांगले. पण कवितेत दडलेल्या अव्यक्त भावना वरच्या रसग्रहणातुन पुरेपुर उतरत नाहित असे नमूद करु इच्छितो.
या निमित्ताने या काव्याची तुलना गुंडा या चित्रपटाशी करु इच्छितो. कितीही सविस्तर परीक्षणे केली तरी गुंडा दशांगुळे उरतोच तसेच या काव्याचे झाले आहे. त्यासाठी दमामितैंचे अभिनंदन.
7 Dec 2015 - 3:31 pm | मितान
तुम्हाला कविता वाचून जो धक्का बसलाय याची जाणीव आहे मृत्युंजयदादा !! पण असे गोंधळू नका.
हे बघा - कविता कोणी केली ? मितान ने !
रसग्रहण कोणी ? दमामि ने
गुंडांगुळे काय उरलं ? कविता
अभिनंदन कोणाचं ? मितानचं !!! =)) =))
7 Dec 2015 - 9:34 pm | मृत्युन्जय
काय की दमामि मधला मि मितान चा आहे असे कोणीतरी म्हणताना ऐकले त्यामुळे गोंधळ उडाला.
7 Dec 2015 - 9:41 pm | pacificready
मि=मितान तर द=? मा=?
7 Dec 2015 - 11:09 am | स्मिता श्रीपाद
साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त असं वाचलं .....
मग पहिली ओळ वाचल्यावर अजुनच कन्फ्युजन झालं...मग पुढचं काई वाचलच नाई...
( आधीच सोमवार सकाळ त्यात आणि ..... ) ;-)
7 Dec 2015 - 1:18 pm | बॅटमॅन
कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी सगळे डोक्यावरून गेले.
(शष्पप्रेमी) बॅटमॅन.
7 Dec 2015 - 2:28 pm | घाटावरचे भट
बाकी सगळे डोक्यावरून गेले म्हणताना ते सगळे म्हणजे 'शष्प' असे तुम्हाला म्हणावयाचे नसावे असे समजतो. अन्यथा अनर्थशास्त्रास फारच प्रत्ययवाही न्याय दिल्यासारखे होईल.
7 Dec 2015 - 2:31 pm | बॅटमॅन
ही ही ही =))
7 Dec 2015 - 1:26 pm | गवि
वा वा.
सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून.
आता "इन ट्यून विथ द ट्यून" वाचायला घेतोच..
7 Dec 2015 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही कविता समजून घ्यायला, "इन ट्युन विथ द टून" वाचायची गरज लागेल ;) :)
7 Dec 2015 - 2:03 pm | बॅटमॅन
म्हणजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो....
(बॅटकिणी ब्रूसाळराव.)
7 Dec 2015 - 2:05 pm | अभ्या..
आक्क्क्क्क्................छी.
7 Dec 2015 - 2:31 pm | बॅटमॅन
अभ्या भिंगार्डे ;) की ते "हीक् छ्याक्" होतं? =))
7 Dec 2015 - 2:41 pm | गवि
ठ्याँ छिक असावं.
7 Dec 2015 - 3:54 pm | अभ्या..
नशीब आवाजाकडे लक्ष गेले.
सतरंजीचे सूत अन धोतराचा सोगा अन गौरांगाकडे असलेले लक्ष नाही दिसले. ;)
" भिंगार्ड्या कंडम माणूस एकदम"
7 Dec 2015 - 3:58 pm | बॅटमॅन
चवळीच्या शेंगेशेजारचा सुरणाचा गड्डा =))
7 Dec 2015 - 1:55 pm | पालीचा खंडोबा १
क्या बात है . मस्तच
7 Dec 2015 - 2:21 pm | सूड
ह्म्म्म!!
7 Dec 2015 - 7:57 pm | आदूबाळ
साकल्यसूक्त
अब समझा.
7 Dec 2015 - 8:20 pm | पिशी अबोली
एपिक लोल!!
7 Dec 2015 - 11:07 pm | बोका-ए-आझम
छान हो
मस्तच हो
कसं जमतं हो?
डोळे पाणावले हो!
शरुमौशींचा वारसा जिवंत ठेवल्याबद्दल अश्रुभरे मेघविव्हळ धन्यवाद!!
31 May 2017 - 11:30 pm | सानझरी
साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद डोक्यात.. च् च्.. आपलं ते डोक्यावरून गेले.. पैसातैंचा प्रतिसाद तेवढा आवडला, कविता उलगडत गेली.. =))
1 Jun 2017 - 12:21 am | पिशी अबोली
ही कविता अशी उलगडायची नाहीये. त्यात साकल्याने गुरफटून घ्यायचं आहे. उलगडताना ती शिवायला घेतलेली गोधडी असते, आणि गुरफटताना शिवून पूर्ण झालेली. हा बेसिक गोंधळ जोपर्यंत मनातून निघत नाही, तोपर्यंत कविता समजण्याइतकी आध्यात्मिक उन्नती होणार नाही तुमची. रोज बे ते एकोणतीस पाढे म्हणत जा. तिशीपर्यंत साकल्य करायचं नाही, हे साधनेने समजेल. साधना कट करू नये.
तूर्तास इतकेच. तूरडाळीचे घोटलेले वरण सप्लिमेंट म्हणून खावे.
1 Jun 2017 - 12:40 am | एस
संधिवाताला तूरडाळ वर्ज्य असतें. तेंव्हा मूगडाळीचें वरण बरें.
1 Jun 2017 - 1:50 pm | प्रीत-मोहर
मूगडाळीने साकल्य साधता येते का॑ पण?
2 Jun 2017 - 10:59 pm | एस
साकल्याच्या शोधात 'वाकल्य' आलें नाही म्हणजें मिळविलीं. :-D
1 Jun 2017 - 12:58 pm | माहितगार
कविते वरचे प्रतिसाद वाचून खासकरून पैतैंचे अ ते ज्ञ रसग्रहण वाचून ज्ञ ते अ च्या मार्गे वाचन करुन रसग्रहणाचा मोह होतो आहे. त्या आधी साकल्य, गायी आणि पार्थ बाणांच्या रुपकांना पुन्हा अभ्यासेन आणि नंतर रसग्रहणासाठी नक्कीच येईन.
2 Jun 2017 - 1:37 pm | गामा पैलवान
डोईवरी भुई आदळतां मारिली बेंबीदेठीची बोंब
एक पेग अधिक ढोसतां फुटे नवप्रतिभेस कोंब
-गा.पै.