बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय. त्याचे कारण लालूप्रसाद या त्यांच्या दुश्मन दोस्तचा अचानक झालेला महाउदय.ज्यांच्या नावाने व चेहऱ्याने निवडणूक लढविली गेली त्या नीतिश यांच्यापेक्षा लालूंचेच जास्त उमेदवार निवडून आले.सगळीकडे उघड झालेल्या माहितीनुसार नीतिश यांच्या अडीच डझन संख्या असलेल्या मंत्रिमंडळापैकी किमान दोन डझन मंत्री जेमतेम बारावीपर्यंत शिकले आहेत. त्यातीलही निम्मे शालान्त परीक्षाही उत्तीर्ण झालेले नाहीत. सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे लालूंचे उपमुख्यमंत्री झालेले पुत्र तेजस्वी हेही जेमतेम नववी पास की नापास आहेत. ज्यांच्याकडे बिहार या बिमारू राज्याच्या आरोग्याची धुरा सोपविली गेली आहे ते लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप अकरावीपर्यंतच प्रताप गाजवू शकले व बारावी नापास आहेत. शिवचंद्रम राम नावाच्या एका महापुरुषाकडे राज्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, यांनी तर शाळेचे तोंडच पाहिलेले नाही.देशाच्या प्रशासकीय सेवेत बरीच वर्षे याच राज्यांच्या उमेदवारांचा दबदबा होता व आजही तो बऱ्यापैकी कायम आहे. मात्र, त्यांचे राज्यकर्ते जर शालांत परीक्षाही उत्तीर्ण झालेले नसतील तर हा दोष कोणाचा? हा प्रवास उलट तर नाहि चालला ना?????????
प्रतिक्रिया
25 Nov 2015 - 3:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै तर अरारा.... मी पयला नावाला कावळा बसला रे बसला की ठॉ. ;)
बाकी, बिहारच्या मंत्र्यांच्या पात्रतेची माहिती असलेला संदेश वाट्सपवर जोरात आहे. ( हे बीजेपीचं काम आहे असं मी म्हणनार नाही. किमान पदवी असलेलेच निवडणुक लढवू शकतील अशी नियमावली निवडणुक आयोगाने केली पाहिजे. ( लिहिता आणि वाचता येतं याचीही खात्री करुन घेतली पाहिजे. आणि मग अश निवडुन आलेल्या लोकांना मंत्रीमंडळात शिन्यारीटीप्रमाणे घेतलं पाहिजे.
बाकी, शिक्षण आणि विकासाचा काही प्रश्न नाही. ज्याला आपल्या मतदार संघात विकास करायचाच आहे तो कसाही करु शकतो फक्त लागते ती इच्छा शक्ती. आणि दुर्दैवाने याच पात्रतेचा अभाव विधानसभा सदस्यात दिसतो.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2015 - 10:12 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाचा विकास हा पुरावा आहेच की.
25 Nov 2015 - 11:04 pm | चैतन्य ईन्या
हे तर पार भुक्कड हौसिंग सोसायटी ते तालुक्याच्या शुल्लक निवडणुकीपासून ते लोकसभे पर्यंत सगळीकडे लागू होणार विधान आहे. लोकसभे मध्ये थोडेफार सोडले तर सगळेच अस्सल नगच आहेत कि. म्हणा लोकांना पण आवडतात अशी लोक. शिवाय नगरसेवक नावाचा प्राणी तर भन्नाट असतो. म्हणजे सगळ्या नगराने ज्याची सेवा, मुबलक धन देवून, करायची असा तो नगरसेवक अशी व्याख्या चपखल बसेल.
24 Nov 2015 - 9:07 am | सुबोध खरे
दोन म्हणी
१) असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
२) लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे च सरकार मिळते. (PEOPLE GET THE GOVT, THEY DESERVE IT)
25 Nov 2015 - 10:32 am | shawshanky
सत्यवचन
24 Nov 2015 - 9:15 am | प्रसाद१९७१
नितिश च्या राज्यावरच्या १० वर्षातली साडे आठ वर्ष भाजप बरोबर होती आणि सु. क. मोदी अर्थमंत्री होते. मग सगळे क्रेडीट नितिश का खातो.
हीच गोष्ट नितीश च्या १० वर्षाच्या कारभारावर टीका करताना भाजपाई पण विसरत होते.
24 Nov 2015 - 12:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
सुशील मोदी उर्फ़ सुमो हा अजिबात निर्णयक्षमता नसलेला माणुस आहे हे इथे बिहारात राहून नीट पाहिले आहे देवा
24 Nov 2015 - 1:47 pm | प्रसाद१९७१
तुम्ही म्हणता ते खरे असेल सोन्य बापु. मला इतकेच म्हणायचे होते की, नितिश कुमार च्या १० वर्षाच्या सरकार मधे ८ वर्ष भाजप भागीदार होता. जर नितिश नी काही चांगले केले असेल तर त्यात भाजपच्या मंत्र्यांचा हातभार पण असणारच ना. क्रेडीट फक्त नितीश ला दिले जाते नेहमी. युतीतले पक्ष कसे एकमेकांना लाथा मारत असतात ते आपण बघतोच ना महाराष्ट्रात गेली २० वर्ष.
मी असेही ऐकले आहे की सुशिल मोदी आणि नितीश एकमेकांचे जवळचे मित्र होते आणिबाणीच्या आधीपासुन ( अजुनही असतील )
24 Nov 2015 - 2:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
कारण सुद्धा तुमच्याच पहिल्या कॉमेंट मधे आहे देवा! बीजेपी स्वतः पार्टनर इन डेवलपमेंट होती पण उठसुठ त्याच शासन काळावर तोंडसुख घ्यायला लागली मग काय होणार नितीश होताच बसलेला श्रेय लाटायला
24 Nov 2015 - 10:46 am | गॅरी ट्रुमन
आपला बॉस बिनडोक आहे असे ज्यांनाज्यांना वाटते त्यांनी बिहारच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करणार्या आय.ए.एस ऑफिसरचा चेहरा डोळ्यासमोर आणावा.कोणीतरी म्हटलेच आहे की सुखी व्हायचे असेल तर आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या माणसाकडे बघावे. म्हणजेच आपण किती सुखी आहोत हे समजून यायला मदत होईल :)
24 Nov 2015 - 2:49 pm | संदीप डांगे
खरे आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो.
24 Nov 2015 - 2:55 pm | गॅरी ट्रुमन
बरोबर आहे. मोदींबरोबर पर्रिकर, प्रभू, पियूष गोयल, काही अंशी गडकरी हे मंत्री आणि अजित डोवाल हे एन.एस.ए सोडले तर केंद्रीय मंत्रीमंडळात फार छाप पाडणारे फारसे कोणी नाही.
24 Nov 2015 - 3:00 pm | संदीप डांगे
तेच तर. पण तेव्हा असले जोक्स जालावर फिरत नाहीत ह्याचेच वैषम्य आहे.
24 Nov 2015 - 3:03 pm | गॅरी ट्रुमन
असले नाही तर वेगळ्या प्रकारचे जोक्स फिरतच आहेत की. कदाचित तुमच्यापर्यंत ते पोहोचले नसतील.
25 Nov 2015 - 3:00 pm | चिंतामणी
आणि टाका जोक्स.
24 Nov 2015 - 3:08 pm | मृत्युन्जय
सुषमा स्वराज आणि राजनाथसिंग?
24 Nov 2015 - 3:15 pm | गॅरी ट्रुमन
राजनाथसिंग निगर्वी आणि फारसे न बोलता काम करणारे आहेत. त्यांचे नाव राहिलेच की. सुषमा स्वराज मोदींपुढे थोड्या झाकोळल्या गेल्या आहेत.त्यांनी परदेशात अडचणीत असलेल्या भारतीयांना मदत केली आहेच. पण तरीही स्वर्णसिंग किंवा इंद्रकुमार गुजराल या परराष्ट्रमंत्र्यांनी आपली छाप त्या मंत्रालयावर सोडली होती तसे सुषमा स्वराज करू शकलेल्या नाहीत हे पण तितकेच खरे.
24 Nov 2015 - 3:24 pm | प्रसाद१९७१
इंद्रकुमार गुजराल - ह्या साहेबांनी म्हणे जो घोळ घालून ठेवला आहे त्याचे परीणाम म्हणे भारत अजुन भोगतोय. एका अर्थानी छाप च म्हणायची ती त्यांची, पण असली छाप काय कामाची?
तसेच उच्च पदव्या घेतलेले अय्यर, खुर्शीद वगैरे लोक मंत्री असण्यापेक्षा लालू परवडला.
24 Nov 2015 - 3:33 pm | गॅरी ट्रुमन
हो पाकिस्तानातील रॉची ऑपरेशन गुजरालांनी बंद केली अशाप्रकारचे वाचले आहे. तसे असेल तर ते नक्कीच चुकीचे केले त्यांनी.
मणीशंकर अय्यरपेक्षा लालू नक्कीच परवडला :)
24 Nov 2015 - 3:15 pm | प्रसाद१९७१
राजनाथ आहेत, स्वराज आहेत. धर्मेंद्र प्रधान आहेत. सुभाष देसाई पण वाईट नसावेत. हर्षवर्धन पण बरे असावेत.
आणि छाप पाडणे महत्वाचे का कमीत कमी पैसे खाउन काम करणारे मंत्री पाहिजेत.
कपिल सिब्बल / थरुन सारखे उच्च शिक्षीत मंत्री असण्यापेक्षा हे खूप च बरे.
24 Nov 2015 - 3:07 pm | मृत्युन्जय
खरेच तुम्हाला असे वाटते? सिरीयसली? १० वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री राहुन नावाजला गेलेला माणूस आणि जोडीला क्लिंटनने दिलेली नावे एकीकडे आणि तेजप्रताप सिंग आणि तो दूसरा जो कोणी असेल तो की ज्यांचे स्वतःचे शून्य कर्तुत्व, सर्व सोयी सुविधा असुनसुद्धा शिक्षणही पुर्ण न करु शकलेले हे दोन सुपुत्र आणि ज्याच्या नावावर ते निवडुन आले तो कॉर्टाने गुन्हेगार ठरवलेला माणूस दुसरीकडे या दोन गटांची तुलना होउ शकते? द्वेष किती आंधळा आणि विखारी असुविखारीआणी मते किती बायस्ड असु शकतात याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणुन मी तुमचा हा प्रतिसाद सगळ्यांना दाखवेन.
24 Nov 2015 - 3:21 pm | सुबोध खरे
+ 100000000000
24 Nov 2015 - 3:24 pm | संदीप डांगे
आ रा रा रा. जरा दम धरा मालक! तुम्ही उमा भारती (६वी) आणि स्मृती इराणी (१२वी) यांना विसरलात का? आहेत, त्या दोघीही अजून मंत्रिमंडळात आहेत बरंका... नाही उगा माझा प्रतिसाद दाखवायला जाल आणि तोंडावर पडाल म्हणून पूर्वसूचना देतो.
तसंच भाजपचे सर्व निर्वाचित संसदसदस्य उच्चविद्याविभुषित, निष्कलंक, सुसंस्कृत वैगेरे आहेत याबद्दल आपला बायस आम्हाला पूर्ण पटलेला आहे. फक्त काय होतंय की, शिंचे भक्त लोक बिहारमधे भाजप हरलाय म्हणून 'आपलं ठेवावं झाकून दुसर्याचं पाहावं वाकून' हा प्रकार चेकाळल्यासारखे करतात तेव्हा राहावत नाही,
तुम्हाला दु:क्क झाले असेल तर स्वारी बर्का..!
24 Nov 2015 - 3:30 pm | प्रसाद१९७१
स्मृती इराणी चे शिक्षण कमी असेल पण बाई कर्तृत्ववान आहे. स्वताच्या बळावर आज उभी आहे.
24 Nov 2015 - 4:11 pm | शलभ
उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या मंत्रिमंडळाला नावं ठेवयची.
24 Nov 2015 - 4:14 pm | संदीप डांगे
सहमत.
24 Nov 2015 - 4:15 pm | संदीप डांगे
हेच म्हणायचे होते पण काही लोक सरळ वाक्यातही वाकडा अर्थ काढतात त्याला काय करावे बरे...?
24 Nov 2015 - 7:44 pm | शलभ
असं तर अजिबात वाटत नाही तुमच्या वाक्यावरुन
25 Nov 2015 - 11:01 am | मृत्युन्जय
केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो.
डांगे तुम्ही ऑलरेडी तोंडावर आपटले आहात. आधी स्वतःला सांभाळा. तुम्ही जेव्हा म्हणता की " केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो." तेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाची तुलना बिहारच्या आयएएस ऑफिसर्सशे करत आहात. म्हणजेच तुम्ही बिहारच्या मुख्यमंत्र्यांची आणि मोदींची तुलना करत आहात. माझा प्रतिसाद पुर्ण त्याच रोखाने होता. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल तो नव्हताच. तुम्हाला प्रतिवाद कळला नाही की तुम्ही मुद्दाम न कळाल्याचे नाटक करत आहात की तुम्हाला तुमच्याच विधानातली विसंगती कळत नाही आहे???
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी उमा भारती किंवा स्मृती इराणींबद्दल जरी बोलत असाल तरीही त्या दोघींनी आपले नाणे वेग वेगळ्या क्षेत्रात खणखणीत बजावलेले आहे हे तुम्ही विसरता. उमा भारती वाचाळ असल्या तरीही त्यांचा राजकारणातला स्वकर्तुत्वावर केलेला प्रवास विसरता. आता याच तुलनेत माझे खालचे सुस्पष्ट वक्तव्य वाचा:
या दोन सुपुत्रांना नसली कशाची कमतरता होती म्हणुन ते शिक्षणही पुर्ण करु शकलेले नाहित? त्यांचे स्वतःचे कर्तुत्व काय?
तसंच भाजपचे सर्व निर्वाचित संसदसदस्य उच्चविद्याविभुषित, निष्कलंक, सुसंस्कृत वैगेरे आहेत याबद्दल आपला बायस आम्हाला पूर्ण पटलेला आहे. फक्त काय होतंय की, शिंचे भक्त लोक बिहारमधे भाजप हरलाय म्हणून 'आपलं ठेवावं झाकून दुसर्याचं पाहावं वाकून' हा प्रकार चेकाळल्यासारखे करतात तेव्हा राहावत नाही,
असा माझा काही बायस आहे असे तुमचे मत का बनले ते काही कळायला मार्ग नाही. शिवाय मी भाजपाच्या सर्व निर्वाचित संसदसदस्यांबद्दल एक शब्दही बोललेलो नसताना तुम्ही नसते निष्कर्ष माझ्या वतीने का काढत आहात हे देखील कळत नाही. सिलेक्टिव्ह रीडिंग ते हेच. विखारी आणी आंधळ्या द्वेषातुन आणी विरोधातुन बाहेर आलात तर तुम्हाला योग्य परिस्थिती दिसेल. पिवळे चष्मे घालुन दुसर्याचा पांढराशुभ्र पायजमा बघायचा आणी मग "तुझी चडी पिवळी झाली" म्हणायचे याला काय अर्थ आहे?
एवढे काय दु:ख झाले तुम्हाला माझ्या स्पष्ट आणी मुद्देसूद प्रतिवादावर की तुम्ही विखारी विद्वेषावर उतरलात. तुम्हाला दु:ख झाले असेल तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही कारण मी योग्य तेच बोलतो आहे. सो नो सॉरी फ्रॉम माय साइड बर का.
25 Nov 2015 - 11:22 am | संदीप डांगे
हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला आहे. मला अगदी असेच म्हणायचं होतं असं तुम्ही कसं काय ठरवलंत. तुमच्याच सिलेक्टीव रिडींग आणी बायसबद्दल तुमचे काय मत आहे? एका साध्या गमतीदार वाक्यात तुम्हाला विखार, विद्वेष, आंधळा विरोध वैगेरे ठासून भरलेला दिसून येण्याइतके काय बोचले बुवा? म्हटले तर त्या वाक्याला बरेच पैलू आहेत पण विखार, विद्वेष, आंधळा विरोध तुमच्या चष्म्यामुळे तुम्हाला दिसत असेल तर माझा दोष नाही.
भाजपचे सरकार आहे म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाविरूद्ध एकही वावगा शब्द ऐकुन घेतला जाणार नाही, त्याविरूद्ध बोलणार्याचा अपमानच केला जाईल अशी काहीशी जालावरिल भक्तमंडळींची नीती आहे, तुम्हीही त्यांना सामील आहात काय?
25 Nov 2015 - 4:50 pm | चिंतामणी
इथे बघा केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता.
गीते, अशोक गणपती राजू हे मित्र पक्षांचे सदस्य आहेत याची नोंद घ्यावी.
25 Nov 2015 - 4:59 pm | कपिलमुनी
गीते मित्रपक्षाचे ?
त्यांना भाजपाकडून मंत्रीपद मिळाला आहे.
25 Nov 2015 - 5:01 pm | नाव आडनाव
गीते नाही, भाजपाचे मंत्री प्रभू आहेत (जे आधी शिवसेनेत होते).
25 Nov 2015 - 5:12 pm | कपिलमुनी
गीते -प्रभू मधे गफलत झाली
25 Nov 2015 - 6:39 pm | चिंतामणी
Suresh Prabhu completed his high school from Sharadashram Vidya Mandir, Dadar, Mumbai, followed by a Bachelor in Commerce with Honours from M.L. Dahanukar College, Vile Parle, Mumbai.[3] He received a Bachelor in Law degree from the New Law College (Ruparel College campus), Mumbai. Prabhu is a Chartered Accountant and a member of the Institute of Chartered Accountants of India. He was All India 11th (eleventh) rank holder in CA exam. He is working on his Ph.D. in Climate Change from Frei University Berlin and Public Finance from Mumbai University.
त्यांचा समावेश उशिराने झाल्याने त्या बातमीत त्यांचेबद्दल माहिती दिलेली नाही.
25 Nov 2015 - 5:05 pm | मृत्युन्जय
हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला आहे. मला अगदी असेच म्हणायचं होतं असं तुम्ही कसं काय ठरवलंत.
हा अजिबात काढलेला अर्थ नाही. तुम्हीच हे लिहिलेले आहे.
तुमच्याच सिलेक्टीव रिडींग आणी बायसबद्दल तुमचे काय मत आहे?
मी असले प्रकार करत नाही.
एका साध्या गमतीदार वाक्यात तुम्हाला विखार, विद्वेष, आंधळा विरोध वैगेरे ठासून भरलेला दिसून येण्याइतके काय बोचले बुवा?
तेजप्रताप यादवची तुलना मी कितीही चिडलो तरी मनमोहन सिंगांशी नाही करु शकणार. तेवढे तारतम्य मी नक्की बाळगुन आहे. त्याची मोदींशी तुलना नेमके हेच खटकले. कारणेही सांगितली आहेत. कृपा करुन वाचा.
म्हटले तर त्या वाक्याला बरेच पैलू आहेत पण विखार, विद्वेष, आंधळा विरोध तुमच्या चष्म्यामुळे तुम्हाला दिसत असेल तर माझा दोष नाही.
मी वापरत असेनच तर झीरो नंबरचा पुर्ण पारद्र्शक काचांचा चष्मा वापरत आहे असे म्हणेन
भाजपचे सरकार आहे म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाविरूद्ध एकही वावगा शब्द ऐकुन घेतला जाणार नाही, त्याविरूद्ध बोलणार्याचा अपमानच केला जाईल अशी काहीशी जालावरिल भक्तमंडळींची नीती आहे, तुम्हीही त्यांना सामील आहात काय?
मी वेळोवेळी केलेली वक्तव्ये वाचुन देखील कोणी हे म्हणत असेल तर माझा नाईलाज आहे. सध्या तरी जालावर मला मोदींच्या अंध भक्तांऐवजी मोदींचा आंधळा विरोध करणारे द्वेष्टेच दिसतात. तुम्हीही त्यांना सामील आहात काय?
25 Nov 2015 - 6:36 pm | संदीप डांगे
वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे.
एकतर वाक्यात मोदी उल्लेखच नाही. त्यातून रोख फक्त कमी शिकलेल्या, अनुभव नसलेल्या लोकांकडे होता. भारतातले कुठलेही मंत्रीमंडळ अनेक कच्च्या-पक्क्या धाग्यांचं असतंच असतं हे तुम्हीही अमान्य करणार नाही. माझा रोख फक्त ह्या विसंगतीकडे होता की भाजपसमर्थक आपण जगातले सर्वश्रेष्ठ, सुविद्य, सुप्रीम असे मंत्रीमंडळ दिले आहे ह्या थाटात बिहारच्या मंत्रीमंडळाची खिल्ली उडवत आहेत. आता ग्राउंड रीअॅलिटी निदर्शनात आणून देणे आंधळा विरोध, विखार वैगेरे असेल तर परदेस मधल्या शाहरूखखानच्या स्टैल मधे म्हणतो की "हां है..."
25 Nov 2015 - 7:10 pm | मृत्युन्जय
वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे.
माझ्याकडुन शिकण्यासारखे बरेच काही आहे. पण आत्ता मिपावर किती शिकवणार ना तुम्हाला. प्रत्यक्ष भेटीत सवडीने बघू.
एकतर वाक्यात मोदी उल्लेखच नाही.
क्लिंटनने लिहिले होते
त्यावर तुम्ही लिहिले
आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा बॉस प्रॅक्टिकली म्हणजे पंतप्रधान. त्यामुळे तुम्ही मोदींबद्दल लिहिले नव्हते हे विधानच हास्यास्पद आहे. अशी विधाने केली नसती तर मी पुढचे सगळे लिहिलेच नसते.
त्यातून रोख फक्त कमी शिकलेल्या, अनुभव नसलेल्या लोकांकडे होता.
दुसरा प्रतिवाद मी आधीच केला आहे. पण तुम्ही तो पद्धतशीरपणे दुर्लक्षित असाल तर मी परत तेच लिहितो.
. या पुत्रांची नक्की लायकी काय हे कळु शकले तर उत्तम. सगळ्या सोयी असुनसुद्धा हे दोघे शिक्षणही पुर्ण करु शकलेले नाहित हे पुन्हा नमूद करु इच्छितो. यांची आणि मोदींची तुलनाच काय?
भारतातले कुठलेही मंत्रीमंडळ अनेक कच्च्या-पक्क्या धाग्यांचं असतंच असतं हे तुम्हीही अमान्य करणार नाही.
नाही कधीच अमान्य करणार नाही. पण किमान प्रमुख धाग्यांचे स्वतःचे काही कर्तुत्व असावे असे वाटते. ही मागणी अव्यवहार्य आहे काय?
माझा रोख फक्त ह्या विसंगतीकडे होता की भाजपसमर्थक आपण जगातले सर्वश्रेष्ठ, सुविद्य, सुप्रीम असे मंत्रीमंडळ दिले आहे ह्या थाटात बिहारच्या मंत्रीमंडळाची खिल्ली उडवत आहेत.
माझा पुर्ण रोख तुय्मच्या या वक्तव्याकडे आहे
. हा पराकोटीचा विद्वेष झाला. मोदींनी आपले कर्तुत्व सिद्ध केलेले आहे आणी मग ते पंतप्रधान झालेले आहेत. एक पंतप्रधान म्हणुन ते किती यशस्वी / अयशस्वी ठरतात ते काळ ठरवेल आणि मग त्यांचे पंतप्रधान म्हणुन मुल्यमापन करण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार असेल पण सध्या एका नववी नापास, अननुभवी, स्वतःची वेगळी काही ओळख अथव लायकी नसलेल्या माणसाच्या रांगेत मोदींना बसवुन तुम्ही केवळ आंधळा द्वेष दाखवत आहात. आंधळे मोदीद्वेष्टे कधी या पातळीवर येतील असे वाटले नव्हते.
भाजपसमर्थक आपण जगातले सर्वश्रेष्ठ, सुविद्य, सुप्रीम असे मंत्रीमंडळ दिले आहे ह्या थाटात बिहारच्या मंत्रीमंडळाची खिल्ली उडवत आहेत.
टॉटेलिटी मध्ये विचार करता भाजपाने आजवरचे सर्वोत्तम सरकार / मंत्रिमंडळ दिले आहे यात वाद नाही. पण सगळेच मोहरे पात्र आहेत असे मात्र अजिबात नाही. अश्या लोकांना मंत्रिपदे देण्याची चूक त्यांनीही केलीच आहे. अलबत इतरांपेक्षा कमी प्रमाणात.
मोदी आणी तेजप्रताप यांची तुलना ही जर तुमची ग्राउंड रीएलीटी असेल अणी मग ते शाहरुख खान वगैरे म्हणत असाल तर बोलणेच खुंटले.
तुम्ही तुमचे मूळा वक्तव्य बदलुन वेगळेच काही म्हणायचे असेल तर अजुन सांगा. त्या केस मध्ये "
हे तुमचे वक्तव्य बाद समजुन इतर चर्चा करता येइल. सद्य परिस्थितीत याला आंधळ्या द्वेषाशिवाय अजुन काही म्हणणे शक्य नाही.
25 Nov 2015 - 7:37 pm | संदीप डांगे
तुम्ही काय वाचता आणि विचार करता ते तुमचं तुम्हीच बघा आता. टृमन यांच्या प्रतिसादातल्या वाक्यात आहे की उच्चविद्याविभूषित आयएएस ऑफिसर्स त्यांच्या बॉसला म्हणजे एका तुलनेने कमी शिकलेल्या, अनुभवशून्य मंत्र्याला रिपोर्ट करतात. इथे बॉस म्हणजे ज्यांना आयएएस रीपोर्ट करतात तो, तो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री वा पंतप्रधानच असतो असे कुठे आहे? असेल तर सांगा. माझ्या अल्पमतीप्रमाणे सर्वच मंत्र्यांना, यात राज्यमंत्रीपण आले, आयएएस लोकांनी रीपोर्ट करणे घडतच असते. त्यात सिलेक्टीवली फक्त मोदी कुठून आले?
मोदी चुकूनही, अनावधनानेही हास्यास्पद ठरवले जाऊ नयेत यासाठी तुमचा हा, माझ्याकडून, खुलासा काढून घेण्याचा आटापिटा असेल तर असोच. इथे 'मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाचे 'बॉस' आहेत' आणि मी त्यांना टार्गेट करतोय हा तुम्ही लावलेला शोध आहे. त्यात काही चुकीचं बोलत आहोत असे आपल्याला वाटत नसेलच.
मला मोदींवरच शरसंधान करायचे असते तर तसे स्पष्ट बोललो असतो. मी याआधी इथे मिसळपाववर मोदींबद्दल जहरी टिका केली आहे याचे उदाहरण दाखवून द्यावे ज्याचा संदर्भ घेऊन मी विखारी, आंधळा द्वेषी आहे असे लेबल आपण चिकटवत आहात?
बाकी आपण सूज्ञ आहात अशी मला खात्री आहेच.
26 Nov 2015 - 12:05 pm | मृत्युन्जय
तुम्ही काय बोलत आहात तुमचे तुम्हाला तरी कळते अहे का? क्लिंटनने लिहिले आहे:
इथे स्पष्टपणे लालूच्या सुपुत्रांना रिपोर्ट करणार्या आयएएस ऑफिसर्स बद्दल लिहिले आहे.
मोदींचा उल्लेख तुम्ही केला. मी किंवा क्लिंटनने नाही. तुम्ही अधिकाधिक गोंधळुन जाउन किंवा गोंधळात टाकण्यासाठी प्रतिसाद देत आहे की काय हे कळत नाही. तुमचे सर्व प्रतिसाद आणी आता हा प्रतिसाद तुम्हीच पुन्हा वाचा. मी परत लिहितो की सर्व सोयीसुविधा असुनही जो स्वतःचे शालेय शिक्षण पुर्ण करु शकत नाही अश्या एका सधन राजकारण्याचा मुलगा आणि मोदी यांचे तुलनाच होउ शकत नाही.
मला काही प्रॉब्लेम नाही ब्वो. शेवटी प्रत्येकाची स्वत:ची जाणा, समज वगैरे असतेच की. पण कोणी चुकीचे बोलले तर त्याला प्रतिवादही मी करणारच. तुम्ही चुकीचे लिहिलेच नाही असे जर तुम्हाला माझ्याकडून वदवुन घ्यायचे असेल तर मझा नाईलाज आहे.
इथे 'मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाचे 'बॉस' आहेत' आणि मी त्यांना टार्गेट करतोय हा तुम्ही लावलेला शोध आहे.
तुम्ही तेच लिहिले आहे. तुम्ही चुकीचे लिहिले असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही. नसती तुलना करण्याचा तुमचा इरादा नसेल तर ठीकच आहे पण म्हणून तुम्ही लिहिलेले बरोबर ठरत नाही. तुम्ही लिहिताना चुकीचे लिहिले असेल कदाचित यावर मी फारतर विश्वास ठेउ शकतो.
त्यात काही चुकीचं बोलत आहोत असे आपल्याला वाटत नसेलच.
हे अगदी बरोबर बोललात.
मला मोदींवरच शरसंधान करायचे असते तर तसे स्पष्ट बोललो असतो.
मी वर लिहिलेलेच परत लिहितो. नसती तुलना करण्याचा तुमचा इरादा नसेल तर ठीकच आहे पण म्हणून तुम्ही लिहिलेले बरोबर ठरत नाही. तुम्ही लिहिताना चुकीचे लिहिले असेल कदाचित यावर मी फारतर विश्वास ठेउ शकतो.
मी याआधी इथे मिसळपाववर मोदींबद्दल जहरी टिका केली आहे याचे उदाहरण दाखवून द्यावे ज्याचा संदर्भ घेऊन मी विखारी, आंधळा द्वेषी आहे असे लेबल आपण चिकटवत आहात?
तुमच्या ज्या मूळ प्रतिसादाला माझा उपप्रतिसाद आहे त्याला उद्देशून सर्व चर्चा चालू आहे. बाकी उत्खनन करण्यात मला इंटरेस्ट नाही.
तुम्हाला तेजप्रताप आणि मोदी या दोन व्यक्तींची तुलना करायची नव्हती असे तुमच्या वरील प्रतिसादावरुन वाटते आणि कदाचित तुम्हाला वेगळेच काही म्हणायचे असावे पण वाक्यरचना चुकली असेल. ती दुरुस्त करुन घ्या अशी सूचना करतो
बाकी आपण सूज्ञ आहात अशी मला खात्री आहेच.
धन्यवाद.
अवांतरः तुमच्या प्रतिसादावरुन असे ध्वनित होत होते की तेजप्रतापला रिपोर्ट करायला लागणे हे आयएएस ऑफिसर्ससाठी जसे हीनपणाचे होते तसेच मोदींना रिपॉर्ट करणे मंत्रिमंडळासाठी आहे. माझा संपुर्ण प्रतिवाद त्या वाक्याला अनुषंगुन आहे. तसे तुम्हाला म्हणायचे नसेल (असे वरील प्रतिसादावरुन वाटते) तर आपण या वादविवादावर पडदा टाकु शकतो. त्या केस मध्ये माझा हा शेवटचा प्रतिसाद या विषयावर.
धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.
26 Nov 2015 - 12:32 pm | संदीप डांगे
कुठे आणि कधी केला ते जरा दाखवून द्या.
मी लिहिलेल्या वाक्याचा तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा अर्थ काढलात तर मी काय करू शकतो? प्रत्येक गोष्ट मोदीविरोधातच आहे असे पूर्वग्रहदुषित चष्म्याने पाहणे नाही तर काय आहे? मला फक्त मंत्री आणि आयएएस इतकाच संबंध दाखवायचा होता. तेजप्रतापला आयएएस रिपोर्ट करतील तसे मोदींना मंत्रीमंडळ रिपोर्ट करतं हे तर मला कधी स्वप्नातही सुचले नसते त्यामुळे म्हणून तेजप्रताप व मोदी एकाच लायनीत हे तर जन्मात कधी सुचलं नसतं.
नको तो अर्थ काढून बेताल वक्तव्ये करणे हे तुमच्यासारख्या संतुलित विचाराच्या व्यक्तिने करणे माझ्यासाठी खरंच धक्कादायक आहे. याआधी कधी तुम्ही असे केलेले आठवत नाही.
तुम्हाला माझ्या वाक्याचा योग्य अर्थ कळला आहे असे समजते त्यामुळे माझाही ह्या विषयावर पडदा.
24 Nov 2015 - 10:49 am | अनुप ढेरे
सहमत आहे. केंद्रात एचारडी मंत्रीपण होतील हे महाशय अशाने!
24 Nov 2015 - 11:29 am | अर्धवटराव
पण बुडत्यांची मजा बघण्याचं निर्ढावलेण अजुन कमावलेलं नाहि ना आम्हि :(
24 Nov 2015 - 10:50 am | मदनबाण
"यथा मूर्ख प्रजा तथा भ्रष्ट राजा"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev
24 Nov 2015 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
Sharad Govindrao Pawar
Education 10th Pass SSC 1958 [1]
Profession Politician
As of 29 October, 2010
[1]* PAWAR SHARADCHANDRA GOVINDRAO(Nationalist Congress Party(NCP)):Constituency- Madha(MAHARASHTRA) - Affidavit Information of Candidate:. Myneta.info. Retrieved on 2014-05-21.
24 Nov 2015 - 11:36 am | बबन ताम्बे
ते तर पुण्याला बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकायला होते. तसेच पुर्वी ११ वी होती ना? मग ११वी पास झाल्याशिवाय कॉलेजला प्रवेश कसा मिळाला असेल?
24 Nov 2015 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
Affidavit Information of Sharad Pawar
http://myneta.info/ls2009/candidate.php?candidate_id=3749
24 Nov 2015 - 4:36 pm | कपिलमुनी
लिंक जबरदस्त !
पवारांची माहिती वाचून मजा वाटली.
इथेच स्मृती इराणी यांची दोन वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे सापडली.
2004
2014
२००४ च्या प्रतिज्ञापत्रात १९९६ साली बी.ए. कॉर्स्पॉडन्स केला होता आणि २०१४ साली ते गायब होउन १९९४ चा बी कॉम (पार्ट -१) दाखवला आहे.
क्यूंकी बीकॉम भी कभी बीए थी !!
24 Nov 2015 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
बरीच रोचक माहिती मिळते इथे. ;)
24 Nov 2015 - 5:21 pm | नाव आडनाव
ह्या लिंक मधे वेगळी माहिती आहे
http://archive.india.gov.in/govt/loksabhampbiodata.php?mpcode=327
बीएमसीसी च्या विकीलिंक मधे जुने विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Brihan_Maharashtra_College_of_Commerce
24 Nov 2015 - 10:08 pm | परिकथेतील राजकुमार
आपण तर बॉ खुद्द काकासाहेबांनी केलेल्या Affidavit वरंच भरोसा ठेवणार. ;)
24 Nov 2015 - 12:07 pm | चिगो
हाणला पराशेठने.. 'इतिहास संशोधक' आहेत ते शेवटी.. ;-)
बाकी हा लेख वॉट्सॅपी माहितीवर आधारीत असेल तर तर त्यात काही चुकापण आहेत, हे सांगु इच्छीतो.. प्रत्युत्तरी वॉट्सॅपी माहितीप्रमाणे श्री. जयकुमार सिंह, ज्यांना दहावी पास दाखवलाय ते सिव्हील इंजिनीअर आहेत.
श्री. विजय कुमार ज्यांना पाचवीवरच रोखलंय, ते स्नातक आहेत.
अब्दुल बारी सिद्दीकी - बारावी-स्नातक..
विजेंद्र यादव-दहावी-स्नातक..
ललन सिंह- आठवी- एम.ए,..
शैलेश कुमार - दुसरी- स्नातक..
अशोक चौधरी - दहावी - पि.एच.डी..
24 Nov 2015 - 12:29 pm | सुबोध खरे
माणसाच्या शिक्षणापेक्षा त्याचे कर्तृत्व जास्त महत्त्वाचे आहे. श्री वसंत दादा पाटील हा माणूस तिसरी कि चौथी पास होते. परंतु त्यांच्या बरोबर काम केलेल्या सर्वच उच्च शिक्षित माणसांचे त्यांच्या "माणूस" समजून घेण्याच्या क्षमते बद्दल अतिशय चांगले मत होते.
त्यांची काम करण्याची तयारी आणि लोकांना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे ते अतिशय लोकप्रिय नेते होते.
श्री लालूंच्या रा ज द मधील नेत्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष द्यावे लागेल. परंतु एकंदर श्री लालू प्रसादाचा इतिहास पाहता ते श्री. नितीश कुमारांना सुखाने जगू देतील असे वाटत नाही.
24 Nov 2015 - 12:29 pm | सुबोध खरे
माणसाच्या शिक्षणापेक्षा त्याचे कर्तृत्व जास्त महत्त्वाचे आहे. श्री वसंत दादा पाटील हा माणूस तिसरी कि चौथी पास होते. परंतु त्यांच्या बरोबर काम केलेल्या सर्वच उच्च शिक्षित माणसांचे त्यांच्या "माणूस" समजून घेण्याच्या क्षमते बद्दल अतिशय चांगले मत होते.
त्यांची काम करण्याची तयारी आणि लोकांना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे ते अतिशय लोकप्रिय नेते होते.
श्री लालूंच्या रा ज द मधील नेत्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष द्यावे लागेल. परंतु एकंदर श्री लालू प्रसादाचा इतिहास पाहता ते श्री. नितीश कुमारांना सुखाने जगू देतील असे वाटत नाही.
24 Nov 2015 - 12:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
लालू प्रसाद ह्यांचे चारा घोटाळ्यातले प्रताप पाहता लेखाचे शीर्षक शक्य होईल असे वाटते, तरीही सरकार स्थापन झाल्याच्या एक महीना आत असा निर्वाळा देणे काही रुचत नाही मला तरी.
शिवाय, राजद जरी बिग्गेस्ट पार्टी म्हणुन उदयाला आला असला तरी एकट्या यादव वोट बेस वर तो सर्वात मोठा पक्ष होणे शक्यच नाही , ह्याचा अर्थ जनतेने लालू ला वोट्स दिली कारण त्यांनी नितीश चा चेहरा अन काम विकले नीट, नितीश ला कामामुळे वोट्स मिळणार होतीच् पण ९ सीट्स कमी म्हणजे त्यांना त्या पुढच्या ५ वर्षात भरून काढायला म्हणून का होईना काम करावेच लागणार आहे असे दिसते आहे, तस्मात् ह्या सरकार ला किमान ६ महीने झाल्यावर जे चित्र उभे असेल त्यावरुन एकंदरित बेसिक निष्कर्ष काढता येईल असे भासते
24 Nov 2015 - 12:55 pm | अर्धवटराव
नितीश सरकार चांगलेच चालेल. लालु आतातायी नाहि. त्यांना हंडी शिजायची वाट बघायची उसंत आहे. किंबहुना नितीश सरकारच्या रुपाने लालुंना अच्छे दिन लानेवाली सरकार आयतीच गावली आहे. मेहेनत नितीश करणार आणि त्याच्या पुण्याईने लालु आपला भ्रष्टाचाराचा कलंक धुवुन काढणार.
24 Nov 2015 - 3:11 pm | मृत्युन्जय
महाराष्ट्रात भाजपाने राष्ट्रवादीला पुन्रुज्जीवित केले आणि बिहार मध्ये नितीश ने लालू बरोबर तेच केले.
नितीश कुमारांबद्दल बरेच चांगले ऐकुन आहे पण त्यांना भाजपा सोडुन लालू बरोबर संगत करायची बुद्धी झाली असेल तर आपण कोण काय बोलणार?
24 Nov 2015 - 4:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
मृत्युंजय भाऊ,
ह्या महागठबंधन बाबतीत नितीश ची पद्धतशीर् गेम मुलायम सिंह ह्यांनी केली आहे
25 Nov 2015 - 11:18 am | गॅरी ट्रुमन
नितीशचा गेम लालूंनी केला आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? बिहारमध्ये मुलायमसिंगांना फारसे स्थान नाही.
25 Nov 2015 - 11:06 pm | चैतन्य ईन्या
हि हि हि पण लालू आणि मुलायम मध्ये काय फरक आहे? दोघेही सारखेच उत्तम प्रतीचे राजकारणी आहेत, किंवा गुंड म्हणा वा पैसे खावू म्हणा
26 Nov 2015 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाही मला मुलायमसिंह यादव असेच म्हणायचे होते गॅरी साहेब, कसे ते सांगतो थोड्यावेळात सद्धया थोड़े कार्यबहुल्य आहे _/\_
27 Nov 2015 - 12:46 pm | अर्धवटराव
:प
वाचण्यास उत्सुक.
27 Nov 2015 - 12:53 pm | कैलासवासी सोन्याबापु
कांस्पीरेसी आहे का काय ते आपले आपण ठरवायचं ही चर्चा बिहार राज्य विशेष शाखाच्या अधिकारी वर्गास करताना इलेक्शन ड्यूटी मधे असताना ऐकली आहे,
बाकी मी माझे राजकीय ज्ञान किंवा ट्रिवियल माहिती गैरी ट्रूमैन ह्यांच्यापेक्षा जास्त आहे असे तरी म्हणाणार नाही
27 Nov 2015 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
लालुंचे राजकीय पुनर्वसन
मुलायम सिंह ह्यांनी एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत असे मला वाटते
बरीच वर्षे आधी लालू प्रसाद ह्यांची इच्छा आपली ज्येष्ठ कन्या मिसा भारती हिचा विवाह मुलायम सिंह पुत्र अखिलेश यादव ह्यांच्याशी व्हावा असा मानस होता त्याला मुलायम सिंह हे तयार नव्हते, ह्या गोष्टीला बरीच वर्षे झाली, तदनंतर यथावकाश मुलायम सिंह ह्यांचा पक्ष हा समाजवादी गटातला सर्वाधिक मोठा पक्ष (एकुण आमदार अन खासदार निवडून येण्याच्या प्रमाणात) म्हणुन उभरला, ह्यावर्षी फेब्रुवरी मधे लालुंची कनिष्ठ कन्या राजलक्ष्मी अन मुलायम ह्यांच्या पुतण्याचा मुलगा तेज प्रताप सिंह (स्वतः खासदार)ह्यांच्याशी झाला व त्या योगे यूपी अन बिहार मधील ही दोन राजकीय यादव मंडळी एकत्र आली, त्यामुळे लालुंचे राजकीय पुनर्वसन करणे हा एक राजकीय अन वैयक्तिक असा मिश्र प्रश्न होऊन राहिला होता कारण आता लालु त्यांचे व्याही होते, पण उघड असे करणे त्यांच्यासाठी हाराकिरी ठरली असती कारण
1 यूपी मधे ढासळती कायदा सुव्यवस्था अन त्या अनुशंघाने झालेला सपाच्या टिकेचा विषय
2 अश्यात जर लालू सारख्या कॉन्विक्ट अन भ्रष्ट माणसाची भलामण केली असता सपा आगामी 2017 निवडणुकीत स्वतःसाठी खड्डा खणती झाली असती
पण हे राजकीय पुनर्वसन करणे आता नव्या झालेल्या संबंधामुळे करणे गरजेचे होऊन बसलेले होते ह्यातुनच मुलायम ह्यांनी एक प्रयोग केला ज्याचे लॅब रॅट्स म्हणुन नितीश कुमार अन लालू वापरले गेले, ह्यातूनच महागठबंधन करणे हा प्रयोग साकार झाला ह्याची उद्दिष्टं खालील प्रमाणे
1 परस्पर लालुंच्या पुनर्वसनाचे कार्य पार पाडणे अन स्वतः नामानिराळे सुद्धा राहणे
2 महागठबंधन चा प्रयोग कितपत अन कसा सक्सेसफुल होतो ते पाहणे
3 बिहारात मित्रपक्ष म्हणून महागठबंधन काँग्रेस ला सुद्धा सोबत बसवणार अन त्या केस मधे आपण सुद्धा ह्या प्रयोगातुन वेगळे निघुन आपला पक्ष तत्वनिष्ठ आहे हे ठसवणे
ह्यातुन सुरुवाती ला महागठबंधन तयार झाले अन लालू, नितीश अन मुलायम एकत्र आलेत असा देखावा निर्माण झाला, नंतर काँग्रेस सोबत जागावाटप अन मैत्री ह्या कारणावरुन आम्ही महागठबंधन सोडतोय हा एपिसोड सुद्धा प्रीप्लान असल्या प्रमाणे झाला इकडे लालुंनी त्यांची सगळी ताकद फक्त नितीश कुमार , त्यांनी केलेला विकास अन त्यांची इमेज मार्केटिंग करण्यात लावली, तसेही राष्ट्रिय नेता असलेला समाजवादी चेहरा म्हणून नितीश हे मुलायम अन एकंदरित समाजवादी कोंडाळ्यात डोईजड़ होऊ घातले होतेच (शरद यादवांस शष्प किंमत नाहिये इकडे आजकाल) ह्या ताकद लावण्या मागे लालुंचा मुख्य उद्देश हा फ़क्त आपल्या मरणासन्न पक्षाला नवसंजीवनी देता आली तर तो अन त्याहुन जास्त आपली दोन लेकरे मार्गी लावणे इतकाच होता बहुतकरून , नंतर राजद हा 80 सीट घेऊन सर्वात मोठा पक्ष झाला ह्यायोगे
1. मुलायम ह्यांची व्याही लोकांचे स्वतःच्या राजकाराणाला तोषिस न लागु देता पुनर्वसन करणे झाले
2. एकेकाळचे एनडीएचे आवडते नेते पंतप्रधान शर्यतीत असलेले नितीश कुमार ह्यांना अनायस मांडी खाली दाबणे झाले
3. आमची पार्टी सत्ता सोडल पण काँग्रेस सोबत एक थाळीत बसुन तत्वांना हरताळ फासणार नाही हे सांगत 2017 साठी बॅकग्राउंड तयार झाले
4. लालू नितीश हे आता एकत्र नांदो न नांदो पण जे काही होईल त्याची जबाबदारी नितीश वर (बहुतकरून) ढकलणे सुलभ अन क्रमप्राप्त झाले
अश्या प्रकारे मुलायम ह्यांनी परस्पर व्याही मंडळीला हा सत्तेचा आहेर केला असे मत निघाले
*चर्चा करणारे सगळे पूर्वांचली अन पश्चिम बिहार म्हणजे आरा बक्सर कडले लोक होते म्हणजे त्यांना ईस्ट यूपी अन बिहार च्या राजनीती ची नीट माहिती असावी असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच, ह्यात काही लूपहोल्स असल्यास ते गैरी ह्यांना समजलेच म्हणा, मी फ़क्त एक विचार जो कानावर आला तो मांडला
27 Nov 2015 - 11:30 pm | चिंतामणी
चांगले विश्लेशण.
28 Nov 2015 - 1:51 am | अर्धवटराव
पटलं नाहि. अर्थात, चर्चेत सहभागी मंडळींना या विषयाची जास्त माहिती असवी...
लालुंच्या राजकीय पुनर्वसाबाबत मुलायम इतके गंभीर असावे काय ? नितीश साहेबांना तिसर्या आघाडीचा सर्वात सशक्त लिडर म्ह्णुन स्थान मिळ्वुन देण्यात नेताजींनी काय कमाल दाखवली ? काँग्रेसशी सलगी दाखवायची नाहि म्हणुन नेताजी इतके कॉन्शस का असावे ? काँग्रेसची ताकत काय उरली आहे युपीमधे ?
28 Nov 2015 - 7:31 am | कैलासवासी सोन्याबापु
१. अनायस लालू व्याही होतेच, त्यांचा वापर नकळत जर नितीश ला दाबण्यात करता आला असता तर एकार्थे त्यांचे पुनर्वसन ही परस्पर झाले असते अन नितीश ही कंट्रोल मधे राहिले असते, त्यामुळे लालुंचे राजकीय पुनर्वसन सुद्धा एक तोंडदेखले कारण, मुळ कारण नितीश कुमार ह्यांना खोड़ा घालणे
२ तिसऱ्या आघाडी मधे नितीश कुमार ह्यांच्या ७१ जागा आहेत, सर्वाधिक जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून राजद उभरला आहे अन ज्याचे राजकीय अस्तित्व बिहारात भोपळा कसेबसे (ते ही फुटलाच तर) फोडणाऱ्या काँग्रेस ला सुद्धा २७ सीट्स मिळाल्या आहेत,मग नितीश कुमार तिसऱ्या आघाडीचे सर्वात सशक्त नेते उरले कसे??
३. काँग्रेस १२ची आहे स्पष्ट बोलले तर, अन ते लोक बाउंसबॅक ही करतात खड्डयातुन, काँग्रेस ची यूपी मधे आज ताकद काहीच नाही तशी ह्या निवडणुकी अगोदर बिहार मधे ही नव्हती , २०१०च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ने स्वतंत्रपणे २४३ (सगळ्या) सीट लढवल्या होत्या ज्यातून ते फ़क्त ४ सीट जिंकले होते (तेव्हा लोकसभा निवडणुकीसम मोदी लाट नव्हती तरीही हे असले पानीपत झाले त्यांचे) तेच २०१५ मधे बिहारात त्यांनी महागठबंधनात प्रवेश केला ज्यात त्यांचा पूर्वोतिहास पाहून त्यांना ४१ जागा त्याही राजद-जदयू वाटपानंतर उरलेल्या दिल्या गेल्या होत्या ज्यातल्या हे लोक २७ जागा जिंकले आहेत, ह्यावरुनच नेताजींच्या मनात काँग्रेस बद्दल काय सुरु असेल (विशेषतः २०१७ चा विचार करता) ह्याचे चित्र बहुतांशी स्पष्ट होते असे वाटते
28 Nov 2015 - 12:09 pm | अर्धवटराव
म्हणुन ते सर्वात तिसर्या आघाडीचे (तशी बनलीच तर) सशक्त नेते (सध्यातरी) आहेत. लालूंना जास्त जागा मिळाल्या तरी व्हॅल्यु नितीशसाहेबांचीच आहे. अर्थात, लालुंचा खोडा असेलच. या तिसर्या आघाडीत काँग्रेस नाहिच. अन्यथा युपीए वि. एन्डीए असा दुहेरी सामनाच होईल.
असो. जे व्हायचे ते होईल :)
28 Nov 2015 - 1:53 pm | गॅरी ट्रुमन
रोचक माहिती. पण थोडीशी फार-फेच्ड वाटली.
मुलायम आणि लालू यांचे गेली कित्येक वर्षांपासून राजकीय दृष्ट्या कधीच जमले नव्हते. १९९८ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेत आल्यानंतर दोघांनी "राष्ट्रीय लोकतांत्रिक मोर्चा" नावाची आघाडी स्थापन केली होती ती तशी एकच खेळी दोघांनी एकत्रपणे केली होती. भारताने अणुचाचण्या घेतल्या म्हणून पाकिस्तानलाही अणुचाचण्या घेणे भाग पडले आणि त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आले म्हणून एका अर्थी भारताने पाकिस्तानचे नुकसान केले असल्यामुळे भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपये द्यावेत अशी अजब मागणी मुलायमसिंगांनी याच रा.लो.मोर्चातर्फे घेतलेल्या एका सभेत केली होती. हा मोर्चाही नंतर फार काळ टिकला नाही.
त्यांच्यातले नातेसंबंध प्रस्थापित झाले असले तरी नेतेमंडळी राजकारण आणि वैयक्तिक नाते-मैत्री वेगळ्या ठेवतात हे पण स्पष्टच आहे.त्यामुळे नातेसंबंध प्रस्थापित झाले म्हणून लालूंचे पुनर्वसन मुलायमसिंगांना करावेसे वाटणे हे तितकेसे पटले नाही (शरद पवारांचे बाळासाहेब ठाकरे आणि भैरोसिंग शेखावत अशा अनेक नेत्यांशी चांगलेच मैत्रीसंबंध होते. तीच गोष्ट प्रमोद महाजनांची.एकाच कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांविरूध्द निवडणुक लढविण्याचेही प्रकार झालेच आहेत) पण त्यांनी राजकारण आणि मैत्री या गोष्टी वेगळ्या ठेवल्या.
दुसरे म्हणजे २०१४ मध्ये मोदीलाटेत वाहून गेल्यानंतर नितीश आणि लालू या दोघांनीही एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. काही प्रमाणात काँग्रेसने या दोघांना एकत्र आणण्यात कॅटॅलिस्टची भूमिका बजावली असे म्हणता येईल. पण मुलायमसिंगांनी त्यात नक्की किती प्रयत्न केले?
२०१९ मध्ये तिसर्या आघाडीकडून कदाचित पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडेल म्हणून आपल्याला प्रतिस्पर्धी नको या दृष्टीने नितीश अशक्त झालेले मुलायमसिंगांना नक्कीच हवे असतील. आणि म्हणून नितीशपेक्षा लालू अधिक बलिष्ठ झालेलेही मुलायमसिंगांना हवे असतील हे पण समजू शकतो. पण म्हणून या सगळ्याचा पडद्यामागचा सूत्रधार मुलायमसिंग कसे ठरतात? एक उदाहरण द्यायचे झाले तर २००४ मध्ये अमेरिकेत जॉर्ज डब्ल्यू बुश विरूध्द जॉन केरी अशी अध्यक्षपदाची निवडणुक झाली होती.आणि जॉन केरी पेक्षा भारताच्या दृष्टीने बुश हे अध्यक्ष होणे अधिक अनुकूल ठरेल या दृष्टीने भारतीय नेत्यांनाही बुशच जिंकायला हवे होते असे वाचल्याचे आठवते. प्रत्यक्षात झालेही तसे. पण म्हणून २००४ च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा पडद्यामागचा सूत्रधार भारत होतो असा अर्थ थोडीच निघतो? ज्या घटना घडल्या त्या मुलायमसिंगांना तशाच घडायला हव्या होत्या.पण त्या तशा घडल्या याचा अर्थ मुलायमसिंगांनी त्या तशा घडवून आणल्या असे कसे म्हणता येईल?
अर्थात हे माझे मत झाले. मी बिहारमध्ये एकदाही गेलेलो नाही की तिथल्या ग्राऊंड रिअॅलिटीची माहिती व्हावी या दृष्टीने तिथल्या कोणाशीही बोललेलो नाही. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचे तसे मत असेल तर ते नक्कीच अधिक व्हॅलिड ठरेल. पण वरकरणी हे पटायला जरा जड वाटते.
28 Nov 2015 - 8:47 pm | अनुप ढेरे
अर्र.. हे माहिती नव्हतं.
28 Nov 2015 - 9:26 pm | गॅरी ट्रुमन
सप्टेंबर १९९८ मध्ये मुलायमसिंगांनी हे विधान केले होते. त्यावेळी ते पेपरमध्ये वाचले होतेच आणि बातम्यांमध्येही बघितले होते. त्याचा डायरेक्ट पुरावा सापडला नाही पण त्या विधानाबद्दल मुलायमसिंगांवर बाळासाहेब ठाकर्यांनी टिका केली हा दुवा मात्र लगेच सापडला.
28 Nov 2015 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी
अकोल्याचे खासदार यांनीही लालू-मुलायम यांच्या पाकिस्तानला २००० कोटी रुपयांची मदत देण्याच्या मागणीला पाठींबा दिला होता.
त्यांनी असा तर्क मांडला होता की शांतता एक तर शत्रुला नामोहरम करून मिळवता येते किंवा पैसे देऊन विकत घेता येते :-) .
24 Nov 2015 - 12:48 pm | मालोजीराव
आधीची सरकारे आयआयटीयन्स चालवत होते नै का !
24 Nov 2015 - 12:57 pm | सुबोध खरे
आय आय टी यन ने अत्यंत कार्यक्षमतेने चालविलेले एक सरकार माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आहे. गोवा येथे श्री मनोहर पर्रीकर यांचे. विशेषतः घोडे बाजार आणी त्यामुळे भ्रष्टाचार्यांना आलेला माज त्यांनी उतरवून दाखविला आहे.
बाकीच्यांबद्दल माहिती नसल्यामुळे पास.
28 Nov 2015 - 2:53 pm | चिंतामणी
तुम्ही "यूगपुरषाला" विसरत आहात.
बाकी त्यांच्या कारभाराबद्दल न बोलणेच हे उत्तम.
24 Nov 2015 - 1:08 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयआयटी वाले युगपुरुष सर्टिफिकेट वाटप तज्ञ श्रीश्री १२००१ ईमानदार पक्ष वाले दिल्लीत काय करीत आहेत सद्धया? लोकपाल किंवा इतर काही निर्णय त्यांनी उत्तम घेतले असतील पण त्यांचा मुळ पिंड हा मोदी विरोधावर पोसलेला आहे हे मान्य न करणे म्हणजे ताकाला जावुन भांडे लपवणे म्हणवेल काय?
24 Nov 2015 - 3:16 pm | कपिलमुनी
गजेंद्र चौहानचा लॉजिक इथे लावा !
क्वालीफिकेशन महत्वाचा नाही, आधी काम करू द्या ! मग कामावर ठरवा =))
दोन्ही धाग्यांवर वेगवेगळे चष्मे घातलेले आहेत.
24 Nov 2015 - 3:28 pm | संदीप डांगे
तुमचं कायतरीच हां मुनिवर... चार्ली हेब्दोची बाजू घेणारे पिंगा गाण्यावर किती दंगा करतात ते पाह्यलं न्हाय का?
24 Nov 2015 - 3:39 pm | उगा काहितरीच
पहिली गोष्ट म्हणजे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीत शिकायची गरजच काय ? प्राचीन भारतीय विद्यापीठे असणाऱ्या बिहार मधे जन्म झाला की बस्स ! सगळं ज्ञान आपोआप मिळते .
24 Nov 2015 - 3:55 pm | जयन्त बा शिम्पि
श्रीमती राबडी देवी , निरक्षर होत्या , त्यांच्यापुढे असेच आय ए एस अधिकारी झुकत होते , आणि तेही तब्बल पाच वर्षे ! ! त्यामानाने लालुंचे दोन्ही सुपुत्र कमीत कमी आठवी नववी तरी पास झाले आहेत , व नितीशकुमारांच्या मंत्रीमंडळात सामिल झाले आहेत. बिहार राज्याच्या मंद गतीने विकास साधणार्या राज्यासाठी आणि तशाच जनतेसाठी ही प्रगती नव्हे काय ? उगाच बोंबाबोंब कशाला ? काल्चक्र उलटे फिरले आहे एव्हढेच ! पुर्वी ' यथा राजा , तथा प्रजा ' असे म्हटले जायचे , आता ' यथा प्रजा , तथा राजा ' असे झाले ! फार काही बिघडले नाही असेच म्हणायचे . इट हॅपन्स ओन्ली इन इंडीया !
24 Nov 2015 - 4:52 pm | सागरकदम
स्मृती इराणी शिक्षण मंत्री आहेत ,त्याला तर आक्षेप नवता घेतला तुम्ही, जाऊ द्या शिक्षण आणि कर्तुत्व ह्याचा संबध नसतो
24 Nov 2015 - 6:50 pm | सुबोध खरे
मला एक गोष्ट कळत नाही कि कोणाच्याही शिक्षणाचा एवढा बाऊ का करीत आहेत?
श्री नितीश कुमार इंजिनियर असल्याने मुखमंत्री म्हणून त्या पदवीचा त्यांना कितपत फायदा झाला? किंवा केवळ एक उदाहरण म्हणून उद्या जर मी बांधकाम खात्याचा मंत्री झालो तर माझ्या वैद्यकीय एम डी पदवीचा कितपत फायदा होईल. कोणत्याही खात्यात तेथील तज्ञ लोक सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतात. तो सल्ला कसा वापरायचा याची व्यवहार बुद्धी ज्याच्या कडे असेल तो माणूस यशस्वी होऊ शकतो.
मुळात आय ए एस माणसे काय सर्वज्ञ असतात? ते लोक हि असाच अनुभव, व्यवहार ज्ञान आणि शहाणपण याचा जास्तीत जास्त चांगला(OPTIMUM) उपयोगच करत असतात.
आय ए एस किंवा मोठ्या व्यवस्थापन संस्थांच्या पदव्या हेच शिकवतात कि आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्रीचा सदुपयोग(OPTIMAL UTILISATION) कसा करायचा.
साधे उदाहरण म्हणजे घरात आपल्याला गरम होत असते तेंव्हा आपण थेट पंख्याखाली बसतो.पंखा एकच खोली एकाच पण कोपर्यात बसलो तर वारा लागणार नाही. हे ज्याला कळले, तो यशस्वी व्यवस्थापक, सचिव किंवा मंत्री होऊ शकतो.
दुर्दैवाने आज कोणत्याही विद्यापीठात व्यवहार बुद्धी(COMMON SENSE) आणी शहाणपण( WISDOM) शिकवले जात नाही. त्यामुळे माझ्या मते पदवीचा आणी चांगला मंत्री होण्याचा थेट संबंध नाही.
काही फरक एवढाच आहे कि तेजस्वी यादव आणी इतर स्वतःच्या कर्तृत्वावर वर आलेले नाहीत तर बापाच्या गादीवर बसले आहेत. त्या गादीचा कसा उपयोग ते करू शकतात यावर त्यांचे यश किंवा अपयश अवलंबून आहे.
24 Nov 2015 - 6:56 pm | संदीप डांगे
सहमत. विरोध योग्य मुद्द्यांवर झाला तरच विरोधकाचा सन्मान होतो. अन्यथा...
24 Nov 2015 - 7:41 pm | शलभ
+१११११११
24 Nov 2015 - 7:50 pm | विवेकपटाईत
साक्षर आणि शिक्षण यात फरक असतो. पण लालूच्या पोरांना कुठले शिक्षण मिळाले आहे, याचा विचार केला पाहिजे. तूर्त बिहारहून मुंबईला येणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही.
25 Nov 2015 - 10:53 am | नाखु
भवितव्याबद्दल जितका मिपाकर विचार करतात ते स्वतः(बिहारीही) करीत नाहीत असे रोचक निरिक्षण आहे....
दैनीक "फुपाटा" मधील राजकारण, विनाकारण शिकरण आणि आपण या लेखातून साभार
25 Nov 2015 - 12:04 pm | कपिलमुनी
चिंता करतो विश्वाची!
बँडविडथ आहे मिपाची ||
25 Nov 2015 - 10:25 pm | चिंतामणी
प्रवास उलटा खरोखरच चालू झाला की नाही याबद्दल बोलावे असे वाटते.
आता जंगलराज परत येउ लागल्याच्या बातम्या यायला सुरवात झाली आहे. ही बघा बातमी.
प्रथमच आमदार म्हणुन दिवडुन आलेल्या राजदच्या आमदाराने पोलिस इनस्पेक्टराला जिवे मारण्याची धमकी दिली.
अश्या अजुन येउ लागल्याने काल लालुजींनी आमदारांचा वर्ग घेतला आणि कसे वागा सांगीतले.
27 Nov 2015 - 1:05 pm | कपिलमुनी
दारुबंदीचा निर्णय आणि पहिल्या ५ कर्जबाजारी राज्यात नाव नसणे (महाराष्ट्र एक नंबर ) !
किती ही अधोगती !
27 Nov 2015 - 11:29 pm | चिंतामणी
हा निर्णय दिसतो तेव्हढा सरळ नाही. अर्थात सांगुन उपयोग होणार नाही. म्हणुन इतकेच लिहीतो.