नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
अंड्याची टरफलं
आपले अनुभव असेच काहीसे
निष्कर्ष आणि ज्ञान
बाहेर यायच्या आधीच...
पाहतो आहे..
पडलेली टरफले
अस्ताव्यस्त..
टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे. एखाद्या पूर्ण वाक्यात मांडता येणारा अनुभव वाक्ये तुटक करुन आणि शब्द वेगळ्या क्रमाने मांडले की त्यातून सौंदर्य निर्मिती कशी होते याबद्दल जाणकारांकडून काही समजून घ्यावेसे वाटले.
हे लिहित असतानाच अजून एक कल्पना सुचली.
लेस काढलेले माझे बुट
पाहत आहेत माझ्याकडे
आ वासून...
शाळेत निघालेला लहानगा
पाहतोय वाट आईची
बांधण्यासाठी
टायची गाठ
वरील रचनेतली वाक्ये सरळ शब्द क्रमाने लिहिली तर एक छोटीशी मजेदार कल्पना एखाद्या लहानश्या लेखात एक दोन ओळीत बसेल असे वाटले.
मग अश्या कल्पनेला पूर्ण स्वतंत्र काव्याचा मान केवळ शब्दरचना बदलल्याने मिळावा का? असे मनात आले.
आपली मते ऐकायला उत्सुक आहे.
--लिखाळ.
प्रतिक्रिया
24 Dec 2008 - 1:38 am | आजानुकर्ण
नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
अंड्याची टरफलं...
आणि कांद्याचीही
आजही ऑम्लेट वाटतं!
आपला
(ऑम्लेटवाला) उद्धव महाराज आजानुकर्ण
लेस काढलेले माझे बुट
पाहत आहेत माझ्याकडे
आ वासून...
सांगताहेत जणू
आता तरी सॉक्स धू की लेका.
आपला
(घाणेरडा) आजानुकर्ण
24 Dec 2008 - 8:51 pm | लिखाळ
:) हा हा.. हे मस्त.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 1:59 am | चतुरंग
नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
कल्पनांची टरफलं
आजकाल लेखन असेच काहीसे
वृत्त आणि मात्रांना
बहर यायच्या आधीच...
फाडतो आहे..
रचलेल्या कविता
अस्ताव्यस्त..
-----------------------------
माझ्या उरलेल्या केसांच्या बटा
पाहत आहेत आरशात
आ वासून...म्हणत
आता तरी कलप लावणं थांबव की!
'शाळा' करत बसलेला टोणगा
पाहतोय वाट बाईंची
मारण्यासाठी
कागदी बाण!
चतुरंग
24 Dec 2008 - 8:54 pm | लिखाळ
ह्म्म असेच काहीसे वाटले म्हणूनच हा लेख लिहिला. पण अशी तुटक वाक्ये रस पूर्ण असतात असे अनेकांना वाटते. खाली असे काही प्रतिसाद आहेत, त्यांची मते सुद्धा बरोबर वाटतात.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 9:30 pm | चतुरंग
तुटक वाक्ये अर्थपूर्ण असली की त्यातून स्फूर्ती घेऊन नवीन काव्य होते. कृपया गैरसमज नसावा.
चतुरंग
24 Dec 2008 - 9:37 pm | लिखाळ
गैरसमज कसला ! उलट तुमची प्रतिक्रिया मार्मिक होती.
मला आवडली आणि पटली होती.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 2:31 am | धनंजय
हा प्रश्न ठीक वाटला नाही. "स्वतंत्र काव्याचा मान" असे प्रमाणपत्र कुठलेच नसावे असे वाटते. ॐ या एका अक्षराला स्वतंत्र जपमंत्राचा मान असावा काय? असे विचारण्यासारखे आहे.
पण "ओळी तोडून आशयात काही फरक पडतो का?" असा फेरबदल करून तुमचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. माझ्या मते कधीकधी फरक पडतो. शब्द रचणार्याच्या मनात वाक्य वाचण्याची लय काय होती? अति-स्वल्पविराम कुठे होते? या बद्दल काही निर्देश ओळी तोडल्यामुळे मिळतात.
शब्दवाचनाला सुयोग्य लय असली, ठेका असला, तर वेगळा आशय, आशयाचा वेगळा पैलू वाचकापाशी पोचतो. लयीशी फारकत घेऊन ओळी तोडू नयेत, उदाहरणार्थ -
असे वाचताना बरे वाटत नाही. पण तुमच्या लेखात बहुतेक ओळी ज्या ठिकाणी तोडल्या त्या ठिकाणी ठीक वाटतात.
काहीतरी सुंदर किंवा अर्थपूर्ण वाचकापर्यंत पोचवायचे असेल, ओळी तोडून काही विशेष परिणाम साधत असेल, तर शब्द रचणार्याने "स्वतंत्र काव्याचा मान" वगैरे अवांतर कल्पनांनी स्वतःला जोखडू नये.
**अंड्यांच्या टरफलांची कल्पना अजून कच्ची वाटली. बुटांची कल्पना आवडली. टायची कल्पना तशी आवडली, पण खूप नाही. लेखकाला स्वातंत्र्य असते, तसे वाचकालाही!**
मुक्तछंद आणि नवकाव्य
नक्की काय असते?
विचार करतानाच्या कल्पना
या मांडल्या.
नक्की काय म्हणायचंय?
पूर्ण वाक्यात न मांडता
छंदोबद्ध रचना न करता
तुटक तुटक वाक्यांत
कशा भावतात वाचकाला?
24 Dec 2008 - 2:41 am | टग्या (not verified)
का
व्य तित
केसे जम
ले ना
हीसे वाट
ले पु
न्हा य
त्न जरू
र करा
वा
24 Dec 2008 - 2:52 am | धनंजय
काही बारीक फेरफार करून ओळी तोडून लेखातली वाक्ये लिहिलेली आहेत.
ओळी तोडताना लय सांभाळावी लागते याचे उदाहरण म्हणून आहे...
"हिरवेहिरवेगार गालिचे" अयोग्य ठि़काणी ओळी तोडून वाचताना बरे वाटत नाही, हेसुद्धा उदाहरणच, काव्य म्हणून नाही.
येथे स्फूर्ती लिखाळ यांना झालेली आहे, या विषयावर काव्यगुण असलेली कविता त्यांनाच जमेल. शाब्दिक उदाहरणाची काव्य-यत्नाशी गफलत झाल्यास दिलगीर ;-)
24 Dec 2008 - 9:03 pm | लिखाळ
बरोबर. अशीच काही साधकबाधक मते मांडली जावीत अशी आपेक्षा होती. आभारी आहे.
वास्तविक अंडी कच्ची असतानाच फुटली :)
या सारख्या केवळ ओळी भलतीकडे तोडून काव्य निर्माण होते का? असा संभ्रम निर्माण झाला होता.
उदाहरणादाखल मी सुद्धा दोन मिनिटात चार कविता पाडू शकतो अश्या तिरिमिरीत मी वरिल दोन रचना अक्षरशः मिनिटाभरात रचल्या आणि समोर ठेवल्या. एखाद्या मोठ्या लेखात ज्या नाविन्यपूर्ण दोन कल्पना एक दोन ओळींची जागा मिळवतील, त्याच कल्पना वाक्यरचनेत बदल केल्याने 'काव्य' ठरल्या. असे होते का? होणे योग्य का? असे प्रश्न पडले म्हणून आपणा सर्वांसमोर मांडले.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 2:42 am | एकलव्य
लिखाळ - आपले स्फुट चटकन मनाला स्पर्श करून गेले.
एखाद्या पूर्ण वाक्यात मांडता येणारा अनुभव वाक्ये तुटक करुन आणि शब्द वेगळ्या क्रमाने मांडले की त्यातून सौंदर्य निर्मिती कशी होते याबद्दल जाणकारांकडून काही समजून घ्यावेसे वाटले.
नक्कीच होते... अहो तेच शब्द आणि तीच वाक्ये योग्य ठिकाणी तोडली की वेगळीच गोडी आणि अर्थ निर्माण होतो. आपल्या छोटेखानी कविता (आ वासून तर झकासच!) तेच तर सांगत आहेत. बोलत किंवा वाचत असाल तर योग्य जागी घेतलेला पॉज शब्दांना एक वेगळीच ताकद देऊन जातो तसेच काहीसे आहे हे!
(जाणकार नसताना मत देणारा) एकलव्य
24 Dec 2008 - 9:06 pm | लिखाळ
आपण फार योग्यच उत्तर दिलेत. माझी भूमिका मी वरती धनंजयांना लिहिलेल्या उत्तरात मांडलीच आहे. आपण जे म्हणता ते विचारात टाकणारे आहे. मला आत्तातरी ते पटल्या सारखे वाटते आहे.
मुक्तछंदाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बनायला या चर्चेमुळे काही मदत होईल ही आशा फळत आहे :)
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 4:25 am | धम्मकलाडू
वरील चर्चा वाचून आम्हाला एक कविता सुचली.
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
24 Dec 2008 - 7:32 am | विसोबा खेचर
काय लिखाळराव, मनस्थिती बरोबर नाही वाटतं हल्ली? :)
अहो एखादी साधी, सोपी परंतु पटकन आवडून जाणारी कविता लिहा की!
तात्या.
24 Dec 2008 - 9:22 am | टग्या (not verified)
"लेस"साठी "नाडी" हा अस्सल मराठमोळा शब्द आहे असे वाटते. त्यामुळे "बुटाची नाडी" हा शब्दप्रयोग अधिक उचित ठरला असता असे वाटते.
(या विषयावरील अधिक चर्चा येथे करणे उचित ठरेल असे वाटते. ;) )
24 Dec 2008 - 9:44 am | विसोबा खेचर
त्यामुळे "बुटाची नाडी" हा शब्दप्रयोग अधिक उचित ठरला असता असे वाटते.
(या विषयावरील अधिक चर्चा येथे करणे उचित ठरेल असे वाटते.
हा हा हा! :)
आमचा टग्या साला पहिल्यापासून एक नंबरचा भिकारचोटच आहे! ;)
असो, अवांतरा/विषयांतराबद्दल क्षमस्व. या संबंधीची पुढील चर्चा कृपया आमच्या खरडवहीत करावी! :)
तात्या.
24 Dec 2008 - 9:11 pm | लिखाळ
तात्या,
तात्या, मी वरील दोन कविता का लिहिल्या ते धनंजय यांना दिलेल्या उत्तरात लिहिलेच आहे. तब्येत ठीक आहे :). कधी जमले तर चांगली कविता करावी अशी इच्छा आहेच :)
टग्या,
लेसला नाडी म्हणावे असे एकदा वाटले. वास्तविक मी बुटाची नाडी असेच नेहमी म्हणतो. लेस क्वचितच म्हणतो. पण नाडी आणि टाय जुळले नसते असे वाटले. आणि नाडी-पट्टी मुळे मिपावर नाडीला जो अर्थ निर्माण झाला आहे त्यामुळे या चर्चेत नाडी शब्दावर कोट्या होत राहू नयेत असे वाटल्याने तो शब्द टाळला.
प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 9:49 pm | चतुरंग
तुमचे मूळ पद्य घेतले आणि त्याचे गद्य रुपांतर केले आहे. फिकट करड्या अक्षरातले कंसातले शब्द हे रीडिंग/फीडिंग बिटवीन द लाईन्स अशा स्वरुपाचे आहेत.
सरळ हेच शब्द लिहून वाक्य लिहिलेत तरी अर्थ पोचतोच पण त्यात वाचकाच्या कल्पनाशक्तीला आवाहन फारसे रहात नाही.
करड्या रंगाचे शब्द गाळून फक्त गाभ्याच्या मूळ कल्पना वाचकासमोर ठेवणार्या पद्याचे सामर्थ्य असे की वाचकागणिक हे कंसातले शब्द बदलू शकतात, नव्हे बदलतातच, आणि त्यातून वेगवेगळे कल्पनांचे धुमारे फुटतात. विचारांना एक वेगळीच गती येते. आजानुकर्णाने वरती केलेला कल्पनाविस्तार आणि माझे विडंबन हे अशाच कल्पनातून स्फुरलेले आहे. गद्यात हे होत नाही. हा मला वाटते गद्य/पद्यातला फरक आहे.
वाक्य कुठे तोडायचे हे मूळ कल्पना काय पोचवायची आहे ह्यावर ठरते, वाचकाच्या कल्पनाशक्तीचा विस्तार जिथून होतो/होणे अपेक्षित आहे तिथे जागा मोकळी सोडून पुढच्या कल्पनेकडे वळता येते. हे जितके सशक्तपणे होत जाईल तितके काव्य समर्थ होत जाते.
----------------------------------------------------------------------------------
नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
अंड्याची टरफलं
आपले अनुभव असेच काहीसे
निष्कर्ष आणि ज्ञान
बाहेर यायच्या आधीच...
पाहतो आहे..
पडलेली टरफले
अस्ताव्यस्त..
------------------------------
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं (बघितली/दिसली, मनात आलं) आपले अनुभव असेच काहीसे (असतात का?) निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच (अंडी फुटून त्या कल्पना बाहेर पडतात). (कल्पनांची) अस्ताव्यस्त पडलेली टरफले पहातो आहे.
चतुरंग
26 Dec 2008 - 4:18 pm | लिखाळ
प्रतिसाद फारच आवडला. या चर्चेतून असेच काही समजून घेण्याची ईच्छा होती.
छान. आवडले.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
24 Dec 2008 - 10:28 pm | कवटी
नुकतीच फुटलेली
फसफसत ओसांडणारी
बीअरची बाटली
आणि वेफर्सही..
आज पार्टी वाटत......
रिकामा ग्लास
पाहतोय माझ्याकडे
आ वासून.....
भाड्या आतातरी
प्यायची थांबव......
कवटी
http://www.misalpav.com/user/765
26 Dec 2008 - 4:19 pm | लिखाळ
:) छान.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'हे होणार असे मी परवाच कुणाला तरी म्हणालो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची' बतावणी करायला उपयोगी पडतात.
26 Dec 2008 - 2:53 pm | मॅन्ड्रेक
अहो कवटि,
बीअरची बाटली, रिकामा ग्लास आणि वेफर्सही..
आज पार्टी वाटत.. ph D करताय वाटत.
ph D म्हण्जे - पिण हेच ध्येय.
26 Dec 2008 - 3:28 pm | पॅपिलॉन
मर्मिक चर्चा आणि बरीचशी उद्बोधकही!
ओळी मध्येच तोडण्याचे (वा पुढे खेचण्याचे) स्वातंत्र्य नवकवींनाच आहे असे नव्हे. अगदी केशवसूतदेखिल -
आम्ही कोण म्हणूनि काय पुसता, आम्ही असू लाडके
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया
असे लिहून गेलेच की!
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
26 Dec 2008 - 4:22 pm | लिखाळ
:)
प्रतिसादाबद्दल आभार.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'असे काहीतरी होणार असे मी परवाच कुणालातरी म्हणालो.' असली वाक्ये आपल्या 'दूरदृष्टीची'बतावणी करायला उपयोगी पडतात.