बोर्डरूम ड्रामा...

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
18 Nov 2015 - 2:24 pm

हल्ली ई-कॉमर्सची नवनवीन रूपे आपण इंटरनेटवर अनुभवतो आहोतच. गेल्या काही वर्षात ह्या क्षेत्रात झालेली वाढ उल्लेखनीय आहे आणि ती वाढ सतत चढत्या दिशेनेच होत राहणार. अगदी औषधापासून, भाज्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन मिळू लागल्या. त्यातूनच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपआपल्या ऑनलाईन स्टोरकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरशीची स्पर्धा सुरु झाली. जितकी स्पर्धा ह्या क्षेत्रात वाढेल, तितकाच त्याचा ग्राहकांचा फायदाही होणार हे निश्चितच. अगदी काही मिनिटात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी, ह्या निरनिराळ्या ऑनलाईन स्टोरवर असलेल्या किमतींची तुलना करून आपल्याला घरपोच मिळतात. त्याही एक ते दोन दिवसात. हे क्षेत्र दिवसेंदिवस आपल्या कक्षा विलक्षण रुंदावत आहे आणि त्यातून होणारी रोजगार निर्मितीही अनेक तरुणांना आकर्षित करत आहे.

ह्याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्याप्रमाणांवर केला जाऊ लागला. भारतातील रिअल इस्टेटचा भाव जसा चढत्या दिशेने वधारू लागला, तसा मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आणि आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागल्या. ह्या क्षेत्रात  www.99acres.comwww.magicbricks.com, www.indiaproperty.com,  www.makaan.comwww.commonfloor.com  अश्या कंपन्या नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपला एक ठसा विशिष्ट ग्राहकांवर उमटवला होता. त्यासाठी निव्वळ हटके मार्केटिंग कँम्पेन्स वापरात येत गेल्या आणि त्यासाठी देशी-विदेशातल्या मार्केटिंग कंपन्यांना टेंडर्स देण्यात आले. साधारण ह्या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईच्या कानाकोपऱ्यात अचानक एका कंपनीच्या जाहिराती झळकू लागल्या. जिकडे पाहावे तिकडे भडक रंगसंगतीचे बॅनर्स, त्यावर एक वरच्या दिशेला निदर्शित करणारा बाण आणि सोबत फक्त एक हॅशटॅग #lookup...

Housing.com

 

त्यानंतर काही दिवसांनी Housing.com अशी कंपनीची ओळख करून देण्यात आली आणि रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये अजून एका ब्रँडची भर पडली.  राहुल यादव आणि त्याच्या मित्रांनी एकत्रितपणे ही कंपनी सुरु केली होती. एकदम गाजावाजा करत ह्या ऑनलाईन रिअल इस्टेट कंपनीने पहिली मोठी उडी घेतली आणि सर्वांना अवाक केले. त्यानंतर काही महिन्यातच त्यांचे अंतर्गत कलह, विरोधकांशी झालेले वादविवाद सोशल मिडियावर उघडे पडले. त्याची चर्चा वृत्तपत्रांमधून, बातम्यांमधून, शेअर बाजारात चर्चिल्या जाऊ लागल्या. ह्या सर्वाचा हाऊसिंग.कॉमवर, रिअल इस्टेट मार्केटवर आणि प्रतिस्पर्ध्यांवर झालेला परिणाम म्हणजेच हा बोर्डरूम ड्रामा.

 

  • राहुल यादव – नाम तो सुना ही होगा. काही महिने हे नाव रोज पेपरात यायचे. मुख्यत्वे टाईम्स ग्रुप्सच्या पेपरांमध्ये. आता टाईम्स ग्रुपच का? ते बघूच पुढे.... सुरुवातीला राहुलची ओळख करून घेऊ. राहुल यादव हाऊसिंग डॉट कॉमचा पहिला सीईओ. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ही संकल्पना तयार केली. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत राजस्थानतून पहिला आल्यावर, सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ७५ टक्के खर्च स्कॉलरशिप म्हणून त्याला मिळाला. तो हुशार आणि चुणचुणीत होताच. शैक्षणिक दरमजल करत तो २००७ मध्ये आयआयटी मुंबईत (IITB) मध्ये दाखल झाला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम त्याने http://exambaba.com/ नावाची वेबसाईट सुरु केली. ज्यावर आयआयटीचे सर्व जुने पेपर्स आणि त्यांचे सोल्युशन्स, तिथे शिकणाऱ्या मुलांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्याचे प्रचंड कौतुक झाले. २०११ मध्ये त्याने आयआयटीमधले आपले शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडला स्वतःचे असे काही सुरु करण्यासाठी.

 

Rahul Yadav

 

 

  • त्या काळात आयआयटीच्या परिसरात घर घेणे, जेणेकरून तिथे येणे जाणे सोप्पे होईल म्हणून त्याने तो शोध सुरु केला. प्रचंड कष्ट केल्यावर त्याला हवेतसे घर मिळाले, पण आपल्याला एक शोधायला किती त्रास झाला, ह्या संकल्पनेतूनच Housing.com चा जन्म झाला. जो त्याने ऑगस्ट २०१२ मध्ये आपल्या ११ मित्रांच्या सहाय्याने पूर्णत्वास नेला. त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते पोर्टल तयार केले आणि मग शोध सुरु झाला इन्व्हेस्टर्सचा. कारण पैश्याशिवाय त्या पोर्टलला सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोचण्यात प्रचंड अडचणी येणार होत्या.
  • राहुलसह सर्व मित्रांनी मार्केट पालथे घालण्यास सुरुवात केली. आपाल्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशन निरनिराळ्या कंपन्यांना ते देऊ लागले आणि त्यांना यश मिळाले फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, फ्युचर बाजारचे झिशान हयात आणि नेटवर्क १८ चे हरेश चावला, ह्यांनी मोठी रक्कम हाऊसिंगमध्ये गुंतवली. ह्या पैश्यातूनच हाऊसिंगचे पुणे, हैद्राबाद आणि गुरगावमध्ये यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यातच नेक्सस वेंचर पार्टनर्स ह्यांनी १५.९ करोड आणि हेलीओन वेंचर्स-क्वाल्कोम वेंचर्स पार्टनर्स, ह्यांनी तब्बल ११५ करोड हाऊसिंगमध्ये गुंतवले.

 

  • १५ डिसेंबर २०१४ ला जपानच्या सॉफ्टबँक कॅपिटलने $90 मिलियन (५७२ करोड) इतकी प्रचंड मोठी रक्कम Housing मध्ये गुंतवून, कंपनीला पैश्यांचा भक्कम असा पाठींबा जाहीर केला. भारतासोबत संपूर्ण आशियातील ग्राहकांना हाऊसिंगकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मानस होता. ह्याच पैश्याच्या जोरावर देशभरातील आयआयटीयन्सला हाऊसिंगमध्ये नोकरी देऊन त्यांनी आपली टीम वाढवली आणि मार्चमध्ये देशातल्या ७ शहरात जाहिरातींचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • इतक्या झपाट्याने वाढ होत असताना, प्रतिस्पर्धी कंपन्या शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी हाऊसिंगचे इंजिनियर्स फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला राहुल ने सोशल मिडियावर जाहीरपणे उत्तर देऊन शिवीगाळ केली. त्याचवेळी टाईम्स ग्रुपच्या एकॉनॉमिक्स टाईम्सनेcom चे इन्व्हेस्टर्स राहुलला काढून टाकण्याच्या तयारीत आहेत अशी बातमी दिली. राहुलने आणि हाऊसिंगने त्वरित त्या वृत्ताचा इन्कार केला आणि राहुल यादवने कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांना एक ईमेल पाठवला आणि तो ईमेल सोशल मिडियावर लिक केला गेला.

 

rahul Vs times

 

  • आता टाईम्सचा हाऊसिंगमध्ये इतका इंटरेस्ट का याचे करणार कळले असेलच. ह्या ईमेल प्रकारानंतर हाऊसिंगवर टाईम्सने १०० करोडची कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीची बदनामी केल्याबद्दल.
  • ही नोटीस आल्यावर राहुल यादव भडकला आणि त्यांनी अनेक सोशल वेबसाईट्सवर आक्रमकपणे टाईम्स ग्रुपवर उघडपणे हल्ला करायला सुरुवात केली. काही झाले तरी टाईम्स ग्रुप काही छोटी कंपनी नव्हती, हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही. अखेरीस ४ मे २०१५ ला राहुल ने तडकाफडकी हाऊसिंगमधल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि त्याचा तो ईमेल सोशल नेटवर्क साईट्सवर फिरू लागला. अतिशय बोचरी टिका त्याने आपल्या मित्रांवर आणि इन्व्हेस्टर कंपन्यांवर केली होती. दुसऱ्या दिवशी झालेल्या बोर्डमिटिंगनंतर त्याने आपला राजीनामा परत घेतला असे जाहीर केले आणि सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली.

 

  • ह्या राजीनामा सत्रानंतर राहुल यादवचे पर्यायी हाऊसिंगचे सोशल नेटवर्कवर प्रचंड हसे झाले. एक यशस्वी ब्रँड स्टार्टअप म्हणून उदयाला आलेल्या हाऊसिंगसाठी हा प्रकार लाजीरवाणा ठरला होता. त्याच महिन्यात राहुल यादवने स्वतःकडचे हाऊसिंग डॉट कॉमचे एकूण एक शेअर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या आपल्या २२५१ सहकाऱ्यांना वाटून टाकले. ज्याची किंमत साधारण १५०-२०० करोड होती.
  • राहुलच्या ह्या लहरी वागण्याचा आता सगळ्यांना कंटाळा आला नसता तर नवलच. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करणे, ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या दिग्गजांना उगाचच ज्ञान पाजाळने, त्यांच्याशी सतत राहुलचे खटके उडणे, मिडियाशी राहुलचे असलेले वर्तन, अश्या अस्नेक गोष्टी विचारात घेऊन १ जुलैच्या बोर्ड मिटिंगमध्ये राहुलला हाऊसिंगमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

ह्या सर्व नाट्यमय घडामोडींवर त्याच्या काही मित्रांनी राहुल विरुद्ध उघड पवित्रा घेतला. राहुलविरुद्ध ब्लॉग्गिंग सुरु झाले. तो कसा वाईट होता, बनेल वृत्तीचा होता आणि हाऊसिंगला तो कसा धोकादायक ठरला असता याचे विश्लेषण केले जाऊ लागले. त्याचवेळी राहुलच्या समर्थनासाठीसुद्धा खूप जण पुढे आले, त्यात हरेश चावला यांचे नाव अग्रगण्य आहे. त्यांनी राहुलचे केलेले विस्तृत विश्लेषण इथे वाचता येईल. हाऊसिंगमध्ये इन्व्हेस्टर मंडळींच्या हातचे बाहुली न बनण्यापेक्षा बाहेर पडून, अजून एक नवीन सुरुवात राहुल करेल असा त्यांनी विश्वास दर्शवला.

म्हणायला गेलं तर ह्या सर्व बोर्डरूम घडामोडींचा आपल्या आयुष्यावर सरळसरळ परिणाम होत नाही. रोज बाजारात हजारो नव्या कंपन्या येतात आणि बंद देखील होतात. राहुल यादव स्वतः नवीन प्रोजेक्टवर काम करतोय, त्याला मुकेश अंबानी ह्यांनी देखील भेटायला बोलावले होते. त्याचे अपडेट्स त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर बघता येतीलच. हाऊसिंगचे नक्कीच नुकसान झाले मोठ्या प्रमाणावर, पण आशा करू ते त्यातून बाहेर येतील आणि पुन्हा आपला दबदबा निर्माण करतील. कारण त्यांच्याकडे अजूनही चांगली टीम आहे.

ह्या बोर्डरूम ड्रामावरून एक लक्षात येते की, ही एक भली मोठी शर्यत आहे, शर्यत जिंकायची असेल, तर तुम्हाला धावत राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात तुम्ही थांबलात तर १००१ टक्के संपलात... !

--------------------

(लेखाचे सर्व संदर्भ : गुगलकडून साभार)

~ सुझे

पुर्व्रप्रकाशित - कलाविष्कार ई दिवाळी अंक २०१५ 

 

समाजजीवनमानराहणीअर्थव्यवहारआस्वादमाहिती

प्रतिक्रिया

एस's picture

18 Nov 2015 - 2:39 pm | एस

छान लेख.

अनुप ढेरे's picture

18 Nov 2015 - 2:41 pm | अनुप ढेरे

रोचक गोष्ट आहे!
हरेश चावलांचा वाचनीय आहे.

सर्वसाक्षी's picture

18 Nov 2015 - 3:05 pm | सर्वसाक्षी

हौसेच्या व घरगुती वस्तु, मग चैनीच्या वस्तु, मोटारगाड्या यानंतर आता गृहनिर्माण व्यवसायातही इ खरेदी येणार हे निश्चित. अनेक घर खरेदी विक्री अडत्यांनी विद्यमान व्यवसायावर अवलंबुन न राहता आता अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. मुळात रहिवासी सदनिकांनी साध्या व मध्यम घराची किंमत कोटींच्या पलिकडे नेऊन ठेवली व साहजिकच अडत्यांचे आकार घरागणीक लाखोंमध्ये पोचले. सामान्य माणुस जो ऋण काढ्न घर घेतो, त्याला लाख दिड लाख अडतीचा भार जाणवणार हे निश्चित. शिवाय हल्ली बांधकाम व्यावसायिक बहुतेक रक्क्म धनादेशाने स्विकारतात, त्यांनी ग्राहकांपर्यंत थेट पोचायचा प्रयत्न केला आहे आणि आता घर खरेदी नोंदणीही बर्‍यापिकी सुलभ झाली आहे हे सर्व लक्षात घेता घरखरेदी इ मार्गाने सुरू होणार हे निश्चित. जो तगला आणि जगला तो जिंकला.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 3:08 pm | भाऊंचे भाऊ

हाऊसिंगच्या इन्व्हेस्टर मंडळींनी राहुलला असे करण्यापासून रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल त्याला बधला नाही.

मोठी चुक. जो व्यक्ती इतर मोठे प्लेअर्स मैदानात असताना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन फंडींग मिळवतो आणी यशस्वी पदार्पण करतो तो इतकी अविवेकी चाल कशी काय निवडु शकतो ? स्पर्धात्मक जग म्हणजे काय एखादे अप्रसीध्द इंग्रजी भाषीक संस्थळ न्हवे जिथे सगळे झेक-जर्म-आयरीश-नायजेरीअन महामुर्ख *पादक नेमलेले असावेत अन सामान्यांच्या हाती काही पर्यायच ठेवलेले असु नयेत ?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:42 pm | टवाळ कार्टा

रोचक

लेख आणि माहिती एकदम झकास्स्स... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- David Guetta - Dangerous Drum & Bass Cover by Anna Sentina, Miki Santamaria, and Coop3rdrumm3r

हे थोडेसे वाचले होते अगोदर. रोचक प्रकार आहे एकूण.

नाव आडनाव's picture

18 Nov 2015 - 4:42 pm | नाव आडनाव

भारी.

नाखु's picture

18 Nov 2015 - 5:20 pm | नाखु

एक्दम अनभिज्ञ आणि अतर्क्य जगाची ओळख.
अजून असे रोचक किस्से-कहाण्या येऊद्या..

पांढरपेशा खालमाने नाखु.

बोका-ए-आझम's picture

18 Nov 2015 - 6:12 pm | बोका-ए-आझम

राहुल यादवचं वागणं बघून मिपावरच्या अनेक आयडींची आठवणी आली. ;)

डोके.डी.डी.'s picture

18 Nov 2015 - 6:21 pm | डोके.डी.डी.

छान लेख

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 6:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

अण्णा _/\_

मला एक समजलं नाहीये. हाउसिंग डॉट कॉम रीयल इस्टेटसाठी मार्केटप्लेस मॉडेल राबवतं आहे ना? (म्हणजे रीयल इस्टेटसाठीचं फ्लिपकार्ट किंवा अ‍ॅमेझॉन.)

यांना सातशे कोटी रुपयांचं क्यापिटल काय करायचंय?

सुहास झेले's picture

18 Nov 2015 - 11:09 pm | सुहास झेले

ब्रँडींग... मार्केटिंग... टेक्नॉलॉजी ... फोडाफोडी... जितका जास्ती पैसा तितका कमीच ;)

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 11:23 pm | भाऊंचे भाऊ

बहुतांश पैसा हा अ‍ॅडवर्टायजिंगवर अथवा पुरक कंपन्या विकत घेण्यात खर्च होतो. प्रत्यक्ष सर्वीस्/प्रोडक्ट डेवलपमेंट कॉस्ट अत्यल्पच असते.

पूरक कंपन्या विकत घ्यायचं एक ठीक आहे. पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का? आणि ते व्यवहार बहुतेकवेळेला गियर्ड (कर्ज काढून फंड केलेले) असतात.

जाहिरातीला एवढा खर्च?

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 11:47 pm | भाऊंचे भाऊ

पण स्टार्टपला इतकी चैन झेपणार आहे का?

चैन जोपर्यंत ऑफीस गॅरेजमधे आहे तोपर्यंतच झेपत नाही. एकदा फंडीग मिळाले की... फक्त स्पर्धेत टीकणे हेच ध्येय उरते.

जाहिरातीला एवढा खर्च ?

होय. जाहीरात म्हणजे ब्रोशर छापणे, फ्लेक्स उभारणे न्हवे तर टॉपचे लोकं साइन करुन त्या अ‍ॅड आइअपीएलच्या प्रत्येक ओवरनंतर प्रसारीत करणे. संस्थळ वापर चालु असताना विवीध बॅनरच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समोर येणे वगैरे वगैरे खर्चीक प्रकरण आहे. तरीही रक्कम बरीच वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे रुपयाचे डॉलरमधील उपलब्ध्द होणारे मुल्य.

हे झाले एका देशाचे अर्थकारण. अर्थात तुम्हाला फक्त भारत न्हवे तर सोबत आख्खा एशीया ताब्यात घ्यायचा आहे, तिथे ऑफीस टाकावेच लागेल (कायदेशीर बाब म्हणून) तर हो ७०० कोटीचे फंडींग १० वर्षांसाठी हवेच जर गुंतवणुकदाराला कंपनीत अपेक्षीत हिस्सा हवा असेल तर ही रक्क अतिशय योग्य आहे.

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 9:29 am | भाऊंचे भाऊ

बरेचदा अनेकांचा स्टार्टप प्रकरणाबाबत जरा गोड गैरसमज असतो. तो म्हणजे स्टार्टप म्हणजे एखादा धंदा करुन बघणे होय. येस धंदा हा भाग महत्वाचा आहे पण स्टार्टप म्हणजे फक्त धंदा टाकुन बसणे न्हवे....

म्हणजे कोलगेटची एजंसी घेतली यश आलं नाही, मग काही दिवस रियल इस्टेट करुन बघत आहे यश आलं नाही मग, उद्या ट्रॅवल कंपनीची एजंसी घेतली, परवा ट्रकचे सुटे भाग विकायचे ठरवले... तेरवा भाजीपाला हे सर्व उद्योग आहेतच आणी त्यात स्टार्टप हा भाग आहेच,

पण स्टार्टप हा शब्द प्रामुख्याने अशा संकल्पनेबाबत ((बिजनेस मॉडेल) जास्त वापरला जातो ज्याचे उत्कृष्ट व्यवसायात / फायद्यात रुपांतर होइल पण सध्या ती बाब प्रचलीत व्यवसायांमधील एक असेल असे नाही. थोडक्यात आख्खी दुनीया जे धंदे करुन (बिजनेस मॉडेल वापरुन) पैसा कमावते त्यापेक्षा काही तरी वेगळे (अन यशस्वी) मॉडेल समोर आणने हा स्टार्टपचा प्रमुख उद्देश असतो. अ‍ॅप्पल स्टार्टप होती कारण त्याआधी पर्सनल काँम्प्युटर्स अस्तित्वात न्हवते. आत्ता तुम्ही बाजीराव रोडला अ‍ॅपल स्टोर टाकले म्हणजे नवीन धंदा टाकलात इट्स नॉट रिअली स्टार्टप.

म्हणून वीसी लोक हे चांगल्या संकल्पनेच्या (स्टार्टपच्या) शोधात असतात आणी त्यांना पटणार्‍या प्रोजेक्टमधे ते फावड्याने पैसा ओततात :) अन या खेळात संकल्पनेला अमुल्य किंमत असते मग ती कीती साधी बाब का असेना. मॅणपावरसाठी खर्च कधीच फार नसतो. आज तुम्ही आइनस्टाइनला जरी जॉबवर ठेवले तरी त्याचे पॅकेज फिक्स आहे त्या पेक्षा जास्त हवे असेल तर तो स्वतःची संकल्पना वापरुन त्याची स्टार्टप चालवेल.

असो स्टार्टप म्हणजे फक्त एखादा धंदा सुरु करणे न्हवे.... त्यामुले फंडींग आले की चैन आणी जबाबदार्‍या दोन्ही सोबत अन खणखणीत येतात.

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 1:09 pm | संदीप डांगे

प्रतिसाद आवडला.. एक विस्तृत लेख टाका स्टार्ट-अप प्रकरणावर. वाचकांना नव्या जगाची नवीन माहिती मिळेल.

शलभ's picture

19 Nov 2015 - 2:15 pm | शलभ

+१

अन्या दातार's picture

19 Nov 2015 - 5:26 am | अन्या दातार

हाैसिंग.काॅमचे करिअर्स पेज बघितले होते त्यात त्यांचा भर अॅनालिटिक्सवर दिसला. कदाचित माॅडेल डेवलपमेंटसाठी आणि इंफ्रास्ट्रक्चरसाठी पैसे लागत असावेत.

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2015 - 2:06 am | श्रीरंग_जोशी

हा तरुण फारच चंचल वाटत आहे. आंत्रप्रिनर म्हणून मोठा पल्ला गाठायचा असेल तर असे राहून चालणार नाही.

माझा एक बॅचमेट पुण्यातल्या एका मोठ्या रिअल इस्टेट डेवलपर कंपनीचा (ही कंपनी आयटी पार्क्स वगैरे बांधते) सिइओ आहे गेल्या काही वर्षांपासून. भारतात या वयात सिइओ बनणे (कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना) ही खूप मोठी गोष्ट आहे.

एका वेगळ्या विषयावरच्या लेखासाठी धन्यवाद.

"जुनून"नावाच्या हिंदी मालिकेत हा बोर्डरूम ड्रामा फार असायचा बहुतेक.

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2015 - 9:17 am | श्रीरंग_जोशी

जुनूनपेक्षा स्वाभिमानमध्ये बोर्डरूम ड्रामा अधिक होता. दोन्ही मालिका १९९५-९६ साली समांतर सुरू होत्या.

जुनूनमध्ये आदित्य धनराज व सुमेर राजवंश या उद्योजकांमध्ये वैयक्तिक कारणावरून तंटा चाललेला असतो. त्यात केशव कलसी, नाना नगरकर वगैरे मंडळी हात धुवून घेत असतात.

स्वाभिमानमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पोझिशनसाठी ऋषभ व त्याचा काका महेंद्र यांच्यामध्ये चुरस असते.

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 1:08 pm | संदीप डांगे

व्वा! स्वाभिमान आवडती सीरियल होती. औद्योगिक भानगडी, विवाहबाह्य लफडी, वैगेरे केकता कर्पूर चे बीज याच सीरीयल्मधून पेरल्या गेले...

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2015 - 6:46 pm | बोका-ए-आझम

'शांती ' मध्येही प्रचंड बोर्डरुम ड्रामा होता. ती १९९४ मध्ये आली होती. भारतातील पहिली डेली सोप. बाकी अमेरिकेतील हाऊस आॅफ कार्ड्स, सूट्स, डॅलस, डायनॅस्टी आणि संत बरंबरं या मालिकाही अप्रतिम होत्या. निदान नावीन्यामुळे छान वाटत होत्या. खरा बोर्डरुम ड्रामा म्हणजे वाॅल स्ट्रीट - मायकेल डग्लस, मार्टिन शीन, चार्ली शीन, डॅरिल हॅना यांनी अजरामर केलेला आॅलिव्हर स्टोनचा चित्रपट.

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 6:53 pm | भाऊंचे भाऊ

सूट्स ट्रुली रॉक्स.

स्वाभिमान च्या लेखिका शोभा डे होत्या.

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 1:17 pm | संदीप डांगे

विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला. हाउसिंगडॉटकॉम चे रीअल इस्टेट मार्केटवर, प्रतिस्पर्ध्यांवर काय परिणाम झाले ते लिहिले नाही. असो.

ह्या वेबसाईटने मात्र रीअल-इस्टेट पोर्टल्सची दुनिया एकदम पुढे नेऊन ठेवली हे खरे. अगदी ठोकळ्या मशिन्स च्या काळात अ‍ॅपलने मॅक लॉन्च केला तसे. मी गेली चार वर्ष रीअल-इस्टेट मार्केटींगमधे काम करत आहे. नायंटीनाईनएकर्स, मॅजिकब्रिक्स, इ. इ-पोर्टल्सचा प्रवास सुरुवातीपासून पाहिला आहे. या टॉपच्या साईट्सपेक्षा जबरदस्त वेगळे देण्यात हाउसिंगडॉटकॉम यशस्वी झाले. राहुल यादवबद्दल कन्स्पिरसी झाली व त्यानेही आपल्या लहरी-व्यावसायिकताशून्य वागण्याने त्याला हातभारच लावला हे सत्यच आहे.

विषय अतिशय नाविन्यपूर्ण व मांडणी झकास. थोडा आवरता घेतल्या सारखा वाटला.

सहमत. संदीपरावाचे लक्ष पोर्टलवर होते. तिथली झ्गमग पाह्यलीय त्यांनी. मी हाउसिंगचे प्रिंट कॅम्पेनिंग पाहूनच चाट पडलो होतो. एकाच वेळी सगळ्या लीडिंग पेपरला फुल्ल फ्रंट पेज. ती पण अगदी कुतूहल वाढवणारी. जबर एन्ट्री होती ती. त्याच वेळी होर्डिंग्ज, डीस्प्लेज अन बॅनर्स पण अशाच राक्षसी आकारात अन संख्येने झळकत होते. सगळीकडे तो अप्वर्ड अ‍ॅरो पाहून अन हॅशटॅग पाहून पहिल्यांदा बर्‍याच जणांना कळले नाही. पाण ह्या कॅम्पेनवर केलेला खर्च अफाट अचाट होता हे नक्की.

आमच्या झेलेअण्णाला धन्यवाद द्यायचेच राह्यले. भारी रे सुहास. आवडले लिखाण.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 8:20 pm | संदीप डांगे

हाउसिंगचं 'कॅम्पेन डिझाईन' लाँचच्या आधिपासून माहित होतं. जाहिरातींचा खर्च अफाट होता हे खरेच, त्याचे कारण आजकाल सगळे आंत्रप्रिनर, स्टार्टप्स स्टीवजॉब्स ला कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याच मंडळींना वाटतं की जिथे तिथे आपले कँपेन झळकले की आपण मार्केटमधे 'अराईव' झालोय. दिग्गज साईट्सच्या स्पर्धेत उतरायचं तर असलं नेत्रदिपक करण्याची आवश्यकता होतीच. पण ते जरा ओवरडन टैप झालंय. रीअल इस्टेटचा आणि वेबसाईट्सचा माझ्या अनुभवानुसार जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती. स्टीवजॉब्स फक्त चकचकित, काळाच्य पुढच्या प्रॉडक्ट डीझाइन देत नव्हता तर त्यात असणारे सॉफ्टवेअरही, हार्डवेअरही काळाच्या पुढे असेल याबद्दल जागरूक होता. ह्या स्गळ्या 'बेस्ट'ला सादर करण्याची पद्धतही 'बेस्ट' हवी. पण आजकाल काही लोक प्रेझेंटेशनच्या बेस्टपणाकडे जास्त लक्ष केंद्रित करतात, प्रॉडक्ट बेस्ट असणे व कस्टमर खुश असणे हीच सगळ्यात मोठी ब्रँडींग असते, ते मार्केटमधे खरे 'अराइव' होणे आहे हे विसरतात. हाउसिंगची वेबसाईट नाविन्यपूर्ण होती, पण हे नाविन्य युजर्सपर्यंत पोचवण्यात ते कमी पडले असे वाटते.

याबाबतीत मी एअरबीएनबीच्या बिझनेसमॉडेलला १० पैकी ९.५ मार्क्स देइल. अगदी योग्य पद्धतीने मार्केटींग करून ही कंपनी आज लॉजिंग-बोर्डींग जगात भयंकर गाजत आहे.

अवांतरः झी-स्टार वैगेरेचे सीरियल हेडसना आपल्या मालिकांचे कँपेनिंग खूप करावे असे वाटते. जाहिरात एजंसीपण नेमक्या त्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच मोठे मोठे होर्डींग्स लावून मुंबईभर दणदणाट करतोय असा भास निर्माण करतात. आपल्या मालिकेचे होर्डींग बघुन हेड्स खुश होतात, जाहिरात एजंसीजचे पैसे सुटतात.

अभ्या..'s picture

20 Nov 2015 - 8:33 pm | अभ्या..

जाहिरातींवर इतका खर्च करण्यापेक्षा बिझनेस मॉडेल व सिस्टम डेवलपमेंट जास्त आवश्यक होती

दॅट्स ईट.
अवांतर माझे १०बाय १०: होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 9:00 pm | संदीप डांगे

होर्डिंग प्रकारावर आख्खे ५०० पानी पुस्तक छापता येईल इतके सुरस प्रकार आहेत.

मग वाट काय बघताय राव... होऊ दे खर्च. तसेही भारतीय जाहिरातजगताबद्दल फार मौल्यवान पुस्तके नाहीत. जी आहेत ती आर्मचेअर अ‍ॅक्टीविस्टसची आहेत. तुझ्यासारख्या ग्राउंडचा अनुभव असणारं कुणीच नाही. इंग्रजी-मराठी दोन्ही छापू, हाय काय नाय काय.

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2015 - 11:52 pm | बोका-ए-आझम

वाचलंत का? रिव्ह्यू चांगले आलेत.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 7:04 am | संदीप डांगे

बघूया... पियुष पांडेचं म्हटल्यावर रीव्यु चांगले येण्याची 'सोय' होऊ शकते. ;-)

माझं असं म्हणणं होतं की अभ्या... ज्या सर्कलमधे आहे त्या वर्तुळातले अनुभव आले पाहिजेत.

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2015 - 9:01 pm | बोका-ए-आझम

सहमत. अभ्याचा श्रीगणेश लेखमालेतला लेख वाचून संपल्यावर मी क्रमशः लिहिलंय का ते शोधत होतो.

आतिवास's picture

20 Nov 2015 - 8:32 pm | आतिवास

यात नायकानेच (राहुल यादव) खलनायकाचीही भूमिका केली आहे.

अजया's picture

20 Nov 2015 - 9:30 pm | अजया

या लाँचबद्दल ऐकले होते. पण यापुढे हा प्रकार घडलेला आत्ताच कळला.एका छान लेखाबद्दल धन्यवाद.

पैसा's picture

21 Nov 2015 - 10:02 pm | पैसा

राहुल यादव खराच सनकी आहे की त्याच्या लहान वय आणि शून्य अनुभावाचा फायदा घेऊन त्याला उचलून टाकलंय हे कळेना! या प्रकारांना लांबूनच नमस्कार.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 10:27 pm | संदीप डांगे

असेही असू शकते.

सुहास झेले's picture

12 Dec 2015 - 7:57 pm | सुहास झेले

Flipkart's Bansals back former Housing CEO Rahul Yadav's new startup

BENGALURU: Flipkart cofounders Sachin and Binny Bansal have invested an undisclosed seed funding in online realty portal Housing's former CEO Rahul Yadav's new startup Intelligent Interfaces.

The startup aims to bring efficiencies in the processes of the Indian government, Yadav said. "The startup will be an interface that will be used by government officials," Yadav told ET. "I see very large businesses that can be created in partnerships with government," he said.

Sachin Bansal confirmed the investment to ET, but declined to comment on the amount invested and other specifics. "He is doing something which is good for the country," Bansal told ET.

मी-सौरभ's picture

14 Dec 2015 - 7:22 pm | मी-सौरभ

एका माहिति नसलेल्या घडामोडीची सुन्दर ओळख करुन दिलित..
उप्दतेस् ची वाट पाहिल्या जाईल.

सुहास झेले's picture

31 Dec 2015 - 12:10 pm | सुहास झेले

Yuvraj Singh invests in Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces

Mumbai: Indian cricketer Yuvraj Singh has made an undisclosed amount of investment in former Housing.com’s chief executive officer and co-founder Rahul Yadav’s start-up Intelligent Interfaces.

“Proud to back Rahul Yadav and Intelligent Interfaces (ii) in helping the Government govern 100x better with the help of technology. Get ready for the (r)evolution!,” Singh posted on his Facebook account with a picture of Yadav, Nishant Singhal and himself.

“A 100x company needs 100x team!,” Yadav said as he shared the post on his Facebook account.