आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?
माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे. या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो. असाच एक हुशार मुलगा माझ्याबरोबर होता; अगदी इतर पालकांना हेवा वाटवा असा. तो रोज नवनविन आणि रोमांचकारी माहिती सांगायचा. यात काय नसायचं? जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ.
एके दिवशी मला त्याने भलतीच गोष्ट सांगितली. त्याने नुकतीच बीअर टेस्ट कशी केली याची कहाणी तो सांगू लागला. बीअर कुठल्या दादाने आणली होती, ते सगळे त्याच्या गच्चीत बसून कसे प्यायले, त्याला दरदरून घाम कसा फुटला, रात्री गार वारा कसा वहात होता, एकदम भारी कसं वाटलं वगैरे. मला थोडा धक्काच बसला. घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते. त्यावेळी दारूचे दुष्परिणाम माहिती नव्हते पण दारू पिणार्यांचा तिरस्कार कसा केला जातो हे माहित होते. आणि ईथे मी ज्याचे अनुकरण करायचो, ज्याच्या प्रत्येक गोष्टीचे अप्रुप वाटायचे तोच दारू प्यायची तारीफ करतोय! अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते आणि दुसरे म्हणजे अशा गोष्टींचे कुतूहल. त्यामुळे त्याचे काही विषेश वाटले नव्हते. तेव्हा ऐकावं ते नवलच असं वय आणि एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे. पण एक मन हे सर्व वाईट आहे असे ठणकावून सांगत होते. हा दारू पितो म्हणल्यावर याचा आदर्श ठेवावा कि ठेवू नये आणि याच्याबरोबर रोज शाळेत ये जा करावी का या विचारात मी पडलो. शेवटी असे ठरवले कि, काही असले तरी तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्यामुळेच माझे ज्ञानवर्धन भरपूर होते आहे तेव्हा आता याचे अनुकरण करण्याची काही गरज नाही पण हे वगळून त्याची संगत करायला काही हरकत नाही. त्यानंतरही त्याने त्याच्या पहिल्या सिगरेटचा किस्सा सांगितला, पहिल्यांदा तंबाखू खाल्याचा किस्सा सांगितला. मी त्याच्या ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि दिनक्रम चालू ठेवला. त्याने हे किस्से बर्याच मित्रांना सांगितले असणार कारण त्यांचा एक चांगला ग्रुप जमला जे हे प्रकार सर्रास करू लागले. त्यालाही त्याच्या कुठल्याश्या मित्राने स्वतःचा अनुभव सांगितला असणार आणि माझा मित्र त्याला बळी पडला असणार. हि साखळी अशी किती लांब चालत आलेली आणि अशी किती लांब जाईल कोणास ठाऊक. त्या ग्रुपमधले काहीजण पुढे जाऊन मुलींची छेडही काढू लागले. त्याचीही एक साखळी तयार होतच असणार.
आजचा विचार करता, तो मुलगा स्वतः व्यसनांच्या आहारी गेला का? तर मला तसं वाटत नाही; यापुढे कधी जाईल का? सांगता येत नाही.
या साखळीत त्याला ज्यांनी गोवले, त्याने ज्यांना गोवले असेल तर त्यातली कोणी व्यसनांच्या आहारी गेली असतिल का? निश्चितच.
'रेगे' हा या विषयावरचाच चित्रपट आला होता पण त्यामधे वाईट गोष्टींच्या आहारी जाण्यात मित्र-मैत्रिणींच्या संगतीचा जो सहभाग आहे तो फारसा दाखवण्यात आला नाही. तर नायक हा स्वतःहूनच गुन्हेगारी विश्वाकडे कसा आकर्षित होतो हे दाखवले होते. 'बालक-पालक' मधे मात्र हे अतिशय योग्य पद्धतीने दाखवले आहे.
जिज्ञासा म्हणलं तर चांगली, म्हणलं तर वाईट गोष्ट. ती चांगल्या गोष्टीत दाखवली तर तुम्हाला मोठा संशोधक करू शकते तसच वाईट गोष्टीत दाखवली तर तुम्हाला व्यसनाधिन किंवा गुन्हेगारही बनवू शकते. दारू, स्मोकिंग अशा समाजात वाईट समजल्या जाणार्या गोष्टींचे समर्थन करणारे सुद्धा असतील. पुढे महाविद्यालयात शिक्षण घेताना बरेचजण केवळ गंमत म्हणून हे सर्व चालू करताना पाहिलय (त्यातले कित्येक हातात पैसा खेळूलागल्यानंतर दर आठवड्याला बसू लागले). कोणतही व्यसन हे तसं वाईटच पण ८ वी-१० वी एवढ्या कोवळ्या वयात जेव्हा यांच्या दुष्परिणामांची माहितीदेखिल नसते तेव्हा यात ओढल्या जाण्याचं कोणीच समर्थन करू करणार नाही.
प्रतिक्रिया
1 Nov 2015 - 6:06 pm | लालगरूड
:'(
1 Nov 2015 - 6:23 pm | अभ्या..
अप्रतिम लेखन. वाक्यावाक्याशी सहमत. लिहित राहा.
(फक्त जरा जास्त गहन विचार करणे सोडा. एवढे पण संवेदनशीलतेचे व्यसन लावून घेऊ नका. दुनिया बडी कु_ चीज है)
1 Nov 2015 - 8:18 pm | आनन्दा
माझ्या बहुतांश मित्रांना दारू - सिगारेटचे व्यसन १०वी ते १२वी च्या दरम्यानच लागले आहे. मी योगायोगाने त्या काळात स्वत:लाच शोधत होतो, त्यामुळे त्यापासून दूर राहिलो.. आता मला ते माझे भाग्यच वाटते..
1 Nov 2015 - 11:39 pm | पद्मावति
उत्तम विषय आणि मांडणी. धागा वाचतेय.
2 Nov 2015 - 10:43 am | रातराणी
हम्म..नाजुक वयाचा विषय. अवघड असतं या वयातल्या मुलांना समजून घेणं आणि समजावून सांगण.
2 Nov 2015 - 1:02 pm | कंजूस
दारू पिणं :मर्दाचं लक्षण.
गालिब: अरे तुने तो पी ही नहीं तु क्या जाने.
ह्या: हे तुझ्याच्यानं झेपणार नाही.
हे ऐकून काही चवताळून तिला कडेवर घेतात नंतर तिचं बोट धरून चालतात.ब्रिटिशांनी याचा चांगला वापर केला.
2 Nov 2015 - 6:30 pm | उगा काहितरीच
या वयात माझ्या सोबत असणारे ९९% मित्र दारू, सिगारेट वगैरे पित होते. यानंतरच्या काळातही (UG, PG) बरेच मित्र दारू प्यायचे, कित्येकदा रूममध्येच पार्ट्या चालत. पण सुदैवाने अजूनतरी दारू, सिगारेट , तंबाखू पासून दूर आहे.
3 Nov 2015 - 9:53 am | जातवेद
९९%? अवघड आहे!
3 Nov 2015 - 5:45 pm | उगा काहितरीच
खरंच ! यात काहीही अतिशयोक्ती नाही.
3 Nov 2015 - 11:56 am | हेमन्त वाघे
आपली कोवळ्या वयाची व्याख्या की ? आठवी ते दहावी ? दहावी ते बारावी ? पुढची वर्षे?
तसेच सर्व व्यसने करणारे बरबाद झाले का? आपल्याकडे याबद्दल काही data आहे का? तसेच मग व्यावसाईक क्षेत्रात जे उच्चपदस्थ धुम्रपान आणि मद्यपान करताना दिसतात ते सर्व बरबाद असतात ?
तसेच आपल्याकडे सर्वोत्कृस्त महाविद्यालयांचा data किवा अनुभव आहे काय ? ( IIT ,IIM , BITS , JBIMS,NMIMS , VJTI , SP Jain , COEP , St Xaviers , JJ Arts , GLC etc?)
तेथे सर्व च्या सर्व गुणी बाले असतात काय ?
3 Nov 2015 - 2:19 pm | जातवेद
मुद्दा 'व्यसन करणारे बरबाद होतात' असा नसून, दुष्परिणामांची माहिती नसताना संगतीतून कमी वयात व्यसन करण्याचा आहे. मी ईथे माझा अनुभव मांडला असून, आकडेवारीच्या माध्यमातून काहिही सिद्ध करण्याचा प्रयत्न नाहिये.
3 Nov 2015 - 4:57 pm | असंका
व्यसनाच्या व्याख्येतच स्वतःचं नुकसान होइल इतपत एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे अशी कल्पना आहे.
त्यामुळे वास्तवात व्यसन ओळखण्याची खुण उलटी असावी. जो बरबाद झाला, त्याच्याबद्दल लोक पटकन म्हणतात की हा अमुक अमुक पार या व्यसनाच्या आहारी गेलाय. तोपर्यंत कदाचित ती एक वाईट सवय म्हणवली जात असते.
त्यामुळे व्यसन करणारे बरबाद झालेलेच आढळतात. ज्यांचं वाईट सवयींनी नुकसान झालेलं नाही, त्यांच्याबद्दल 'त्यांना व्यसन लागले आहे' असं म्हणणं जरा अवघड आहे.
5 Nov 2015 - 9:13 am | पॉइंट ब्लँक
data मिळाला तर काय analysis करणार आहात ह्याची थोडी (technical) माहिती मिळेल काय?
3 Nov 2015 - 3:12 pm | प्रभाकर पेठकर
या वयात आपण श्रीमंत व हुषार मुलांना रोल मॉडेल समजत असतो आणि त्यांचं अनुकरण करायला बघत असतो.
असहमत. आपण एक सरसकट आणि चुकीचे मत बनविले आहे. हुषार ठिक आहे पण श्रीमंत मुलांना आपले रोल मॉडेल समजणे हे चुकीचे आहे. त्यांच्या श्रीमंत असण्यात त्यांचे कर्तृत्व काय? श्रीमंत आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतला जे त्यांच्याही हातात नव्हतं. अनुकरण करायला ज्यांना आपले आदर्श मानायचे त्यांच्यात स्वतःचे गुण असावेत. आई-वडील श्रीमंत हा त्यांचा गुण होऊ शकत नाही.
जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्ससर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ.
वरील विधानांमध्ये 'ज्ञाना'चे जे नमुने दिले आहेत ते अनुकरण करण्याजोगे नाहीत. तो अभ्यासात किती हुशार होता, खेळात किती हुशार होता, सभाधीटपणा, वक्तृत्व, अभ्यासपूर्ण ठाम मते असणे इ.इ.इ. गोष्टी त्या वयात महत्त्वाच्या असतात.
एवढा भारी पोरगा दारूची तारिफ करतोय म्हणल्यावर दारू पिणे कदाचित चांगलेच असेल असे वाटणे साहजिक आहे.
आपण स्वतः आयुष्याबद्दल, चांगल्या वाईटाचा विचार करीत होता की नाही अशी शंका येते. 'तो करतोय म्हणजे चांगले'
असा विचार मनांत येणे म्हणजे आपली विचारशक्ती गहाण टाकल्यासारखे आहे. प्रत्येक चांगल्या वाईटाचा विचार प्रत्येकाने करून चांगल्याचेच अनुकरण करायचे असते. आणि घरच्या संस्कारातून, शालेय संस्कारातून ह्या बद्दलची जागृती त्या वयातही आलेली असते.
जगात कोठे काय चाललय, नविन कॉम्पुटर गेम्स, शिक्षकांच्या-मुलींच्या खाजगी गोष्टी, नवे चित्रपट, हिरॉईन्स सर्वकाही. त्याच्या ज्ञानापुढे आणि आत्मविश्वासापुढे आपण म्हणजे कःपदार्थ.
'ज्ञान' कशाला म्हणावे ह्या बद्दलच आपल्या मनांत संभ्रमीत अवस्था आहे. आणि स्वतःला कमी समजणं हा दुर्गूणही आहे. जर आपण मागे पडत असू तर योग्य ज्ञान संपादून स्वतःची किंमत स्वतःच वाढविली पाहिजे. अकारण स्वतःला कःपदार्थ समजल्याने मनांत कायमस्वरूपी एकप्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो जो तुमच्या प्रगतीसाठी घातक आहे.
घरचे संस्कार तर दारू ही नेहमी वाईट कशी असते असेच होते.
नुसते संस्कार चांगले असून भागत नाही. ते आई-वडीलांचे कर्तव्य होते. ते त्यांनी केले. पण ते संस्कार प्रत्यक्षात आचरणे हे आपले कर्तव्य आहे. तिथेच जर आपल्या मित्राची वाईट गोष्टही आपल्याला 'तो हुशार आहे म्हणून' समर्थनिय आणि अनुकरणिय वाटत असेल तर घरचे संस्कार वायाच गेले म्हणावे लागेल. तुम्ही त्या मार्गाने गेला नाहीत ते कदाचित तुमच्या जवळ आवश्यक ते पुरेसे धाडस नव्हते म्हणून पण तुमचे विचार दोलायमान झाले हा मनाचा कमकुवतपणा दर्शवितो.
अमुक प्रकारची पुस्तके किंवा सीडी त्याने कशी मिळवली, ती कशी कुठे वाचली, पाहिली हे त्याने आधिही सांगितले होते. पण एक म्हणजे ह्या गोष्टी वाईट आहेत हेच माहित नव्हते कारण ह्यावर मोठ्यांकडून कधिच काही ऐकले नव्हते
म्हणूनच म्हणतो तुम्ही स्वतः विचार करीतच नव्हता. घरचे काय म्हणतात त्यावरच अमल करण्याकडे तुमचा कल होता. तसे का करायचे आणि का करायचे नाही ह्यावर तुमची स्वतःची परिपक्व मते तयार झालीच नाहीत. त्यामुळे 'घरच्या
मोठ्यांकडून कांही सांगितले नाही' म्हंटल्यावर तुमची मनःस्थिती दुविधेत सापडली. बाकी त्यावयात 'हे' चांगले की वाईट ह्या बद्दल मनांत साशंकता होती हे आश्चर्यच आहे. आमच्या वेळी मनोरंजन आणि जालिय ज्ञानाचा विस्फोट न होताही ह्या पासून दूर राहायचे ज्ञान सर्वानाच असायचे.
सर्वप्रकारच्या सुसंस्कारांवर आपल्या व्यक्तीमत्त्वाची इमारत उभी असेल तर बाहेरच्या दु:ष्प्रवृती ती ढासळवू शकत नाही. एकाच घरातील सर्व मुलांवर आई-वडील सारखेच संस्कार करीत असतात पण तरीही मुले वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाची बनतात कारण नुसते संस्कार करणे नाही तर ते आत्मसात करणं, स्विकारणं, आचरणात आणणं ही जबाबदारी त्या त्या मुलाची असते. त्यात ते प्रत्येक मुल वेगवेगळ्या पद्धतीने स्विकारते किंवा नाकारते आणि म्हणून त्यांची व्यक्तिमत्त्वे विभिन्न स्वरूपाची होत जातात.
3 Nov 2015 - 3:35 pm | जातवेद
किती चिरफाड करायची ती काका? आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर चांगलेच संस्कार केले आहेत आणि आम्ही आजतागायत ते व्यवस्थित पाळले आहेत. आपली एकमेकांशी ओळख ती काय? एका लेखावरून तुम्ही एवढी टोकाची मते बनवाल अशी अपेक्षा नव्हती; अगदी कःपदार्थ करून टाकलात आम्हाला :)
3 Nov 2015 - 4:07 pm | प्रभाकर पेठकर
गैरसमज नसावा.
लेखात जी उदाहरणं दिली आहेत ती तुम्ही तुमची स्वतःची दिली आहेत त्यामुळे अर्थातच प्रतिसादही त्या उदाहरणाला धरूनच करणार नं?
तुमचा मुद्दा पटविताना तुम्ही तुमच्या मनाची घालमेल व्यक्त केली आहे त्यावरूनच मी अनुमान बांधणार नं? आपली ओळख अज्जीबात नाही. त्यामुळे आपले एकमेकांचे लिखाण हीच आपली ओळख, बरोबर की नाही?
तुमच्या आईवडीलांनी तुमच्यावर चुकीचे संस्कार केले आहेत असे मी कुठेही म्हंटलेले नाही. पण त्या संस्कारांना अनुसरून तुम्ही तुमची मते परिपक्व बनविलेली नाहीत, त्यामुळे 'आईवडीलांचे संस्कार वाया गेले' असे म्हंटले आहे. तेही आपल्या मनाची दोलायमान परिस्थिती पाहून (जी मला तुमच्या लिखाणातून जाणवली).
माझा प्रतिसाद पटला नसेल तर सोडून द्या. संपादकांना सांगून उडविला तरी माझी हरकत नाही.
पण, माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला तरी, मी संपादकांच्या लक्षात आणून देतो. स्वतः समोरच्यावर वैयक्तिक हल्ले करीत नाही.
3 Nov 2015 - 4:20 pm | जातवेद
गैरसमज नाही. संपादक मंडळ, असू दे प्रतिसाद.
प्रत्येकाचे त्या वयातील भावविश्व वेगळे असते. तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली. परंतु त्या वयात एवढे सगळे समजायची परिपक्वता आली नसते आणि त्यातच असे प्रकार घडतात म्हणून हा प्रपंच.
आणि तुला म्हणा, तुम्हाला काय?
3 Nov 2015 - 6:07 pm | प्रभाकर पेठकर
तुम्ही मांडलेली मते एका पालकाच्या पाल्याकडून अपेक्षा अशी जाणवली.
हे मात्र अमान्य.
मी माझ्या ८वी, ९वी आणि १०वी च्या वयाचा, त्या परिस्थितीचा विचार करून त्या काळची परिस्थिती आठवून माझी आणि माझ्या मित्रांची त्या काळातील भूमिका आठवून प्रतिसाद दिला आहे.
ब्राह्मण मित्रांबरोबरच कोळी, आगरी, कुणबी असे अनेक जातीतील आणि बंगल्यात राहणार्यांपासून ते झोपडपट्टीत राहणारे असे कित्येक माझे मित्र होते. त्यांच्या घरी माझे जाणे येणे आणि जेवणे खाणेही व्हायचे. त्यांचे दारूडे वडीलही असायचे. दहिसर जिथे माझे १०० टक्के बालपण गेले ते त्या काळात खेडेच होते. कच्चे रस्ते, लाकडी खांबावर लटकविलेले म्युनिसिपाल्टीचे दिवे, उन्हाळ्यात सरकारी टँकरमधून पाणी पुरवठा आणि पत्र्याची शाळा अशी परिस्थिती होती. तिथे दिवेलागणीला रस्त्याने झिंगत जाणारे दारूडे हे फार सामान्य दृष्य होतं. झोपडपट्टीतील शिवीगाळ, अगदी चाकूसुर्यांनी मारामार्या अशा अनेक गोष्टी चालायच्या. रेल्वेस्टेशनवर चरस, गांजाचा चोरटा व्यापार करणारे हमाल होते. हे वातावरण बालपणासाठी कांही फार आदर्श म्हणण्यासारखे नाही हे तर तुम्हालाही पटेल. तुमच्यावर तुमच्या आईवडीलांनी केले तसेच माझ्यावर माझ्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले. चांगल्या वाईटाची जाण आम्हा सर्व मित्रांना (१२-१५ जणं) होतीच. चांगल्या वाईटाची नेहमीच चर्चा व्हायची आणि कोणी चुकीची मते व्यक्त केली, अगदी गंमत म्हणूनही, तरी त्याला कट्टर विरोध केला जायचा. घर, शाळा, समाज, मुंबई मराठी ग्रंथ संगरहालय आणि दहिसर मोफत वाचनालय ह्यांनी जे संस्कार केले त्याने सर्वातून व्यवस्थित निभाऊन नेलं. ह्या वातावरणात आणि ह्या शाळकरी वयात जे माझे आणि माझ्या मित्रांचे विचार होते तेच मनांत चमकून मी 'तो' प्रतिसाद दिला आहे.
तुम्ही गैरसमज करून घेतला नाहीत ह्या बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'आपण एकमेकांना ओळखतही नाही' अशा परिस्थितीत, फक्त वयाच्या अधिकारात, एकदम एकेरीवर येणे मला रुचत नाही. कधी काळी भेट होऊन (एखाद्या कट्ट्यावर) ओळख वाढेल आणि एकेरी संबोधन शक्य होईल अशी आशा बाळगतो.
4 Nov 2015 - 11:45 pm | जातवेद
आम्ही यामुळेच तरून गेलोय जोडीला वंदनीय गुरूजनांची शिकवण होतीच.
5 Nov 2015 - 10:19 am | आनन्दा
काका सार्या चांगल्या गोष्टींबरोबरच मुली, पैसा, शिक्षण, दारू या गोष्टीदेखील त्याच वयात हळूहळू मुलांच्या विश्वात प्रवेश करायला लागलेल्या असतात हे पण तितकेच खरे आहे.
तुमच्या मित्रांमध्ये कदाचित कोणीहपित्या वयात दारू पिणारा नसेल. पण एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराने दारू प्याली, आणि ती कशी भारी आहे हे कट्ट्यावर साअंगितले तर चर्चा तर होणारच ना.
5 Nov 2015 - 12:08 pm | प्रभाकर पेठकर
इथे चर्चा १४ ते १६ वर्षाच्या मुलांची चालू आहे.
ह्यावयात मुली, पैसा, दारू हे विषय डोक्यातसुद्धा असू नयेत. त्यावर अमलबजावणी तर दूरची बात. नशिबाने आम्हाला मित्रही चांगलेच मिळाले.
आता काळ बदलला आहे. समाज ऐहिकतेकडे जास्त झुकताना दिसतो आहे. आई-वडील दोघेही कमावते असल्यामुळे, दिवसभर मुलापासून दूर असल्याच्या अपराधी भावनेतून मुलावर (त्याच प्रेम मिळविण्यासाठी) अनाठायी खर्च वाढतो आहे. अशा वेळी मुलांनाही लवकर 'मोठे' व्हायची घाई झाली तर तो दोष कोणाचा? असो.
5 Nov 2015 - 12:53 pm | बॅटमॅन
पैसा दारू वगैरे ठीके पण मुलींचा विचारही नको वगैरे जरा अतीच हं.
5 Nov 2015 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
ठिक आहे. तुम्हाला सवलत आहे.
5 Nov 2015 - 2:20 pm | बॅटमॅन
धन्यवाद सरजी.
5 Nov 2015 - 2:12 pm | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११
3 Nov 2015 - 5:42 pm | सूड
मान्य आहे काका!! पण ज्या वयाबद्दल विचार हे मांडलेत त्या वयातल्या सगळ्याच मुलांना इतकी सारासार विवेकबुद्धी नसते, असं मला वाटतं.
3 Nov 2015 - 8:36 pm | प्रभाकर पेठकर
अगदी ह्या शब्दात नसेल तरी आशय हाच असतो. कदाचित आम्ही मागच्या पिढीत मोडत असल्याने आणि घरी टिव्ही, काँप्युटर, व्हिडिओ गेम्स आणि आई-वडील दोघेही नोकरीवर जाणारे नसल्यामुळे संस्कार, संवाद, मैदानी खेळ आणि चर्चा-वादविवाद ह्यांचे अस्तित्व आणि महत्व जास्त होते. त्यामुळे कदाचित आम्हाला अकाली प्रौढत्व आले असेल. ८वी ९वी १०वी म्हणजे १४ ते १६ वर्षे वय. ह्या वयात पुलंचा 'खरा दागिना' हा धडा आम्हाला होता. त्यात 'लुळ्यापांगळ्या श्रीमंती पेक्षा हट्टीकट्टी गरीबी बरी' असा, आरोग्याला महत्व देणारा विचार मांडला होता. Merchant of Venice सारख्या धड्यातून श्रीमंत आणि कवडीचुंबक सावकाराचे नकारात्मक व्यक्तिचित्र चितारलेले होते. सदगुणांचे आणि सदवर्तनाचे धडे असायचे आणि 'आयुष्यात पैशांपेक्षा अंगीभूत गुण महत्त्वाचे आहेत' हेच विशद करणारे, अधोरेखित करणारे, संस्कारक्षम धडे ह्याच आणि ह्या आधीच्या वयात असायचे. हल्लीचा अभ्यासक्रम माहित नाही.
4 Nov 2015 - 2:20 pm | सूड
मे बी!!
3 Nov 2015 - 4:06 pm | असंका
सिगरेट पिऊन आवाज सुधारतो म्हणतात.
3 Nov 2015 - 6:42 pm | आदूबाळ
हो... उषा उत्थुपचा आवाज हे टार्गेट असेल तर नक्कीच.
4 Nov 2015 - 4:25 pm | असंका
_/\_
:-)) :-))
3 Nov 2015 - 5:02 pm | इरसाल
पिउन की ओढुन म्हणतो की रे मी शिगरेट्ट ?
3 Nov 2015 - 6:05 pm | असंका
धूम्रपान... चालेल?
तो मुद्दा नाय हो... आवाज सुधारतो म्हणे ते केल्याने.
3 Nov 2015 - 5:43 pm | सूड
सुंदर लेख!! लिहीत राहा.
3 Nov 2015 - 7:54 pm | बिहाग
ह्याचा मुद्यावर पुढच्या पिढीला या व्यसनांची गरज वाटणार नाही असे वातावरण पालकांना ( त्यांचा परीने )कसे निर्माण करता येईल याची चर्चा झाले तर बरे होईल.
3 Nov 2015 - 9:12 pm | हेमन्त वाघे
प्रभाकर पेठकर काका
आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले - आपण की करता?
असो मी पण दहिसर ला बर्याचदा यायचो .. आताही येतो .माझे खास पिणारे मित्र दहिसर चे आहेत . अजूनही दोन महिन्यात एकदा दीपा वर मी असतो.
तुम्ही कोठल्या शाळेत होता .. केंव्हा ??? तुम्ही "मामा" वर पडीक असायचा का? तसेच तुम्ही बोमन ला ( रुस्तमजी वाला) ओळखता का ?
या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ...
3 Nov 2015 - 10:04 pm | प्रभाकर पेठकर
आपले विचार अगदी साने गुरुजी सारखे वाटले
हा: हा: हा:, अगदीच मार्मिक शेरा आहे.
'दिपा' (स्टेशनसमोरचं) खुप उशिरा सुरु झालं त्या पूर्वी त्या एरीयात शंकर नांवाच्या माणसाचा देशी दारूचा अड्डा होता. सांकेतीक भाषेत बोलताना सगळे 'शंकर मंदिरात' जाऊन येतो असे म्हणायचे. त्या काळी गुळेकर नांवाचा दहिसरातील कुप्रसिद्ध गुंड यायचा. तिथेच एकदा त्याच्या एका तथाकथित शत्रूने त्याच्या वर चाकू हल्ला केला होता तेंव्हा अगदी फिल्मी स्टाईल दारूची बाटली फोडून त्याने प्रतिहल्ला केला आणि पळून गेला. नंतर तो अड्डा बंद करण्यात आला (पोलीस कारवाई?). सुरुवातीला दिपा बार चांगला होता. तंदूरी पापलेट अप्रतिम मिळायचे. पण नंतर एसी मधील सिगरेट धुराचा त्रास आणि उघड्यावर मच्छरांचा त्रास अशा मुळे मी तिथे जाणे बंद केले.
माझे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपालटीच्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण विद्यामंदीर दहिसर (पूर्व) ह्या शाळेत झाले. (१९७० एसेस्सी).
'मामा' म्हणजे दहिसर पश्चिमला स्टेशन समोरचे हॉटेल का? माझ्याकाळी तेच एकमेव मांसाहारी उपहारगृह होते. कारवारी पद्धतीचे माशाचे कालवण हे जेवणात आणि मिसळपाव हे नाश्त्याला उत्तम मिळायचे. मामा स्वभावाला गरीब माणूस. दगडी पाटीवर दिवसाचा जमा खर्च लिहायचा. त्याचा त्या काळातील (१९७०) दिवसाचा गल्ला ३००-३५० रुपये म्हणजे भरगच्च होता. मी पडीक नसायचो. तेव्हढे पैसेच नसायचे रोज उपहारगृहात जायला.
बोमन म्हणजे इराणी वाडीचा मालक का? त्याला कुत्र्यांचा फार शौक होता. इराणी वाडीत १०० मिटर आत गेल्यावर त्याचा बंगला होता. त्याच्या घरी एकदोन वेळा गेलो आहे. चहापाणीही झाले आहे. त्याचा एकेक कुत्रा हा गाईच्या वासरा एव्हढा होता. अल्सेशियन ३-४ होते बाकी इतरही होते. मालक दिलदार होता. पण त्याचा गोल्ड स्मगलींग मध्ये हात होता असे म्हणायचे. त्याच्याकडे काळ्या रंगाची एक शानदार ब्युक होती. शिवाय जीप वेगळी. त्याच्या वाडीत हिन्दी अभिनेत्री रेखा आणि नविन निश्चलच्या 'सावनभादो'च्या एका गाण्याचे शुटींग झाले होते. आम्ही शाळकरी गणवेषातच शुटींग पाहायला गेलो होतो.
या जगात एवडे आदर्शवादी संस्कार ठेवतात हे बघोन आनंद झाला ...
सगळ्यांचे आईवडील आदर्शवादी संस्कार आपल्या मुलांवर करतात. पण लेखात म्हंटल्याप्रमाणे आम्हीही गैरवर्तन केले, सिगारेटी फुंकल्या आणि इतर मजाही केली. पण कमावत्या पैशात स्वखर्चात. शाळकरी वयात कोणाकडे पाहून अशा गोष्टींना आदर्श मानून नाही. जे केले ते स्वतःच्या विचारांनी केले. घरचे संस्कार होते म्हणूनच सर्व करूनही त्यात वाहात नाही गेलो. स्वत:चे आयुष्य घडविण्याला प्राधान्य दिले बाकी सर्व गौण आणि माफक होते. म्हणूनच म्हंटले आहे संस्कारांना तुमच्या परिपक्व विचारांचीही जोड असावी नाहीतर चुकीच्या मार्गावर वाहात जाण्याला भरपूर वाव असतो.
3 Nov 2015 - 10:14 pm | टवाळ कार्टा
याच्यापुढे "पण त्यात अडकून नाही पडलो" असे लिहायचे राहिले कै? :)
4 Nov 2015 - 12:42 am | प्रभाकर पेठकर
मिपा व्यतिरिक्त व्यसन असे कुठलेच नाही.
4 Nov 2015 - 3:42 pm | उगा काहितरीच
मिपाला व्यसन समजल्यास तर मी पण व्यसनीच !
4 Nov 2015 - 4:16 pm | आदूबाळ
कोणीही आपला वैयक्तिक अनुभव लिहिला नाही याचं आश्चर्य वाटलं. वेळ मिळाला की माझा अनुभव लिहीन.
4 Nov 2015 - 5:40 pm | जातवेद
पहिल्या वेळेचा का?
4 Nov 2015 - 10:18 pm | आदूबाळ
पहिल्या वेळेचाच असं नाही, कोवळ्या वयात व्यसन करायचा.
4 Nov 2015 - 6:49 pm | सुबोध खरे
तंबाखू हे मृत्यूचे जगातील दुसरया क्रमांकाचे कारण आहे. आणि २०२० पर्यंत दरवर्षी एक कोटी लोक दरवर्षी तंबाखूमुळे म्र्युत्यू पावतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. भारतात सध्या ८-९ लाख लोक दरवर्षी तंबाखूमुळे मृत्यू पावतात. भारतात १५ वर्षाच्या खालील ४० लाख लोक तंबाखू चे नियमित सेवन करतात. तंबाखू हे सर्वात महत्त्वाचे प्रतिबंध करता येण्याजोगे कारण आहे.
Tobacco is the second major cause of death in the world today. Nearly 5 million people die due to tobacco use every year and this figure will increase to 10 million tobacco attributable deaths per year by 2020(1). Of these, 7 million deaths will occur in the developing countries, mainly China and India(2,3). The number of people in the age group of 18 years and younger in the world today is 2.4 billion, which is the largest generation in history. Since most of young people in developing countries are currently non-tobacco users, tobacco industry especially targets them. Everyday about 80,000 to 100,000 young people initiate smoking, most of them in the developing countries(4). Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide.
India is the world’s second largest producer of tobacco. Every year about 800,000-900,000 Indians die due to tobacco use(6). It was estimated in 1999-2001 that 5,500 adolescents start using tobacco every day in India, joining the 4 million young people, under the age of 15, who already use tobacco regularly(7,8). Like other developing countries, the most susceptible time for initiating tobacco use in India is during adolescence and early adulthood, ages 15-24 years(9). Most tobacco users start using tobacco before the age of 18 years, while some start as young as 10 years(8)
http://www.indianpediatrics.net/aug2005/aug-757-761.htm
हे फक्त तंबाखू बद्दल आहे
बाकी व्यसनांची कथा नंतर.
आपणच वाचा आणी विचार करा
8 Nov 2015 - 12:28 am | कानडाऊ योगेशु
डॉ साहेबांचा हा प्रतिसाद वाचुन थिएटरमध्ये पाहत असलेल्या चित्रपटाचा मध्यंतर झाला असल्याचा फिल आला. आजकाल एक जाहीरात लागते ना इस शहर मे इतना धुआ धुआ क्युं है.. त्या जाहीरातीची आठवण झाली. (ह. घ्या.)
ए शेंगदाणे...ए शेंगदाणे....!
4 Nov 2015 - 10:14 pm | सोंड्या
स्वानुभव जास्त रंगवून सांगता येणार नाही पण थोडक्यात सांगतो.
12वी ला असतांना चैतन्यकांडीच व्यसन लागलं. 12वी नापास झाल्यावर एक वर्ष तर एका दिवसाला 20 ईतपत ते वाढत गेलं. पण ग्रॅज्युएशन च्या पहिल्या वर्षभर ते निग्रहाने कमी करत घेतलं. 2र्या वर्षी NCC लावल्यामुळे ते प्रमाण एका महिन्याला 4/5 एवढं कमी केलं(धावण्याचा स्टॅमिना वाढवायचा होता). काॅलेज ग्रुप मधील एकाही जिगरी बडी ला ही माहित नसेल की मी शिग्रेट पितो व मला कोणाचीही संगत नव्हती. आणी आत नोकरी व इतर रामरगाड्यात गुंतल्यापासुन हे व्यसन 97.5% कमी बंद झालय. आता विश्वास आहे की हे व्यसन कमी होइल पण वाढणार नाही. हे सर्व होत असतांना अनेक दारू पिणारे मित्र भेटले व भेटतात पण दारू पिण्याच मन होत नाही कारण माझ्या एखाद्या गोष्टीत वाहून जाण्याच्या क्षमतेवर मला विश्वास आहे म्हणून एकच प्याला पासून दूर रहातो.
4 Nov 2015 - 10:38 pm | परिकथेतील राजकुमार
जवळ जवळ प्रत्येकाला कुठलेही व्यसन हे मित्रांमुळेच (किंवा इतर कोणामुळेच) कसे काय लागते? मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला असे कोणीच कसे म्हणत नाही?
मी दारु पितो पण मला ही सवय कोणामुळेही लागलेली नाही. दहा पैकी नऊ वेळा मी निवांत एकटा बसूनच ढोसतो. मूळात घरचे संस्कार वैग्रे असले काय नसते. धाडस नसले की लोकं संस्काराचा आडोसा घेतात.
4 Nov 2015 - 11:37 pm | जातवेद
परा, आपण ८ वी - १० वी च्या वयात 'मला इच्छा झाली आणि मी आस्वाद घेऊन बघितला' असे धाडस करू शकतो का?
नाही असे नाही. अशी उदाहरणे पण पाहण्यात आहेत पण मित्रं अगदी हात धरून प्यायला बसवणारी नसली तरी उद्युक्त करण्याला जबाबदार होते अशा केसेसमधे.
आणि दारू पिण्यात कसले आलेय धाडस? दुष्परिणामांची माहिती होती हेच अशा गोष्टींपासून दूर राहण्याचे एकमेव कारण आहे आणि तोच संस्कार. 'आपल्या आई वडिलांची मान आपल्या कृत्यांमुळे शरमेने खाली जाऊ नये' अशा वागण्याला 'धाडस नाही' असे लेबल लावता येणार नाही.
हेच वाक्य मी, 'संस्कार नसले की लोक फाजील धाडसाचा आधार घेतात' असे म्हणले तर चालेल का?
5 Nov 2015 - 10:49 am | बिपिन कार्यकर्ते
का नाही? मी केलंय. माझ्या माहितीतल्या असंख्य लोकांनी केलंय. माझा एक मित्र तर सातवीतच इतक्या सिगरेटी ओढायचा की त्या वयाच्या मानाने चेन स्मोकरच म्हणायला पाहिजे. आज अत्यंत यशस्वी आणि जबाबदार माणूस म्हणून परदेशात स्थायिक आहे. अजून एक मित्र साधारण त्याच वयात बायकांच्या नादाला लागला. पुढे त्याने स्वतःला त्यापासून निग्रहाने दूर केले. तो ही आत अत्यंत प्रथितयश आणि जबाबदार माणूस आहे. या दोघांनाही मित्रांमुळे ही व्यसनं लागली असे नव्हते.
5 Nov 2015 - 11:01 am | कपिलमुनी
पण बायका त्याच्या नादी लागल्या का ;)
5 Nov 2015 - 1:32 pm | बिपिन कार्यकर्ते
मुनीवर, सगळे तपशील इथेच लिहू? ;)
आणि त्या तपशीलांचा तसा काही संबंध नाही इथे.
5 Nov 2015 - 11:58 am | जातवेद
७वी मधल्या मुलाला सिगरेट विकणार्यांना पहिला फोडला पाहिजे.
5 Nov 2015 - 1:34 pm | बिपिन कार्यकर्ते
पहिले म्हणजे, तो विकतच आणत होता हे कशावरून? आणि दुसरे असे की, ७वी मधल्या मुलांकरवी बिड्या सिग्रेटी आणवणार्यांनाही फोडला पाहिजे मग. :)
5 Nov 2015 - 2:20 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!
5 Nov 2015 - 2:23 pm | जातवेद
हे ही वाईट आणी ते ही वाईटच!
5 Nov 2015 - 7:57 pm | परिकथेतील राजकुमार
धाडसाला वयाचे बंधन नसते.
परवाच बातमी वाचली की, आजकाल चौथी पाचवीतली मुले शाळेत मुला-मुलींच्या जोड्या लावतात, अश्लील शेरेबाजी करतात त्यामुळे वैतागलेल्या प्रशासनाने पालकांची मिटींग बोलावली होती.
6 Nov 2015 - 1:47 am | बिपिन कार्यकर्ते
सध्या ५७-५८ वयाच्या असलेल्या एका जोडप्याने ५वीतच एकमेकांशी लग्न करायचे ठरवलेले होते. माझ्या बॅचमध्येही ५वी ६ वीतच लग्न ठरवून टाकलेल्या एक दोन जोड्या होत्या.
6 Nov 2015 - 1:22 am | शब्दबम्बाळ
या हिशोबाने अट्टल बेवड्या लोकांना तर शौर्य पदक वगैरे दिले गेले पाहिजे!! :P
6 Nov 2015 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार
त्यांची कोणाकडून काही अपेक्षा नसते.
इनफॅक्ट शौर्यपदकासाठी अट्टल बेवडे तुम्हाला योग्य वाटतात हे पाहून, तुम्हालाच कौमार्य पुरस्कार द्यायला हवा.
6 Nov 2015 - 1:44 pm | शब्दबम्बाळ
आले बापले! अच्च का?
7 Nov 2015 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार
जसे बोलता तसेच लिहायला पाहिजे असे काय नाय हो.
बाकी, तुम्ही बोबडे आहात म्हणून असे लिहिताय, का अपूर्ण बौद्धिक वाढ?
7 Nov 2015 - 9:13 pm | शब्दबम्बाळ
खर तर प्रतिसाद देणार नव्हतो पण इतर धाग्यांवर आपण लोकांना आंतरजालावर कसे वागावे हे छान सात्विक सल्ले दिलेले पहिले त्यामुळे लिहितोय!
दोन्ही प्रतिसादात मी वैयक्तिक टीका केलेली नाही आणि तुम्ही दोन्ही प्रतिसादात वैयक्तिक आणि अपमान करणारा मजकूर लिहिला आहे. आता त्यामुळे मला काही एक फरक पडत नाही हि गोष्ट वेगळी पण निदान बाकीच्यांना सल्ले देण्याआधी स्वतःचे वर्तन पहा! दुसर्यांना फुकटचे सल्ले देणे खूप सोप्प असत ना असही...
मला हि छान पैकी वैयक्तिक टीका करता येईल पण ती मला करायची नाही. केवळ "धाडस" नाही म्हणून नाही हा!
हेच मत दारूच्या बाबतीत काही लोकांच असते. पण असो.
काही लोक उगीच, परा चा कावळा करतात!
7 Nov 2015 - 9:50 pm | परिकथेतील राजकुमार
अरे बाप रे!
मग आता? सदस्यत्व परत करताय का काय? ;)
7 Nov 2015 - 9:56 pm | परिकथेतील राजकुमार
हान अर्धवटच प्रतिक्रिया दिली गेली.
तर मी काय म्हणत होतो, उर्वरीत कुस्ती खवत खेळू (म्हणजे तुमची इछा असेल तर). धाग्याचे काश्मीर नको.
7 Nov 2015 - 10:13 pm | शब्दबम्बाळ
वरच्या दोन प्रतिक्रिया लिहिताना धाग्याच काश्मीर होतंय हे डोक्यात शिरलं नाही वाटत!
सिलेक्टिव रीडिंग करून तेवढीच प्रतिक्रिया दिलीत, (गैर)सोयीचे मुद्दे टाळून, वेगळ्या अपेक्षा नाहीतच...
मला आपल्याशी काही निरर्थक चर्चा करायची नाही हे वरचा प्रतिसाद शांतचित्ताने वाचला तर (कदाचित) समजू शकेल, खवमध्ये तर नकोच.
आणि माझ्या सदस्यत्वाची उगीच चिंता नसावी त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही!
उगीचचा सल्ला "आंतरजालावर लिहिताना जास्त उत्तेजित होऊन प्रतिक्रिया लिहू नयेत, नाहीतर पूर्ण लिहून होण्या आधीच प्रकाशित होतात"
पूर्व परीक्षण सोयीचा लाभ घ्या मग जमेल हळू हळू...
7 Nov 2015 - 10:46 pm | परिकथेतील राजकुमार
अंमळ गल्लत होते आहे का? त्याला प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणतात.
बघा, अपेक्षा नाही म्हणता आणि तक्रार पण करता. असे बंबाळायचे नाही ब्वॉ.
अरे? असे कसे? अहो चर्चेने बरेच प्रश्न सुटतात. निरर्थकतेचा प्रश्न पण सुटतो का पाहूयात की.
मी कशाला चिंता करू? मी फक्त परत करताय का विचारले. ह्यात चिंता कुठे आली? उलट 'आनंद' म्हणता येईल.
छे छे! मिपावरती काय उत्तेजीत व्हायचे? मचाक, अंतर्वासना वैग्रेवरती ठिक आहे.
पूर्वपरिक्षण? =)) ते तरी कधी बॅंकॉकमध्ये पण केले नाही. इथे कधी करायचो.
असो...
8 Nov 2015 - 12:04 am | टवाळ कार्टा
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशाचे करतात?
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोण करतात?
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कोणाकडून करून घ्यावे?
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कधी करून घ्यावे?
बँकॉकमध्ये पुर्वपरिक्षण कशासाठी करून घ्यावे?
9 Nov 2015 - 5:44 pm | बॅटमॅन
रच्याकने, मिपाकरांच्या तरुण पिढीसोबत बँकॉक कट्ट्याला येणार का?
9 Nov 2015 - 7:13 pm | टवाळ कार्टा
असं आडून आडून पराशेट तरूण नाही असे नसे नस्ते म्हणायचे =))
10 Nov 2015 - 9:57 am | परिकथेतील राजकुमार
तू काय करतोयस तरुण पिढीसोबत?
10 Nov 2015 - 10:05 am | टवाळ कार्टा
भौतेक त्याला आण्भवी गायडन्स म्हणून घेत्लाय ;)
5 Nov 2015 - 10:29 am | सुबोध खरे
मी ए एफ एम सी मध्ये असताना एका साध्या गावच्या मित्राला सिगारेट ओढताना पाहिले आणि विचारले का रे बाबा, सिगारेट का ओढतोस?
त्यावर तो म्हणाला लोक मला स्मार्ट समजत नाहीत.
मी त्याला म्हणालो कि जर एक रुपयाच्या सिगारेतने माणूस स्मार्ट होत असेल तर पुणे स्टेशन वरचा भिकारी पण एक रुपयात स्मार्ट होउ शकेल.
तो चमकला. पण त्याला त्यातील गम्य कळले आणि त्याने "असले" प्रयत्न सोडले. आज तो एक प्रथितयश कान नाक घसा याचा तज्ञ आणि प्राध्यापक आहे.
माझ्या मुलाने मला हाच प्रश्न ९ वीत असताना विचारला होता आणि मी त्याला हेच उत्तर दिले होते. शिवाय हेही सांगितले कि स्मार्ट दिसण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता असणे हे तुमच्या न्युनगंडाचे लक्षण आहे. स्मार्टनेस हा आतूनच असायला पाहिजे. ते त्याला इतके पटले कि या गोष्टी त्याने त्याच्या ग्रुप वर टाकल्या आणि सर्व मुलांना हि ते पटले. सुदैवाने त्याच्या मित्रांपैकी जवळ जवळ कोणीच सिगारेट ओढत नाही( नसावा). हीच गोष्ट दारू पिण्याबद्दल आहे.
मॉडर्न होण्यासाठी विचारसरणी बदलणे कठीण आहे. पण हातात दारूचा ग्लास/ सिगारेट पकडणे सोपे आहे.
5 Nov 2015 - 11:53 am | जातवेद
+११११
8 Nov 2015 - 12:36 am | कानडाऊ योगेशु
स्मार्ट असे नाही पण सिगारेट पिणारा माणुस आत्मविश्वासी जरुर वाटतो.
बर्याच हिंदी मराठी मसाला चित्रपटामध्ये हिरोच्या टाळ्याखाऊ एंट्रीला बहुतांश वेळेला त्याच्या हातात सिगारेट असते आणी नाकातोंडातुन रेल्वेचय इंजिनाप्रमाणे धूर सोडत ते ध्यान पडद्यावर अवतरते ह्याच्यामागे हेच कारण तर नसावे.!
8 Nov 2015 - 9:44 pm | बिहाग
तुम्ही "Thank you for smoking " नावाचा चित्रपट बघा आणि ठरवा खरे काय ते.
8 Nov 2015 - 9:58 pm | सुबोध खरे
हातात सिगारेट असलेला भिकारी पण आत्मविश्वासाने मुसमुसलेला दिसतो?
नाही.
मूळ जो नायक म्हणून असतो तो देखणं आणि तरुण असतो आणि तो "अभिनय " करत असतो. हेच नव तरुणाला समजत नाही आणि आपण हि सिगरेट हातात धरून स्मार्ट दिसू असे त्याला वाटत असते आणि तो व्यसनात अडकतो.
5 Nov 2015 - 10:54 am | बिपिन कार्यकर्ते
आमच्या घराजवळ राहाणारा माझा एक सिनियर स्कूलमेट आहे. त्याचे वडील चेन स्मोकर. बरेचदा दारूही पीत. अगदी घरीदेखिल. त्याच्या १८व्या वाढदिवशी वडीलांनी बाटली आणली. त्याला समोर बसवले. आणि सांगितले, 'तू अजून प्यायला आहेस की नाही माहित नाही. पण नसशील प्यायला, तर पहिली बाटली माझ्याकडून. आणि यापुढे दोन गोष्टी लक्षात ठेव. कधीही एकट्याने प्यायची नाही. आणि दुसरे म्हणजे, कोणी कंपनी नसेल तर मला सांग, मी बसेन तुझ्याबरोबर.' त्याला त्याच वेळेस सिगरेटही ऑफर केली, मात्र हे सांगून, 'शक्यतो ओढू नकोस. पण तुझं तू ठरव.'
तो मित्र आजतागायत दोन्ही गोष्टींपासून दूर आहे. तो म्हणतो, 'त्या वयात या गोष्टी थ्रिल म्हणून केल्या जातात. आमच्या बापसाने हवाच काढून घेतली त्या थ्रिलमधली. मित्र जेव्हा हे सगळे थ्रिल म्हणून करत त्यावेळी मला त्यांची कीव यायची.'
माझ्यापुढे तो बाप आदर्श म्हणून आहे.
5 Nov 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
+११११११११११
5 Nov 2015 - 12:35 pm | नाखु
बिकासर नेमके.
दारू-आदी व्यसन करण्यात (आणि त्यात धन्यता मानणे) आणि वल्लीदांसारखी गड-लेणी आडवाटांमार्गे फिरण्यात (यापैकी) नक्की कशात थ्रील आहे हे माहीती पाहिजे.
असं वयाच्या ११ व्या वर्षीच माहीती पडलेला (कमावता बालक ) नाखु
5 Nov 2015 - 11:12 am | सुबोध खरे
व्यसने करणारी माणसे यशस्वी होत नाहीत असा दावा नाहीच यात. व्यसनांमुळे त्या माणसाचे आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे नुकसान होते. हे किती होते आणि त्याचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त जे लोक व्यसनान्चे उदात्तीकरण करतात त्यांनी आपल्यामुळे दुसर्या माणसाचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. वर दिलेल्या दुव्यातील दोन वाक्ये परत उद्धृत करीत आहे.
Of 1000 teenagers who smoke today, 500 will eventually die of tobacco related diseases-250 in their middle age and 250 in their old age(5). Tobacco is the single largest preventable cause of death and disability worldwide.
5 Nov 2015 - 1:36 pm | बिपिन कार्यकर्ते
अर्थातच डॉक. व्यसने आणि यशस्वी होणे यांचा संबंध नाही, व्यसने आणि वाया जाणे यांचाही संबंध नाही.
नुकसानीचा मुद्दा जनरली बरोबर आहे. अर्थातच त्यालाही वैयक्तिक पदर आहेतच. व्यसनांचे उदात्तीकरण नकोच,
5 Nov 2015 - 1:59 pm | याॅर्कर
म्हणजे दुग्धशर्करा योग,
व्वा काय तरतरीत होतं डोकं
.
.
.
.
पण कधीतरीच हं,दररोज नव्हे
(सूचना-धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे)
5 Nov 2015 - 2:07 pm | जातवेद
रकाच्याने, कोणि धुम्रपान बंद केले तर फुफ्फुसामधे जमा झालेला टार कमी व्ह्यायला किती वेळ लागू शकतो? कि तो नेहमी तसाच राहतो?
5 Nov 2015 - 2:25 pm | बॅटमॅन
टारसर्पवियोग =))
5 Nov 2015 - 2:29 pm | जातवेद
म्हणजे दिवसरात्र काहिही न खाता पिता नुस्ता चहा घेत राहिले हि तो सर्प बाहेर येतो म्हणायचे?
5 Nov 2015 - 8:01 pm | बॅटमॅन
=))
ते काही माहिती नाय बा. हा सापगारुड्याचा खेळ आम्ही कधी खेळलो नाही, सबब कुठली पुंगी अन कशी वाजवायची ते माहिती नाय.
5 Nov 2015 - 8:34 pm | चतुरंग
सिग्रेट मी चोरली. पेटवून बघितली. घाबरत घाबरत एकच झुरका मारला आणि जे काय झालंय डोक्यात ते अजूनही आठवतं. अर्धा तास तरी ठसकत उसकत बसलो होतो. डोकं गरगरत होतं. ही असली गोष्ट बाबा का ओढतात ते समजलं नाही आणि आणखीन गोंधळलो. :( परंतु आपण हे कधी करायचे नाही हे ठरवले तेव्हाच.
बाबांचे एक मित्र होते खलील म्हणून. उर्दू शेरोशायरीमधला उस्ताद माणूस. बोटांच्या चिमटीत सदैव धुनी पेटलेली. आमच्या घरी आले तेव्हा मला म्हणाले "बेटा, इस शौक पे मैंने जितना पैसा बरबाद किया है उसमें मैं एक अँबेसिडर कार खरीद सकता था! और मेरी तबिय्त का हाल तो पूछो मत! बेटा जिंदगीमें कभीभी स्मोकिंग मत करना!!" बस तेवढे शब्द माझ्या मनावर कोरले गेले आणि मी पुन्हा हातात कधीही सिग्रेट धरली नाही.
मित्रांसोबर बिअर प्यायलोय परंतु त्यापेक्षा पुढे कधी गेलो नाही आतातर मी चहा कॉफीही क्वचितच घेतो! :)
इथे अम्रिकेत तर मुलांना अगदी लहान वयातच अल्कोहोल, सिग्रेट, ड्र्ग्जबद्दल व्यवस्थित माहिती देतात. त्यातले धोके समजावून देतात. बहुतांश मुले यापासून दूर राहू शकतात. आपण त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवायलाच लागतं परंतु त्यातलं थ्रिल करुन बघण्याआधी त्यातले धोके माहीत असल्यामुळे मुलं सहसा त्यावाटेने जायची शक्यता कमी असते.
माझा मुलगा लहान असताना आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये रहात होतो तिथे एका अमेरिकन स्नेह्याची पत्नी स्मोकिंग करत होती. वयाने मोठे होते ते. ती बाई पन्नाशीची तरी असेल. हा लगेच तिच्याजवळ पळत पळत गेला आणि म्हणाला "यू आर गोइंग टु डाय इफ यू स्मोक!" :)
-मुक्तरंग
5 Nov 2015 - 8:42 pm | परिकथेतील राजकुमार
हे आपले उगा रेवतीकाकुंना खुश करायला....
5 Nov 2015 - 8:45 pm | चतुरंग
सार तू काड्या!! ;)
(काडीकथेतील खाजकुमार) रंगा
5 Nov 2015 - 8:49 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=))
=))
=))
=))
=))