नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.
या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया
15 Oct 2015 - 9:59 am | खेडूत
चांगला विषय!
स्पर्धकांकडून केवळ इमेज यूआरेल घेउन सं. मं. ने 'फक्त क्रमांकाने' चित्रे प्रकाशित करण्याची सूचना मागे कुणीतरी केली होती. असं काही करता येईल काय?
15 Oct 2015 - 11:07 am | एस
तसेच करायला हवे. स्पर्धकांकडून व्यनिने इमेज यूआरएल घेऊन सर्व प्रवेशिका एकाच दिवशी एकाच धाग्यात केवळ अनुक्रमांक देऊन प्रकाशित कराव्यात , स्पर्धकांची नावे टाळून. मग त्याच धाग्यात मतदान घेतले जावे. अनबायस्ड मते मिळतील तसेच उशिरा येणार्या प्रवेशिकांनाही समान संधी मिळेल.
काय म्हणता?
15 Oct 2015 - 11:09 am | वेल्लाभट
+१
सहमत
15 Oct 2015 - 1:27 pm | नाव आडनाव
+१
हेच बाकिच्या स्पर्धांसाठीपण करायला पाहिजे जसं शतशब्द्कथा किंवा अजून नंतर येणार्या स्पर्धा.
15 Oct 2015 - 10:25 am | नूतन सावंत
जलाशयामध्ये समुद्रही अनर्भूत आहे का?
15 Oct 2015 - 10:43 am | असंका
15 Oct 2015 - 10:40 am | भटकंती अनलिमिटेड
सकाळी सुर्योदयाच्या वेळी भिगवणजवळील उजनी धरणाचा जलाशय आणि एक नौका.
15 Oct 2015 - 12:47 pm | अमृत
फोटो छान आहे
15 Oct 2015 - 2:18 pm | बाबा योगिराज
भेष्टच ना
15 Oct 2015 - 1:08 pm | जगप्रवासी
भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना?
तुमच्या फोटोचा खूप चाहता आहे मी, तुमचा ब्लॉग पण वाचतो छान आहेत लेख. बर्याच दिवसांनी मिपावर आलात.
15 Oct 2015 - 1:11 pm | भटकंती अनलिमिटेड
मीच पंकज झरेकर. आशीर्वाद असू द्या.
15 Oct 2015 - 1:41 pm | खटपट्या
क्रुपया ब्लॉगची लींक द्या
15 Oct 2015 - 2:29 pm | भटकंती अनलिमिटेड
http://www.pankajz.com/
https://www.facebook.com/PankajBhatkantiUnlimited
15 Oct 2015 - 2:56 pm | रंगासेठ
पंकज सरच आल्यामुळे आत्ता दुसर्या-तिसर्या क्रमांकासाठी फोटो टाकावे म्हणतो. :-)
15 Oct 2015 - 3:09 pm | भटकंती अनलिमिटेड
शिकाऊ एंट्री मागे घ्यावी का अस्मादिकांनी?
23 Oct 2015 - 5:15 pm | रंगासेठ
हॅ हॅ हॅ.. माफी असावी. :)
17 Oct 2015 - 7:18 am | चांदणे संदीप
+111111111111
:)
15 Oct 2015 - 1:09 pm | जगप्रवासी
सांगायचं राहिलं फोटो छान आहे
15 Oct 2015 - 1:25 pm | जिन्क्स
15 Oct 2015 - 2:19 pm | बाबा योगिराज
वा वा
15 Oct 2015 - 3:05 pm | प्रभो
15 Oct 2015 - 4:41 pm | स्पा
15 Oct 2015 - 6:44 pm | मार्मिक गोडसे
सुरेख छायाचित्र. कितीवेळ बघितलं तरी मन भरत नाही.
पाण्याचे तरंग बोटाच्या ठशासारखे वाटतात.
15 Oct 2015 - 6:51 pm | नाव आडनाव
क्या बात !
15 Oct 2015 - 6:55 pm | सौंदाळा
अप्रतिम आहे.
मागच्या २ महिन्यात राजगडावर जायचे ३ बेत या ना त्या कारणामुळे फसले आहेत. आता जमवलेच पाहिजे.
15 Oct 2015 - 6:56 pm | मुक्त विहारि
आवडला...
16 Oct 2015 - 7:29 am | किसन शिंदे
व्वा! स्पावड्याही स्पर्धेत उतरला म्हणायचा की..
रच्याकने ते पद्मावती तळे आहे.
17 Oct 2015 - 8:46 am | अजया
@ स्पा,अप्रतिम फोटो.मान गये उस्ताद!
17 Oct 2015 - 8:58 am | अत्रुप्त आत्मा
पांडूSSSSSssss :D
19 Oct 2015 - 2:30 pm | मृत्युन्जय
खतरनाक.
या स्पावड्याला परीक्षक करुन टाका रे. नाहितर प्रत्येक स्पर्धेत याचाच फोटो पहिला यायचा ;)
खुपच सुंदर फोटो आहे. अप्रतिम. केवळ चांगला कॅमेरा असुन चालत नाही. पारखी नजर लागते आणि स्किल आहेच. स्पावड्या कडे ते उदंड आहे.
15 Oct 2015 - 4:51 pm | बदल
28 Oct 2015 - 12:05 pm | चिगो
भारी फोटो..
15 Oct 2015 - 5:37 pm | के.के.
Kickapoo State Park, Oakwood, IL
15 Oct 2015 - 6:47 pm | नूतन सावंत
अन्तर्भूत म्हणायचे आहे.
15 Oct 2015 - 9:12 pm | बेन१०
15 Oct 2015 - 11:07 pm | जातवेद
19 Oct 2015 - 2:38 pm | कपिलमुनी
पेंटींग वाटावे एव्ढा सुंदर फोटो आहे
21 Oct 2015 - 11:09 am | जातवेद
थान्कू
15 Oct 2015 - 11:11 pm | अजिंक्य विश्वास
मस्तानी तलाव
डिटेल्स
कॅमेरा -६००डी
लेन्स- कॅनन १८-५५ एम्.एम् लेन्स
आय्.एस्. ओ. - १००
एफ् स्टॉप- एफ् ५.६
एक्स्पोजर टाईम- १/५० सेकंद
मोड- मॅन्युअल
पोस्ट प्रोसेसिंग- फोटोमॅटिक्स प्रो
21 Oct 2015 - 10:03 pm | आदूबाळ
एक नंबर! दिवेघाटातून घेतलेला फोटो!
16 Oct 2015 - 12:04 am | एस
काही प्रवेशिकांच्या विषयवस्तूंमध्ये जलाशय ही मुख्य विषयवस्तू नसून दुय्यम किंवा पूरक घटक आहे. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाशी अशा प्रतिमा थोड्या विसंगत वाटत आहेत. मला वाटते की अशा स्पर्धकांनी त्याऐवजी दुसर्या प्रवेशिका द्याव्यात.
16 Oct 2015 - 5:33 am | जे.जे.
वरचा स्पर्धेसाठि...
कुठलेहि पोस्ट प्रोसेसिन्ग नाही.
16 Oct 2015 - 1:36 pm | जगप्रवासी
सुधागडावरील तळे - स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी नाही
जगप्रवासी
16 Oct 2015 - 7:31 pm | माम्लेदारचा पन्खा
आग्वादच्या तुरूंगाशेजारील चमचमता अरबी समुद्र....
16 Oct 2015 - 7:41 pm | माम्लेदारचा पन्खा
मानवनिर्मित जंगलातला निसर्गनिर्मित येऊर तलाव !!
17 Oct 2015 - 1:17 am | वाचक
वर्मोंट राज्यात 'सियोन' विभागात असलेला तलाव
फॉल कलर्स असल्यामुळे स्पर्धेसाठी नाही.
आणि होड्या
17 Oct 2015 - 10:57 am | श्रीरंग_जोशी
पहिला फोटो पाहून तो केवळ फॉल कलर्स दर्शवत आहे असे वाटत नाही. तळ्यालाही तेवढेच दर्शवले जात आहे असे वाटते. स्पर्धाविषयानुसार प्रवेशिका अनुरुपच आहे.
मुदत संपण्यापूर्वी नवा फोटो काढून तो प्रवेशिका म्हणून सादर करण्याची तुमची योजना असल्यास हा फोटो अवांतर म्हणून चालेलच.
18 Oct 2015 - 8:40 pm | वाचक
श्रीरंग, धन्यवाद
विचार करतो, पण इतरही फक्त तळ्याचे काढलेले फोटो सापडतात का ते पहातो.
17 Oct 2015 - 1:33 am | इडली डोसा
लेक ऑगल,ईन्डीयानातील ब्राउन कौंटी स्टेट पार्क
17 Oct 2015 - 2:10 am | डॉ सुहास म्हात्रे
शांग्रिला (युन्नान राज्य, चीन) मधिल पुडात्सो राष्ट्रिय उद्यान, तिथे घर करून राहिलेले मूठभर आदीवासी आणि पर्यटकांसाठी केलेली काही व्यवस्था सोडली तर, हजारो वर्षे आधुनिक मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहे. हा परिसर "जागतिक नैसर्गिक वारसा स्थान (world natural heritage area)" म्हणून ओळखले गेले आहे. या उद्यानातील एक जलाशय...
17 Oct 2015 - 8:14 am | इडली डोसा
अगदी चित्रातली असल्यासारखी वाटतीये ही जागा.
18 Oct 2015 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे स्पर्धेसाठी नाही.
आरसी तळे (मिरर लेक) : न्युझिलंडमधिल फियोर्डलँडमधे असलेल्या मिलफर्ड साऊंडकडे जाताना हे तळे लागते. त्याच्या आरसपानी, स्वच्छ आणि नितळ पाण्यामुळे ते जगप्रसिद्ध आहे. त्याच्या खास भौगोलिक जागेमुळे त्याच्या नितळ व तरंगविरहित पाण्यात आजूबाजूच्या पर्वतांचे प्रतिबिंब अगदी एखाद्या बिलोरी आरशात पहावे इतके स्पष्ट दिसते...
17 Oct 2015 - 8:43 am | अजया
एकसे एक फोटो.
17 Oct 2015 - 9:18 am | भाग्यश्री कुलकर्णी
अप्रतीम सर्वच फोटो.त्या स्थळी जाण्याचा फील आला.
17 Oct 2015 - 9:42 am | मदनबाण
जाहिरात :-
काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )
काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalen
18 Oct 2015 - 5:05 am | किल्लेदार
देवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा
स्पर्धेसाठी नाही.
18 Oct 2015 - 9:05 pm | प्यारे१
अत्युच्च देखणा फोटो!
21 Oct 2015 - 2:35 pm | कपिलमुनी
एवढा सुंदर फोटो स्पर्धेसाठी का नाही?
फारीनच्या तळ्यांच्या फोटूसाठी स्वदेशी तळे असावे :)
21 Oct 2015 - 9:16 pm | किल्लेदार
:) :) :)
18 Oct 2015 - 10:00 pm | ऐक शुन्य शुन्य
19 Oct 2015 - 2:41 pm | मृत्युन्जय
नैनितालच्या भिमताल मधील हा हंस अकेला:
स्पर्धेसाठी "नदी" चालणार असेल तर खालील फोटो ग्राह्य धरावा (आणि वरचा रद्द करावा). खालील फोटो पहलगाम मधील बेताब व्हॅलीचा आहे. खाली वाहणारी लीडर नदी. बेताब चित्रपटाचे शूटिंग इथे झाले म्हणुन ही बेताब व्हॅली:
20 Oct 2015 - 12:38 am | श्रीरंग_जोशी
नदीचा फोटो अप्रतिम आहे. परंतु स्पर्धाविषय तळे, तलाव अन सरोवर इतकाच सिमित आहे.
19 Oct 2015 - 3:10 pm | असंका
कित्ती सुंदर सुंदर जलाशये!!!
जवळ जवळ सर्वच जलाशये माणसाचा स्पर्श न झालेली अशी दिसतायत ....
19 Oct 2015 - 5:31 pm | वेल्लाभट
लेक लुगानो, लुगानो, स्वित्झर्लंड.
येथील एका उंचावरच्या चर्चच्या परिसरातून काढलेला लेक लुगानोचा फोटो
कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एच एस - एफ ४ १/१६०० आयएसओ २००
21 Oct 2015 - 5:37 pm | इन कम
+१
20 Oct 2015 - 12:30 am | एकप्रवासी
20 Oct 2015 - 12:39 am | एकप्रवासी
ठिकाण : खेड, नातुनगर
21 Oct 2015 - 11:05 am | ऋतुराज चित्रे
सुंदर फोटो
20 Oct 2015 - 9:33 am | श्रीरंग_जोशी
स्थळ: मिनेसोटातील सिल्वर बे मरीना येथून टिपलेले लेक सुपिरिअरचे हे दृश्य.
EXIF -
Camera: Sony Nex 5N; Lens: 18-35;
ƒ/13.0; Exposure: 1/200; ISO: 100
टीपः चित्र मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
काही कारणाने चित्र दिसत नसल्यास पर्यायी दुव्यावर ते पाहता येईल.
20 Oct 2015 - 3:32 pm | फोटोग्राफर243
21 Oct 2015 - 8:40 am | बाबा योगिराज
आवड्यास.
21 Oct 2015 - 2:41 pm | असंका
कुटला मनायचा?
फोटो अप्रतिमच!!
22 Oct 2015 - 7:46 am | फोटोग्राफर243
पुण्या जवळ चा एक जलाशय...
21 Oct 2015 - 10:22 am | उदय
21 Oct 2015 - 10:59 am | जागु
एकच फोटो द्यायचा असतो का? बरेच आहेत म्हणून विचारले.
21 Oct 2015 - 2:31 pm | पैसा
स्पर्धेला एकच. बाकीचे असेच लोकांना बघण्यासाठी देऊ शकतेस.
21 Oct 2015 - 2:35 pm | मधुरा देशपांडे
हो एका स्पर्धकाने एकच फोटो द्यायचा आहे. ज्यांनी एकापेक्षा जास्त फोटो दिले आहेत, त्यांनी कुठला स्पर्धेसाठी आहे ते सांगितले आहे.
21 Oct 2015 - 2:25 pm | जागु
सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.
21 Oct 2015 - 2:52 pm | नाव आडनाव
सगळेच फोटू लै भारी. पहिले ३ / ५ निवडायचे परिक्षकांसाठी अवघडंच आहे.
21 Oct 2015 - 2:54 pm | मोहनराव
ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी.
21 Oct 2015 - 4:29 pm | पुष्करिणी
21 Oct 2015 - 4:33 pm | पुष्करिणी
वरिल फोटो - र्हाइन नदीचा आहे, स्पर्धेसाठी नाही.
खालचा फोटो स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं -मार्च २०१३
22 Oct 2015 - 8:14 am | कंस
From RMNP
22 Oct 2015 - 11:26 pm | मिनियन
23 Oct 2015 - 11:02 am | पियुशा
सगळे फोटोज अशक्य जबराट आहेत, :)
23 Oct 2015 - 4:38 pm | सोंड्या
1)(स्पर्धेसाठी नाही)<img src="https://www.flickr.com/photos/133201312@N03/21681130733/in/album-72157654018254793/" width="1232" height="432" alt="1" />
2)<img src="https://www.flickr.com/photos/133201312@N03/22276386576/in/album-72157654018254793/" width="600" height="440" alt="2" />
3)<img src="https://www.flickr.com/photos/133201312@N03/22313062241/in/album-72157654018254793/" width="600" height="440" alt="3" />
सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.
23 Oct 2015 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
तुम्ही फोटोजचे दुवे वापरण्याऐवजी फ्लिकरवर ते डिस्प्ले झाल्यावर त्या वेबपेजचे दुवे वापरले आहेत.
दुवे खालीलप्रमाणे असायला हवेत
बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते.
संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे.
अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.
23 Oct 2015 - 9:51 pm | सोंड्या
मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काका
23 Oct 2015 - 5:15 pm | रंगासेठ
सगळेच फोटो जबरदस्त आहेत.
23 Oct 2015 - 8:50 pm | इडली डोसा
हा अजुन एक बघा बो लेक, बान्फ नॅशनल पार्क कॅनडा