अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
16 Sep 2015 - 1:49 pm

[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे. आणि बादशहा अकबर तिच्या कक्षाकडे चालत येत आहे.]
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ : बेगमचा शयनकक्ष
काळ : निवांत बसून गप्पागोष्टी करण्याचा
वेळ : सायंकाळची
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पात्रे :
1) अकबर
2) बेगम
3) बिरबल
4) बेगमचा भाऊ म्हणजेच अकबराचा मेहुणा
5) शिपाई नं. 1
6) शिपाई नं. 2
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(अकबर बेगमच्या शयनकक्षासमोर येतो व पाहतो तर आपण आल्याची वर्दी द्यायची सोडून दोन शिपाई व्हाटसअपवरचे जोक वाचून हसत आहेत. अकबर त्यांच्यामागे उभा राहिला तरी त्यांना पत्ता नाही.)
अकबर : (जोराने ओरडून) नालायकांनो, चिरा पडली तुमच्या तोंडान, हे काय करताव? (दोघेही शिपाई दचकतात व अकबराला पाहून खूप घाबरतात)
शिपाई नं. 1 : (वेडगळपणाने) बादशहानु, आम्ही जोक वाचताव. तुम्हाना सांगतो अस्ला जबरी हाये... (दुसरा शिपाई पहिल्याला चिमटा काढून त्याला शांत बसायची खूण करतो)
शिपाई नं. 2 : (चाचरत) बादशहानु जल्ला तुम्ही आलाव?? जल्ला मंग त्या मांगच्या शिपुरड्यानी वर्दी दिल्याली मना ऐकू कशी नाय आली??
अकबर : (वैतागून) आर त्योबी जल्ला फेसबुकावर कुण्या पोरीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्याली समद्यांना दाखवत बसलाय. आरे तुम्हाना काय लाज लज्जा शरम?
शिपाई नं. 1 : आमचा दादूस बोल्ला कोण्च्या बी कामाची लाज धराची नाय...(पुन्हा एक चिमटा काढून दुसरा शिपाई त्याला थांबवतो)
शिपाई नं 2 : बादशहानु, म्या तरी ह्याला सांगत व्हतो, कॅन्डी क्रश लाव. एक डाव मांजा, एक डाव तुजा आस खेळू पण यानीच व्हाटसअप लावून मना जोक वाचाया लावलान. मंग मी हसणारच ना तुम्हीच सांगा तुम्हीबी हसला अस्ताव का नाय जोक आयकल्यावर?
अकबर : (वैतागून) ए अरे ए...पण हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव??
शिपाई नं. 1 : (पुन्हा वेडगळपणाने) ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो)
अकबर : (वैताग, राग, चिडचिड एकदमच आणत) आरे कसा करता म्हंजे करून दाखवतय रे मेल्या. बंद करा ते आन काम करा कामाच्या येळेला! (दोघेही शिपाई खाली मान आणि खांदे टाकून उदास चेह-याने आपापल्या जागेवर म्हणजेच दरवाज्याच्या दोनही बाजूला उभे राहतात आणि वर्दी द्यायला सुरू करतात.)
शिपाई नं. 1 : बाहिथ बघ
शिपाई नं 2: बा खाली जा
शिपाई नं 1 : हुश्शार!
दोघेही शिपाई : बादशा अकबर येत्यात हो ~~ (अकबर आत शिरतो)
बेगम : (वैताग चेह-यावर स्पष्ट आणित) ह्यो कंचा टायम म्हणायचा? हिथ सफरचंद चिरून चिरून आवरे बारीक झाले की आता फोडणीलाच टाकणार व्हते.
अकबर : (रोमॅन्टिक आवाजात) अग आवरे... तुज्या हातच कारल बी मना गोरच लागतय, मंग जल्ला ह्ये तर सफरचंद हाय ना?
बेगम : (लाजत) जावा तिकरं!
अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का?
बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून...आता मी काय सांगते जरा कान देऊन ऐका. (अकबर सावरून बसतो) मांजा भाव, दोन - चार जांगेवर हिन्टरव्ह्यू देऊन आलाय पण त्येला जॉब मिळालेला न्हाय. आन त्यो तर लईच हुश्शार हाये तवा त्येला तुम्ही तुमच्याकडच ठिऊन घेवा.
अकबर : आवरे, जल्ला त्यो जर आवराच हुश्शार हाये तर त्येला त्या दोन - चार जागेवाल्यांनीच का न्हाय घितला?
बेगम : (चिडून) जल्ला मांज्या माहेरच्या लोकांचा काय बी तुम्हांना बघवतच नाय. मी जातेच आता माहेराला. मंग बसा एकटेच सफरचंद खात! (सफरचंदाच ताट आदळते)
अकबर : (विनवणीच्या सुरात) आग आवरे, तसा नाय, त्येला चांगला जॉब लागूदे. मी कुठ काय म्हणतोय.
बेगम : हां, मंग त्येला तुम्हीच जॉब देवा!
अकबर : अग पण आवरे त्येला तर ऑटोकॅड पण तर नाय येत. मंग त्येला कोण्च काम देऊ मांज्या हापिसात?
बेगम : (उपरोधाने) तुमच्या बिरबलाची तर लय मोठी डिग्री हाये ना. मंग सगळे लोक कामावरन कारा आणि एकट्या बिरबलालाच ठीवा की कामासाठी.
अकबर : (पुन्हा अजिजिने) अग आवरे चिरू नको, तू म्हणतेस तर त्येला ठिऊन घेतो कामाला. पण काय कामासाठी घिऊ, मना कलत नाय.
बेगम : त्येला बिरबलाच्या जागेवर डिटेलर म्हणून घ्या.
अकबर : आग आवरे! बिरबल तर आमचा ब्येस डिटेलर हाय. त्येच्या बराबरीत तुजा भाव कुठच नाय. मंग बिरबलाला कारायचा कसा?
बेगम : तुम्ही मांज्या भावाला वलकत नाय! त्येच्या हुशारीची कहाणी आमच्या गावात समद्यांना तोंडपाठ हाये. आणि आता जर तुम्ही त्येला कामावर नाय घेताव तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा.
अकबर : आवरे, हे बघ, तुना कुठबी जायाची गरज नाय. आपण आताच हिथ तुज्या भावाला आन बिरबलाला बोलवून घिऊ आणि त्यांची टेस्ट घिऊ. तुज्या समोरच निकाल लागूदे दोघांचा.
बेगम : ठीक हाय!
अकबर : (टाळी वाजवतो) जल्ला कोण हाये का तिकरं? (शिपाई नं. 1 हातात मोबाईल धरून काहीतरी टाईप करीत आतमध्ये येतो.) आरे ये कालतोंड्या, मोबाईलसकट फिकून दीन आठव्या मजल्यावरन. जवा बघाव तवा मोंबाईल-मोंबाईल. आवरा काय अस्तय रे त्याच्यात?
शिपाई नं. 1 :(मोबाईल पुढे करीत) रिचार्ज वर ऑफर हाये. रिचार्जवर एक पिझ्झा फ्री!
अकबर : बाबो, पिझ्झा! मंग माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर!
शिपाई नं. 1 : बादशहानु छोटा रिचार्ज आता पन्नासचा झालाय, तुम्हांना परवरतय का सांगा? लगीच करतो. पण अर्धा पिझ्झा मना बी पायजे.
बेगम : (वैतागून जोरात ओरडते) आरे गप बसा तुम्ही दोघबी. मांज्या डोक्यांचा पिझ्झा होतय.
अकबर : अरे शिपाई, जा आमच्या मेवण्याला जिथ आसल तिथ जाऊन सांग, तूना बोलावलंय हाय म्हणाव बादशहानं!
(शिपाई जातो आणि बादशहाचा मेहुणा वेडे चाळे करत आत येतो.)
मेहुणा : बादशाहाचा ईजय चव्हाण असो! (दात विचकत फिदीफिदी हसतो)
अकबर : वा! आवरे ह्यो तर खरंच लई हुश्शार हाये!
बेगम : असू दे! ईचारा काय इचारायचंय ते!
अकबर : (हातातला एक पेपरचा गठ्ठा मेहुण्यासमोर टाकत) हे काय हाये सांगतोस का?
मेहुणा : ह्यो कागदाचा गठ्ठा आहे. (स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन दात काढतो. बेगम पण त्याच्या डोक्यावरून गहिवरून हात फिरवून बोटे मोडते)
अकबर : (आता वैतागून दुसरीकडे पाहत) ह्येच्यावर काय दिसतंय तूना?
मेहुणा : (खूप निरखून पाहिल्याचा आव आणीत) जापन्ना ह्येच्यावर मना लय काल्या काल्या लायनी दिसत्यात आन एक गारीबी दिसते. पोंम पोंम! (पुन्हा दात विचकतो)
अकबर : (मनात आधी 'बास' म्हणतो) शाबास! आता मना सांग ह्ये गारीच्या बाजूला घर हाये ते कराया तूना कितके दीस लागतीन?
मेहुणा : (छाती फुगवून) लय दीस लागतीन!
अकबर : बेगम, आता मी बिरबलाला बोलवतो! (ताली वाजवत) ये व्हाटसअप वाल्या हिकर ये! (शिपाई आत आल्यावर) जा बिरबलाला सांग आम्ही बोलावलंय!
(शिपाई जातो आणि बिरबल बादशहा आणि बेगम यांना मुजरा करत आत येतो.)
बिरबल : बादशहा सलामत आन बेगम यांचा ईजय असो. बोला सरकार आम्हाना कशाला बोलिवल हाय.
अकबर : (पुन्हा तोच कागदाचा गठ्ठा बिरबलाला दाखवत) बिरबल हे काय हाये?
बिरबल : (कागदाचा गठ्ठा हातात घेतो आणि सावकाशपणे एक-एक पान उलटत पाहतो.) बादशा सलामत, ह्यो मोशीतला एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट "बेव्हरलीक्रेस्ट" हाये. हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये आणि ह्यो समदा प्रोजेक्ट कराया अंदाजे एकशेसोला तास लागतेन!
अकबर : (बेगमकडे पाहून विजयी स्मितहास्य करीत) बघ आवरे! मी तुना पैलच बोल्लो व्हतो. बिरबल आमचा ब्येस डिटेलर हाये!
बेगम : (रागाने हातात सफरचंदाचं ताट घेते आणि भावाला मारीत सुटते.) कालतोंड्या, बावलटा, आवरा कसा येरा निघाला तू, माझी सगरी विज्जत घालीवली. तुना आता जित्ता नाय सोरत!

(मग अकबराचा मेहुणा बहिणीचा मार चुकवत पळू लागतो, बहिण त्याच्यामागे पळते आणि पडदा पडतो.)

(केवळ विनोदनिर्मिती साठी आगरी/मालवणी/कोकणी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांपैकी कुठल्याच भाषेवर माझे प्रभुत्व नसल्याने हा प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती)

नाट्यकथाविडंबनkathaaलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

16 Sep 2015 - 1:56 pm | अभ्या..

खत्तरनाक.
लैच जब्रा दम हाय संदीपभाऊ. मस्त जमलय.

अभ्यादादा,

माझ्या पहिल्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद काळजात घर करून बसला आहे त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची खरी प्रतीक्षा असते.
तुम्हाला कथा आवडली आणि पहिला प्रतिसाद तुमचाच आला यापेक्षा अजून काय वेगळे हवे होते?

असेच लक्ष असूद्या गरीबाकडे! _____/\______

आपणच गरीबानी एकमेकाकडे लक्ष द्यायचे भाऊ. नाहीतर आपला निकाल लावायला बसलेतच पांढरे कार्डवाले. ;)
असो. छान लिहिताय. शुभेच्छा अन पाठिंबा कायमच असेल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Sep 2015 - 1:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवरला मना..
अवांतरः माझी आणि धम्याची खरडवही वाचल्यासारख वाटले. ;)
धम्या बघतोयेस ना बाला?

मी-सौरभ's picture

16 Sep 2015 - 2:01 pm | मी-सौरभ

आवडेश

नाखु's picture

16 Sep 2015 - 2:03 pm | नाखु

गजाल
आवडली

मदनबाण's picture

16 Sep 2015 - 2:04 pm | मदनबाण

अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का?
बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून..

हॅहॅहॅ... जल्ला, खुर्च्चीतन पटकन खाली पडलो असतो ना मी... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||

मांत्रिक's picture

16 Sep 2015 - 2:06 pm | मांत्रिक

विनोद कळला नाही! व्यनी कराल?

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 4:35 pm | चांदणे संदीप

सही पकडे है! ;)

मांत्रिक's picture

16 Sep 2015 - 2:05 pm | मांत्रिक

मस्तच! अगदी धमाल लिवलंय! फुल टैमपास!

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 2:08 pm | प्यारे१

लै भारी रं म्हावर्‍या.
बाकी
>>> हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये
ह्ये काय ल्हिवलाय? म्हणजे मला थोडीफार माहिति आहे या क्षेत्रातली म्हणून विचारतोय. कदाचित मी चुकत असेन.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 3:38 pm | चांदणे संदीप

प्यारेदादा,
खूप तीव्र उतारावरील जमिनींवरच्या घरांचा पाया खोलपर्यंत न्यावा लागतो.
त्यासाठीचा एक पर्याय म्हणजे Pile Foundation.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 3:44 pm | प्यारे१

ओके ओके आलं लक्षात. सध्या समुद्राकाठी असल्यानं Pile Foundation इकडचंच लक्षात आहे.

लेख वाचून खूसुखूसु, फिदिफिदी, फिस्सकन, खी खी खी...सगळ्या प्रकारचं हसून झालंय...
मालवणी बोलणारी अकबर अँड कंपनी अल्टिमेट आहे !

पैसा's picture

16 Sep 2015 - 2:43 pm | पैसा

मस्त आहे!

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2015 - 2:56 pm | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: सुंदर कल्पनाविस्तार.
ह्यात भाषा आणि तांत्रिक तपशिल महत्त्वाचे नसून हा काल्पनिक संवाद आधुनिकतेचा साज चढवून रंगविला आहे तो कौतुकास्पद आहे. मजा आली वाचताना.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 3:33 pm | चांदणे संदीप

हाही प्रयत्न गोड मानून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार!
इथे हे छोटस नाटक टाकू की नको अशा विचारात होतो.

आपल लिखाण आवडल गेल की खरंच आनंद होतो. कदाचित या क्षेत्रात नवीन असल्यामुळे असेल किंवा माहिती नाही.

सर्व वाचकांचेही आभार!

जेपी's picture

16 Sep 2015 - 3:35 pm | जेपी

मस्त लेख.

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 3:49 pm | नीलमोहर

" माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर "

"हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव??
-ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो)"

हा हा !!
भारीच..
हसून हसून वाट लागली की..

बाकी ते बिरबलचं प्रोजेक्ट एस्टिमेट पण पर्फेक्ट..

माहितगार's picture

16 Sep 2015 - 3:52 pm | माहितगार

आवडले, महाविद्यालये गणपतीचे सार्वजनिक कार्यक्रमस्थळी करून पाहण्याजोगी नाटीका वाटते, मस्त !

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 4:08 pm | चांदणे संदीप

येग्झॅट्ली!
ह्यो पोग्राम करून झालेला आहे मागच्या दिवाळीला आमच्या हापिसात!
इथे तो व्हिडिओ पाहता येईल.

पण पुरेशा नियोजनाअभावी, आर्थिक पाठबळाअभावी व आजिबात रंगीत तालीम केलेले आम्ही, यामुळे इतक चांगल नाट्य तितकस चांगल रंगल नाही याचा राहून राहून खेद वाटतो.

माहितगार's picture

16 Sep 2015 - 4:17 pm | माहितगार

इतक चांगल नाट्य तितकस चांगल रंगल नाही

मला नाट्यक्षेत्राचा गंधही नाही. तरीपण नाट्यलेखनातील नाटीकेचा शेवट जरा घाई होते आहे का ? शेवटच्या भागात सुधारणेस वाव आहे असे वाटते का ते जाणकारांनी सांगावे

कालतोंड्या हा शब्द आपण भारतीय लोक सहजतेने वापरत असलो आणि युरोपीयनांप्रमाणे या शब्दाचा वापर रेसीस्ट नसला तरीही या शेवटी रंगवाचक शब्द आहे आणि या शब्दास सहजपणे जमल्यास सुट्टी द्यावी असे वाटते.

मदनबाण's picture

16 Sep 2015 - 4:08 pm | मदनबाण

मग माकडतोंड्या बद्धल काय म्हणाल ?
माकडांनी निशेधाचा ठराव पास करावा काय ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||

सुबोध खरे's picture

16 Sep 2015 - 6:17 pm | सुबोध खरे

साहेब
काळतोंड्या हे कोकणातील वानराचे( हुप्प्या, माकड नव्हे माकडाचे तोंड लाल असते) दुसरे नाव आहे. त्याचा रंगवाचक शिवीशी संबंध नाही.

सस्नेह's picture

16 Sep 2015 - 4:00 pm | सस्नेह

मजेदार !

ब़जरबट्टू's picture

16 Sep 2015 - 4:09 pm | ब़जरबट्टू

लय बेक्कार फुटलो राव...

मस्त लिव्हलय ...

बबन ताम्बे's picture

16 Sep 2015 - 4:11 pm | बबन ताम्बे

त्या कॉमेडीची सर्कस कार्यक्रमात एक जण अकबरासारखाच बोलतो.

अविनाश पांढरकर's picture

16 Sep 2015 - 4:12 pm | अविनाश पांढरकर

मस्त लेख.

प्रचेतस's picture

16 Sep 2015 - 4:58 pm | प्रचेतस

जबरी लिहिलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2015 - 5:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल आहे ! मजा आ गया !!

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 5:14 pm | चांदणे संदीप

मोठ्या लोकांचे पाय लागले आज गरीबाच्या धाग्याला.
भरून पावलो! _____/\_____

नाव आडनाव's picture

16 Sep 2015 - 5:39 pm | नाव आडनाव

जल्ला! मना आवरीची गोट्ट लई आवरली :)
आधी वाचलेल्या मिथुन भाऊंच्या (ब्रिटिश) आगरी भाषेत लिहिलेल्या कथा आठवल्या.
मस्त :)

सतिश गावडे's picture

16 Sep 2015 - 5:55 pm | सतिश गावडे

लय भारी लिवलास बाल्या.
जल्ला हासून हासून मांजे पोटान दुकाय लागला.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 6:03 pm | चांदणे संदीप

थांकू दादूस!

प्यारे१'s picture

16 Sep 2015 - 6:28 pm | प्यारे१

गावडे सरांचे सर-पण..... काल पण, आज पण, उद्या पण! ;)

मुक्त विहारि's picture

16 Sep 2015 - 6:09 pm | मुक्त विहारि

नाटुकली छान लिहिली आहे.

सुबोध खरे's picture

16 Sep 2015 - 6:18 pm | सुबोध खरे

+१

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 6:40 pm | चांदणे संदीप

तुम्हांला आवडली हे पाहून फार आनंद झाला!.
खरे सर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

मित्रहो's picture

16 Sep 2015 - 6:18 pm | मित्रहो

मजा आली

गोर????

मेल्या तुजो प्रयत्न गोर तिकट खारट आंबट तुरट सगला मानून फस्त करून टाकल्याव.

लई ब्ब्येस लिवलंस हां

जे.पी.

चांदणे संदीप's picture

16 Sep 2015 - 6:42 pm | चांदणे संदीप

बापरे!

जे.पी.मॉर्गनदादा
धन्यवाद!

यानिमित्ताने मी तुमच्या लेखनाचा FAN, A.C., Cooler, हातपंखा आणि जे काही असेल ते…आहे....हे सांगतो!

विवेकपटाईत's picture

16 Sep 2015 - 8:22 pm | विवेकपटाईत

लय भारी जबरदस्त +_++++

उगा काहितरीच's picture

16 Sep 2015 - 8:31 pm | उगा काहितरीच

मस्त

बोका-ए-आझम's picture

16 Sep 2015 - 9:51 pm | बोका-ए-आझम

कसला भारी पीस त्यो!

निशदे's picture

16 Sep 2015 - 10:43 pm | निशदे

हसून हसून वाट लागली.......... असेच लिहा अजून आणि आम्हाला वाचायला द्या पटापट!

एस's picture

16 Sep 2015 - 10:53 pm | एस

क्या बात! फार्स एकदम फर्मास जमला आहे.

मास्टरमाईन्ड's picture

16 Sep 2015 - 11:11 pm | मास्टरमाईन्ड

तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा.

हहपुवा

चांदणे संदीप's picture

17 Sep 2015 - 12:16 am | चांदणे संदीप

उगवत्या सोनेरी प्रभेला
मोहक नाजूक कळ्या
फुग-या फसव्या गालांना
हस-या खाचेच्या खळ्या
देता आल्या, तर आणखी काय पाहिजे?
आजचा दिवस 'जगलो' असा मोजण्यात आलेला आहे!

(सर्वांसोबत पुन्हा हसलेला)
Sandy

रातराणी's picture

17 Sep 2015 - 5:21 am | रातराणी

भारी लिहल आहे रे!
आवडेश :)
अशी सिरीज लिहिलीस तर मज्जा येईल.

रा दादुस का लिवलं रं !! येक लंबर !!

मला वाटत हे कलाकार , पात्र सही वठवतील

अकबर : भरत गणेशपुरे
बेगम: हेमांगी कवी
बिरबल : भाऊ कदम
बेगमचा भाऊ म्हणजेच अकबराचा मेहुणा : कुशल बद्रिके
5) शिपाई नं. 1: प्रियदर्शन जाधव
6) शिपाई नं. 2 : सागर कारंडे

चांदणे संदीप's picture

17 Sep 2015 - 8:14 am | चांदणे संदीप

माझ्या मते बिरबल आणि मेहुणा यांची कास्टींग तुम्ही सुचवलीये त्याच्या अगदी उलट पाहिजे!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

रच्याकने मिपाकरांपैकी कुणी विंटरेस्डेड आहे हा ही नाटुकली करायला?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Sep 2015 - 12:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेच्चं ल्यायला आलेलो!!

खेडूत's picture

17 Sep 2015 - 7:16 am | खेडूत

मस्त आहे कथा!
ब्रिटीश यांची नाट्काची कथा आठवली... :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Sep 2015 - 8:57 am | कैलासवासी सोन्याबापु

जॉनी रावत च्या २ ४ कॅसेटी ऐका! तुमची आगरी भाषा सुद्धा स्ट्रांग होईल त्यात तुमची ही उपजत विनोदी शैली मिसळली की हास्यरस शेम्पेन उड़ेल बघा!

हे नाटुकले जबरी आहे! लैच रिफ्रेशिंग वाटते!!!

चांदणे संदीप's picture

17 Sep 2015 - 10:46 am | चांदणे संदीप

खर आहे...जॉनी रावतमुळेच आगरी भाषा माहिती झाली.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बापूसाहेब!

एक एकटा एकटाच's picture

17 Sep 2015 - 9:05 am | एक एकटा एकटाच

खुसखुशीत

मस्त लिहिलय.

धमाल आली वाचायला.मस्त! मस्त!

आनंदराव's picture

18 Sep 2015 - 12:03 pm | आनंदराव

अकबर. बिरबला च्या कथा या फोरम्याट मधे लिहायला घ्याच.
मजा येईल.

चांदणे संदीप's picture

18 Sep 2015 - 12:11 pm | चांदणे संदीप

आनंदराव तुमच्या आणि वर निशदे आणि रातराणी यांच्या सूचनेवर विचार करणेत आलेला आहे.

घेतले आहे मनावर…पाहूया कसे जमते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

दा विन्ची's picture

18 Sep 2015 - 10:56 pm | दा विन्ची

फर्मास

gogglya's picture

22 Sep 2015 - 8:10 pm | gogglya

अजून येऊ द्या!

चांदणे संदीप's picture

22 Sep 2015 - 8:16 pm | चांदणे संदीप

कमिंग सून! (म्हणजे, लौकरच!)

नूतन सावंत's picture

23 Sep 2015 - 8:42 am | नूतन सावंत

सकाली सकाली हस्न्याच्ये सर्व परकार करून झाले आहेत.राज्ज्यात सर्व आलबेल हाय.
मस्त लिवलाय.ते आनंदरावांनी सुचविलेलं त्येव्हडं मनावर घ्या.

तुडतुडी's picture

23 Sep 2015 - 5:06 pm | तुडतुडी

हे हे हे. मस्त

पाषाणभेद's picture

27 Sep 2015 - 11:52 am | पाषाणभेद

छान आहे आवडली

चांदणे संदीप's picture

27 Sep 2015 - 1:08 pm | चांदणे संदीप

धन्यवाद पाभे!

स्टे ट्यून्ड... उद्याच दुसरा भाग टाकतोय!

चांदणे संदीप's picture

27 Sep 2015 - 1:53 pm | चांदणे संदीप

धन्यवाद पाभे!

स्टे ट्यून्ड... उद्याच दुसरा भाग टाकतोय!