Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 13:49
लेखनविषय (Tags)
नाट्य
कथा
विडंबन
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
विरंगुळा
[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे. आणि बादशहा अकबर तिच्या कक्षाकडे चालत येत आहे.] ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- स्थळ : बेगमचा शयनकक्ष काळ : निवांत बसून गप्पागोष्टी करण्याचा वेळ : सायंकाळची ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पात्रे : 1) अकबर 2) बेगम 3) बिरबल 4) बेगमचा भाऊ म्हणजेच अकबराचा मेहुणा 5) शिपाई नं. 1 6) शिपाई नं. 2 ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- (अकबर बेगमच्या शयनकक्षासमोर येतो व पाहतो तर आपण आल्याची वर्दी द्यायची सोडून दोन शिपाई व्हाटसअपवरचे जोक वाचून हसत आहेत. अकबर त्यांच्यामागे उभा राहिला तरी त्यांना पत्ता नाही.) अकबर : (जोराने ओरडून) नालायकांनो, चिरा पडली तुमच्या तोंडान, हे काय करताव? (दोघेही शिपाई दचकतात व अकबराला पाहून खूप घाबरतात) शिपाई नं. 1 : (वेडगळपणाने) बादशहानु, आम्ही जोक वाचताव. तुम्हाना सांगतो अस्ला जबरी हाये... (दुसरा शिपाई पहिल्याला चिमटा काढून त्याला शांत बसायची खूण करतो) शिपाई नं. 2 : (चाचरत) बादशहानु जल्ला तुम्ही आलाव?? जल्ला मंग त्या मांगच्या शिपुरड्यानी वर्दी दिल्याली मना ऐकू कशी नाय आली?? अकबर : (वैतागून) आर त्योबी जल्ला फेसबुकावर कुण्या पोरीची फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्याली समद्यांना दाखवत बसलाय. आरे तुम्हाना काय लाज लज्जा शरम? शिपाई नं. 1 : आमचा दादूस बोल्ला कोण्च्या बी कामाची लाज धराची नाय...(पुन्हा एक चिमटा काढून दुसरा शिपाई त्याला थांबवतो) शिपाई नं 2 : बादशहानु, म्या तरी ह्याला सांगत व्हतो, कॅन्डी क्रश लाव. एक डाव मांजा, एक डाव तुजा आस खेळू पण यानीच व्हाटसअप लावून मना जोक वाचाया लावलान. मंग मी हसणारच ना तुम्हीच सांगा तुम्हीबी हसला अस्ताव का नाय जोक आयकल्यावर? अकबर : (वैतागून) ए अरे ए...पण हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव?? शिपाई नं. 1 : (पुन्हा वेडगळपणाने) ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो) अकबर : (वैताग, राग, चिडचिड एकदमच आणत) आरे कसा करता म्हंजे करून दाखवतय रे मेल्या. बंद करा ते आन काम करा कामाच्या येळेला! (दोघेही शिपाई खाली मान आणि खांदे टाकून उदास चेह-याने आपापल्या जागेवर म्हणजेच दरवाज्याच्या दोनही बाजूला उभे राहतात आणि वर्दी द्यायला सुरू करतात.) शिपाई नं. 1 : बाहिथ बघ शिपाई नं 2: बा खाली जा शिपाई नं 1 : हुश्शार! दोघेही शिपाई : बादशा अकबर येत्यात हो ~~ (अकबर आत शिरतो) बेगम : (वैताग चेह-यावर स्पष्ट आणित) ह्यो कंचा टायम म्हणायचा? हिथ सफरचंद चिरून चिरून आवरे बारीक झाले की आता फोडणीलाच टाकणार व्हते. अकबर : (रोमॅन्टिक आवाजात) अग आवरे... तुज्या हातच कारल बी मना गोरच लागतय, मंग जल्ला ह्ये तर सफरचंद हाय ना? बेगम : (लाजत) जावा तिकरं! अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का? बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून...आता मी काय सांगते जरा कान देऊन ऐका. (अकबर सावरून बसतो) मांजा भाव, दोन - चार जांगेवर हिन्टरव्ह्यू देऊन आलाय पण त्येला जॉब मिळालेला न्हाय. आन त्यो तर लईच हुश्शार हाये तवा त्येला तुम्ही तुमच्याकडच ठिऊन घेवा. अकबर : आवरे, जल्ला त्यो जर आवराच हुश्शार हाये तर त्येला त्या दोन - चार जागेवाल्यांनीच का न्हाय घितला? बेगम : (चिडून) जल्ला मांज्या माहेरच्या लोकांचा काय बी तुम्हांना बघवतच नाय. मी जातेच आता माहेराला. मंग बसा एकटेच सफरचंद खात! (सफरचंदाच ताट आदळते) अकबर : (विनवणीच्या सुरात) आग आवरे, तसा नाय, त्येला चांगला जॉब लागूदे. मी कुठ काय म्हणतोय. बेगम : हां, मंग त्येला तुम्हीच जॉब देवा! अकबर : अग पण आवरे त्येला तर ऑटोकॅड पण तर नाय येत. मंग त्येला कोण्च काम देऊ मांज्या हापिसात? बेगम : (उपरोधाने) तुमच्या बिरबलाची तर लय मोठी डिग्री हाये ना. मंग सगळे लोक कामावरन कारा आणि एकट्या बिरबलालाच ठीवा की कामासाठी. अकबर : (पुन्हा अजिजिने) अग आवरे चिरू नको, तू म्हणतेस तर त्येला ठिऊन घेतो कामाला. पण काय कामासाठी घिऊ, मना कलत नाय. बेगम : त्येला बिरबलाच्या जागेवर डिटेलर म्हणून घ्या. अकबर : आग आवरे! बिरबल तर आमचा ब्येस डिटेलर हाय. त्येच्या बराबरीत तुजा भाव कुठच नाय. मंग बिरबलाला कारायचा कसा? बेगम : तुम्ही मांज्या भावाला वलकत नाय! त्येच्या हुशारीची कहाणी आमच्या गावात समद्यांना तोंडपाठ हाये. आणि आता जर तुम्ही त्येला कामावर नाय घेताव तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा. अकबर : आवरे, हे बघ, तुना कुठबी जायाची गरज नाय. आपण आताच हिथ तुज्या भावाला आन बिरबलाला बोलवून घिऊ आणि त्यांची टेस्ट घिऊ. तुज्या समोरच निकाल लागूदे दोघांचा. बेगम : ठीक हाय! अकबर : (टाळी वाजवतो) जल्ला कोण हाये का तिकरं? (शिपाई नं. 1 हातात मोबाईल धरून काहीतरी टाईप करीत आतमध्ये येतो.) आरे ये कालतोंड्या, मोबाईलसकट फिकून दीन आठव्या मजल्यावरन. जवा बघाव तवा मोंबाईल-मोंबाईल. आवरा काय अस्तय रे त्याच्यात? शिपाई नं. 1 :(मोबाईल पुढे करीत) रिचार्ज वर ऑफर हाये. रिचार्जवर एक पिझ्झा फ्री! अकबर : बाबो, पिझ्झा! मंग माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर! शिपाई नं. 1 : बादशहानु छोटा रिचार्ज आता पन्नासचा झालाय, तुम्हांना परवरतय का सांगा? लगीच करतो. पण अर्धा पिझ्झा मना बी पायजे. बेगम : (वैतागून जोरात ओरडते) आरे गप बसा तुम्ही दोघबी. मांज्या डोक्यांचा पिझ्झा होतय. अकबर : अरे शिपाई, जा आमच्या मेवण्याला जिथ आसल तिथ जाऊन सांग, तूना बोलावलंय हाय म्हणाव बादशहानं! (शिपाई जातो आणि बादशहाचा मेहुणा वेडे चाळे करत आत येतो.) मेहुणा : बादशाहाचा ईजय चव्हाण असो! (दात विचकत फिदीफिदी हसतो) अकबर : वा! आवरे ह्यो तर खरंच लई हुश्शार हाये! बेगम : असू दे! ईचारा काय इचारायचंय ते! अकबर : (हातातला एक पेपरचा गठ्ठा मेहुण्यासमोर टाकत) हे काय हाये सांगतोस का? मेहुणा : ह्यो कागदाचा गठ्ठा आहे. (स्वत:च्या हुशारीवर खूष होऊन दात काढतो. बेगम पण त्याच्या डोक्यावरून गहिवरून हात फिरवून बोटे मोडते) अकबर : (आता वैतागून दुसरीकडे पाहत) ह्येच्यावर काय दिसतंय तूना? मेहुणा : (खूप निरखून पाहिल्याचा आव आणीत) जापन्ना ह्येच्यावर मना लय काल्या काल्या लायनी दिसत्यात आन एक गारीबी दिसते. पोंम पोंम! (पुन्हा दात विचकतो) अकबर : (मनात आधी 'बास' म्हणतो) शाबास! आता मना सांग ह्ये गारीच्या बाजूला घर हाये ते कराया तूना कितके दीस लागतीन? मेहुणा : (छाती फुगवून) लय दीस लागतीन! अकबर : बेगम, आता मी बिरबलाला बोलवतो! (ताली वाजवत) ये व्हाटसअप वाल्या हिकर ये! (शिपाई आत आल्यावर) जा बिरबलाला सांग आम्ही बोलावलंय! (शिपाई जातो आणि बिरबल बादशहा आणि बेगम यांना मुजरा करत आत येतो.) बिरबल : बादशहा सलामत आन बेगम यांचा ईजय असो. बोला सरकार आम्हाना कशाला बोलिवल हाय. अकबर : (पुन्हा तोच कागदाचा गठ्ठा बिरबलाला दाखवत) बिरबल हे काय हाये? बिरबल : (कागदाचा गठ्ठा हातात घेतो आणि सावकाशपणे एक-एक पान उलटत पाहतो.) बादशा सलामत, ह्यो मोशीतला एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट "बेव्हरलीक्रेस्ट" हाये. हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये आणि ह्यो समदा प्रोजेक्ट कराया अंदाजे एकशेसोला तास लागतेन! अकबर : (बेगमकडे पाहून विजयी स्मितहास्य करीत) बघ आवरे! मी तुना पैलच बोल्लो व्हतो. बिरबल आमचा ब्येस डिटेलर हाये! बेगम : (रागाने हातात सफरचंदाचं ताट घेते आणि भावाला मारीत सुटते.) कालतोंड्या, बावलटा, आवरा कसा येरा निघाला तू, माझी सगरी विज्जत घालीवली. तुना आता जित्ता नाय सोरत! (मग अकबराचा मेहुणा बहिणीचा मार चुकवत पळू लागतो, बहिण त्याच्यामागे पळते आणि पडदा पडतो.) (केवळ विनोदनिर्मिती साठी आगरी/मालवणी/कोकणी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांपैकी कुठल्याच भाषेवर माझे प्रभुत्व नसल्याने हा प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती)
  • Log in or register to post comments
  • 13660 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/16/2015 - 13:56

Permalink

खत्तरनाक.

खत्तरनाक. लैच जब्रा दम हाय संदीपभाऊ. मस्त जमलय.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 15:43

In reply to खत्तरनाक. by अभ्या..

Permalink

माझ्या पहिल्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद

अभ्यादादा, माझ्या पहिल्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद काळजात घर करून बसला आहे त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची खरी प्रतीक्षा असते. तुम्हाला कथा आवडली आणि पहिला प्रतिसाद तुमचाच आला यापेक्षा अजून काय वेगळे हवे होते? असेच लक्ष असूद्या गरीबाकडे! _____/\______
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 09/16/2015 - 16:51

In reply to माझ्या पहिल्या कथेवरचा तुमचा प्रतिसाद by चांदणे संदीप

Permalink

आपणच गरीबानी एकमेकाकडे लक्ष

आपणच गरीबानी एकमेकाकडे लक्ष द्यायचे भाऊ. नाहीतर आपला निकाल लावायला बसलेतच पांढरे कार्डवाले. ;) असो. छान लिहिताय. शुभेच्छा अन पाठिंबा कायमच असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Wed, 09/16/2015 - 13:57

Permalink

आवरला

आवरला मना.. अवांतरः माझी आणि धम्याची खरडवही वाचल्यासारख वाटले. ;) धम्या बघतोयेस ना बाला?
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 09/16/2015 - 14:01

Permalink

मस्त

आवडेश
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 09/16/2015 - 14:03

Permalink

मस्त

गजाल आवडली
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/16/2015 - 14:04

Permalink

अकबर : (मागे पाहत) तिकर काय

अकबर : (मागे पाहत) तिकर काय सरप्राईज ठिवलय का? बेगम : झाला का तुमचा पांचट ज्योक मारून.. हॅहॅहॅ... जल्ला, खुर्च्चीतन पटकन खाली पडलो असतो ना मी... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 09/16/2015 - 14:06

In reply to अकबर : (मागे पाहत) तिकर काय by मदनबाण

Permalink

विनोद कळला नाही! व्यनी कराल?

विनोद कळला नाही! व्यनी कराल?
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 16:35

In reply to अकबर : (मागे पाहत) तिकर काय by मदनबाण

Permalink

सही पकडे है! ;)

सही पकडे है! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 09/16/2015 - 14:05

Permalink

मस्तच! अगदी धमाल लिवलंय! फुल

मस्तच! अगदी धमाल लिवलंय! फुल टैमपास!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/16/2015 - 14:08

Permalink

लै भारी रं म्हावर्‍या.

लै भारी रं म्हावर्‍या. बाकी >>> हिलसाईड असल्यामुले हिथ पाईल फौण्डेशन लागणार हाये ह्ये काय ल्हिवलाय? म्हणजे मला थोडीफार माहिति आहे या क्षेत्रातली म्हणून विचारतोय. कदाचित मी चुकत असेन.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 15:38

In reply to लै भारी रं म्हावर्‍या. by प्यारे१

Permalink

खूप तीव्र उतारावरील

प्यारेदादा, खूप तीव्र उतारावरील जमिनींवरच्या घरांचा पाया खोलपर्यंत न्यावा लागतो. त्यासाठीचा एक पर्याय म्हणजे Pile Foundation. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/16/2015 - 15:44

In reply to खूप तीव्र उतारावरील by चांदणे संदीप

Permalink

ओके ओके आलं लक्षात. सध्या

ओके ओके आलं लक्षात. सध्या समुद्राकाठी असल्यानं Pile Foundation इकडचंच लक्षात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Wed, 09/16/2015 - 14:21

Permalink

आगं...आई ग! ह ह पु वा....मस्तं, मस्तं लिहिलंय.

लेख वाचून खूसुखूसु, फिदिफिदी, फिस्सकन, खी खी खी...सगळ्या प्रकारचं हसून झालंय... मालवणी बोलणारी अकबर अँड कंपनी अल्टिमेट आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 09/16/2015 - 14:43

Permalink

हाहाहा!

मस्त आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/16/2015 - 14:56

Permalink

सुंदर.

हा: हा: हा: सुंदर कल्पनाविस्तार. ह्यात भाषा आणि तांत्रिक तपशिल महत्त्वाचे नसून हा काल्पनिक संवाद आधुनिकतेचा साज चढवून रंगविला आहे तो कौतुकास्पद आहे. मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 15:33

Permalink

सर्वांचे आभार!

हाही प्रयत्न गोड मानून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार! इथे हे छोटस नाटक टाकू की नको अशा विचारात होतो. आपल लिखाण आवडल गेल की खरंच आनंद होतो. कदाचित या क्षेत्रात नवीन असल्यामुळे असेल किंवा माहिती नाही. सर्व वाचकांचेही आभार!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 09/16/2015 - 15:35

Permalink

मस्त लेख.

मस्त लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Wed, 09/16/2015 - 15:49

Permalink

:) धन्यवाद

" माजा बी धाचा छोटा रिचार्ज कर " "हॉपिस हावर्स मध्ये तुम्ही ऑन डुटी कस काय मोबाईलवर टाईमपास करताव?? -ह्यो काय असा. (हातातला मोबाईल समोर धरतो आणि हसत हसत स्क्रोल करू लागतो)" हा हा !! भारीच.. हसून हसून वाट लागली की.. बाकी ते बिरबलचं प्रोजेक्ट एस्टिमेट पण पर्फेक्ट..
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 09/16/2015 - 15:52

Permalink

आवडले, महाविद्यालये गणपतीचे

आवडले, महाविद्यालये गणपतीचे सार्वजनिक कार्यक्रमस्थळी करून पाहण्याजोगी नाटीका वाटते, मस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 16:08

In reply to आवडले, महाविद्यालये गणपतीचे by माहितगार

Permalink

येग्झॅट्ली!

येग्झॅट्ली! ह्यो पोग्राम करून झालेला आहे मागच्या दिवाळीला आमच्या हापिसात! इथे तो व्हिडिओ पाहता येईल. पण पुरेशा नियोजनाअभावी, आर्थिक पाठबळाअभावी व आजिबात रंगीत तालीम न केलेले आम्ही, यामुळे इतक चांगल नाट्य तितकस चांगल रंगल नाही याचा राहून राहून खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 09/16/2015 - 16:17

In reply to येग्झॅट्ली! by चांदणे संदीप

Permalink

इतक चांगल नाट्य तितकस चांगल

इतक चांगल नाट्य तितकस चांगल रंगल नाही
मला नाट्यक्षेत्राचा गंधही नाही. तरीपण नाट्यलेखनातील नाटीकेचा शेवट जरा घाई होते आहे का ? शेवटच्या भागात सुधारणेस वाव आहे असे वाटते का ते जाणकारांनी सांगावे
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 09/16/2015 - 15:58

Permalink

कालतोंड्या शब्दास सुट्टी देणे शक्य असू शकेल का ?

कालतोंड्या हा शब्द आपण भारतीय लोक सहजतेने वापरत असलो आणि युरोपीयनांप्रमाणे या शब्दाचा वापर रेसीस्ट नसला तरीही या शेवटी रंगवाचक शब्द आहे आणि या शब्दास सहजपणे जमल्यास सुट्टी द्यावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 09/16/2015 - 16:08

In reply to कालतोंड्या शब्दास सुट्टी देणे शक्य असू शकेल का ? by माहितगार

Permalink

मग माकडतोंड्या बद्धल काय

मग माकडतोंड्या बद्धल काय म्हणाल ? माकडांनी निशेधाचा ठराव पास करावा काय ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/16/2015 - 18:17

In reply to कालतोंड्या शब्दास सुट्टी देणे शक्य असू शकेल का ? by माहितगार

Permalink

साहेब

साहेब काळतोंड्या हे कोकणातील वानराचे( हुप्प्या, माकड नव्हे माकडाचे तोंड लाल असते) दुसरे नाव आहे. त्याचा रंगवाचक शिवीशी संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 09/16/2015 - 16:00

Permalink

हा: हा: !

मजेदार !
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Wed, 09/16/2015 - 16:09

Permalink

जबरा..

लय बेक्कार फुटलो राव... मस्त लिव्हलय ...
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Wed, 09/16/2015 - 16:11

Permalink

मस्त खुसखुशीत !!

त्या कॉमेडीची सर्कस कार्यक्रमात एक जण अकबरासारखाच बोलतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश पांढरकर on Wed, 09/16/2015 - 16:12

Permalink

मस्त

मस्त लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 09/16/2015 - 16:58

Permalink

जबरी लिहिलंय.

जबरी लिहिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 09/16/2015 - 17:08

Permalink

धमाल आहे ! मजा आ गया !!

धमाल आहे ! मजा आ गया !!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 17:14

Permalink

धन्यवाद वल्लीदा, इएकाका!

मोठ्या लोकांचे पाय लागले आज गरीबाच्या धाग्याला. भरून पावलो! _____/\_____
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Wed, 09/16/2015 - 17:39

Permalink

जल्ला! मना आवरीची गोट्ट लई

जल्ला! मना आवरीची गोट्ट लई आवरली :) आधी वाचलेल्या मिथुन भाऊंच्या (ब्रिटिश) आगरी भाषेत लिहिलेल्या कथा आठवल्या. मस्त :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 09/16/2015 - 17:55

Permalink

लय भारी लिवलास बाल्या.

लय भारी लिवलास बाल्या. जल्ला हासून हासून मांजे पोटान दुकाय लागला.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 18:03

In reply to लय भारी लिवलास बाल्या. by सतिश गावडे

Permalink

थांकू दादूस!

थांकू दादूस!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/16/2015 - 18:28

In reply to लय भारी लिवलास बाल्या. by सतिश गावडे

Permalink

गावडे सरांचे सर-पण..... काल

गावडे सरांचे सर-पण..... काल पण, आज पण, उद्या पण! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 09/16/2015 - 18:09

Permalink

मस्त....

नाटुकली छान लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/16/2015 - 18:18

In reply to मस्त.... by मुक्त विहारि

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 18:40

In reply to +१ by सुबोध खरे

Permalink

तुम्हांला आवडली

तुम्हांला आवडली हे पाहून फार आनंद झाला!. खरे सर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Wed, 09/16/2015 - 18:18

Permalink

मस्त

मजा आली
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Wed, 09/16/2015 - 18:36

Permalink

प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती

गोर???? मेल्या तुजो प्रयत्न गोर तिकट खारट आंबट तुरट सगला मानून फस्त करून टाकल्याव. लई ब्ब्येस लिवलंस हां जे.पी.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 09/16/2015 - 18:42

In reply to प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती by जे.पी.मॉर्गन

Permalink

बापरे!

बापरे! जे.पी.मॉर्गनदादा धन्यवाद! यानिमित्ताने मी तुमच्या लेखनाचा FAN, A.C., Cooler, हातपंखा आणि जे काही असेल ते…आहे....हे सांगतो!
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 09/16/2015 - 20:22

Permalink

लय भारी जबरदस्त +_++++

लय भारी जबरदस्त +_++++
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 09/16/2015 - 20:31

Permalink

मस्त

मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 09/16/2015 - 21:51

Permalink

क बाला!

कसला भारी पीस त्यो!
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Wed, 09/16/2015 - 22:43

Permalink

हसून हसून वाट लागली..........

हसून हसून वाट लागली.......... असेच लिहा अजून आणि आम्हाला वाचायला द्या पटापट!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 09/16/2015 - 22:53

Permalink

आवरा!

क्या बात! फार्स एकदम फर्मास जमला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मास्टरमाईन्ड on Wed, 09/16/2015 - 23:11

Permalink

+१

तर मी चालले माहेराला. मांज एशियाडच बुकिंग करून देवा.
हहपुवा
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 09/17/2015 - 00:16

Permalink

दिवस आजचा मोजला!

उगवत्या सोनेरी प्रभेला मोहक नाजूक कळ्या फुग-या फसव्या गालांना हस-या खाचेच्या खळ्या देता आल्या, तर आणखी काय पाहिजे? आजचा दिवस 'जगलो' असा मोजण्यात आलेला आहे! (सर्वांसोबत पुन्हा हसलेला) Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 09/17/2015 - 05:21

Permalink

भारी लिहल आहे रे!

भारी लिहल आहे रे! आवडेश :) अशी सिरीज लिहिलीस तर मज्जा येईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com