बैसलो होतो पानटपरीवर

भैड्या's picture
भैड्या in जे न देखे रवी...
19 Sep 2015 - 8:18 pm

बैसलो होतो पानटपरीवर उगाच
फुंकित बिड्या,
करीत खेळ आगिशी पेटविल्या अनंत काड्या

ऊठुन बैसलो घेतला दगड टाकिला पत्र्यावरी
आवाज जाहले शेजारचे कुत्रे पळता भुई थोडी.

धाप लागिली घाम फुटला नरड्यात माझ्या कोरड.
हाड कुत्र्या छौ साल्या बंद कर तुझी ती ओरड.

झाड दिसले चढलो वरती बैसलोय मटकुळं करून.
बैसलयं खाली बघतयं वरी कुत्रं खाकरून.

एक थेरीडा बघुन प्रसंग गेलाय बावचळुन.
हासडुनी शिव्या मजला गेला कुत्र्याला घेऊन.

रोखुन मज दाखवा कुणी चालिलो मी अड्ड्यावर.
चार शिपुरडे नेई मजला पुन्हा टपरीवर.

क्रमश:

अनर्थशास्त्रइशारागरम पाण्याचे कुंडछावाहझलरौद्ररसनृत्यगझलभूगोलसामुद्रिक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

19 Sep 2015 - 8:43 pm | चांदणे संदीप

धन्य आहे दादा.... यात आणि क्रमश: काय आहे??

एक एकटा एकटाच's picture

19 Sep 2015 - 8:44 pm | एक एकटा एकटाच

कशा उगा
नसती उठाठेव

तुमच्या मिपा-वयाच्या तुलनेत 'गरम पाण्याचे कुंड' तुम्हांला बरेच लवकर सापडले आहे. 'भूछत्र', 'कोडाईकनाल', 'गरम पाण्याचे कुंड' इत्यादी मिपापरिभाषा समजायला आम्हांला दोन वर्षे लागली!

असो, चालू द्या.

चाणक्य's picture

19 Sep 2015 - 9:16 pm | चाणक्य

बाप्पा मोड आॅन <आमची आख्खी जिंदगी गेली काशिनाथ तरी आजून आम्हाला सुधरना> बाप्पा मोड आॅफ

चाणक्य's picture

19 Sep 2015 - 9:19 pm | चाणक्य

अर्धवट आला प्रतिसाद...परत टंकतो

बाप्पा मोड आॅन - 'आमची आख्खी जिंदगी गेली काशिनाथ आमाला आजून सुधरना' - बाप्पा मोड आॅफ

काशिनाथा सद्बुद्धी दे रे बाबा..

प्रतिसाद पण फेस्बुकी. कशाचा कशाला पत्ता नाही. काय म्हणतायेत ते समजून घ्यायचं नाही. त्यातली खोच कळाली नाही तर गप्पही राहायचे नाही, औघडे.

भैड्या's picture

20 Sep 2015 - 9:24 am | भैड्या

ख्याक्कीकिक्क....!
घ्या अजुन एक बिनकामाचा परती साद खास तुमच्यासाठी. म्हणे खोच कळ्ळी न्हाय.^O^

बाप्पा मोड ऑन "जुडि !! कशाचि पालकाचि का मेथिचि ? आन काय करतो हा तुझा ज्यानराव, नाय म्हंजे पोटापान्याच काय? बबन्या ना आम्चा नॉन मॅट्रिक पासय " बाप्पा मोड ऑफ.

काशिनाथ ऱ्हावद्या बाजुला. ही मेथीची जुडि काय प्रकरण आहे?

नव्या ठोकळ्यांना कसं कळायचं राव..

मनीषा's picture

21 Sep 2015 - 7:17 am | मनीषा

हाहाहा ...
नसत्या काड्या करणार्‍या उपद्व्यापी माणसाची कविता आवडली.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

21 Sep 2015 - 4:55 pm | मम्बाजी सर्वज्ञ

झक्कास कविता! आवडेश खन्ना प्रसन्न!!!!
हसून हसून डोळ्यात पाणी आले. एकदम लहानपणची आठवण आली. घरा मागे एक ओढा होता पलीकडे सोसायटी चे नाव आठवत नाही. शनिवारी गल्लीतली पोरे खट्याळ पणा करायचो. सोसायटीच्या मध्य भागी एक वाचमान ची टपरी होती. ओढ्याच्या या किनार्यावरून दगड भिरकवायचा उंच, बरोब्बर टपरीवर पडला कि मोठा आवाज होत असे. वाच्मानच काय पण सोसायटीतल्या बर्याच लोकांची झोप उडायची.
एक दिवस वाचमनची बायको ओढ्याजवळ दबा धरून बसली. पहिला दगड पडल्याबरोबर आम्ही सगळे हसून लोळायला लागलो. सगळे बेसावध होतो. अचानक पाठीत रट्टे पडायला लागल्यावर लक्षात आले तोपर्यंत उशीर झाला होता. संध्याकाळी सोसायटीत असले मोठे भांडण झाले कि काही बोलायची सोय नाही. भांडणाचा निष्कर्ष असा निघाला कि बाहेरची पोरे कोलानितल्या ग्राउंड वर सोसायटीतल्या पोरांना खेळू देत नसल्यामुळे असले उद्योग सुचतात. तेवा पासून ग्राउंड वर मोठे चक्कर मारून आम्हाला खेळायला जागा करून देऊ लागले. क्रिकेट आणि फुटबाल कितीही झाले तरी त्याला आमच्या जुन्या खेळाची सर कधीच आली नाही.