Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

मोग्याम्बो's picture
मोग्याम्बो in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 10:51 pm

Avengers: Age of Ultron ह्या बहुचर्चित चित्रपटाने जगातील सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट निर्मिती करणारी Marvel Studio ही संस्था सगळ्यांना परिचित आहे. Comic Books मधील पात्रांवर चित्रपट तयार करण्यामध्ये ही सध्या अग्रगण्य आहे. पण ही कंपनी एकेकाळी दिवाळखोरी जाहीर करणार होती असे म्हटले तर?

Marvel Comics सन १९३९ साली स्थापन झाली. तिचा पहिला वहिला मालक होता "मार्टिन गुडमन". पण Marvel ला २००५ साल येईपर्यंत कधीच स्थैर्य लाभले नाही. त्याचे कारण म्हणजे प्रत्यके गोष्टीमध्ये ते DC Comics च्या मागेच राहिले.

"ह्युमन टोर्च " आणि "नेमोर" ह्या दोन पात्रांनी मार्वेल कॉमिक्स ची सुरवात झाली. तो काळच मुळी दुसऱ्या महायुद्धाचा होता. त्यामुळे हे दोन महानायक सैन्या सोबत लढायचे. पण ते पूर्णपणे मनुष्य नव्हते. ह्युमन टोर्च हा एक Android होता. तर नेमोर हा म्युटंट असून एटलांटीस चा राजकुमार होता. त्यामुळे मार्वल ला मानवी superhero ची गरज भासत होती.

Human Torch

Namor

Captain America

त्यामुळे १९४१ साली त्यांनी Captain America ला जन्म दिला. कॅप्टन अमेरिका हा पहिला महायोद्धा होता ज्याने कॉमिक बुक्स मध्ये हिटलरशी दोन हात केले होते.
दुसरे महायुद्ध संपले आणि कॉल्ड वॉर चालू झाले. मार्वल ने ह्या तिन्ही महानायकांना एकत्रित करून "All Winners Squad" तयार केला.
ही पात्रे थेट सैन्याशी निगडीत असल्याने ५० च्या दशकापर्यंत खूप प्रसिद्ध होती. पण जस जशी शांतता प्रस्थापित होत होती तसे ह्यांची प्रसिद्धी लोप पावू लागली.

त्याकाळी कॉमिक्स बुक्सचे वितरण "News stand Distribution" द्वारे व्हायचे. सुरवातीला "Timely" आणि नंतर "Atlas" बरोबर मार्वलचा करार होता. युद्धानंतर कॉमिक्स बुक्सचा खप खूपच कमी झाला होता. म्हणून गुडमन ने "America News Comapny" शी करार केला. पण ही भागीदारी काही काळच चालू शकली. काही कायद्यातील तरतुदींमुळे हा करार मार्वल ला मोडावा लागला.

युद्धाशी संबधित गोष्टीमध्ये वाचकांना फारसा रस नाही राहिला होता. म्हणून मार्वलने वेगवेगळ्या शैली पडताळून पाहण्यास सुरवात केली. हॉरर, क्राईम, रोमान्स, कॉमेडी, सटायर असल्या अनेक प्रकारांमध्ये ते कॉमिक्स काढू लागले. पण म्हणावे तसे यश त्याना प्राप्त होत नव्हते.

१९६१ साला नंतर खर्या अर्थाने मार्वलचे चांगले दिवस येऊ लागले. कारण त्यावेळी "Stan Lee" हा संपादक बनला होता. DC ने त्यांच्या सुपर हिरोसची "Justice League" टीम बनवली होती. त्याकाळी ही टीम प्रसिद्धीच्या उच्च स्तरावर होती. त्यांच्या यशाचे कारण म्हणजे वेगवेगळ्या स्तरांतील वेगवेगळ्या प्रकारचे महानायकांचे एकत्रीकरण. मार्वलने पण हा मार्ग स्विकारायचे ठरवले. स्टेन ली ने पहिली सुपर हिरो असलेले कुटुंब बनविले. त्यांचे नाव होते "Fantastic Four". खऱ्या जगातील सुपर हिरोंचा वावर कसा असेल ह्या गोष्टींवर स्टेन लीच भर होता. Fantastic Four च्या यशा नंतर मार्वल ने सुपर हिरोंची लाटच आणली.Hulk, Spider-Man, Thor, Ant-Man, Iron Man, the X-Men हे महानायक तर Daredevil, Punisher हे Anti Hero त्यांनी बनविले. Dr. Strange हा तर जादू तोणा, काळी जादू, चेटूक करणारा SuperHero होता. तो सुधा खूप प्रसिद्धीस आला. आणि ह्याच काळात "Avengers" नी जन्म घेतला. त्यावेळी Avengers हे Justice League पेक्षा जास्त प्रसिद्ध नव्हते पण त्यांचा फायदा मार्वलला भविष्यात नक्कीच झाला. इतका फायदा झाला की आत्ता Justice League ला त्यांच्या अस्तित्वाची चिंता भासू लागली आहे

Avengers

७०च्या दशकात मार्वलने जागतिक बाजारपेठेत पाय पसरवण्यास सुरवात केली. फ्रांस, ब्रिटन ह्या देशांमधले तिथले लोकल स्वरूपाचे महानायाक त्यांनी बनविण्याचा प्रयत्न केला. Captain Britain नावाचा महानायक स्टेन ली ने बनविला. मार्वल कॉमिक्स हे त्या काळचे मसाला कॉमिक्स असयाचे. त्यांची धाटणी ही विनोदी प्रकारची असायचे. स्टेन ली हा प्रत्येक कॉमिक्स मध्ये विनोद असलेच पाहिजेत ह्यावर भर द्यायचा. त्याउलट DC बऱ्यापैकी गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे मार्वल आवडणारा एक वर्ग तयार झाला होता.
Spider Man हा मार्वल चा १ नम्बरचा हिरो होता. पहिला teenager सुपर हिरो म्हणून तो कॉमिक्स वाचणाऱ्याला जवळचा वाटत होता. ह्याच काळात गुडमन आणि स्टेन ली दोघेही मार्वल मधून निवृत्त झाले.

Stan Lee
Stan Lee

पण १९८० नंतर दूरदर्शनचा शिरकाव घराघरात होऊ लागला. एनिमेशन पट तयार होऊ लागले. अनेक एनिमशन टीवी मालिका तयार होऊ लागल्या. कॉमिक्स वाचणारा प्रमुख वर्ग प्राथमिक करमणुकीचे साधन म्हणून टीवी कडे पाहू लागला. जगातील सर्वच कॉमिक्स बुकना आत्ता मंदीचा सामना करावा लागत होता. आणि मार्वललाही ह्याचा फार मोठा फटका सहन करावा लागत होता. त्यांच्या वाईट पर्वास सुरवात झाली होती.

इतिहासवाङ्मयचित्रपटविचारसमीक्षामाहिती

प्रतिक्रिया

चैतू's picture

4 Sep 2015 - 11:47 pm | चैतू

एवढा इतिहास तर माहितच नव्हता

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 1:11 am | उगा काहितरीच

वाचतोय!

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2015 - 7:47 am | कैलासवासी सोन्याबापु

+१

वगिश's picture

5 Sep 2015 - 7:53 am | वगिश

पुभाप्र

जेपी's picture

5 Sep 2015 - 9:09 am | जेपी

वाचतोय.
पुभाशु.

तुषार काळभोर's picture

5 Sep 2015 - 12:41 pm | तुषार काळभोर

क्रमशः आहे ना?
असेल तर पुभाप्र
नसेल तर, हे अर्धवट वाटलं.

मोग्याम्बो's picture

5 Sep 2015 - 2:34 pm | मोग्याम्बो

पुढचा भाग लवकरच येईल

मार्वल आवडत नाहीत. डीसी भारी. (आम्ही तर ईंद्रजाल कॉमिक्स वाचत होतो, म्हणजे आधी पहात होतो मग वाचत होतो)

द-बाहुबली's picture

5 Sep 2015 - 1:39 pm | द-बाहुबली

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १

लेख अजुन वाचला नाही पण या विषयावर धागा निघालाय हीच आनंदाची बाब आहे. खवचट सविस्तर प्रतिसाद अर्थातच धागा वाचुन झाल्यावर देइन ;)

द-बाहुबली's picture

5 Sep 2015 - 2:06 pm | द-बाहुबली

रोचक धागा.. अगदी सविस्तर येउद्या. लेखणी एकदम मोकळी सोडा.

मोग्याम्बो's picture

5 Sep 2015 - 2:38 pm | मोग्याम्बो

कॉमिक्स बद्दल वाचकांना किती रस आहे हे नक्की माहित नव्हते म्हणून खूपच छोटा लेख लिहिला. पुढील लेख नक्कीच सविस्तर लिहीन.

पुभाप्र. पण सविस्तर लिहा.

वितो आन्दोलिनि's picture

5 Sep 2015 - 4:06 pm | वितो आन्दोलिनि

छान लेख. आवडला. पुभाप्र.

साधा मुलगा's picture

6 Sep 2015 - 12:47 pm | साधा मुलगा

+१

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2015 - 2:51 pm | बोका-ए-आझम

मस्त लेख. पुभाप्र.

वगिश's picture

6 Sep 2015 - 3:24 pm | वगिश

पुभाप्र

कपिलमुनी's picture

7 Sep 2015 - 12:42 pm | कपिलमुनी

वेगळ्या विषयावरची लेखमाला !
कॉमिक्स आणि कॅरेक्टर्स हयांना अमेरिकन जीवनात महत्वाचा स्थान आहे. तिथे याला जबऱ्या फॅन फोलोंईग आणि कलेक्टर्स असतात.Transformers, Iron Man अशा कित्येक भन्नाट कल्पना आधी कॉमिक्स मधे आणि नंतर मोठ्या पडद्यावर आल्यात. Disney, DC, Marvel यांचा इतिहास , स्पर्धा रंजक आहे.
पुढील लेखाला शुभेच्छा !
मिपावर स्वागत

नया है वह's picture

7 Sep 2015 - 7:18 pm | नया है वह

पुभाप्र

मुक्त विहारि's picture

7 Sep 2015 - 7:33 pm | मुक्त विहारि

पुढला भाग जरा लवकर टाकलात तर उत्तम......

(कार्टून प्रेमी) मुवि

मार्वल ची माहिती बऱ्यापैकी आहे पण मराठीत वाचायला मजा येतीये … अजून येऊ दे …

कॉमिक्सचा (आणि इस्पेशली राज कॉमिक्स) चाहता
कॅप्टन कहर

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 11:00 am | विशाल कुलकर्णी

सॉलीड लेख...
जुन्या आठवणी ताज्या झाल्या राव. धन्यवाद.

लिहा हो, अगदी दिल खोलके लिहा. हा आपल्या आवडीचा इशय आहे.

मार्व्हलपेक्षा डीशीचा फ्यान असलो तरी काय झाले? स्टॅन ली म्हणजे बाप माणूस, नाद नाय करायचा.

आदिजोशी's picture

8 Sep 2015 - 3:42 pm | आदिजोशी

७६ वर्षाचा झाला तरी उत्साह बघा.

कपिलमुनी's picture

8 Sep 2015 - 3:50 pm | कपिलमुनी

विरुद्ध पक्षामधली माणसे(?) आली!

मोग्याम्बो's picture

8 Sep 2015 - 5:15 pm | मोग्याम्बो

मीही DC चाहताच आहे, पण DC ने जास्त चढ उतार नाही पहिले जेवढे Marvel ने पाहीले. त्यामुळे मार्वलची स्टोरी जास्त रोचक आहे.

आदिजोशी's picture

8 Sep 2015 - 6:00 pm | आदिजोशी

आम्हाला दोघेही आवडतात :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Sep 2015 - 5:19 pm | अनिरुद्ध.वैद्य

दर मार्व्हल फ़्लिममंदी असतो त्यो :) बाकी डीसीमध्ये तुमचा अवतार झकास ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Sep 2015 - 8:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्हाला बॅटमॅनचं कामिक्स बनिवणारा अजुन एक मणुक्ष माहिती आहे.

मोग्याम्बो's picture

10 Sep 2015 - 10:24 am | मोग्याम्बो

Frank Miller म्हणायचे आहे का तुम्हाला

बॅटमॅन's picture

14 Sep 2015 - 12:57 pm | बॅटमॅन

आम्हांलाही, सांगतो थांबा त्याला.

आदिजोशी's picture

8 Sep 2015 - 3:34 pm | आदिजोशी

लिहाल तितके कमी :) थांबू नका.

चिगो's picture

8 Sep 2015 - 4:11 pm | चिगो

मस्तच.. वाचतोय.

मी भारतीय म्हणजेच हिंदी कॉमिक्सचा जंबाट चाहता होतो.. आता पण थोडाफार आहे. लहानपणी लोकमत कॉमिक्स यायचं मराठीमध्ये, ते नंतर बंद झालं. राज कॉमिक्सचे नागराज, सुपर कमांडो ध्रुव (हा माझा सगळ्यात आवडता) डोगा, अश्वराज, भोकाल सगळेच वाचायचो तेव्हा.. 'अ‍ॅव्हेंजर्स', 'जस्टीस लीग' सारखे ह्यांचेपण मल्टी-हीरो विशेषांक असायचे. 'बाँकेलाल' हे विनोदी पात्रपण मस्त होतं. डायमंड कॉमिक्सचं सगळ्यात प्रसिद्ध पात्र म्हणजे 'चाचा चौधरी' पण त्यांचे इतर पात्रं जसे बिल्लु (ह्याचे डोळे सदैव केसांच्या बटांनी झाकलेले असायचे), पिंकी जास्त आवडायचे. कुठल्यातरी वेगळ्याच कॉमिक्सचे 'राम-रहीम', 'मोटू-पतलू' पण मस्त होते.

संचित's picture

9 Sep 2015 - 1:33 pm | संचित

मस्त.

थॉर माणूस's picture

10 Sep 2015 - 10:27 am | थॉर माणूस

अरे कुठे नेऊन ठेवलाय भाग २ आमचा? :)

साधा मुलगा's picture

13 Sep 2015 - 8:00 pm | साधा मुलगा

+१

कपिलमुनी's picture

14 Sep 2015 - 12:44 am | कपिलमुनी

कधी ?