भारतरत्न अब्दुल कलाम

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
27 Jul 2015 - 10:01 pm

APJ Kalam

भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले.

आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे. त्यामुळे आज परत एकदा "विठ्ठलाच्या पायी थरारली वीट" ह्या ओळी आठवल्या शिवाय राहवत नाहीत...

कलामांना विनम्र श्रद्धांजली!

राजकारणविचारप्रतिक्रियाबातमी

प्रतिक्रिया

_मनश्री_'s picture

27 Jul 2015 - 10:03 pm | _मनश्री_

वाईट बातमी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली !!

शशिकांत ओक's picture

27 Jul 2015 - 11:51 pm | शशिकांत ओक

डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सन 2007साली ते पुण्यात हवाईदलातील SU 30 विमानात बसून चालवायला आले असताना त्याच्या उत्साही स्वभावाला उद्धेशून मी एक पत्र पाठवले होते. मला त्याची पोच जरूर मिळाली. परंतु त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली नाही. मी त्यांना नाडीग्रंथांवर भाषेच्या अंगाने शोधकार्य करायला आपण विश्वविद्यालयांना सुचवावे अशी ती विनंती होती. त्यांच्या मूकसंमती मुळे ते नंतर प्रत्यक्षात घडलेही...

शशिकांत ओक's picture

29 Jul 2015 - 12:13 am | शशिकांत ओक
पद्मावति's picture

27 Jul 2015 - 10:04 pm | पद्मावति

आत्ताच न्यूज़ वाचली.

श्रीरंग_जोशी's picture

27 Jul 2015 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी

अत्यंत दु:खद बातमी.
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. कलाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे आवडते कार्य करत होते.
शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले.

त्यांचे विचार अन कार्य नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील.

पैसा's picture

27 Jul 2015 - 10:13 pm | पैसा

विद्यार्थ्यांच्यामधे असताना, भावी पिढीला काही अमूल्य मार्गदर्शन करत असताना हे घडले. या अजातशत्रु व्यक्तिमत्वाने मृत्यूलाही जिंकले असे म्हणावे लागेल.

अर्धवटराव's picture

27 Jul 2015 - 10:22 pm | अर्धवटराव

:(

कलाम सरांना विनम्र श्रद्धांजली.
अतीव आदराने नतमस्तक असं व्यक्तीमत्व.

आतिवास's picture

27 Jul 2015 - 10:24 pm | आतिवास

२००४-२००५ मध्ये कधीतरी 'इंडिया २०२०' वाचून एपीजेंना एक पत्र लिहिलं. वेबसाईटवरून पत्ता शोधून ते पोस्ट केलं. राष्ट्रपतींनी दखल घेणं सोडा; ते त्यांच्यापर्यंत पोचणारही नाही याची मला खात्री होती.

महिनाभराने दिल्लीतून एक पत्र आलं. खुद्द एपीजेंनी उत्तर दिलं होतं. ती फक्त पोच नव्हती, तर मी नोंदवलेल्या आक्षेपांना त्यांनी सौम्य भाषेत, भिन्न मताचा आदर राखत उत्तर दिलं होतं.

माझ्यासारख्या एका सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी दिलेली वागणूक माझ्यासाठी 'बेंचमार्क' आहे - नेहमीच राहील.

प्यारे१'s picture

27 Jul 2015 - 10:30 pm | प्यारे१

___/\___

भावपूर्ण श्रद्धांजलि.
अशा प्रसंगी घरातलं कुणीतरी गेल्याची भावना क्वचितच असते ती आज आहे.

अमृत's picture

28 Jul 2015 - 8:47 am | अमृत

घरातील कुणीतरी गेल्याची भावना. :-(

जुइ's picture

27 Jul 2015 - 10:39 pm | जुइ

त्यांचा शेवट देखिल मार्गदर्शन करताना झाला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. कलाम सरांना भावपुर्ण श्रद्धांजली.
प्यारे खरच कोणतरी जवळचे आज आपल्यामधे नाही हिच भावना सर्वांच्या मनात आहे.

जडभरत's picture

27 Jul 2015 - 11:10 pm | जडभरत

कलामसाहेबांना विनम्र श्रद्धांजली.

किसन शिंदे's picture

27 Jul 2015 - 11:15 pm | किसन शिंदे

मनातून खूप रूखरूख लागलेय. माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक!

कलाम साहेबांना श्रद्धांजली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

अतुलनीय शास्त्रज्ञ, राष्ट्रपती, शिक्षक आणि माणूस यांचे मिश्रण असलेले अनन्य व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. :(

एका आदर्श शिक्षकाने त्याचा शेवटचा श्वास विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच घेतला.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली.

रातराणी's picture

27 Jul 2015 - 11:23 pm | रातराणी

विनम्र श्रद्धांजली.

माजी राष्ट्रपती,अब्दुल कलम यांना भावपूर्ण श्रद्धांजली

स्रुजा's picture

27 Jul 2015 - 11:26 pm | स्रुजा

भावपूर्ण श्रद्धांजली. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहीले.

असलेले व आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त कार्यरत असलेल्या......

'डॉ. अब्दुल जे. कलाम यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो व चिरशांती लाभो.'

रेवती's picture

27 Jul 2015 - 11:30 pm | रेवती

फार वाईट झाले.
मा. कलामांना विनम्र श्रद्धांजली.

राघव's picture

27 Jul 2015 - 11:40 pm | राघव

अत्यंत दु:खद बातमी. :-(
विनम्र श्रद्धांजली..

एस's picture

27 Jul 2015 - 11:40 pm | एस

श्रद्धांजलीला शब्दही अपुरे पडावेत अशी मोजकीच माणसे जगात होऊन जातात... कलामसर त्यांपैकी एक.

मन्या सज्जना's picture

27 Jul 2015 - 11:45 pm | मन्या सज्जना

भावपूर्ण श्रद्धांजलि!ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो!

काळा पहाड's picture

27 Jul 2015 - 11:56 pm | काळा पहाड

:(

संदीप डांगे's picture

28 Jul 2015 - 12:19 am | संदीप डांगे

भारताचे मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांना मनापासून एक कडक सॅल्यूट आणि अश्रुपूर्ण श्रद्धांजली.

सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न पाहणारे आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले आयुष्य झोकून देणारे फार कमीच. त्यात अग्रक्रमाने अब्दुल कलाम यांचे नाव आहे. आज जगात भारतीयांना मानाने नजर वर करून बोलता येते यामागे या माणसाचे कठोर श्रम कारणीभूत आहेत. माणूस गेला तरी त्याने केलेले काम मागे राहते याचे साक्षात उदाहरण अब्दुल कलाम यांनी घालून दिले आहे. फक्त क्षेपणास्त्रच नाही तर जीवनाच्या इतर अंगांमधेही संशोधक वृत्ती दाखवून यांनी तिथेही काही शोध लावलेत. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाचे उदाहरण म्हणून भारत २०२० या प्रकल्पाचे देता येईल. जेवढी मेहनत त्यांनी या प्रकल्पासाठी घेतली त्याच्या १ टक्का तरी भारतातल्या सगळ्या तरूणांनी ते पुस्तक अभ्यासण्यासाठी घेतली असती तर त्यांच्या हयातीतच त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. भारतीयांकडून फक्त याच एका भेटीची अपेक्षा प्राण सोडतांना त्यांना राहीली असावी.

चतुरंग's picture

28 Jul 2015 - 12:27 am | चतुरंग

एका अतिशय गरीब आणि सर्वसामान्य घरातून आलेला माणूस किती मोठी पदे भूषवू शकतो, इतकेच नव्हे तर त्या पदांना स्वतःच्या अनन्य व्यक्तिमत्त्वाने वेगळी झळाळी प्रदान करतो आणि तरीदेखील सर्वसामान्य नागरिकाला ती व्यक्ती आपल्यातली वाटत राहते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम. त्यांचे संपूर्ण आयुष्य, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मार्गदर्शक म्हणावे लागेल. मा. कलामांना विनम्र श्रद्धांजली.
(या प्रसंगाने मला माझ्या मामाची आठवण झाली ज्याला कलामांचा भरपूर सहवास मिळाला होता, त्यांनी एकत्र कामही केलेले होते. त्याच्या प्रथम स्मृतिदिनी एक लेख लिहिला होता त्याचा दुवा -
http://www.misalpav.com/node/7972
आज दोघेही या जगात नाहीत. :( )
-(साश्रु)चतुरंग

मधुरा देशपांडे's picture

28 Jul 2015 - 1:36 am | मधुरा देशपांडे

भावपुर्ण श्रद्धांजली!

अरुण मनोहर's picture

28 Jul 2015 - 4:46 am | अरुण मनोहर

देशाला अभिमान असावा असा एक थोर भारतीय आज आपल्याला सोडून गेला. त्यांच्या महान कार्याचा दिपस्तंभ सतत आपल्याला मार्गदर्शन करीत राहो !

चिगो's picture

28 Jul 2015 - 5:42 am | चिगो

डॉ. कलामांना विनम्र श्रद्धांजली..

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 5:52 am | उगा काहितरीच

भावपूर्ण श्रद्धांजली !

एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली.

बोका-ए-आझम's picture

28 Jul 2015 - 7:00 am | बोका-ए-आझम

जो गेला तो एपीजे अब्दुल कलाम नावाचा देह. त्यांचे विचार अजरामर आहेत आणि राहतील. डाॅ.कलाम यांना आदरांजली!

हाडाचा शिक्षक विद्यादान करतानाच गेला. ऋषितुल्य आदरणीय डाॅ कलामांना भावपूर्ण श्रध्दांजली.
.

यशोधरा's picture

28 Jul 2015 - 8:04 am | यशोधरा

:(

dadadarekar's picture

28 Jul 2015 - 8:12 am | dadadarekar

श्रद्धांजली

अमित मुंबईचा's picture

28 Jul 2015 - 8:55 am | अमित मुंबईचा

डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली

ब़जरबट्टू's picture

28 Jul 2015 - 8:59 am | ब़जरबट्टू

श्रद्धांजली !

अधुनिक विज्ञान ऋषी ही संज्ञा सार्थ करणारा एक सच्चा देशसेवक !!!

नतमस्तक नाखु

कविता१९७८'s picture

28 Jul 2015 - 9:21 am | कविता१९७८

डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली

निस्वार्थी मनाने देशसेवेच्या कार्यास वाहुन घेणारे थोर व्यक्तिमत्व आदरणीय श्री. कलाम साहेब यांना विनम्र श्रद्धांजली.

डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली

ऋषीतुल्य व्यक्तीमत्वास भावपूर्ण आदरांजली

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jul 2015 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार

आकाशाला गवसणी घालणार आभाळाएवढा माणूस.
डाॅ. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पैजारबुवा

विवेक्पूजा's picture

28 Jul 2015 - 10:11 am | विवेक्पूजा

श्रद्धांजली :(

मृत्युन्जय's picture

28 Jul 2015 - 10:57 am | मृत्युन्जय

भावपुर्ण श्रद्धांजली. आदर वाटावीत अशी व्यक्तिमत्वे देशातुन कमी होत चालली आहेत.

मित्रहो's picture

28 Jul 2015 - 11:04 am | मित्रहो

जेथे कर माझे जुळती म्हणावे असे एक व्यक्तीमत्व आज हरवले.

मोहन's picture

28 Jul 2015 - 11:05 am | मोहन

भारत रत्न कलामांना विनम्र श्रध्दांजली.

बाळ सप्रे's picture

28 Jul 2015 - 11:22 am | बाळ सप्रे

त्यांच्या जाण्यानं दु:ख होण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानदानानं आणि देशाला व समाजाला केलेल्या इतर योगदानानं समृद्ध झालेल्या जगण्याचं अप्रुप वाटतं. He lived the life he wanted and died the death he wanted.

खटपट्या's picture

28 Jul 2015 - 11:29 am | खटपट्या

भावपूर्ण श्रध्दांजली !!

सस्नेह's picture

28 Jul 2015 - 11:37 am | सस्नेह

आदरपूर्ण श्रद्धांजली !!!

सुधीर कांदळकर's picture

28 Jul 2015 - 11:39 am | सुधीर कांदळकर

श्रद्धांजली. राजकारणातील मोजक्या पूज्य व्यक्तींपैकी एक.

कुसुमावती's picture

28 Jul 2015 - 12:02 pm | कुसुमावती

भावपूर्ण श्रध्दांजली

होबासराव's picture

28 Jul 2015 - 12:32 pm | होबासराव

भावपूर्ण श्रध्दांजली

श्रीगुरुजी's picture

28 Jul 2015 - 12:40 pm | श्रीगुरुजी

अरेरे! फार मोठा माणूस गेला. खर्‍या अर्थाने व सर्वार्थाने 'भारतरत्न' असलेले शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम काल अचानक गेले.

त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली!

विजय_आंग्रे's picture

28 Jul 2015 - 12:51 pm | विजय_आंग्रे

भावपूर्ण श्रद्धाजंली!

जगप्रवासी's picture

28 Jul 2015 - 1:01 pm | जगप्रवासी

आज सकाळी एक मेसेज आला

न हिंदू दिखता था न मुसलमान दिखता था,
उसे तो बस इन्सानो मे इन्सान दिखता था,
हो गई आज खामोश वो आवाज सदा के लिये,
जिसकी बातो मे केवल हिंदुस्थान दिखता था !!

भावपुर्ण श्रद्धांजली

द-बाहुबली's picture

28 Jul 2015 - 1:01 pm | द-बाहुबली

जेष्ठ शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेबांना माझा मानाचा मुजरा आणी अश्रुपूर्ण श्रद्धांजली. साहेब आज आपल्यासारख्या अनेक व्यक्तीमत्वांची देशाला नितांत गरज आहे.

मूकवाचक's picture

28 Jul 2015 - 3:49 pm | मूकवाचक

भावपूर्ण श्रध्दांजली!

तिमा's picture

28 Jul 2015 - 4:34 pm | तिमा

माझे मामा व थोर शास्त्रज्ञ, डॉ. वामन दत्तात्रय पटवर्धन(एआरडीई आणि इआरडीएल चे माजी डायरेक्टर) यांचे ते पट्ट्शिष्य होते. योगायोगाने दोघेही २७ जुलै रोजीच गेले. या थोर मानवाला विनम्र श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रध्दांजली

मनीषा's picture

28 Jul 2015 - 9:53 pm | मनीषा

विनम्र श्रद्धांजली !

रमेश आठवले's picture

29 Jul 2015 - 1:49 am | रमेश आठवले

कलाम यांना शास्त्रीय संगीताची आवड होती . फुरसत मिळाली की ते वीणेवर रियाझ करत असत आणि वीणा नेहमी बरोबर बाळगत असत. प्रेसिडेंट असताना २००७ साली ते पुण्याला आले होते. भीमसेन जोशीना स्वत:च्या मुक्कामी भेटायला बोलवायच्या ऐवजी ते त्यांच्या घरी जाउन त्याना भेटले होते. त्यांनी केलेल्या फर्माईश प्रमाणे भीमसेन यांनी त्याना जोगीयातील 'हरिका भेद न पायो ' ही बंदिश ऐकवली होती.

विकास's picture

29 Jul 2015 - 2:07 am | विकास

त्यावेळचा फोटो

Bhimsen and Kalam

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jul 2015 - 7:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एपीजेंना श्रद्धांजली. :(!!!!

चांगली लोकं पटापट गेली ह्या वर्षी :(.

मदनबाण's picture

29 Jul 2015 - 11:45 am | मदनबाण

डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

पथिक's picture

29 Jul 2015 - 12:14 pm | पथिक

भावपूर्ण श्रध्दांजली. पर्यावरण, पृथ्वीची माणसाने केलेली अवस्था याविषयी बोलताना आपल्या हातात अंदाजे तीस वर्षे आहेत असं म्हणाले ते शेवटच्या दिवशी! (एका फेसबुक पोस्ट वरून)

श्रीकृष्ण सामंत's picture

30 Jul 2015 - 8:03 am | श्रीकृष्ण सामंत

डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
TIFR बरोबर त्यांनी वेळोवेळी खूपच संपर्क ठेवला होता.