भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले.
आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे. त्यामुळे आज परत एकदा "विठ्ठलाच्या पायी थरारली वीट" ह्या ओळी आठवल्या शिवाय राहवत नाहीत...
कलामांना विनम्र श्रद्धांजली!
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सन 2007साली ते पुण्यात हवाईदलातील SU 30 विमानात बसून चालवायला आले असताना त्याच्या उत्साही स्वभावाला उद्धेशून मी एक पत्र पाठवले होते. मला त्याची पोच जरूर मिळाली. परंतु त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली नाही. मी त्यांना नाडीग्रंथांवर भाषेच्या अंगाने शोधकार्य करायला आपण विश्वविद्यालयांना सुचवावे अशी ती विनंती होती. त्यांच्या मूकसंमती मुळे ते नंतर प्रत्यक्षात घडलेही...
अत्यंत दु:खद बातमी.
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. कलाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे आवडते कार्य करत होते.
शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले.
त्यांचे विचार अन कार्य नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील.
२००४-२००५ मध्ये कधीतरी 'इंडिया २०२०' वाचून एपीजेंना एक पत्र लिहिलं. वेबसाईटवरून पत्ता शोधून ते पोस्ट केलं. राष्ट्रपतींनी दखल घेणं सोडा; ते त्यांच्यापर्यंत पोचणारही नाही याची मला खात्री होती.
महिनाभराने दिल्लीतून एक पत्र आलं. खुद्द एपीजेंनी उत्तर दिलं होतं. ती फक्त पोच नव्हती, तर मी नोंदवलेल्या आक्षेपांना त्यांनी सौम्य भाषेत, भिन्न मताचा आदर राखत उत्तर दिलं होतं.
माझ्यासारख्या एका सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी दिलेली वागणूक माझ्यासाठी 'बेंचमार्क' आहे - नेहमीच राहील.
अतुलनीय शास्त्रज्ञ, राष्ट्रपती, शिक्षक आणि माणूस यांचे मिश्रण असलेले अनन्य व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. :(
एका आदर्श शिक्षकाने त्याचा शेवटचा श्वास विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच घेतला.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली.
भारताचे मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांना मनापासून एक कडक सॅल्यूट आणि अश्रुपूर्ण श्रद्धांजली.
सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न पाहणारे आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले आयुष्य झोकून देणारे फार कमीच. त्यात अग्रक्रमाने अब्दुल कलाम यांचे नाव आहे. आज जगात भारतीयांना मानाने नजर वर करून बोलता येते यामागे या माणसाचे कठोर श्रम कारणीभूत आहेत. माणूस गेला तरी त्याने केलेले काम मागे राहते याचे साक्षात उदाहरण अब्दुल कलाम यांनी घालून दिले आहे. फक्त क्षेपणास्त्रच नाही तर जीवनाच्या इतर अंगांमधेही संशोधक वृत्ती दाखवून यांनी तिथेही काही शोध लावलेत. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाचे उदाहरण म्हणून भारत २०२० या प्रकल्पाचे देता येईल. जेवढी मेहनत त्यांनी या प्रकल्पासाठी घेतली त्याच्या १ टक्का तरी भारतातल्या सगळ्या तरूणांनी ते पुस्तक अभ्यासण्यासाठी घेतली असती तर त्यांच्या हयातीतच त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. भारतीयांकडून फक्त याच एका भेटीची अपेक्षा प्राण सोडतांना त्यांना राहीली असावी.
एका अतिशय गरीब आणि सर्वसामान्य घरातून आलेला माणूस किती मोठी पदे भूषवू शकतो, इतकेच नव्हे तर त्या पदांना स्वतःच्या अनन्य व्यक्तिमत्त्वाने वेगळी झळाळी प्रदान करतो आणि तरीदेखील सर्वसामान्य नागरिकाला ती व्यक्ती आपल्यातली वाटत राहते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम. त्यांचे संपूर्ण आयुष्य, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मार्गदर्शक म्हणावे लागेल. मा. कलामांना विनम्र श्रद्धांजली.
(या प्रसंगाने मला माझ्या मामाची आठवण झाली ज्याला कलामांचा भरपूर सहवास मिळाला होता, त्यांनी एकत्र कामही केलेले होते. त्याच्या प्रथम स्मृतिदिनी एक लेख लिहिला होता त्याचा दुवा -
http://www.misalpav.com/node/7972
आज दोघेही या जगात नाहीत. :( )
-(साश्रु)चतुरंग
प्रतिक्रिया
श्रद्धांजली
डॉ.अब्दुल कलाम आणि नाडीग्रंथ
कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.
कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.
कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.
कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
विठ्ठलाच्या पायी थरारली वीट
एक आठवण
___/\___
सहमत
विनम्र श्रद्धांजली.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.
कलामसाहेबांना विनम्र
मनातून खूप रूखरूख लागलेय.
अतुलनीय शास्त्रज्ञ,
विनम्र श्रद्धांजली.
माजी राष्ट्रपती,अब्दुल कलम
भावपूर्ण श्रद्धांजली.
'मरावे परी किर्तीरुपी उरावे' ह्या उक्तिचे मुर्तीमंत उदाहरण..
फार वाईट झाले.
__/\__
_/\_
भावपूर्ण श्रद्धांजलि!ईश्वर
:(
भारताचे मिसाईल मॅन ए पी जे
अतिशय दु:खद बातमी!
भावपुर्ण श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली .
विनम्र श्रद्धांजली..
भावपूर्ण श्रद्धांजली !
एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला
आदरांजली!
हाडाचा शिक्षक विद्यादान
श्रद्धांजली.
.
डाॅ.कलाम यांना भावपूर्ण
..
भावपूर्ण श्रद्धांजली !
डाॅ.कलाम यांना भावपूर्ण
निस्वार्थी मनाने देशसेवेच्या
मनातील आवडत्या व्यक्तींपैकी एक!
ऋषीतुल्य व्यक्तीमत्वास
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली. आदर
विनम्र श्रद्धांजली