व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना
पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.
तुम्हाला काही विशिष्ट शारीरिक समस्या नसेल तर सर्किट ट्रेनिंग कुणालाही (वयाचं तसं बंधन नाही; १५ ते ६५ या साधारण मर्यादा) करता येतं (आपापल्या परीने) आणि व्यायामाचा आनंद घेता येतो. यात शक्यतोवर आपल्या शरीराचं वजन वापरूनच व्यायाम केला जातो, त्यात अतिरिक्त वजन/डंबेल्स इत्यादींची गरज लागत नाही. व्यायामाचा रोख स्नायूंची ताकद वाढवण्याकडे असतो; आकार वाढणं हे ‘बाय प्रॉडक्ट’ असतं.
साधारणपणे सर्किट ट्रेनिंग २०-३० मिनिटात संपतं. यात विश्रांती कमी असते, त्यामुळे ती २०-३० मिनिटं तुमचा पल्स रेट ऑप्टिमम हाय ठेवणं हे उद्दिष्ट असतं. यात कार्डिओ आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा मिलाफ साधला जातो त्यामुळे ही पद्धत बरीच लोकप्रिय आहे. बारीक व्हायचं असो त्याचबरोबर शरीर टोन करायचं असो; किंवा जस्ट टू मेंटेन असो; सर्किट ट्रेनिंग ला संधी द्यायला हरकत नाही.
(खाण्याचा विषय आणल्याशिवाय चैन पडत नाही) खाण्याची रेसिपी करावी; म्हणजे, कुणाला साखर चालत नाही, मग गूळ घालावा, तिखट कमी, मसाला जास्त वगैरे वगैरे, तसं हे सर्किट ट्रेनिंग कस्टमाईझ करता येतं. पण त्यासाठी मुळात व्यायामप्रकारांची माहिती असणं गरजेचं.
मी माझ्या माहितीच्या आणि थोडक्या अनुभवाच्या आधारे एक सर्किट ट्रेनिंग डिझाईन केलंय, जे, साधारणपणे सगळ्यांना करता येईल; ते इथे शेअर करतोय; २० मिनिटात हा व्यायाम करून होतो. पण ती २० मिनिटं तुम्ही शिस्तीत दिल्याप्रमाणे व्यायाम करणं जरूरीचं आहे, त्याशिवाय इफेक्ट वाटणार नाही. बघा करून महिनाभर; सांगा कसं वाटतं ते.
प्रतिक्रिया
28 Nov 2013 - 2:32 pm | ज्ञानव
ते नॉर्मलला येई पर्यंत.....
वरील सर्व व्यायाम प्रकार करायला एक माणूस मिळेल का?
पण उत्तम आहे. प्र य त्न क री नच
हुश्श....
28 Nov 2013 - 2:44 pm | वेल्लाभट
खिचडी मधील हंसा जिमात जाते, जिम मधला इंस्ट्रक्टर हे करायचं ते करायचं असा सगळा व्यायाम समजावतो. हंसा म्हणते, "हाय लॉट! प्रफुल...ये सब ह्...म करेंगे तो हम इ...न को पैसे क्यूं देंगे?"
:D
प्रयत्न करी 'नच'! असं नाही ना म्हणायचंय तुम्हाला :}
28 Nov 2013 - 3:30 pm | ज्ञानव
बरोबर ओळखलत....आजूबाजूचे कमी खा आणि व्यायाम कर सांगून जाम दमवतात हो! मग भूक लागते मग.......जाऊ द्या झाले
29 Nov 2013 - 12:37 pm | स्पा
उत्तम माहितीपूर्ण धागा
डॉक्टरांचे प्रतिसाद पण माहितीपूर्ण , शिवाय ते स्वताही ते फॉलो करतात हे महत्वाचे , कारण त्यांच्या वयापेक्षा ते १० वर्षांनी लहान दिसतात :)
1 Dec 2013 - 11:24 am | सुहास्य
हो हो माझा अनुभव पण आहेच ...रोज रेगुलर व्ययम आणी थोडासा :प खाण्यावर ताबा ...हा फिट्नेस चा मुल्मन्त्र आहे ....नक्की फायदा होतो ...
7 Jun 2015 - 7:56 pm | संदीप डांगे
या धाग्याबद्दल वेल्लाभट यांचे आभार!
7 Jun 2015 - 8:20 pm | वेल्लाभट
थ्यांक्यू !
7 Jun 2015 - 9:03 pm | लालगरूड
माझे वय 19 व वजन 48आहे. वजन वाढवन्यासाठी मदत करा. gym लावावी का???
7 Jun 2015 - 9:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
थोडं देउ का माझ्याकडचं =))
३० एक किलो तर सहज देउ शकीन.
7 Jun 2015 - 9:27 pm | लालगरूड
खिक्क ... :-D काहीही हं ची
7 Jun 2015 - 9:39 pm | टवाळ कार्टा
हा ची कोण
7 Jun 2015 - 9:59 pm | लालगरूड
आपले चिमणराव ... :-D
7 Jun 2015 - 9:33 pm | संदीप डांगे
मी पण मी पण.. ३० किलो सहज..
जोक्स अपार्ट. १६व्या वर्षी माझं वजन ३९ किलो. खरंच. चाळीस ला एक कमी. दहावीच्या सुट्ट्यांत जीम लावली. खुराक सुरु केला. चार महिन्यांत वजन ५६ किलो!!!. पुढे दहा वर्ष हे वजन ६८-७० पर्यंत पोचलं. बैठ्या कामाने आणि नो-व्यायामने हे आता ९४-९६ असतं.
7 Jun 2015 - 9:39 pm | टवाळ कार्टा
१०० झाल्यव झाल्यबद्दल वेल्लाभटांचा सत्कार पावणे पंच्याहत्तर किलोचे डंबेल्स देउन करण्यात येत आहे
-शुभेच्छूक अ.भा.मि.खादाडी संघटना