गोंधळ

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
6 Apr 2015 - 9:38 am

सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ.
असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली.
प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो . (सदर अवतरण आम्ही श्री रा रा बॅट्ट्मण लिखीत बोलीभाषेची सालपटे आणि अर्थाची फोलपटे एक तैलबुद्धी अभ्यास या थोर्र ग्रथांतून घेतले आहे तेव्हा त्याचे खुलाष्यासाठी लेखकमजकूरांशी संपर्क करावा ही विनंती.जाहीर अवांतर आपली जबाबदारी टळली.स्वगत अवांतर :बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ)
तर तूर्तास मिपा वारंवार बद पडत आहे आणि जालीय ईडापीडानिवारणार्थ* गोंधळ घालण्याचा संकल्प सोडला
(* खरडफळा उर्फ वाचकांची चावडी वरील खर्डींचा संदर्भ)
ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान या तडाखेबंद कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे
रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे.

!!गोंधळ !!

मिपाचा गोधळ मांडिला गोंधळाला यावे ||
उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे

तांब्यासवे जिल्बी पाडू गोंधळाला यावे ||
काडीसारू फुकटतमाश्या गोंधळाला यावे ||१||

माईंआडच्या नाना तुम्ही गोंधळाला यावे ||
बाईंआडच्या गणा गोंधळाला यावे ||२||

आपसातल्या उरबडवे गोंधळाला यावे ||
साप आतल्या शोधबडवे गोंधळाला यावे ||३||

पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे ||
माजघरातल्या गृहीणींनो गोंधळाला यावे ||४||

कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे ||
मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५||

पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे ||
अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६||

विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे ||
उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७||

अना फेम लाडोबा गोंधळाला यावे ||
अना फेम दोडोबा गोंधळाला यावे ||८||

विदावाले फापटपसारे गोंधळाला यावे ||
क्षुधावाले वारूणीवारे गोंधळाला यावे ||९||

लेखनमात्र विचारकारी गोंधळाला यावे ||
अचूकमात्र पिचकारी गोंधळाला यावे ||१०||

विलंबीत सन्यासग्रस्ती गोंधळाला यावे ||
अचंबित अन्यायत्रस्ती गोंधळाला यावे ||११||

अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे ||
बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२||

स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे ||
अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३||

नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे ||
नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४||

======================
पुढील कवने श्री रा रा जेपीम्हाराज (सन्यास फेम) आणि श्री बॅट्टमण यांनी रचावीत अशी जाहीर विनंती)

आरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताभूछत्रीहास्यसंस्कृतीबालकथामुक्तकजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

जेपी's picture

6 Apr 2015 - 9:44 am | जेपी

जबरदस्त.. =))

श्रीरंग_जोशी's picture

6 Apr 2015 - 9:48 am | श्रीरंग_जोशी

कं रचलच, कं रचलय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2015 - 9:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ

साहित्तिक कटप्रॅक्टीस =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Apr 2015 - 9:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकी गोंधळ मस्तं :)

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2015 - 10:54 am | टवाळ कार्टा

आईच्चा घो...असे लेख येणार असतील तर मिपा वारंवार बंद पडूदे....कस्ले लिहिले आहे....
भ...ह...न...ना...ट :)

अना फेम लाडोबा गोंधळाला यावे

हे कैच्याकै आवडल्या गेल्ये आहे ;)

जेपी's picture

7 Apr 2015 - 6:37 pm | जेपी

तुला आवडणार..च..

*blum3*

त्यात काय विशेष होतं रे टक्या? जरा इस्काटून सांग की!!

पाटील हो's picture

1 Jun 2015 - 9:03 am | पाटील हो

पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे

हा हा हा .

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2015 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा

ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gif या तडाखेबंद http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे
रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे.

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif वारलो वारलो हो नाखु(न)काका! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif अजुन गोंधळ पाहिलाही-नाही पूर्ण! त्याआधीच वारलो!

मदनबाण's picture

6 Apr 2015 - 11:14 am | मदनबाण

हा.हा.हा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

आहाहाहाहाहाहा......कं लिवलंय कं लिवलंय!!!! नाखुकाकांना आजपासून मिपाशाहीर ही पदवी बहाल करण्यात येत आहे होऽऽऽ!!!!!

प्रचेतस's picture

6 Apr 2015 - 11:49 am | प्रचेतस

अगागागागागा..........
नाखुकाका रॉक्स यमकपाडू शॉक्स.... =))

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 12:55 pm | पॉइंट ब्लँक

पार धुरळा उडिवलाय. मिपा दोन दिवस बंद ठेवल्यावर प्रतिभेचा पूर आलाय नुसता.

अगदी असा वेगळा गोंधळ मांडायची गरज नव्हती. ;)

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2015 - 1:26 pm | टवाळ कार्टा

लवकर थंड पडला की गोंधळ :)
फू...फू...फू

अजया's picture

9 Apr 2015 - 1:30 pm | अजया

धमाल गोंधळ =))

अविनाश पांढरकर's picture

14 Apr 2015 - 7:45 am | अविनाश पांढरकर

कं लिवलंय कं लिवलंय!!!!

मिपा माईचा गोंधळ मस्तच ...

नाखु's picture

30 May 2015 - 9:55 am | नाखु

पुढचा गोंधळ तूच लिहायला घे.
जेप्या सध्या खफवर "राशींची काशी" हे साप्ताहीक सदर चालवतोय आणि त्यातून्+सन्यासातून फुरसत नाहीय.

जाता जाता जन हितार्थ.

काल आकुर्डी कट्ट्याला

अना फेम लाडोबा आणि अना फेम दोडोबा यांची तीव्रतेने आठवण काढली गेली याची संबधितांनी नोंद घ्यावी.

टवाळ कार्टा's picture

30 May 2015 - 10:53 am | टवाळ कार्टा

खिक्क

पैसा's picture

30 May 2015 - 10:12 am | पैसा

लै भारी!

सतिश गावडे's picture

30 May 2015 - 10:58 am | सतिश गावडे

जबराट लिहिलंय. =))

कोण कोण आले होते मग,कालच्या गोंधळाला ? +)

नूतन सावंत's picture

30 May 2015 - 2:54 pm | नूतन सावंत

जबरीच लिहिलंय.

कर्मचारी's picture

30 May 2015 - 3:19 pm | कर्मचारी

कविता हाय का केजरींचाढ झाडू.... सगळे झाडून झाडल्यात..

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2015 - 3:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी !!!

प्रसाद गोडबोले's picture

30 May 2015 - 8:52 pm | प्रसाद गोडबोले

गोंधळ आवडला

पण गोन्धळाचा भाग होवून गेला , सध्या आम्ही पाळणा च्या प्रतिक्षेत आहोत हो :D

अवांतर : गोंधळ तूर्तास बाजुला ठेवून मिपावर पाळणा लिहिण्याची स्पर्धा घेवुयात काय ;)

प्रचेतस's picture

31 May 2015 - 8:04 am | प्रचेतस

जुळ्यांसाठी का?

प्रसाद गोडबोले's picture

31 May 2015 - 9:07 am | प्रसाद गोडबोले

पण जुळ्यान्ना एकाच पाळण्यात घालून झोपवतात की वेगवेगळ्या ते माहीत नाही . असो तरीही बाळा जो जो रे च्या चालीवर एक छान पाळना 'बाळा लुलु लुलू रे' असा लिहावा असे मनात आहे
=))

नाखु's picture

1 Jun 2015 - 8:47 am | नाखु

"जोड पाळणा" असे म्हणतात म्हणजे नवरंग शिनेमात जसी दोन्ही पात्रे संध्या नामक नटवीने नटीने रंगपंचमी नाचात वठवली तसे.

जोडपाळणा हा शब्द इतिहास धुंडाळेशास्त्री पुरावेप्रचूर रा.रा. बॅट्ट्मण यांचे "जुळ्यांचे जोडाष्टक" या पुस्तकातील "जुळली तार" या प्रकरणातून घेतला आहे. शब्द वापरू दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

कारकून
खा ल माने
अभामिपामांप्कास संचालित जुळे नामकरण समिती.

बॅटमॅन's picture

1 Jun 2015 - 4:37 pm | बॅटमॅन

त्या पुस्तकाची प्रेरणा एक ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे असे सांगणारा कन्नड शिलालेख नुकताच गहाळ झाल्याचे एका मंदिरातील शिलालेखावर वल्लीने वाचले होते म्हणतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 8:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जुळ्यांसाठी का अस्साचं प्रश्ण विचारतो आणि हिमालयामधे जायची तयारी करतो. ;)

(सुन टु बी शापग्रस्त) अनिरुद्ध-

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 8:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने...मी थोडसं वेगळं वाचलं आणि हसुन फुटलो. लिहिण्याच्याऐवजी पाळणा हलवायची स्पर्धा वाचलं =))

सौन्दर्य's picture

31 May 2015 - 9:20 am | सौन्दर्य

मिपावर तसा नवीन असल्याने सगळेच संदर्भ कळले म्हणणे (अति) शहाणपणाचे ठरेल. तरी एकूण गोंधळाचा बाज आणि काव्य एकदम चपखल. अजून येऊ दे.

यशोधरा's picture

31 May 2015 - 10:07 am | यशोधरा

अर्रे! आज वाचला हा गोंधळ! जबराट!

चौकटराजा's picture

31 May 2015 - 10:34 am | चौकटराजा

अरे नादखुळ्या ,, बराच आहेस की ! पण मी वाल्या ला विसरलास काय बालका ???
तुझी माई ....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 1:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चौराकाका आणि जेपी मिळुन मिसळुन माई आयडी चालवत असावेत असा सौंशय आहे.

प्रचेतस's picture

31 May 2015 - 10:46 am | प्रचेतस

जो जो जो ग वेल्हाळ | करि निद्रा गुणी बाळा जो जो जो ग ||
कन्यारत्न ही जन्मली | बहु सुकृत ती चांगली | वयजू गे माऊली | शुद्धमती गायिली || जो जो जो ग ||
पाळणा चंदनसा कातियेला | अलवार तयार केला | कड्या घुंगुरे सजविला | गोफ चहूबाजूला ||
कुंच कुंचली चढवुनी | तीट अंगी लावूनी | वयजू येती ती घेवुनी| कन्याबाळाला ||
पाळण्याखालुनी फिरवूनी | नाव ठेविले सरस्वती | बर्फी ती वाटोनी || जो जो जो ग ||

जो जो जो रे वेल्हाळा | करि निद्रा गुणी बाळा जो जो जो रे ||
पुत्ररत्न हे जन्मले | बहु सुकृत ते चांगले | आत्माराम ते वडिली | माया केली || जो जो जो रे ||
झोळण्यात बाळाला टाकियेला | हळूच झोका दिल्हा | बाळ हसू लागला | आत्मा प्रसन्नला ||
अंगडे टोपडे घालुनी | दृष्ट ती काढूनी | आत्या घेई उचलुनी | पुत्रबाळाला ||
झोळण्याखालुनी फिरवूनी | नाव ठेविले गणपती | पेढे ते वाटोनी || जो जो जो रे ||

पैसा's picture

31 May 2015 - 11:12 am | पैसा

वल्ली पाळणा लिहिणार। अत्रुप्त तयां लोणचे मारणार।
मिपाकरें काड्या टाकणार। भांडण होणार निश्चित।।

यशोधरा's picture

1 Jun 2015 - 9:11 am | यशोधरा

बाडिस! =))

प्रसाद गोडबोले's picture

31 May 2015 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

खुप सुंदर पाळणा ! पण तरीही स्वतंत्र धागा काढावा ही णम्र विनंती क्रिप्या लक्षात घ्या ना गडे

बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक बुक्क्या कोणाच्या पाठीत मारायच्या ?

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा

@ बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक बुक्क्या कोणाच्या पाठीत मारायच्या ?>> ╰_╯ देख लूंगा! ╰_╯ तुझे भी देख लूंगा!!! ╰_╯

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 1:12 pm | अत्रुप्त आत्मा

@आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर >>> ╰_╯ ह्हुंsssss!!! ╰_╯ इसका बदला लिया जाएगा| ╰_╯ जरुर लिया जाएगा| ╰_╯ ह्हुंsssss!!! ╰_╯

प्रचेतस's picture

31 May 2015 - 1:18 pm | प्रचेतस

तुम्ही चिडताय का इतके? हा पाळणा कथानायकाच्या जुळ्यांसाठी आहे. तुमच्या नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2015 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार बोथट झालय का सद्ध्या? ;) दु दु दु दुर्ल़क्ष!!!

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2015 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा

त्याचा दुसरा भाग , दुरुन-लक्ष्य करणे हा आहे.. आता त्येची वाट बघा! ;)

यशोधरा's picture

1 Jun 2015 - 9:06 am | यशोधरा

अग्गागा!! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2015 - 1:44 am | डॉ सुहास म्हात्रे

ह्ही, ह्ही, ह्ही... ख्खी, ख्खी, ख्खी... ;)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jun 2015 - 12:49 pm | प्रसाद गोडबोले

गोंधळ परत एकदा वाचला ,

ह्यात लिव्ह इन रिलेशनवाल्यांना गोंधळाला बोलावलेले नाही हे पाहुन मनास अत्यंत खेद जाहला !

हे काय बरोबर नाय नाखुनकाका :=\

पथिक's picture

1 Jun 2015 - 1:01 pm | पथिक

लई भारी!

हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांचा सत्कार एक एक जेटपॅक आणी नेटपॅक देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक- जेपी आणी तमाम सिक्स पॅक कार्यकर्ते.

सूड's picture

2 Jun 2015 - 10:20 pm | सूड

काय नाव ठेवलं म्हणे कथानायकाच्या जुळ्यांचं?

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 11:25 am | वेल्लाभट

खत्तरनाक!!!!!!

संदीप डांगे's picture

15 Dec 2015 - 4:29 pm | संदीप डांगे

फर्मास.... =))

एक बस नाखु. बाकी सब तंबाखू....