मराठी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
8 Apr 2015 - 5:04 pm

महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले

ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं. आता गेले काही वर्ष, मराठी आणि मुंबई बाबत जे घडलंय, घडतंय, त्यावर सुचलेलं हे मुक्तक.

देशभरातून लोक मुंबईत आले
मुंबईला 'आपलंसं' करत गेले
मुंबईने त्यांना आपलं मानलं
त्यांनी मुंबईला 'आपलंच' मानलं
आपण आपलं बघितलंच नाही
त्यांना त्यांचं सांगितलंच नाही
आपले राजकीय पक्ष आले
आपल्यातच ते भांडत गेले
आपलं कुणी ऐकलंच नाही
आपल्याला कुणी विचारलंच नाही
आपण आपलं सोडत गेलो
वाकत गेलो मोडत गेलो
आपलं सुद्धा ते आमचं म्हणाले
तेंव्हाही आपण गप्पच राहिलो
उशीर फार झाला होता
तेंव्हा काळ आला होता
आपली 'मनं' जुळलीच नाहीत
आपल्याला ती कळलीच नाहीत
आता आपलंच हिसकावून नेत आहेत ते
त्यांना हवं ते घेत आहेत ते
वर आपल्याला दटावणारे
काल आपले मानले तेच आहेत ते
आता आपण आपलं बोललो
तर राग येतो त्यांना
आपल्यालाच गप्प बसवायचाही
धीर होतो त्यांना
चूक आपलीच मोठी झाली
आपण शोधत बसलो आपला वाली
आता तरी समजू का आपण
की आता एकी दाखवायची वेळ आली?

सक्ती काय कायदे काय नियम कसले करणार
जिकडे तिकडे गळचेपी आहे कसे आपण तरणार
ठरलेल्या त्या सणांना 'ट्रॅडिशनल' होणार आम्ही
आणि 'माज आहे मराठीचा' टिशर्टवर लिहून फिरणार
अवघं मैदान गेलंय आता
घर तेवढं वाचवायला हवं
इंग्रजीवर पकड हवीच
पण आधी मराठी शिकवायला हवं
मुखात असेल मराठी
तर ती मनात असण्याला अर्थ आहे
मनातच ती नसेल
तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे

- अपूर्व ओक

अभय-लेखनभावकविताकवितामुक्तकसाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

8 Apr 2015 - 5:13 pm | कविता१९७८

मस्त

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 5:19 pm | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 6:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं.

मान गये वेल्लाकाका!! जे ब्बात!!

वेल्लाभट's picture

9 Apr 2015 - 10:46 am | वेल्लाभट

कविता, मदनबाण, कॅप्टन, सूड
धन्यवाद :)

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2015 - 10:59 am | टवाळ कार्टा

लय भारी...पण ते "माज आहे मराठीचा" खटकले...माज करणारा समोरचा कोण आहे हे न बघता माज करतो...त्यात मराठी अ-मराठी असे काहीही नसते...उ.दा. रिक्षावाले, सर्कारी कर्मचारी, मामालोक, बाईकवर झेंडे लाउन फिरणारे,....लिस्ट बरीच मोठी आहे

वेल्लाभट's picture

9 Apr 2015 - 11:38 am | वेल्लाभट

मला तुझा मुद्दा नाही कळला टका.
'गर्व नाही; माज आहे मराठी असल्याचा' वगैरे उक्त्या असलेल्या टी शर्टचं उदाहरण दिलं मी. माज करण्याचं नव्हे.

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2015 - 11:52 am | टवाळ कार्टा

अर्रे हो...गल्तीसे मिश्टेक...आय माय स्वारी बर्का...सकाळी घाइघाइत वाचलेली आणि ऑफिसात आल्यावर पर्तिसाद लिहिला

वेल्लाभट's picture

9 Apr 2015 - 11:39 am | वेल्लाभट

आणि धन्यवाद :)

नाखु's picture

9 Apr 2015 - 11:57 am | नाखु

मुखात असेल मराठी
तर ती मनात असण्याला अर्थ आहे
मनातच ती नसेल
तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे

परवाचा इंग्रजी कलगी-तुरा पाहता हा बाण मर्मभेदी आहे
आशयघन मुक्तकाव्य

संदीप डांगे's picture

9 Apr 2015 - 12:30 pm | संदीप डांगे

+१

पॉइंट ब्लँक's picture

9 Apr 2015 - 2:13 pm | पॉइंट ब्लँक

+२

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2015 - 1:54 pm | अत्रुप्त आत्मा

:)