विडंबनकाव्यमाला-भाग-३

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Jul 2011 - 2:42 pm

मुळ काव्य-''मी माझा'' या चारोळी काव्य संग्रहातून,कवी-श्री.चंद्रशेखर गोखले
विडंबन-''मग तू कुणाचा?''

.............मुळ काव्य....................................................................विडंबन...................................................................................

१)पुसणारं कोणी असेल तर.................................................कात्रण चांगलं असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे..............................................करंजीला अर्थ आहे
कुणाचे डोळेच भरणार नसतील..........................................करंजीच मोडली...तर(?)
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे..................................................तर..सारण सुद्धा व्यर्थ आहे

२)तुझ्या माझ्यातलं अंतरसुद्धा.........................................इडली डोश्यातलं अंतर
तुझ्या माझ्यातला दुवा आहे............................................हा त्यांच्यातला दुवा आहे
ही माझी कल्पना नाही....................................................ही माझी कल्पना-?.....नाही हो
हा माझा दावा आहे ......................................................अहो,मध्यस्थी रवा आहे...

३)पाण्याचं वागणं .......................................................तेलाचं वागणं
कीती विसंगत?.......................................................कीती विसंगत ?
पोहोणाय्राला बुडवुन................................................चकलीला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत................................................कडबोळी ठेवतं तरंगत

४)भरुन आलेलं आभाळ...........................................टोपलीभर पापलेट
ढळत गेलेला दिवस................................................जणू दिसे खरवस
माझ्या मनात चंद्राची आशा.................................मनात बांगड्याची आशा
आणी नेमकी आली आवस....................................आणी नेमका आला रावस

५)मी आहेच जरा असा..........................................मी आहेच जरा असा
एकटा एकटा राहणारा.........................................एकटा एकटा खाणारा
वाळकं पान सुद्धा गळताना...................................जळकं भजं सुद्धा तळताना
तन्मयतेनं पाहणारा..........................................माझच म्हणुन पाहणारा

पराग दिवेकर..............

शृंगारहास्यकविताचारोळ्याविडंबन

प्रतिक्रिया

पप्पु अंकल's picture

22 Jul 2011 - 8:45 pm | पप्पु अंकल

आली.........आली.........प्रतिभा आली.............

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2011 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

झाली......झाली......(अंबे ए ए ए)प्रतिक्रीया ''पूर्ण'' ....झाली.... हं अ अ अ ....उठा आता

प्रचेतस's picture

6 May 2017 - 9:38 am | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

6 Apr 2015 - 8:05 pm | प्रचेतस

है शाब्बास....!

सूड's picture

6 Apr 2015 - 8:12 pm | सूड

टोपलीभर पापलेट
जणू दिसे खरवस
मनात बांगड्याची आशा
आणी नेमका आला रावस

काय सांगता?

बाकी पापलेटाला खरवसाची उपमा दिल्याबद्दल एखादी प्रधानीण तुमचं हे काव्य वांग्यासारखं चुलीत भाजून काढेल.

भरली केळी खायला बोलावेल इसे वाचावे.

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 12:01 am | पॉइंट ब्लँक

काव्य वाचून, तुडुंब भरलेल्या पोटाला परत भूक लागली :)

बॅटमॅन's picture

7 Apr 2015 - 12:39 am | बॅटमॅन

सूर्यकांत खोकले =)) =)) =))

प्रमोद देर्देकर's picture

8 Apr 2015 - 4:40 pm | प्रमोद देर्देकर

हंम किंवा मग
हुश झाली अता जिलबी पाडुन म्हणुन ....

तांब्याकांत मोकले(ळे)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 9:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तांब्याकांत मोकले(ळे)

ह्या ह्या ह्या....देर्देकर शेठ. व्वा. तोरा जवाब नै!!!

खटपट्या's picture

7 Apr 2015 - 2:33 am | खटपट्या

हा हा

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2015 - 2:22 pm | प्रसाद गोडबोले

सुचतं कसं राव अस्सं

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 9:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप प्रेशर असतं बाबा विडंबनाचं...अश्शी सुळ्ळकन कविता होते.

पापलेट काय खर्वस काय, औघडे ब्वॉ. त्या निमित्ताने इंग्रजीतल्या काही खंग्री उपमांचे कलेक्शन इथे डकवतो.

http://www.3quarksdaily.com/3quarksdaily/2011/12/56-worst-similes-from-h...

"He was as tall as a 6′3″ tree." ळॉळॉळॉळॉळ