विडंबनकाव्यमाला-भाग-२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Jul 2011 - 9:48 am

मुळ काव्य- ''मी माझा''-कवी-चंद्रशेखर गोखले...............................................विडंबन-''मग तू कुणाचा?''-सूर्यकांत खोकले

माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या उसवण्यावर जाऊ नका
जरी तुमच्यात बसलो तरी...........................................मी दुकानात असलो तरी(सुद्धा?)
माझ्या असण्यावर जाऊ नका......................................मला 'टेलर' म्हणुन पाहू नका....

तक्रार ही नाही की.....................................................तक्रार ही नाही,की-तो
चंद्र आत डोकावतो.....................................................चंदू आत डोकावतो
पण त्याचं बघुन चोंबडा...........................................पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या
प्राजक्तही सोकावतो...................................................शरदही सोकावतो

एकदा आकाशाचा अंकुर..........................................एकदा शेजारचा चंदू
माझ्या मनात रुजला.............................................आंम्हाला बघुन लाजला
पण परिस्थितीच अशी...........................................पण परिस्थितीच 'अशी'
की तो मनातच कुजला...........................................की तो तिथेच बुजला...

एक अशी रात्र हवी........................................एक अशी विहीर हवी
जीला पहाट जोडलेली नाही.....................................जिला रहाट जोडलेला नाही
अशक्यातली गोष्ट आहे..................................तांब्यातली गोष्ट आहे ही
पण मी आशा सोडलेली नाही...............................पण मी बादली सोडलेली नाही

पहाटेला क्षितिजावर......................................कढईच्या क्षितिजावर
चांदण्यांचा गाव.......................................वड्यांचा गाव
आणी कुशीत येताना सुद्धा....................................आणी सुरीत येताना
झोपत असल्याचा आव.................................चपापला पाव

पराग दिवेकर...........

शृंगारहास्यचारोळ्याविडंबन

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

13 Jul 2011 - 4:54 pm | कच्ची कैरी

>>माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका.....................................>><<<
माझ्या प्रतिसादावर जाउ नका ..कविता चांगली जमुन आलीये .

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2011 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

नाही जात तुमच्या प्रती---सादा---वर....धन्यवाद

मस्त मजा आली वाचुन ..
विडंबन तसा माझा नावडता काव्य प्रकार.. तरीही तुम्ही खुप मजा आणली आहे त्यामुळॅ छान वाटले

तक्रार ही नाही,की-तो
चंदू आत डोकावतो
पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या
शरदही सोकावतो

मस्त एकदम ..

मुळ काव्यातील खालील ओळी लाजवाब

पहाटेला क्षितिजावर
चांदण्यांचा गाव
आणी कुशीत येताना सुद्धा
झोपत असल्याचा आव

आत्मशून्य's picture

13 Jul 2011 - 6:52 pm | आत्मशून्य

कढईच्या क्षितिजावर
वड्यांचा गाव
आणी सुरीत येताना
चपापला पाव

वा वा ,, बहोत खूब, एकदम डोळ्यासमोर चित्र उभे केलेत.....

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2011 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा हा....हे विडंबन 'झालं' तेंव्हा आमच्या नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळच्या अण्णा कडचा वडापाव नुकताच पोटात समाधिस्त झालावता....त्यामुळे ''पोटी होतं(च),ते ओठी आलं'' असं खय्रा अर्थानी झालं असावं...प्रतिसादाबद्दल आभार.

स्वानन्द's picture

13 Jul 2011 - 10:04 pm | स्वानन्द

क्रमांक दोन आणि तीन च्या विडंबोळ्या आवडल्या.

चौथी अज्जिबात झेपली नाही. :-|

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2011 - 12:58 am | अत्रुप्त आत्मा

नवा शब्द---विडंबोळ्या---वाहव्वा लई झ्याक ...अता ह्यो कुटतरी नक्की वापरु...ह्ही ह्ही ह्ही

प्रचेतस's picture

5 May 2017 - 9:34 am | प्रचेतस

=))

सूड's picture

5 May 2017 - 2:42 pm | सूड

तक्रार ही नाही,की-तो
चंदू आत डोकावतो
पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या
शरदही सोकावतो

एकदा शेजारचा चंदू
आंम्हाला बघुन लाजला
पण परिस्थितीच 'अशी'
की तो तिथेच बुजला..

चंदूने असं काय दाखवलं की शरद सोकावला आणि असं काय झालं की ताबडतोब दुसर्‍या कडव्यात चंदू 'बुजला'?? अवघड!! =)) =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ख रा ब........फुटलो बे...!!! =))

शरदाचं "चांदणं" दाखवलं असावं चंदुने.

बॅटमॅन's picture

7 May 2017 - 12:02 am | बॅटमॅन

बुव्या बुव्या जिल्बीकार
हाती कळ(फलक) प्रतिभा अपार
तांब्या ठेवला दारापाशी
नि:शब्द जाहलो बुव्यापाशी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2017 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हाती का पोटी?

पद्मावति's picture

5 May 2017 - 9:06 pm | पद्मावति

कढईच्या क्षितिजावर
वड्यांचा गाव
आणी सुरीत येताना
चपापला पाव

=))

घ्या गुर्जी, वाईट किडे सुरू झाले ना डोक्यात हा धागा वाचून
=))

घट्ट लावून घेतलेलं दार
बाहेर "ओक्यूपाईड"च तोरण
अहो, हे कसलं बिना गाण्याचं
कार्य उरकण्याचं धोरण?

रातराणी's picture

5 May 2017 - 11:46 pm | रातराणी

=))
कहर!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2017 - 9:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

का हो हे चंदु आणि मेंगळ्या शरद कोण? =))