डिस्क्लेमर : प्रत्येकाने आपल्या प्लास्टिक सर्जरीचं आत्मचिंतन करावं
णमस्कार लोक्स .. पुन्हा आली शनिवार संध्याकाळ .. आज विषय प्लास्टिक सर्जरी. आजच्या आयुष्यात प्रत्येक अन प्रत्येक कुठे न कुठे माणूस प्लास्टिक सर्जरी करून वागत आहे. ज्याने प्लास्टिक सर्जरी आज्जीबात केली नाही अशा महापुरूषाला आमचा साष्टांग दंडवत. उमगलं का मी काय म्हणतोय ते ? प्लास्टिक सर्जरी म्हणजे आपला (खरं तर विद्रुप, जे आपल्याला झाकायचंय) खरा चेहरा झाकणे आणि त्यावर शस्त्रक्रिया करून एक खोटा( खरं तर सुंदर, जो समाजाला चांगला वाटतो) चेहरा बनवून घेणे. थोडक्यात काय ? आपल्या मनात असतं एक , पण आपण कैक कारणांमुळे मनातलं बाहेर येउ न देता एक प्लास्टिकचा नकली आणि गोड चेहरा दुसर्या समोर ठेवतो. सतत हसरा, सतत टवटवीत ,कधीही न त्रासलेला, आणि महत्वाचं म्हणजे समोरच्याला खुष ठेवणारा.. हा आता त्यामागील कारणं व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य असू शकतात. परंतू ९९.९९९९% लोकं प्लास्टिक सर्जरी करतात हे नक्की.
आज शनिवार, नाममात्र बँक उघडी असते म्हणून लोकालाजे ऑफिसला जात असतो. माझी कंपनी तशी शनि-रविवार बंद. त्यामुळे बॉसने आज आलार्मचं काम केलं नाही. ते त्याच्या साठीच उत्तम आहे(नाहीतर मला झोपेत शिव्या द्यायची सवय आहे,उगाच स्वप्न परमोच्च बिंदूवर असताना फोन वाजुन झोपमोड होणे कोणाला आवडेल ? असो ) तर आज काही बॉसने सकाळी फोन केला नाही. ऑफिसातुन थोडं मिपा-मिपा आणि थोडं युट्युब आणि उरलेल्या वेळात थोडं काम ... असा आर्धा दिवस निघुन गेला, दोन वाजता घरी आलो,येतानाच हाटिलात रूम डिलेव्हरीसाठी जेवण ऑर्डर करून आलो,सकाळी नाष्ता पण केला नव्हता.. म्हणून कावळे सुरात गात होते. मस्त मिपा खोललं...खरडाखरडी केली... जेवण आलं .. आता यथेच्छ ताव मारू म्हंटलं ..ताट तयार केलं, कोंबडीची 'फोड' नाइफने कापली आणि फोर्कमधे घरून तोंडात पहिला घास घालणार... "माझं चालनं..माझं बोलणं.. माझं वागणं .. तुम्ही म्हणाल तसं .. होहो .. तुम्ही म्हणाल तसं "... मोबाईल भणभणायला लागला .. स्क्रिन वर "फोकलीचा कॉलींग" दिसलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली .. (आम्ही बॉसचा नंबर 'फोकलीचा' असा सेव्ह केलाय के कुठे बोलू नका हो.. माझा बॉस बिहारी आहे, त्यामुळे ते नाव देण्यास अजुन एक कारण आहे) .. चमचा जोरात प्लेट वर आपटला.. चिकन पिस खाली पडला.. मला फिकीर नव्हती... थोडी केसं उपटली.. दोन सुवचने हासडली .. आणि पटकन प्लास्टिक सर्जरी घातली ....
प्लास्टिक सर्जरी : "येस सर, आय वॉज वेटींग फॉर युवर कॉल ओन्ली.. "
फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?"
(स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना)
प्लास्टिक सर्जरी : "सर ऍक्चुअली नो प्रोग्रेस टूडे, वॉज वेटींग फॉर द फिक्सेस, माय इश्श्यूज आर पेंडिंग सिंन्स लाँग, डिड यु आस्क पी.डी.जी.टीम (प्रोडक्ट डेव्हलपमेंट ग्रुप) ? "
फोकलीचा : "या आय स्पोक टू अठावले... ही सेड इट वील बी डन ऑन प्रायॉरिटी,बाय ट्युसडे ..."
(स्वः साला मलाच गोळ्या देतोय .. डुकराला तिकडून इश्शू सॉल्व नाही करता येत ? क्लायंट बोंबा मारतो तेंव्हा गप ? मी देऊ का हे उत्तर क्लायंटला ? )
प्लास्टिक सर्जरी: " सर द लिस्ट आय सेंट हॅज आयडीज् वीथ प्रायॉरिटी, प्लिज टेक अप"
( सुमारे ५१ मिनीटं बॉसने विनाकारण तासलं .. मनातुन तळतळाट परंतू प्लास्टिक सर्जरीतुन गोड गोड बोलत येस सर .. या सर बोलत वेळ कटवला .... याइथे माझं जेवण पुर्ण गार झालं , माझा कोंबडीवरचा रागही गेला, आणि मी जेवण तसंच ट्रॅश बीन मधे टाकून दिलं ... मग सुरू झालं विचार चक्र ... अरे आपण हे असं काय करतो ? तिकडे जेंव्हा इशू हॉट होतो, तेंव्हा ब्लेम गेम सुरू होतो, आणि दर वेळी खालचा दबतो म्हणून आपल्याला सगळं कळत असुनही फक्त गोडच बोलावं लागतं .. तर का ? तर त्यालाच हल्ली प्रोफेशनल म्हणतात म्हणे, राग गिळणे म्हणजे एक युजफूल स्किल आहे , आणि ते आलंच पाहिजे नाही तर तुमची प्रगती नाही... कितीही दबाव असला तरी आपला हाताळायचा , लोकांना तोंड देताना मात्र प्लास्टिक सर्जरी हवीच .. नाही तर तुमचं खरं नाही ... किंवा प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे तुम्हाला त्याचा त्रास हा भोगावाच लागणार , हल्ली फाटक्या तोंडाचा तोंडावर पडतो.
माझ्या बर्थ डे च्या दिवशी शनिवार होता, पुण्यातलं ऑफिस बंद , इथं प्रसिद्ध गोट रेस होती, माझ्या क्लायंट बँकेनेही त्यात भाग घेतला होता, मला बँड मिळाला,ज्याने त्याठिकाणी प्रवेश मिळू शकत होता, आणि अ ते ज्ञ पर्यंत सगळ्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी फुकट होत्या, त्यामुळे माझा आनंद द्विगुणीत झालेला, आदल्या दिवशी मरिनाला (बॅ़केतली कलिग, होय तीच ती ६'३" भव्यदिव्य , अतिशय चांगल्या स्वभावाची अन मोठ्या मनाची ) सकाळी दहा वाजता कार घेउन ये म्हणालो , पावने नऊ ला फोन खनानला, हा दुसरा बॉस, ह्याचा दुसरा प्रोजेक्ट , दुसरी बँक .. थोडी शंका मनाला चाटून गेली
बॉस २ : "अरे प्रशांत.. कसा आहेस ? "
(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय )
प्लास्टिक सर्जरी : " सर .. मी ठिक "
बॉस २ : "अरे एक काम होतं , जरा एच.एफ.सी.यू. मधे जायचं होतं.. आज तुझ्या बँकेत सुटीच असेल ना... जरा तिकडे जा ना ... नितीनला (रिसोर्स २, असुन नसल्यासारखा) जरा हेल्प कर, ऑरॅकल आणि ओ.एस.चे पॅचेस टाकून झालेत , जाउन फक्त डि.बी. अप कर ... "
( आयुष्यात मी फारच कमीवेळा रागाची परिसीमा गाठली आहे, या आधी हा राग समोरच्या व्यक्तीवर अक्षरश: आडवा उभा निघाला होता.. पण यावेळी मी प्लास्टिक सर्जरी केलेली ना)
प्लास्टिक सर्जरी : " सर , आज एक फंक्शन आहे , गोट रेस ला चाललोय ... "
(वाक्य तोडत)
बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... "
(माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं .. किती तरफडलो याची कल्पना नाही ..)
प्लास्टिक सर्जरी : "ओके सर, आय'ल गो ... बाय "
हे वाक्य मी प्रचंड ताकद लाउन नम्रतेनं बोललो , आत किती खदबदलो असेल त्याची कल्पनाच करा ..
बँकेत गेलो , परिस्थिती पाहिली .. ना युनिक्सचे पॅचेस लावलेले , ना ऑरॅकलचे... नितीन ने बॉसला काय अपडेट केलेलं काय माहित.. नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. ..
दहाला मरिनाने फोन केला, मी एच.एफ.सी.यू. मधे आहे हे कळल्यावर ती तिकडे आली. एक काळी चकाचक मर्सिडीज सी-क्लास,मॉडेल २००२ ... अर्रे वा .. मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो,
मरिना माझ्यापेक्षाही उंच आहे, माझ्यापेक्षाही धिप्पाड
तिनं मला गाडीत बसायला सांगितलं आणि मला तिला नाही म्हणनं किती जिवावर आलेलं हे शब्दांत सांगणे शक्य नाही. तिने भरपूर आग्रह केला , पण "मै कानुन के हाथो मजबूर था " , जाताना पुन्हा आलिंगण आणि शहारे
त्यादिवशी युनिक्स वाला माकड माणूस दुपारी एकला आला , त्याने पॅच लावण्यात घोटाळा केला आणि त्या दिवशी अक्षरशः शुन्य काम झालं .. पुन्हा बॉस २ ला प्लास्टिक सर्जरीतला मेल केला.
हे तर झालं कामातलं .. पण प्लास्टिक सर्जरी फार फार कॉमन आहे. रोजच्या जिवनात आपण मुखवटे घालूनच हिंडत असतो.. लांब का जाता ? मिसळपाव वर वावरताना पहा.. आपल्याला बरेच मुखवटे दिसतील. केवळ मर्जी हाशिल करणे, एखाद्याच्या फेवर मधे रहाणे अशा कारणांनी अनेक मुखवटे वावरत असतात. सर्जरीमागिल कारण नेहमीच ते केलं नाही तर आपल्याला आर्थिक किंवा अन्य तोटा होइल असे नाही तर बर्याचदा फार साधी कारण .. कधी कधी त्याला वाईट नको वाटायला असा पुर्वग्रह करून देखिल सर्जरी केली जाते ....
तर प्लास्टिक सर्जरी हे कलियुगातील एक अत्यावश्यक स्किल आहे , आणि आपण त्याला कळत नकळत ऍडॅप्ट झालो आहोत. आज प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत. ज्याने ओळखू न येणारी प्लास्टिक सर्जरी आहे, तो आज यशस्वी आहे लोकप्रिय आहे, ज्याने प्लास्टिक सर्जरी केलीये पण ती तृतीय श्रेणीची आहे म्हणून कोणालाही ओळखून येते तो फार गोत्यात जातो , त्याचा समोरचे गोड बोलून काटा काढतात. तिसरा प्रकार म्हणजे ज्याने कोणतीही सर्जरी केलेली नाही, असा जर बिगशॉट असेल तर खपून जाते , पण जर कॉमन मॅन असेल तर त्याला समुहीक 'फाट्यावर मारले जाते'
----------------------------------------------------------------------------------------------
डॉ.टारझन (प्लास्टिक सर्जन)
१५-११-२००८
प्रतिक्रिया
15 Nov 2008 - 8:49 pm | कपिल काळे
मस्त टारया
अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली.
<<फोकलीचा: "या प्रसांत (बरोबर लिहीलय, यावरून समजदारांना ऍक्सेंट कळेलच), व्हॉटस गोइंग ऑन, व्हाट्स प्रोग्रेस टूडे ?">>
वा वा म्हणजे तू पण आता लिखाणातून ऍक्सेंट दाखवायला लागलास तर. बघू कुणा कुणाला वाचता येतो.
http://kalekapil.blogspot.com/
15 Nov 2008 - 9:03 pm | घाटावरचे भट
जबरी लिहिलंय टारू. एकदम पटेश....
15 Nov 2008 - 10:02 pm | ऋषिकेश
असंच म्हणतो .. फूल टू पटेश
-(मुखवट्या आडचा) ऋषिकेश
15 Nov 2008 - 9:30 pm | अभिज्ञ
छान लिहिले आहेस.
विशेषत: शेवटचा परिच्छेद जास्त भावला.
अभिज्ञ.
15 Nov 2008 - 9:53 pm | प्राजु
असा वैचारिक लेख, सहजपणे उतरला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Nov 2008 - 11:04 pm | रेवती
साध्या भाषेत असल्याने वाचताना गप्पा मारतोय असे वाटले.
ही प्रतिक्रीया प्लास्टीक सर्जरी नव्हे.
रेवती
15 Nov 2008 - 11:10 pm | टारझन
हा हा हा , झबरदस्त , आपण चलाख वाचक आहात यात वादच नाही आता.
(मन के साथ बाता : क्या सही पकडेला टारू तेरे को ...)
15 Nov 2008 - 11:30 pm | बिपिन कार्यकर्ते
टार्स, एका चांगल्या वैचारिक प्रकटनाबद्दल प्रथम अभिनंदन. (तुझ्या भाषेत हाबिणंदण :) )
तू ज्याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतोस त्याला मुखवटे असंही म्हणतात. आणि, मित्रा, विश्वास ठेव, हा मुखवटा कूणालाही चुकला नाही. कोणी २४ तासापैकी २३ तास हा मुखवटा लावून वावरतो तर कोणी २३ तास बिनामुखवट्याचा असतो एवढाच फरक. थोरांपासून पोरांपर्यंत सगळेच मुखवटा वापरतात. वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात तर हा सार्वजनिक आयुष्यापेक्षा जास्त उपयुक्त ठरतो. या मुखवट्याचं सोप्पं डेफिनिशन द्यायचं तर असं देता येईल, "आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा"
आणि हा मुखवटा कधी कसा वापरायचा हे माणसाला अगदी उपजतच कळत असतं. लहानपणी कधी फिरायला गेलो की आई घरूनच बजावून न्यायची की रस्त्यात हट्ट करायचा नाही, हे माग -ते माग असं करायचं नाही. सवयीने असं लक्षात आलं की आईच्या सांगण्याप्रमाणे वागलं की नंतर बिनबोभाट फायदा होतो काहितरी, त्या मुळे बर्याच वेळा आईस्क्रीमच्या दुकानासमोरून जाताना शहाण्यासारखं वागायचो. :) कॉलेजमधे असताना, कधी मित्रांच्या घोळक्यात तोंडात शिव्या येतील पण घरी कधीच नाही, अगदी पहाटे पहाटे आई / ताई साखरझोपेतून अभ्यास करायला उठवायची तेव्हा पण नाही. पण हे सगळं आपोआप होतं आणि वैयक्तिक संबंधातल्या आपुलकी, आदर, धाक किंवा प्रेमामुळे होतं.
पण जेव्हा नोकरी करायला लागतो तेव्हा हे भान राहणं आणि तो मुखवटा नीट वापरता येणं हे कर्मकठिण. ज्याला जमलं तोच शिडी चढू शकतो. कारण जगातले यच्चयावत 'बॉस' हे मूर्ख असतात आणि आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं हे एक फार मोठं शल्य प्रत्येकाच्या मनात असतं. तर अशा परिस्थितीत स्वतःचा इगो सांभाळून त्याला मान देणं लै लै लै कठिण. तुझ्या एकंदरीत लिखाणावरून तू ते मस्तच जमवतो आहेस असं वाटतंय. तस्मात् भविष्यकाळ उज्ज्वल आहे वत्सा.
बाकी तू जे तिसर्या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे. :)
बिपिन कार्यकर्ते
15 Nov 2008 - 11:45 pm | टारझन
बेष्ट, तुम्ही माझ्या लेखाच्या ४ पावले अजुन मागे गेलात .. मी तर फक्त सामाजिक मुखवट्यांवर लक्ष केंद्रित केलेलं .. कारण इकडे पर्सनल लाईफ आहे कुठे. गेले ११ महिने झाले एकांतवास :), तुम्ही मात्र कौटूंबिक आणि वैयक्तिक मुखवट्यांवर प्रकाश टाकलात , तुमचंही हाबिणंदण.
बाकी तू जे तिसर्या प्रकारचं वर्गीकरण केलं आहेस ते अस्तित्वात असू शकत नाही असं माझं मत आहे.
होय महाराजा, तिसरा प्रकार नसतो असं माझंही मत आहे. पण काही फाटक्या तोंडाची लोकं असतात. मी म्हंटलोच होतो ९९.९९९९९% लोकं मुखवटे वापरतातच. कुठे सत्ययुगातले वंशज शिल्लक असू शकतात. म्हणून खबरदारी म्हणून तिसरा प्रकार त्याच्या परिणामांसह टाकलायच ..
- (शिकाऊ सर्जन)
टार्जन
17 Nov 2008 - 4:23 pm | लिखाळ
>>"आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, नैसर्गिक रित्या मनात येणारी प्रतिक्रिया बदलता येणं म्हणजे मुखवटा" <<
:) छान !
टारझनशेठ,
लेख छान आहे. आवडला...
मी स्वतः असे मुखवटे कधी-कुठे-का चवढतो ते मला तपासावे लागेल :)
-- लिखाळ.
16 Nov 2008 - 7:41 am | विनायक प्रभू
टारझना फिलॉसॉफर झालास की रे.
जास्त परमोच्च बिंदूची स्वप्ने बघू नकोस हो. स्वप्नदोष होतो. ह्.यु.एल. चा भाव वाढतो.
16 Nov 2008 - 10:27 am | टारझन
हिंदुस्तान लिव्हर वाचवनं आपल्याच हातात आहे मालक :)
स्वप्नदोष ? =)) =)) =)) =)) नाही नाही.
- प्रो.डॉ.टारझन चिरुटे
(मास्टर ऑफ फिलॉसॉफी, केळकर युनिव्हर्शिटी)
18 Nov 2008 - 4:40 am | भास्कर केन्डे
डॉ टारुशेट,
मस्त सर्जरी केली आहे की! आवडली बॉ आपल्याला... खरच ही सर्जरी कुणालाच चुकलेली नाहीये.
आपला,
(सर्जन) भास्कर
आम्ही येथे वसतो.
16 Nov 2008 - 2:10 pm | अनिल हटेला
+१
टारूबाळ प्रगल्भ होत चाललाये.....
(एम बी बी एस चा विद्यार्थी )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Nov 2008 - 2:14 pm | स्वाती दिनेश
टारु,लेख आवडला.
साध्या भाषेत गप्पा मारल्यासारखे लिहिले आहेस ह्या रेवतीच्या म्हणण्याशी सहमत.
स्वाती
16 Nov 2008 - 3:31 pm | विजुभाऊ
टार्या मरिना उतरली ते एक अतिशय रिच सुंगंध पसतवत, काळ्याच कलरची मिडी ड्रेस तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत होता, सनग्लासेस मधे मरिना नेली किंवा ५० सेंट किंवा शॅगीच्या व्हिडिओची 'बेब' वाटत होती. उतरून तिने मला सहजच मला एक घट्ट आलिंगण दिलं आणि मी शहारलो,
लेका वपु काळेना कॉम्पिटीशन देतोस की ;)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
16 Nov 2008 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टार्या, लेख आवडला...
प्लॅष्टीक सर्जरीचा संवादाच्या निमित्ताने माणसाच्या विविध प्रवृत्तींना सही पकडलं आहे.
रोजच्या जीवनात प्रसंगानुरुप कितीतरी मुखवटे घालावे लागतात या आपल्या चिंतनाशी सहमत आहे.
सुविचार : हाडबीडं, दातबीतं तोडणारे कधी-कधी सिरियस आणि सुंदर लिहितात यावर विश्वास ठेवला पाहिजे ;)
-दिलीप बिरुटे
(टारझन)
16 Nov 2008 - 3:45 pm | अवलिया
का र भौ टा-या
आर तुज पार भरित झाल की रे त्या नोकरीपायी...
अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा
च्यामारी असले फालतु मुखवटे नसतात तिथे...
बाकी लेख मस्त.
आवडला.
हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे ;)
नाना
17 Nov 2008 - 10:15 am | टारझन
अर लेका दे सोडुन अन ये मस्त रिंगणात अन कर झकास धंदा
इचार कराय हवा नाना !!
हे मनापासुन कारण आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे तुला ठाउकच आहे
म्हाईत हाय भौ !!!
सर्व मनापासनं परतिसाद दिल्याल्यांचे आबार !! या येळी लै म्होट्या म्होट्या प्रतिक्रिया आल्या :)
(वांग्यात) भरून पावलो
- टारझन
16 Nov 2008 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगलं लिहिलं आहेस. पण मलातरी प्लास्टिक सर्जरीचा अनुभव नाही, अजूनपर्यंत गरज पडली नाही, आणि नजीकच्या भविष्यात गरज पडेल असं वाटत नाही.
(फटकळ, फाटक्या तोंडाची, "अल्पसंख्यांक") अदिती
16 Nov 2008 - 4:22 pm | टारझन
मिपावर विषेश गरज नाही, पण सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे. तु सर्व आघाड्यांवर विना सर्जरी वावरत असशील असा विश्वास वाटतो.
लेखात म्हंटल्याप्रमाने आपल्या सारख्या महापुरुषांना(महास्त्रिया असतं का ? ) आमच्या सारख्या सर्वसामान्याचा साष्टांग दंडवत.
- कॉमन मॅन
टारझन
16 Nov 2008 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःला स्वतःवर प्लास्टीक सर्जरी करायची नसेल, विशेषतः व्यक्तिगत आयुष्यात तर एक तर दुसर्यावरही तशी वेळ आणली नाही पाहिजे, नाहीतर दुसर्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यातून संपूर्णपणे काढता आलं पाहिजे. उगाच खोटं-खोटं गोड बोलून खोटे संबंध ठेवण्यापेक्षा मी सरळ संबंध कमी करते / संपवते. आणि ज्यांच्याशी एकदा संबंध जोडलेले आहेत, जे लोकं मी आहे तशी मला मान्य करतात त्यांना ते 'आहेत तसे' मी मान्य करते; मग प्लास्टिक सर्जरीची वेळच येत नाही.
लहानपणी जेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिकले नव्हते, स्वतः विचार करायला शिकले नव्हते तेवढ्यापुरती फक्त सर्जरी केली; आता गरज वाटत नाही आणि जमेल असं तर अजिबातच वाटत नाही.
कामाच्या ठिकाणी माझ्या कामाचं स्वरुप वेगळं आहे त्यामुळे सर्जरीची गरज नाही. नशीबाने खूप लहानपणीच मला लक्षात आलं होतं की "रॅट रेस"मधे धावणं मला जमणार नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आज थोडातरी फायदा झालेला दिसतोय.
(स्पष्ट आणि सरळ) अदिती
16 Nov 2008 - 4:45 pm | टारझन
अगदी मान्य, सर्वांनी हे तंत्र अंगिकारने आज काळाची गरज आहे.
हो बरोबर, याचा अनुकरन आम्ही पण करतो , म्हणूनच ज्यांना आम्ही आहे तसे मान्य करतो त्यांची "*क ऑफ" किंवा तस्तम स्लॅग भाषा आम्ही कधी माईंडही करत नाही, ते आपलेच आहेत आणि त्यांनी तसं आपलाच आहे म्हणून असं म्हंटलं असेल असा आम्ही गोड समज करून घेतो. असा कोणी रोडवरचा बोलला तर लिटरली त्याची हाडं मोडून ठेवली असती हे सांगायला नकोच.
-(विचारी) टारलाडू
16 Nov 2008 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामाजिक आणि व्यावहारिक , कौटुंबीक जिवनात विना प्लास्टिक सर्जरी रहाणे ही फारच महान गोष्ट आहे.
सहमत आहे !!! अहो, जग इतकं धावपळीचं झाले आहे की, कितीही ठरवले तरी मला असे वाटते की, अनेक मुखवट्यांना फेस करतांना नकळत आपणही एक मुखवटा धारण केलेला असतो/ धारण करावा लागतो. नसतो तो आपला मूळ स्वभाव, आणि बर्याचदा लक्षात येत नाही हे कसं झालं म्हणून. पण फायद्या तोट्याच्या गणितात त्याही मुखवट्याचं मग कौतुक वाटायला लागते. विना सर्जरी वागणारे लोक फार अपवाद असावेत त्यांना आपण फार मोठे म्हणतो मग ते महापुरुष याच सज्ञेत मोडतात. त्यामुळे अपवाद असलेल्या माणसांच्या समोर नक्कीच नतमस्तक झालं पाहिजे.
जालावर आपण एकमेकांना ओळखतो तरी किती, (कोणालाही वयक्तिक उद्देशून नाही, तसे वाटल्यास क्षमा असावी )यातले व्यवहारात किती मुखवटे आणि किती सत्य हे ओळखणे अवघड आहे. अर्थात आम्ही काय कोणावरही अविश्वास दाखवत नाही. पण 'गमन' केल्यावर आपला खरा चेहरा कधीतरी वाचला पाहिजे असेही वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
16 Nov 2008 - 6:03 pm | टवाळचिखलू
सुधिर (आमच्यापैकीच एक प्राणी) मला नेहमी म्हणायचा तु जसा आहेस तसा वागत नाहीस.
तीच ही प्लास्टिक सर्जरी.
<<<अरे हो बाबा, अशी सर्जरी करावी लागते हल्ली.>>>>
सहमत.
सकाळ झाली चिखलू उठला अन गावाचा ठोका चुकला.
17 Nov 2008 - 11:03 am | मनस्वी
>नितीनला मस्करीच्या नादात डोक्यात एक फटका बसला, नितीनला दिवसभर काही सुधरत नव्हतं हा भाग अलहिदा. ..
हे मस्त केलंस!
17 Nov 2008 - 12:27 pm | आनंदयात्री
लिहले छान आहेस !!
-
आपलाच
(हजारो मुखवटे वापरणारा)
आंद्या बेलवलकर
17 Nov 2008 - 12:32 pm | मैत्र
टारू भाऊ ... शतश: आभार या लेखा बद्दल...
मी बर्याच प्रमाणात तिसर्या प्रकारात मोडतो. आणि सध्या एका अतिशय त्रासदायक प्रकारातून जात आहे.
गोट रेस ला न गेल्याने तुला राग येईल दु़:ख होइल पण तुझ्या आयुष्यात मोठा फरक पडणार नाही...
'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्या एका कंपनीत गेले २.५ वर्ष मी 'व्हॅल्युज' ची खुलेआम पायमल्ली बघतो ऐकतो आणि भांडत भांडत सहन करतो आहे.
मला आत्तापर्यंत दोन तीन वेळा असा फीड बॅक मिळाला आहे की काही चुकीचं असेल ज्यामुळे तुला त्रास झाला - जसं खुप जास्त काम, रिवर्क, तुझ्या हातात नसलेलं काम किंवा आधी माहीत नसलेलं अचानक दिलेलं काम न होणे.. त्या कामाचं प्लॅनिंग आणि माणूस न शोधल्यामुळे ते तुला द्यावं लागलं त्याबद्द्ल जबाब दार असलेल्या मनुष्याला काहीच फरक न पडणे..
अवास्तव प्लॅन करून तो मान्य करण्यासाठी डोक्यावर बसणार्या मॅनेजर बरोबर वाद घालणे आणि तो प्लॅन कसा चुकीचा आहे हे सांगणे. पटत नसलेली गोष्ट शांतपणे सांगणे व कुठे आणि काय पटत नाही ते सांगणे...
असं काहीही केलं तर तुमची मुद्दाम मारली जाइल.
वानगी दाखल:
१. ऑफर दिल्यावर जॉइन करायला घाई करणे आणि जॉइन केल्यावर काम नाही. दोन तीन महिने बेंच आहे. बदली घ्या सांगणे.
ऑफर देताना लोकेशन प्रमाणे निगोशिएट करणे आणि बदली घ्यायला सांगणे ही फसवणूक एक प्रकारचं फ्रॉड आहे.
२. काही ठराविक प्रॉडक्ट साठी नोकरी देणे, कामाबद्दल सांगणे आणि नंतर त्यात काम नाही कुठल्यातरी बंद होत आलेल्या प्रॉडक्ट वर सपोर्ट कामासाठी दबाव आणणे. - अजून एक फसवणूक.
३. काहीच प्रोजेक्ट नाहीत म्हणुन दुसरं काही शिकून ते कंपनीत मुळापासून बसवण्याच्या कामाला लावणे ज्यातून काहीही निष्पन्न होत नाही.
४. प्रोजेक्ट हवा असेल तर बदली घ्या.
५. प्रोजेक्ट मध्ये काहीच्या काही काम देणे.
६. एका कामावर जास्त दिवस न राहील्याने प्रॉडक्ट ची ही पुरेशी माहिती होत नाही.
७. दोन महिन्यात चार महिन्याचं काम करायला सांगणे - कारण आधी प्लॅन केलं नव्हतं. आता कस्टमर ला सांगता येत नाही की आधी झोपलो होतो. आता तुम्ही मरा आणि काम करा. येत नाही किंवा संबंध नाही याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला फक्त माणसाला माणूस - नगाला नग लावायचा आहे. पुढे तुझं काम आणि त्यात काही प्रॉब्लेम आला तर तुमची जबाबदारी. पुढच्या वेळी रिव्हिव्यु वर परिणाम होइल.
८. सहा महिने आहेत म्हणुन बायकोने ऑनसाईटला जॉब जॉइन केल्यावर १-२ महिन्यात परत जा सांगणे.
सध्याचा कहरः
तिथे दुसरा कुठलाही प्रोजेक्ट नाही परत जाण्यावाचून पर्याय नाही कळल्यावर सगळं आवरून परत आल्यावर दोन आठवडे दुसर्या प्रोजेक्ट साठी परत ऑनसाईट जा. बायकोच्या करिअर चं या बकवास प्लॅनिंग मुळे खोबरं झालं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही.
दिड वर्षात तीन वेळा लोकेशन आणि कामात बदल करून फॅमिलि लाइफ ची वाट लावली आहे. तरी ८-९ महिने परत जा कारण आम्ही येताना आधी सांगितलं नाही - कारण तेव्हा विचार केला नव्हता की दिड वर्ष अनुभव असलेला माणुस हे करू शकणार नाही आणि त्याला घेतलं.
मित्रहो... असे असंख्य अनुभव आहेत. सध्या या नवीन भांडणाने वाट लागली आहे. काही सल्ला मिळाला तर फार आवश्यक आहे...
17 Nov 2008 - 2:11 pm | तात्या विंचू
'व्हॅल्युज' चा डंका वाजवणार्या एका कंपनीत.........
म्हणजे इन्फी काय????
17 Nov 2008 - 3:13 pm | कुंदन
टेक एम ( यम ) असल ....
मला अगदी अस्साच किंवा याहुन बी भीषण अनुभव आलाय तिथे .....
17 Nov 2008 - 5:06 pm | महेश हतोळकर
शेवटी सगळ्या नोकर्या आणि सगळ्या बायका सारख्याच. काय समजलास बेंबट्या!
बाकी प्लास्टीक सर्जरी मस्त जमलीय.
18 Nov 2008 - 1:29 am | चतुरंग
सोडून बाकी सगळे करत असतात हेच खरे आहे! टारुबाळ तुझे अवलोकन फारच मार्मिक आहे आणि तुझ्या लिहिण्यातला सच्चेपणा भावला! एकदम चोक्कस! एका खुसखुशीत आणि कळीच्या विषयाला हात घालणार्या लेखाबद्दल अभिनंदन.
काही वेळा सर्जरी आवश्यक असतेही पण ती कुठे गरजेची आहे आणि कुठे नाही ह्यातले तारतम्य आपण हरवून बसण्याची फार मोठी शक्यता असते! आपण ह्या गोष्टीकडे जागरुकतेने लक्ष देत नाही आणि मग हळूहळू तेच आपल्याला सोईचे वाटायला लागते. निदान आपल्या जवळच्या नात्यात उदा. नवरा-बायको, आई-बाप-मुले, अगदी घट्ट मित्र अशा जागी तरी मुखवटे नकोत/नसावेत कटु असलं तरी सत्य जे असेल ते सांगण्याची हिम्मत आणि तात्कालिक वाईटपणा घेऊन अंतिम चांगल्याकडे वाटचाल करण्याजोगे मानसिक धैर्य फार थोडे लोक दाखवू शकतात आणि जे दाखवतात ते नक्कीच मोठे होतात!!
(चि.वि.जोश्यांची 'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' ही गोष्ट आठवली! :)
(अवांतर - प्रतिसाद कालच लिहायला घेतला होता, चिरंजीव मधेच येऊन खेळायचे म्हणाले मग 'मी कामात आहे, जा पाहू इथून' असा मुखवटा न चढवता त्याच्याशी खेळलो आणि आज प्रतिसाद पूर्ण केला. बघ बरं मी किती प्रामाणिक आहे! ;)
(खुद के साथ बातां : चला रंगा, गेलास एकदाचा टारुच्या गुडबुक्समधे आता कधीमधी त्याला टांग मारलीस तरी तुझा संशय येणार नाही! ;) )
चतुरंग
18 Nov 2008 - 8:36 am | शितल
टार्या,
सर्जरी मस्त जमली आहे रे. :)
19 Nov 2008 - 4:17 pm | मृगनयनी
(कामाचं बोल केळ्या .. मला उशीर होतोय )
=)) =)) =)
(स्व: चोच्या, आख्खा डिएसआर[डेली स्टेटस रिपोर्ट] पाठवला ना, उघडून बघायचे कष्ट घेना)
जबरी रिऍक्शन! रे टोच्या.......
मस्त आहे रे तुझी प्लॅस्टिक 'टर्जरी'!!
एकूण काय, आफ्रिकेतली झंडूची फुलं मात्र तुझ्या वर जाम 'मरि(ना)त' असतात !
मिपावरच्या मुखवट्यांवर भाष्य ऐकून अंमळ बरे वाटले.....
लास्ट पॅरिग्राफ मस्तच आहे...... धकाधकीच्या, मुखवट्यांच्या दुनियेची कैफियत हृदय हेलावून जाते...
:)
हे पण ""कीप इट अप!""
9 Dec 2008 - 2:11 am | भडकमकर मास्तर
आम्ही लै लेट वाचलं आणि लेट पर्तिक्रिया लिवतोय...
एकदम मस्त झालाय हा लेख...
बॉस २: "अरे ३-४ तासांच काम आहे, त्या नंतर जाना... "
(माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं ..
हे एकदम भारी... =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
4 Mar 2010 - 9:11 am | अप्पा जोगळेकर
लवलाट लिहीलयंस टार्या. एक्दम परफेक्ट. पण मला वाटत की ही मनुष्य प्रवृत्ती आहे. पूर्वीसुद्धा असंच होत असणार.
4 Mar 2010 - 9:50 am | राजेश घासकडवी
छान लेख. असले लेख वाचले की मग डोक्यात विचार वगैरे येतात, ज्याची आम्हाला फारशी सवय नाही.
प्रश्न असा येतो, की इतक्या वेळा इतकी वेगवेगळी प्लास्टीक सर्जरी करून आपण इतका वेळ जगतो... मग 'खरा चेहेरा' नक्की कधी, कुठे व कोणासमोर असतो? कारण स्वत:ला आपण आत्मप्रतिमेच्या आरशात बघतो तेव्हासुद्धा एक सर्जरी केलेला चेहेरा दाखवतोच की नाही?
4 Mar 2010 - 10:42 am | साईली
अहो टारझन सर्जन ...
फारच सुरेख . मस्त आवड्ल.
'आयपीएलच्या अंतिम लढतीत सामनावीर किताब
टारझन सर्जन याना द्यावा लागेल.
4 Mar 2010 - 12:26 pm | सुधीर काळे
लेख झकास आहे. फक्त एक दुरुस्ती!
ज्या काव्यात/गोष्टीत जास्तीत जास्त "मुखवटे" आहेत (महाभारत) ते सारं द्वापारयुगात घडलं. थोडक्यात काय तर ही प्लॅस्टिक सर्जरीची बीमारी कलियुगापेक्षा जुनी आहे!
पण लेख छान उतरला आहे. वाचायला मजा आली!
------------------------
सुधीर काळे (चाँदको हमने कभी गौरसे देखाही नहीं, उससे कहिये कि कभी दिनके उजालोंमें मिले|)
4 Mar 2010 - 12:32 pm | शुचि
२ बॉसेसची उदाहरणं मस्त रंगवली आहेत केळ्याची आणि फोकलीच्याची =))
लेख खूप आवडला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
4 Mar 2010 - 1:24 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही लिहीले आहेस्.खरंच आहे मुखवट्याशिवाय जगता येत नाही न आवडणारे नातेवाईक,कर्तव्य म्हणुन हजेरी लावावी लागणारे समारंभ,त्यात तेच नाटकी हास्य नको त्या विषयावरच्या चर्चा,सगळ कितीही नकोसं वाटलं तरी समोरच्याच्या मुड जाउ नये करावेच लागते हे सगळ.
4 Mar 2010 - 8:12 pm | संदीप चित्रे
जरा वेगळा विषय आहे !
>> माझा माझ्या प्रॉडक्ट वर पुर्ण विश्वास आहे, ३-४ तासांत कुठे तरी गाडं आडणारच माहित होतं
काय बरोब्बर लिहिलंयस मित्रा. कोडिंग करणार्या प्रत्येकाच्या मनातलं वाक्यं असावं हे :)
बाकी मुखवटे वापरणं आपण इतक्या लहानपणापासूनच शिकतो की सम हाऊ इट बिकम्स सेकंड नेचर ! अगदी 'मी कुणाची भीड भाड ठेवत नाही' म्हणणाराही कुठे ना कुठे, कुठला ना कुठला मुखवटा वापरतोच.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
4 Mar 2010 - 11:14 pm | अक्षय पुर्णपात्रे
मजेदार आणि विचार करायला लावणारा लेख.
5 Mar 2010 - 6:29 am | हर्षद आनंदी
मुखवटा घातला तरच प्रगती नाहीतर तुम कीस झाड की पत्ती??
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
7 Mar 2010 - 5:29 am | Pain
मस्त आहे !
7 Mar 2010 - 12:16 pm | मी-सौरभ
नोकरी कर्णार्या सगळ्यांना हे करावचं लागत......
-----
सौरभ :)