राम राम मंडळी,
आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे..
आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..!
पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :)
तात्या.
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 12:30 pm | कलंत्री
पत्ता दिला असता तर आज हजेरी लावता आली असती.
9 Nov 2008 - 12:50 pm | सरपंच
कर्वेनगरात कुठेसं आहे..
तात्या.
10 Nov 2008 - 11:30 am | रम्या
पत्ता कसला? हॉटेलचा की चित्रातल्या पोरीचा? :D
रम्या
9 Nov 2008 - 12:46 pm | अरुण मनोहर
पेठकरशेठ, आमच्याही मनापासून शुभेच्छा. यज्ञकर्मात मिपावासीयांसाठी खालील यादीप्रमाणे सर्व मिळावे अशी कामना आहे.
खराखुरा मिसळपाव
तर्रीदार कोंबडी
मच्छीफ्राय
बेसनलाडू
सर्वात महत्वाचे--- १५% सूट
9 Nov 2008 - 12:57 pm | मदनबाण
काकाश्री तुम्हाला भरपुर शुभेच्छा.... :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
9 Nov 2008 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते
काका, शुभेच्छा. जरा त्या हाटिलाचा पत्ता द्या बरं. पुणे भेटीत नक्की येणार.
बिपिन कार्यकर्ते
9 Nov 2008 - 1:16 pm | प्रमोद देव
प्रभाकरपंतांचे हे 'यज्ञकर्म' अखंडित चालतच राहो! तथास्तु!
9 Nov 2008 - 3:57 pm | दत्ता काळे
काका 'यज्ञकर्मास' हार्दिक शुभेच्छा
9 Nov 2008 - 4:14 pm | अनंत छंदी
च्यामारी, परवा पुण्यात आलो की बघतोच!, पण पुणेरी मिसळीत काही दम नसतो राव, मिसळ म्हणजे कोल्हापुरीच.... पहिल्या घासाला ठसका लागून डोळ्यात पाणी आल्याशिवाय काही खरं नाही, तेव्हा पेठकरशेठ तेवढं कोल्हापुरी मिसळीचं बघा. तुमच्या नवीन व्यवसायाला आमच्या तृप्ततेचा ढेकर देत शुभेच्छा!!
9 Nov 2008 - 4:34 pm | सर्वसाक्षी
पेठकरसाहेब,
अचानक उद्भवलेल्या कामामुळे येता आले नाही, क्षमस्व! हरकत नाही २२-२३ ला प्रयत्न करतो - जमल्यास तात्यालाही घेउन येतो!
आपल्या नव्या उपाहारगृहाला शुभेच्छा व आपले हार्दिक अभिनंदन
9 Nov 2008 - 8:31 pm | ऋषिकेश
वा! चविष्ट बातमी
"यज्ञकर्म" नाव खूपच आवडले.. एकदम सुचक आणि चपखल नाव.... पुण्यात आल्यावर भेट नक्की .
कोणी पत्ता सांगेल काय?
-(यज्ञकर्मी) ऋषिकेश
9 Nov 2008 - 9:05 pm | गणा मास्तर
पेठकर काकांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
कोण म्हणतो रे मराठी माणसाला धंदा करता येत नाही म्हणुन.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
9 Nov 2008 - 9:18 pm | रेवती
आपल्या उपहारगृहास पोटभर शुभेच्छा!
रेवती
9 Nov 2008 - 9:29 pm | प्रभाकर पेठकर
विसोबा खेचर, कलंत्री, सरपंच, अरुण मनोहर, मदनबाण, बिपिन कार्यकर्ते, प्रमोद देव, बाळ्कराम, अनंत छंदी ,सर्वसाक्षी, ऋषिकेश, गणा मास्तर आणि रेवती तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
'यज्ञकर्म उपहारगृहा'चा पत्ता:
सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८.
१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला
'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)
३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
माझ्या उपहारगृहाला आपल्या संस्थळावर (मिपावर) आवर्जून प्रसिद्धी दिल्याबद्दल श्री. विसोबा खेचर उर्फ तात्याराव अभ्यंकर ह्यांचे विशेष आभार.
अवांतरः तात्याराव, तुमच्या 'लहानशा शुभेच्छा पत्राने' 'मोठा आशय' (आणि ऐवज) माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. धन्यवाद.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 6:06 am | गणा मास्तर
पत्ता सांगावा तर असा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
10 Nov 2008 - 9:12 am | पिवळा डांबिस
पत्ता सांगावा तर असा
हां, पन जरा सविस्तर (मराठीत डिटेलवारी!!) सांगला अस्ता तर बरं झालं आस्तं नाय?:))
प्रभाकरजी, तुमच्या या "यज्ञकर्मा"ला आमच्या मन:पूर्वक अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!!!!
पुण्यात आलो की जठराग्नीला आहुती द्यायला आता तिथेच....
आपला,
शैलेश
10 Nov 2008 - 12:21 pm | मनिष
काकांना शुभेच्छा...लवकरच चक्कर मारतो!
10 Nov 2008 - 3:19 pm | श्रावण मोडक
नव्या उद्योगाला शुभेच्छा. जरूर भेट देऊ.
सहजरावांना पडलेल्या आणि विसोबा खेचरांनी अनुमोदन दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकर द्या. म्हणजे पुढचे ठरवता येईल.
(बाकी तुम्ही अट्टल मराठीच. आपल्या हॉटेलाचा पत्ता देता-देता आणखी तीन चार हाटेलांचे पत्ते देऊन मोकळे. आता त्या मुद्यातील अंतर इतके वाटते की, मध्येच कोणी तुम्ही लिहून ठेवलेल्या दुसऱ्याच हॉटेलात शिरले तर पंचाईत).
10 Nov 2008 - 8:12 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या हॉटेलाचा पत्ता देता-देता आणखी तीन चार हाटेलांचे पत्ते देऊन मोकळे. आता त्या मुद्यातील अंतर इतके वाटते की, मध्येच कोणी तुम्ही लिहून ठेवलेल्या दुसऱ्याच हॉटेलात शिरले तर पंचाईत.
पंचाइत नाही. जरूर भेट द्या आणि मला सांगा त्या सर्व उपहारगॄहांचया तुलनेत मी कुठे सरस आहे किंवा कुठे कमी पडतो आहे.
तुमची निरिक्षणं मला मोलाची आहेत.
धन्यवाद.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
11 Nov 2008 - 3:46 pm | श्रावण मोडक
हुई ना बात!!! तुम्ही अट्टल मराठी (व्यावसायिकता या अर्थाने) नाही. आमचे शब्द मागे.
बाकी, आम्ही इकडे-तिकडे जाणार नाही. 'यज्ञकर्म' ठरवले तेथेच करतो आम्ही. रस्ता कितीही लांबचा असला/वाटला तरी. कारण अशा खास हेतूंसाठी लांबवर जाण्याची सवय (आमचे काही मित्र खोड म्हणतात याला) जुनीच. इथे तर तुमच्या पाकृ वाचून मनोमन चवीच्या कल्पनेनंच आम्ही खल्लास झालो आहोत. त्यामुळं लक्ष्य 'यज्ञकर्म' ठरले तर तेच.
9 Nov 2008 - 9:30 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
9 Nov 2008 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता नक्की येऊन जातो आम्ही दोघं!
आणि नवीन उपहारगृह सुरू करण्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
9 Nov 2008 - 10:32 pm | चतुरंग
उदरभरण नोहे जाणिजे 'यज्ञकर्म'!
व्यवसायवाढीच्या ह्या नवीन उपक्रमास शुभेच्छा! तुमच्या-आमच्या सर्वांच्या यज्ञकर्माची भरभराट होवो!!
(खुद के साथ बातां : रंगा, पुढच्या भारतभेटीत भेट द्यायच्या ठिकाणाची लिस्ट वाढली की रे! )
चतुरंग
10 Nov 2008 - 3:53 am | घाटावरचे भट
अभिनंदन पेठकर काका. आपल्या या हाटेलासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा!!!!
-भटोबा
10 Nov 2008 - 4:29 am | सूर्य
पेठकरकाका अभिनंदन. मी भेट देणारच. :)
- सूर्य.
10 Nov 2008 - 5:46 am | भाग्यश्री
अभिनंदन पेठकर काका..
पुण्यातल्या घराच्या जवळच आहे.. नक्कीच येईन गेल्यावर..
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Nov 2008 - 6:02 am | शितल
काका,
तुमचे अभिनंदन, उपहारगृहाचे नाव ही खास ठेवले आहे. :)
10 Nov 2008 - 6:44 am | देवदत्त
अरे वा, चांगले आहे.
काका,
माझ्याकडूनही अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
जमेल तेव्हा भेट देईनच.
10 Nov 2008 - 7:20 am | सहज
पत्ता कळला आहे. पुढल्या पुणे भेटीत नक्की.
व्हेज, नॉनव्हेज, बार? सगळे?
पुन्हा एकदा अभिनंदन.
10 Nov 2008 - 7:31 am | विसोबा खेचर
व्हेज, नॉनव्हेज, बार? सगळे?
हेच विचारतो..!
तात्या.
10 Nov 2008 - 9:06 am | शेखर
अभिनंदन काका.
तृप्तीचा ढेकर 'यज्ञकर्मात' येणे हे पुण्यकर्मच आहे.
भेट द्यायला येणारच.
शेखर.
10 Nov 2008 - 9:11 am | llपुण्याचे पेशवेll
खरेतर मी कधी पासून तुमचे हाटील सुरू होण्याची वाट बघत होतो. साधारण तिथेच 'कोंबडी वडे' या नावाने देखील एक हाटील चालू आहे. मला वाटले की कोंबडीवडेच तुमचे आहे. :)
असो आता तुमच्या हाटीलाला भेट द्यायला हवी. :)
पुण्याचे पेशवे
10 Nov 2008 - 11:18 am | नंदन
मनःपूर्वक अभिनंदन काका. नावही सुरेख आहे. पुढच्या पुणेवारीत नक्की यायचा प्रयत्न करेन.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Nov 2008 - 9:25 pm | आजानुकर्ण
अभिनंदन,
पुण्यात आल्यावर तुमच्या हॉटेलात नक्की येणार. आमची पार्टी तिथेच करू
आपला
(शुभचिंतक) आजानुकर्ण
10 Nov 2008 - 9:41 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. अजानुकर्ण. जरूर या. तुमची भेट सत्कारणीच लागेल.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 1:56 pm | मनस्वी
यज्ञकर्मासाठी शुभेच्छा पेठकर काका. नाव खूपच छान ठेवलंय.
नक्की भेट देणार.
10 Nov 2008 - 2:55 pm | उदय सप्रे
पेठकर साहेब,
आजकाल मराठी माणसबद्धल काही चांगली बातमी ऐकूच येत नव्हती , त्यामुळे आपल्या "यज्ञकर्म" ची बातमी ऐकून खूप बरे वाटलें.नावही खूप छान आहे.
मनापासून शुभेच्छा !
उदय सप्रेम
11 Nov 2008 - 4:33 pm | निखिलराव
काका, शुभेच्छा ..
शनिवारी येतो...
निखिल सुर्यवशी
10 Nov 2008 - 3:00 pm | छोटा डॉन
पेठकरकाकांचे त्यांच्या नव्या "यज्ञकर्म" उपहारगृहाच्या उद्धाटनाबद्दल अभिनम्दन व आमच्यातर्फे भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
बाकी हॉटेलचे स्वरुप नक्की कसे आहे ?
म्हणजे शुद्ध शाकाहारी की सगळेच, स्पेशॅलिटी काय आहे ते लिहले तर बरे होईल ...
येत्या "पुणे दौर्यात" तुमच्या हॉटेलात चक्कर नक्की ...
यायच्या आधी तसे कळवु नक्की, मला "काका-काकुंना पार्टी" द्यायची आहे, त्यांनाही घेऊन येईन नक्की ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 Nov 2008 - 3:04 pm | लिखाळ
अभिनंदन काका !
यज्ञकर्माची उत्तरोत्तर भरभराट होवो आणि पुणेकरांची पोटे स्वादिष्ट खाण्याने भरोत :)
पुणेवारी मध्ये यज्ञकर्माला नक्कीच भेट देणार.
आता मिपाकरांना छान हक्काचा आणि रुचकर कट्टा तयार झाला तर :)
-- लिखाळ.
10 Nov 2008 - 3:08 pm | मैत्र
पेठकर काका,
अभिनंदन... आणि जबरदस्त यश मिळावं या शुभेच्छा !
काय डिटेल पत्ता दिला आहे ! बेष्ट... नक्की भेट देउ...
मेनू सांगा म्हणजे तेवढ्या भेटी प्लॅन करता येतील :)
10 Nov 2008 - 3:44 pm | विसुनाना
यज्ञकर्मात 'इदं न मम' म्हणून ढेकर द्यायला येतोच आहे.
यज्ञात 'होता' म्हणून पेठकरसाहेब उपस्थित असतात काय?
यज्ञकर्मातील हवि आणि अर्घ्ये कळाली तर बरे होईल!
एकदा 'सोलकढी'त जाऊन आलोय. त्यामुळे रस्ता डोळ्यासमोर आहे.
10 Nov 2008 - 5:01 pm | सुनील
आपल्या यज्ञकर्मच्या अनेक शाखा निघोत (त्यातील एक ठाण्यात येओ) यासाठी शुभेच्छा!
ठाण्यात शाखा निघण्यापूर्वी पुण्याला जाण्याचा योग आलाच तर यज्ञकर्मी भेट निश्चित!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Nov 2008 - 8:09 pm | प्रभाकर पेठकर
पिवळा डांबिस, मनिष, श्रावण मोडक, संजय अभ्यंकर, १३_१३ व्यस्त अदिती, चतुरंग, घाटावरचे भट, सूर्य, भाग्यश्री, शितल, देवदत्त, शेखर, पुण्याचे पेशवे, नंदन, मनस्वी, उदय सप्रे, छोटा डॉन, लिखाळ, मैत्र, विसुनाना आणि सुनिल मनःपूर्वक धन्यवाद.
सहजराव, तात्यासाहेब आणि बाकी सर्व मिपाकरी,
उपहारगॄह सामिष आणि निरामिष (व्हेज./नॉन व्हेज.) असे मिश्राहारी आहे.
'बार' नाही. (इस 'बार" नही|)
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 8:14 pm | मुक्तसुनीत
पेठकरकाका, तुमच्या हाटेलास आमच्याही अनेक शुभेच्छा ! मी आता पुण्यात आलो की तिथे आल्याशिवाय जायचा नाही ! :-)
10 Nov 2008 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मुक्तसुनित,
तुम्हा सर्वांच्या पाठींब्यावरच माझ्या यशाची इमारत उभी राहणार आहे.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 8:56 pm | वाटाड्या...
काका..
तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला मनापासुन शुभेच्छा..,..पुण्यात आलो की नक्की येणार व आपल्या व्यवसायाला हातभार लावणार...
धन्यवाद..
मुकुल...
10 Nov 2008 - 9:02 pm | मुक्तसुनीत
पेठकर काकाना विनंती. जरा हाटेलाचे फोटु इथे डकवा की राव ! :-)
10 Nov 2008 - 10:31 pm | बिपिन कार्यकर्ते
सुनीतरावांना जोरदार समर्थन... काका, फोटू डकवा.
बिपिन कार्यकर्ते
10 Nov 2008 - 9:05 pm | मिसळ
पेठकरकाका, हार्दिक शुभेच्छा...भारत भेटित नक्किच भेट देऊ. कृपया उपहारगृह चालू असण्याचे दिवस / तास लिहाल का.
- मिसळ
10 Nov 2008 - 9:09 pm | अभिरत भिरभि-या
माझ्या घराजवळच आहे.
फुडच्या पुणे भेटीत नक्की येणार.
(कुठल्या मिपाकराला प्रत्यक्ष पाहायची ही आमची पयली वेळ)
अभिरत
10 Nov 2008 - 9:39 pm | प्राजु
अहो पत्ता द्या ना. येऊच आम्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Nov 2008 - 9:52 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मुकुल, मिसळ, अभिरत भिरभिर्या आणि प्राजु मनःपूर्वक धन्यवाद.
श्री. मुक्तसुनित, लवकरच तात्यांच्या परवानगीने टाकीन मिपावर उपहारगॄहाची काही छायाचित्रं.
श्री. मिसळ, आठवड्याचे सर्व दिवस. तास सकाळी ६.३० ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ११.
श्री. अभिरत भिरभिर्या,
कुठल्या मिपाकराला प्रत्यक्ष पाहायची ही आमची पयली वेळ
अरेरे! मग दुसरा कोणी चांगला निवडा. उगीच, मिपावरून तुमचे मनच उडून जायचे.
प्राजु,
http://www.misalpav.com/node/4521#comment-65209
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 9:54 pm | मानस
पुढच्या भारत्-भेटीत, पुण्याला आलो की नक्की येणार. मनापासुन शुभेच्छा ....
10 Nov 2008 - 9:57 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. मानस,
तुमचा 'मानस' अतिशय योग्य आहे. वाट पाहीन.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
10 Nov 2008 - 10:14 pm | नाटक्या
पेठकर साहेब,
तुमच्या हॉटेलास आमच्याही अनेक शुभेच्छा ! मी आता पुण्यात आलो नक्की भेट देईन, अगदी सहकुटुंब!!! नावही अतिशय सुरेख आणि समर्पक ठेवले आहे...
- नाटक्या...
11 Nov 2008 - 6:46 am | बन्ड्या
प्रभाकरजी, तुमच्या या "यज्ञकर्मा"ला आमच्या मन:पूर्वक अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!!!!
....बन्ड्या
11 Nov 2008 - 4:27 pm | ब्रिटिश
लाल शर्ट पंचेचालीस
पांडरी टोपी बत्तीस घ्या बत्ती~~~स
हाफ प्यांट बारा रुपये झाले बा~~~रा
यज्ञकर्माला हार्दीक सुभेच्छा
हाटेलचा बाल्या
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
11 Nov 2008 - 4:55 pm | भोचक
पुणेरी पाहुणचारासाठी नक्की येऊ. पेठकरकाका शुभेच्छा.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
11 Nov 2008 - 5:18 pm | प्रभाकर पेठकर
सर्वश्री नाटक्या, बंड्या, ब्रिटिश आणि भोचक मनःपूर्वक धन्यवाद.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
16 Nov 2008 - 12:26 pm | एकलव्य
ही बातमी कशी नजरेतून सुटली?
पेठकर काका - अभिनंदन! आमचा योग केव्हा येईल ते येवो पण "यज्ञकर्म"कडे टोळधाड लवकरच पाठवून देतो...
(सहकुटुंब - सहपरिवार) एकलव्य
16 Nov 2008 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेठकर साहेब,
यज्ञकर्माला आमच्या सही दिलसे हार्दिक शुभेच्छा !!!
पुण्यात आलो तर आपली भेट नक्की :)
-दिलीप बिरुटे
16 Nov 2008 - 1:39 pm | भास्कर केन्डे
आदरणीय श्री. प्रभाकरपंत,
तुमच्या हॉटेलात चवीने हादडायला सहकुटुंब नक्की येणार. आमचे कुटुंब स्वयंपाक्याबद्दल रामशास्त्री बाण्याचे आहे बरे... कोणता मसाला कमी-जास्त झाला आहे एका फटक्यात सांगणार. पण आपल्याला बॉ पानात पडलेलं ते साफ करायचं येवढच माहित. ;)
आपला,
(खादाड) भास्कर
आम्ही येथे वसतो.
16 Nov 2008 - 3:12 pm | प्रभाकर पेठकर
एकलव्य, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे अणि भास्कर केन्डे,
आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. उपहारगॄहाला जरूर, जरूर भेट द्यावी. चमचमीत खाद्यपदार्थांचा शोध 'यज्ञकर्म' पाशी संपतो.
अवांतरः काही अपरिहार्य कारणांमुळे उपहारगृहाचे अधिकृत उद्घाटन सोमवार संध्याकाळ पर्यंत लांबले आहे. क्षमा असावी.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
16 Nov 2008 - 3:44 pm | वृषाली
उपहार गृहासाठी हार्दिक शुभेच्छा.
पुण्याला अजुन आले नाही कधी पण कधी जमले तर नक्की भेट देऊ यज्ञकर्म ला.
22 Nov 2008 - 12:36 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद मृदगंध..
जमवाच पुण्याला येण्याचे. पुन्हा पुन्हा याल यज्ञकर्मसाठी.
22 Nov 2008 - 2:58 pm | जयवी
पेठकर काका......अभिनंदन हो :)
"यज्ञकर्म " नाव एकदम आवडेश :) नक्की भेट देऊ.
22 Nov 2008 - 3:49 pm | उदय ४२
पेठ्कर काका,
नव्या उपक्रमास पोटापासून शुभेच्छा!उदरभरण ..आणि यज्ञकर्मासाठी नक्की येणार!
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
22 Nov 2008 - 11:57 pm | प्रभाकर पेठकर
जयवी आणि उदय ४२,
धन्यवाद.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
23 Nov 2008 - 1:13 am | राम दादा
पेठकररांव आमच्या तुम्हाला आणि यज्ञकर्म ला हार्दिक शुभेच्छा...
बाकी पुण्याला येण्याचा योग जर आला तर...आपण नक्की येणार यज्ञकर्मची चव चाखायला..
आपला शुभेच्छुक ...
राम दादा.
23 Nov 2008 - 11:56 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद..जरूर या. आपलं स्वागत आहे.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
24 Nov 2008 - 12:06 am | व्यंकु
पेठकर काकांच्या हॉटेलास अनेक शुभेच्छा
24 Nov 2008 - 4:37 am | वेदनयन
पेठकरकाका, मात्रुभुमीत परतल्यावर तुमच्या उपहारगॄहात प्रथम तीनदा येणार (कारण तुम्ही येण्याचे तीन मार्ग दिलेत). योग्य मार्ग सापडल्यावर मग मात्र खाते उघडणार; आधी ऍडवान्स देणार बर का.
शुभेच्छा! शुभेच्छा!! शुभेच्छा!!!
पुणेकर नाही पण लवकरच पुण्यात स्थायिक होण्याचा विचार आहे.
24 Nov 2008 - 9:31 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद व्यंकू आणि वेदनयन,
अगत्य येणे करावे हि नम्र विनंती.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!