गोष्ट तशी ८ वर्षापुर्वीची. मी B.E. II year मध्ये होतो. माझा मित्र विजय , शेंडी लावण्यात तरबेज. डोक्यानी थोडे मंद असे २-४ लोक शोधायचे आणि त्यांची मजा घ्यायची, त्याचा हा नेहमीचा टाईमपास.
डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या सुनामीत अडकलेल्या एका जहाजेवर २००६ साली पोसायडन नावाचा सिनेमा आला होता. विजय आणि इतर काही मित्र सोबत रात्री ६-९ चा शो पाहून आलो. होस्टेल च्या खिडकीतून माझ्या रूम वरून मी बघितले तर विजय ४-५ मित्रांना सोबत घेऊन काही सांगत होता. मागे याच चौघांना मी विजयला चक्क "आर्नोल्ड श्वार्झनेगर हा रोबोटिक्स मध्ये मोठे शोध लावणारा न्यूरोसर्जन आहे" आणि "याहू हि कंपनी भारताच्या मालकीची असून ती शम्मी कपूर चा पुतण्या चालवतो" असल्या थापा मारताना ऐकले होते.
विजय मित्रांसमोर सिनेमाची स्टोरी सांगत होता "भारतीय तत्वज्ञानावर या पेक्षा कठीण पाश्चात्य चित्रपट शोधून सापडणार नाही. एका जहाजात जहाजातून प्रवास करत असताना मोठी सुनामी येऊन त्यांची जहाज उलटते. आता भर रात्री समुद्रात आधीच लाटा वेगात असताना जहाज अचानक उलटली तर सर्वांचे मरण निश्चित होते. परंतु अनेक भाषांचा जाणकार असलेल्या सिनेमाच्या हिरोला अत्यंत विलक्षण संयोगाने ज्ञानेश्वरांचे बंगाली भाषेतील पसायदान हाती पडते. पोसायडन हा त्याचा बंगाली अपभ्रंश. हिरो हा इतिहासाचा अभ्यास्कर्ता असल्याने त्याच्या ते लगेच लक्षात येते. आता या बुडत्या जहाजातून वाचण्याचा काही उपाय नाही, तेव्हा पाश्चात्य गोष्टींचा क्षणभंगुरपणा लक्षात घेऊन परमेश्वराला सिनेमाचा नायक शरण जातो, आणि पसायदान वाचणे सुरु करतो. पसयादानाशी एकरूप झालेला हिरो हा प्रत्येक ओळ स्वत: वाचत जहाजावरील सर्व लोकांना अर्थ समजावून देत असतो. जहाजावर असलेल्या सर्वांवर आता कमरेपर्यंत आलेले पाणी आता मरणाच्या दाढेत ढकलत असते. आता आयुष्याचे मोजके क्षण राहिले असे वाटत असतानाच, या पसायदानाच्या शेवटी तुकारामांचे काही अभंग येतात..... आणि अचानक चमत्कार ... ज्याप्रमाणे तुकारामांचे अभंग बुडत्या इंद्रयाणीतून परत आले, त्याचप्रमाणे या बंगाली पोसायडनाच्या कृपेने बुडती जहाज आपोआप पाण्यावर येते."
इंग्रजी चित्रपटाच्या कधीही मागे न जाणारे ते माझे भोळे मित्र, आपण परत मूर्ख तर नाही बनवल्या जात आहो या शंकेने माझ्या कडे पहात होते. मी हासू न थांबवता आल्याने होस्टेलच्या रूम मध्ये धावत पळालो.
टीप: माझा misalpav वरील पहिलाच लेख असून, लेखनात काही चूक झाली असल्यास क्षमस्व.
प्रतिक्रिया
30 Nov 2014 - 12:37 am | खटपट्या
मिसळ्पाववर स्वागत !!
काहीच चूक झालेली नाही.
भन्नाट कीस्सा !!
30 Nov 2014 - 2:13 am | मुक्त विहारि
आवडला हा पण किस्सा..
30 Nov 2014 - 7:34 am | श्रीरंग_जोशी
भन्नाट आहे हा किस्सा.
30 Nov 2014 - 7:38 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भन्नाट...येऊ द्या अजुन असे किस्से.
बाकी बंगाली पोसायदान =))
30 Nov 2014 - 7:55 am | स्वप्नज
मस्तय किस्सा. पसायदान-पोसायदान..तुमचा मित्र हुशार आहे..
येऊ देत अजून किस्से
30 Nov 2014 - 7:56 am | जेपी
भन्नाट किस्सा...
30 Nov 2014 - 9:55 am | बहुगुणी
थोडासा अवांतर तपशीलातला खुलासा:
हा चित्रपट मूळच्या The Poseidon Adventure या १९६९ सालच्या कादंबरीवर आधारित आतापर्यंतच्या चित्रपटांपैकी ४था चित्रपट. यातला १९७२ चा The Poseidon Adventure हा disaster films या प्रकारातला एक नावाजलेला सिनेमा. थरारक चित्रपटांची आवड असलेल्यांनी (Tora! Tora! Tora!, Airport, Earthquake आणि Towering Inferno या त्याच दशकातील इतर चित्रपटांच्या पठडीतला)हा चित्रपट जरूर पहावा.
30 Nov 2014 - 10:03 am | संचित
मी बघतो आणि माझ्या मित्रालाही पाहायला सांगतो. बघूया त्यावरही काही किस्सा बनला तर..... *pardon* *PARDON* =]
30 Nov 2014 - 10:07 am | संचित
प्रतिक्रीयान्बद्दल धन्यवाद.
मूवी, जेपी आपले लेख\प्रतिक्रिया नियमित वाचतो. इथे आपल्या प्रतिक्रिया पाहून छान वाटले.
30 Nov 2014 - 10:57 am | टवाळ कार्टा
=))
=))
=))
30 Nov 2014 - 12:13 pm | शरद
मस्त. आता बंगालीसारखाच इतर भाषांतील किस्से यावेत.
शरद
30 Nov 2014 - 12:24 pm | बोका-ए-आझम
मस्त किस्सा! अशीच आमच्या प्रोफेसरांनी जयहिंद काॅलेजमधल्या फाडफाड इंग्लिश आणि धाडधाड अज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची मापं काढली होती. त्यांनी सांगितलं की विल्यम शेक्सपिअर हा खरा तामिळ ब्राम्हण. त्याचं खरं नाव वामन शेषप्पा अय्यर आणि त्याची बायको मूळची अम्मा हट्टंगडी. ती तिकडे जाऊन अॅन हॅथवे झाली.
त्यांनी सांगितलेला अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे वेस्ट इंडीजचा विकेटकीपर डेरेक मरे निवृत्त झाला आणि त्याच्या ठिकाणी जेफ दुजाँ आला. हे रामदासस्वामींनी ३०० वर्षे आधी लिहून ठेवलं आहे दासबोधात - मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे!
30 Nov 2014 - 12:58 pm | संचित
डेरेक मरे आणि शेक्सपियर दोन्ही मस्त...
अशीच एक अजून थाप: इंग्लंड चे राजपरीवार हे मुळात भारतीय आहे, म्हणून तर ते कुळ पाहून लग्न करतात, त्या सर्वांचा एकच family business असतो, आणि त्यांचे arrange marriage होते.
30 Nov 2014 - 1:00 pm | टवाळ कार्टा
=))
1 Dec 2014 - 6:07 pm | बॅटमॅन
मरे आणि दुजाँ चा किस्सा कहर खतरनाक आहे. =))
30 Nov 2014 - 1:07 pm | बोका-ए-आझम
अजून एक भन्नाट किस्सा म्हणजे महाभारतातील अर्जुनाचा वाढदिवस ४ जूनला असतो कारण भगवद्गीतेत स्वत: श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलेले आहे - बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!
30 Nov 2014 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा
@व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!>>> =))))))
1 Dec 2014 - 12:46 am | सूड
अशाच टाईपचा पुत्रकामेष्टि पूर्वी का करत असत त्याचा संदर्भ सांगणारा एक जोक आहे.
3 Dec 2014 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले
सांगा की मग
1 Dec 2014 - 10:39 am | योगी९००
हा हा हा... भन्नाट किस्सा....पसायदान .....!!!
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!..!!
यावर वि.आ बुवांनी आवाज मासिकात (गंमत म्हणून) अशी टिप्पणी केली होती..
क्रुष्ण अर्जूनाला म्हणतो " बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!..!!" = म्हणजे मी खुप मे महिने पाहीले आहेत आणि तुझा जन्म चार जुनचा असल्याने तुझ्या जन्मवर्षातला मे महिनाही तुझ्या नशिबी आला नाही.
वि.आ.बुवांनी त्याच आवाज मासिकात "असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय" चा अर्थ असा गंमतीशीर लावला होता..
" माझी आई घरात आहे. तुझी आई ज्योतीकडे गेली. मृतात्म्यांची आई अमृत प्यायला गेली.."
@बोका-ए-आझम : शेक्सपियर आणि दुजा-मरे मस्तच....
30 Nov 2014 - 2:31 pm | बॅटमॅन
अगायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =))
अतीव आनंद झाला हा किस्सा वाचून. =))
30 Nov 2014 - 3:21 pm | स्पंदना
शेंडी लावू !!!
आयला खरच!! दुनिया झुकती है!! झुकानेवाला चाहिये!!
30 Nov 2014 - 5:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
लय भारी किस्सा ! *ok*
मिपावर स्वागत. असेच लिहीत रहा.
30 Nov 2014 - 7:31 pm | स्पा
रोफ्ल
भन्नाट सीन =))
1 Dec 2014 - 12:01 am | Targat Porga
शम्मी कपूर चा पुतण्या .. :-D
1 Dec 2014 - 8:47 am | नाखु
मजेदार आणि उस्फुर्त प्रतीसाद फुलांनी रांगोळी छान सजली आहे.
तमसो$मा ज्योतीर्गमयः = तुझी आई ज्योतीबाला जाते.
विद्वान स्रवत्र पूज्यते = विद्वानांची किंमत जगात शून्य (मराठी पूज्य) आहे
3 Dec 2014 - 4:24 pm | इरसाल
तमसो$मा ज्योतीर्गमयः = तु झोप आई मी ज्योतीकडे जातो.
1 Dec 2014 - 10:58 am | झकासराव
हाहाहाहाहा :)
1 Dec 2014 - 11:30 am | चिगो
भन्नाट किस्सा.. प्रतिसादात आलेले इतर किस्सेपण जबराट..
1 Dec 2014 - 11:35 am | अजया
=))
1 Dec 2014 - 11:54 am | आतिवास
:-)
'पसायदान' चं 'पोसायडान'!!
1 Dec 2014 - 1:45 pm | विजुभाऊ
आत्मा म्हणजे अॅटम.
आत्म्याचा नियमः आत्मा नष्ट होत नाही. तो निर्माण करता येत नाही. मात्र एका रूपातून तो दुसर्या रुपात जन्म घेत असतो
उर्जेच्या अविनाषत्वाचा नियम :उर्जा नष्ट होत नाही ती निर्माण करता येत नाही एका प्रकारच्या उर्जेचे रुपांतर दुसर्या प्रकारच्या उर्जेत होते.
1 Dec 2014 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले
हसुन हसुन पुरेवाट झाली =))))
संच्या , स्वागत रे मिपावर !
अजुन एका "पात्रं" आलं मिपावर ह्याचा लॉय ऑनंदो झॉला :))
:)
2 Dec 2014 - 2:32 am | पहाटवारा
मस्त किस्सा ..
यावरुन अस्मादिकांचा मराठि शाळा ईयत्ता २ री तुकडि अ मधला अभीनव शोध आठवला.
शाळेत 'अती तेथे माती' चा अर्थ विचारल्यावर - 'जमीनीमधे जितके जास्त खणत जावे, तितकी मातीच माती मिळते' असा लावला होता :)
अवांतर : हा किस्सा माहितगारांच्या म्हणींच्या धाग्यावर द्ययचा होता ..पण त्यांच्या धमकीमूळे देता आला नाहि.
-पहाटवारा
2 Dec 2014 - 4:50 am | निनाद मुक्काम प...
इंग्लिश राजघराणे हे भारतीय आहेत हा विनोद येथे उत्पन्न झाला ,
बाकी असे किस्से भन्नाट असतात.
2 Dec 2014 - 8:30 pm | आनन्दिता
बोरीक अॅसिड आंबट बोरांपासुन बनवलेलं असतं!
2 Dec 2014 - 8:45 pm | बोका-ए-आझम
हा एक प्रत्यक्षात घडलेला किस्सा! आमची एक हुशार विद्यार्थिनी आहे जान्हवी विंची नावाची. तिच्याबद्दल असा गैरसमज कोणीतरी पसरवला होता की ती लिओनार्डो दा विंचीची
खापर खापर खापर खापर पणती आहे आणि भारतात आल्यावर त्यांनी आपलं आडनाव बदलून विंची केलं. लोकांनी त्या बिचारीला हैराण करुन सोडलं!
2 Dec 2014 - 11:57 pm | बॅटमॅन
विंची =)) =)) =))
3 Dec 2014 - 12:01 pm | योगी९००
"दा विंची कोड" हा चित्रपट पंजाबमध्ये सुरुवातीला बिलकूल चालला नाही. पण एका कल्पक थेटरवाल्याने चित्रपटाचे नाव "विंची दा कोड" असे केले आणि त्याच्या थेटरवर चित्रपट पहायला तोबा गर्दी झाली असे ऐकले.
3 Dec 2014 - 1:00 pm | टवाळ कार्टा
=))
3 Dec 2014 - 1:46 pm | बॅटमॅन
=))
3 Dec 2014 - 3:19 pm | बोका-ए-आझम
ROFL! :)
3 Dec 2014 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
काहीही... ही...ही...ही...
3 Dec 2014 - 1:56 pm | अजया
बोक्या =)) कहर किस्से =))
3 Dec 2014 - 3:28 pm | प्रसाद१९७१
अवांतर - तुम्ही वर जी २ उदाहरणे दिली आहेत(याहू आणि अर्नॉल्ड्ची ), ती वाचुन हे डोक्यानी मंद लोक भावी इंजिनीयर आहेत हे वाचून भारताची प्रचंड काळजी वाटू लागली.
3 Dec 2014 - 3:42 pm | बॅटमॅन
वरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर म्हणून रोफलल्या गेले आहे.
3 Dec 2014 - 4:01 pm | प्रसाद१९७१
काही कळले नाही. रोफलल्या म्हणजे काय? का हे माहीती नसणे माझ्या मंद बुद्धीचे लक्षण आहे?
3 Dec 2014 - 4:06 pm | टवाळ कार्टा
र्ऑफ्ळ
3 Dec 2014 - 4:06 pm | टवाळ कार्टा
रोफ्ल
4 Dec 2014 - 8:53 am | खटपट्या
लोळ !!
3 Dec 2014 - 8:26 pm | श्रीरंग_जोशी
{
मस्तं रे बॅटेशा, पण पीठावर का बरे लोळतोस?
- ताईसाहेब फुरसुंगीकर
}
4 Dec 2014 - 11:28 am | बॅटमॅन
ही ही ही ;)
3 Dec 2014 - 4:00 pm | साती
भारीच आहे हे न्यॉनेश्वरांचे पोसॉयदॉन.
4 Dec 2014 - 10:40 am | सुनील
संस्कृतचे शिक्षक - अर्थ सांगा - एषा: मम हस्ता:
विद्यार्थी - येशा मला हसतो.
-- (सारे प्रवासी घडीचे - जयवंत दळवी)
5 Dec 2014 - 12:57 pm | अद्द्या
माझी लहान बहिण ७-८ वर्षाची असतानाचा किस्सा आहे . .
माझा एक मामा वारला होता . तिसरा दिवस होता . . नेहमी दंगा करणारे आम्ही शांत पाने मोठे सांगतील ते करत होतो . . कारण हा मामा आमच्यात बसून दंगा करणार्यांपैकी होता . .
तर . जवळच्याच देवळात ज्ञानेश्वरी पारायण चाललं होतं . आणि दुपारी जेवणाच्या आधी . ३-४ अभंग म्हणून तिथले बुवा शेवटी . . ज्ञानदेव तुकाराम . . चा जप करू लागले . . आणि तेव्हाच . हि लहान शी मुलगी जी आत्तापर्यंत एक शब्द न काढता गप्प जेवत होती . .एक्दम म्हणाली . . "दादा तुकारामाला ज्ञानदेव का म्हणतात हे लोक? त्यांना सगळं माहिती होतं म्हणून? "
8 Dec 2014 - 12:59 pm | योगी९००
वरील किस्सा चांगला आहे पण मध्येच मामा वारला होता वगैरे संदर्भ अनावश्यक वाटतो.
5 Dec 2014 - 3:28 pm | टिलू
एका पुस्तकात असेच पु.ल. लोकांना गंडवत असतात - इटली हा मूळ 'विठ्ठली' देश होता आणि 'विठूकान्ह' वरुन Vatican City बनले आहे !!
5 Dec 2014 - 3:41 pm | अनुप ढेरे
कॅस्पियन = काश्यपियन, रशिया = ऋषिय्य आणि ख्रिस्त = कृष्ण असही सांगताना लोकांना ऐकलं आहे.
5 Dec 2014 - 4:32 pm | राजाभाउ
शाळेत असताना एकदा सरांनी एकाच्या पेपर मधुन उत्तर वाचुन दाखवले होते. असा त्याचा जाहीर पंचनामा करणे क्रुरच होत पण तेन्व्हा तसे काही वाटले नव्ह्ते, तर प्रश्न असा होता कि "दोलकाचा दोलनकाल हा लांबीवर अवलंबुन असतो हे सिद्ध करा" त्या वर उत्तर हे होते
दोलक हि एक द्विबिजपत्री वनस्पति आहे, तिला सुचिपर्णि व्रुक्षा सारखि पाने असतात व तीला हात लावला तर पाने टोचतात. त्याचे खोड जाड असते. त्यावर हत्याने घाव घातले असता त्याल जखमा होतात. त्यावर आयोडीन लावले असता जखमा भरुन येतात. आयोडीन हा एक संप्लवनशील पदार्थ आहे म्हणुन दोलकाचा दोलनकाल हा लांबीवर अवलंबुन असतो
8 Dec 2014 - 8:16 pm | शलभ
:D
5 Dec 2014 - 7:20 pm | चुकलामाकला
शाळेत असताना परिक्षेत "होमी भाभा" वर टिप लिहायची होती. कुणीतरी लिहिले," होमी भाभा डबक्यात रहातो. त्याच्यामुळे पोट बिघडते. त्याचा आकार सतत बदलतो. तो एकपेशीय प्राणी आहे."
बिचार्याने होमी भाभा" आणि अमिबा यात गफलत केली होती.:):)
5 Dec 2014 - 9:37 pm | राघवेंद्र
एकदम मस्त