हवा हवाई

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
2 Aug 2014 - 11:18 pm

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर
अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो.

खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो. काहितरी अघटित घडले असावे असे समजुन प्रेक्षक आपल्या खुर्चीवर अधिक सावधान होवुन संपूर्ण लक्ष पडद्यावर लावुन बसतात.

दिग्दर्शक अमोल गुप्ते 'तारे जमीं पर' व 'स्टॅनले का डिब्बा' सारखे उत्कॄष्ट बालचित्रपट दिल्यानंतर परत एकदा खुप चांगला विषय, खुप मोठ्ठे प्रश्न सहजगत्या आपल्यासमोर मांडतांना दिसतात व सर्व लहानथोर प्रेक्षकांना खुष तर नक्किच करतात.

कितना बडा नाम है तुम्हारा? असे विचारुन भट्ट टी स्टॉलचा मालक १२ वर्षाच्या अर्जुनला प्रश्न विचारत,मजा करत त्याचे टोपण नाव 'राजू' ठेवुन बान्द्राकुर्ला कॉम्प्लेक्स पार्कींगजवळ्च्या त्याच्या चहाच्या दुकानावर कामास ठेवून घेतो. अर्जून त्याच्या आईला(नेहा जोशी) प्रेमाने समजवतो की हे सर्व जमेल व तेही मी आनंदाने करेल.

मग सुरु होतो अर्जुनच्या कामावरचा पहिला दिवस! गरम गरम चहाचे ग्लास उचलता उचलता हाताला चटके बसतात पण दिवसभर काम करुन न थकता अर्जुन संध्याकाळी घरी जायला निघू का? विचारतो. पण दुकान मालक त्याला सांगतो कि अभि रुक जरा! कुछ लोग आनेवाले है.

रात्र झाल्यावर पार्कींग मध्ये फ्लड लाईट्स लागतात व एक एक कार्/रिक्षा/स्कुटर येवु लागतात. त्यातुन ५ वर्षापासुन १८ वर्षापर्यंतचे लहान मुलेमुली आपल्या आई,वडीलांसोबत किंवा कार ड्रायव्हर सोबत भारी कपड्यात, हातात चॉकोलेट/शितपेये किंवा बर्गर घेवुन व पायात स्केटींगचे शूज घेवुन येतात, तेव्हा जीवनात किती मोठा विरोधाभास आहे ह्याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहात नाही.

लक्की उर्फ अनिकेत भार्गव(साकिब सलीम)ह्या स्केटिंगच्या ट्रेनरला चहा देत देत अर्जुन त्याला वाटणारे स्केटींगचे शूजचे आकर्षण कायम ठेवून स्केटींग करणार्या मुलांचे निरिक्षण करता करता एक धडा मनातल्या मनात गिरवत जातो.
मग खरा चित्रपट सुरु होतो!

गरीब परिस्थिती बघता अर्जुन एवढ्या महागड्या स्केटस घेवु शकेल?

त्याला कोण मदतीला धावुन येतात?

त्याचे स्वप्न पुर्ण होते का?

प्रत्येक आजोबांनी आपल्या नातवासोबत, प्रत्येक माता पित्यांनी आपल्या मुलांसोबत पहावा, प्रत्येक गुरुलाही खुप काही शिकायला मिळेल असा हा उत्कॄष्ट चित्रपट आहे.

पहाच एकदा, मग परत बोलू या विषयावर!

हवा हवाई ट्रेलर!

बालकथाजीवनमानचित्रपटआस्वादशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

छान लिहीत होता की हो, अजून लिहायला हवे असे वाटले पण सिनेमा चांगला असणार हे नक्की! मला मिळालाय पण बघणे जमलेले नाही. अजून दोनेक महिन्यात बघेन. धन्यवाद!

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 11:35 pm | कवितानागेश

इन्टरेस्टिन्ग.

मदनबाण's picture

3 Aug 2014 - 9:45 am | मदनबाण

ह्म्म...
हवा हवाई म्हंटल्यावर मला बॉ श्री देवीच्या मिस्टर इंडिया मधल्या गाण्यावर काही लिहलय का अस वाटल होत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

'Hawaa Hawaai' wins best film at Schlingel Film Festival Germany
Mumbai: Bollywood film ‘Hawaa Hawaai’ has won the top award for Best Film at the 19th Schlingel Film Festival Oct, 2014 in Chemnitz, Germany in the junior film category. There was a total of 136 films from 40 countries competing for the award.

The Amol Gupte-directed film featured his son Partho and actor Saquib Salim in the lead roles. Saqib played the role of a skating coach to Partho's character. The film was a hit among youngsters and was received very well by the critics.

On wining the prestigious award director Amole Gupte said, "I am so thankful to this learned jury for recognising the art and the intent in the making of Hawaa hawaai. This top honour puts the film on a very special shelf of cinema."

एस's picture

31 Oct 2014 - 6:00 pm | एस

'हवा हवाई' च्या संपूर्ण टीमला एकतर धन्यवाद इतका वेगळा, छान विषय मांडल्याबद्दल आणि ह्या पुरस्काराबद्दल अभिनंदनदेखील!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2014 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त बातमी !

हवा हवाईच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन !!!